मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज जळगावात सभा. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे सभेला उपस्थित राहणार. यंदा पेरण्या उशिरा, अतिवृष्टीची भीती, बुलढाण्यातील भेंडवड घट मांडणीतील भाकीत जाहीर. पुणे-बेंगलोर महामार्गावरील जांभूळवाडी भागात आज मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात चार लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 22 जण जखमी झाले आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आज गोंदियाच्या दौऱ्यावर. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची सकाळपासूनच बारामतीतून दौऱ्याला सुरुवात. विविध कामांचा घेणार आढावा. यासह राज्य आणि देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.
उद्धव ठाकरे यांचं भाषण जसंच्या तसं :
थोडे फटाते आता जिंकल्यावरती ठेवा.
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव, बिघनी आणि मातांनो. हा सगळा जल्लोष आणि उत्साह पाहिल्यानंतर शिवसेना कोणाची? हे दिसतंय ना? पाकिस्तानला विचारलं की शिवसेना कोणाची तर पाकिस्तानही सांगेल पण आमच्याकडे मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयोगाला दिसत नाही. त्यांचा दोष आहे. त्यांचा धृतराष्ट्र झाला असेल पण हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे हे त्यांनी ओळखलं नसेल. आता सुषमा ताईंच्या स्टाईलमध्ये बोलायचं तर ही घोषणा अजिबात दिलेली नाही याची पोलीस आणि पत्रकारांनी घ्यावी.
काही लोकांना वाटलं होतं की ते म्हणजेच शिवसेना. अरे हट! म्हणे सभेत घुसणार. अशा घुशी आम्ही खूप पाहिल्या आहेत. पण निवडणुकीच्या रंगणात अशा घुशी खोदून, शेपट्या धरुन राजकारणात आपटायच्या आहेत.
40 गद्दार गेले तर काही वाटत नाही. पण आर ओ तात्या यांच्या निधनाने खूप वाईट वाटलं. आर ओ तात्या यांनी वैशाली ताई यांची जी ओळख त्यावेळी सांगितली तेव्हा कळलं नव्हतं. पण आज वैशाली ताई यांनी ती ओळख दाखवून दिली.
त्यांनी एक पाकिट दाखवलं. त्यामध्ये बुरशी आहे. ती मातीत टाकली की पीक कसदार येतं. चांगलं पीक आल्यानंतरही त्याला कीड लागली तर त्याला मारण्याचं औषध ही आर ओ तात्या यांनी हातात देवून ठेवलेली आहेत. कारण कसता तुम्ही, निवडणूक आल्यावर तुम्ही प्रचार करता, तुम्ही मरमर राबता, आणि हे पिकोजी वरती बसतात, त्यांना संजय राऊत गुलाबो गँग म्हणतात.
यांना वाटतं आपण घोड्यावर बसलो. घोड्यावर बसल्यावर घोड्याच्या लाथा तुम्ही खायच्या आणि तुम्ही आरामात बसायचं हे आता नाही चालणार. जसं घोड्यावर चढवलं होतं ना, तसं आता खाली पुन्हा खेचण्याची वेळ आली आहे. निवडून दिलेले गद्दार झाले पण निवडून देणारे आजही माझ्यासोबत आहेत. ज्यांनी आपल्या भगव्याला कलंक लावला तो कलंक धुवायचा आहेच. पण तो कलंक लावणारे हात ही राजकारणात कायमचे गाढून टाकायचे आहेत. या गर्दीला नुसता अर्थ नाही. लोकं आता बोलायला लागले आहेत.
अंबादास यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा सांगितल्या. आज कापूस शेतकऱ्यांच्या घरामध्ये पडला आहे. मंत्री म्हणतील अरे घरामध्ये पडलाय ना कर गाधी आणि झोप त्याच्यावर. आम्ही कसे कापसाच्या गाधीवर झोपतो? पण तसं नाहीय ते. आपलं सरकार होतं त्यावेळी जागतिक संकट होतं. नैसर्गिक चक्रीवादळही येत होते. पण अशा संकटावेळी सरकारने मदत केली होती की नाही?
उलट्या पायाचं सरकार आहे. हे सरकार अवकाळी आलं. हे सरकार म्हणजेच संकट आहे. एका तरी संकटात यांनी केलेली मदत तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर सांगा. एक शेतकरी मला भेटला, कवी आहे. त्यांना मंचावर आणू शकतो. पण कारवाई केली जाते.
शेतकऱ्याने त्याच्या व्यथेला शब्दांकन करुन टाहो फोडला तर त्याला अटक कराल. झाल्या असतील तुमच्या वाऱ्या तर या आता बांधावरी, तुमचं सगळं चांगलं असेल ओकेमधी, पण माझ्या कापसाला भाव किती, हे विचारणारा शेतकरी. या शेतकऱ्याला मी मुद्दाम इथे आणलं नाही. तसीच एक आपली बहीणाबाई, खान्देशाची बहिणाबाईचं नाव ऐकलंय का? आज बहिणाबाई असत्या तर त्यांनाही या सरकारने तुरुंगात टाकायला कमी केलं नसतं. बहिणाबाई किती सोप्या भाषेत बोलून गेली. मोठमोठे जे पंडीत समजवू शकत नाही ते ती अशिक्षित बाई सोप्या भाषेत बोलून गेली. ती सोप्या भाषेत म्हणाली, जो इमानाले विसरला त्याला नेक म्हणू नये, जलमं दात्याला भोवला त्याला लेक म्हणू नये. हे जन्मदात्याला भोवणारे सगळे गद्दार. मगाशी घोषणा दिली की, कोण आला रे कोण आला, गद्दारांचा बाप आला. नाही रे बाबा, मी अशा गद्दारांचा बाप नाही. अशी घाणेरडी औलाद आपली असूच शकत नाही. पाठिवरती सोडाच पण आईच्या कुशीवर वार करणारी औलाद आमची असू शकत नाही. भाषम ऐकून आपण मोठे झालो, काही लोक बाप बदलतात तर काही बाप चोरतात.
