Maharashtra Breaking Marathi News Live | बुलढाण्यातील वरुडमध्ये दोन गटात तुफान हाणामारी, 20 ते 25 जण जखमी

| Updated on: Jun 13, 2023 | 7:31 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या शहरातील आणि गावातील घडामोडींसाठी टीव्ही9 मराठीला आवश्य भेट द्या.

Maharashtra Breaking Marathi News Live | बुलढाण्यातील वरुडमध्ये दोन गटात तुफान हाणामारी, 20 ते 25 जण जखमी
Marathi News Live
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन. रत्नागिरी, श्रीहरी कोटासह वसईत पावसाला सुरुवात. पुढील दोन दिवस वेगवान वाऱ्यासह पावसाचा इशारा. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला पुण्यातून अटक. सागर बर्वे असं धमकी देणाऱ्याचं नाव. सागर आयटी इंजीनिअर असल्याची माहिती. कल्याण-डोंबिवलीतील वाद क्षुल्लक होता. वाद संपला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सारवासारव. मनसे नेते अमित ठाकरे आज मुंबई विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांची भेट घेऊन अभिनंदन करणार. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 12 Jun 2023 10:22 PM (IST)

    बुलढाण्यातील वरुडमध्ये दोन गटात तुफान हाणामारी

    बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील वरुड गावात किरकोळ कारणावरून 2 गटात तुफान हाणामारी झाली. यावरून तलवारी चालल्या आहेत. हाणामारीमध्ये दोन्ही गटातील 20 ते 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा वरुडमध्ये दाखल झाला. गावात सध्या तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी परिस्थिती हाताळली आहे. हाणामारीमध्ये जखमी झालेल्यांना उपचारासाठी खामगाव शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

  • 12 Jun 2023 10:07 PM (IST)

    कस्टम विभागाची कारवाई

    मुंबई : फॉरेन पोस्ट ऑफिसमधून MDMA च्या १२५४ गोळ्या जप्त करण्यात आल्या. एकूण ५२० ग्रॅम MDMA ड्रग्स जप्त केल्याची कारवाई कस्टम विभागाने केली आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. पार्सल स्वीकारण्यास आलेल्या दानीश शेख आणि समद उमाटिया यांना अटक करण्यात आली आहे. उमाटियाने नेदरलँड्सवरून पार्सलची ऑर्डर केली होती. डार्क वेबचा वापर करून ऑर्डर करण्यात आली होती. तर बिटकॉइन्समध्ये पैसे चुकवले होते.


  • 12 Jun 2023 10:03 PM (IST)

    वहागाव येथे जेवणातून विषबाधा, एकाचा मृत्यू

    सातारा : कराड तालुक्यातील वहागाव येथे जेवणातून 23 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली. त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. वाहगाव येथील तुकाराम राऊत असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सात जणांवर कराड येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जुलाब उलट्यांचा त्रास झालेल्या 15 जणांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.

  • 12 Jun 2023 09:01 PM (IST)

    Hsc Supplementary Exam 2023 Maharashtra Board | बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ, विद्यार्थ्यांना दिलासा

    मुंबई | महाराष्ट्र बोर्ड एचएससी परीक्षेचा निकाल 26 मे रोजी जाहीर झाला. यावेळेसही मुलींनी बाजी मारली. या परीक्षेत अनेक विद्यार्थी पास झाले. तर काहींना अपयश आले. 12 वीच्या परीक्षेत अपयशी झालेल्या विद्यार्थ्या महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून दिलासा देण्यात आला आहे. शिक्षण मंडळाने बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या तारखेत 18 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह 18 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच अर्ज विद्यार्थ्यांनी त्यांच्याच कॉलेजमधून भरायचे आहेत.

    विद्यार्थ्यांना दिलासा

  • 12 Jun 2023 08:36 PM (IST)

    Gujarat Biparjoy Update | बिपरजॉय चक्रीवादळामुळे आज 56 रेल्वे गाड्या रद्द

    गांधीनगर : बिपरजॉय चक्रीवादळाचा कहर पाहायला मिळतोय. या बिपरजॉय वादळामुळे अरबी समुद्रात लाटा पाहायला मिळतायेत. सुमद्रकिनाऱ्याला वादळाचा फटका बसलाय. या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत बचावकार्य आणि इतर महत्वाच्या गोष्टींवर चर्चा पार पडली.

    गुजरात राज्यालाही बिपरजॉयचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने खबरदारी म्हणून मोठा निर्णय घेतला आहे. गुजरातमधील बिपरजॉय प्रभावित भागातील 56 रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच उद्यापासून म्हणजेच 13 जूनपासून ते 15 जूनपर्यंत 95 रेल्वे गाड्या रद्द असतील, असा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

  • 12 Jun 2023 08:23 PM (IST)

    Shiv Sena Party Meeting | शिवसेना आमदार, खासदार आणि नेत्यांची बैठक

    मुंबई | राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना आमदार, खासदार आणि नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बैठक बोलावली आहे. वर्धापन दिनाच्या तयारीसह विविध विषयांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं समजतंय. वरळीतील एनएससीआय सभागृहात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

  • 12 Jun 2023 08:12 PM (IST)

    Manohar Joshi Discharge | माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

    मुंबई | राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु होते. मनोहर जोशी यांची काही दिवसांपूर्वी प्रकृती सुधारल्याने त्यांना आयसीयूतुन शिफ्ट करण्यात आले होते. मनोहर जोशी यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने 22 मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं.

    मनोहर जोशी यांना डिस्चार्ज

  • 12 Jun 2023 07:59 PM (IST)

    वारकऱ्यांनी दाखवली मोठी माणुसकी, व्हिडीओ व्हायरल 

    पुण्यातील पालखी सोहळ्यासाठी आज हजारो भाविक हे एफ. सी. रोडवर दाखल झाले आहेत. मोठी गर्दी सायंकाळपासूनच एफ. सी. रोडवर बघायला मिळत आहे. यादरम्यान आज एफ. सी. रोडवरून अँब्युलन्स जात होती. अँब्युलन्स जात असल्याचे लक्षात येताच वारकऱ्यांनी आणि पुणेकरांनी अँब्युलन्सला वाट करून देत माणुसकीचे दर्शन दाखवून दिले आहे.

  • 12 Jun 2023 07:51 PM (IST)

    भरधाव हायवाने दोन दुचाकीला उडवले

    जालना येथे एक धक्कादायक घटना घडलीये. भरधाव हायवाने दोन दुचाकीला उडवले. मुरूम घेऊन जाणाऱ्या हायवाने दोन दुचाकीला धडक दिल्याने दोन्ही तरूण हे थेट डाव्या कालव्यात वाहून केले. यापैकी एक जण गंभीर जखमी झालाय. वाहून गेलेले दोन्ही तरुण हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील भोगलगावाचे रहिवाशी असल्याची माहिती मिळत आहे. वडीगोद्री -जालना मार्गांवरील हे संपूर्ण प्रकरण आहे.

  • 12 Jun 2023 07:46 PM (IST)

    पोलिसाची कॉलर पकडून बेदम मारहाणीची घटना

    वसईत लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या पती पत्नीसह मैत्रिणीने भर रस्त्यात पोलिसांची कॉलर पकडून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीये.  शनिवारी मध्यरात्री वसईच्या दत्तानी मॉल समोरील मुख्य रस्त्यावर रात्री साडे बारा वाजता ही घटना घडली आहे. मुख्य रस्त्यावर भांडण सुरू असताना विनाकारण जमलेली गर्दी पांगवत असताना आरोपी पती पत्नी आणि त्याच्या मैत्रिणीलाही बाजूला जाण्यास सांगताच त्यांनी पोलिसांची कॉलर पकडून मारहाण केली आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे.

     

  • 12 Jun 2023 07:32 PM (IST)

    संत तुकाराम महाराजांची पालखी एफ. सी. रोडवर दाखल

    संत तुकाराम महाराजांची पालखी ही नुकताच एफ. सी. रोडवर दाखल झाली आहे. भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे बघायला मिळत आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेत आहेत. टाळ, चिपळ्याने परिसर दुमदुमला आहे. तसेच दर्शन घेण्यासाठी भाविकांनी देखील मोठी गर्दी केल्याचे बघायला मिळत आहे.

  • 12 Jun 2023 07:28 PM (IST)

    माऊलींच्या पालखीचे दर्शन भिडे गुरुजी घेणार 

    थोड्याच वेळात माऊलींची पालखी शिवाजीनगरला दाखल होणार आहे. माऊलींच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. माऊलींच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भिडे गुरुजी देखील दाखल झाले आहेत. अनेक राजकिय नेते हे देखील माऊलींच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी पोहचले आहेत.

     

  • 12 Jun 2023 07:25 PM (IST)

    गोवंश तस्करी वाहतूकीच्या संशयावरून जमावाकडून तिघांना मारहाण

    नाशिकच्या इगतपुरीत गोवंश तस्करी वाहतूकीच्या संशयावरून जमावाकडून तिघांना मारहाण करण्यात आली. जीव वाचविण्याच्या उद्देशाने अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्याने दोन दिवस अगोदर दरीत पडल्याने त्यातील एकाचा मृत्यू झालाय. मारहाणीत एक जण गंभीर जखमी देखील झाले होते. एकूण 15 ते 16 जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून 6 जणांना अटक करून इतरांचा शोध सुरू आहे.

