Maharashtra Breaking Marathi News Live | पुराचा धोका कमी करण्यासाठी मुंबई, पुण्यासह 7 शहरांसाठी 2500 कोटींची योजना

| Updated on: Jun 14, 2023 | 7:12 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या शहरातील आणि गावातील घडामोडींसाठी टीव्ही9 मराठीला आवश्य भेट द्या.

Maharashtra Breaking Marathi News Live | पुराचा धोका कमी करण्यासाठी मुंबई, पुण्यासह 7 शहरांसाठी 2500 कोटींची योजना
Marathi News Live
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. सायंकाळी चार वाजता कोल्हापूरच्या तपोवन मैदानावर कार्यक्रम होणार आहे. वादग्रस्त स्टेटसवरुन अलीकडेच कोल्हापुरातील वातावरण तापलं होतं. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा महत्वाचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोल्हापुरात पहिल्यांदाच एकत्रित सभा होणार आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 13 Jun 2023 11:06 PM (IST)

    पुराचा धोका कमी करण्यासाठी मुंबई, पुण्यासह 7 शहरांसाठी 2500 कोटींची योजना; अमित शाह

    नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या मुंबई, पुण्यासह 7 शहरांमध्ये पुराचा धोका कमी करण्यासाठी 2500 कोटी रूपयांचे प्रकल्प उभारले जाणार असल्याची महत्त्वाची घोषणा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली.  आज येथील विज्ञान भवनात केंद्रीय गृह मंत्री शाह यांच्या अध्यक्षतेत आपत्ती व्यवस्थापनाची महत्त्वाची बैठक पार झाली. या बैठकीत शाह यांनी ही घोषणा केली. या बैठकीस राज्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता उपस्थित होते. यामध्ये मुंबई, पुणे यांच्यासह चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद या सात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश असल्याची माहितीही शाह यांनी यावेळी दिली.

  • 13 Jun 2023 11:02 PM (IST)

    भाजपकडून फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार संपवाण्याचा काम; नाना पटोले

    मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भाजपच्या डझनभर मंत्र्यांकडून अपमान केला गेला आहे. तर कालच वारकरी संप्रदायावर या सरकारने अन्याय करुन त्यांनी आपली खरी वृत्ती दाखवली असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. महाराष्ट्रमध्ये फुले,शाहू, आंबेडकर यांचा विचार संपवाण्याचा काम हे सरकार करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी भाजपवर केला आहे. राज्यातील हे सरकार मनुवादी विचारसरणीचे सरकार आहे. त्यामुळेच डझनभर भाजपचा नेत्यांनी महापुरुषांचा अपमान केला आहे.

  • 13 Jun 2023 10:51 PM (IST)

    मुंबई, पुण्यासह 7 शहरांसाठी 2500 कोटींची योजना

    नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या मुंबई, पुण्यासह 7 शहरांमध्ये पुराचा धोका कमी करण्यासाठी 2500 कोटी रुपयांचे प्रकल्प उभारले जाणार असल्याची महत्त्वाची घोषणा आज केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी येथे केली. आज येथील विज्ञान भवनात केंद्रीय गृह मंत्री श्री. शहा यांच्या अध्यक्षतेत आपत्ती व्यवस्थापनाची महत्त्वाची बैठक पार झाली. या बैठकीत श्री. शहा यांनी ही घोषणा केली. या बैठकीस राज्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता उपस्थित होते. यामध्ये मुंबई, पुणे यांच्यासह चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद या सात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश असल्याची माहिती केंद्रीय मंत्री श्री.शहा यांनी यावेळी दिली.

  • 13 Jun 2023 10:05 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस यांच्या धाराशिव दौऱ्यात बदल

    धाराशिव : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धाराशिव दौऱ्यात अचानक बदल झाला. 15 जूनऐवजी देवेंद्र फडणवीस हे 16 जून रोजी धाराशिव येथे येणार आहेत. फडणवीस हे मोदी @ 9 मोहिमेअंतर्गत धाराशिव येथे सभा घेणार आहेत. तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखडा बैठक घेणार आहेत. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे भूमिपूजन आणि पाहणी करतील. अशी माहिती भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी दिली.

  • 13 Jun 2023 09:47 PM (IST)

    कल्याणमध्ये रिमझिम पाऊस, पावसाचा अधूनमधून जोर वाढतोय

    कल्याण : कल्याण डोंबिवलीत रिमझिम पावसाला सुरुवात. पावसाचा अधूनमधून जोर वाढत असल्याने रस्त्यावरती ये-जा करणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडत आहे. पावसासोबत जोरदार वारा सुटल्याने कल्याण डोंबिवली परिसरातील अनेक ठिकाणी बत्ती गुल झालीय.

  • 13 Jun 2023 09:19 PM (IST)

    चार जणांचा जीव घेणारा खंडाळ्यातील अपघाताचं नेमकं कारण समोर

    पुणे : खंडाळ्याजवळ मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर घडलेल्या घटनेचा अपर पोलीस वाहतूक महासंचालकांनी अहवाल मागवला आहे. चालकानं रहदारीचे नियम मोडल्याने चालकाचं नियंत्रण सुटलं आणि टँकर पलटी झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. लोणावळा पोलिसांनी महासंचालकांना दिलेल्या अहवालात नमूद केलं आहे. अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे.

  • 13 Jun 2023 09:02 PM (IST)

    Hte Pune Expres | हटिया-पुणे एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड

    अमरावती | या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. हटिया-पुणे या एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं समजतंय. या तांत्रिक बिघाडामुळे एक्सप्रेस गाडी अमरावतीच्या चांदूर रेल्वेजवळ एक्सप्रेस थांबवण्यात आली आहे. एक्सप्रेस थांबल्याने इतर गाड्यांना विलंब होत आहे. हटिया-पुणे या एक्सप्रेस थांबल्याने त्याचा परिणाम हा विदर्भ, नागपूर-कोल्हापूर एक्सप्रेसवर झाला आहे.

  • 13 Jun 2023 08:56 PM (IST)

    Girish Mahajan On Ajit Pawar | अजित पवार यांच्याकडून निवडणूक घेण्याचं आव्हान, मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले?

    राज्याच्या राजकारणात आजचा दिवस गाजला तो सर्वच वृत्तपत्रांमधील पहिल्या पानावरील जाहीरातीमुळे. ‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या जाहीरातीवरुन राज्याचं राजकारण चांगलंच तापलं. याच मुद्द्यावरुन विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटाला आव्हान दिलं. एवढेच लोकप्रिय आहात तर उद्या निवडणुका जाहीर करा, असं आव्हान दिलं. आता या आव्हानाला मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिलंय.

    पवारांच्या या आव्हानावर “घोडा मैदान दूर नाही, निवडणुकांसाठी तयार आहोत” असं म्हणत गिरीश महाजन यांनी उत्तर दिलंय.

  • 13 Jun 2023 08:37 PM (IST)

    Shambhuraje Desai On Dry Day | लोकांची मागणी असेल तर ड्राय डे चे दिवस कमी करु, मंत्री शंभुराजे देसाई यांचं आश्वासन

    मुंबई | “लोकांची मागणी असेल तर ड्राय डे चे दिवस कमी करु. त्यासाठी लोकांची मागणी आली पाहिजे”, असं म्हणत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराजे देसाई यांनी आश्वासन दिलं आहे. देशात आणि राज्यांमध्ये ठराविक दिवशी दारूची दुकाने बद ठेवली जातात. अशा दिवसांना ड्राय डे म्हटलं जातं.

    देशात प्रामुख्याने 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन), 14 एप्रिल (आंबेडकर जंयती), 15 ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) आणि 2 ऑक्टोबर (गांधी जयंती) या आणि इतर दिवशी ड्राय डे असतो. या व्यतिरिक्त ज्या भागात निवडणुका असतात, तिथे त्या दिवसासाठी ड्राय डे ठेवण्यात येतो.

  • 13 Jun 2023 08:22 PM (IST)

    Santosh Suman Manjhi Resigns | जीतन राम मांझी यांच्या मुलाचा नितीश कुमार मंत्रिमंडळातून राजीनामा

    पाटणा | बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातून कॅबिनेट मंत्री संतोष सुमन यांनी राजीनामा दिला आहे. संतोष सुमन हे जीतन राम मांझी यांचे सुपुत्र आहेत. जीतन मांझी हे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जातंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जीतन राम मांझी यांनी आपल्या मुलाचा राजीनामा विजय चौधरी यांच्याकडे सोपवला आहे.