खेडच्या सभेत म्हणाले की उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, ढेकणे मारायला तोफ लागत नाही. तर तुमचं फक्त एक बोट ढेकणाला चिरडू शकतं. आपण काय दिलं नव्हतं? आज माझ्याकडे काहीच नाही. कारण त्यांनी शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह चोरलेलं आहे. ते माझा बाप चोरायचा प्रयत्न करत आहेत. माझ्याकडे आज काही नसताना तुम्ही सगळे आज माझ्याकडे का आले आहेत? हा प्रश्न मला पडतो. पण एक नक्की तुम्ही आलात ते मला आशीर्वाद द्यायला आलात. लाखो करोडो हात माझ्यासोबत आहेत. कोणी माझा केस वाकडं करुन बघतं तेच पाहतो. येऊन दाखवा.
आवाहनाची भाषा आम्हाला करु नका. मागे आम्हाला एका वृत्तापत्राने मुलाखत घेतली तेव्हा विचारलं की, भाजप आव्हान आहे का? मी म्हटलं भाजप आव्हान नाही. तर भाजप जेवढे दिवस सत्तेत राहतील त्यामुळे होणारी हानी कशी भरुन काढायची? हे आव्हान आहे.
जळगावात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. एका 62 वर्षाच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. दुसरा 26 वर्षाचा मुलगा राहुल राजेंद्र पाटील याने कपाशीला अपेक्षित उत्पन्न मिळालं नाही म्हणून नैराश्यात आत्महत्या केली. का? कारण त्याने वडिलांकडून पाच एकर शेती कसण्यासाठी घेतली. पीक गेलं. पण पीक गेल्यानंतर वडिलांना तोंड काय दाखवू, वडिलांना पैसे कुठून देऊ? डोक्यावर कर्जाचा बोझा आहे. २६ वर्षाच्या पोराने गळफास लावून घेतला.
काल-परवा बातमी आली की जगात हिंदुस्तान लोकसंख्येत एक नंबर. पण जगात लोकसंख्येत एकनंबर असल्यावर तरुण पोरं अशी आत्महत्या करत असतील तर या लोकसंख्येचं करायचं काय? लोकशाही म्हटल्यावर तुम्ही राजा म्हणून कोण ते निवडता.
तुमच्या डोळ्यांमध्ये धुळफेक चालली आहे. महागाई कमी झाली? मला पंतप्रधान मोदी यांचा महागाई कमी झाली का? असं विचारणारा व्हिडीओ दाखवायचा आहे. माझ्या एका जरी शेतकऱ्याने शेतीत उत्पन्न दुपटं झालं असेल तर हा म्हणून हात वर करा, मला आनंद वाटेल.
आपण सगळ्या थापा ऐकत आलो आणि पुन्हा अब की बार, अब की बार बस झालं आता आपटी बार करा यांना. सत्यपाल मलिकने माहिती सांगितली. पुलवामा हत्याकांडात आपले ४० जवान शहीद झाले. सुरक्षा विभागाने हलगर्जीपणा केला. भ्रष्टाचााराचे खुलासा केला. पण त्यांच्याविरोधात चौकशीचा ससेमिरा लावला. सगळे मंत्री कर्नाटकात निवडणूक म्हणून ठाण मांडून बसले आहेत. अमित शाह म्हणाले, सत्यपाल मलिक आज बोलले, राज्यपाल असताना का नाही बोलले? तेव्हा सत्यपाल मलिक यांनी स्पष्ट सांगितलं की, मी पंतप्रधान मोदी यांना जेव्हा सांगितलं तेव्हा ते रील कार्पेटमध्ये होते. त्यांनी सांगितलं की या विषयी काही बोलले नाहीत. अमित शाह यांना प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही विरोधकांच्या मागे ईडी, सीबीआय लावले आहे, तुरुंगात जाता की भाजपात येता? तुमच्यामध्ये आल्यानंतर ते शुद्ध होतील आणि आमच्यात राहिल्यावर भ्रष्ट कसे?
एकनाथ खडसे मला भेटले. त्यांनी मला २०१४ मध्येच सांगितलं होतं की, आपली युती यापुढे राहणार नाही. कारण आमचं आता ठरलं. मग नेमकं भाजपचं करायचं काय. त्यावेळी एकनाथ खडसे भाजपात होते. म्हणून त्यांच्या गळ्यात युती तोडायचं टाकले. त्यांना भाजपच्या पक्षात चांगले लोकं नको म्हणून त्यांनी एकनाथ खडसे यांनाही बाहेर टाकलं. दुसऱ्या पक्षाच्या लोकांना भ्रष्टाचाराचे आरोप करुन स्वत:च्या पक्षात घ्यायचये? हा कोणता न्याय आहे. सगळे गुलाबो गँग नसतात. काही संजय राऊत असतात. अनिल देशमुख यांच्यासोबतही तेच. हसन मुश्रीफ यांच्या पत्नी तर रस्त्यावर जाऊन बोलल्या की आम्हाला गोळ्या झाड्या.