  • 12 Jun 2023 07:18 PM (IST)

    जुहू चौपाटीला फिरायला आलेले सहा जण समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना  

    मुंबईच्या जुहू चौपाटी येथे एक धक्कादायक घटना घडलीये. या घटनेनंतर सर्वत्र अत्यंत भीतीचे वातावरण हे बघायला मिळत आहे. मुंबईतील जुहू चौपाटी या ठिकाणी फिरायला आलेले सहा जण समुद्रात बुडाल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. इतकेच नाही तर या घटनेमध्ये  स्थानिकांनी आतापर्यंत दोन जणांना रेस्क्यू केले आहे. मात्र, अजूनही चार जण हे बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

  • 12 Jun 2023 07:11 PM (IST)

    महाराष्ट्राकडे देशातील सर्वात प्रगतशील राज्य म्हणून पाहिले जाते- देवेंद्र फडणवीस 

    नुकताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले आहेत की, महाराष्ट्राकडे देशातील सर्वात प्रगतशील राज्य म्हणून पाहिले जाते. महाराष्ट्र देशाच्या उत्पादनामध्ये जवळपास 23 टक्के वाटा असलेले महाराष्ट्र आहे. गुंतवणुकीतमध्ये आज आपले राज्य  सर्वात पुढे आहे असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले. या प्रगतीचे शिल्पकार हे ब्रँड्स आहे, या ब्रँड्सचे आम्ही सत्कार करत आहे, असेही फडणवीस म्हणाले.

  • 12 Jun 2023 06:51 PM (IST)

    गुजरातमधील 56 रेल्वे गाड्या रद्द

    बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातमधील प्रभावित भागात 56 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, बिपरजॉय चक्रीवादळाच्या भावित भागातील सोमवारी 56 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मंगळवारपासून 15 जूनपर्यंत एकूण 95 गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.

  • 12 Jun 2023 06:41 PM (IST)

    संत तुकोबारायांच्या पालखीनंतर माऊलींची पालखी पुण्यात दाखल

    पुणे : माऊलींची पालखी पुण्यात दाखल झाली आहे. संगमवाडी परिसरात भाविकांकडून पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आलं आहे. पुण्यातील भवानी पेठेतील विठोबा मंदिरात हा मुक्काम असणार आहे. पुणेकरही मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहिले आहेत.

  • 12 Jun 2023 06:31 PM (IST)

    खासदार डॉ. अमोल कोल्हेंची फडणवीसांवर टीका

    माऊलींच्या संजीवनी समाधी असलेल्या ठिकाणी वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला ही दुर्दैवी गोष्ट असल्याचं खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. समाज माध्यमाध्ये वारकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याचा व्हिडिओ दिसतोय. मात्र जे समोर दिसते ते नाकारायचे आणि खोटं बोल पण रेटून बोल अशी भावना गृहमंत्रीची झाली आहे. वारकऱ्यांच्या भावनांचा आदर करून सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे.

  • 12 Jun 2023 06:21 PM (IST)

    तुकोबांच्या पालखीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

    तुकोबांच्या पालखीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. अनेक मानाच्या दिंड्या पुण्यात दाखल झाल्या आहेत. तुकाराम महाराजांची पालखी संगमवाडी पुलावरून आता पुढे गेली आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील स्वागतासाठी उपस्थित होते. परदेशी पाहुणेही पालखी सोहळा पाहण्यासाठी दाखल झाले आहेत.

  • 12 Jun 2023 06:11 PM (IST)

    महाराष्ट्रात भाव मिळत नसल्यामुळे कांदा निघाला तेलंगणााला

    तेलंगणा राज्यातील हैदराबादला महाराष्ट्रातील कांद्याची विक्री होत आहे. महाराष्ट्राच्या तिप्पट भावात तेलंगणात कांद्याला भाव मिळत आहे. हैदराबादच्या मार्के मध्ये कांद्याची खरेदी सुरू असून तेलंगणा सरकारकडून कांदा खरेदी विक्रीसाठी सहकार्य केलं जात आहे. बीआरएस पक्षाचे झेंडे लावून कांदा निघाला हैदराबादला नेला जात आहे. महाराष्ट्रात 400 रुपये कांद्याला भाव तर तेलंगणात कांद्याला 1900 रुपये भाव मिळाला आहे.

  • 12 Jun 2023 05:57 PM (IST)

    पुण्यात ऑन ड्युटी पोलीस ऑफिसर रंगले विठ्ठलाच्या भक्तीत

    बंदोबस्तातील पोलिस भक्ती रसात न्हाऊन जातात याचे उदाहरण पाहायला मिळालं. ज्ञानोबा आणि तुकोबा महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यात दाखल होत आहे. या निमित्ताने एफ सी रोड वर पोलिस उपनिरीक्षक मोहन टापरे हे पोलिस अधिकारी बंदोबस्तावर आहेत यावेळी त्यांनी पालखीच्या दर्शनासाठी जमलेल्या भाविक भक्तांसमोर संतांचे अभंग सादर करून एक अनोखा संदेश दिला. त्यांच्या या संतवाणीने उपस्थितीत हरखून गेले.

  • 12 Jun 2023 05:55 PM (IST)

    29 मुले कथित तस्करी प्रकरण

    मनमाड, नाशिक 29 मुले कथित तस्करी प्रकरण. चार शिक्षक मौलानांना मनमाड न्यायलयाने दिली 14 दिवसांची न्यायलयीन कोठाडी. चारही आरोपींची पोलीस कोठडी संपल्यामुळे त्यांना आज मनमाड कोर्टात हजर करण्यात आले होते. आता या चौघांनाही न्यायलयाने सेंट्रल जेल मध्ये पाठवले.

  • 12 Jun 2023 05:43 PM (IST)

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वागत कमानीचे बांधकाम थांबवणाऱ्यावर अट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करा अशी मागणी

    सांगली मिरज तालुक्यातील बेडग येथे विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वागत कमानीचे बांधकाम थांबवणाऱ्यावर अट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करा अशी मागणी एमआयएम पक्षाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि पोलीस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे यांच्यासह बेडग गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

  • 12 Jun 2023 05:38 PM (IST)

    वारकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्विकारून माफी मागा

    नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांची माफी मागावी. अन्यथा आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्र्यांना पंढरपूर मध्ये पायी ठेवू देणार नाही. संभाजी ब्रिगेडनं राज्य सरकारला दिला इशारा. आळंदीत एका खोलीत कोंडून झालेली मारहाण अर्थात वारकऱ्यांवर झालेला हल्ला हा शिंदे-फडणवीस सरकारचा नाकर्तेपणा आहे. वारकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्विकारून माफी मागा.

  • 12 Jun 2023 05:30 PM (IST)

    जुहू बीच: समुद्राच्या मध्यभागी सुमारे 3 ते 4 फूट उंच लाटा, सतर्कतेचा इशारा

    भरतीच्या काळात मुंबईतील जुहू बीचवर समुद्राच्या मध्यभागी उंच लाटा उसळत आहे आणि समुद्राचे पाणी बाहेर येत आहे. या लाटा समुद्राच्या मध्यभागी सुमारे 3 ते 4 फूट उंच उठत आहे. जुहू चौपाटीवर फिरायला आलेल्या लोकांना पोलिस आणि लाइफगार्ड जुहू बीचवर येण्यापासून रोखत आहेत. त्यानंतरही काही लोक समुद्रात उसळणाऱ्या या उंच लाटांचा आनंद घेत आहेत. समुद्राच्या वाढत्या लाटा पाहून कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी पर्यटकांना पाण्यापासून दूर ठेवण्यात आले आहे.

  • 12 Jun 2023 05:30 PM (IST)

    कोल्हापूर: राजू शेट्टी यांचा राज्य सरकारवर घणाघाती आरोप

    ‘शासन आपल्या दारी’ ही प्रचारी थाटाची कल्पना आहे. राजू शेट्टी यांचा राज्य सरकारवर घणाघाती आरोप. ऊस दर नियंत्रण मंडळ स्थापन करायला वेळ नाही आणि म्हणे हे गतिमान सरकार आहे. तुम्ही आमच्या दारात आला ठीक आहे पण आमच्या ऊस दरात काय? अनुदानाचं काय? बदल्याचं रेटकार्ड मी जाहीर केलं होतं, पैसे देऊन बदल्या करून घेणारे अधिकारी नागरिकांना लुटतात. उद्याचा कार्यक्रम झाल्यानंतर कुठल्या लाभधारकाने कुणाला किती पैसे दिले याची यादी जाहीर करणार. राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा

  • 12 Jun 2023 05:22 PM (IST)

    सांगली: दुष्काळी जत तालुक्यातल्या पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

    दुष्काळी जत तालुक्यातल्या पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पूर्व भागातल्या जवळपास पाच ते सहा गावांनी म्हैसाळ सिंचन योजनेच्या पाण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुष्काळग्रस्त ग्रामस्थांनी धरणे आंदोलन सुरू करत पाणी मिळाल्याशिवाय उठणार नाही,अशी भूमिका जाहीर केली आहे.

