Maharashtra Breaking Marathi News Live : चंद्रपूर जिल्ह्यात वीज पडून एकाचा मृ्त्यू; अवकाळी पावसामुळे नुकसान

| Updated on: Apr 23, 2023 | 7:07 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : राजकारण, समाजकारणासह विविध क्षेत्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking Marathi News Live :  चंद्रपूर जिल्ह्यात वीज पडून एकाचा मृ्त्यू; अवकाळी पावसामुळे नुकसान
Marathi News Live
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : आज देशभरात अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे. अक्षय तृतीये निमित्त सोने खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. ईद निमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण. दिल्लीच्या जामा मशिदीसह अनेक मशिदीत नमाजचं पठण. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना सीबीआयचं समन्स. काँग्रेस म्हणाली, हे तर होणारच होतं. काँग्रेस नेते राहुल गांधी आज आपला सरकारी बंगला खाली करणार. कल्याण डोंबिवलीत 48 तासात कोरोनाचे दोन बळी. भंडाऱ्याच्या लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पाच उमेदवार बिनविरोध विजयी. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 22 Apr 2023 11:52 PM (IST)

    आसरा देणाऱ्या मालकाची मोलकरणीने केली हत्या; पतीसह मुलालाही अटक

    मोलकरणीने मालकाची हत्या केली, मोलकरणी, पती आणि मुलाला अटक केली

    मुंबईतील मालाडमधील धक्कादायक घटना

    25 वर्षांपूर्वी एका अपंग मुलीला रेल्वे स्थानकावरून उचलून घरी आणणाऱ्या घरमालकाने तिचे पालनपोषण करून तिला दोन वेळची भाकरी दिली, पैशाच्या लालसेपोटी मोलकरणीने पती आणि मुलासह तिची हत्या केली

    मालाडमधील न्यू सिलिन बिल्डिंगमध्ये राहणारी 69 वर्षीय मारी सिलिन विल्फेड डिकोस्टा हिची 20 एप्रिल रोजी हत्या

    या घटनेनंतर मालाड पोलिसांनी 42 वर्षीय मोलकरीण शबनम प्रवीण उर्फ ​​मोहम्मद उमर शेख आणि तिचा पती आणि मुलाला अटक

  • 22 Apr 2023 11:28 PM (IST)

    सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांना कोरोनाची लागण

    नवी दिल्ली

    सर्वोच्च न्यायालयात पुन्हा कोरोनाची एन्ट्री

    सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांना कोरोनाची लागण

    सूत्रांनुसार, न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस, एस रवींद्र भट, जेबी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा या न्यायाधीशांना कोरोनाची लागण

    सध्या सर्वोच्च न्यायालयात वकील,पक्षकार, नागरिक यांना मास्क सक्ती


  • 22 Apr 2023 11:03 PM (IST)

    चंद्रपूर जिल्ह्यात वीज पडून एकाचा मृ्त्यू; अवकाळी पावसामुळे नुकसान

    चंद्रपूर

    चंद्रपूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटसह पाऊस

    जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील धानोलीपोहा येथे वीज पडून गुराख्याचा मृत्यू

    नवलाजी लडके (वय 40 ) असं मृतकाचं नाव,

    गुरं चारण्यासाठी गावाशेजारी गेलेला असताना आज दुपारी झालेल्या अवकाळी पावसात वीज पडून झाला मृत्यू

  • 22 Apr 2023 07:26 PM (IST)

    शेअर बाजाराला ठोकला अखेरचा रामराम

    इतके लाख गुंतवणूकदारांचा झाला मोहभंग

    अवघ्या 9 महिन्यांत काहींनी घेतला यू-टर्न

    बाजाराकडे पाठ फिरविण्याची काय आहेत कारणं

    नेमकं असा काय झाला बदल, केला अखेरचा दंडवत, वाचा बातमी 

  • 22 Apr 2023 07:01 PM (IST)

    नागपूर : महिलांवरील अत्याचाराविरोधात आंदोलन

    तोंडाला काळी पट्टी बांधून मुक आंदोलन

    सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांचे नेतृत्व

    महिला आणि पुरुषही आंदोलनात झाले सहभागी

  • 22 Apr 2023 06:57 PM (IST)

    अकोल्यात पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन

    धरणाचे पाणी तेल्हारा, अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळावे

    आमदार देशमुख यांच्या आंदोलनाच्या विरोधामध्ये आंदोलन

    धरणावर ग्रामस्थांनी धरणे आंदोलन सुरू केले

    या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे

    पाण्याचे राजकारण होत असल्याचा प्रकार

  • 22 Apr 2023 06:53 PM (IST)

    नांदेडमध्ये बालाजी कल्याण उत्सवाचे आयोजन

    नांदेडमध्ये बालाजी कल्याण उत्सवाचे आयोजन

    भगवान बालाजीचा विवाह सोहळा पाहण्यासाठी गर्दी

    तिरुपतीवरून बालाजी भगवंतांची मूर्ती आणण्यात आली

  • 22 Apr 2023 06:50 PM (IST)