शिवसेनेत जे राहीले, नितीन देशमुख झोपेचं इन्जेक्शन दिलं. मारहाण केली. परत आला, राजन साळवी गेला नाही. चौकशीचा ससेमिरा लावला. माझ्यासोबत राहिलेल्यांच्या पाठिमागे चौकशीचा ससेमिरा लावलाय. किती जणांन अटक कराल? चला येतोच आम्ही. जेलभरो करतो. खोट्या केसेस भरायच्या आहेत ना, कडेकोट पोलीस बंदोबस्तात तुम्ही छळणार याला नामर्दपणा म्हणतात. राहुल गांधी यांनाच प्रश्न पडलेला नाही. तर सगळ्यांना लागलेला आहे. केवळ पंतप्रधानांचा मित्र पाच-सहा वर्षात जगात इतका मोठा श्रीमंत कसा होऊ शकतो?
मिंधे म्हणतात आमचं सरकार घेणार नाही तर देणारं नाही, काय दिलं तुम्ही? यांनी म्हणे घरी बसून सरकार चालवलं. पण मी घरी बसून जे केलं ते तुम्ही वणवण फिरुन करु शकत नाही. जनेतेला विचारा की, मी तुम्हाला जवळचा वाटतो की मिंधे वाटतो. शेवटी वारसा असतो. वैशाली ताई आर ओ तात्यांचं काम पुढे घेऊन चालल्या आहेत. तुम्ही घराणेशाही म्हणाल. पण असेल घराणेशाही. तुझ्यामागे पुढे काय? तू जाशील निघून. पण जनतेचं काय? त्यामुळे एक वारसा लागतो. आर ओ तात्या कुटुंबाचा अभिमान वाटतो. सगळे लोभासाठी जात असताना तुम्ही लढण्यासाठी आला आहात. निवडणुकीत पाचोऱ्यात गद्दाराला गाडणार की नाहीत? निवडणूक कधीही येऊ शकेल.
सर्वोच्च न्यायालयात निकाल प्रलंबित आहे. न्यायदेवता नक्कीच न्याय देईल. निकालानंतर शक्यता पडताडून पाहत आहेत. लवकरच शिवसेना आणखी फुटणार. मग राष्ट्रवादी, काँग्रेस फुटणार. आपण इकडेतिकडे बघत बसतो आणि हे चोर तुमचं सगळं घेऊन जातात.
– नुसतं निवडणूक म्हणून मी आलेलो नाही
– वैशाली ताई आणि आरो तात्यांचा अभिमान म्हणून मी इथे आलोय
– पाचोऱ्यात गद्दाराना तुम्हाला गाडाव लागेल
– लवकरच न्यायालयाचा निकाल आहे
– न्यायदेवता न्याय देईल अशी अपेक्षा आहे
– मी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत गेलो तर म्हणे मी हिंदुत्व सोडलं
– तीन वर्षात कधी तरी हिंदुत्व सोडलं अस तुम्हाला वाटत
– मी कोणत्याही धर्मावर अन्याय होऊ दिला नाही
– मंदिर उघडावे म्हणून ढोल बडवले
– मी हिंदुत्व सोडलं नाही सोडणार नाही
– आपलं हिंदुत्व शेंडी जानव्याच हिंदुत्व नाही
– आमचं हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व
– गो हत्येचा संशय आला तर भर रस्त्यात मारतात
– महिलांवर अत्याचार झाल्यावर उलट त्यांच्या वर गुन्हे घालतात
– शिवसेनेच्या महिला पदाधिकार्याला मारहाण केली
– हेच तुमचं हिंदुत्व
– रोशनी शिंदेंची तक्रार घेतली नाही
– पण तिच्यावर गुन्हे दाखल
– हे हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का
– खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ च्या हातात भगवा शोभून दिसत नाही
– स्वतःकडे नेता नाही आदर्श नाही म्हणून कोणाची आई चोरायची, कोणाचा बाप चोरायचा
– मिंध्ये ना आम्ही 48 जागा देऊ अस बावनकुळे म्हणाले
– तुम्ही आमचं चोरलेल शिव धनुष्य आणि मोदींचा चेहरा घेऊन या
– मी माझं नाव घेऊन येतो उद्धव बाळासाहेब ठाकरे
– तुम्ही चोरलेलं धनुष्य घेऊन या आम्ही मशाल घेऊन येऊ
– कधीही निवडणूक घ्या आम्ही तयार आहोत
– मला सहानुभूती नको ही चीड आहे
– मला मिंध्ये ना सांगायचं आहे हिम्मत असेल तर मविआ शी लढा
– मी वाट बघत होतो
– घुसणारे कधी घुसतात
– पण संजय राऊत म्हणाले तुम्ही घुसलात तर परत जाणार नाही
संजय राऊत यांच्या भाषणातील मुद्दे :
आजच्या सभेने उद्धवजी निकाल दिलाय की, पाचोरा कुणाचं, आजच्या सभेचा निकाल हा स्पष्ट आहे. पाचोरा हे कडवट शिवसैनिकांचं आहे. पाचोरा हे उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या शिवसैनिकांचं आहे. आर ओ तात्या यांच्यानंतर वैशाली ताई पाटील यांच्यावर विश्वास दाखवणारी ही सभा आहे.
घुसून दाखवा, अजून किती घुसू? इथपर्यंत घुसलो की? शिवसैनिकांच्या नादाला लागू नका. बाळासाहेब ठाकरे यांना वेळ जात नव्हता म्हणून शिवसेना स्थापन केली नाही. तुम्ही माती खालली असेल, पण आजही हजारो लाखो शिवसैनिक आहेत जे शिवसेनेशी इमान राखून आहेत.
जळगावात गुलाबो गँग स्थापन झालीय. त्या गुलाबो गँगला 200 कोटींनी लुटले. चार आहेत ना? महाराष्ट्र्च्या राजकारणात फार घोटाळा केलाय. पाचोऱ्यातही घोटाळा झालाय. आपल्याला आज उद्धव ठाकरे यांचंच भाषण ऐकायचं आहे.