  • 12 Jun 2023 05:14 PM (IST)

    400 मुलांचं धर्मांतर झालं की नाही ते पोलिसांनी सांगावं- जितेंद्र आव्हाड

    मुंब्र्याला बदनाम करायचा कट आहे. 400 मुलांचं धर्मांतर झालं की नाही ते पोलिसांनी सांगावं. पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती द्यावी. मुंब्र्याचा विकास वेगाने होतोय. मुंब्रा धर्मांतर प्रकरणी जितेंद्र आव्हाड आक्रमक. ठाण्यापेक्षा मुंब्र्याचे रस्ते अतिशय चांगले.

  • 12 Jun 2023 05:03 PM (IST)

    शिंदे गटाच्या चार मंत्र्यांना डच्चू मिळणार- संजय राऊत

    ठकारे गटाचे खासदार संजय राऊय यांनी शिंदे गटाच्या चार मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याचा दावा केला आहे. शिंदेच्या चार मंत्र्यांच्या हटवण्यासाठी केंद्रातून दबाव असल्याचं राऊत यांनी सांगितलं आहे. संजय राऊत यांच्या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

  • 12 Jun 2023 04:56 PM (IST)

    इटलीचे माजी पंतप्रधान सिल्व्हियो बर्लुस्कोनी यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन

    इटलीचे माजी पंतप्रधान सिल्व्हियो बर्लुस्कोनी यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. ते तीन वेळा इटलीचे पंतप्रधान म्हणून निवडून आले होते. 1994 मध्ये ते पहिल्यांदा पंतप्रधान झाले आणि त्यांचा कार्यकाळ 1995 पर्यंत होता. आणि दुसऱ्यांदा ते 2001 मध्ये पंतप्रधान झाले आणि 2006 पर्यंत या पदावर राहिले. 2008 मध्ये ते तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आले आणि 2011 पर्यंत ते पंतप्रधान राहिले.

  • 12 Jun 2023 04:52 PM (IST)

    बिपरजॉय चक्रीवादळ 15 जून रोजी सौराष्ट्र, कच्छ आणि पाकिस्तानच्या किनारपट्टीवर धडकणार

    बिपरजॉय चक्रीवादळ हळूहळू 5 कि.मी. प्रति तास वेगाने उत्तरेकडे सरकत असून 14 जूननंतर त्याची दिशा बदलेल. 15 जूनच्या दुपारपर्यंत तीव्र चक्रीवादळ सौराष्ट्र, कच्छ आणि पाकिस्तानच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याची माहिती आयएमडीने दिली आहे.तसेच 14 ते 15 जून दरम्यान सौराष्ट्र, कच्छमध्ये मुसळधार पाऊस पडेल.

  • 12 Jun 2023 04:49 PM (IST)

    कुख्यात माफिया खान मुबारकचा हरदोई तुरुंगात मृत्यू

    प्रदीर्घ काळापासून हरदोई कारागृहात बंदिस्त असलेल्या माफिया खान मुबारकचा मृत्यू झाला आहे. माफिया खान मुबारकच्या मृत्यूची माहिती मिळताच पोलीस सतर्क झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खान मुबारक यांची प्रकृती तुरुंगातच बिघडली होती. यानंतर त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाला.

  • 12 Jun 2023 04:44 PM (IST)

    भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक 4 जुलै रोजी होणार

    भारतीय ऑलिम्पिक महासंघाने रिटर्निंग ऑफिसरला पत्र लिहून भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका 4 जुलै रोजी घ्याव्यात असे म्हटले आहे. बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक आणि काही प्रशिक्षकांची भेट घेतल्यानंतर क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक 30 जूनपर्यंत होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, तांत्रिक कारणांमुळे निवडणूक प्रक्रिया 4 जुलै रोजी होणार आहे.

  • 12 Jun 2023 04:07 PM (IST)

    कोल्हापूरातील ‘शासन आपल्यादारी’साठी सांगलीतून 100 बस रवाना

    सांगली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर येथे मंगळवारी होणाऱ्या ‘शासन आपल्यादारी’ या उपक्रमाला उपस्थित राहण्यासाठी सांगलीतून एसटी महामंडळाच्या 100 बसेस कोल्हापूरकडे रवाना झाल्या आहेत. कोल्हापूरमध्ये या बसेस एकत्रित होणार आहेत. तेथून उद्या सकाळी कार्यक्रम स्थळी नागरिकांना ने आण करण्यासाठी या बसेस मागविण्यात आल्या आहेत. त्यासाठी आज सांगली डेपोसह सांगली जिल्ह्यातून शंभर बसेस कोल्हापूर विभागाकडे पाठवण्यात आल्या आहेत. उद्या या सर्व बसेसच्या माध्यमातून ‘शासन आपल्यादारी’ या कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांना या बसेसमधून कार्यक्रम स्थळी नेऊन पुन्हा बस स्थानकापर्यंत सोडण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

  • 12 Jun 2023 03:44 PM (IST)

    आळंदीत घटनेत देवस्थानचा संबंध नाही

    आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात वारकरी आणि पोलिसांमध्ये काल झटापट झाल्याने खळबळ उडाली होती. पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांवर पोलिसांनी लाठीमार केल्याच्या घटनेत आळंदी देवस्थानचा काही संबंध नसल्याचे देवस्थानने म्हटले आहे. त्यामुळे आनंदाच्या या सोहळ्याला गालबोट लागले होते. कालचा प्रकार हा गैरसमजतीतून झाला आहे, एकुण 47 दिंड्या होत्या, त्यामध्ये 75 वारकऱ्यांना पास दिले होते,वारकरी शिक्षण संस्थेतीलही मुलांनाही देवस्थानचे पास दिले होते, मात्र अधिक संख्या असल्याने त्यांनी हट्ट धरला. मुलंही वारकरी म्हणून हट्ट करत होती. आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांनी काम केले, यात चुका शोधण्यापेक्षा सुधारणा करूया, याचे कोणीही राजकारण करू नये , असे आवाहन आळंदी देवस्थानकडून केले आहे.

  • 12 Jun 2023 03:19 PM (IST)

    सायन पुलावर इलेक्ट्रिकचा पोल कोसळून दुचाकीस्वार जखमी

    सायन येथील पुलावर जोरदार वाऱ्यामुळे इलेक्ट्रीक पोल कोसळून एक दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात त्याला फारसी गंभीर दुखापत झाली नसली तरी रस्त्यावरील इलेक्ट्रीक पोल जर वाऱ्याने कोसळून अपघाताला आमंत्रण मिळत असेल तर हा गंभीर प्रश्न आहे.

    शहरात तीन दिवसांपासून सोसाट्याच्या वाऱ्याने वाहतूक कोंडी झाली असतानाच सायन सर्कलच्या पुलावरुन सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर इलेक्ट्रिकचा पोल कोसळल्यामुळे दुचाकीस्वार जखमी होऊन वाहतूक कोंडी झाली आहे. यावेळी पोलिस घटनास्थळी दाखवत होते. ह्या ठिकाणी दोन इलेक्ट्रिक पोल पडले असून एक पोल थेट दुचाकीवर पडल्याने एक जखमी झाला आहे. या दुचाकी चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला टिळक रुग्णायालयात दाखल करण्यात आले आहे

  • 12 Jun 2023 02:58 PM (IST)

    वन्यप्राण्यांकडून शेतीचे नुकसान

    बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात उंद्री सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी शेतीचे नुकसान करत आहेत. त्यामुळे वन विभागाकडून या संपूर्ण नुकसानाची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शेतकऱ्यांकडून सातत्याने वनविभागाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र असे असून देखील वनविभागाकडून अद्याप शेतकऱ्यांना कुठलीच नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही.

  • 12 Jun 2023 02:54 PM (IST)

    जामनेरमध्ये युवा सेनेच्या वतीने आंदोलन

    जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये युवा सेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. मंत्री गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार, गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस यांचे फोटो ठेवत राज्य सरकारच्या निषेधार्थ पिंडदान आंदोलन केले. कापसाला भाव मिळावा, शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्य भावात मिळावी, यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

  • 12 Jun 2023 02:46 PM (IST)

    सायन पुलावर वाहतुकीची कोंडी

    सायन पुलावर असलेल्या इलेक्ट्रिकचा पोल कोसळला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. सायन सर्कलच्या पुलावरुन सीएसएमटीला जाणाऱ्या रस्त्यावर इलेक्ट्रिकचा पोल पडल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. या ठिकाणी दोन इलेक्ट्रिक पोल पडले असून एक पोल थेट दुचाकीवर पडला आहे.

  • 12 Jun 2023 02:37 PM (IST)

    बीडमध्ये आंदोलन

    बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सामाजिक कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीसाठी सरण आंदोलन सुरू केले आहे. जिल्ह्यातील 656 लहान मोठ्या गावात स्मशानभूमीची मोठी दुरावस्था आहे. पावसाळ्यामध्ये अंत्यसंस्कार दरम्यान मृतदेहाची हेळसांड होत आहे. यामुळे स्मशानभूमीची दुरावस्था प्रकरणी तातडीने उपाययोजना करावी. या प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर प्रतीकात्मक सरण आंदोलन करण्यात आले. सरणावर बसून जोरदार घोषणाबाजी करत या आंदोलनाने सर्वांचचं लक्ष वेधले आहे.