  • 13 Jun 2023 08:15 PM (IST)

    Trai On Spam Calls | ट्रायचे सर्वसामांन्यांना दिलासा देण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांना आदेश

    मुंबई | सर्वसामान्यांना नको असलेल्या कॉल्सपासून मोठा दिलासा मिळणार आहे. ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सने सुसज्ज स्पॅम फिल्टर्स बसवण्याच्या सूचना दिल्या आहेत. कंपन्यांना येत्या 30 दिवसांत फिल्टर बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कंपन्यांना नको असलेल्याकॉल्सचा डेटा सामायिक प्लॅटफॉर्मवर शेअर करावा लागेल. त्यामुळे आता सर्वसामांन्यांची नको त्या कॉल्सपासून सुटका होणार आहे.

  • 13 Jun 2023 07:56 PM (IST)

    बिपरजॉय वादळामुळे गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

    बिपरजॉय वादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने गुजरातच्या कच्छ आणि देवभूमी द्वारकामध्ये उद्या रेड अलर्ट जारी केला आहे. वादळ जमिनीवर येण्यापूर्वी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.  जामनगर, पोरबंदर आणि मोरबीमध्ये इशारा जारी करण्यात आला आहे. यानंतर 15 तारखेला हे वादळ कच्छ आणि देवभूमी द्वारकाला धडकणार आहे. त्या दिवशीही या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • 13 Jun 2023 07:40 PM (IST)

    मथुरेतील वृंदावनच्या प्रेम मंदिराला आग

    उत्तर प्रदेशातील मथुरा येथील वृंदावन येथील लोकप्रिय प्रेम मंदिराच्या मागील भागात भीषण आगीची घटना घडलीये. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी हजर झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. पांढऱ्या संगमरवरी बनवलेले प्रेम मंदिर देशातच नव्हे तर जगभरात खूप लोकप्रिय आहे.

  • 13 Jun 2023 07:32 PM (IST)

    GoFirst विमान कंपनीची 16 जूनपर्यंत उड्डाणे रद्द

    GoFirst कंपनीने अत्यंत मोठा निर्णय घेत थेट 16 जूनपर्यंत उड्डाणे रद्द केली आहेत. GoFirst विमान कंपनीने याबद्दलची एक नोटीस जारी केली आहे. त्यांनी या नोटीसमध्ये माहिती दिली आहे की,  16 जूनपर्यंत त्यांची सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. कंपनीने ऑपरेशनल रिजन असे कारण देखील दिले आहे.

  • 13 Jun 2023 07:29 PM (IST)

    सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात संचार बंदी आदेश लागू

    नुकताच सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात संचार बंदी आदेश लागू करण्यात आलीये. सोलापूर शहर पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी हे आदेश काढले आहेत. साखर कारखान्यापासून एक किलोमीटरच्या परिसरात कलम 144 लागू करण्यात आलाय. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या एक किलोमीटरच्या परिघात अत्यावश्यक सेवा वगळता संचार करण्यास बंदी आहे. कारखान्याच्या एक किलोमीटर परिसरात असलेले सर्व सभागृह, मंगल कार्यालय, रेस्टोरंट, बार, हॉटेल, धार्मिक स्थळ, प्रार्थना स्थळ बंद करण्याचे आदेश देखील काढण्यात आले आहेत.

  • 13 Jun 2023 07:21 PM (IST)

    बाबाजी दाते महिला सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि संचालक मंडळाला मोठा झटका

    नुकताच यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेच्या तत्कालीन अध्यक्ष आणि संचालक यांना मोठा धक्का बसलाय. अधिकार्‍यांकडून आर्थिक नुकसानीची 97 कोटी दोन लाख 17 हजार 758 रुपये रक्कम वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सहकारी संस्थेच्या अप्पर निबंधकांनी हे आदेश दिले आहेत. महिला बँकेचे कर्ज वाटपानंतर वसुली अभावी झालेल्या नुकसानीची संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली. अध्यक्ष विद्या केळकर यांच्यावर 50 कोटींपेक्षा अधिक तर सीईओ सुजाता महाजन यांच्यावर 25 कोटींपेक्षा अधिकची वसुली निश्चित

  • 13 Jun 2023 07:09 PM (IST)

    एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शेतीपुरक साहित्याचे होणार वाटप

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शेतीपुरक साहित्याचे वाटप होणार आहे. कोल्हापूर येथील सभेनंतर शेतीपुरक साहित्य शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. शेतकऱ्यांना रोटर ट्रॅक्टर डिझेल इंजन, औषध फवारणी पंप तसेच बांधकाम कामगारांना सुरक्षा साधने असणारी पेटी हे साहित्य दिले जाणार आहे.

  • 13 Jun 2023 07:06 PM (IST)

    वसई विरार नालासोपाऱ्यात पावसाला सुरूवात

    वसई विरार नालासोपाऱ्यात पावसाला सुरूवात झाली आहे. वसई विरार नालासोपाऱ्यात सायंकाळी 5 नंतर रिमझिम पावसासह अधून मधून जोरदार पाऊस येतोय. अचानक जोरदार पाऊस पडत असल्याने वाहनधारक, नागरिक यांची होत मोठी तारांबळ होताना दिसत आहे. पावसामुळे हवेत थंडावा बघायला मिळतोय.

  • 13 Jun 2023 06:54 PM (IST)

    Cm Eknath Shinde Live | सर्व्हेत मला आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पसंती- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    एक सर्व्हे करण्यात आला त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पसंती दिली आहे. हे श्रेय एकट्या एकनाथ शिंदेंचं नाही. हे उपमुख्यमंत्री, आमचं मंत्रिमंडळ आणि या राज्याची जनता, तसेच केंद्रातील मोदी सरकारचं हे श्रेय आहे. आमचा प्रस्ताव जेव्हा केंद्राकडे जातो, तेव्हा एकही पैसा कमी न करता मंजूर होतो, हे डबल इंजिनचं सरकार काम करतंय.

  • 13 Jun 2023 06:46 PM (IST)

    Cm Eknath Shinde Live | महिलांना एसटीमध्ये 50 टक्के सवलत दिली- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    एसटीमध्ये प्रवास करताना महिलांना 50 टक्के सवलत दिली. माता भगिनींना या निर्णयामुळे फायदा झाला, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास केला आहे, असे अनेक योजना राबवल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

  • 13 Jun 2023 06:42 PM (IST)

    Cm Eknath Shinde Live | अडीच वर्षाचं सरकार विकासातील स्पीडब्रेकर होतं, मुख्यमंत्र्यांची मविआवर टीका

    आपलं सरकार दहा महिन्यांपूर्वी स्थापन झालं आहे. त्या आधीच्या सरकारमध्ये अडीच वर्षात एकही सिंचनाचा प्रकल्प मंजूर केला नव्हता. पण तुमच्या सरकारने 29 सिंचनाचे प्रकल्प मंजूर केले आहेत. 6 ते 7 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचा निर्णय घेणारं हे तुमचं सरकार आहे. ” केंद्राच्या पाठिंब्यामुळे राज्यात अनेक योजना राबवतोय. अडीच वर्षाचं सरकार विकासातील स्पीडब्रेकर होतं. आमच्या डबल इंजिन सरकारने हे स्पीडब्रेकर हटवले”, असंही मुख्यमंत्री एकनाख शिंदे यांनी स्पष्ट केलं.

  • 13 Jun 2023 06:40 PM (IST)

    Cm Eknath Shinde Live | मंत्रिमंडळात आम्ही सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले – मुख्यमंत्री एकनाथ शिंद

    सरकार स्थापन झाल्यापासून आतापर्यंत आम्ही सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. या व्यतिरिक्त आम्ही कोणतेही निर्णय घेतलेले नाहीत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. अनेक योजना राबवल्या असून या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला त्याचा लाभ घेता येईल, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे सांगितलं.

  • 13 Jun 2023 06:33 PM (IST)

    Cm Eknath Shinde Live | आपलं सरकार सर्वसामन्याचं सरकार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    कोल्हापुरात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सुरु आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं मत मांडलं. हे सरकार सर्वसामान्यांचं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमादरम्यान आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची माहितीही कोल्हापुरातील जनतेला दिली. “कोल्हापूरने कायम धाडसीपणा दाखवला आहे. मग तो पूर असु द्या, अनेक संकट आली तरी कोल्हापूरकर सामोरा गेला आहे.”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

  • 13 Jun 2023 06:26 PM (IST)

    शिवसेनेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, गजानन किर्तीकर यांचं वक्तव्य

    शिवसेनेमुळे भाजपा राज्यात पुन्हा सत्तेत आली आहे, असं शिवसेना नेते आणि खासदार गजानन किर्तीकर यांनी सांगितलं आहे. शिवसेनेच्या 40 आमदारांनी आपली ताकद ओळखावी, असं सांगत किर्तीकरांनी आमदारांचं मनोबळ वाढवण्याचा प्रयत्न केला. 40 आमदार सोबत होते म्हणून मविआची सत्ता उलथवून टाकण्यात यश आलं. यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. तसेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले.