जळगावात लोकसभा आणि विधानसभेवर शिवसेनेचाच भगवा भडकेल.
आर ओ तात्या यांच्या कन्या वैशाली पाटील यांचं अतिशय भावनिक भाषण :
आज माझ्या मनात आनंद आणि वेदना अशा स्वरुपाचा संमिश्र दिवस आहे. आज तात्यासाहेब नाहीत. तात्यासाहेब नसताना उद्धव ठाकरे यांची सभा आहे. आनंद यासाठी की आज माझे वडील तात्यासाहेब यांचं स्वप्न पूर्ण होतंय. तात्यांनी भव्य प्रयोगशाळा उभी केली. या प्रयोगशाळेचं उद्घाटन फक्त उद्धव ठाकरेंच्या हस्ते व्हावं, अशी तात्यांची मनस्वी इच्छा होती. पण त्यांचंं निधन झालं. त्यामुळे स्वप्न अधुरं राहीलं होतं. पण आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रयोगशाळेचं उद्घाटन झालं. तात्यांची इच्छा आज पूर्ण झाली.
तात्यासाहेब निष्ठावंत शिवसैनिक म्हणून जगले. आज तात्यासाहेब जिथे कुठे असतील उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आणि प्रयोगशाळेचं उद्घाटन पाहून प्रचंड आनंद झाला असेल. आज उद्धव ठाकरे यांनी तात्यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. उद्धव ठाकरेंवर प्रेम करणारे तात्या आज प्रत्यक्ष बोलत होते असं वाटत होतं. जशी दोघांची भेट व्हायची तशी उद्धव साहेब आणि त्यांची भेट झाली.
तात्यांनी उद्धव साहेबांना कोणता मूक संवाद साधला असेल तो असा होता की, उद्धव साहेब तुम्ही घाबरु नका, मी देहाने जरी नसलो तरी माझं रक्त, माझी लेक आणि आपले निष्ठावंत शिवसैनिक आपल्या पाठिशी आहेत. जे गेले ते जाऊद्यात. ते सर्व इतिहासाचे जीर्ण पाने आहेत. नवा इतिहास घडवणारे समोर बसले आहेत. हे सर्व शिवसैनिक फक्त आणि फक्त तुमचे आहेत साहेब. हे शिवैसिनक उद्याच्या युद्धाचे मशाली आहेत. उद्याचा सूर्यादय आपलाच आहे साहेब, लवकरच भगवी पहाट उगवल्याशिवाय राहणार नाही. या महाराष्ट्र्चा भूमीवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही हे माझ्या वडिलांचे तात्यांचे शब्द आज त्यांच्या मूकसंवादातून जाणवले. हे सगळं मी अनुभवलं.
शिवसैनिक शिवसेनेला वाऱ्यावर सोडणार नाही. तात्यांनी केवळ पैशांसाठी विचारांशी प्रतारणा करणार नाही. तात्यांची लेक म्हणून मला आवडलं नाही. त्यामुळे मी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभी राहिली. उद्धव ठाकरे यांना भेटायला मातोश्रीला गेलो. उद्धव ठाकरे म्हणाले माझ्या आर ओ तात्या यांच्या कन्या माझ्यासोबत आहेत ही गोष्टी मला अभिमानाची आहे. हे ऐकून मला खूप दिलासा वाटला.
सुषमा अंधारे यांच्या भाषणातील मुद्दे :
आजची सभा ही दिवंगत आर ओ तात्या पाटील यांच्यासाठी अपेक्षित होती. त्यांनी 2019 मध्ये सभेसाठी वेळ घेतली होती. पण मध्येच दुर्देवी घटना घडली. आर ओ तात्या यांचं निधन झालं.
आर ओ तात्या यांच्यानंतर त्यांच्या कन्या वैशाली ताई सूर्यवंशी यांच्या पाठिशी अत्यंत ठामपणे उभा आहे. सर्व पदाधिकारी आणि पक्षप्रमुख ठामपणाने उभे आहेत.
या सभेच्या आधी अनेक वल्गना झाल्या. काही लोकांनी सभा रद्द करण्याचे प्रयत्न केले. रेल्वे स्टेशनवर आठ-दहा लोकं काळे झेंडे घेऊन गेले होते. त्यांनी पोलिसांना फोन केले होते.
किशोर आप्पा मध्ये बोलले. त्यांना मी आधीच बोलले होते, आप्पा मारु नका विनाकारण गप्पा कारण तुमच्यावर लागला आहे गद्दारीचा ठपका. ते असे म्हणाले की, या खूर्च्या 25 हजारच आहेत. उदय भाऊ म्हणाले 8 हजार खुर्च्या आहेत, तंबाखू चोळणारे अजून एक होते, शंभूराज देसाई तंबाळू चोळता चोळता म्हणाले, अहो गर्दीच होणार नाही. किशोर आप्पा, उदय भाऊ, शंभूराज देसाई यांनी स्वत: यावं आणि खुर्चा मोजाव्यात
राहिला प्रश्न गुलाबराव पाटील यांचा. महाप्रबोधन यात्रेत मी नाकावर टिच्चून चार सभा घेतल्या. पाचवी सभा घेऊ न देण्याचा प्रयत्न केला. पण ऑनलाईन 25 लाख लोकांनी ती सभा पाहिली. पालकमंत्र्यांना संविधानाचं पालन करुन बोलावं.