  • 12 Jun 2023 02:30 PM (IST)

    पालघरमध्ये अंमल पदार्थ जप्त

    अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना जेरबंद करण्यात पालघरमधील तलासरी पोलिसांना यश आलं आहे . पोलिसांनी नाकाबंदी करून ही कारवाई केली आहे. यामध्ये 1 लाख 98 हजार 600 रुपये किंमतीचा 9 किलो 930 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरोधात तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

  • 12 Jun 2023 02:23 PM (IST)

    धुळे महासभेत आंदोलन

    धुळे शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या विरोधात महासभेमध्ये आज पाणी प्रश्न चांगलाच गाजला. या पाणी प्रश्नावरण विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी एकत्र येत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी थेट रिकामे हांडे घेऊन सभागृहात प्रवेश केला आणि पाणी द्या पाणी द्या अशा घोषणाबाजी करत सभागृह दनाने सोडले. मात्र पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधारी भाजपकडून सर्व प्रयत्न केले जात असून, लवकरच शहरांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. त्यामुळे विरोधकांनी नसत्या विषयाचं भांडवल करू नये, असा दम आंदोलन नगरसेवकांना देण्यात आला.

  • 12 Jun 2023 02:07 PM (IST)

    बनावट प्रमाणपत्र 11 जणांविरोधात गुन्हा दाखल

    नांदेड पोलीस भरतीत बनावट प्रमाणपत्र दाखल केल्या प्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2022-23 या काळात नांदेड येथे पोलीस भरती घेण्यात आली होती, या भरती प्रक्रियेत 9 जणांना भूकंपग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र दाखल केले. या प्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 12 Jun 2023 02:00 PM (IST)

    गोंदिया | नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात 423 रानगव्यांची नोंद

    गोंदिया बौध्द पौर्णिमेच्या दिवशी आयोजित प्राणीगणना रद्द झाली. दरम्यान प्रशासनाच्या वतीने 3 जून रोजी प्राणीगणना आयोजित केली होती. त्या अनुषंगाने नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्पात 3 जून रोजी आटोपलेल्या वन्यप्राणी गणना निसर्गानुभव यामध्ये सर्वाधिक 423 रानगव्यांची नोंद घेण्यात आली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर रानडुकरांची नोंद आहे. या आकडेवारीवरून मात्र नवेगाव नागझिरा हे जरी व्याघ्र प्रकल्प असले तरी यात रानगव्यांचीच संख्या अधिक असल्याचे बोलले जात आहे. वन्यप्राण्यांसाठी राखीव करण्यात आलेल्या जंगलांमध्ये कोणत्या प्राण्याची किती संख्या आहे. याची मोजणी करण्यासाठी दरवर्षी वन्यप्राणी गणना केली जाते.

    दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ही वन्यप्राणी गणना केली जाते. मात्र यंदा बुद्ध पौर्णिमेच्या सप्ताहात सलग पाऊस बरसनार म्हणून 5 मे रोजी वन्यप्राणी गणनेचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यानंतर वन्यप्राणी गणनेचा कार्यक्रम 3 जून रोजी घेण्यात आला. यामध्ये नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पाणवठ्यांवर हा वन्यप्राणी गणना निसर्गानुभव कार्यक्रम घेण्यात आला होता.

  • 12 Jun 2023 01:52 PM (IST)

    पालघर | अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश

    अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना जेरबंद करण्यात तलासरी पोलिसांना यश आलं आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नाकाबंदी करून पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत 1 लाख 98 हजार 600 रुपये किमतीचा 9 किलो 930 ग्रॅम इतका गांजा पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. आरोपीं विरोधात तलासरी पोलीस ठाण्यात 154 /2023 , गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 (ब), 20(ब) (2), 29 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तलासरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वसावे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

  • 12 Jun 2023 01:48 PM (IST)

    जळगाव | शेतकऱ्यांसह विविध प्रश्नांसाठी अनिल पाटील यांचे धरणे आंदोलन

    शेतकऱ्यांसह विविध प्रश्नांसाठी आणि प्रशासकीय इमारतीच्या कामासाठी जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रतोद तथा आमदार अनिल पाटील यांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आंदोलन धरणे आंदोलन करून आमरण उपोषण पुकारले आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून कापूस,केळी, कांदा पिकाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. व्यापाऱ्यांकडून कृत्रिम बियांनाची टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी हे धरणे आंदोलन सुरू असेल यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

  • 12 Jun 2023 01:44 PM (IST)

    बारामती लोकसभेसाठी भाजपची लगबग सुरू, भाजप पदाधिकाऱ्यांची झाली बैठक

    बारामती लोकसभेसाठी भाजपकडून तयारीला सुरुवात करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपचे बारामती लोकसभेचे प्रमुख आमदार राहुल कुल यांनी आज भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे शिवाय प्रत्येक बूथ सक्षम करण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहनही आमदार राहुल कुल यांनी आज बारामतीत केले. यावेळी बारामती, पुरंदर, दौंड तालुक्यातील भाजप पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

  • 12 Jun 2023 01:41 PM (IST)

    बिपरजॉय चक्रीवादळ भारताच्या किनारपट्टीवर आज धडकणार?

    बिपरजॉय चक्रीवादळ भारताच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर बिपरजॉय चक्रीवादळ धडकण्याचा धोका नाही. पण या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येणार आहे. उत्तर कोकण आणि मुंबई किनारपट्टी लगतच्या भागात वाऱ्यांचा वेग अधिक असणार आहे, बिपरजॉय चक्रीवादळाचा लँडफॉल 15 जूननंतर होण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे. 15 जूननंतर पुढील 2 ते 3 दिवस गुजरात, राजस्थान आणि दिल्लीत पावसाची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवली आहे.

  • 12 Jun 2023 01:38 PM (IST)

    धाराशिव | ‘गुन्हेगार नव्हे तर गुन्हेगारी मानसिकता बदलणे गरजेचे’, आरोपींच्या समुपदेशनाचा उपक्रम

    गुन्हेगार नव्हे तर आरोपीची गुन्हेगारी मानसिकता बदलणे गरजेचे आहे, नेमके हे काम धाराशिव पोलीस करीत असुन वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपीच्या पुनर्वसन व त्यांना समुपदेशन करण्याचा उपक्रम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे राबवित आहेत. आरोपीची माहिती एकत्र करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात अनन्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असुन त्यांना वैद्यकीय मदत, व्यावसायिक मार्गदर्शन केले जात आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी याबाबत माहिती सांगितली

  • 12 Jun 2023 01:32 PM (IST)

    भंडारा | मोहाडी तालुक्यात घरकूल लाभार्थ्यांच्या एल्गार, ग्रामपंचायती सामोर २०० जणांचं उपोषण

    भंडारा जिल्ह्यातील सालई खुर्द शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्याचा शासनाचा धोरणात्मक निर्णय असला तरी अतिक्रमण धारकांना याचा फायदा होताना दिसत नाही आहे. मोहाडी तालुक्यातील सालई खुर्द येथील शिवाजी नगर मधील मागील ३५-४० वर्षांपासून अतिक्रमण जागेवर वास्तव्य करीत असलेल्या गोरगरीब, वंचित, बेरोजगार, बेघर लाभार्थ्याना प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर आहे. तरीसुद्दा त्या जागेवर ग्रामपंचायत बांधकामाची परवानगी देत नसल्यामुळे लाभार्थ्यांनी एल्गार पुकारला आहे. ग्रामपंचायत समोर बेमुदत उपोषणावर बसलेले आहेत. ग्रामपंचायतने पाहिजे त्या प्रमाणात पाठपुरावा केला नेल्याने अतिक्रमण धारकांचे घरकुल मंजूर असून सुद्दा आतापर्यंत त्यांना रीतसर परवानगी मिळाली नाही. घरकुल बांधकामाची परवानगी दयावी या मागण्याकरिता घरकुल लाभार्थी व २०० नागरिकांचा ग्रामपंचायत समोर भर उन्हात उपोषणावर बसले आहेत.

  • 12 Jun 2023 01:29 PM (IST)

    पंढरपुरात आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भारत राष्ट्र समितीने पोस्टरबाजी

    पंढरपूर येथे बी आर एस हा पक्ष शेतकऱ्यांचा असल्याने के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात सुरुवात केली आहे. के सी आर यांच्या भारत राष्ट्र समितीमध्ये भगीरथ भालके जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता पंढरपुरात भारत राष्ट्र समितीने पोस्टर बाजी सुरू केली आहे

  • 12 Jun 2023 01:25 PM (IST)

    जळगाव | अमळनेरमधील तीन दिवसांची संचार बंदी आज संपली, रस्त्यावर नागरिकांची वर्दळ

    जळगावच्या अमळनेरमध्ये लावण्यात आलेली संचार बंदी आज संपली आहे. तीन दिवसांनी संचारबंदी संपल्याने नागरिकांची रस्त्यावर वर्दळ बघायला मिळाली आहे. व्यापारी असतील व्यवसायिक असतील यांनी आपले दुकाने उघडून पुन्हा आपल्या दिनचर्याला सुरुवात केली आहे. सध्या अमळनेर मध्ये शांतता बघायला मिळत आहे. तीन दिवसांपूर्वी अमळनेर मध्ये शुल्लक कारणावरून दोन गटात दगडफेक झाली होती. या पार्श्वभूमीवर अमळनेर मध्ये कलम 144 नुसार सलग तीन दिवस संचारबंदी लावण्यात आली होती. तीन दिवसानंतर अमळनेर मधली संचारबंदी उठवण्यात आली आहे.