  • 13 Jun 2023 06:18 PM (IST)

    शिवसेनेनं केलेली जाहिरात योग्य नाही- प्रवीण दरेकर

    शिवसेनेनं केलेली जाहिरात योग्य नाही असं भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी म्हंटलं आहे. शिंदे यांना वरचढ दाखवून दुसऱ्यांना कमी दाखवणं अयोग्य असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. जाहिरात चुकीची असल्यास खुलासा करू असंही दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे. तर प्रवीण दरेकरांशी मी स्वत: बोलेन असंही शंभुराज देसाई यांनी सांगितलं आहे.

  • 13 Jun 2023 06:14 PM (IST)

    जाहिरातीवरून संजय राऊत यांनीही काढले चिमटे, म्हणाले…

    आजचा दिवस पूर्णपणे जाहिरातीमुळे गाजला असंच म्हणावं लागेल. जाहिरातीतून देवेंद्र फडणवीस गायब असल्याने विरोधकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. आता भाजपाने यावर उत्तर द्यावं असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. तर भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे.

  • 13 Jun 2023 06:08 PM (IST)

    जाहिरातीवरून विरोधकांचा शिवसेनेवर हल्लाबोल, फडणवीस यांना सुनावले खडे बोल

    जाहिरातीवरून विरोधकांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ खडसे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इतका अपमान करतील असं वाटलं नव्हतं, अशी बोचरी टीका नाना पटोले यांनी केली आहे. तर शिंदेंची राक्षसी महत्वकांक्षा फडणवीस यांना समजली असेल, असे खडे बोल जितेंद्र आव्हाड यांनी सुनावले आहेत.

  • 13 Jun 2023 06:00 PM (IST)

    तरुणांचे सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण, 70,000 जणांना नियुक्ती पत्र

    सरकारी नोकरीची क्रेझ आजही कायम आहे. गेल्या काही वर्षांपासून सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाल्याने आणि स्थानिक पातळीवरील भरती आयोगातील घोटाळ्यांमुळे अनेक तरुणांनी रोष व्यक्त केला होता. केंद्र सरकारने देशातील तरुणांना रोजगार देण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी एक पाऊल टाकले. देशातील विविध राज्यातील अनेक तरुणांच्या सरकारी नोकरीचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. त्यासाठी देशभरात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 70,000 तरुणांना नियुक्ती पत्र दिले.

  • 13 Jun 2023 05:42 PM (IST)

    ट्विटरचे पूर्व सीईओंचा दावा खरा- नाना पटोले

    ट्विटरचे पूर्वी सीईओ जॅक डोर्सी यांनी जो दावा केला आहे. शेतकरी आंदोलनाच्या बातम्या दाबण्यासाठी दबाव आल्याचा केलेला दावा खरा असण्याची दाट शक्यता असल्याचे मत काँग्रेसचे नाना पटोले यांनी केला. आज सीबीआय, ईडी या यंत्रणांचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप हा खोटं बोलणारा पक्ष असल्याचा निशाणा त्यांनी यावेळी साधला.

  • 13 Jun 2023 05:25 PM (IST)

    भारतातील अनेक राज्यांना हीट व्हेवचा फटका

    दिल्ली, पंजाब आणि हरियाणा या राज्यांना येत्या काही दिवसांत उष्ण वाऱ्यांचा फटका बसेल. या राज्यात तापमान येत्या काही दिवसांत 40-45 अंशावर जाण्याची शक्यता आहे. या वेळी बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेशात हीट व्हेवचा कहर सुरु आहे. येत्या पाच दिवसांत देशातील अनेक भागात उष्ण वारे वाहणार आहेत.

  • 13 Jun 2023 05:21 PM (IST)

    आर्वी तालुक्यातील स्टोरेज यार्डला भीषण आग

    आर्वी तालुक्यातील स्टोरेज यार्डला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. आग अजून आटोक्यात आलेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप ही समोर आलेले नाही.

  • 13 Jun 2023 05:12 PM (IST)

    तामिळनाडूतील ऊर्जा मंत्र्यांवर ईडीची धाड

    अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लॉड्रिंग प्रकरणात तामिळनाडूतील ऊर्जा मंत्र्यांवर धाड घातली. मंत्री वी. सेंथिलबालाजी यांच्या घरावर धाड टाकण्यात आली. त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीने सध्या चेन्नई, करुर आणि इतर ठिकाणी छापेमारी केली आहे.

  • 13 Jun 2023 05:07 PM (IST)

    स्वातंत्र्य सैनिकांना राज्य सरकारचा मोठा दिलासा

    स्वातंत्र्य सैनिकांना राज्य सरकारने मोठा दिलासा आहे. निवासी प्रयोजनासाठी जमीन देण्याबाबत कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. स्वःताची निवासी जागा नसलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना निवासी प्रयोजनासाठी 230 चौरस मीटर मर्यादेत शासकीय जमीन देण्यासाठी यापूर्वीची मासिक उत्पन्न मर्यादा 10,000 रुपये होती. मासिक वेतनात वाढ झाल्याने आता ही मर्यादा मासिक 30,000 रुपये करण्यात आली आहे.

  • 13 Jun 2023 05:01 PM (IST)

    कोल्हापूर: शासन आपल्या दारी कार्यक्रमात जाण्याचा प्रयत्न करणारे ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. कोल्हापूर मधील प्रलंबित प्रश्नांवरून आज ठाकरे गट मुख्यमंत्री शिंदे यांना करणार होता विचारणा. कोल्हापूरच्या कळंबास्पोर्ट्स जवळ जमले होते कार्यकर्ते

  • 13 Jun 2023 05:00 PM (IST)

    मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी उरला आता एकच दिवस

    भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) नागरिकांना आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी उद्यापर्यंतचा वेळ दिला आहे. फ्री आधार कार्ड अपडेट करण्याची अंतिम मुदत 14 जूनपर्यंत उपलब्ध आहे. त्यानंतर आधारमध्ये तपशील भरण्यासाठी, आवश्यक बदलासाठी नागरिकांना पूर्वीसारखेच शुल्क अदा करावे लागेल. ज्यांच्या आधार कार्डला 10 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे आणि त्यांनी यादरम्यान कधीच आधार कार्ड अपडेट केले नाही, त्यांच्यासाठी आधार कार्ड मोफत अद्ययावत करण्याची एकच दिवसांची संधी उरली आहे. आता ऑनलाईन आधार कार्ड अपडेटसाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही. तर आधार केंद्रावर (Aadhaar Centre) जाऊन ही प्रक्रिया पूर्ण केल्यास तुम्हाला कमीत कमी 50 रुपये शुल्क द्यावे लागेल.

  • 13 Jun 2023 04:53 PM (IST)

    गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, विजेचा कडकडाट

    हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे आज गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वारा व विजेच्या कडकडासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. आलेल्या पावसाने लोकांना काहीसा दिलासा मिळालाय. मागील काही दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात तापमान ४३ अंशवार आलंय त्यामुळे चांगलाच उकाडा होता. मात्र आज आलेल्या पावसामुळे लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

  • 13 Jun 2023 04:43 PM (IST)

    जाहिरातीवर बावनकुळेंचा खुलासा ऐकायला आवडेल – अजित पवार

    अशी जाहिरात कधी पाहिली नाही. जाहिरातीवर बावनकुळेंचा खुलासा ऐकायला आवडेल, अजित पवारांचा टोला. शिंदे लोकप्रियता दाखविण्यासाठी सत्ताधाऱ्यांमध्ये स्पर्धा. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका उद्या जाहीर करा, अजितदादांचं शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान. सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या मैदानात यावं. इतके लोकप्रिय आहात तर निवडणूक का टाळता?

  • 13 Jun 2023 04:35 PM (IST)

    सर्व्हे कुणी केला? जाहिरातीवरून अजितदादांचा सवाल

    जाहिरातीवरून अजितदादांचा सवाल, सर्व्हे कुणी केला? जाहिरातीत बाळासाहेब दिसेना अशी जाहिरात कधी पाहिली नाही. जाहिरातीतून बाळासाहेबांचा फोरो सोयीस्कररित्या वगळला. फडणवीसांपेक्षा शिंदे लोकांसाठी अनुकूल, भाजपला मान्य आहे का?

