Maharashtra Breaking Marathi News Live | पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचं निधन

| Updated on: Apr 26, 2023 | 7:03 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. राज्यात राजकारणात नवीन समीकरण आकाराला येणार का? महाविकास आघाडी एकसंध राहील का? ते लवकरच समजेल.

Maharashtra Breaking Marathi News Live |  पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचं निधन
Follow us on

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात नवीन टि्वस्ट येणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार यांच्या नावाची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांना ठाकरे गटाकडून टार्गेट केलं जातय. राज्यात नवीन समीकरण आकाराला येणार का? ते लवकरच समजेल. पण त्याचवेळी अवकाळी पावसामुळे काही भागात शेतीच नुकसान झालय. या संदर्भातील सर्व घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 25 Apr 2023 09:58 PM (IST)

    Parkash Singh Badal Passes Away | प्रकाश सिंह बादल यांचं निधन

    पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचं निधन झालं आहे. बादल दीर्घकाळापासून आजारी होते, अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. प्रकाशसिंग बादल यांनी रात्री 8 वाजून 28 मिनिटांनी चंदीगडमधील फोर्टिस रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. प्रकाशसिंग बादल यांची बुधवारी अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे

  • 25 Apr 2023 09:27 PM (IST)

    राहुल गांधी यांची मानहानीच्या केस प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयात धाव

    सूरत न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निकाल जैसे थे ठेवला

    त्यानंतर राहुल गांधी यांनी आज गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली

    गुजरात न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष


  • 25 Apr 2023 09:27 PM (IST)

    पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांचं निधन, वयाच्या 95 वर्षी घेतला अंतिम श्वास

    पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांचं निधन झालं

    आज रात्री 8 वाजून 28 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला

    प्रकाश सिंग बादल हे 95 वर्षाचे होते

    आजारपणामुळे त्यांना मोहालीच्या फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं

    त्यांच्या पार्थिवावर बंठिडा जिल्ह्यातील बादल गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे

  • 25 Apr 2023 07:17 PM (IST)

    या कर्मचाऱ्याला मुकेश अंबानी यांच्यापेक्षा अधिक पगार

    तुमचाही विश्वास नाही बसणार

    मुकेश अंबानी यांच्यापेक्षा इतके जास्त घेतो पगार

    मुंबई इंडियन्ससोबत आहे खास नातं

    आयपीएल फ्रँचाईजीचे कामकाज सांभाळते ही व्यक्ती

    पगाराचा आकडा पाहून डोळे विस्फारतील, वाचा बातमी 

  • 25 Apr 2023 06:31 PM (IST)

    आरबीआयची सुवर्ण खेळी

    भारतीय रिझर्व्ह बँकेला वाटते कशाची भीती

    सोन्याचा साठा का करतेय केंद्रीय बँक

    कोरोना महामारीनंतर सोन्याचा मोठा साठा

    कोणती कारणं सतावत आहे आरबीआयला

    इतक्या लाख कोटींच्या सोन्याची केली खरेदी, वाचा बातमी 

  • 25 Apr 2023 05:54 PM (IST)

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चौकशी समितीनं केली चौकशी

    काही कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवल्याची माहिती

    माजी महासंचालक जयंत उमराणीकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलीय

    आज विद्यापीठात येऊन रँप सॉंगप्रकरणी चौकशी केल्याची माहिती

  • 25 Apr 2023 05:36 PM (IST)

    किसान सभेचा लॉंगमार्च

    महसूलमंत्र्यां समवेत झालेली बैठक निष्फळ

    मुंबई येथे सह्याद्री अतिथी गृहावर आज दुपारी पार पडली बैठक

    लाँगमार्च काढण्यावर अजित नवले ठाम

    किसान सभेने राधाकृष्ण विखे पाटलांच्या लोणीतील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा दिलाय इशारा

    26 ते 28 एप्रिल रोजी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी अकोले ते लोणी लॉंगमार्च

    लॉंगमार्चला अद्याप पोलिसांची परवानगी नाही

  • 25 Apr 2023 05:36 PM (IST)

    करदात्यांना मोदी सरकारचा मोठा दिलासा

    नवीन कर रचनेत आता दोन मोठे फायदे

    ITR भरणाऱ्यांना असा मिळेल दिलासा

    उत्पन्नासोबतच याठिकाणी ही होईल लाभ

    गुंतवणुकीवर लाभ मिळविण्यासाठी जुनी कर रचना फायदेशीर

    नवीन कर रचनेत करपात्र उत्पन्नाची मर्यादा जास्त, वाचा बातमी सविस्तर 

  • 25 Apr 2023 05:33 PM (IST)

    महादेवराव महाडिक यांच्या विजयानंतर महाडिक गटाचे आणखी दोन उमेदवार विजयी

    महाडिक गटाचे उत्पादक गट क्रं 1 मधून विजय भोसले, संजय मगदूम झाले विजयी

    दुसऱ्या फेरीतील पहिल्या गटात देखील महाडिक गटाने मारली बाजी

    जवळपास 1357 मताधिक्याने विजयी

    21 पैकी महाडिक गटाचे आतापर्यंत 3 उमेदवार विजयी

  • 25 Apr 2023 05:33 PM (IST)

    पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विकास दांगट यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

    राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केली हकालपट्टी

    अजित पवारांच्या आदेशानं कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादीनं पँनल उभं केलंय

    मात्र भाजपच्या पँनलचा प्रचार करत असल्याचा दांगट यांच्यावर आरोप

    पक्षाच्या विरोधात बाजार समितीत काम केल्यास थेट हकालपट्टी होणार

    राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजार समितीच्या निवडणुकीत घेतली मोठी भूमिका

  • 25 Apr 2023 05:31 PM (IST)

    पिंपरी चिंचवड

    मराठा आरक्षणाची पुनर्याचिका फेटाळली

    मराठा समाजात असंतोष

    येत्या 6 मे ला समाजाकडून ‘मराठा आरक्षण एल्गार परिषद’ घेण्यात येणार

    मराठा आरक्षण समन्वय समितीची घोषणा

    मराठा आरक्षण समिती, मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज या परिषदेतून सरकारला अंतिम इशारा देणार

  • 25 Apr 2023 04:53 PM (IST)

    पुणे शहर आणि जिल्ह्यातील अनाधिकृत होर्डिंग्जची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे

    शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनं मुख्यमंत्र्यांना लिहीलं पत्र

    अनधिकृत होर्डिंग्जची यादी पाठवली मुख्यमंत्र्यांकडे

    पुणे जिल्ह्यात साडेपाच हजार अनधिकृत होर्डिंग्ज आहेत

    त्याचं स्ट्रक्चरल ऑडीट करून पावसाळ्यात दूर्घटना घडणार नाहीत

    यासाठी प्रशासनाला सूचना द्या पत्राद्वारे केली मागणी

  • 25 Apr 2023 04:44 PM (IST)

    आरबीआयचा पुण्यातील बँकेला मोठा दणका

    सहकारी बँकेला ठोठावला 13 लाखांचा दंड!