    भंडारा जिल्ह्यात पावसाने झोडपले

    घरावरील सिमेंटचे पत्रे उडाले आहेत

    मोहाडीतील झेडपी शाळेतील झाड कोसळला

    100 वर्षाचा कडूलिंबाचा झाड कोसळला

  • 22 Apr 2023 06:27 PM (IST)

    100 रुपयांचं खास नाणं लवकरच बाजारात

    केंद्र सरकार आणणार शंभर रुपयांचा कलदार

    या दिवशी येणार बाजारात नवीन नाणं

    काय खास असेल या नाण्यात

    कशा निमित्त हे नाणं घेऊन येत आहे केंद्र सरकार

    ‘मन की बात’ शी असा आहे थेट संबंध,  बातमी एका क्लिकवर

  • 22 Apr 2023 06:06 PM (IST)

    श्री गणेश आणि देवी शारदा यांचा शारदेश मंगलम् विवाह सोहळा थाटात संपन्न

    श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे सोहळ्याचे आयोजन

    श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात थाटात पार पडला सोहळा

  • 22 Apr 2023 06:05 PM (IST)

    भंडारा जिल्ह्याला पावसाने चांगलं झोडपलं

    घरावरील सिमेंटचे पत्रे उडाले

    मोहाडी शहरातील जिल्हा परिषद शाळेतील 100 वर्ष जुने झाड कोसळले

    एका घरावर झाड कोसळलं

  • 22 Apr 2023 06:03 PM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यात पुन्हा अवकाळी पाऊस

    मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

    देसाईगंज तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस आणि मेघगर्जनेसह वादळी पाऊस

    अवकाळी पावसामुळे भाजीपाला आणि कठाण पिकांचे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होण्याचे अंदाज

    गडचिरोली जिल्ह्यात अजून दोन दिवस अवकाळी पाऊस आणि मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

  • 22 Apr 2023 06:01 PM (IST)

    अनिल परब 

    वज्रमूठ सभेच्या पूर्व नियोजनासाठी तिन्ही पक्षाचे मुख्य नेते उपस्थित होते

    कोणतही गालबोट लागणार नाही, याची काळजी घ्यायची आहे

    पोलिसांनी बोलणं झालं आहे

    पार्किंग व्यवस्बथेद्दल नियोजन झालं आहे

    सगळ्या परवानग्या मिळतील

    आता ग्राउंडची परवानगी मिळाली आहे

  • 22 Apr 2023 05:58 PM (IST)

    गोंदियात विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची पुन्हा हजेरी

    वातावरणात गारवा निर्माण झालाय

    वादळी वाऱ्याने आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार

  • 22 Apr 2023 05:55 PM (IST)

    शाहरुख खानच्या घराबाहेर सौम्य लाठीचार्ज

    ईदच्या मुहूर्तावर शाहरुख खानला पाहण्यासाठी हजारो चाहते अचानक रस्त्यावर आले

    पोलिसांनी त्यांना हटवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला

    यावेळी शाहरुख खानला पाहण्यासाठी मन्नतच्या बाहेर मोठ्या संख्येने चाहते जमा झाले आहेत

    मन्नतसमोर उभे राहून शाहरुख खानचे चाहते जोरजोरात ओरडत आहेत

    पोलrस गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असताना लोकांची दमछाक सुरू आहे

  • 22 Apr 2023 05:33 PM (IST)

    शुद्ध सोन्याची सरकारकडून करा खरेदी

    सोने-चांदीची अस्सल नाणी मिळतील

    मोठ्या शहरातील ग्राहकांना थेट जाऊन खरेदी करता येतील

    तर देशातील ग्राहकांना ऑनलाईन नाणी खरेदीची संधी

    शुद्ध सोन्याची अशी करता येईल खरेदी, वाचा बातमी 

  • 22 Apr 2023 05:26 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस यांची जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर टीका

    रामनवमी आणि हनुमान जयंती दंगलीसाठी साजरी करत नाहीत.  लोकांच्या मनात राम आणि हनुमानाबद्दल श्रद्धा आहे.

    महाराष्ट्रात येणा-या काळात दंगली होतील असं वक्तव्य करणं याचा अर्थ दंगली घडवायचा असा आहे का?. नेत्यांनी संवेदनशीलपणे बोलायला हवं. सनसनाटी निर्माण करणं योग्य नाही.