  • 13 Jun 2023 04:29 PM (IST)

    मुंबई: लोकल ट्रेन उशिराने धावत असल्याने प्रवाशी परेशान

    बोरिवली ते चर्चगेट आणि चर्चगेट ते बोरिवली जाणारी धीम्या लोकल ट्रेन 30 ते 40 मिनिटे उशिराने धावत आहेत. मालाड ते गोरेगाव दरम्यान सिग्नलच्या समस्या असल्याने अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर लोकल ट्रेन धीम्या गतीने धावत आहेत. बोरिवली ते कांदिवली रेल्वे स्थानकामध्ये स्लो मार्गावर लोकल ट्रेन धीम्या गतीने धावत आहे. लोकल ट्रेन उशिराने धावत असल्याने प्रवाशी परेशान.

  • 13 Jun 2023 04:20 PM (IST)

    शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये काँग्रेसचे आंदोलन

    औरंगाबादमध्ये हज हाऊस उघडण्यासाठी काँग्रेसचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात शेकडो काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झालेत.

  • 13 Jun 2023 04:17 PM (IST)

    सोलापूर: मुख्य बाजारपेठेत महापालिकेची अतिक्रमण कारवाई

    सोलापुरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मधला मारुती येथे महापालिकेने अतिक्रमण विरोधी कारवाई केलीये. मधला मारुती परिसरातील सराफ कट्टा इथले अतिक्रमण हटवले. कोणतीही नोटीस न देता अतिक्रमण विरोधी कारवाई केल्याची व्यापाऱ्यांची तक्रार. महापालिका प्रशासनाने वारंवार याबाबत सूचना दिलेली असताना अतिक्रमण तसेच ठेवल्याने कारवाई केल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्यात आली.
    दरम्यान सराफ व्यापाऱ्यांनी या घटनेचा निषेध केलाय.

  • 13 Jun 2023 03:58 PM (IST)

    बाळासाहेब आमच्या हृदयात आहेत, प्रकाश सुर्वेंचा राऊतांना टोला

    प्रत्येक वेळी आम्ही बाळासाहेबांचे नाव घेऊनच काम करतो, ते आमच्या हृदयात वसलेले आहेत. संजय राऊतांनी आम्हाला शिकवायची गरज नाही, असे प्रकाश सुर्वे यांनी सुनावले. जो पवार साहेबांची चाकरी करतो, त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवु नये असा टोलाही सुर्वे यांनी लगावला.

  • 13 Jun 2023 03:44 PM (IST)

    रिजेक्ट झालेल्या बस अमरावती जिल्ह्यासाठी पाठवल्या जातात, खासदार नवनीत राणा यांचा गंभीर आरोप

    रिजेक्ट झालेल्या एसटी बस अमरावती जिल्ह्यासाठी पाठवल्या जातात, ग्रामीण भागात आणि आदिवासी भागासाठी भंगार बस पाठवतात. असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

    नवनीत राणा कडून अमरावती बसस्थानकाची पोलखोल, त्यांनी एसटी बसने १० किलोमीटर प्रवास केला. यावेळी त्यांनी बसस्थानकाची पाहणी केली, तेथील असुविधांमुळे नाराजी वर्तवली. अमरावती एसटीबस स्थानकाला नवीन बस देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

  • 13 Jun 2023 03:32 PM (IST)

    डबल इंजिनचं सरकार रस्त्यावर उतरून काम करतंय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मी आणि देवेंद्र फडणवीस लोकांच्या मनात आहोत, आमची युती लोकांच्या मनातली आहेत, लोकांच्या कामासाठी आहे , असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

  • 13 Jun 2023 03:29 PM (IST)

    आमच्या कामाचा जनतेला फायदा होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात १० हजारांची वाढ होणार. शेतकऱ्यांना आपलं सरकार भरघोस मदत करणार. लातूरमध्ये पशुरोग निदान प्रयोगशाळा उभारणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

    राज्यातील सरकार हे मोदींच्या नेतृत्वात काम करत आहे. केंद्रातून राज्याला आर्थिक पाठबळ मिळतंय, असेही ते म्हणाले.

  • 13 Jun 2023 03:25 PM (IST)

    नुकसानग्रसत शेतकऱ्यांसाठी १५०० कोटी देण्याचा निर्णय घेतला आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    नुकसानग्रसत शेतकऱ्यांसाठी १५०० कोटी देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.  कोल्हापूरमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमातनंतर बोलताना शिंदे यांनी घोषणा केली.

  • 13 Jun 2023 03:10 PM (IST)

    जयपुर : पेपरफुटीच्या विरोधात भाजपचे आंदोलन

    पेपर फुटीप्रकरणी भाजप कार्यकर्ते अशोक गेहलोत सरकारविरोधात जयपूरमध्ये निदर्शने करत आहेत. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी वॉटर कॅननचा वापर केला.

  • 13 Jun 2023 02:50 PM (IST)

    मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर गाड्यांच्या लांबच लांब रांगा

    मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटाजवळ पेट्रोलचा उलटून मोठा अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. टँकरला आग लागल्याने मोठ्याप्रमात वाहतूक कोंडी झाली असून तब्बल पाच किलोमीटरपर्यंत वाहानांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुंबईहून पुण्याकडे येणारा रस्ता मोकळा आहे मात्र पुण्याहून मुंबईला जाणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. 

  • 13 Jun 2023 02:40 PM (IST)

    कोल्हापूरच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार नाही

    कोल्हापूर येथे आयोजीत शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही हजर राहाणार होते मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या कानाला इजा झाल्याने डॉक्टरांनी हवाई प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती नसणार आहे. मंत्री दिपक केसरकर यांनी ही सगळी माहिती दिली.

  • 13 Jun 2023 02:33 PM (IST)

    दरेकरांचा काही गैरसमज झाला असेल तर चर्चा करेन – मंत्री दिपक केसरकर

    जाहिरात देतांना एखादी चुक होऊ शकते, ती चुक सुधारल्या जावू शकते. आमच्यामध्ये कुठलेही गैरसमज आणि मतभेद नाहीत असे स्पष्टीकरण मंत्री दिपक केसरकर. आमच्यामध्ये एक ते दिड तास चर्चा झाली मात्र ती महाराष्ट्राच्या जनतेसाठी कोणत्या योजना राबवायच्या या संदर्भात झाली असे केसरकर म्हणाले. श्रेयवादाची लढाई दोन्हीही पक्षांमध्ये अजिबात नसल्याचे केसरकर यांनी ठणकावून सांगीतले. ही फुट पाडण्याचा प्रयत्न कोण करतयं हे उघड असल्याचा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

  • 13 Jun 2023 02:22 PM (IST)

    सर्वेक्षणावरून शिवसेना भाजपा युतीत वाद नाही- शंभूराज देसाई

    कॅबिनेट बैठकीनंतर शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सर्वेक्षणावरून शिवसेना भाजपा युतीत वाद नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. पाच मंत्र्यांना डच्चू मिळणार या बातम्यांमध्ये अजिबात तथ्य नाही असे शंभूराज देसाई म्हणाले. एखाद्या जाहिरातीमुळे कदाचीत गैरसमज पसरले असतील मात्र आम्ही एकत्र बसुन ते दूर करू असेही देसाई म्हणाले. ज्यांना आमच्यामध्ये भांडणं लावायचे आहेत त्यांना लावू त्या शिंदे आणि फडणवीस हातात हात घालून कामं करत आहेत असा टोलाही त्यांनी विरोधकांला लगावला.

  • 13 Jun 2023 02:10 PM (IST)

    मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक ठप्प

    मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर टँकरला अपघात झाल्यामुळे मोठी आग लागली आहे. या अघातात चार जणांचा दुरदैवी मृत्यू झाला तर तीघे गंभीर जखमी आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. मात्र वाहतूकीला याचा मोठा फटका बसला आहे. या अपघातामुळे एक्सप्रेस वेवर वाहतूक ठप्प झाली आहे.

  • 13 Jun 2023 01:59 PM (IST)

    नाशिक : बिऱ्हाड मोर्चातील कर्मचाऱ्याने गीताच्या माध्यमातून मांडल्या व्यथा

    नाशिकच्या गोल्फ क्लब येथून राज्यभरातील आदिवासी विभागातील रोजंदारीवरील वर्ग तीन आणि वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांनी बिऱ्हाड मोर्चा काढला आहे. गेल्या दहा वर्षांपासून रोजंदारीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घ्यावे आणि इतर प्रमुख मागण्यासाठी हे मोर्चेकरी मुंबईच्या दिशेने निघाले आहे. ‘सीएम साहेब न्याय द्या’ अशी आर्त हाक हे मोर्चेकरी मारत आहे.. या मोर्चातील एका कर्मचाऱ्याने आपल्या गीताच्या माध्यमातून आपल्या व्यथा शासनाकडे मांडण्याचा प्रयत्न केलाय. ‘पाठीवरती मारा, पण नका मारू पोटी’ असे गीत या कर्मचाऱ्याने सादर केले आहे.