    देशातील या चार बँकांना हलगर्जीपणा भोवला

    या कारणामुळे या बँकांवर थेट झाली कारवाई

    ग्राहकांच्या ठेवींचे मग काय होते, पैसा मिळतो का परत, बातमी एका क्लिकवर

  • 25 Apr 2023 04:42 PM (IST)

    कोल्हापूर कसबा बावड्यात सुद्धा महाडिक गटाची कमाल

    बावड्यात एकूण 916 पैकी तब्बल 310 हुन अधिक मत महाडीकांनी घेतली

    सतेज पाटलांच्या बालेकिल्ल्यात महाडीकांनी घेतली 310 मते

    महाडीकांच्या बालेकिल्ल्यात मात्र सतेज पाटलांना कमाल करता आली नाही

    शिरोली मध्ये एकूण 800 पैकी सतेज पाटील यांच्या पॅनेल ला केवळ 130 मतं

  • 25 Apr 2023 04:19 PM (IST)

    जालना जिल्ह्यातील या भागात वादळी वाऱ्यासह गारपीटीला सुरुवात

    जालना जिल्ह्यातील अंबड, वडीगोद्री, गोंदी या भागात वादळी वाऱ्यासह गारपीटीला सुरुवात

    वादळी वारा आणि गारपिटीमुळे कांदा भाजीपाला आणि फळबागांचे नुकसान होण्याची शक्यता

    वादळी वाऱ्यामुळे एकलहरा गावात म्हशीवर झाड कोसळल्याने म्हशीचा मृत्यू

    सतत होणाऱ्या गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेतीमालाचे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल

  • 25 Apr 2023 04:15 PM (IST)

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कोकणात मोठं आंदोलन उभारणार

    कोणत्याही परिस्थितीत बारसू सोलगाव रिफायनरीला विरोध करणाऱ्या लोकांसोबत ठाम राहायचं

    रिफायनरीला विरोध म्हणून मोठं जन आंदोलन उभं राहणार

    बैठकीत स्थानिकांसोबत कायम राहण्याचा निर्धार

    दिल्लीत जाऊन कोणाशी चर्चा करण्यात अर्थ नाही

    लोकांसोबत राहूयात बैठकीत चर्चा झाल्याची माहिती

    शिवसेना आंदोलन उभारण्याच्या तयारीत

    विश्वसनीय सूत्रांची माहिती

  • 25 Apr 2023 04:01 PM (IST)

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कोकणात मोठं आंदोलन उभारणार

    कोणत्याही परिस्थितीत बारसू सोलगाव रिफायनरीला विरोध करणाऱ्या लोकांसोबत ठाम राहायचं

    रिफायनरीला विरोध म्हणून मोठं जन आंदोलन उभं राहणार

    बैठकीत स्थानिकांसोबत कायम राहण्याचा निर्धार

     

  • 25 Apr 2023 03:57 PM (IST)

    बारसुच्या सड्यावर अखेर बोर मारण्याच्या कामाला सुरुवात

    पोलीस बंदोबस्तात बोर मारण्याचं काम सुरू
  • 25 Apr 2023 03:37 PM (IST)

    बारसू रिफायनरीबाबत राजकारण होत आहे- चंद्रशेखर बावनकुळे

    या प्रकल्पाबाबत  स्वतः उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली होती

    आता सरकार बदलल्यावर, घरी गेल्यावर भूमिका बदलली

    आता भडकवण्याचा प्रयत्न सुरु आहे

    तेव्हा लोकांचं मत का ऐकलं नाही?

    उद्धव ठाकरेंचं पत्र आता आम्ही त्या भागातील लोंकाना पाठवू- बावनकुळे

  • 25 Apr 2023 03:33 PM (IST)

    भाजप खासदार सुजय विखे यांचा खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा 

    संजय राऊत यांची मानसिकता मेंटली लेवल 5 होती..  वर होती आता ती 7 वर गेली आहे

    त्यांना लवकरच थेरपीमध्ये ऍडमिट करावे लागेल
  • 25 Apr 2023 03:31 PM (IST)

    संजय राऊत हे कोणत्या मानसिकतेतून बोलतात हे सगळ्यांना माहीत आहे 

    फडणवीस साहेबपण म्हणाले त्यांची रात्रीची नशा उतरलेली नसते.. नरेश म्हस्के यांची टीका
  • 25 Apr 2023 03:30 PM (IST)

    रत्नागिरी बारसू रिफायनरी प्रकल्पात मोठी अपडेट

    रिफायनरी विरोधी संघर्ष समिती अध्यक्ष अशोक वालाम पोलिसांच्या नजर कैदेत

    वालाम यांच्यावर जिल्हा बंदीचे आदेश

  • 25 Apr 2023 03:24 PM (IST)

    रिफायनरी मुद्द्यावरून भाजप आमदार नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

    उद्धव ठाकरेंची ही सवयच आहे, उद्धव ठाकरेंनी कोकणातल्या ज्या ज्या प्रकल्पांना पहिला विरोध केला ,काही काळानंतर तेच त्याच्या समर्थनासाठी उतरले आहेत.- राणे

    उद्धव ठाकरेंच्या विरोधाची किंमत ज्यादिवशी मोजली जाईल त्या दिवशी त्यांचे समर्थन मिळेल

     

  • 25 Apr 2023 03:22 PM (IST)

    यवतमाळ जिल्हात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात

    बाभूळगाव तालुक्यात पडला गारांचा पाऊस

    मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण

    सकाळी 11 नंतर  उन्हाचा पारा चढत होता

    अचानक वातावरणात बदल होऊन दुपारी २नंतर वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात

  • 25 Apr 2023 03:16 PM (IST)

    सोलापूर जिल्हा परिषदेच्या इमारतीवर चढले जनशक्ती शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते

    गायरान जमिनीवर शासकीय इमारत उभारली जाते, मग गरिबांचे घरकूल का बांधू दिले जात नाही? असा आरोप करत आंदोलन

    जनशक्ती संघटनेचे चार ते पाच कार्यकर्ते प्रशासनाला जाब विचारण्यासाठी चढले इमारतीवर

    पुरुष आणि महिला पदाधिकारीही चढल्या झेडपीच्या इमारतीवर

  • 25 Apr 2023 03:13 PM (IST)

    भावी मुख्यमंत्री असे बॅनर्स काढायला सांगतो- देवेंद्र फडणवीस

    नागपुरात भावी मुख्यमंत्री असे बॅनर्स झळकले..

    देवेंद्र फडणवीस म्हणाले ते बॅनर्स काढायला सांगतो, भाजपाची ही परंपरा नाही

    कर्नाटकात भाजपाला बहुमत मिळेल- देवेंद्र फडणवीस

     

  • 25 Apr 2023 03:03 PM (IST)

    बारसू रिफायनरीला विरोध करणाऱ्यांचा आम्ही सन्मान करतो, चर्चा करू- फडणवीस

    राजकारणापुरता विरोध सहन करणार नाहीत- फडणवीस

  • 25 Apr 2023 02:53 PM (IST)

    यवतमाळ | जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात

    गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण

    सकाळी 11 नंतर उन्हाचा पारा वाढतो

    अचानक वातावरणात बदल होऊन दोननंतर वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात

  • 25 Apr 2023 02:42 PM (IST)

    वाशिम | जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू

    उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना मिळाला दिलासा

  • 25 Apr 2023 02:32 PM (IST)

    वाशिम | शहरातील पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये शॉर्ट सर्किटमुळे 6 ई-बाईक जळाल्याची धक्कादायक घटना

    एका शोरुम समोर विक्रीसाठी ठेवलेल्या ई-बाईक ला ही शॉर्ट सर्किटमुळे लागली आग

    शॉर्ट सर्किटमुळे 6 गाड्या जळून खाक, शोरुम मालकाचं मोठं नुकसान

    वाशिम नगर परिषदेच्या अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नांनंतर देखील गाड्या जळून खाक

  • 25 Apr 2023 02:24 PM (IST)

    जालना | स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जाफराबाद येथील कृषी कार्यालयावर केले धरणे आंदोलन

    आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी कृषिअधिकाऱ्याच्या अंगावर कागदे फेकून मारली.

    अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा मिळावा

    विमा न देणाऱ्या पीक विमा कंपनीवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.

  • 25 Apr 2023 02:18 PM (IST)

    छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणूक

    छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणूक

    राजाराम निवडणुकीचा पहिला निकाल हाती

    संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी मारली बाजी

    माजी आमदार महादेवराव महाडिक 128 पैकी 83 मत

    महादेवराव महाडिक 29 मतांनी विजयी

  • 25 Apr 2023 02:12 PM (IST)

    मंत्री उदय सामंत यांच्याकडून ठाकरेंच्या पत्राचा दाखला

    रिफायनरीसाठी उद्धव ठाकरेंनी स्वतः केंद्राला पत्र दिलं होतं – सामंत

    उद्धव ठाकरेंनीच बारसूमधील जागा सुचवली होती – सामंत

    बारसूत दडपशाही नाही, आंदोलकांशी चर्चा सुरु – सामंत

    सामंत यांच्याकडून ठाकरेंनी २०२२ मध्ये लिहिलेल्या पत्राचा दाखला

     

  • 25 Apr 2023 02:01 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांनी तेव्हाच पत्र लिहिलं होतं

    नाशिक : बारसू आणि नाट्यामध्ये असलेली जमीन आम्ही रिफायनरी जमीन देऊ शकतो.

    लोकं राहत नाही, वाडी आणि झाडी नाही ही जमीन त्यासाठी देऊ

    हा प्रकल्प आल्यानंतर पर्यावरण ऱ्हास होणार नाही

    उदय सामंत यांची नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत माहिती.

  • 25 Apr 2023 01:52 PM (IST)

    आम्हाला विकासाची आघाडी सगळीकडे अपेक्षित आहे – प्रफुल्ल पटेल

    नाशिक : महाराष्ट्रात सर्वत्र विकास व्हायला हवा

    मुख्यमंत्री बदलाबाबत मला माहित नाही, ज्यांनी सरकार उभे केले त्यांनाच विचारा

    आमचा पक्ष वाढला पाहिजे अशी प्रत्येकाची ईच्छा आहे

    आमच्या नेत्याने (अजित पवारांनी) सूचित केले म्हणजे उद्याच त्यांना मुख्यमंत्री व्हायचे असे नाही

    पक्षाला मोठे करा, स्पर्धेत भाग घेण्याची प्रत्येकाला ईच्छा आहे

    राष्ट्रवादीला बळकट करायचे आहे, त्याप्रमाणे आम्ही काम करतोय

    प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया

  • 25 Apr 2023 01:43 PM (IST)

    एक फोन आणि उदय सामंत कार्यक्रम सोडून आले बाहेर

    नाशिक : नाशिकच्या ग्रेप पार्क मध्ये आयोजित उद्योग परिषदेत उदय सामंत झाले आहेत सहभागी

    मात्र एक फोन येताच सामंत कार्यक्रम सोडून आले बाहेर

    बरसू गावातील तणावाच्या पार्शवभूमीवर सामंत घेत आहेत फोन वरून सातत्याने आढावा

  • 25 Apr 2023 01:36 PM (IST)

    कल्याण डोंबिवली, शहापूर मध्ये मनसेला खिंडार

    कल्याण डोंबिवली, शहापूर परिसरातील शहरसंघटक, शाखाप्रमुख विभाग प्रमुख व अनेक परिसरातील पदाधिकारी मातोश्रीवर दाखल

    थोड्या वेळात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर बांधणार शिवबंधन

  • 25 Apr 2023 01:30 PM (IST)

    पुण्यातील सेंट मेरी शाळेच्या बाहेर मनसेचं आंदोलन

    पुणे : शाळेत खाजगी दलालामार्फत प्रवेश दिला जात असल्याचा आरोप

    शाळा प्रमाणित आहे का ? आरटी ई अंतर्गत दिल्या जाणाऱ्या प्रवेशाची मागितली माहिती

    सर्वसामान्य पालकांना शाळेची फी परवडत नाही खाजगी दलालामार्फत प्रवेश का दिला जातोय

    शाळेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतं मनसेनं केलं आंदोलन

    शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं

  • 25 Apr 2023 01:27 PM (IST)

    आंदोलकांना अटक व पत्रकारांना धमकी देण्यापेक्षा मानवी दृष्टीकोनातून संवेदनशीलपणे प्रश्न हाताळावा

    पुणे :  रत्नागिरीतील बारसू रिफायनरीविरोधातील आंदोलकांवरील मुस्कटदाबीचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून निषेध

    आंदोलकांना अटक व पत्रकारांना धमकी देण्यापेक्षा मानवी दृष्टीकोनातून संवेदनशीलपणे प्रश्न हाताळावा

    लोकशाहीत प्रत्येकाला शांततामय आंदोलनाचा अधिकार, सरकारने आंदोलकांच्या हितांचा, भावनांचा आदर करावा

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन आंदोलकाशी समन्वय, संवादातून मार्ग काढावा

    संवादातून मार्ग निघेपर्यंत सर्वेक्षण थांबवावं – विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे आवाहन

  • 25 Apr 2023 01:22 PM (IST)

    पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेऊन विकास करावा

    पुणे : आमचा विकास कामाला विरोध करत नाही

    बारसूतील लोकांशी चर्चा करून निर्णय काढावा

    विरोधी पक्षनेते अजित पवार यांची प्रतिक्रिया

    स्थानिक लोकांच्या समस्या काय आहे त्यावर सरकारने चर्चा करावी

  • 25 Apr 2023 01:13 PM (IST)

    पहिल्या फेरीचा चौथ्या गटातही महाडिक गट आघाडीवर

    कोल्हापूर : छत्रपती राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत महाडिक गट आघाडीवर

    सत्ताधारी राजर्षी शाहू सहकारी आघाडीचे 11 उमेदवार आघाडीवर

    महाडिक गट आणि सतेज पाटील गटात चुरस

    पहिल्या फेरीत महाडिक गटाचे उमेदवार जवळपास 800 मतांनी आघाडीवर

  • 25 Apr 2023 01:06 PM (IST)

    छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणूक

    कोल्हापूर : पहिल्या फेरीतील उत्पादक गटातही महाडिक गटाची आघाडी

    तिसऱ्या गटातील तिन्ही उमेदवार 900 मतांनी आघाडीवर

    21 पैकी महाडिक गटाचे आठ उमेदवार आघाडीवर

  • 25 Apr 2023 12:57 PM (IST)

    एमपीएससी आयोगाचे उत्तीर्ण विद्यार्थी आझाद मैदानावर बसणार उपोषणाला

    – एमपीएससी आयोगाची 2020 साली उत्तीर्ण झालेल्या राज्यसेवा गट ब च्या 217 विद्यार्थ्यांना अजूनही नियुक्ती देण्यात आलेली नाही.