अजित पवार यांच्याबद्दल चुकीची माहिती पसरवण्यात आली. पण याबाबतच्या बातम्या समोर आल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती
भाजपचे हिंदुत्वाच्या नावाने बेगडी प्रेम दाखवलं जात आहे. नवनीत राणा यांना हनुमान चालीसा म्हणता येत नाही.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले कोरोना काळातला हलगर्जीपणा कुठे गेला, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. खरंतर त्यांना आम्ही उत्तर देत नाही. पण कोरोनाची आपत्ती ही नैसर्गिक होती. तर खारघरची आपत्ती ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची निर्मित आहे. राज साहेबांना माध्यमांसमोर दोन-तीन प्रश्न विचारावे लागतील, राजसाहेब कोरोनाचा काळ चालू असताना मुख्यमंत्री सहायता निधीऐवजी पीएम केअर फंडमध्ये पैसे भरा असं आवाहन करत होते तेव्हा तुम्ही देवेंद्र फडणवीस राजकारण करत आहेत, असं का म्हणाले नाही? कोरोना काळात संकट होतं. पण त्या संकट काळात मंदिर सुरु करण्याच्या नावाने राजकारण करु नका, असं राज ठाकरे का म्हणाले नाही? गुजरातमध्ये कोरोना काळात रस्त्यावर प्रेतं जाळली गेली, तेव्हा हलगर्जीपणा दिसला नाही का?
ठाकरे गटाच्या नेत्या शुभांगी पाटील यांची गुलाबराव पाटील यांच्यावर टीका
गुलाबराव पाटील यांचा पानटपरीवाला असा उल्लेख
शुभांगी पाटील नेमकं काय म्हणाल्या ?
संजय राऊत यांच्या कार्यालयाच्या बाहेर तिकीटासाठी विनवण्या करत होता, त्याच संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तिकीट दिला, पान टपरीवाला खरा असतो, पण तुमच्यासारखे काही लोकंच खोके घेऊन गद्दारी करतात
मी शेतकऱ्याची लेक म्हणून चलेंज देते, घुसन दाखवा, तुमची राहिलेली सुद्धा राहणार नाही, ही जनताच तुम्हाला सोडणार नाही
जो बाप चोरतो तो कधीच दुसऱ्याचं हित करु शकतो. ही खान्देशची भूमी आहे, या खान्देशाच्या भूमीत महिला फार मोठ्या झाल्या.
बोलण्याची संधी दिली म्हणून धन्यवाद न मानता याच जिल्ह्यात पुन्हा जन्माला यावं अशी इच्छा व्यक्त करते
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव दाखवणार होते देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे
महाविकास आघाडीचे सरकार पाडल्याचा आरोप करत दाखवणार होते काळे झेंडे
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात
अंबरनाथमध्ये इलेक्ट्रिक बाईक चार्जिंग पॉइंटला आग
इमारतीमधील दुकानात आग लागल्याने धुराचे मोठे लोट
अग्निशमन दलाने आगीवर मिळवले नियंत्रण
भाजपच्या फोडाफोडीवर योग्यवेळी भूमिका घेऊ – शरद पवार
शरद पवार आज अमरावती दौऱ्यावर
अमरावतीत अॅग्रीकल्चर फोरमला उपस्थिती
एलॉन मस्क यांनी दिला मोठा धक्का
ट्विटरने या युझर्सला मोठं गिफ्ट
गेल्या आठवड्यात काढलं होतं ब्लू टिक
एलॉन मस्क का झाला एवढा उदार
सब्सक्रिप्शन, शुल्क न आकरता ब्लू टिक केले परत, बातमी वाचा एका क्लिकवर
जळगावच्या पाचोऱ्यात उद्धव ठाकरे यांची सभा
सभेआधी आर. आर. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण
पाचोऱ्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
खासदार अमोल कोल्हे यांच्या ट्विटमुळे पुन्हा भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण
ट्विटमध्ये कोल्हेनी दोन पुस्तकं वाचतानाचे फोटो शेअर केले आहेत
एक पुस्तक शरद पवारांचे ‘नेमकचि बोलणे’ आणि दुसरं ‘द न्यू बीजीपी’ हे पुस्तकं ते वाचत आहेत
अमोल कोल्हे यांच्या भाजप प्रवेशाच्या पुन्हा चर्चा रंगल्या आहेत
सर्वाधिक बोनस देणाऱ्या कंपन्या कोणत्या
बोनसच्या रुपाने मिळवा मलाई
परतावा, लाभांश आणि बोनसच्या रुपाने कमाई
न या आहेत सर्वाधिक बोनस देणाऱ्या टॉप-10 कंपन्या, वाचा सविस्तर
अजित पवारांच बारामतीत पुन्हा लोकसंख्या नियंत्रणावरून वक्तव्य
आजोबा म्हणायचे आपली लोकसंख्या ही 35 कोटी होतो
आता आपण 142 कोटी इतके झालोत
उगीच देवाची कृपा म्हणतो याला आपणचं जबाबदार आहोत
सगळ्याच राजकीय लोकांनी, पंथांनी, धर्मानी विचार केला पाहिजे
ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे
आपण चीनलाही याबाबतीत मागे पडलोय
अजित पवारांच बारामतीत मिश्कील वक्तव्य
जळगावातील पाचोऱ्यात उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी 20 फुटांचा झेंडूच्या फुलांचा हार तयार करण्यात आलाय
बाईकस्वारांचीही एकच गर्दी
ढोल ताशे नगाडे वाजवून उद्धव ठाकरेंचं चौका चौकात स्वागत
जळगावातील सागर पार्क मैदानावरून गुलाबराव पाटील समर्थक उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी जळगावतून रवाना
संजय राऊतांनी केलेल्या गुलाब गॅंग पाचोराकडे रवाना
शेकडो शिवसैनिक गुलाबराव पाटील यांचे मुखवटे घालून पाचोरा येथे रवाना
जळगावात जोरदार घोषणाबाजी
जळगाव जिल्ह्यातील शेकडो शिवसैनिकांची घोषणाबाजी
गुलाबराव पाटलांचे मुखवटे लावून शेकडो वाहनातून शिंदे गटाचे शिवसैनिक ठाकरे यांच्या सभेत जाणार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेसंदर्भात नवीन आरोप होत आहे.