  • 12 Jun 2023 01:16 PM (IST)

    नाशिक | संभाजी ब्रिगेडच्या वतीने सरकारच्या विरोधात आंदोलन

    नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. काल रविवारी आळंदी येथे वारकऱ्यांसोबत झालेल्या घटनेचा नाशिकमध्ये आज निषेध करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिकच्या पंचवटी येथील यशवंतराव महाराज पटांगणावर हे निषेध आंदोलन पाहायला मिळतेय. कार्यकर्त्यांनी निषेध म्हणून ‘मुंडन आंदोलन’ केल्याचे पाहायला मिळाले.

  • 12 Jun 2023 01:12 PM (IST)

    श्री ज्ञानेश्वर आणि श्री तुकाराम महाराज यांची पालखी मार्गस्थ होणारे पुण्यातील रस्ते वाहतुकीसाठी होणार बंद

    श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन तसेच पालखी मार्गस्थ होत असताना शहरातील रस्ते बंद करण्यात येतात. पालखी मार्गस्थ होणारे रस्ते पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद होणार असून फर्ग्युसन कॉलेज रोड, जंगली महाराज रोड ,टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. सोयीनुसार टप्प्याटप्प्याने शहरातील मुख्य रस्ते वाहतूक पोलीस बंद करणार आहेत. वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी पालखी मार्गावरील प्रमुख चौक आणि रस्ते टप्प्याटप्प्याने वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. लाइव्ह लोकेशन सुविधेमुळे पालखी सोहळ्याची माहिती नागरिकांना उपलब्ध होईल,तसेच वाहतुकीचे नियोजनही करणे शक्य होणार आहे. सोहळ्यानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहेत. diversion.punepolice.gov.in या लाइव्ह लोकेशनमुळे रस्ते खूप वेळ बंद राहणार नाहीत. पालखी मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे.पालखी सोहळ्यातील भाविकांच्या गर्दीचे नियोजन,अनुचित घटना रोखण्यासाठी बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे.

  • 12 Jun 2023 01:08 PM (IST)

    छगन भुजबळ यांच्याकडून येवल्यातील शिवसृष्टी, मुक्ती भूमीतील विकास कामांची पाहणी

    येवला शहरात साकारण्यात येत असलेल्या शिवसृष्टी प्रकल्प आणि मुक्ती भूमी परिसरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी सुरू असलेले कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. मुक्ती भूमी येथे भिक्कु निवास, भिक्कू पाठशाळा, ऑडिओ व्हिज्युअल रूम, ॲम्पी थिएटर, विपश्यना हॉल, पाली भाषा संशोधन केंद्र, ग्रंथालय, प्रशासकीय कार्यालय, व्यापारी संकुल, कर्मचारी निवासस्थान, संरक्षक भिंत, अंतर्गत रस्ते, बागबगीचा, पार्किंग सुविधा यासह विविध विकास कामांचा समावेश आहे. येवला शिवसृष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती ब्राँझ पुतळा,शिवकालीन ऐतिहासिक घटनांचे म्यूरलस्, गार्डन, माहिती केंद्र, उपहारगृह, स्वच्छ्ता गृह इत्यादी कामांचा समावेश आहे.

  • 12 Jun 2023 12:55 PM (IST)

    बीड | शरद पवार आणि संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ बीडमध्ये मूक मोर्चा

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ बीड मध्ये मूक मोर्चा काढण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या वतीने हा मूक मोर्चा काढण्यात आला आहे. आमदार संदीप क्षीरसागर, आमदार विक्रम काळे, माजी आमदार अमर सिंह पंडित त्याचबरोबर महाविकास आघाडीचे नेते या मूक मोर्चात सहभागी झाले आहेत.

  • 12 Jun 2023 12:45 PM (IST)

    अहमदनगर | आक्षेपार्ह कमेंट केल्याप्रकरणी परानेर बंदची हाक

    नगरच्या पारनेरमध्ये आज बंदची हाक देण्यात आली आहे. आक्षेपार्ह कमेंट केल्याप्रकरणी परानेर बंदची हाक देण्यात आली आहे. महापुरुषांवर आक्षेपार्ह कमेंट केल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. युवकाने महापुरुषांवर आक्षेपार्ह कमेंट केली होती. आता युवकाविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे..

  • 12 Jun 2023 12:40 PM (IST)

    पुणे | संत तुकाराम महाराज – संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी परदेशी पाहुण्यांनाही पाहता येणार

    संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज पुण्यात होणार दाखल होणार आहे. G- 20 साठी आलेल्या परदेशी पाहुण्यांनाही पालखी सोहळा पाहता येणार आहे. फर्ग्युसन कॉलेज रोडवर पुणे महापालिकेकडून विदेशी पाहुण्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. G- 20 परिषदेसाठी पुण्यात आलेले शंभर पाहुणे एकत्रीत पालखी सोहळा पाहणार आहेत…

    20 आमंत्रित देशाचे आणि प्रमुख पाहुण्या देशांचे असे एकूण 37 देशांचे पाहुणे एकत्रा पालखी सोहळा पाहणार आहेत. मुख्य पालख्यांच्या विश्वस्तांच्या हस्ते परदेशी पाहुण्यांचा सत्कार होणार आहे. महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा परदेशी पोहोचावी यासाठी पुणे महापालिकेचा उपक्रम.. इतिहासात पहिल्यांदाच 37 देशांचे पाहुणे घेणार पालखी पाहण्याचा आनंद

  • 12 Jun 2023 12:36 PM (IST)

    नंदूरबार | शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे पाणी प्रश्न पेटला

    शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे पाणी प्रश्न पेटला आहे. प्रकाश या गावातील गढी व कुंभार खाच या परिसरामध्ये ग्रामस्थांना पाणी येत नसल्याने ग्रामपंचायतमध्ये महिला व पुरुषांनी मोर्चा काढला .

    पाणी येत नाही म्हणून ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील यांनी शहादा बी डी ओ यांना फोन केला. मात्र त्यांच्याकडून दिलीप पाटील यांना समाधान कारक उत्तर न देता अरेरावी केली म्हणून तेथील नागरिकांनी त्यांच्या विरोधात आणि पाणी मिळत नाही म्हणून मोर्चा काढला.

  • 12 Jun 2023 12:27 PM (IST)

    अमरावती | मध्यप्रदेश मधील खंडवा येथे जाणाऱ्या एसटी बसला अपघात

    अमरावतीवरून धारणी मार्गे मध्यप्रदेश मधील खंडवा येथे जाणाऱ्या एसटी बसला अपघात अपघाता झाला आहे. या दुर्दैवी अपघआतात सात ते आठ प्रवाशी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. परतवाडा ते धारणी दरम्यान बिहाली ते घटांग दरम्यान बस पलटी झाल्याची माहिती समोर आली आहेय जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचं काम युद्ध पातळी सुरू आहे. अपघातानंतर एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारीं घटनास्थळी रवाना झाले आहेत.

  • 12 Jun 2023 12:23 PM (IST)

    वरकाऱ्यांवर लाठीचार्ज झाला ही वाईट घटना – चंद्रकांत खैरे

    ‘हिंदुत्ववादी समजणारे हे दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत, पण वरकाऱ्यांवर लाठीचार्ज झाला ही वाईट घटना आहे. एरवी कधीही बोलणारा तो तुषार भोसले कुठे आहे आता भोसले कोण त्याला अध्यात्म आणि धार्मिकता काहीही माहिती, आता कुठे गेला तो, सुषमा अंधारे विरोधात आरडा ओरडा करतो आता कुठे आहे तो, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांनीही पंढरपूरला जाण्याच्या आधी माफी मागितली पाहिजे, नाक घासून वारकऱ्यांची माफी मागितली पाहिजे नाहीतर वारकरी संप्रदाय त्यांना सोडणार नाही.. ‘ असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे.

    संदिपान भुमरे यांच्या वडिलांची 4 एकर जमीन आता भुमरे कडे 700 एकर जमीन कुठून आली, 10 वाईन शॉप लायसन, पेट्रोल पंप हॉटेल हे सगळं कुठून आलं असा प्रश्न देखील चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला.. भागवत कराड, संदीपान भुमरे यांच्या सगळ्या कुंडल्या माझ्याकडे आहेत, मी वेळेवर याबाबत बाहेर काढणार आहे. संदीपान भुमरे यांनी भ्रष्टाचार केलाय जनता माफ करणार नाही, मुंबईत अधिकाऱ्यांना पैसे देऊन 7 कोटी रुपयांचा निधी आणला होता, सध्या तिकडे सगळं टक्केवारी देऊन सुरू आहे. असं देखील चंद्रकांत खैरे म्हणाले…

  • 12 Jun 2023 12:10 PM (IST)

    आळंदीतील वारकऱ्यांवरील लाठीचार्जचा नवा व्हिडीओ समोर

    आळंदीतील वारकऱ्यांवरील लाठीचार्जचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. वारकरी आक्रमक झाल्यानंतर पुढे जाण्याचा प्रयत्न केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. आळंदीतील घटनेवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री लक्ष देत आहेत. त्यांनी घटनेबाबत माहिती घेतली आहे आणि चौकशी पूर्ण होईल असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे..