    – कागदोपत्री प्रक्रिया पार पडूनही विद्यार्थ्यांना नियुक्ती न दिल्यामुळे जलसंपदा आणि अभियंता विभागातील नियुक्त्या रखडल्या आहेत.

    – स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्यांने नैराश्यात आत्महत्या केली. सरकारने आश्वासन देऊनही अदयाप नियुक्त्या न दिल्याने अनेक विद्यार्थी नैराश्यात जात आहेत.

    – सरकारने आपल्या मागण्याची दखल घ्यावी यासाठी 217 विद्यार्थी आझाद मैदानावर आजपासून उपोषणाला बसणार आहेत.

  • 25 Apr 2023 12:46 PM (IST)

    प्रेयसीला जाळण्याचा प्रयत्न करून प्रियकराची आत्महत्या

    – मूल शहरातल्या इंदिरा नगर परिसरात प्रेयसीला जाळण्याचा प्रयत्न करून प्रियकराने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

    – या प्रकरणात 40 वर्षीय प्रेयसी किरकोळ जखमी झाली आहे. तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू आहेत. तर बंडू निमगडे असे मृतक प्रियकराचे नाव आहे.

    – प्रेम संबंधामुळे घरात वारंवार खटके उडत असल्याने मृतकाने हे टोकाचे पाऊल उचलले.

  • 25 Apr 2023 12:32 PM (IST)

    नवाब मलिक यांना दिलासा नाहीच, जामीन अर्जाची सुनावणी पुढे ढकलली

    – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जामिनावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

    – नवाब मलिक यांची एक किडनी फेल झाली आहे. त्यामुळे त्यांना जामीन मिळावा असा युक्तिवाद ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी न्यायालयात केला.

    – सर्वोच्च न्यायालय नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर एक मे ला सुनावणी घेणार आहे. त्यामुळे 1 मे पर्यंत नवाब मलिक यांना तुरुंगात रहावे लागणार आहे.

  • 25 Apr 2023 12:18 PM (IST)

    रत्नागिरी सभेसाठी मनसेचा नवा व्हिडिओ, प्रश्न जिथे, जनतेचा मार्ग तिथे

    – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 6 मे रोजी रत्नागिरीत जाहीर सभा होणार आहे.

    – या सभेपूर्वी मनसे पदाधिकाऱ्यांनी या सभेचा एक व्हिडिओ तयार केला आहे.

    – कलाकारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी रत्नागिरीतील कलाकारांना एकच पर्याय तो म्हणजे मनसे

    – कलाकारांना जाणणारा हाडाचा कलाकार येतोय रत्ननगरीत

    – चला 6 मे 2023 ला स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुल

     

  • 25 Apr 2023 12:08 PM (IST)

    अभाविपने फेटाळला विद्यापीठात झालेल्या तोडफोडीचा आरोप

    – काल सावित्रीबाई फुले विद्यापीठात झालेल्या तोडफोडीचा आरोप अभाविपने फेटाळला

    – विद्यार्थ्यांनी विद्यापीठात कोणतीही तोडफोड केली नाही असा दावा अभाविपने केला आहे.

    – कुलगुरूंनी अभाविपला हीन वागणूक दिली. त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले.

    – विद्यापीठातील तोडफोडीशी आमचा काही संबंध नाही.

    – विद्यापीठानं अभाविपच्या मागण्या मान्य केल्या अभाविपचं प्रसिद्धीपत्रक काढून स्पष्टीकरण

  • 25 Apr 2023 12:00 PM (IST)

    Team India Squad Announced: WTC Final साठी टीम इंडियाची घोषणा, मुंबईच्या खेळाडूला संधी

    Team India squad for ICC World Test Championship 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे. या टीममध्ये मागच्या वर्षभरापासून बाहेर असलेल्या एका खेळाडूला स्थान मिळालं आहे. वाचा सविस्तर….

  • 25 Apr 2023 11:52 AM (IST)

    मेडीकल काॅलेजच्या मागणीसाठी हिंगणघाट बंदची हाक

    मेडीकल काॅलेजच्या मागणीसाठी स्थानिक नागरीकांचा मोर्चा

    स्थानिकांचा मोर्चा उपविभागीय कार्यालयाबाहेर दाखल

    विद्यार्थांचा मोठ्याप्रमाणात सहभाग

  • 25 Apr 2023 11:45 AM (IST)

    किसान सभेच्या आंदोलकांना विखे पाटलांकडून बैठकीचं निमंत्रण

    आज दुपारी १२.३० वाजता सह्यांद्री अताथी गृहावर होणार बैठक

    राधाकृष्ण विखे पाटील यांनी बोलाविली बैठक

    किसान सभेच्या महसूल मंत्र्याच्या लोणीमधील कार्यालयावर लाँगमार्च

  • 25 Apr 2023 11:29 AM (IST)

    राज्यातील वरिष्ठ नेते कर्नाटक निवडणूकीच्या प्रचारात

    देवेंद्र फडणवीस,गिरीश महाजन,आशिष शेलार,दरेकर कर्नाटकात

    कर्णाटक विधानसभा निवडणूकीच्या प्रचारामध्ये हे सगळे नेते होणार सहभागी

  • 25 Apr 2023 11:25 AM (IST)

    राजापूर-धारतळे चेक पोस्टवर गाड्यांची तपासणी

    रिफायनरी सर्वेक्षणस्थळी पोलिसांचा बंदोबस्त, राजापूर-धारतळे चेकपोस्टवर गाड्यांची तपासणी

    मार्गावर जाणाऱ्या प्रत्येक गाड्या अडविल्या जातायतं

    पत्रकारांनासुद्धा केला जातोय पोलीसांकडून मज्जाव

     

  • 25 Apr 2023 11:20 AM (IST)

    राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री चालेल असं बोललेलो नाही- संजय राऊत

    पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा असेल – संजय राऊत

    अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चेवर संजय राऊत यांची प्रतिक्रीया

  • 25 Apr 2023 11:12 AM (IST)

    काही लोकं आंदोलन भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत- सामंत

    मी सातत्याने पोलीसांसोबत संपर्कात आहे- उदय सामंत

    बारसूतील लोकांच्या भावनेचा सरकारने विचार करावा’- अंबादास दानवे

  • 25 Apr 2023 11:07 AM (IST)

    भाजपच्या कामच श्रेय घ्याल तर बडनेराची जनता तुम्हाला तिथेच गाडल्या शिवाय राहणार नाही

    रवी राणा आज भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देत आहे. तुझा मतलब आहे म्हणून.

    ज्या ठिकाणी रवी राणांनी बोर्ड लावले त्या ठिकाणी जनतेने काळ फासाव.