राज्य सेवा आयोगाची परीक्षा 30 एप्रिलला होणार आहे.
या परीक्षेची प्रवेशपत्रे सोशल मीडियावर फिरत आहे.
राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेला बसलेल्या सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांपैकी 93 हजार विद्यार्थ्यांचे परीक्षा प्रवेश पत्र लिक झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
डेटा लीक झाल्याचा व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा केला जात आहे. आता MPSCकडून या संदर्भात खुलासा आला आहे.
खूनाच्या गुन्ह्यात भोगत होता जन्मठेपेची शिक्षा, इंदापूर पोलीसांची कारवाई
पैठण कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला इंदापूर तालुक्यातील काटी गावातील आरोपी अमोल बनकर
2019 मध्ये कारागृहातून पळाला होता.
गोपनीय माहितीच्या आधारे इंदापूर पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने त्याला ताब्यात घेतलयं.
उद्धव ठाकरे यांच्या सभेआधी राजकीय वातावरण तापलं
दगड मारून सभा बंद करू- गुलाबराव पाटलांचा इशारा
तुम्ही दगड मारा, मग लोकं तुमच्यावर दगड मारतील- संजय राऊत
जंतर-मंतरवर पुन्हा एकदा पैलवानांचे आंदोलन
कुस्ती महासंघ च्या अध्यक्षांबाबत कोणताही निर्णय न झाल्याने पुन्हा एकदा आंदोलन
दोन महिन्यांपूर्वी पैलवानांनी केल होत आंदोलन
बजरंग पुनिया याच्यासह काही कुस्तीगीर आंदोलनात सहभागी
कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यामध्ये पैलवानांकडून तक्रार दाखल
अजित पवारांच बारामतीत मोठं वक्तव्य
1967 पासुन शरद पवार साहेबांवर विश्वास ठेवला
माझ्यावर 1990 पासून माझ्यावर विश्वास टाकला
या विश्वासाला तडे जाऊ देणार नाही
एका हॉटेलच्या उद्घाटनाच्या निमित्ताने अजित पवारांच वक्तव्य
एकमेकांच्या सणाला शुभेच्छा देणं ही शिवाजी महाराजांची शिकवण आहे
कोणी काय डोक्यात वेगळा घालायचं प्रयत्न केला तर डोक्यात घेऊ नका
बारामतीचं वातावरण सुरक्षित राहिलं पाहिजे
जळगावच्या पाचोऱ्यात उद्धव ठाकरे यांची जाहिर सभा
सभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे जळगावमध्ये दाखल
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिव स्मारकाचे भुमीपूजन
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. सुरुवातीला महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढेल असा सर्वत्र प्रचार केला गेला.
आयुषने २०१८ साली प्रदर्शित झालेल्या ‘लव्हयात्री’ सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं,
पण आता एका कारणामुळे अभिनेत्याला कायदेशीर नोटिस पाठवण्यात आली आहे… वाचा सविस्तर
उच्चदाब ग्राहकांच्या वीजपुरवठ्याच्या तपासणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या महावितरणच्या कल्याण मंडळ कार्यालय एकच्या विशेष पथकाने गेल्या दोन महिन्यांत तब्बल १ कोटी ४३ लाख रुपयांच्या ३८ वीजचोऱ्या उघडकीस आणल्या आहेत.
वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून बीज प्रक्रिया आणि उगवण क्षमतेसाठी प्रात्यक्षिक देण्यातं आलं आहे. जिल्ह्यातील 3 लाख 10 हजार हेक्टरवर होणार सोयाबीनची पेरणी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
वाशिम जिल्ह्यात दोन दिवस अगोदर झालेल्या वादळी वारा आणि गारपिटीमुळे सरपखेड, धोडप शिवारातील उच्च दाब वाहिनीचे अनेक खांब कोसळल्याने वीज, शेती वीज पंपांचा पुरवठा खंडित झाला होता.
अपघातासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी दिलेत अहवाल देण्याचे आदेश,
जिल्हाधिकाऱ्यांकडून चार सदस्यीय समिती स्थापन,
समितीत आरटीओ, बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग आणि वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांचा समावेश
मराठी साहित्य परिषदेच्या बैठकीत निर्णय
दोषींवर गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता
आयोगाकडून हॉलतिकीट व्हायरल प्रकरणाची चौकशी केली जाणार
या प्रकरणात लवकरच गुन्हा दाखल होणार
विश्वसनीय सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती
Viral Video | सोशल मीडियावर सध्या एका मगरीचा व्हिडीओ अधिक व्हायरल होत आहे. पाण्यामध्ये सुरु असलेल्या हार्वेस्टर मशीनवर मगरीने हल्ला केला आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांनी पाहिल्यानंतर चिंता व्यक्त केली आहे.