  • 12 Jun 2023 12:04 PM (IST)

    ‘प्रत्येक गोष्टीला शेवट..’, मराठमोळ्या अभिनेत्रीचा भीषण अपघात; कारचा चुराडा… दुर्दैवी घटनेचा व्हिडीओ व्हायरल

    ‘प्रत्येक गोष्टीला शेवट..’, मराठमोळ्या अभिनेत्रीचा भीषण अपघात; कारचा चुराडा… दुर्दैवी घटनेचा व्हिडीओ व्हायरल

    मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात; कारचा चुराडा… वाचा सविस्तर 

  • 12 Jun 2023 12:01 PM (IST)

    राधानगरी-स्वारगेट बसला आग

    साताऱ्यात एसटी महामंडळाच्या राधानगरी स्वारगेट या चालत्या बसने पेट घेतल्याची घटना घडली आहे. साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जात असताना आनेवाडी टोलनाक्या जवळ ही घटना घडली. बस चालकाच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर तात्काळ प्रवाशांना एसटीतून बाहेर काढले. एसटीमध्ये 30हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. अग्निशामक दलाच्या मदतीने आग विजविण्यात यश मिळाले.

  • 12 Jun 2023 11:52 AM (IST)

    पुरंदर तालुक्यातील मांडकी गावात दोन गटात हाणामारी

    पुरंदर तालुक्यातील मंडाकी येथे दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. लोकांच्या डोळ्यात मसाला टाकून मारहाण करण्यात आली आहे. वस्तीला रस्ता करत असताना ग्रामस्थ आणि एका कुटुंबीयांमध्ये ही मारहाण झाली. या वादात हत्यारबंद लोक शेताच्या बांधावरून फिरताना दिसत होते. त्यामुळे परिसरात मोठी घबराट निर्माण झाली आहे. या घटनेचा व्हिडीओही आता समोर आला आहे.

  • 12 Jun 2023 11:50 AM (IST)

    खा. डॉ. अमोल कोल्हे आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतले भीमाशंकरचे दर्शन

    बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे आज खासदार डॉ अमोल कोल्हे आणि राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दर्शन घेत महापूजा केली. आज खासदार अमोल कोल्हे आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा एकत्रित शिरूर लोकसभा मतदार संघातील आंबेगाव तालुक्यात गाव भेट दौरा आयोजित करण्यात आला आहे.

  • 12 Jun 2023 11:48 AM (IST)

    सरकारकडून पोलिसांच्या ताकतीचा गैरवापर – सुप्रिया सुळे

    खेळाडू विठूभक्तावर राज्य व केंद्र सरकारकडून दबाव आहे. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्र सरकारने याची चौकशी केली पाहिजे. या घटनेचा निषेध करते. ऑलिंपिक विजेते असतील किंवा माऊली विठूभक्त यांच्याविरुद्ध केंद्र व राज्य सरकार पोलिसाचा ताकतीचा गैरवापर करत आहे. शांततेच्या मार्गाने माऊली माऊली करत आपण सर्वजण पंढरीला जात असतो. अशा लोकांना पोलिसांनी जी वागणूक दिली ती दुर्दैवी असल्याचं सुळे यांनी म्हटलंय. खासदार सुप्रिया सुळे आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पळसदेव येथील पळसनाथाच्या मंदिराची त्यांनी पाहणी देखील केलीय.

  • 12 Jun 2023 11:46 AM (IST)

    वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या रेखाताई ठाकूर यांनी घेतली मयत अक्षय भालेराव यांच्या कुटुंबियांची भेट

    गेल्या 1 जून रोजी बोढार हवेली गावात अक्षय भालेराव या तरुणाचा खून करण्यात आला होता. जातीय वादातून आरोपीनी अक्षयची हत्या केली, असा आरोप आहे. दरम्यान ही घटना निंदनीय आहे. अशा प्रकाराच्या घटनाना वंचित बहुजन आघाडी सहन करणार नाही, अशा शब्दात वंचितच्या नेत्या रेखाताई ठाकूर यांनी नाराजी व्यक्त करत, आरोपींना कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

  • 12 Jun 2023 11:45 AM (IST)

    यवतमाळमध्ये कारमधून 2 कोटी 70 लाखाची रक्कम जप्त

    यवतमाळच्या आर्णी शहराच्या बायपास रोडवर काळ्या रंगाच्या कारमधून मोठी रक्कम नेत असल्याची गोपनीय माहिती आर्णी पोलिसांना मिळाली. त्यावरून सापळा रचून, वाहनांची झडती घेतली असता 2 कोटी 70 लाख रोख आढळून आली. एमएच-26-बीसी-7245 या क्रमांकाची काळ्या रंगाची कार शहरात दाखल होत असताना पोलिसांनी थांबवली. कारमध्ये मधुरम सत्यनारायण स्वामी (28), बालाजी भीमराव चौधरी (42), रोहित किसनराव सोनपाखरे (28) प्रदीप प्रकाश जोंधळे (सर्व राहणार नांदेड), संजीवकुमार निर्मला झा (55, नागपूर), गजानन गणेश गिरी (42, रा. फुलसावंगी)
    यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता पोलिसांचा सकारात्मक उत्तरे न दिल्याने ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी आर्णी पोलीस अधिक तापास करत आहेत.

  • 12 Jun 2023 11:41 AM (IST)

    नवी दिल्लीत चक्रीवादळाबाबत केंद्र सरकारची बैठक

    चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठक घेणार आहेत. दुपारी एक वाजता हवामान तज्ञ आणि मंत्र्यांसोबत मोदींची बैठक होणार आहे. बीपरजॉय चक्रीवादळाबाबत केंद्र सरकार नियमावली जाहीर करण्याची शक्यता आहे.

  • 12 Jun 2023 11:38 AM (IST)

    निवडणुका आल्या की धार्मिक भावना भडकावण्याचा प्रयत्न

    Live Updates

    कोल्हापुरात धार्मिक वातावरण तापला असतानाच आमदार हसन मुश्रीफ यांनी हातात विणा घेऊन अनोखा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. हणबर समाजाच्या लक्ष्मी मंदिराचं कलशारोहण सोहळ्याच्या निमित्ताने आमदार हसन मुश्रीफ यांनी विणा हातात घेतली. निवडणुका आल्या की धार्मिक भावना भडकावण्याचा प्रयत्न होतो. याचा मला अनुभव आहे. मात्र लोक हेच स्वीकारणार नाहीत. टीव्ही 9 शी बोलताना आमदार यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

  • 12 Jun 2023 11:31 AM (IST)

    देशभरात महाजनसंपर्क अभियान सुरू – कैलाश विजयवर्गीय

    सत्तेचा लेखा जोखा मांडण्याचे काम सध्या सुरू आहे. आधीच्या सरकार मध्ये पंतप्रधान कोण होत आणि निर्णय कोण घेत होत हे सगळ्यांना ज्ञात आहे. आता मात्र देश आणि जगात मोदींजींच्या माध्यमातून देशाची वेगळी ओळख आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून 4 करोड घर तयार झाले आहेत. देशातील एकाही गावात वीज नाही असे नाही. विकसित देशांपेक्षा जास्त जीडीपी आज भारताचा आहे. येणारा काळ आर्थिक मंदीचा असेल. मात्र भारताला त्याचा परिणाम जाणवणार नाही असे अर्थ तज्ञांचे मत आहे.

    प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज बनवण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न आहेत. पंतप्रधान जगात कुठेही गेले, तरी एक वेगळा सन्मान त्यांना मिळतो. US काँग्रेसला संबोधित करणारे मोदी आहेत. हा देशवासीयांचा सन्मान आहे. अमेरिकेची आर्थिक स्थिति नाजूक आहे. अमेरिका आपल्या देशात सोबत आर्थिक व्यवहार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. 37 किलोमीटर प्रति दिन रस्ते तयार होत आहेत.

  • 12 Jun 2023 11:28 AM (IST)

    दिपक गवळी पीए नाही तर कृषी अधिकारी आहे – अब्दुल सत्तार

    दिपक गवळी पीए नाही तर कृषी अधिकारी आहे, तो या युनिटमध्ये सहभागी आहे. 62 अधिकारी यात होते. 50 वर्षांतील पहिली कारवाई आहे. मे महिन्यापासून आतापर्यंत 269 कारवाई झाली आहेत. बोगस बियाणेवाले, खतेवाले असतील त्यांनी तात्काळ नष्ट करावे. कोणत्याही शेतकऱ्याने तक्रार केल्यास कारवाई केली जाईल. लपूनछपून कारवाई झालेली नाही, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच कारवाई झाली. बोगस बियाण्यांवर आणि खतांवर आळा घालण्यासाठी आम्ही कायदा करण्याचा विचार करतोय. दहा वर्षे शिक्षा व अजामिनपात्र गुन्हा दाखल झाला पाहिजे. कुणी पैसे मागितले असतील तर चौकशी केली जाईल. पाच मंत्री संदर्भात मुख्यमंत्री यांनी आज रात्री बैठक बोलावली आहे. यात पुढील दिशा ठरवली जाईल.

