Coromandel Express Accident Live Updates | ओडिशात रेल्वे अपघातात मोठा हाहाकार, 50 जणांचा मृत्यू

| Updated on: Jun 03, 2023 | 7:17 AM

Coromandel Express accident Odisha Live News Updates : कोरोमंडल एक्सप्रेसला अपघात झाला. यात सुमारे ५० जण ठार झाल्याची माहिती आहे. या अपघातात जखमींची संख्या ३०० पर्यंत गेली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मृतकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली.

Coromandel Express Accident Live Updates | ओडिशात रेल्वे अपघातात मोठा हाहाकार, 50 जणांचा मृत्यू
Marathi News Live
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : कोरोमंडल एक्सप्रेसला अपघात झाला. यात सुमारे ५० जण ठार झाल्याची माहिती आहे. या अपघातात जखमींची संख्या ३०० पर्यंत गेली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मृतकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली. बाहानासा स्टेशनजवळ मालवाहू गाडीला शालीमार चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेस धडकली. यामुळे कोरोमंडल एक्सप्रेसच्या ८ बोगीज रुळाखाली घसरल्या. बाहानासा बाजार स्टेशनजवळ ही घटना सात वाजून २० मिनिटांनी घडली.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 02 Jun 2023 10:56 PM (IST)

    रेल्वे अपघातात आतापर्यंत ५० जणांचा मृ्त्यू

    मृतकांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये

    रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा

    गोवा-मुंबई वंदे मातरम कार्यक्रम रद्द

    आतापर्यंत ५० जणांचा मृत्यू, ३०० जण जखमी

  • 02 Jun 2023 10:42 PM (IST)

    रेल्वेचे हेल्पलाईन नंबर

    हावडा हेल्पलाईन नंबर : 033-26382217

    खरगपूर हेल्पलाईन नंबर : 8972073925 & 9332392339

    बालोसोर हेल्पलाईन नंबर : 8249591559 & 7978418322

    शालिमार हेल्पलाईन नंबर : 9903370746


  • 02 Jun 2023 10:27 PM (IST)

    ओडिशा या ठिकाणी रेल्वेचा अपघात

    अपघात झाल्याने उद्याचा वंदे भारत ट्रेन लोकार्पण कार्यक्रम रद्द

    रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव गोवा येथून ओडिशा येथे अपघातस्थळी रवाना

    कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला धडक बसल्याने मोठा रेल्वे अपघात

  • 02 Jun 2023 10:14 PM (IST)

    चाळीसगाव : चार दिवसांपासून उपोषण सुरू

    नागद रोड येथील अँग्लो उर्दू हायस्कूल शाळेच्या आवारातील अतिक्रमण काढण्यासाठी उपोषण

    ठाकरे गटाचे अल्पसंख्याक शहर प्रमुख वसीम शेख यांच्या आंदोलनाची दखल

    भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी आंदोलनाची घेतली दखल

    उद्या कायदेशीर पद्धतीने अतिक्रमण काढण्याच्या प्रशासनाला सूचना

    वसीम शेख हे विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत तहसील कचेरीसमोर उपोषणाला बसले

  • 02 Jun 2023 10:08 PM (IST)

    नाशिक : आमदार केसरी कुस्ती स्पर्धा

    मखमलाबाद येथील मराठा मंगल कार्यालयाच्या मैदानावर रंगत

    नाशिक पूर्वचे भाजपचे आमदार राहुल ढिकले यांच्या पुढाकाराने आयोजन

    मखमलाबाद तालीम फाउंडेशन आणि जय बजरंग तालीम संघाच्या वतीने आयोजन

    विजेत्यांना दोन लाखांपासून ते 11 हजार रुपयांपर्यंत मिळणार बक्षिसे

    प्रथम विजेत्याला मिळणार दोन लाख रुपये आणि दुचाकी

  • 02 Jun 2023 10:03 PM (IST)

    ममता बॅनर्जी यांनी ओडिशा सरकारशी केला संपर्क

    ओडिशामध्ये भीषण रेल्वे अपघात

    अपघातात 50 पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू

    200 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाल्याची माहिती

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ओडिशा सरकारशी केला संपर्क

    ओडिशा राज्यात अपघात झाल्याने तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल सरकारकडून ओडिशा सरकारशी संपर्क