    आमदार रवी राणा यांना थुकलेल चाटायची सवय आहे ती बंद करा. या अगोदर देखील सांगितलेला आहे. जे अर्धवट कामे आहे ते आधी पूर्ण करा.

    भाजपच्या कामच श्रेय घ्याल तर बडनेराची जनता तुम्हाला तिथेच गाडल्या शिवाय राहणार नाही.

    आज पासून या आंदोलनाला सुरवात झाली आहे.

    यापुढे बडनेरा मतदारसंघात रवी राणाला तोंड उधळ माथ्याने फिरता येणार नाही.

    वेळ पडल्यावर आमदार रवी राणांच्या ईडी चौकशीची मागणी करू..

    रवी राणांनी काल विमानातून उदय सामंत यांना स्वतःचा भानखेडा मधील कोट्यवधी रुपयांचा रिसोर्ट दाखवला कुठून आले एवढे पैसे जनतेला उत्तर द्यावे लागेल…

  • 25 Apr 2023 11:06 AM (IST)

    दागिन्यांवरील मेकिंग चार्जेसचा का पडतो भार

    घडवणीच्या शुल्काची नेमकी भानगड काय

    काय द्यावा लागतो ग्राहकाला मेकिंग चार्ज

    हे शुल्क आकारताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतात

    ग्राहकांना किती मोजावा लागतो यासाठी पैसा

    कसा कमी करता येईल मेकिंग चार्ज, बातमी एका क्लिकवर 

     

  • 25 Apr 2023 10:53 AM (IST)

    माझी इच्छा मी बोलून दाखवली – रवींद्र धंगेकर

    माझी इच्छा मी बोलून दाखवली

    सगळ्यांना वाटतं की मुख्यमंत्री व्हावं

    तस मलाही वाटतं की मुख्यमंत्री व्हावं काल पत्रकार मित्रांनी विचारलं म्हणून मी तस म्हणालो

    अजित दादा खुप मोठे नेते

    ते मुख्यमंत्री व्हावं अस मलाही वाटतं

    अजित दादा आमचे नेते ते महाराष्ट्राचे नेतृत्व करतात

    मुख्यमंत्री व्ह्यायला कुणाला आवडणार नाही?

    राजकारणात कधीही काहीही होऊ शकत एखाद्याला पद मिळाव अस वाटतच

    ऑन अजित पवार

    अजिर पवार मुख्यमंत्री व्हायलाच हवेत अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मला आवडेल

    अजित दादा मोठे झालेलं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कधीही आवडेल

    अजित दादा दादा आहेत दादा जे बोलतात ते करतात

    ऑन पुणे लोकसभा

    पुणे लोकसभा कोणाला द्यायची हे महाविकास आघाडीचे नेते ठरवतील

    पक्ष जो उमेदवार देईल तो मान्य असेल

    सात वर्षापासून पुण्यात भाजपने आश्वासनाची खैरात दिली

    भाजपला लोक आता मते टाकणार नाहीत

    ऑन चंद्रकात पाटील

    चंद्रकांत पाटील हे तर आपले पाहुणे या निवडणुकीच्या आधी ते कोल्हापूरला जातील

    चंद्रकांत पाटलांची पुण्याची काही नाळ नाहीये पाहुण्यांना किती दिवस पुण्यात ठेवणार

    भाजपच्या लोकांना देखिल चंद्रकांत पाटील आवडत नाहीत

    पुण्यात चंद्रकांत पाटलांचा प्रभाव नाही आणि त्यांचा संबंध देखील नाही

    दोन वर्षांपूर्वी आले आणि पुण्याचा नेतृत्व करायला सुरुवात केली हे शक्य नाही

    ते वरून आलेल नेतृत्व

  • 25 Apr 2023 10:51 AM (IST)

    महिला पैलवानांच्या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

    महिला पैलवानांच्या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

    आज सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांवर ओढले ताशेरे

    तक्रार दाखल होऊनही तपास पुढे का नाही ? न्यायालयाची विचारणा

    आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कुस्तीपटूंचे सध्या जंतर-मंतर मैदानावर आंदोलन

    लैंगिक शोषण झाल्याचा खेळाडूंचा आरोप

    कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करण्याची महिला कुस्तीपटूंची मागणी

  • 25 Apr 2023 10:43 AM (IST)

    छत्रपती राजाराम कारखाना निवडणुकीच्या मतमोजणीचा पहिला कल हाती

    कोल्हापूर

    छत्रपती राजाराम कारखाना निवडणुकीच्या मतमोजणीचा पहिला कल हाती

    माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार सतेज पाटील गटात प्रचंड चुरस

    पहिल्या फेरीत सत्ताधारी छत्रपती राजर्षी शाहू सहकारी आघाडी उत्पादक गट क्रं 1 मध्ये आघाडीवर

    उत्पादक गट क्रमांक 1 मध्ये सत्ताधारी आघाडीवर

  • 25 Apr 2023 10:42 AM (IST)

    केरळ राज्यात पहिली वंदे भारत ट्रेन

    केरळ

    केरळ राज्यात पहिली वंदे भारत ट्रेन

    पंतप्रधान मोदींच्या हस्ते ट्रेन सुरू होणार

    तिरुवानंतपुरममध्ये मोदींचा रोड शो

    3200 कोटी रुपयांच्या विकासकामांची मोदींच्या हस्ते उदघाटन

  • 25 Apr 2023 10:42 AM (IST)

    लग्नातील मानावरून दोन गटात फिल्मी स्टाईल हाणामारी

    लग्नातील मानावरून दोन गटात फिल्मी स्टाईल हाणामारी

    छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील थापटी तांडा येथे लग्नातील मानपान वरून नवरदेव व नवरीच्या गटामध्ये लाट्या गाठ्याने तुंबळ फिल्मी स्टाईल हाणामारी झाली असून यामध्ये आठ ते दहा गंभीर जखमी झाले आहे. या भांडणाची माहिती स्थानिक नागरिकांनी तात्काळ पाचोड पोलीस ठाण्यांत कळविले असता.पोलिसानी घटनास्थळी दाखल होऊन दोन्ही गटातील जखमींना पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल केले वैद्यकीय अधिकारी डॉ बाबासाहेब घुगे यांनी जखमी वर प्राथमिक उपचार केले आहे.

  • 25 Apr 2023 10:31 AM (IST)

    पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

    पुणे

    पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

    पुण्याय औषधाच्या नावाखाली अवैध मद्याची वाहतूक

    57 लाखाचा मुद्देमाल व मद्य जप्त

    अवैध मद्याची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अटक

  • 25 Apr 2023 10:30 AM (IST)

    निलगिरी बाग परिसरातील डाळिंब मार्केट ला लागली मोठी आग

    नाशिक – निलगिरी बाग परिसरातील डाळिंब मार्केट ला लागली मोठी आग

    आगीत डाळिंब आणि इतर साहित्य जळून खाक

    आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे बंब दाखल

    सुदैवाने जीवित हानी नाही

    आगीचे कारण मात्र अस्पष्ट

  • 25 Apr 2023 10:22 AM (IST)

    अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघात आमदार रवी राणा यांच्या विरोधात भाजप आक्रमक

    अमरावती ब्रेकिंग

    अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघात आमदार रवी राणा यांच्या विरोधात भाजप आक्रमक…

    नगरसेवकांनी केलेल्या विकास कामांचं आमदार रवी राणा श्रेय घेत असल्याचा आरोप

    भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू गटनेते तुषार भारतीय यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन.