अनील देशमुख स्वागतासाठी नागपूर विमानतळावर दाखल
संध्याकाळपर्यंत शरद पवार अमरावतीमध्ये असतील
अमरावतीत अॅग्रीकल्चर फोरमला ते उपस्थीत राहाणार
शरद पवार नागपूर विमानतळावरून अमरावतीकडे रवाना
गुंतवणूकदार तीनच वर्षांत मालामाल
अवघ्या वर्षांत लागली लॉटरी
37 रुपयांचा स्टॉक 490 रुपयांना
एक लाखांचे झाले 12 लाख, बातमी एका क्लिकवर
14.7 करोड किलोच्या चहाच्या पीकाचं…
देशात चहाच्या पीकाचं अधिक नुकसान होत आहे. कीडींचा सगळ्यात जास्त फटका चहाच्या पीकाला बसला आहे. त्यामुळे चहाचे उत्पादक शेतकरी मागच्या कित्येक दिवसांपासून चिंतेत आहेत. नेमकं काय करावं हे कुणालाचं कळत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. एका वेबबाईटने दिलेल्या माहितीनुसार चहाच्या पीकामुळे वर्षाला किमान 14.7 करोड किलो चहाच्या पीकाचं नुकसान होत आहे. संपूर्ण बातमी
सोने-चांदीत आपटी बार
दरवाढीला आठवड्यात मोठा ब्रेक
किंमती इतक्या घसरल्या
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव काय, वाचा बातमी
नागपूर- आज शरद पवार अमरावती दौऱ्यावर
थोड्याच वेळात शरद पवारांच नागपूर विमानतळवर होणार आगमन
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते स्वागतासाठी विमानतळावर दाखल
रत्नागिरी- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रत्नागिरी सभा म्हणजे पिकनिक
राज यांनी रत्नागिरीत यावं पिकनिक करावी आणि निघून जावं
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आम्ही दखल घेत नाही
गुलाबराव पाटलांनी सभेवरती दगड फेकावा आणि दगडा सहित घरी जावं
उद्धव ठाकरे यांची पाचोरा येथील सभा पाहूनच गुलाबराव पाटील यांचे डोळे बंद होतील
गुलाबरावांचे गुलाब फुलणार की नाही याची भीती गुलाबरावांना आहे
त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सभे संदर्भात त्यांचाच त्रागा
Viral Video | व्हिडीओमध्ये आपल्या प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी एक तरुण बेसबॉल मॅच सुरू असताना मैदानात शिरतो. त्यानंतर काय झालंय ते तुम्ही व्हिडीओ पाहा.
हॉलमार्किंगमध्ये पण सराफा घालताय गंडा
22 कॅरटंच सांगून 18 कॅरटंच सोनं मारलंय जातंय माथी
फसवणूक टाळण्यासाठी वापरा ही सोप्पी ट्रिक
तुम्ही घरबसल्या ओळखू शकता फसवणूक, एका क्लिकवर वाचा बातमी
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे होत आहे. या सभेची जय्यत तयारी सध्या पाचोरा शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी बॅनरबाजी आणि भगवे झेंडे संपूर्ण पाचोरा शहरभरात ठाकरे गटाकडून लावण्यात आलेले आहे. सभेपूर्वीची वातावरण निर्मिती ठाकरे गटाकडून करण्यात आली असल्याच आपल्याला पाहायला मिळत आहे.
मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रचाराचा नारळ महाविकास आघाडीने आणि भाजप मित्रपक्षांकडून फोडण्यात आला. वडगाव ग्रामदैवत पोटोबा महाराज यांच्या मंदिरात महाविकास आघाडीची बैठक झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला शुभारंभ केला.
भारत राष्ट्र समिती समितीची उद्या छत्रपती संभाजीनगरमधील जबिंदा मैदानावर के. चंद्रशेखर राव यांची सभा होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या संध्याकाळी 5 वाजता ही सभा होणार आहे. नांदेडमध्येही भारत राष्ट्र समिती समितीची यशस्वी सभा झाल्यानंतर आज मराठवाड्याची राजधानी या ठिकाणी उद्या भारत राष्ट्र समिती समितीची सभा होणार आहे.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. सुरुवातीला महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढेल असा सर्वत्र प्रचार केला गेला. मात्र आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाने काढता पाय घेतला आहे. काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांनी विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप करीत शिवसेना ठाकरे गटाने करत, महाविकास आघाडीतून काढता पाय घेतला आहे. महाविकास आघाडीच्या पॅनलशी शिवसेनेचा काही संबंध नसल्याची भूमिका उद्धव ठाकरे गटाने पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
बंगलोर महामार्गावर रात्री झालेल्या अपघातानंतर खासदार सुप्रिया सुळे अपघातस्थळाची पाहणी करणार
रात्री झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू तर 22 जण जखमी झाले आहेत
धुळे शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. मार्च आणि नंतर आता एप्रिल महिन्यामध्ये सतत अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक बेजार झाले आहेत. जिल्ह्यात दिवसाचे तापमान हे 40 ° c पर्यंत असताना दुसरीकडे मात्र सायंकाळी तापमानाचा पारा खाली येतो आणि वादळी वाऱ्यासह येणाऱ्या अवकाळी पावसामुळे होत्याचं नव्हतं होतं, अशी परिस्थिती धुळे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे. या अवकाळी पावसामुळे फळबागांना मोठा फटका बसत आहे. तसेच जनावरांना लागणाऱ्या चाऱ्याचे दरही या अवकाळी पावसामुळे वाढत आहेत.