    जखमी आणि मृतांमध्ये अनेक प्रवासी हे तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल राज्यातील असल्याची माहिती

  • 02 Jun 2023 09:29 PM (IST)

    ओडिशात रेल्वे अपघातात मोठा हाहाकार, 30 जणांचा मृत्यू

    ओडिशातील बालासोर येथे कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला धडक बसल्याने मोठा रेल्वे अपघात

    आतापर्यंत 30 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

    शेकडो नागरीक जखमी झाल्याची माहिती

  • 02 Jun 2023 09:07 PM (IST)

    भाजप खासदार सुजय विखे आणि रोहित पवार एकाच मंचावर एकत्र

    अहमदनगर :

    जामखेड येथे एका कार्यक्रमात भाजप खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी आमदार रोहीत पवार हे एकाच मंचावर

    दोघे एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या

    काही दिवसांपूर्वी विखे पिता-पुत्र आणि राम शिंदे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता

    मात्र आठवड्याभरापूर्वी स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी हा वाद संपुष्टात आला असल्याचं जाहीर केलं होत

    मात्र या घटनेला आठ दिवसही झाले नाही तोच खासदार सुजय विखे आणि आमदार रोहित पवार एका मंचावर एकत्र आलेले बघायला मिळत आहेत

    दोघे एकत्र आल्याने पुन्हा एकदा राम शिंदे आणि विखे पिता-पुत्रांमध्ये वादाची ठिणगी पेटण्याची शक्यता

  • 02 Jun 2023 08:57 PM (IST)

    Ahmedabad Police Arrested 18 Bangladeshi Men | अहमदाबादमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 18 बांगलादेशी नागरिकांना अटक

    अहमदाबादमधून 18 बांगलादेशी नागरिकांना अटक

    बापूनगर, ओढव, इसनपूर आणि चाणक्यपुरी यासारख्या विविध भागातून एकूण 18 बांगलादेशी नागरिकांना अटक

    अहमदाबाद पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपची धडक कारवाई

    18 बांगलादेशी नागरिकांचा वैध कागदपत्रांशिवाय शहरातील वेगवेगळ्या भागात रहिवास

    स्पेशल ऑपरेशन ग्रुपकडून कारवाईसाठी पाच टीम

  • 02 Jun 2023 08:46 PM (IST)

    देशातला पहिला लिथियम आयन सेल उत्पादन करणारा गिगा कारखाना गुजरातमध्ये

    देशातला पहिला लिथियम आयन सेल उत्पादन करणारा गिगा कारखाना गुजरातमध्ये उभारला जाणार

    गुजरात सरकार आणि टाटा समूह यांच्यात इलेक्ट्रॉनिक्स धोरणांतर्गत सामंजस्य करार

    लिथियम आयन सेल निर्मिती गिगा कारखान्यामुळे सुमारे 13 हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार

    पहिल्या टप्प्यावर 13 हजार कोटींच्या गुंतवणुकीने 20 GW क्षमतेचा प्लांट उभारण्यात येणार

  • 02 Jun 2023 08:12 PM (IST)

    Coromandel Express Train Accident | कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेन दुर्घटनाग्रस्त, अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती

    कोरोमंडल एक्स्प्रेसला भीषण अपघात

    चेन्नईहून हावडाकडे जाणाऱ्या कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात

    ट्रेनचे अनेक डब्बे रेल्वे रुळावरुन घसरले

    दुर्घटनेत अनेक प्रवासी जखमी

    ओडीशाच्या बालासोर जिल्ह्यातील घटना

  • 02 Jun 2023 07:58 PM (IST)

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने अमरावतीत त्रिवार अभिवादन सोहळा

    या सोहळ्यात नागपूर येथील नामवंत गायक, गायिका

    कलावंतांचा संच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित लोकप्रिय गीतांचे सादरीकरण करत आहेत

    भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आणि शिवप्रेमी कडून कार्यक्रमाचे आयोजन

  • 02 Jun 2023 07:54 PM (IST)

    गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात मारहाण झालेल्या युवकाचा पोलिसांवर आरोप

    गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात मारहाण झालेल्या युवकाचा पोलिसांवर आरोप

    जुन्नर तालुक्यात निमगाव सावा येथे आयोजित केलेल्या गौतमी पाटीलच्या

    कार्यक्रमात अनेक वेळा काही युवकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला

    यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार देखील करावा लागला.

