मुंबई : अभिनेता सलमान खान होस्ट करत असलेला बिग बॉस ओटीटी-2 आजपासून सुरू होत आहे. आज रात्री 9 वाजता या शोचा ग्रँड प्रीमियर जियो सिनेमावर स्ट्रीम होणार आहे. ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ यांच्यावर ठाण्यात शाईफेक आणि मारहाण. घटनेचा ठाकरे गटाकडून तीव्र निषेध. कल्याण पश्चिम येथे शिंदे गटाचा मार्गदर्शन मेळावा. खासदार श्रीकांत शिंदे मार्गदर्शन करणार. लोणावळ्यात राष्ट्रवादीच्या डॉक्टर सेलची राज्यस्तरीय निवासी कार्यशाळा. विरोधी पक्षनेते अजित पवार करणार कार्यशाळेचं उद्घाटन. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जी-20 चा कार्यक्रम. मंत्री चंद्रकांत पाटील कार्यक्रमाला हजेरी लावणार. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून 42.50 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या कार्यक्रमानिमित्त कल्याणमध्ये ठीक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. शिवसेना आणि भाजपचे सर्व नेते एकाच बॅनरवर असल्याचे पाहायला मिळत आहे. आमदार आणि कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण हे देखील बॅनरवर झळकले, काही दिवसांपुर्वी त्यांच्या वक्तव्यानंतर वर्चस्वाचा वाद उफाळून आल्यानंतर आज हे नेते एकाच बॅनरवर दिल्याने व्यासपीठावर हे नेते काय बोलणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
अहमदनगर : राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडतेय. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून थोरातांना भाजपचे विवेक कोल्हे यांची साथ मिळालीय. अवघ्या राज्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागलय. विवेक कोल्हे हे भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव असून त्यांनी विखेंना साथ देण्याऐवजी थोरातांचे बोट धरल्याने या निवडणुकीत रंगत वाढलीय. विखे पाटील यांनी कारखाना व्यवस्थित चालवता नाही त्यामुळे शेतकरी, सभासद आम्हाला कौल देतील असा विश्वास विवेक कोल्हे यांनी व्यक्त केलाय.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्यासह सर्वच मानाच्या संताच्या पालखी सोहळा उत्साहात होत आहे. या सर्वच मानाच्या संताच्या पालखी सोहळ्याचा शेवटचा मुक्काम वाखरी पालखी तळावर असतो. या तळावर सध्या अस्वच्छतेचे वातावरण आहे. पालखी कट्ट्यावरील फरशा फुटल्या आहेत. प्रशासनने अद्याप तरी याबाबत ठोस पावले उचलायला सुरू केली नाहीत. नेहमी वेळेवर कामे करून त्याचा दर्जा राखला जात नाही पुन्हा दरवर्षी दुरुस्ती करण्याची कामे काढली जातात. त्यामुळे मोठी गैरसोय होत असल्याचे समोर आले आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील चिंचोली निळोबा येथील मनोहर देवकर आणि राम देवकर ह्या दोन ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केलाय. मनोहर देवकर आणि राम देवकर ह्या दोन ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून 150 घरांना केशर आंब्याच्या वृक्षांचे वाटप केले. पर्यावरणाचे महत्व लक्षात घेता हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
अकोला कृषी विभागाचा वादग्रस्त छापा प्रकरण चर्चेत आले आहे. या छापा टाकणाऱ्या पथकातील चाळीस अधिकार्यांना कृषी संचालकांनी पुण्यात बोलवलं आहे. बैठकीत सगळ्या कागदपत्रांची तपासणी करत अधिकाऱ्यांची चौकशी कृषी संचालक करणार आहे. या प्रकरणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी एकूण ६२ आधिकारी असल्याच सांगितल होते. पण आज पुण्यात फक्त ४५ अधिकाऱ्यांना बोलवण्यात आले आहे. यामुळे इतर १७ जण नेमके कोण होते? हा मुख्य आहे
बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून कोकणातच रखडलाय. मान्सूनची रेषा रत्नागिरीपर्यतच कायम आहे. त्यामुळे मान्सून अद्याप पुढे सरकलेला नाही. १८ जूननंतर मान्सूनला गती मिळण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. नैऋत्य मोसमी पावसाच्या पुढच्या प्रवासासाठी १८ ते २१ जूनदरम्यान अनुकूल परिस्थिती अरबी समुद्रात निर्माण होईल. रत्नागिरीत वेगवान वारे वाहत आहेत. तुरळक पावसाच्या सरी रत्नागिरीत पडतायत. रत्नागिरीकरांना देखील दमदार पावसांच्या सरींची प्रतिक्षाच आहे. महाराष्ट्राला मान्सून व्यापण्यास विलंब होणार आहे.