    आमदार रवी राणांनी लावलेल्या फलकाला फासणार भाजप काळ

  • 25 Apr 2023 10:21 AM (IST)

    पारनेर तहसीलदार शिवकुमार आवळकंठे आंदोलक शेतकऱ्यांवर भडकले

    पारनेर तहसीलदार शिवकुमार आवळकंठे आंदोलक शेतकऱ्यांवर भडकले

    शिवपाणंद शेतरस्त्यांसाठी शेतकऱ्यांनी केले पेरू वाटप आंदोलन

    मात्र भडकलेला तहसीलदारांनी आंदोलन शेतकऱ्यांना हुसकवले, शेतकऱ्यांचे पेरू फेकून दिल

    पारनेर तहसील कार्यालयात घडला प्रकार

    संबंधित शेतकऱ्यांनी आंदोलनासंदर्भात निवेदन दिले होते

    शांततेच्या मार्गाने पेरू वाटप आंदोलन तहसील कार्यालयात सुरू होते

    मात्र तहसीलदार आवळकंठे यांनी आंदोलन शेकऱ्यांना हुसकवलं

    तर येथे तमाशा घालायचा नाही. १४४ कलम सुरू असून, त्या अनुषंगाने आतमध्ये टाकण्याची धमकी शेतकऱ्यांना दिली

  • 25 Apr 2023 10:20 AM (IST)

    तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांच्या घोषणांमुळे तेलंगणा हे राज्य डबघाईला

    तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांच्या घोषणांमुळे तेलंगणा हे राज्य डबघाईला आले आहे.के सी राव हे पंतप्रधान पदाचा चेहरा बनू शकत नाहीत अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. बी आर एस ला महाराष्ट्रात यश मिळणार नाही, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधले महत्व संपलेले नेतेच बीआरएस मध्ये दाखल होत आहेत अशीही टीका सतीश चव्हाण यांनी केली आहे, सतीश चव्हाण यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे यांनी

  • 25 Apr 2023 10:20 AM (IST)

    बाजार समितीचा प्रचार शिगेला असताना हा प्रकार झाल्याने राजकीय वातावरण तापले

    चंद्रपूर : वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उमेदवार आणि वरोरा शिवसेना (उभाठा) तालुकाध्यक्ष दत्ता बोरेकर यांच्या दुचाकी समोर काल मध्यरात्री अज्ञात इसमाने आडवी टाकली बोलेरो गाडी,

    त्यामुळे दुचाकी घसरून बोरेकर यांच्या पायाला आणि खांद्याला जखम,

    बोरेकर यांनी त्या अज्ञात वाहनचालकाने बाजार समितीच्या निवडणूकीवरून शिवीगाळ केल्याचा आणि हल्ला करण्याच्या उद्देशाने गाडी आडवी टाकल्याचा केला आहे पोलीस तक्रारी मध्ये आरोप,

    बाजार समितीचा प्रचार शिगेला असताना हा प्रकार झाल्याने राजकीय वातावरण तापले

  • 25 Apr 2023 10:17 AM (IST)

    पीएम केअर्स फंडमध्ये देण्यांगाचा ओघ

    सरकारी आणि खासगी कंपन्यांनी ओतला पैसा

    पीएम केअर फंडात पैशांचा ओघ थांबता थांबेना

    कंपन्यांनी जमा केले 2900 कोटी

    केंद्र सरकार म्हणते या फंडावर सरकारचे नियंत्रण नाही

    सर्वाधिक दान केले या कंपनीने, वाचा बातमी 

  • 25 Apr 2023 10:11 AM (IST)

    राहुल कुल यांच्यांकडून ५०० कोटींचे मनी लॉन्ड्रिंग

    राहुल कुल यांच्यांकडून ५०० कोटींचे मनी लॉन्ड्रिंग

    संजय राऊत यांचा गंभीर आरोप

    राज्य शासन दखल घेत नसल्यामुळे सीबीआयकडे तक्रार

    सीबीआयकडून आपणास पोहच पावती मिळाली-संजय राऊत

    राज्य शासन कारवाई का करत नाही- राऊत

  • 25 Apr 2023 10:03 AM (IST)

    GT vs MI IPL 2023 : Arjun Tendulkar च्या बाबतीत रोहित शर्मा हार्दिक पंड्यासारख नाही करणार, कारण….

    GT vs MI IPL 2023 : Arjun Tendulkar च्या बाबतीत रोहित शर्माला ही रिस्क घ्यावीच लागेल. त्यामागे फक्त एकच कारण आहे. हार्दिक पंड्याने असा धोका पत्करला नव्हता. दोन्ही कॅप्टनसमोर आता सारखीच स्थिती आहे. वाचा सविस्तर….

  • 25 Apr 2023 10:02 AM (IST)

    ठाकरे गटास नितेश राणे यांचा धक्का

    वैभववाडीत उद्धव ठाकरे शिवसेनेला भाजपचे आमदार नितेश राणे यांनी जोरदार धक्का दिला आहे. वैभववाडी नगरपंचायतच्या ठाकरे सेनेच्या तीन नगरसेवकांसह शहराध्यक्ष युवा सेना तालुकाप्रमुख यांनी भाजपात प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांनी मुंबईत भाजपात प्रवेश केला. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या सर्वांचे भाजपमध्ये स्वागत केले. या प्रवेशामुळे ठाकरे शिवसेनेला वैभववाडीत मोठा धक्का बसला आहे.

  • 25 Apr 2023 10:02 AM (IST)

    Arjun Tendulkar IPL 2023 : ज्याने वाढवला पगार, त्यालाच अर्जुन तेंडुलकर देणार ‘दणका’

    Arjun Tendulkar IPL 2023: मागच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकर महागडा गोलंदाज ठरला होता. आजच्या त्याच्या कामगिरीकडे सगळ्यांच लक्ष असेल. एक ओव्हरमध्ये अर्जुन तेंडुलकरने 31 धावा दिल्या होत्या. वाचा सविस्तर….

  • 25 Apr 2023 10:01 AM (IST)

    GT vs MI 2023 Playing 11 : गुजरात विरुद्ध जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्सला काय चूका सुधाराव्या लागतील?

    GT vs MI 2023 Playing 11 : पहिल्या दोन पराभवानंतर मुंबई इंडियन्सच्या टीमने सलग तीन सामने जिंकून जोरदार कमबॅक केलं होतं. पण त्यानंतर मुंबईला पराभवाचा झटका बसला. आता प्लेऑफच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मुंबई इंडियन्सला विजय मिळवावा लागेल. वाचा सविस्तर….

  • 25 Apr 2023 09:52 AM (IST)

    मनसे बिळातील उंदिर- विनायक राऊत यांची टीका

    मनसे सारख्या बिळातल्या उंदराच्या बोलण्याकडे आम्हाला गांभीर्याने लक्ष देण्याची गरज नाही. मनसेचे नेते काय आणि कार्यकर्ते काय हे सुपारी बहाद्दर आहेत. यामुळेच त्यांचा पक्ष अधोगतिकडे जात आहे, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केलीय. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विनायक राऊत हे गल्लीतले नेते तर संजय राऊत हे बांडगुळ असल्याची टीका केली होती.