  • 12 Jun 2023 11:20 AM (IST)

    ठाकरे गट शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड शाहू महाराजांची जयंती साजरी करणार

    छत्रपती संभाजी नगरमध्ये ठाकरे गट शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड शाहू महाराजांची जयंती साजरी करणार आहेत. संपूर्ण राज्यभर 26 जून रोजी शाहू महाराजांची जयंती साजरी केली जाणार आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी माहिती दिली. संभाजी ब्रिगेड आणि ठाकरे गटाचा पहिला सार्वजनिक उपक्रम आहे.

  • 12 Jun 2023 11:17 AM (IST)

    वारकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करतो – संजय राऊत

    महाराष्ट्रात औरंग्याची औलाद कशी निर्माण झाली हे आम्ही काल पाहिले. लाठीचार्ज करणाऱ्या पोलीसांच्या अंगात औरंगजेब संचारला आहे. बेदमपणे वारकऱ्यांना लाठिचार्ज होताना पाहिलं, ते कोणी नाकारु शकत नाही. जगात वारीचा सन्मान केला जातो. ही सत्तेची मस्ती आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. टोळ्या पाळल्यात आणि त्या तिकडे तणाव निर्माण करतात. काल झालेला प्रकाराचा कोण प्रायश्चित घेणार. हिंदुधर्माभिमानी मुख्यमंत्री कुठं आहेत?, उपमुख्यमंत्री कुठे आहेत? हिंदु मोर्चा काढणारे कुठे आहेत? त्र्यंबकेश्वरमध्ये घुसलेलेच आळंदीमध्ये दिसले. आताच तुम्ही बोला, मागचं का उकरुन काढता.

    तुमच्या हातात सत्ता आहे ना? तुम्ही खुर्च्या उबवायला बसलात ना? महाराष्ट्रातील सर्वच स्तरावर निषेध केला, पण फक्त भाजपनं निषेध केला नाही. कुठेत पालकमंत्री त्यांच्या हद्दीत झालय ना? मिंधे गट कुठे आहे? आम्ही म्हणतो तुम्ही खेद तरी व्यक्त करा, नाहीतर तुम्हाला महापुजेचा अधिकार नाही. वारी ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. दिंडीचे नियंत्रण भाजपच्या लोकांना हवंय, माफी तर मागा.

  • 12 Jun 2023 11:13 AM (IST)

    भंडारा जिल्ह्यात कोतवाल भरती प्रकरणाला नवे वळण

    भंडारा जिल्ह्यात कोतवाल भरती परिक्षेत फसवणूक आणि नियुक्तीत घोळ हा विषय सध्या तापलेला आहे. या प्रकरणात भंडारा पोलिसांनी अटक केली असून, मुख्य सूत्रधार अजूनही फरार आहे. कोतवाल भरती प्रकरण तापत असताना तुमसर तालुक्यातील एका महिला उमेदवाराच्या पतीला एका भ्रमणध्वनीवर ‘सेटिंग’ करून देण्याचे आमिष दाखवले आहे. ती अज्ञात व्यक्ती आणि महिला उमेवाराच्या पतीचे संभाषण असलेली ध्वनिफीत मोठ्या प्रमाणात वायरल झालेली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण, तालुक्यात आणि जिल्ह्यात अशाप्रकारे आर्थिक गैरव्यवहारातून किती जणांची नियुक्ती करण्यात आली, असे अनेक प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

  • 12 Jun 2023 11:11 AM (IST)

    यवतमाळमध्ये व्याजाच्या पैशातून अक्षयची हत्या

    यवतमाळ शहरात एका 27 वर्षीय युवकावर बंदुकीतून गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. ही हत्या व्याजाच्या पैशातून झाल्याची घटना समोर आली आहे. अक्षय सतिश कैथवास असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी हसीना खान उर्फ लक्ष्मीबाई लीलारे, विजय लिलारे, गोलू लीलारे, खुशाल लीलारे, शरीफ खान, सोपान लीलारे आणि अजित दुंगे यांनी कट रचून अक्षयची हत्या केल्याच्या आरोपातून या सात संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  • 12 Jun 2023 11:09 AM (IST)

    वारकऱ्यांवरील लाठीचार्जचा निषेध – अंबादास दानवे

    सरकार हिंदुत्ववादी विरोधी आहे का अशी स्थिती दिसते आहे. सरकारकडून कोणतीही कारवाई नाही. औरंगजेबाच्या नावावर भाजपचं राजकारण सुरु आहे. सरकारने कठोर कारवाई केली असती तर हे पुढे घडले नसते.

  • 12 Jun 2023 11:07 AM (IST)

    मालेगावात काल झालेल्या घटनेचे तीव्र पडसाद

    मालेगावाता काल घडलेल्या घटनेवरुन विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. घटनेच्या निषेधार्थ विद्यार्थी आणि काही हिंदुत्ववादी संघटनांची घोषणाबाजी सुरु आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाच्या बाहेर विद्यार्थी एकटवले आहेत. विद्यार्थ्यांची जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मालेगाव कॉलेज रोडवर कॉलेजच्या बाहेर गोंधळ सुरू आहे.

  • 12 Jun 2023 10:58 AM (IST)

    शिवरायांना मुस्लिमांबद्दल कधीच आकस नव्हता – हसन मुश्रीफ

    गेल्या आठवड्यापासून कोल्हापूरातील वातावरण बिघडत आहे. शिवरायांना मुस्लिमांबद्दल कधीच आकस नव्हता.  22 वतनदार आणि सैन्याचे प्रमुख महाराजांसोबत मुस्लिम होते. तर मावळे किती मुस्लिम किती असतील ? त्यामुळे औरंगजेब आपला शत्रूच आहे, त्याचे उदात्तीकरण होऊच शकत नाही अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरमध्ये दिली.

    मुस्लिम कुटुंबांनी आपल्या मुलांना समजवून सांगने गरजेचे आहे. काल सुद्धा पोलीसांनी कागल मधील संबंधित मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सतर्क राहण्याचे गरज आहे. निवडणुका जवळ येत आहेत, तसे वातावरण बिघडत चालले आहे. त्यामुळे शांतता राखण्याचे आवाहन हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

  • 12 Jun 2023 10:42 AM (IST)

    तलावात 40 वर्षीय व्यक्तीचा बुडून मृत्यू

    विरार – विरार पूर्व शिरगाव तलावात 40 वर्षीय व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला आहे. विरार पूर्व शिरगाव, भटपाडा येथील तलावात आज सकाळी पावणे सहा वाजता ही घटना घडली आहे. विनोद बिस्तुर कोळी असे बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते अर्नाळा गावातील रहिवासी आहेत. कोळी आणि त्यांचा 5 जणांचा ग्रुप नेहमी विरारच्या शिरगाव तलावात पोहायला जात होते. पण आज त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने सकाळी त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

  • 12 Jun 2023 10:39 AM (IST)

    वाहन चोरणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

    नवी मुंबई एपीएमसी पोलिसांकडून दोन जणांना अटक करण्यात आली आहे, त्यांच्याकडून तीन स्कुटी व दोन रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. नवी मुंबईत वाहन चोरांचे प्रमाण वारंवार वाढत आहे. तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांना दोन आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश आलं आहे. त्यांच्याकडून जवळपास 3 लाख 40 हजार रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात नवी मुंबईतील एपीएमसी पोलिसांना यश आलं आहे.

  • 12 Jun 2023 10:36 AM (IST)

    भंडारा जिल्ह्यात कोतवाल भरती प्रकरणाला नवे वळण….

    कोतवाल भरती प्रकरण चांगलचं तापलं असताना तुमसर तालुक्यातील एका महिला उमेदवाराच्या पतीला एका भ्रमणध्वनीवर ‘सेटिंग’ करून देण्याचे आमिष दाखवण्यात आले आले. ती अज्ञात व्यक्ती आणि महिला उमेवाराच्या पतीचे संभाषण असलेली ध्वनिफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण, तालुक्यात आणि जिल्ह्यात अशाप्रकारे आर्थिक गैरव्यवहारातून किती जणांची नियुक्ती करण्यात आली, असे अनेक प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

  • 12 Jun 2023 10:32 AM (IST)

    दिंडीचं नियंत्रण भाजपच्या लोकांना करायचं असल्यामुळे त्यांच्या काही टोळ्या अशा पद्धतीने गोंधळ घालत आहेत

    फडणवीस आणि शिंदे सरकारच्या पोलिसांनी वारकऱ्यांवरती हल्ला केला आहे. दिंडी ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. दिंडीचं नियंत्रण भाजपच्या लोकांना करायचं असल्यामुळे त्यांच्या काही टोळ्या अशा पद्धतीने गोंधळ घालत आहेत. कालचा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे, त्यामुळे सरकारने महाराष्ट्राची आणि वारकऱ्यांची माफी मागावी असं संजय राऊत म्हणाले.