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका

  • 22 Apr 2023 05:11 PM (IST)

    नागपुरात झालेल्या अवकाळी पावसाने पोलीस ठाण्याच्या नामफलकाचे नुकसान

    नागपूर विमानतळ परिसरात सोनेगाव पोलीस ठाण्याचे नामफलक वादळी वाऱ्याने पडले

    या भागात झाडे सुद्धा मोठ्या प्रमाणात उन्मळून पडली

    लगेचच या ठिकाणचे पडलेली झाडे उचलण्यात आली

     

  • 22 Apr 2023 05:10 PM (IST)

    रेणुका मातेच्या मूर्तीला अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आंब्याची आरास

    नांदेडच्या तीर्थक्षेत्र माहुरगडावर रेणुका मातेच्या मूर्तीला अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आकर्षक अशी आंब्याची आरास करण्यात आली आहे.

    आंब्याचे डहाळे आणि आंब्याचा वापर केलेल्या या आकर्षक आरास मुळे रेणुका मातेचे रूप आणखीन आकर्षक दिसतंय.

    सलग आलेल्या सुट्ट्यामुळे भाविकांनी देखील माहूर गडावर गर्दी केली आहे.

  • 22 Apr 2023 05:09 PM (IST)

    गडचिरोलीत वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात

    सकाळपासून होता गारवा

    ढगांच्या गडगडाटसह पावसाला सुरुवात

    काल रात्री उशिरा वादळ वाऱ्यासह पाऊस

     

  • 22 Apr 2023 04:38 PM (IST)

    ईद निमित्त शाहरुख खानला पाहण्यासाठी चाहत्यांची मन्नत बाहेर प्रचंड गर्दी

    ईद निमित्त बॉलिवूडचे किंग खान शाहरुख खानला पाहण्यासाठी चाहत्यांनी मन्नत बाहेर प्रचंड गर्दी केली आहे.

    दरवर्षी ईदच्या निमित्ताने चाहते शाहरुख खानच्या एका झलकची आतुरतेने वाट पाहत असतात. आजही शाहरुख खानच्या घराबाहेर चाहते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

    शाहरुख खानच्या चाहत्यांची वाढती संख्या पाहून मन्नतच्या बाहेर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

    लोकांना समुद्रकिनारी मन्नतपासून दूर ठेवण्यात आले आहे, जेणेकरून रस्त्यावर गर्दी होऊ नये,

    शाहरुख खानवर प्रेम करणारे त्याचे चाहते म्हणतात की जोपर्यंत शाहरुख खान ईदच्या निमित्ताने दिसत नाही तोपर्यंत आमची ईद अपूर्ण राहते.

    शाहरुख खानला पाहिल्यानंतर हे चाहते म्हणतात “हमारा चांद नजर आ गया”

  • 22 Apr 2023 04:37 PM (IST)

    या मेटल स्टॉकने केले मालामाल

    दीर्घकालीन गुंतवणूक ठरली फायद्याची

    500 टक्क्यांहून अधिकचा मिळाला परतावा

    1 लाखांचे तीनच वर्षांत झाले 6 लाख

    मेटल कंपनीमुळे गुंतवणूकदारांची बल्ले बल्ले, वाचा बातमी 

  • 22 Apr 2023 03:54 PM (IST)

    यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे वेडसर व्यक्तीकडून मशीदीसमोर नारेबाजी केल्याने शहरात काही काळ तणाव

    पोलिसांनी बंदोबस्त तैनात करत परिस्थिती आणली नियंत्रणात

    आज दारव्हा शहरातील जामा मशीद समोर एका वेडसर व्यक्तीने नारेबाजी केल्याने परिसरात खळबळ उडाली होती

  • 22 Apr 2023 03:49 PM (IST)

    अक्षय्य तृतीये निमीत्त सोन्याच्या दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी

    सोन्याचे भाव वधारले तरीही ग्राहकांचा खरेदीकडे कल

    अनेक ग्राहकांनी प्रिबुकींग सेवेचा घेतला लाभ

    मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा नऊ हजारांनी भाववाढ

  • 22 Apr 2023 03:41 PM (IST)

    पुणे- खराडीतील ऑईल पेंट कंपनीला लागली आग

    आगीचं कारण अद्याप अस्पष्ट

    अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतायेत

    सात गाड्यांकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले जातायेत

  • 22 Apr 2023 03:31 PM (IST)

    नंदूरबार- तळोदा तालुक्यात पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा…

    तळोदा तालुक्यातील रामपूर परिसरात जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपीट…

    अवकाळी पाऊस आणि गारपीट मुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होण्याचे अंदाज….

    जिल्ह्यात अजून दोन दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता….

  • 22 Apr 2023 03:28 PM (IST)

    चंद्रपुरात भर दुपारी  मुसळधार पाऊस..

    मुसळधार पावसाच्या सरींनी चंद्रपूरकरांना चिंब भिजवलं..