  • 25 Apr 2023 09:40 AM (IST)

    नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत रंगत

    कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक मतदानासाठी आता अवघे तीन दिवस उरले आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचा नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि पेठ या तीन तालुक्यांमध्ये विस्तार असल्याने उमेदवारांची देखील प्रचारासाठी मतदारांपर्यंत पोहचणे कठीण जात आहे. या तीन तालुक्यांत 3388 मतदार आहे. यामध्ये एकूण 223 ग्रामपंचायती आणि 110 सहकारी संस्थांचा समावेश आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक उलाढाल 1500 ते 2000 कोटी इतकी आहे. त्यामुळे सत्ता मिळविण्यासाठी दोन पॅनलमध्ये लढत होणार आहे.

  • 25 Apr 2023 09:29 AM (IST)

    छत्रपती संभाजी नगर शहरात लाठीमार

    पुन्हा एकदा छत्रपती संभाजी नगर शहरात राडा

    किल्ले अर्क परिसरात दोन गटात वाद

    वादानंतर हजारो तरुण उतरले रस्त्यावर

    तरुणांना पांगवण्यासाठी पोलिसांनी केला सौम्य लाठी चार्ज

    दोन तरुणांच्या वादाचे रूपांतर झालं राड्यामध्ये

    तब्बल एक तास हजारो तरुणांचा जमाव होता रस्त्यावर

    पोलिसांनी सौम्य लाठी चार्ज करत जमावाला पांगवले

  • 25 Apr 2023 09:29 AM (IST)

    काल पुन्हा एकदा छत्रपती संभाजी नगर शहरात राडा झाल्याची माहिती

    छत्रपती संभाजी नगर ब्रेकिंग :-

    काल पुन्हा एकदा छत्रपती संभाजी नगर शहरात राडा झाल्याची माहिती

    किल्ले अर्क परिसरात राडा झाल्याची माहिती समोर

    दोन गटात वाद झाल्यामुळे हजारो तरुण उतरले रस्त्यावर

    तरुणांना पांगवण्यासाठी पोलिसांनी केला सौम्य लाठी चार्ज

    दोन तरुणांच्या वादाचे रूपांतर झालं राड्यामध्ये

    तब्बल एक तास हजारो तरुणांचा जमाव होता रस्त्यावर

    पोलिसांनी सौम्य लाठी चार्ज करत जमावाला पांगवले

  • 25 Apr 2023 09:25 AM (IST)

    सोने-चांदीत पुन्हा घसरणीचे सत्र

    सकाळच्या सत्रात किंमती किंचित वधारल्या

    गेल्या दहा दिवसांत सोने-चांदी स्वस्त

    गेल्या 11 वर्षांत भाव डबल

    HUID क्रमांकावरुन असा ओळखा अस्सलपणा, वाचा बातमी 

  • 25 Apr 2023 09:20 AM (IST)

    रिफायनरी विरोधात आंदोलन

    रिफायनरी विरोधात आंदोलन करण्यासाठी कालपासून आंदोलक माळ रानावर ठिय्या आंदोलन करीत आहेत. कालपासून रिफायनरी विरोधक उपाशी आहेत. यामुळे अनेक महिलांना चक्कर आले. यामुळे मंगळवारी सकाळी पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहे. यामुळे विरोध केल्यामुळे पोलिसांनी लाठी चार्ज केला.

  • 25 Apr 2023 09:09 AM (IST)

    गुन्हेगारी टोळ्यांवर मकोका कारवाई

    डोंबिवली शहरात ९ संघटित गुन्हेगारी टोळ्यामधील २४ आरोपींवर मकोकातंर्गत (महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गेनाइज्ड क्राइम एक्ट)कारवाई

    चोरी , हत्त्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा, खंडणीसारखे गंभीर गुन्ह्यात होता या आरोपीचा सहभाग

    या टोळीत विशेषतः रस्त्यावर चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील चैन खेचणाऱ्या 3 इराणी टोळीचाही समावेश

    डोंबिवली सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे याची कारवाई

  • 25 Apr 2023 09:02 AM (IST)

    बेदाणाचे विक्रमी उत्पादन

    सांगली जिल्ह्यातील यंदा द्राक्ष बागायतदारांनी मोठ्या प्रमाणावर बेदाणे करण्यावर भर दिला आहे. आता सरार्स शेतकऱ्यांचा बेदाणा तयार झाला आहे, मात्र विक्रमी बेदाणाचे उत्पादन झाल्यामुळे हे बेदाणे ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेज कमी पडतात अशी द्राक्ष पट्ट्यामध्ये परिस्थिती आहे. तर आणखी काही शेतकऱ्यांच्या बागेत अजून द्राक्ष असल्याने त्याचा ही शेतकरी बेदाणा करण्याच्या मनस्थितीत आहे.

  • 25 Apr 2023 08:55 AM (IST)

    छत्रपती संभाजी नगरमध्ये मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सभेत पैसे वाटपाच्या चर्चेला उधाण

    सभेदरम्यान 500 रुपयांच्या नोटा मोजतानाचा व्हिडीओ सभेत व्हायरल

    सभेला लोकांना पैसे देऊन गर्दी जमवल्याची चर्चा

    सभेदरम्यान पैसे मोजत असताना व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सभेच्या गर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण

  • 25 Apr 2023 08:45 AM (IST)

    राज्यात परभणीत पेट्रोल-डिझेलचा उच्चांक

    नांदेड आणि सिंधुदुर्गचा क्रमांक नंतर

    या शहरा खालोखाल इतर ठिकाणी भावाची काय स्थिती

    जवळच्या पेट्रोल पंपावरील इंधनाचा भाव घ्या जाणून

    भाव जाणून घ्या एका एसएमएसवर, वाचा सविस्तर 

  • 25 Apr 2023 08:44 AM (IST)

    केंद्रीय प्रदूषण बोर्डाने दखल घेतल्यानंतर आत्ता मुंबईतील प्रदूषणाबाबत मनपाला मार्गदर्शक सुचना जारी

    ब्रेक. – केंद्रीय प्रदूषण बोर्डाने दखल घेतल्यानंतर आत्ता मुंबईतील प्रदूषणाबाबत मनपाला मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत

    – बांधकाम व्यवसायातील धूळ व हवेतील बदल ह्या बाबी ह्या मुंबईतील प्रदूषणासी कारणीभूत असल्याचं ऊघड झालंय…

    त्यामुळे हवेतील प्रदूषण नियंत्रणासाठी विभागीय स्तरावर मनपा आत्ता टास्क फोर्सची नेमणुक करणारेय…

    मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा स्तर सुधारावा म्हणून विभागीय पातळीवर प्रमाणित कार्यपद्धती (स्टॅण्डर्ड ऑपरेटींग प्रोसिजर) अंमलात आणण्याची सुरूवात झाली आहे. ..