अपघातानंतर टेम्पोने घेतला पेट
पुणे नाशिक महामार्गावर आळेफाटा येथील कलासागर हॉटेल समोरील घटना
पहाटे तीनच्या सुमारास घडला अपघात
अपघातात टेम्पो जळून खाक
प्रसंगावधान राखल्याने जीवितहानी टळली
कोणत्या शहरात महागले पेट्रोल-डिझेल
कच्चा तेलाने घेतली आज विश्रांती
इराकने वाढवला कच्चा तेलाचा पुरवठा
2 डॉलर प्रति बॅरलने स्वस्त इंधन
तुमच्या शहरात आजचा भाव काय, वाचा सविस्तर
उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालल्याने उजनी धरणातील पाणीसाठा कमी होतोय
सध्यस्थितीत उजनी धरणात प्लस पाच टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे
मागील पन्नास दिवसात 2 टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन
शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी लवकरच एक आवर्तन सोडण्यात येणार आहे
यात 3 हजार 51 दुचाकी, तर 1 हजार 343 चारचाकींचा समावेश,
चारचाकी, दुचाकी व्यतिरिक्त 325 गुड्स वाहने, 186 रिक्षा, 23 बस, 224 अन्य वाहनांची खरेदी
दस्तनोंदणी कार्यालयातही घर, सदनिका आणि मालमत्ता खरेदी करण्यासाठी पुणेकरांची गर्दी
आमदार सतेज पाटील यांच्या गटाच्या बूथ वरील अंगठी हे चिन्ह हटवायला लावलं
महाडिक गटाने आक्षेप घेतल्यानंतर हटवले चिन्ह असलेले बॅनर
जिल्हा परिषद महिला आणि बालकल्याण विभाग करणार कारवाई
आगामी काळात सर्व ग्रामपंचायतींमध्ये बाल दक्षता समितीच्या माध्यमातून करण्यात येणार जनजागृती
सरपंच, ग्रामसेवक, आशा आणि अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून बालविवाह रोखण्यासाठी होणार जनजागृती कार्यक्रम
जनजागृती केल्यानंतर देखील बालविवाह आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा
– सोलापुरात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुका निघणार
– राज्यातील सर्वात मोठ्या मिरवणुका सोलापूरमध्ये काढल्या जातात
– या मिरवणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील विविध प्रसंगाचे देखावे पाहायला मिळणार
– आंबेडकरी चळवळीचे मोठे केंद्र असलेल्या सोलापूरात आज युवकांचा भीमजल्लोष पाहायला मिळणार
– जवळपास दीडशेहुन अधिक मांडळांना मिरवणुकीत असणार सहभाग
– सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातील आंबेडकर अनुयायी मिरवणूक पाहण्यासाठी येतात सोलापुरात
58 मतदान केंद्रांवर पार पडणार मतदान प्रक्रिया, कोल्हापूर शहरातील दोन केंद्रांवर होणार मतदान
संस्था गटासाठी सेंट झेवियर्स हायस्कूल मध्ये पार पडणार मतदान
या गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक निवडणुकीच्या रिंगणात, 21 जागांसाठी 44 उमेदवार रिंगणात
आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला
राजाराम निवडणुकीच्या निमित्ताने गेले पंधरा दिवस सतेज पाटील आणि महाडिक गटामध्ये रंगल्या वैयक्तिक आरोपाच्या फैरी
हॉटेल गौरी इन मध्ये कृषी पदवीधर संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन
कृषी पदवीधर अधिवेशनाला शरद पवार करणार मार्गदर्शन
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर होणार चर्चा
कृषी पदवीधर अधिवेशनात जिल्ह्यातील शेतकरी आणि कृषी पदवीधर राहणार उपस्थित
सकाळी 10.30 वाजता नागपूर विमानतळावर आगमन त्यानंतर वाहनाने दुपारी 1.30 वाजता अमरावती आगमन
दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कृषी पदवीधर अधिवेशनाला लावणार शरद पवार हजेरी
उष्णतेची लाट येण्याच्या शक्यतेने घेण्यात आला निर्णय
सकाळी 8 ते दुपारी 12 अशी असेल नवीन वेळ
बालकांना शिक्षण आणि पोषण आहार देण्यासाठी सकाळी 8 ते 10.30 अशी वेळ करण्यात आली निश्चित
उष्माघाताचा फटका बालकांना बसू नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश
रमजान ईद निमित्ताने सहा मित्र गेले होते गंगापूर धरण परिसरात फिरण्यासाठी
शेहबाज नेहमत अली खान (वय 14) या अल्पवयीन मुलाचा झाला पाण्यात बुडून मृत्यू
ही मुले नाशिकच्या विहितगाव परिसरातील रहिवासी
सहापैकी एका मुलाचा बुडून मृत्यू, तर पाच जण सुखरूप
शहरात नव्याने 100 बोअरवेल खोदण्याचे नियोजन
पाणी टंचाई निर्माण झाल्यास तीस टँकरने पाणीपुरवठा केला जाणार
‘अल निनो’मुळे पाऊस लांबल्यास 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याचा प्रशासनाचा दृष्टीकोन
राज्याच्या विविध भागातून चोरी झालेल्या वाहनांचा यात समावेश
वडगांव पोलिसांनी गंगामता वाहन शोध संस्थेमार्फत मूळ मालकांचा शोध घेऊन त्यांना लोणावळा पोलीस उपअधीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते देण्यात आले
यावेळी मूळ मालकांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला होता
97 वाहनांपैकी 32 वाहने मूळ मालकांना देण्यात आली आहे
तर अजून 65 वाहने लवकरच हस्तांतरित करण्यात येणार असल्याचं वडगाव पोलिसांनी सांगितले
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे आज सायंकाळी उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे
उद्धव ठाकरे सभेतून कोणा कोणावर निशाणा साधणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेही सभेला हजर राहणार, खडसे- ठाकरे पहिल्यांदाच जाहीरसभेत एकत्र येणार
सभा न भूतो न भविष्यती होण्याची शक्यता