  • 13 Jun 2023 01:53 PM (IST)

    नांदेड | मान्सून लांबणीवर तरीही शेतकऱ्यांच्या पेरणीची तयारी अंतिम टप्प्यात

    नांदेडच्या ग्रामीण भागात बी-बियाण्याच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांनी दुकानात गर्दी केलीय, नायगांव शहरातील बियाण्यांसह खतांच्या दुकानावर आज गर्दी झालेली दिसलीय. मान्सून लांबत असला तरी शेतकऱ्यांची पेरणीसाठी तयारी अंतिम टप्प्यात आलेली दिसत आहे. त्यामुळे आता बियाण्याच्या दुकानात वर्दळ वाढलीय, विशेष म्हणजे सोयाबीनचे बनावट बियाणे आजच आढळून आल्याने शेतकरी नामवंत कंपन्यांच्या बियाण्याला पसंती देताना दिसतायत.

  • 13 Jun 2023 01:45 PM (IST)

    नवी दिल्ली | भाजपचा 2024 साठी बडे चेहरे निवडणूकीच्या रिंगणात उतरवण्याचा प्लान ?

    भाजप 2024 च्या लोकसभा निवडणूकीसाठी राज्यसभा खासदारांना मैदानात उतरवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणूकीत बडे चेहरे उतरवून भाजप जनतेत जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातून नारायण राणे यांना भाजप निवडणूकीच्या मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. तसंच अर्थमंत्री निर्मला सितारमन, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना भाजप निवडणूकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • 13 Jun 2023 01:41 PM (IST)

    नाशिक | इगतपुरीत वादळी वाऱ्यामुळे विजेचा पोल कोसळला, ४ आदिवासी महिलांना विजेचा धक्का

    इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथे वादळी वाऱ्यामुळे विजेचा पोल पडल्यामुळे ४ आदिवासी महिलांना विजेचा धक्का बसला आहे. यामुळे ह्या महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर तातडीने टाकेद बुद्रुक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. ह्या घटनेत अन्य नागरिक आणि महिला तात्काळ बाजूला झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे. वीज मंडळाच्या गलथान कारभारामुळे लोकांचा जीव धोक्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. जुने विजेचे पोल तात्काळ बदलावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

  • 13 Jun 2023 01:36 PM (IST)

    शहादा तालुक्यातील कलमाडी तह गावात सिलेंडरचा भीषण स्फोट

    शहादा तालुक्यातील कलमाडी तह गावात एका घराला अचानक गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. यामध्ये घरातील संसार उपयोगी वस्तू, बचत केलेली रोख रक्कम आणि वर्षभरासाठी साठवून ठेवलेलं कडधान्य जळून खाक झाला आहे. तर या घटना कुठलीही जीवित हानी झालेली नाही आहे. कलमाडी तह गावातील परशुराम ठाकरे हे आपल्या कुटुंबासह शेती काम करून उदरनिर्वाह करतात त्यांची पत्नी छाया परशुराम ठाकरे या आशा वर्कर असून त्या दुपारी आपलं कार्य करून घरी आले त्यावेळी त्यांनी किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी गेल्या असता त्यांना गॅस सिलेंडर लीक झाल्याच्या अंदाज आल्याने आपल्या दोन मुलीसह घरात न बाहेर निघाले असतात गॅस सिलेंडरच्या स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होता की घरातील छत व भिंती ही कोसळल्या असून आगीच्या लोड बाजूतल्या परिसरापर्यंत पोहोचल्या अचानक झालेला स्फोटाने परिसरातील नागरिक भयभीत झाले असून परिसरातील नागरिकांनी वेळीच धाव घेत आग आटोक्यात आणली.

  • 13 Jun 2023 01:31 PM (IST)

    पुणे | मुस्लिम रिक्षाचालकांच्या सेवेने वारकरी भारावले, वारीत सामाजिक ऐक्याचं दर्शन

    राज्यातील हिंदू मुस्लिम सगळे धर्म सोबतच असल्याचा संदेश पुण्यातील काही रिक्षाचालकांनी यंदाच्या वारीतून दिला आहे. 11 जून रोजी आळंदीतून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरकडे झाले. आज संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पुण्यात मुक्कामास आहेत. लाखो वारकरी वारीसोबत पुण्यात दाखल झाले आहेत. यात वृद्ध, अपंग वारकरी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. अशा वारकऱ्यांना पुण्यातील मुस्लिम रिक्षाचालकांनी मोफत सेवा पुरवली आहे. आळंदी पासून पालखी मुक्काम स्थळापर्यंत या रिक्षाचालकांनी वारकऱ्यांना मोफत सेवा दिली आहे. फय्याज मोमीन आणि असिफ अली मोहम्मद सय्यद हे दोघेही या आपल्या सेवेबद्दल भरभरून बोलतात.

  • 13 Jun 2023 01:30 PM (IST)

    परळी | तहसील कार्यालयाबाहेर वयोवृद्ध दांपत्याचे बेमुदत उपोषण सुरू

    परळी तहसील कार्यालयाबाहेर शेत रस्त्याच्या मागणीसाठी वयोवृद्ध दांपत्याचे उपोषण सुरू आहे. आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. परळी तालुक्यातील हिवरा येथे शेत रस्त्यात जाणाऱ्या रस्त्याच्या मधोमध स्थानिकांनी नाला खोदून ठेवला आहे. त्यामुळे रहदारीचा रस्ता बंद झालाय. त्यामुळे हा रस्ता खुला करण्यात यावा या मागणीसाठी दांपत्य उपोषण करीत आहे. यापूर्वी दोन वेळा यांनी उपोषण केले होते. निगरगट्ट प्रशासन यांची दखल घेत नाही. आता मात्र जोपर्यंत सदरचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत उपोषणातून माघार घेणार नाही. असा पवित्रा वयोवृद्ध दांपत्याने घेतला आहे.

  • 13 Jun 2023 01:27 PM (IST)

    जळगाव | अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

    जळगावच्या अमळनेर तालुक्यातील अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून पांझरा नदी पात्रात 400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. अक्कलपाडा धरणाचे दोन दरवाजे वीस सेंटीमीटरने उघडण्यात आले आहे. धरणातून विसर्ग सोडल्याने पांझरा नदी काठच्या गावांना मोठा दिलासा मिळाला आहे

  • 13 Jun 2023 01:23 PM (IST)

    मुंबई | चर्चगेट ते बोरिवली लोकल 18 मिनिटे उशिराने, प्रवाशांना मनस्ताप

    चर्चगेट ते बोरिवली लोकल ट्रेन 18 मिनिटे उशिराने धावत आहे. ही ट्रेन 1:04 वाजता गोरेगाव स्थानकावर पोहोचणार होती, परंतु आतापर्यंत अंधेरी स्थानकावर पोहोचली आहे. ट्रेन उशिरा का धावत आहे, याचे कोणतेही कारण अद्याप समोर आले नाही. तर ट्रेन उशिरा धावत असल्याने ट्रेनमध्ये बसलेले लोक नाराज आहेत.

  • 13 Jun 2023 01:20 PM (IST)

    पुणे | पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एका टँकरला भीषण आग, काय आहे कारण?

    पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर एका टँकरला आग लागली आहे. पुण्यावरून मुंबईच्या दिशेने टँकर चालला होता. यामध्ये दोघे होरपळले आहेत. बोरघाटात एका पुलावर हा प्रकार घडला आहे. त्यातील एक महिला खालून जाणाऱ्या रस्त्यावर पडली आहे. दोन्ही बाजूची वाहतूक थांबविण्यात अली आहे. केमिकल घेऊन भरधाव वेगात निघालेल्या टँकरच्या चालकाचा ताबा सुटला, यामुळं टँकर स्लिप झाला, या अपघाताने टँकर रस्त्यावर आडवा झाला. मग त्यातील केमिकल रस्त्यावर पसरले, खालून जाणाऱ्या मार्गावरही केमिकल पसरले. त्यानंतर टँकरला आग लागली. खालील मार्गावर काम करणाऱ्या चार व्यक्तींवर हे केमिकल पडले. यात ते होरपळले. तर टँकरमधील आगीत होरपळले.

  • 13 Jun 2023 01:17 PM (IST)

    पंढरपूर | विठुरायाच्या दर्शनरांगेत भाविकांना 24 तास चहा पाण्यासह ऑनलाईन दर्शन

    विठुरायाच्या दर्शनाचा ओढीने लाखो वारकरी भक्त पंढरपूरकडे मार्गस्थ झाले आहेत. अशातच पंढरपुरात विठ्ठल भेटीसाठी असणाऱ्या मंदिरातील दर्शन रांगेत बारा पत्र्यांचे शेड उभे करण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. साधारणपणे 12 हजार भाविक उभा राहतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे या पत्र्यांच्या शेडमध्ये भाविकांना 24 तास चहा, पाणी नाश्ता जेवण त्याचबरोबर विठ्ठलाचे स्क्रीनवरती ऑनलाईन दर्शन अशा सुविधा देण्यात येणार आहेत.