    मात्र येथील खुडे कुटुंबातील नयन खुडे व त्याचा भाऊ आणि आईला पोलिसांनी मारहाण

    केली असा आरोप नयन खुडे आणि त्याच्या भावाने केला

    ज्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला ती जागा आमच्या मालकीची

    असून आम्हाला कोणी या कार्यक्रमाबद्दल दिली नव्हती कल्पना- नयन खुडे

  • 02 Jun 2023 07:42 PM (IST)

    नाशिक शिक्षणाधिकारी आणि एका शासकीय कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक

    महापालिका शिक्षणाधिकारी सुनीता धनगर आणि एका शासकीय कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक

    लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून ५० हजार रुपयांची लाच घेताना कारवाई

    अधिक चौकशीसाठी धनगर यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू

    महापालिकेत लाचलुचपत विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईने एकच खळबळ

  • 02 Jun 2023 07:39 PM (IST)

    किमान चाळीस जागा जिंकायच्या आहेत- संजय राऊत 

    ४८ जागांचा आढावा घेतलाच पाहिजे, कोणाची कुठे ताकद आहे

    महाराष्ट्रातच नाही देशात विचार व्हायला पाहिजे

    जिंकेल त्याची जागा हे सूत्र असायला पाहिजे

    मला सुद्धा यावर चर्चा करता येणार नाही

    जाहीरपणे चर्चा करायची नाही हे ठरले आहे

    प्रत्येक पक्ष सर्व जागांचा आढावा घेत आहे

    कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू आहे

    किमान चाळीस जागा जिंकायच्या आहेत

  • 02 Jun 2023 07:37 PM (IST)

    शिंदेंच्या भोईरांनी ठाकरेंच्या भोईरांना दिला ‘हा’ सल्ला

    भावी खासदार नको भावी पंतप्रधानच्या निवडणूक लढवा

    आम्हीही त्यांच्या प्रचाराला येऊ

    शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर शिंदे गट

  • 02 Jun 2023 07:30 PM (IST)

    कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि खासदार ब्रिजभूषण सिंह यांना मोठा धक्का

    कुस्तीपट्टूंच्या लैगिंक शोषणाचा आरोप असलेले

    भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि

    भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांना धक्का

    योगी सरकारने 5 जूनच्या अयोध्येत रॅलीला परवानगी नाकारली

    योगी सरकारचा मोठा निर्णय

  • 02 Jun 2023 07:24 PM (IST)

    सरसंघचालक मोहन भागवतांनी केलेल्या विधानाचे हिंदूमहासंघाकडून समर्थन

    खऱ्या अर्थाने ते हिंदूंचं राष्ट्र होत, शिवाजी महाराजांच्या प्रथम फळीतील लोकं सर्व हिंदू होते

    स्वराज्याची शपथ पूर्णपणे हिंदू मार्गाने, हिंदू पद्धतीने घेतली गेली, मुस्लिमांचा कधीही विचार केला गेला नाही

    परवा नवीन संसद भवनाच्या उदघाट्नाला मुस्लिम धर्मीयांना जी धर्म प्रार्थना करायला लावली, तसे शिवाजी महाराजाच्या वेळी काही केले नाही

    खऱ्या अर्थाने ते हिंदूराष्ट्र होत, -आनंद दवे

  • 02 Jun 2023 07:11 PM (IST)

    खासदार ओमराजे निंबाळकर यांनी काढली अधिकाऱ्यांची खरडपट्टी

    जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकारी यांना सुनावले खडेबोल

    आम्ही मूर्ख आहोत का, दीड वर्ष झाली तरी काम करीत नाहीत

    बदलीसाठी एका शिक्षकाकडून पावणे दोन लाख घेतले हे कोणत्या नियमात बसते

    तुम्हाला निवडणूक लढवायची नाही, मते मागायची नाहीत आम्हाला जनतेत जावे लागते

    सोलापूर जिल्हा परिषद शिक्षक बदली, पदोन्नती करते मात्र धाराशिव जिल्हा परिषद पाकिस्तानमध्ये आहे का ?