  • 12 Jun 2023 10:23 AM (IST)

    सरकारने पहिल्यांदा वारकऱ्यांची माफी मागावी – संजय राऊत

    जगात वारीचा सन्मान केला जातो. अशा पद्धतीचं संकटं कधीही वारीवरती आलं नव्हत. सरकारने महाराष्ट्राची माफी मागायला हवी, कालच्या प्रकरणामध्ये वारकरी जखमी झाले आहेत. काहीतरी करायचं आणि गोंधळ घालायचा हे या सरकारचं धोरण आहे. त्यासाठी त्यांनी काही टोळ्या संभाळल्या आहेत. भाजपच्या नियोजनकर्त्यांमुळे वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

  • 12 Jun 2023 10:18 AM (IST)

    इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने काही युवक आक्रमक

    अहमदनगरला पारनेर तालुक्यातील पाबळ येथील एका युवकाने इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने काही युवक आक्रमक झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या निषेधार्थ आज पारनेर शहर बंदची हाक देण्यात आली आहे.

  • 12 Jun 2023 10:16 AM (IST)

    गणपतीपुळे समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद

    रत्नागिरी : गणपतीपुळे समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. त्याचबरोबर पर्यटकांना समुद्रात जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम गणपतीपुळे किनारपट्टीवर झाला आहे. सलग दोन दिवस गणपतीपुळे समुद्र किनाऱ्याला भरतीचा फटका बसला आहे. गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरती साडेपाच मीटरहून अधिक उंचीच्या लाटा पाहायला मिळाल्या. समुद्र शांत होत नाही, तोपर्यंत पर्यटकांना बीचवर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

  • 12 Jun 2023 10:00 AM (IST)

    बॉलिवूडवर भडकली प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी; म्हणाली “आईला नेहमीच वेश्या किंवा नोकर..”

    अभिनेत्री ईला अरुण यांची मुलगी इशिता अरुण आईच्या पावलांवर पाऊल टाकत अभिनेत्री झाली. इशिता सध्या तिच्या ‘स्कूप’ या वेब सीरिजमध्ये चर्चेत आली आहे. या सीरिजच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या आईला मिळणाऱ्या भूमिकांविषयी खंत व्यक्त केली. “माझ्या आईला आता अशा भूमिका मिळत आहेत, ज्यामधून ती तिचं अभिनयकौशल्य सिद्ध करू शकते. तिच्या अभिनयाची सुरुवात श्याम (बेनेगल) काकांपासून झाली. ते सर्वांचे प्रिय आहेत आणि मी नेहमी मस्करी करते की आईने सतत वेश्या, नोकर किंवा विणकराच्या भूमिका साकारल्या आहेत”, असं ती म्हणाली. वाचा सविस्तर..

  • 12 Jun 2023 09:55 AM (IST)

    शरद पवारांना धमकीच्या फोनप्रकरणी एका व्यक्तीला अटक

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आलेल्या धमकीच्या फोनप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने पुण्यातून एका 34 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. सागर बर्वे असं आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत (13 जून) पोलीस कोठडी सुनावली आहे.

  • 12 Jun 2023 09:49 AM (IST)

    मुंबई | इमर्जन्सी साखळी ओढणाऱ्या 711 जणांवर कारवाई

    अत्यावश्यक कारणांसाठी किंवा इमर्जन्सी घटनेवेळी उपनगीय आणि मेल, एक्स्प्रेसमध्ये इमर्जन्सी साखळीची (अलार्म चेन पुलिंग) सुविधा देण्यात आली आहे. मात्र प्रवासी अत्यंत क्षुल्लक कारणांसाठी इमर्जन्सी साखळी ओढतात. मे 2023 मध्ये मध्य रेल्वेवर 941 इमर्जन्सी साखळी ओढण्याच्या घटना घडल्या आहेत. 711 जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून 2 लाख 71 हजार रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे.

  • 12 Jun 2023 09:42 AM (IST)

    पाटणामध्ये इयत्ता बारावीपर्यंतच्या सर्व शैक्षणिक उपक्रमांवर निर्बंध

    बिहारमधील उष्णतेच्या लाटेमुळे पाटणा डीएमने इयत्ता 12वीपर्यंतच्या सर्व शैक्षणिक उपक्रमांवर निर्बंध घातले आहेत. 12 जून ते 18 जून या कालावधीसाठी हे निर्बंध घालण्यात आले आहेत.

  • 12 Jun 2023 09:35 AM (IST)

    खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा आज शिरूर लोकसभा मतदार संघात दौरा

    माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि खासदार अमोल कोल्हे हे दौऱ्यात एकत्र आहेत. अमोल कोल्हे यांचे शिरूर मतदारसंघात भेटीगाठी आणि दौरे वाढले आहेत. हडपसर, शिरूरनंतर आज ते आंबेगाव तालुक्यात गावभेट दौरा करणार आहेत. भीमाशंकर इथल्या मंदिरात दर्शन घेऊन ते दौऱ्याची सुरुवात करणार आहेत.

  • 12 Jun 2023 09:28 AM (IST)

    महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लावण्याचं काम- देहू संस्थानच्या विश्वस्तांची प्रतिक्रिया

    “आळंदीमधील वारकऱ्यांवरील लाठीचार्जची घटना निंदनीय आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. प्रशासनाने आणि वारकऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी. वारकरी हा सहिष्णू असतो. त्यांना अशा प्रकारे पोलिसांनी अडवायला नको होतं. महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लावण्याचं काम पोलिसांनी केल आहे. वारकरी हे पोलिसांना सहकार्य करतीलच. मात्र वेळ आली तर संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवतो. भले देऊ कासेची लंगोटी, नाठाळ्याच्या माथी मारू काठी,” अशी प्रतिक्रिया देहू संस्थानच्या विश्वस्तांनी दिली.

  • 12 Jun 2023 09:21 AM (IST)

    वारकऱ्यांवरील लाठीचार्जची घटना निषेधार्ह- दिलीप वळसे पाटील

    “राज्याचे उपमुख्यमंत्री हे आळंदीत वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला नाही असं म्हणत आहेत. मात्र व्हिडीओमध्ये स्पष्टपणे लाठीचार्ज झाल्याचं दिसत आहे. गेली शेकडो वर्षे वारकरी या वारीत शिस्तीचं पालन करत सहभागी होतात. चुकीच्या व्यवस्थापनामुळे ही गर्दी झाली आणि लाठीचार्ज करण्यात आला. ही घटना निषेधार्ह आहे,” असं माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

  • 12 Jun 2023 09:14 AM (IST)

    झारखंडमधील सर्व शाळा 14 जूनपर्यंत बंद राहणार

    राज्यात सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा 14 जूनपर्यंत बंद राहतील. झारखंड सरकारच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने माहिती दिली आहे.

     

  • 12 Jun 2023 09:07 AM (IST)

    बिपरजॉय चक्रीवादळाचा कच्छला धोका?

    अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय वादळाचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर झालं असून ते 15 जून रोजी दुपारी कच्छ आणि कराचीदरम्यानच्या किनाऱ्यावर धडकण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुढील चार दिवस मच्छीमारांनी अरबी समुद्रात जाऊ नये, चक्रीवादळ नेमकं कुठे धडकेल हे दोन दिवसांत स्पष्ट होईल, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.

  • 12 Jun 2023 08:59 AM (IST)

    Adipurush | प्रदर्शनाआधीच ‘आदिपुरुष’च्या तिकिटांची जोरदार विक्री; ‘पठाण’, ‘RRR’ला तगडी टक्कर

    आदिपुरुष हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवीन विक्रम रचणार, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषकांनी वर्तवला आहे. कोरोना महामारीनंतर पठाण आणि ब्रह्मास्त्र यांसारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली होती. वाचा सविस्तर…..

  • 12 Jun 2023 08:57 AM (IST)

    ऑस्ट्रेलियात बसचा भीषण अपघात

    ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्समध्ये हंटर भागात लग्नाच्या पाहुण्यांना घेऊन जाणाऱ्या एका बसला भीषण अपघात झाला. यात 10 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत.

  • 12 Jun 2023 08:52 AM (IST)

    स्टुडिओत लायटिंग ट्रस पडून तरुणीचा मृत्यू

    नोएडाच्या थाना सेक्टर 11 मध्ये एका खासगी स्टुडिओत फॅशन शो दरम्यान लायटिंग ट्रस पडल्यामुळे एका युवतीचा मृत्यू झाला. वंशिका चोपडा असं तिचं नाव आहे. एक अन्य पुरुष जखमी झालाय. या प्रकरणी चौघांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु आहे. नोएडाचे ADCP शक्ति अवस्थी यांनी ही माहिती दिली.

  • 12 Jun 2023 08:44 AM (IST)

    आक्षेपार्ह स्टेटस, कागल बंदची हाक

    आक्षेपार्ह स्टेटसवरून कोल्हापूरच्या कागल शहरात तणाव निर्माण झाला होता. काल रात्रीची घटना आहे. आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या तरुणांना कागल पोलिसांनी अटक केली. हिंदुत्ववादी संघटनांकडून आज कागल बंदची हाक देण्यात आलीय. आठवडी बाजार असल्याने बंद मागे घ्यावा, असं पोलिसांकडून आवाहन करण्यात आलय. सकाळी दहा वाजता हिंदुत्ववादी कार्यकर्ते शिवाजी चौकात जमणार आहेत.