  • 13 Jun 2023 01:15 PM (IST)

    नाशिक | राज्यातील आदिवासी विकास विभागातील रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांचा मंत्रालयापर्यंत मोर्चा

    राज्यभरातील आदिवासी विकास विभागातील रोजंदारीवरील वर्ग तीन आणि वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांनी नाशिक मधील गोल्फ क्लब येथून आपल्या विविध मागण्यांसाठी बिऱ्हाड मोर्चाला सुरुवात केली आहे. या मोर्चात शेकडोंच्या संख्येने कर्मचारी सहभागी आहे. मंत्रालयापर्यंत जाण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. 25 मे 2023 रोजीचे आदिवासी विकास विभागाचे शासन पत्र रद्द करावे, दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर बाहेरील कर्मचाऱ्यांना घेऊ नये, तसेच दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या वर्ग तीन आणि वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत संरक्षण देण्यात यावे आणि त्यांना सेवेतून कमी करू नये, अशा प्रमुख मागण्या घेऊन हे मोर्चेकरी मुंबईच्या दिशेने जात आहे. या मोर्चात लहान मुलांना घेऊन महिला आणि तसेच काही दिव्यांग बांधव देखील सहभागी झाले आहे.

  • 13 Jun 2023 01:12 PM (IST)

    पुणे | लोकसभा निवडणुकीसाठी मनसे सज्ज, वसंत मोरे यांचे भावी खासदार म्हणून बॅनर

    भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचेही भावी खासदार म्हणून बॅनर लावण्यात आले होते. काँग्रेसकडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांची तयारी आहे. आता मनसेकडून वसंत मोरे यांचे भावी खासदार म्हणून शहरात बॅनर्स लागले आहे. भाजप शहराराध्यक्ष जगदीश मुळीक, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे लागले होते भावी खासदार म्हणून बॅनर्स काही महिन्यांपूर्वी लागले होते. आता पुण्यातील सिंहगड रोड परिसरात वसंत मोरे यांचे बॅनर्स लागले आहे. वसंत मोरे यांनीही खासदारकीसाठी इच्छुक असल्याचे संकेत सोशल मीडियावर दिले होते. पुण्यात पोटनिवडणूक जाहीर होण्याआधीच भावी खासदारांची शहरात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

     

  • 13 Jun 2023 12:50 PM (IST)

    भंडारा | करडी – भंडारा मार्गावर भरधाव टिप्परने दुधाच्या ट्रकला दिली जबर धडक

    करडी – भंडारा मार्गावर भरधाव टिप्परने दुधाच्या ट्रकला दिली जबर धडक दिली आहे. धडक इतकी जोरदार होती की धडकेत दूध वाहन चालक आणि क्लिनर यांना गंभीर दुखापत झाली असून उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे पाठवण्यात आलं आहे. अपघातानंतर संतप्त गावकऱ्यांनी रास्ता रोखून धरले असून होणारी अवजड वाहतूक त्वरीत बंद करावी अशी मागणी केली आहे..

     

  • 13 Jun 2023 12:45 PM (IST)

    खंडाळा घाटत ऑईल टँकरला आग

    खंडाळा घाटत ऑईल टँकरला आग लागल्यामुळे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई – पुणे एक्स्प्रेसवेवरील खंडाळा घाटत ऑईल टँकरला मोठी आग लागल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. तासाभरापासून वाहतूक ठप्प झाली आहे.. आगीत दोन जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

     

  • 13 Jun 2023 12:40 PM (IST)

    राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 15 जुन रोजी धाराशिव येथे येणार

    राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 15 जुन रोजी धाराशिव येथे येणार आहेत. फडणवीस हे मोदी @ 9 मोहिमेअंतर्गत धाराशिव येथे सभा घेणार आहे… फडणवीस तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखडा बैठक घेणार आहेत. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पचे भूमिपूजन व पाहणी करणार देखील फडणवीस करणार आहेत. अशी माहिती भाजपाचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी दिली आहे…

  • 13 Jun 2023 12:29 PM (IST)

    औरंगाबाद | महाराष्ट्रातील कांद्याला तेलंगणात मिळाला 1 हजार 700 रुपयांचा भाव

    महाराष्ट्रातील कांद्याला तेलंगणात 1 हजार 700 रुपयांचा भाव मिळाला आहे. हैदराबादच्या मार्केटमध्ये कांद्याला तब्बल 1700 रुपयांचा भाव मिळाला आहे. महाराष्ट्रात कांद्याला 400 रुपयांचा भाव मिळत होता. तेलंगणात मात्र कांद्याला महाराष्ट्राच्या चौपाट भाव मिळाला आहे. कन्नड तालुक्यातून तब्बल 6 ट्रक कांदा तेलंगणात गेला होता. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तेलंगणाची मोठी मदत झाली आहे. तेलंगणात कांद्याला चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे..

  • 13 Jun 2023 12:26 PM (IST)

    संतोष सुमन यांचा अल्पसंख्यांक मंत्रीपदाचा राजीनामा, नितीश कुमार सरकारला मोठा झटका

    बिहार पाटना | नितीश कुमार सरकारला मोठा झटका लागला आहे. संतोष सुमन यांचा अल्पसंख्यांक मंत्रीपदाचा राजीनामा… जितन राम मांझी यांचा मुलगा संतोष सुमन यांनी राजीनामा दिला आहे. पण त्यांनी राजीनामा देण्याचे कारण अस्पष्ट आहे.. 23 तारखेला विरोधी पक्षांची बैठक होणार आहे… बैठकीपूर्वीच नितेश कुमार सरकारला मोठा धक्का बसला आहे…

  • 13 Jun 2023 12:20 PM (IST)

    शिनसेनेमुळे भाजप पुन्हा सत्तेत – गजानन किर्तीकर

    शिनसेनेमुळे भाजप पुन्हा सत्तेत आलं असल्याचं वक्तव्य गजानन किर्तीकर यांनी केलं आहे. शिवसेनेचे ४० आमदार एकत्र आल्याने भाजप पुन्हा सत्तेत आलं आहे. असं वक्तव्य सेनेच्या बैठकीत गजानन किर्तीकर यांनी केलं आहे.

  • 13 Jun 2023 12:17 PM (IST)

    आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस…वाढदिवानिमित्त युवा सेनेच्यावतीने सामाजिक उपक्रमांचं आयोजन

    युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे… त्यांच्या वाढीदवसानिमित युवा सेनेच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. चेंबूरमध्ये युवा सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप पार पडले.

    शिवाय याठिकाणी आणि मुंबई उपनगरात मोठ्या प्रमाणात युवा सेनेच्या वतीने आदित्य ठाकरे यांना भावी मुख्यमंत्री म्हणून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. जो सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतो आहे. या बाबत सूरज चव्हाण आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हे बॅनर म्हणजे जनतेच्या मनातल्या भावना असल्याचे सांगितले.

  • 13 Jun 2023 12:08 PM (IST)

    बाळासाहेबांची शिवसेना ते म्हणतात, बाळासाहेबांचा फोटो नाही, हे आश्चर्य…. – छगन भुजबळ

    मला आश्चर्य वाटतंय नेहमी पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि खाली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या दोघांचे फोटो असायचे. आज उपमुख्यमंत्री फडणवी एकदम गायब झाले आहेत.. मला आश्चर्य वाटतं, ही शिंदे साहेबांची मोठी झेप आहे. बाळासाहेबांची शिवसेना ते म्हणतात, बाळासाहेबांचा फोटो नाही… असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे… ते पुढे म्हणाले, ‘फडणवीसांना ते विसरले तर विसरुदे.. पण बाळासाहेबांना तर निदान विसरता कामा नये… मला माहित नाही, सर्व्हेची आकडेवारी कुणी काढली? असं देखील छगन भुजबळ म्हणाले..

     

  • 13 Jun 2023 12:03 PM (IST)

    बुलढाण्यात दोन गटातील वाद विकोपाला, 19 जण जखमी

    बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील वरूड गावात दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. वरुड गावातील दोन गटातील जुना वाद विकोपाला गेल्याने ही संपूर्ण घटना घडली आहे. यामध्ये तब्बल 19 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. यामध्ये नऊ जणांना अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ रेफर करण्यात आल आहे. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीसांनी तब्बल 22 लोकांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहे. दंगा काबू पथकासह पोलिसांची मोठी कुमक गावातील परिस्थिती हाताळून आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असल्याचे पाहायला मिळतंय.