    मुंबईत सध्या अडीच हजार ठिकाणी इमारत बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे या बांधकामांच्या अंतर्गत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात धूळ हवेत पसरतेय…

    धुळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कडक नियम करण्यात आले असून या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असा सूचक इशारा महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी बिल्डर व प्रदूषणाला हातभार लावणाऱ्यांना दिला आहे…

    लवकरच याबाबत नियम तयार करण्यात येतील आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर मनपा काय करावाई करणार हे पाहणं महत्वाचे ठरेल…

  • 25 Apr 2023 08:40 AM (IST)

    भाजीपाल्याची आवक घटली

    – नवी मुंबईच्या वाशीतील एपीएमसी बाजारपेठेत तापमानातील बदलांमुळे भाजीपाल्याची आवक कमी होऊ लागली आहे

    – ग्राहकांकडून मागणीही घटली आहे

    – शेवगा शेंग, वाटा, हिरवी मिर्चीचे दर कमी झाले आहेत

    – कोथिंबीर, आवळा, गाजरचे दर या आठवड्यात वाढले आहेत

  • 25 Apr 2023 08:36 AM (IST)

    ‘कागदोपत्री संभाजीनगरचे नाव औरंगाबादच ठेवा’

    सरकार अंतिम निर्णय घेत नाही तोपर्यंत शहराचे नाव औरंगाबाद वापरा

    मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश

    सरकारी कागदपत्रांवर औरंगाबाद हेच नाव वापरण्याच्या दिल्या सूचना

    शहराचे नाव बदलण्याच्या विरोधातील याचिकेवर खंडपीठाचे निर्देश

  • 25 Apr 2023 08:29 AM (IST)

    पुणे विमानतळावरून मालवाहतूक आता दुपटीने वाढणार

    पुणे मंत्रावर उभारण्यात आलेल्या नव्या कार्गो टर्मिनलचे काम अंतिम टप्प्यात

    नव्या कार्गो टर्मिन च्या उद्घाटनानंतर मालवाहतूक वाढणार

    मे महिन्याच्या अखेरपर्यंत नवे कार्गो टर्मिनल होणार सुरू

    देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मालवाहतूक दुपटीने वाढण्याची शक्यता

  • 25 Apr 2023 08:18 AM (IST)

    कोल्हापूर | छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणूक

    राजाराम कारखान्याच्या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात

    उमेदवार प्रतिनिधींसमोर मतपेट्या फोडण्याचं काम सुरू

    अवघ्या काही वेळात प्रत्यक्ष मतमोजणीला होणार सुरुवात

    29 टेबलवर दोन फेऱ्यात होणार मतमोजणी

  • 25 Apr 2023 08:17 AM (IST)

    पुणे विभागातील 107 औषध विक्रेत्यांचे परवाने रद्द

    अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई

    औषधांच्या विक्री प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळल्याने 107 औषध विक्रेत्यांचे परवाने रद्द

    तर 442 औषधी विक्रेत्यांचे परवाने निलंबित

    एफडीएकडून पुणे विभागात नवीन पथकाची स्थापना

    गेल्या वर्षभरात पुणे विभागातील अनेक ठिकाणावर एफडीएचे छापे

    एका वर्षात 107 जणांचे परवाने रद्द

  • 25 Apr 2023 08:16 AM (IST)

    नाशिक | पुढचे चार दिवस पुन्हा धोक्याचे

    नाशिक जिल्ह्याला उद्यापासून पुन्हा ऑरेंज अलर्ट

    बेमोसमी पावसाचा पुन्हा फटका बसण्याची शक्यता

    जिल्ह्यातील हजारो हेकटर जमिनीचे अवकाळीमुळे यापूर्वीच नुकसान

    आधीचे पंचनामे संपत नाहीत तोच पुन्हा नव्या संकटाची चाहूल

  • 25 Apr 2023 08:15 AM (IST)

    पुण्यातून धावणार ‘भारत पर्यटक ट्रेन’

    भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या ‘देखो अपना देश’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ योजनेअंतर्गत पुण्यातून धावणार पर्यटक ट्रेन

    28 एप्रिल रोजी पुण्यातून सोडण्यात येणार ‘भारत गौरव पर्यटक ट्रेन’

    जगन्नाथ पुरी, कोलकत्ता, गया, वाराणसी आणि प्रयागराज या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना नागरिकांना देता येणार भेट

    पुण्यातून पहिली ट्रेन 28 एप्रिल रोजी निघणार

    रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे करणार ट्रेनचे उद्घाटन

    भारत गौरव पर्यटक ट्रेन दहा दिवस दाखवणार देशातील मुख्य धार्मिक स्थळे

  • 25 Apr 2023 08:14 AM (IST)

    पुणे शहरात आठवड्यातून एकदा पाणी बंद?

    पुणे महापालिकेकडून पाणीपुरवठा संबंधित नियोजनाची तयारी

    पुणे महापालिका करणार 31 ऑगस्टपर्यंतच्या पाण्याचं नियोजन

    यंदा पाऊस कमी पडण्याची शक्यता

    त्याच अनुषंगाने पुणे महापालिकेचे पाण्यासाठीचे नियोजन सुरू

    खडकवासला धरण साखळीमध्ये पुरेसा पाणीसाठा

    मात्र शहराला आठवड्यातून एकच दिवस पाणी कपातीचा

    कालवा समितीच्या बैठकीनंतर पुणे महापालिका घेणार याबाबत अधिकृत निर्णय

  • 25 Apr 2023 08:13 AM (IST)

    भंडारा | हवामान खात्याचा आज ऑरेंज अलर्ट जारी

    काही ठिकाणी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता

  • 25 Apr 2023 08:13 AM (IST)

    रत्नागिरी | कोकणातील रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना पोलिसांकडून अटक

    कोळवणकर यांच्यासह इतर दोन सहकाऱ्यांना अटक

    राजापूरमध्ये पोलिसांची कारवाई

    अटक केलेले तिघेही सध्या रत्नागिरीमध्ये

  • 25 Apr 2023 08:11 AM (IST)

    पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद

    महापालिकेच्या विविध जलशुद्धीकरण केंद्रे आणि टाक्यांच्या दुरुस्तीसाठी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

    शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने होणार पाणीपुरवठा

    पाणीपुरवठा विभाग प्रमुख पावसकर यांची माहिती

    गुरुवारी दिवसभर पुणे शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

    शहरातील सर्व पेठा, स्वारगेट, धायरी ,कात्रज ,हडपसर ,वारजे औंध, वाघोली या सर्व भागात गुरुवारी पाणी बंद

  • 25 Apr 2023 08:09 AM (IST)

    कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आता अवघे तीन दिवस

    – चंद्रपूर जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आता अवघे तीन दिवस उरले आहेत.

    – सहकार क्षेत्रात अनेक वर्षांपासून हितसंबंध असणारे सहकारी संस्थांचे मतदार निष्ठावंत मानले जातात.त्यामुळे नव्याने निवडून आलेल्या ६ हजार ३१० ग्रामपंचायत सदस्यांवर सर्वच राजकीय पक्षांची मदार आहे.

    – या मतदारांची मने वळविण्यासाठी कुठे पंगती उठत आहेत, तर कुठे घोडेबाजार सुरू झाल्याच्या चर्चांना गावागावांत उधाण आले आहे.