    10 जुन पर्यंत विषय मार्गी लागले नाही तर आंदोलन करणार

  • 02 Jun 2023 07:07 PM (IST)

    सोलापुरमध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मिरवणुकीत पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये तणाव

    मिरवणुकीमध्ये लावण्यात आलेल्या बॅनरवरून गोंधळ

    पोलिसांकडून कार्यकर्त्यांना बॅनर काढण्याच्या सूचना दिल्याने पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

    बजरंग दलाच्या गोरक्षा विभागातर्फे लावण्यात आले बॅनर

    शिवराज्याभिषेक दिनानिमित्त काढण्यात येतेय रॅली

    सोलापुरातील हजारो शिवभक्त रॅलीमध्ये सहभागी

    आम्हाला बॅनर काढायला सांगत आहेत मात्र आम्ही बॅनर काढणार नाही

    जर पोलिसांनी बॅनर काढले तर आम्ही पोलिसांवरच गुन्हा दाखल करू

  • 02 Jun 2023 06:56 PM (IST)

    साई भक्तांसाठी आनंदाची बातमी

    द्वारकामाई मंदिर रात्रभर खुले राहणार आहे. भक्तांना आता रात्रीचंही दर्शन घेता येणार असून साई संंस्थान प्रशासनाने हा निर्णय घेतलाय.

  • 02 Jun 2023 06:34 PM (IST)

    पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार शुभारंभ

    भारतातील 19 व्या वंदे भारत एक्सप्रेसचा उद्या होणार शुभारंभ आहे.

    पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुभारंभ होणार असून मडगाव उद्या ते मुंबई अशी धावणार आहे.

    4 जूनपासून सर्वसामान्यांसाठी सुरू होणार, प्रवाशांसाठी उत्तम सोय करण्यात आलीय.

  • 02 Jun 2023 06:19 PM (IST)

    कुस्तीपटूंना आता राहुल गांधींचा पाठिंबा

    25 आंतरराष्ट्रीय पदके मिळवून देणाऱ्या मुली रस्त्यावर उतरून न्यायासाठी याचना करत आहेत, असे सांगत ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीवर ठाम असलेल्या कुस्तीपटूंना आता काँग्रेस नेते राहुल गांधींनी पाठिंबा दिला आहे. दोन एफआयआरमध्ये लैंगिक शोषणाचे 15 गंभीर आरोप असलेले खासदार – पंतप्रधानांच्या सुरक्षा कवचाखाली सुरक्षित आहेत. मुलींच्या या परिस्थितीला मोदी सरकार जबाबदार असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

  • 02 Jun 2023 06:01 PM (IST)

    समृद्धी महामार्गाला जोडणारा जालना-नांदेड मार्ग डांबरी?

    क्राँकीट ऐवजी हा रस्ता डांबरी करण्याची सरकारची सूचना

    मविआ सरकारच्या काळात झाला होता जालना-नांदेड मार्ग जोडण्याचा निर्णय

    अंबादास दानवे यांचा राज्य सरकारवर निशाणा

  • 02 Jun 2023 05:57 PM (IST)

    जे जे रुग्णालयातील वादावर लवकर तोडगा काढा

    रुग्णांचे हाल थांबविण्याचे केले अजित पवार यांनी आवाहन

    रुग्णालयातील नेत्रोपचार विभागातील 9 वरिष्ठ डॉक्टरांनी दिला सामूहिक राजीनामा

    तर 750 डॉक्टर्संनी पण पुकारला बेमुदत संप

  • 02 Jun 2023 05:45 PM (IST)