    काल रात्री जोरदार वादळ स्थिती असताना नागरिकांची उडाली होती धांदल

    मात्र आज सकाळपासून पुन्हा एकदा तापमान वाढीस लागले असताना दुपारी अचानक काळ्या ढगांची गर्दी होत पावसाला सुरुवात

     

  • 22 Apr 2023 03:21 PM (IST)

    नागपूर- नागपुरात अवकाळी पावसाला सुरुवात

    सकाळपासून होता वातावरनात गारवा

    आता ढगाळ वातावरण झाले असून ढगांच्या गडगडाटसह पावसाला सुरुवात

     

  • 22 Apr 2023 03:17 PM (IST)

    माझगाव न्यायालयाच्या वातानुकूलित इमारतीचे लोकार्पण

    मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन

    17 मजली इमारतीमध्ये वाचनालय, कॉन्फरन्स हॉल, साक्षीदार कक्ष, महिला आणि पुरुष वकिलांसाठी स्वतंत्र कक्ष आदी अद्ययावत सुविधांचा समावेश

     

  • 22 Apr 2023 03:08 PM (IST)

    अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत पुणेकरांची सोने खरेदीला मोठी गर्दी

    पुण्यातील सराफा बाजारात सोने खरेदी करण्यासाठी पुणेकरांनी केली गर्दी

    अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्त साधत सोयाच्या बाजारात होणार कोट्यावधींची उलाढाल

    पुणे शहरात सोन्याचा भाव ५९ हजारांच्या पार

  • 22 Apr 2023 02:48 PM (IST)

    वाशिम | शहरातील सार्वजनिक बांधकाम कार्यलयासमोर स्वीप्ट डिझायर गाडीने अचानक घेतला पेट

    गाडीने अचानक पेट घेतल्यामुळे संपूर्ण गाडी जळून खाक

    धक्कादायक घटनेत गाडीचं मोठं नुकसान झालं

    घटनेत सुदैवाने जीवीत हानी नाही

  • 22 Apr 2023 02:28 PM (IST)

    पुणे : खराडी, साईनाथ नगर येथे एका गोडाउनमध्ये भीषण आग

    अग्निशमन दलाकडून ७ वाहने घटनास्थळी रवाना

     

  • 22 Apr 2023 02:22 PM (IST)

    पनवेल | खारघर दुर्घटनेट फक्त दोन श्री सेवक उपचार घेत होते

    खारघर दुर्घटनेट फक्त दोन श्री सेवक उपचार घेत होते

    वाशीतील एमजीएम रुग्णालयात दोन श्री सेवक उपचार घेत होते

    या दोन श्री सेवकांनादेखील आज सोडण्यात आलं आहे

  • 22 Apr 2023 02:17 PM (IST)

    नवी दिल्ली | काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी यांनी निवासस्थान सोडलं

    निवासस्थानामधून साहित्य नेणारी शेवटची गाडी गेट बाहेर पडली

    गेल्या १९ वर्षांपासून राहुल गांधी यांचे वास्तव्य होतं तुघलक लेनवरच्या निवासस्थानी

    खासदारकी गेल्यानंतर लोकसभा सचिवालयाने दिलेल्या नोटिसीनुसार राहुल गांधी यांनी घर सोडले

    तुघलक लेन परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात

  • 22 Apr 2023 02:12 PM (IST)

    बंगळुरु | ‘कर्नाटकमध्ये काँग्रेसला बहुमत मिळेल…’ मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा

    कर्नाटक विधानसभा निवडणूक

    काँग्रेसमध्ये कोणतीही स्पर्धा नाही

    पूर्ण बहुमताने सरकार आणणे हाच आमचा उद्देश

    काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा

  • 22 Apr 2023 02:07 PM (IST)

    ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत यांना उष्माघाताचा त्रास

    उदसिंग राजपूत सिग्मा रुग्णालयात दाखल

    उदयसिंग राजपूत यांच्यावर आयसीयू विभागात उपचार सुरू

    उदयसिंग राजपूत हे कन्नडचे ठाकरे गटातील आमदार

  • 22 Apr 2023 02:01 PM (IST)

    Entertainment update : बॉक्स ऑफिसवर सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमा फेल

    Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सलमान खान फेल!

    पहिल्या दिवशी सिनेमाने कमावले फक्त इतकेच रुपये… वाचा सविस्तर

  • 22 Apr 2023 01:58 PM (IST)

    पक्षानं संधी दिल्यास पुणे लोकसभेची निवडणूक लढवणार

    पुणे : कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी मतं व्यक्त केलंय

    मेधा कुलकर्णी यांच्याजागी चंद्रकांत पाटलांना संधी देण्यात आली होती

    मेधा कुलकर्णी यांच्याकडे सध्या महिला आघाडीचं पदं देण्यात आलंय

    मात्र भाजपा मेधा कुलकर्णींच राजकीय पुनर्वसन करणार का ? ही चर्चा यानिमित्ताने होतीये

    पक्षानं संधी दिल्यास विचार करू असं खाजगीत कुलकर्णींनी मत व्यक्त केलंय

    टीव्ही 9 मराठीला सूत्रांची माहिती

  • 22 Apr 2023 01:50 PM (IST)

    लोक माझे सांगाती चा भाग दोन प्रकाशित होणार

    पुणे : मे चा पहिल्या आठवड्यात प्रकाशन

    २०१४ ते २०२३ पर्यंत चा काळा बाबत अनेक खुलासे

    धक्कादायक खुलासे होणार ?