  • 13 Jun 2023 11:49 AM (IST)

    ओबीसींसाठी सातत्याने काम केले – अनिल देशमुख

    बावनकुळे यांना माहीत आहे, ओबीसी समाजात 350 जाती आहे. या समाजाची जनगणना झाली पाहिजे अशी मागणी आहे. जेव्हा आकडेवारी समोर येईल, ज्यांच्यावर अन्याय होत आहे. त्यांच्यासाठी सरकारला काम करता येईल, पण त्याच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, उच्चशिक्षित मुले हे परदेशला जाताना शिष्यवृत्ती कमी आहे, जनगणना झाल्यावर खरी परिस्थिती समोर येईल. राष्ट्रवादीचे अनेक कार्यक्रम ओबीसींसाठी केले, आम्ही सातत्याने काम केले.

  • 13 Jun 2023 11:46 AM (IST)

    सगळं हास्यास्पद आहे – अनिल देशमुख

    स्वतःच एजन्सीकडून स्वतःची पाठ थोपटण्याचा प्रकार आहे, अशी जाहिरात हास्यास्पद आहे. आज सर्व जनता त्रस्त आहे. बेरोजगारी, शेतकरी, मोठे उद्योग महाराष्ट्रात येणार होते. लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम शिंदे करत आहेत. शिंदे मतदार संघात जाऊन पाहिले तर खरी परिस्थिती लक्षात येईल. 40 पैकी तीन ते 4 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाही अशी परिस्थिती असताना असे सर्व्हे दाखवले जात आहेत. शिंदे यांनी दिशाभूल करू नये अशी विनंती करायची आहे. त्यांच्या मित्र पक्षातील फडणवीस आहे, तिन्ही पक्ष मिळून निवडणुका लढणार आहेत. महाराष्ट्रात पाहिले तर mva सरकार येणार आहे. प्रतिष्ठित एजन्सीचा सर्वे मानायचा असतो, अशा सर्व्हेला काही महत्व नाही, असे अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

  • 13 Jun 2023 11:42 AM (IST)

    सांगलीत वादग्रस्त स्टेटसवरुन तणाव

    कसबे डिग्रज गावात एका युवकाने वादग्रस्त स्टेटस ठेवल्यानंतर गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी संबंधित युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गावामध्ये सध्या शांतता आहे. काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्यानंतर गावातील ज्येष्ठ मंडळी आणि पोलिसांनी हस्तक्षेप करत सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केलं आहे.

  • 13 Jun 2023 11:38 AM (IST)

    शिवसेनेची जाहीरात पाहून आश्चर्य – छगन भुजबळ

    शिवसेनेच्या जाहीरातीवर राष्ट्रवादीचे नेते छगल भुजबळ यांनी टीका केली आहे. शिंदे फडणवीसांना विसरले, बाळासाहेबांना विसरायला नको अशी भुजबळ यांनी केली आहे. जाहीरातीत फडणवीसांचा फोटो नाही ही शिंदेंची मोठी झेप आहे. जाहीरातीत फडणवीसांचा फोटो नाही बघून अनेकांची मनं दुखावली असतील.

  • 13 Jun 2023 11:34 AM (IST)

    लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेली चंद्रभागा नदी घाणीच्या विळख्यात

    आषाढी यात्रा तोंडावर असताना भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चंद्रभागा नदीपात्रात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सध्या नदीपात्रातील पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. अशा घाण पाण्यातच भाविक पवित्र स्नान करत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.‌

  • 13 Jun 2023 11:31 AM (IST)

    मनसे नेते वसंत मोरे यांचे शहरात बॅनर्स

    मनसे नेते वसंत मोरे यांचे आता भावी खासदार म्हणून शहरात बॅनर्स लागले आहेत. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात हे बॅनर्स लागलेत. याआधी भाजप शहराराध्यक्ष जगदीश मुळीक, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे भावी खासदार म्हणून बॅनर्स लागले होते. वसंत मोरे यांनी खासदारकीसाठी इच्छुक असल्याचे सोशल मीडियावर संकेत दिले होते. पुण्यात पोटनिवडणूक जाहीर होण्याआधीच भावी खासदारांची शहरात जोरदार चर्चा आहे.

  • 13 Jun 2023 11:26 AM (IST)

    मुल्ला मौलवीनी सांगितलं मुस्लिमांचे एकही मत भाजपला देणार नाही – खैरे

    देशात मुस्लिम लोक मोदी मित्र होणार नाही, मला मोठ्या मौलवींनी सांगितले. माझ्या दिल्लीतील बंगल्यात यायचे. अनेक अग्रिकल्चर अधिकारी भेटले ते म्हटले खूप प्रेशर आहे. 12 अधिकारी 20 स्टाफ यांच्यामार्फत वसुलीचे काम सुरू आहे. मी nda काम करताना पाहिलं, मी st चा मंत्री असताना निवड समिती भ्रष्टाचार करीत होते. त्यावेळी मला विचारलं गेलं. मला आदेश येताच मी सदस्य पदाधिकारी नसल्याचा आदेश काढला. मिंधे गट धडधडीत पैसे आणा ठेवा म्हणतात, मंत्रालयात त्यांच्या कॅबिनमध्ये पैशे मोजायची मशीन ठेवले आहे. दरेकर आणि घोसाळकर यांची शिवसेनेत असताना मारामारी झाली होती, त्यानंतर ते मनसेत गेले होते. त्यांचं काही खरं आहे का? गुणवंत सदावर्ते भाजपच्या इशाऱ्यावर काम करतात.

  • 13 Jun 2023 11:24 AM (IST)

    लाखो रुपयांच्या करोडोच्या जाहिराती देऊन टिमकी मिरवणार हे सरकार – चंद्रकांत खैरे

    जाहिरात प्रकरणावरुन ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी टीका केली आहे. मी पण जाहिरात देऊ शकतो. जनतेच्या सर्व्हे झाला होता हे फेल आहेत. फडणवीस डाऊन झाले. हुशार व्यक्ती चाणक्य व्यक्ती खाली आणि कमी शिकलेले पुढे. हा सर्व्हे चुकीचा भाजपला डॅमेज करणार आहे. आमच्या शिवसेनेची मान्यता आजही प्रचंड आहे. अनेक जण सांगतात शिवसेना प्रतिमा वाढली आहे. एक मोठा नेता बोलला मी नाव सांगत नाही. हे तीन दिवस कुठे गायब झाले, आता प्रकट झाले.

    भाजपच्या जुन्या मित्रांना दाखवावा लागेल. शिंदे सोबत गेल्याने तुम्ही डाऊन झालात. उद्धव साहेब सोबत असताना तुम्ही मुख्यमंत्री होता. आताची परिस्थिती तुम्हाला आवडेल का, तुमचे चेहरे पडले आम्ही टिव्हीत बघतो, फडणवीस यांचा चेहरा पडला.

    शिंदे गट आणि भाजपच मतभेद चव्हाट्यावर यायला लागेल. शिवसेना प्रमुखांच्या नाव घेतलं जात कट्टर म्हणतात. मग बाळासाहेबांचा फोटो टाकला पाहिजे होता. हे सर्व भाजप कडे तर चालल्ले नाहीत ना अस दिसतंय. शिस्तबद्ध भाजपला हे कसं आवडतं. वाचाळवीर भाजपला प्रतिमा स्वच्छ ठेवायचं असेल तर या लोकांना काढावा लागेल. उद्धव साहेबांच्या कारकिर्दीवर बोट ठेवायचा अधिकार नाही. सर्वसामान्य नागरिक आजही ठाकरेंची स्तुती करतात. हा सर्वे यांनी केलेला आहे. यांच्याकडे चेले चपटे आहेत, त्यांनी सर्व्हे केला. यांचा (शिवसेना (शिंदे) – भाजप) फाटतय म्हणून मला आनंद आहे.

  • 13 Jun 2023 11:18 AM (IST)

    लातूरमध्ये अपात्र सदस्यांचा तहसीलमध्ये गोंधळ

    लातूर जिल्ह्यातल्या 410 ग्राम पंचायत सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने अपात्रतेची कार्यवाही करण्यात आली आहे. मात्र अनेक सदस्यांनी प्रमाणपत्र सादर केल्याचे समोर आले आहे. जात प्रमाणपत्र देऊनही अपात्रतेची कार्यवाही करण्यात आल्याने रेणापूर तहसीलमध्ये ग्राम पंचायत सदस्यांनी गोंधळ घातला. आम्ही प्रमाणपत्र दिले आहे, तरी देखील कार्यवाही का ? असा सवाल त्यांनी तहसीलदारांना केला. प्रमाणपत्र सादर केलेल्या सदस्यांवरील अपात्रतेची कार्यवाही मागे घ्या अशी मागणी सदस्यांची आहे.