कल्याणपूर्वमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. कल्याण पूर्व लोकग्राम पादचारी पूलाच्या कामाकरीता ४२ कोटी ५० लाखाचा निधी मंजूर करण्यात आले आहे. त्यासंदर्भात बॅनरबाजी करण्यात आली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. बॅनरवर भाजप अन् शिवसेनेच्या केंद्रीय नेत्यांपासून कल्याण डोंबिवली परिसरातील सर्व पदाधिकाऱ्यांचे फोटो आहेत.
आशिष देशमुख केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी दाखल झाले. उद्या आशिष देशमुख यांचा भाजपात प्रवेश करणार आहे. भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर आशिष देशमुख यांनी गडकरींची भेट घेत आहेत. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची भेट आहे.
चढ्या दराने बियाणे विक्री करणाऱ्या यवतमाळ शहरातील कृषी केंद्रावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दिले. 850 रुपयांची बॅग 1200 ते 1400 रुपयात विकली जात होती. यासंदर्भात टीव्ही ९ मराठीने वृत्त दाखवले होते. त्यानंतर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दिले.
मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु आहे. केंद्रीय मंत्र्यांचे घर जाळले जात आहे. मणिपूरमध्ये १०० पेक्षा जास्त अतिरेकी घुसले आहे. त्यांना चीनचा पाठिंबा मिळत आहे. परंतु केंद्र सरकार चीनवर कारवाई करत नाही. पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केली जाते, तशी सर्जिकल स्ट्राईक चीनवर करण्याची केंद्र सरकारची हिंमत आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु आहे. केंद्रीय मंत्र्यांचे घर जाळले जाते. लाखो लोक पलायन करत आहे. त्यानंतर सरकारकडून कारवाई होत नाही. सरकारला हवे तरी काय? मणिपूरला काश्मीर बनवायचे आहे का? हे सर्व केंद्रीय गृहमंत्रालयाचे अपयश आहे.
मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना संगमनेर शहरात अटक करण्यात आली. मुलीच्या फिर्यादीवरून बिहारमधील दोघांना अटक करण्यात आली. सोशल मिडियातून दोघांशी त्या मुलीची ओळख झाली होती. ते मुलीला भेटायला आल्यावर पळवून नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
मुलीच्या फिर्यादीवरून बिहार राज्यातील अकरम शेख आणि नेमतुल्ला यांना अटक केली आहे.
अकोला कृषी विभागाचा वादग्रस्त छापा प्रकरण… छापा टाकणाऱ्या पथकातील चाळीस अधिकार्यांना कृषी संचालकांनी पुण्यात बोलवलं आहे. छाप्यावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर अधिकाऱ्यांची कृषी संचालक चौकशी करणार आहेत. अधिकाऱ्यांची बैठक घेत पुण्यात कृषी संचालक या छाप्या विषयी चौकशी करणार आहेत. छाप्याच्या संदर्भातील कागदपत्रांची कृषी संचालक पडताळणी करणार आहेत. या छाप्यात सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी देखील कृषी संचालक करणार आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज पुणे दौऱ्यावर आहेत. चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजप टिफिन बैठक घेणार आहे. खडकवासला आणि शिवाजीनगर या विधनासभा मतदारसंघात टिफिन बैठक होणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे.