    महाविकास आघाडी आणि पहाटेचा शपथविधी च रहस्य उलगडणार ?

    लोक माझे सांगाती शरद पवार यांचे आत्मचरित्र

  • 22 Apr 2023 01:42 PM (IST)

    फक्त खबरदारी म्हणून जेष्ठ नागरिक बूस्टर डोस घेऊ शकतात

    पुणे : आम्ही पाच ते सहा मिलियन म्हणजेच 50 ते 60 लाख डोसेसचा साठा स्टॉक करून ठेवला आहे

    सध्या लसीची मागणी कमी असून कोरोनाचे वेरियंट सुद्धा सौम्य आहेत

    येत्या दोन ते तीन महिन्यात कोरोना लसीच आम्ही उत्पादन वाढू

    कोवो वॅक्स ही भारतीय बनावटीची लस असून तिला अमेरिका आणि युरोपने देखील मान्यता दिली आहे

    आदर पूनावाला यांची माहिती

  • 22 Apr 2023 01:30 PM (IST)

    चालकाला अचानक भोवळ, पेट्रोल पंपावर भीषण अपघात

    पुणे : पुणे-सातारा महामार्गावरील पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी आलेल्या ट्रकने, डिझेल पंपला धडक देत उखडला पंप

    चालकाला अचानक भोवळ आल्याने, पुणे सातारा महामार्गावरच्या खेड शिवापूर हद्दीतील कोंडे देशमुख पेट्रोल पंपावर घडला प्रकार

    सुदैवाने जीवितहानी नाही, पेट्रोल पंपाच मात्र नुकसान

    पंपावरील कर्मचारी थोडक्यात बचावला

    डिझेल भरण्यासाठी थांबलेल्या चारचाकीलाही ट्रकची धडक

    घटनेचा सर्व थरार cctv मधे कैद

  • 22 Apr 2023 01:20 PM (IST)

    मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठि मराठा समाज आक्रमक

    पंढरपूर : केंद्र आणि राज्य सरकारचा पुतळा जाळून मराठा समाजा कडून राज्य सरकारचा निषेध

    सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली यात राज्य सरकार कमी पडल्याचा आरोप करत शिंदे फडणवीस यांच्या विरोधात घोषणा देवुन व्यक्त केला निषेध

    50 खोके एकदम ok अशाही घोषणा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिल्या

    छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजाचे आंदोलन

    लवकरात लवकर आरक्षण दिले नाही तर आषाढि यात्रेची शासकिय महापुजा मुख्यमंत्री यांना करू देणार नाही असा इशारा आंदोलन कर्त्यांनी दिला आहे.

  • 22 Apr 2023 01:10 PM (IST)

    आमदार खोसकर धमकी प्रकरणी मोठी अपडेट

    नाशिक : चुंबळे यांनी TV9 कडे दिली ऑडिओ रेकॉर्डिंग

    आमदार खोसकर खोटं बोलत असल्याचा चुंबळे पिता पुत्राचा आरोप

    ऑडिओ रेकॉर्डिंग मध्ये कुठेही धमकी अथवा शिवी नाही असा चुंबळे यांचा दावा

    आमदारांच्या आरोपा नंतर चुंबळे पिता पुत्र TV9 वर

  • 22 Apr 2023 01:02 PM (IST)

    जळगावात उध्दव ठाकरेंचे अवैध बॅनर पोलिसांनी हटविले

    जळगाव : उद्या उध्दव ठाकरेंची जळगाव मधील पाचोरा येथे सभा आहे.

    या सभेच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांच्या स्वागतार्ह कार्यकर्त्यांनी ठीक ठिकाणी बॅनर लावून जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते

    मात्र अवैध बॅनर वरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी पोलीस प्रशासनाने हटविले बॅनर

  • 22 Apr 2023 12:43 PM (IST)

    भारताबरोबर युद्धाची शक्यता, निवडणूक पुढे ढकला, पाकिस्तानची मागणी

    पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने पंजाब प्रांतात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवरून सर्वोच्च न्यायालयाकडे एक मागणी केली आहे.

    देशात राजकीय अस्थिरता आहे. दहशतवादी घटना वाढत आहेत. देश आर्थिक संकटात सापडला आहे. याचा फायदा भारत घेऊ शकतो.

    अशावेळी महत्त्वाच्या पंजाब प्रांतात निवडणूक घेतल्यास काही मुद्द्यांचा फायदा घेऊन भारत अस्थिरता निर्माण करू शकतो.

    त्यामुळे पंजाब प्रांतामधील निवडणूक पुढे घेण्यात यावी अशी मागणी पाकिस्तान सरकारने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात पाकिस्तान सरकारने अहवालही सादर केला आहे.