    नेपाळचे पंतप्रधान महाकालच्या चरणी

    पंतप्रधान पुष्प कमल दहल उज्जैन नगरीत

    महाकालेश्वर मंदिरात केली विधीवत पुजा

    दहल सध्या भारताच्या दौऱ्यावर

  • 02 Jun 2023 05:34 PM (IST)

    एकनाथ खडसे घेणार पंकजा मुंडे यांची भेट

    भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना उद्या भेटणार

    ज्यांनी भाजप वाढवली त्यांचाच छळ होत आहे

    खडसे यांनी दिली खरमरीत प्रतिक्रिया

  • 02 Jun 2023 05:27 PM (IST)

    आता देशचं होणार कुस्तीपटूंचा आखाडा

    मागणी मान्य न झाल्यास देशभर पंचायत

    शेतकरी नेते राकेश टिकेत यांची घोषणा

    बृजभूषण शरण सिंह यांना अटक करण्याची मागणी

    मागणी मान्य न झाल्यास 9 जूनपासून जंतरमंतरवर आंदोलन

    कुस्तीपटू होणार दिल्लीत आंदोलनासाठी जमा

  • 02 Jun 2023 05:20 PM (IST)

    छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाची तारीख बदलली

    जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

    निवडणुकांसाठी वाटेल ते करण्याची राज्यकर्त्यांची भूमिका

    सत्तेचा दुरुपयोग करणे हाच त्यांचा मुलभूत हक्क

  • 02 Jun 2023 05:13 PM (IST)

    अरविंद केजरीवाल तामिनाडूत दाखल

    केंद्र सरकारविरोधात मोट बांधणीचे काम वेगात

    मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची घेतली भेट

    केंद्र सरकार दिल्लीवर अन्यायकारक कायदे लादत असल्याचा आरोप

  • 02 Jun 2023 05:08 PM (IST)

    किल्ले रायगडाच्या पायथ्याशी 45 एकरात शिवसृष्टी

    राज्य शासनाकडून 50 कोटी रुपयांच्या निधी देणार

    प्रतापगडाच्या संवर्धनासाठी प्रतापगड विकास प्राधिकरणाची लवकरच स्थापना

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

  • 02 Jun 2023 05:04 PM (IST)

    लघुलेखकांचा निकाल कधी जाहीर करणार

    एमपीएससीने लघुलेखक (सर्व श्रेणी) आणि टायपिस्ट पदाची परीक्षा

    26 डिसेंबर 2022 रोजी चाळणी परीक्षा

    पाच महिने पूर्ण झाले तरी निकाल जाहीर नाही

    एमपीएससीने निकाल जाहीर करावा

    खासदार सुप्रिया सुळे यांनी केली मागणी

  • 02 Jun 2023 04:50 PM (IST)

    सोलापूर | सोलापुरात पोलिस हवालदाराला 4 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

    एमआयडीसी पोलिस ठाण्यातील लाचखोर कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

    इस्माइल बागवान असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव

    ठेकेदारांकडून ताब्यात घेतलेली गाडी तक्रारदारास देण्यासाठी मागितली लाच

    सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

  • 02 Jun 2023 04:37 PM (IST)

    सांगलीमध्ये जय हिंद महा ‘रक्तदान’ यात्रा

    – जय हिंद महा’रक्तदान’ यात्रेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यामध्ये एक लाख जणांचा रक्तदान करून ते जास्तीत जास्त देशासाठी आणि आर्मीसाठी देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

    – याची सुरुवात म्हणून आज सांगलीच्या पलूस शहरातून  करण्यात आली.

    – डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या संकल्पनातुन या यात्रेची सुरवात करण्यात आली आहे.

    – या यात्रेसंदर्भात पैलवान चंद्रहार पाटील आणि स्थानिक नागरिक निलेश येसुगडे, पलूस नगरपरिषदचे उपनगराध्यक्ष संदीप सिसाल उपस्थित होते.

  • 02 Jun 2023 04:35 PM (IST)

    संजय राऊत यांनी फडणवीस यांची पुन्हा उडविली खिल्ली

    उद्या देवेंद्र फडणवीस चटई घेऊन गेले आणि शिवतीर्थावरच मला राहायचं असे म्हणाले, तर तो त्यांचा प्रश्न आहे.