अहमदनगरमध्ये मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. संगमनेर शहरातील या घटनेने परिसरात घबराट पसरली आहे. मुलीच्या फिर्यादीवरून बिहारमधील दोघांना अटक करण्यात आली आहे. सोशल मिडीयातून मुलीची ओळख झाली होती. 2 वर्षांपूर्वी पब्जी गेमच्या माध्यमातुन मुलीची आरोपींशी ओळख झाली. या मुलीला भेटायला आल्यावर पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. मुलीच्या फिर्यादीवरून बिहार राज्यातील आक्रम शेख आणि नेमतुल्ला यांना अटक करण्यात आली आहे. लव्ह जिहाद आणि धर्मातरचा प्रकार असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे. पोलीस तपासात धर्मातर की लव्ह जिहाद हे स्पष्ट होणार आहे. आज दुपारी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
नाशिकमध्ये पोक्सोच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीने पोलीस स्टेशनमध्येच आत्महत्येचा प्रयत्न केला. कारवाईच्या भीतीपोटी सिन्नर पोलीस स्टेशनच्या पहिल्या मजल्यावरुन उडी मारली आहे. जितेंद्र तोरोले (रा. खडकीवन, मध्यप्रदेश) असं संशयित आरोपीचं नाव आहे. सध्या त्याच्यावर नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. पिडीत मुलगी साडे बारा वर्षांची असून, ती चार महिन्यांची गर्भवती आहे.
शिंदे गटाचा एक शिवसैनिक मुख्यमंत्र्यांना भेटायला चक्क सायकलवरून मुंबईला जायला निघालाय. मिरजेहून शिवसैनिक अनिल पाटील हे मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्यासाठी निघाले आहेत. टीव्ही 9 मराठीशी बोलताना ते म्हणाले की, आजपर्यंत कधीच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असो की उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांना भेटलो नाही पण आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला सायकलवरून निघालो आहे. त्यांच्या भेटीसाठी सांगली ते ठाणे असा सायकल प्रवास करून अनिल पाटील आपलं स्वप्न पूर्ण करणार असल्याचं ते म्हणाले.
कोल्हापूरमधील जलजीवन मिशनचे काम अडवणाऱ्यांवर आता थेट गुन्हे दाखल होणार आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सीईओ संजयसिंह चव्हाण यांनी इशारा दिला आहे. मंजूर कामांमध्ये अडथळे आणणाऱ्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील दीडशेहून अधिक गावांमध्ये मंजुरी मिळूनही जलजीवन मिशनची कामं सुरू झाली नाहीत. ग्रामपंचायतमध्ये झालेलं सत्तांतर आणि स्थानिक राजकारणातून आलेल्या तक्रारांमुळे कामात अडथळे येत आहेत. मंजूर कामे पूर्ण करावीच लागणार स्पष्ट सूचना सीईओंनी दिल्या आहेत. कार्यारंभ आदेश देऊनही काम सुरू न करणाऱ्या ठेकेदारांवरही कारवाई होणार आहे.
सांगलीतील कुपवाड एमआयडीसीमधील पाणी पुरवठा रात्री सुरळीत झाला आहे. एमआयडीसीमधील पाणीपुरवठा बंद झाल्याच्या बातमीनंतर रात्री एक पंप सुरु करुन पाणीपुरवठा सुरु केला आहे. कुपवाड एमआयडीसीमधील एक हजारहून अधिक उद्योगांना करण्यात येणारा पाणीपुरवठा गुरुवारी रात्री अचानक बंद करण्यात आला होता. पाणीपुरवठा अचानक बंद केल्यामुळे उत्पादनावर परिणाम होऊन उद्योजकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं होतं.
कोल्हापूर जिल्ह्यातील संबंधी आदेश अखेर तीन दिवसांसाठी शिथिल करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर अखेर पाटबंधारे विभागाने हा निर्णय घेतलाय. आज रात्रीपासून मंगळवारपर्यंत नद्यांमधून पाणी उपसा करता येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमधल्या कमी पाणी साठ्याच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने बेमुदत उपसा बंदी आदेश लागू केले होते. आदेश मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सिंचन भवन कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला होता.
बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मोठ्या प्रमाणात अवैध बायोडिझेल माफिया सक्रिय असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आल्या होत्या. बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर बायोडिझेल पंपावर मोठी कारवाई केली आहे. या बायोडिझेल पंपावरून तब्बल 16 हजार लिटर बनावट बायोडिझेल जप्त केले आहे. ज्याची किंमत तब्बल 13 लाख रुपये आहे.