  • 22 Apr 2023 12:34 PM (IST)

    ‘दगडूशेठ’ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य

    अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला.

    ससूनमधील रुग्ण, वृद्धाश्रम, अनाथाश्रम तसेच गणेशभक्तांना हा आंब्याचा प्रसाद देण्यात येणार आहे.

    पुण्यातील आंब्यांचे व्यापारी देसाई बंधु यांच्यावतीने हा महानैवेद्य अर्पण करण्यात आला.

  • 22 Apr 2023 12:18 PM (IST)

    पुण्यात घरगुती गॅसचा काळाबाजार, दोघांना अटक, 60 सिलेंडर जप्त

    पुण्यातील राजगड पोलिसांनी घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे.

    पोलिसांनी त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपनीचे 60 सिलेंडर आणि 1 लाख 71 हजार 500 रुपयांचा माल जप्त केला आहे.

    लक्ष्मण अर्जुन गोडसे आणि प्रवीण रेवणसिद्ध शेळके अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

    घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधील गॅस काढून तो व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये भरून त्याची जादा दराने ते विक्री करत होते.

  • 22 Apr 2023 12:16 PM (IST)

    श्रीसदस्य उन्हात तडफडून मेले आणि हे आत श्रीखंड पुरी खात होते- संजय राऊत

    टाईट होऊन बाईट देणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका- संजय राऊत

    मी महाविकास आघाडिची वकिली करतो ईतर कुणाची नाही- संजय राऊत

    अजित पवारांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता- संजय राऊत

  • 22 Apr 2023 12:06 PM (IST)

    आमदार नितेश राणे यांना अटक करा, आंबेडकर चळवळीच्या नेत्याची मागणी

    नगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत व्यापाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना अटक करावी अशी मागणी आंबेडकरी चळवळीचे नेते अशोक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केली.

    आमदार नितेश राणे यांनी नगर येथे सभा घेतली. या सभेत भाषण करून त्यांनी दोन गटांत दंगल घडवण्याची परिस्थिती निर्माण केली. गृहमंत्र्यांचे नाव घेत पोलीस प्रशासनावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला.

    धर्माच्या नावावर युवकांची माथी भडकावली. दोन गटांत फूट पडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आमदार नितेश राणे यांना अटक करावी अशी मागणी गायकवाड यांनी केली.

    जिल्ह्यामध्ये धार्मिक, सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या कोणत्याही नेत्याला बंदी घालावी या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मंगळवारी भव्य मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

  • 22 Apr 2023 10:30 AM (IST)

    डोळे झाकून करु नका सोने खरेदी

    सोने खरेदी करताना रहा सावध

    होऊ नका फसवणुकीचे शिकार

    काही जण साधतात फसवणुकीचा मुहूर्त

    सोने खरेदी करताना अशी घ्या काळजी, वाचा बातमी 

  • 22 Apr 2023 10:01 AM (IST)

    मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द

    नंदुरबार शहरात होणाऱ्या छत्रपती मल्टी स्पेशलिस्ट रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नंदुरबार जिल्हा दौरा अखेर रद्द झाला आहे. खारघर येथे घडलेल्या दुर्घटनेमुळे मुख्यमंत्र्यांनी दक्ष होत नंदुरबार येणे टाळला आहे.

  • 22 Apr 2023 09:54 AM (IST)

    वसई तहसील कार्यालयाची इमारत धोकादायक

    वसई तहसिलदार कार्यालयाची इमारत धोकादायक ठरवून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची पालिकेची नोटीस

    वसई विरार महापालिकेच्या प्रभाग आयचे सहाय्यक आयुक्त मोहन संखे यांनी ही नोटीस दिली आहे.

    पालिकेकडून दिलेल्या नोटीसमध्ये कॉलम व बीमला तडे गेलेले आहेत, स्लॅब चा काही भाग जीर्ण झालेला आहे, असे म्हटले आहे.  इमारतीचे स्टील जीर्ण अवस्थे असल्याचे म्हटले आहे.

  • 22 Apr 2023 09:43 AM (IST)

    मालेगावात रमजना ईद साजरी

    रमजान ईद मालेगावात मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी

    लाखो मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज पठण

    मालेगाव ईदगाह मैदानात लाखो मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज अदा

    मुस्लिम बांधवांनी मोठी गर्दी पाहायला मिळाली

    आमदार मुफ्ती इस्माईल यांनी ईदगाह मैदानात सामूहिक नमाज पठण केले

  • 22 Apr 2023 09:39 AM (IST)

    सोने-चांदीचा साधा अक्षय मुहूर्त

    आठवडाभरापासून किंमतीत घसरण

    भावातील पडझडीचा होणार फायदा

    आज सोने-चांदी खरेदीची करा लगबग

    दुपारनंतर भावात वाढ होण्याची शक्यता

    14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव काय, वाचा बातमी 

  • 22 Apr 2023 09:36 AM (IST)