    उद्यापासून मी इथे आठ दिवस झोपणार, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले तर तो राज ठाकरेंचा प्रश्न आहे.

    या, राहा, बसा. येवा शिवतीर्थ आपलाच असा अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांना छेडले आहे.

  • 02 Jun 2023 04:27 PM (IST)

    आयफोन मागितल्याने वडिलांनीच केली मुलाची हत्या

    – कागल तालुक्यातील बामणी गावच्या हद्दीत झालेल्या तरुणाच्या खूनाचा 24 तासात छडा लावण्यात पोलिसांना यश आलेय.

    – याप्रकरणी कोल्हापूर एलसीबीने दोघांना अटक केलीय.

    – अमरसिंह थोरात असे खून झालेलय तरुणाचे नाव आहे.

    – सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील गोटखिंडी गावचे थोरात रहिवासी आहे.

    – मयत अमरसिंह हा दारुच्या आहारी गेल्याने घरात वारंवार भांडणे होत होती.

    – आयफोन घेण्यासाठी अमरसिंह याने वडिलांकडे दीड लाखांची मागणी केली होती.

    – पण, वडिलांनी नकार दिल्याने त्यांच्या वाद झाला.

    – याच रागातून वडिलांनी अमरसिंहच्या डोक्यात लोखंडी पाईप घालून हत्या केली.

  • 02 Jun 2023 04:19 PM (IST)

    कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांची मोठी घोषणा

     

    कॉंग्रेस सरकार निवडणूकीत दिलेली सर्व पाच वचने या आर्थिक वर्षातच पूर्ण करणार

     

  • 02 Jun 2023 04:07 PM (IST)

    मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या कार्याचा ठसा कुठेच उमटत नाही – खासदार विनायक राऊत

    – सुनील तटकरे हे सन्माननीय खासदार आहेत त्यांचा सन्मान राखणं हे क्रमप्राप्त आहे.

    – पण सत्तेच्या मस्तीत वावरणाऱ्या लोकांना विरोधकांना कस्पटात टाकायचं आहे.

    – शिवसेनेचा वर्धापन दिन 19 ला आहे. त्यापूर्वी 1 दिवसीय शिबीर 18 ला होत आहे. विविध विषयांवर त्यात मार्गदर्शन केलं जाईल.

    – कोरोना काळात ऐतिहासिक काम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक काम झालं आहे.

    – नितेश राणे यांच्या पिपाणीला आम्ही किंमत देत नाही

  • 02 Jun 2023 04:00 PM (IST)

    सोलापुरात 2 आणि 3 जून रोजी उष्णतेचे वारे वाहणार

    – कुलाबा प्रादेशिक वेधशाळेने अंदाज वर्तवल्याने सोलापूर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर

    – गरज असल्यासच घराबाहेर पडण्याचे प्रशासनाचे आवाहन

    – प्रशासनाच्या आवाहनानंतर सोलापुरातील रस्त्यावर शुकशुकाट

    – लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचेही आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आवाहन

    – मागील महिन्या भरापासून सोलापूर जिल्ह्यात दररोज 40 डिग्री सेल्सिअस पेक्षा अधिक तापमानाची नोंद

    – त्यातच जून महिन्यातही उष्णतेचे वारे वाहणार असल्याच्या इशाऱ्याने नागरिक धास्तावले

  • 02 Jun 2023 03:52 PM (IST)

    नवी दिल्ली – भाजपच्या चाय पे चर्चा या यशस्वी मिशन नंतर मिशन टिफीन

    देशातील 543 लोकसभा मतदारसंघातील 4 हजार विधानसभा मतदारसंघात होणार टिफीन बैठक

    उद्या 3 मे रोजी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आग्रा इथून करणार टिफीन बैठकीची सुरुवात

    या बैठकीत भाजप खासदार, आमदार आणि भाजपचे प्रमुख नेते दुपारी कार्यकर्त्यांसोबत दुपारचे जेवण करणार