घरातील कर्त्या माणसाचा आधार गेल्यानंतर दुःख करत न बसता परिस्थितीशी दोन हात करत नंदुरबार सारख्या आदिवासी दुर्गम जिल्ह्यातील शहादा येथील पल्लवी बेलदार या तरुणीने जिल्ह्यात पहिली महिला बस चालक होण्याचा मान मिळवला आहे. पल्लवीच्या हा प्रवास संघर्षमय राहिला असून तिने जिल्ह्यातील शहादा आगारातील बस फेऱ्या मारून आपल्या कामाचा श्रीगणेशा केला आहे.
तळेगाव दाभाडे येथे शाळेचे बांधकाम सुरू असताना रस्त्याच्या कडेची भिंत कोसळली, मध्यरात्री एकच्या दरम्यान भिंत कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. नुकत्याच शाळा सुरू झाल्यात, ज्या ठिकाणी दुर्घटना घडली आहे. तिथून नागरिकांची कायम वर्दळ असते. त्याचबरोबर लहान मुलं सुध्दा तिथं खेळत असतात. ही संपूर्ण घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे.
नाशिकमध्ये शेती पिकांची आवक घटल्याने पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत. अद्याप मान्सूनचे आगमन न झाल्याने पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. कोथिंबीर, मेथी, शेपू, कांद्याचे दर वाढले आहेत. कोथिंबीर 70 ते 80 रुपये, मेथी 25 ते 30 रुपये जुडी असे दर सध्याचे दर आहेत.
चंद्रपूरमध्ये पोलिस बंदोबस्त सुरु असताना चक्क बीअर शॉपीमध्ये जाऊन दारू ढोसणाऱ्या दोन पोलिस शिपायांना जिल्हा पोलिस अधीक्षकांनी निलंबित केले आहे. त्यामुळे पोलिस विभागात मोठी खळबळ माजली आहे. जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई असल्याचे बोलले जात आहे. उमेश मस्के, नरेश निमगडे अशी निलंबित झालेल्या पोलिसांची नावे आहेत.
19 तारखेला असलेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मातोश्री परिसरात दोन्ही गटांमध्ये बॅनरवर पाहायला मिळत आहेत. सोमवारी १९ जूनला दोन्ही गटांचा मुंबईत वर्धापन दिन होणार आहे. शिंदे गटाने आणि ठाकरे गटाने आजूबाजूला बॅनर लावले आहेत. त्यामुळे सगळीकडे बॅनरची चर्चा सुरु आहे. “निष्ठावंतांचा कुटुंब सोहळा, शिवसेना परिवार जगावेगळा” असा ठाकरेंच्या बॅनरवर आशय आहे. “३६५ दिवस २४ तास शिवसेनेचा ध्यास, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक असेल आमची कायम साथ” असा शिंदेंच्या शिवसेनेच्या बॅनरवर आशय आहे. संपुर्ण मातोश्री परिसरात झेंड्यांचीही स्पर्धा लागली आहे.
ठाणे महानगरपालिका हद्दीत यांत्रिक पद्धतीने सफाई करण्यासाठी दोन चॅलेंजर शिपिंग मशीन, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मशीनचे उदघाटन होणार आहे. ही मशीन तासाला 7 ते 15 किलोमीटर रस्ता साफ करू शकते. रुंदीला 3 मीटर पट्टा कव्हर करते. ट्रकमध्ये बसून ही मशीन ऑपरेट होते. 3.2 केबिक मीटर कचरा माती यात बसू शकते. तर 36 सफाई कर्मचाऱ्यांचे काम, ही मशीन एकाचवेळी एका तासात करू शकते.
भाजपकडून खासदार धनंजय महाडिक यांची कोल्हापूर लोकसभेच्या प्रचार प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार संजय मंडलिक हे भाजपच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. 2019 ला ज्यांनी पराभव केला, त्याचं मंडलिकांसाठी खासदार धनंजय महाडिक यांना धडपडावं लागणार आहे. अवघ्या चार वर्षात बदलली राजकारणाचं समीकरण बदललं आहे. 2019 ला सतेज पाटील यांनी आमचं ठरलंय, म्हणत संजय मंडलिक यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.