    विनाअनुदानित शाळेची 1800 कोटी रुपयांची बाकी

    शासनाने थकवले शाळांचे अनुदान

    विनाअनुदानित शाळेची 1800 कोटी रुपयांची बाकी

    खाजगी विना अनुदानित शाळांना देण्यात येणारी रक्कम सरकारने थकवली

    थकबाकीमुळे शाळांचा आक्रमक पवित्रा

  • 22 Apr 2023 09:26 AM (IST)

    प्रा. सुषमा अंधारे यांचे व्याख्यान

      शिवसेनेच्या फायर ब्रँड उपनेत्या प्रा. सुषमा अंधारे यांची तोफ नवी मुंबईत धडाडणार आहे .जुईनगर सेक्टर २३  येथील जनार्धन पाटील नवी मुंबई मनपा शाळेच्या मैदानात आज सायंकाळी ६ वाजता प्रा अंधारे यांचे भिमोत्सव २०२३ च्या कार्यक्रमात जाहीर व्याख्यान असून त्यात  काय बोलणार याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष असणार आहे .
  • 22 Apr 2023 09:14 AM (IST)

    जामनेर तालुक्यात अवकाळी पाऊस

    जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात शुक्रवारी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे जामनेर पाळधी शिवारात शेकडो हेक्टर पिके आडवी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान प्रशासनास नुकसानीची माहिती देऊनही प्रशासनाकडून पंचनामे करण्यास दिरंगाई केली जात असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

  • 22 Apr 2023 09:07 AM (IST)

    पुण्यात भरला आंबा महोत्सव

    अक्षय तृतीयेनिमित्त आंबा खरेदी करण्यासाठी पुणेकरांची गर्दी

    पुण्यात भरला आंबा महोत्सव

    महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने पुण्यात आंबा महोत्सवाचा आयोजन

    शेतकरी ते थेट ग्राहक अशी होत आहे आंब्याची विक्री

    यंदा आंब्याचे उत्पादन मात्र घटलं

    आंब्याचे उत्पादन 30 ते 40 टक्क्यांनी घटल

    मार्केटमध्ये आंब्याची आवक घटल्याने मोठी भाव वाढ

  • 22 Apr 2023 08:59 AM (IST)

    भेंडवडच्या घटमांडणीचे भाकिते आज जाहीर होणार

    शेतकऱ्यांचे लक्ष लागून असलेल्या सुप्रसिद्ध भेंडवडची घटमांडणी आज अक्षय तृतीयाच्या दिवशी संध्याकाळी होणार आहे. उद्या २३ एप्रिल रोजी सकाळी या घटमांडणीची भाकिते जाहीर केली जाणार आहेत.

    पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवड यागावी शेतामध्ये घट मांडण्याची परंपरा सुमारे तीनशे वर्षांपासून सुरू आहे.

    चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी हे उद्या भविष्यवाणी जाहीर करतील

  • 22 Apr 2023 08:44 AM (IST)

    आज तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव काय

    कुठे वाढली किंमत, कुठे झाला भाव कमी

    राज्यात सर्वाधिक महाग इंधन मिळते कुठे

    गेल्या तिमाहीत पेट्रोलियम कंपन्यांना फायदा

    यापूर्वी केंद्र सरकारने दिली कोट्यवधींची नुकसान भरपाई

    येत्या काही दिवसांत इंधन आघाडीवर आलबेल होण्याची शक्यता, वाचा बातमी 

  • 22 Apr 2023 08:10 AM (IST)

    कोरोना बाबत महाराष्ट्रासह 8 राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश

     

     

    केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून 8 राज्यांना पत्र

    कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने उपाययोजना करण्यासाठी पत्र

    महाराष्ट्रसह दिल्ली, यूपी, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ राज्यांना केंद्राकडून पत्र

  • 22 Apr 2023 07:59 AM (IST)

    पुण्यात पीएमपीएलच्या एसी बसला प्रवाशांचे प्राधान्य

     

     

    दररोज दोन लाख प्रवासी करत आहेत वातानुकूलित बसने प्रवास

    शहरात कुणाची तीव्रता वाढल्याने प्रवाशांकडून एसी बसला प्राधान्य

    पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर आणि ग्रामीण भागातील 82 मार्गांवर धावतात वातानुकूलित बस

    शहरात सुरू आहेत 458 एसी बस

    दररोज जवळपास दोन लाख वीस हजार नागरिकांचा एसी बसमधून प्रवास

  • 22 Apr 2023 07:58 AM (IST)

    RTE प्रवेशात घोळच घोळ, सरकारने थकवले शाळांचे अनुदान

    विनाअनुदानित शाळेची 1800 कोटी रुपयांची बाकी

    खासगी विना अनुदानित शाळांना देण्यात येणारी रक्कम सरकारने थकवली

    थकबाकीमुळे शाळांचा आक्रमक पवित्रा, अनेक शाळांनी रोखला RTE मध्ये प्रवेश

    शिक्षण हक्क कायदा अंतर्गत 25% राखीव जागांवर दुर्बल वंचित घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो

    या प्रवेशची रक्कम सरकार शाळांना देत असते

    मात्र याच योजनेची 1800 कोटी रुपये राज्य सरकारकडे थकले असून ही रक्कम देण्याची मागणी आता खासगी शाळांनी केली आहे

  • 22 Apr 2023 07:56 AM (IST)

    अक्षय तृतीयेनिमित्त पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर सजलं

     

     

    अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत मंदिरात आंब्याची आरास

    श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात 11000 आंब्याची आरास करण्यात आली आहे

    अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त साधत दरवर्षी बाप्पांना आंब्याची आरास करण्यात येते

    यावर्षी देखील मंदिरात आंब्याचा प्रसाद चढवण्यात आला आहे

    सकाळपासूनच गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी रांग मंदिर परिसरात लागलेली पाहायला मिळत आहे

  • 22 Apr 2023 07:55 AM (IST)

    कोल्हापुरात छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी उद्या मतदान

     

     

    58 मतदान केंद्रांवर पार पडणार मतदान प्रक्रिया, मतदान केंद्रांच्या परिसरात बंदी आदेश लागू

    अप्पर जिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी काढले आदेश

    मतदान केंद्र परिसरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी काढला बंदी आदेश

    राजाराम सहकारी साखर कारखान्यात आमदार सतेज पाटील आणि आमदार महादेवराव महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला

  • 22 Apr 2023 07:14 AM (IST)

    भंडाऱ्याच्या लाखांदूरात पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस, चार जणांना घेतला चावा

    पिसाळलेल्या कुत्र्यामुळे शहरात भीतीचे वातावरण

    चार जणांना चावा घेतल्याने ते जखमी झाले आहेत

    जखमींना पुढील उपचारांसाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं

  • 22 Apr 2023 07:13 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक जोरात

    काँग्रेस नेते आणि आमदार सुनील केदार यांनी सावनेरची निवडणूक बिनविरोध करत विजय मिळवला

    नागपूर जिल्ह्यातील 7 तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका होणार

    त्यापूर्वीच काँग्रेस नेते आणि आमदार सुनील केदार यांनी सावनेर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करत भाजपला धक्का दिला

    सावनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 पैकी 18 जागा केदार गटाने बिनविरोध जिंकल्या

    यापूर्वी सुद्धा सावनेर बाजार समितीवर केदार गटाचे वर्चस्व होते, ते कायम ठेवण्यात त्यांना यावेळी सुद्धा यश आले

    नागपूर जिल्ह्यात होणाऱ्या बाजार समिती निवडणूक –

    1) सावनेर-बिनविरोध – केदार गट

    2) रामटेक- 28 एप्रिल मतदान आणि 29 एप्रिल मतमोजणी

    3) कुही- मांढळ- 28 एप्रिल मतदान आणि 29 एप्रिल मतमोजणी

    4) पारशिवनी- 28 एप्रिल मतदान आणि 29 एप्रिल मतमोजणी

    5) भिवापूर- 13 मे मतदान आणि 14 मे मतमोजणी

    6) उमरेड- 13 मे मतदान आणि 14 मे मतमोजणी

    7) मौदा- 30 एप्रिल मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी

  • 22 Apr 2023 07:11 AM (IST)

    पुण्यात पीएमपीएलच्या एसी बसला प्रवाशांचे प्राधान्य

     

     

    दररोज दोन लाख प्रवासी करत आहेत वातानुकूलित बसने प्रवास

    शहरात कुणाची तीव्रता वाढल्याने प्रवाशांकडून एसी बसला प्राधान्य

    पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर आणि ग्रामीण भागातील 82 मार्गांवर धावतात वातानुकूलित बस

    शहरात सुरू आहेत 458 एसी बस

    दररोज जवळपास दोन लाख वीस हजार नागरिकांचा एसी बसमधून प्रवास

  • 22 Apr 2023 07:09 AM (IST)

    देशभरात ईदचा उत्साह, मशिदींमध्ये नमाज पठण

    शुक्रवारी संध्याकाळी चंद्र दर्शन झाल्यानंतर ईदची घोषणा करण्यात आली आहे

    त्यामुळे आज देशभरात ठिकठिकाणी मशिदीत नमाज पठण केलं जाणार आहे

    ईदच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

  • 22 Apr 2023 07:05 AM (IST)

    देशभरात अक्षय तृतीयेचा उत्साह, सोने खरेदीसाठी गर्दी होणार

     

     

    अक्षय तृतीयेनिमित्ताने देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केली जाणार

    अक्षय तृतीयेच्या शुभ महुर्तावर आज सोने खरेदी केली जाणार

    अनेक ठिकाणी नदीत स्नान करून अक्षय तृतीया साजरी होणार