  • 13 Jun 2023 11:10 AM (IST)

    शिवसेनाप्रमुख आमच्या हृदयात – शंभुराजे देसाई

    शिवसेनाप्रमुख आमच्या हृदयात आहेत. अशा पद्धतीचे वक्तव्य करुन राऊत वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आम्ही काम करतो. वंदनीय बाळासाहेबांच्या आशीर्वादावर चाललेली शिवसेना आहे. चिन्ह नाव आम्हाला मिळालं हा आशीर्वादचं आहे. जाहीरातीवरील टीकेला शंभुराजे देसाई यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.

  • 13 Jun 2023 11:07 AM (IST)

    कोल्हापूरमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटिसा

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोल्हापूरच्या प्रलंबित प्रश्नाबाबत विचारणा करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आंदोलन किंवा एकत्र येऊ नये अशा नोटिसीद्वारे सूचना केल्या. हा शासकीय कार्यक्रम नव्हे तर राजकीय इव्हेंट असल्याची टीका ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली. ही दडपशाही चालणार नाही. आम्ही एकत्र येणार आमचे पाच प्रश्न मुख्यमंत्र्यांना सभेच्या ठिकाणीच विचारणार, असे म्हणत ठाकरे गट आपल्या भूमिकेवर ठाम आहे.

  • 13 Jun 2023 11:05 AM (IST)

    रत्नागिरीत कातळशिल्पांची पाहणी करण्यासाठी संशोधक आणि अभ्याकांची टीम बारसूत दाखल

    बारसूतील कातळशिल्पांच्या ठिकाणी देशातील नामांकित संशोधक आणि अभ्यासकांची टीम पाहणी करण्यासाठी दाखल झाली आहे. या टीमसोबत खासदार विनायक राऊत हे देखील बारसू सड्यावर पाहणीसाठी पोहचले आहेत. संशोधक पार्थ चौहान, मृदुला माने, जिग्ना देसाई, प्रविण सुकुमारन, सुधिप रिसबुड यांची टीम पाहणी करत आहे. बारसू सड्यावर रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे.

  • 13 Jun 2023 10:53 AM (IST)

    अकरा वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

    लातूर शहरातल्या एका हॉटेलच्या खिडकीतून खाली कोसळल्याने अकरा वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अध्या देशपांडे ही चिमुकली आपल्या पाहुण्यांकडे कार्यक्रमाच्या निमित्ताने आली होती. शहरातल्या अंजनी हॉटेलमध्ये तिसऱ्या मजल्यावरील खोलीत ती नातेवाईकांसह थांबली होती. काचेच्या खिडकीत बसून ती बाजूला सुरु असलेला व्हॉलीबॉलचा खेळ पाहत होती. तिचा तोल गेल्याने ती खिडकीतून खाली कोसळली.

  • 13 Jun 2023 10:47 AM (IST)

    चांदोली धरणात ४.९२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक

    सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली धरणात ४.९२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा जेमतेम एक महिना पुरेल इतकाच आहे. यामुळे आता सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. आता जून महिना अर्धा संपला आहे. धरणात फक्त १८.१२ टक्के पाणी शिल्लक आहे.

  • 13 Jun 2023 10:42 AM (IST)

    चार ते पाच प्लास्टिक गोदामं आगीत जळून खाक

    बोईसर अवधनगर परिसरातील प्लास्टिक गोदामांना मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती. चार ते पाच प्लास्टिक गोदामं आगीत जळून खाक झाली आहेत. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. तीन अग्निशमन दलाच्या गाड्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात पहाटेच्या सुमारास यश आले आहे. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही, मात्र लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालं आहे.

  • 13 Jun 2023 10:39 AM (IST)

    सह्याद्री राज्य अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळ बैठकीचं आयोजन

    आज सह्याद्री राज्य अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळ बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.
    राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने विकसित केलेल्या रजिस्ट्रेशन मॉड्युलचे अनावरण करण्यात येणार आहे. या नंतर ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरला जाणार आहेत.

  • 13 Jun 2023 10:19 AM (IST)

    विरोधी पक्षांची बिहारमधील पटनामध्ये बैठक

    23 तारखेला विरोधी पक्षांची बिहारमधील पटनामध्ये बैठक आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत बैठकीला असणार उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बैठकीचं आयोजन केलं आहे. अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जीही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

  • 13 Jun 2023 10:14 AM (IST)

    अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाचा दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

    अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सांगलीच्या तासगाव तालुक्यातील तरुणास न्यायालयाने दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. राहुल गुलाब जाधव असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सह सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी सदरची शिक्षा सुनावली आहे. सरकारतर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील आरती देशपांडे साटविलकर यांनी काम पाहिले.

  • 13 Jun 2023 10:10 AM (IST)

    अमोल कोल्हे यांनी मतदार संघ पिंजून काढायला सुरुवात केली

    शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी मतदार संघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. मात्र मतदार संघात आल्यास काळे झेंडे दाखविले म्हणून माजी सरपंचाला पोलिसांनी ताब्यात घेतले. चार तास हा गोंधळ सुरु होता अशी माहिती मिळाली आहे.

  • 13 Jun 2023 10:05 AM (IST)

    आनंदाच्या क्षणी शिंदे बाळासाहेबांना कसे विसरले – संजय राऊत

    ‘शिंदेंच्या जाहिरातीत मोदींचा फोटो, बाळासाहेबांचा फोटो नाही.’ शिंदेंची सेना ही मोदींची ‘शवसेना’ आहे. आनंदाच्या क्षणी शिंदे बाळासाहेबांना कसे विसरले असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला आहे. फडणवीसांपेक्षा शिंदे श्रेष्ठ असल्याचे जाहिरातीतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

  • 13 Jun 2023 09:00 AM (IST)

    किरकोळ महागाईदरात दिलासादायक घट

    भाजीपाला, तृणधान्य किमती घसरल्यामुळे मे महिन्यात किरकोळ महागाई दर 25 महिन्यांच्या नीचांकी 4.25 टक्क्यांवर नोंदवला गेला. महागाई दरात घसरणीचा हा क्रम सलग चौथ्या महिन्यात कायम आहे. ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित महागाई दर आधीच्या एप्रिल महिन्यात 4.7 टक्के पातळी होता. तर गेल्या वर्षी म्हणजे मे 2022 मध्ये तो 7.04 टक्के अशा चिंताजनक पातळीवर होता.

  • 13 Jun 2023 08:54 AM (IST)

    नवी दिल्ली | येत्या 23 जून रोजी विरोधी पक्षांची बैठक

    बिहारच्या पाटणामध्ये विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही बैठकीला जाणार आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही बैठक बोलावली आहे. अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जीही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

  • 13 Jun 2023 08:48 AM (IST)

    गुजरात : बिपरजॉय चक्रीवादळाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा

    चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यावेळी त्यांनी बिपरजॉय चक्रीवादळासंदर्भातील पूर्वतयारीची माहिती घेतली. आपत्तीच्या काळात सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन केंद्र सरकारने दिलं आहे. गुजरात राज्याला चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

  • 13 Jun 2023 08:42 AM (IST)

    बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित

    आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. भावनगर, राजकोट, अहमदाबाद आणि गांधीधाममध्ये आपत्कालीन नियंत्रण कक्ष उघडण्यात आले आहेत. अतिरिक्त हेल्पलाइन क्रमांक देखील सक्रिय केले आहेत, असं माहिती आणि प्रकाशन रेल्वे बोर्डाच्या संचालकांनी दिली.

  • 13 Jun 2023 08:36 AM (IST)

    चक्रीवादळामुळे द्वारकामधील समुद्र खवळला

    गुजरात : बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे द्वारकामधील समुद्र खवळला असून जोरदार वारे वाहत आहेत. IMD च्या ताज्या अपडेटनुसार, चक्रीवादळ 15 जूनच्या संध्याकाळपर्यंत जखाऊ बंदराजवळील सौराष्ट्र आणि कच्छ पार करणार आहे.

    पहा व्हिडीओ

  • 13 Jun 2023 08:30 AM (IST)

    जुहूतील समुद्रात बेपत्ता झालेल्या पाच जणांपैकी दोघांची सुटका, एकाचा मृत्यू

    मुंबईतील जुहू बीचवर काल समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या पाच जणांपैकी दोघांची सुटका करण्यात आली आहे. पाच जणांपैकी एकाचा मृत्यू झाला असून उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे. बिपरजॉय वादळामुळे समुद्र खवळलेला असून त्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनारी न जाण्याचं आवाहन मुंबई महानगरपालिकेनं नागरिकांना केलं आहे.