अमरावतीत बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्या वाहन चालकाकडून 2 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाहतूक शाखेने मोठी कारवाई केली आहे. ऑनलाइन चलानमध्ये सहा कोटींचा दंड थकीत आहे. मागील 17 महिण्यात 1 लाख 62 हजार 114 वाहन चालकांनी मोडले नियम आहेत. वाहन चालकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नांदेड जिल्हयातील कंधार तालुक्यातील कंधारेवाडी या गावातील अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी डॉक्टर होणार आहे. विशेष म्हणजे तीने शेतात काम करुन नीटची तयारी केली. कुठलीही शिकवणी न लावता पहिल्याच प्रयत्नात ती नीटच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली.
यवतमाळ – अधिक दराने बियाणे विक्री करणाऱ्या यवतमाळ शहरातील कृषी केंद्रांवर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी कारवाईचे करण्याचे आदेश दिले आहेत. 850 रुपयांची बॅग 1200 ते 1400 विकली जात आहे. त्याचबरोबर त्याचं केंद्रावर इतर साहित्य सुध्दा घ्यावे लागत आहे.
जेजुरीतला मुक्काम उरकून माऊलींची पालखी आज वाल्ह्माकडे रवाना होत आहे. आजचा पालखींचा मुक्काम वाल्ह्यात होणार आहे. उद्या माऊलींच्या पादुकांना शाही नीरा स्नान घातलं जाणार आहे. त्यामुळे जेजूरीकरांनी पालखीला आज निरोप दिला. यावेळी शेकडो भाविक उपस्थित होते.
श्रीरामपुर जिल्हा व्हावा या मागणीसाठी श्रीरापूर बंदची हाक देण्यात आली आहे. व्यापारी, नागरिक आणि विविध संघटनांकडून आज शहर बंदची हाक देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिर्डी येथील अप्प जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे श्रीरामपूरकर आक्रमक झाले आहेत. बंद दरम्यान शहरात फेरी काढण्यात येणार आहे. त्यानंतर प्रशासनाला श्रीरामपूर जिल्हा करण्याचं निवेदन देण्यात येणार आहे.
तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाचे 36 जिल्ह्यात संपर्क कार्यालय सुरू होत आहे. हे सर्व कार्यालय त्यांच्या मालकीचे असणार आहेत. या कार्यालयात होणार विधानसभा, लोकसभा, मनपा, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचत निवडणुकीची तयारी. संपर्क कार्यालयात असणार दररोज 1 हजार कार्यकर्त्यांना जेवणाची सोय. BRS पक्षाच्या कार्यालयात महाराष्ट्रातील युवकांना मिळणार नोकरी. BRS पक्षाच्या कार्यलयात वॉर रूम, रेस्ट रूम, मिटिंग हॉल आणि जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
रत्नागिरीतील गुहागर येथे चायनीज खाल्ल्याने सात जणांना विषबाधा झाली आहे. उलट्या आणि मळमळ सुरू झाल्याने या सातही जणांना तात्काळ सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर युद्धपातळीवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात आलं.
वाशीमच्या मंगरुळपीर येथे सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघातात मृत्यू झाला. मंगरुळपीर- कारंजा रोडवरील घोटा फाट्याजवळ ट्रक आणि मोटारसायकलचा अपघात झाला. या अपघातात नातेवाईकांना भेटून घरी परतत असताना ट्रकने उडवल्यामुळे जवानाचा जागीच मृत्यू झाला. योगेश आडोळे हा जवान आपल्या धोत्रा या मूळ गावी कालच सुट्टीवर आला होता. योगेशचा अपघाती मृत्यू झाल्याने शोकाकुल वातावरण गावात झालं आहे.
माऊलीच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाल्यानंतर इतर भक्तांच्या पालख्याही पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. काल वारकरी संत प्रभावळीतील महत्त्वाच्या संत जनाबाई यांच्या पालखीचे त्यांचे जन्मगाव परभणीच्या गंगाखेड येथून पंढरपूरकडे भाविकासह प्रस्थान झाले. सायंकाळी परळी येथे पालखीचे आगमन झाले. मुक्कामानंतर आज सकाळी अंबाजोगाईकडे पालखी प्रस्थान करणार आहे. अशा अनेक पालख्या परळी शहरातून पंढरपूरकडे प्रस्थान करत असतात.
कल्याण पश्चिम येथे आज सकाळी 10 वाजता मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. शिंदे गटाने या मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मेळाव्याला कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. भाजप आणि शिंदे गटातील वादाच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.