    भाजपचे 250 नेते देशात विविध ठिकाणी सहभागी होणार, पुढील 30 दिवस चालणार हे मिशन

  • 02 Jun 2023 03:46 PM (IST)

    शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वी होणाऱ्या शिबिरात विविध विषयांवर मार्गदर्शन करू – खा विनायक राऊत

    शिवसेनेचा वर्धापन दिन 19 तारखेला आहे, त्यापूर्वी 18 तारखेला एक दिवसीय शिबीर होईल. विविध विषयांवर त्यात मार्गदर्शन केलं जाईल

    नितेश राणेंच्या पिपाणीला आम्ही किंमत देत नाही

    कोरोना काळात ऐतिहासिक काम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक काम झालं

  • 02 Jun 2023 03:31 PM (IST)

    राहुल गांधींनी देशाचा इतिहास वाचावा – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

    ज्यांना खासदारांची चाळीशी गाठता आली नाही त्यांच्याकडून अशाच वक्तव्यांची अपेक्षा

    परदेशात जाऊन देशाला अवमानित करणे हा राहुल गांधी यांचा धंदा

    राहुल गांधींनी देशाचा इतिहास वाचला पाहिजे

    भारत देशाचा पाया हिंदू धर्मावर आधारीत

    राहुल गांधी बौद्धिक दिवाळखोर, त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध

    त्यांच्या बेताल वक्तव्याबद्दल प्रत्येक भारतीयाने जाब विचारला पाहिजे

  • 02 Jun 2023 03:26 PM (IST)

    जालना दादर जनशताब्दी एक्सप्रेसचे इंजिन झाले फेल

    लासलगांव -निफाड रेल्वे स्थानकादरम्यान ट्रेन दोन तासांपासून उभी

    मुंबईकडे जाणाऱ्या इतर गाड्यांचा खोळंबा

    प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल

  • 02 Jun 2023 03:21 PM (IST)

    तिथी-तारखेवरून सरकारवर टीका करणाऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडलंय – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

    शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा किंवा जयंती रोज साजरी केली तरी हरकत नाही.

    शिवाजी महाराज आराध्य दैवत असून त्यांचे समाजावर अनंत उपकार, मग तारीख आणि तिथीचा वाद कशाला पाहिजे ?

    राज्यसरकारने भव्य सोहळ्याचे आयोजन केले त्याचे विरोधकांनी स्वागत केले पाहिजे.

    प्रत्येक गोष्टीत राजकारणच केलं पाहिजे असे नाही.

    राज्यातील जनता त्यांना क्षमा करणार नाही.

  • 02 Jun 2023 03:16 PM (IST)

    नाशिक – संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान

    टाळ मृदुंगाच्या गजरात पालखीचे प्रस्थान

    45 दिंड्या आणि शेकडो वारकरी सहभागी

    मानाचे अश्व , मानाच्या बैलजोड्या आणि रथात ठेवलेल्या पादुका घेऊन प्रस्थान

  • 02 Jun 2023 03:10 PM (IST)

    शिवराज्याभिषेक सोहळा सोडून सुनिल तटकरे गडाखाली

    सुनील तटकरे झाले नाराज

    शिवराज्याभिषेक सोहळा राजकीय वाटतो, सुनिल तटकरेंचे विधान

  • 02 Jun 2023 03:07 PM (IST)

    परभणीत तापमानाने गाठला उच्चांक

    परभणीत आज 42.8 इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली

    वाढत्या तापमानामुळे दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट

    गरमी पासून बचाव करण्यासाठी नागरिकांची स्विमिंग पूल येथे गर्दी

    थंड पदार्थांच्या सेवनात झाली मोठी वाढ

  • 02 Jun 2023 02:56 PM (IST)

    बाबांना जो महाराष्ट्र पाहिजे होता, तो राहिला आहे का? – प्रितम मुंडे

    गोपीनाथ मुंडे हयात नसले, तरी त्यांचे विचार जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतोय.

    पंकजा मुंडे यांच्या भाषणाची सर्वांना उत्सुकता आहे.

    बाबांच्या आठवणीनंतर मला गहिवरून येते.

    नऊ वर्ष विकासशील कामाची राहिली.

    बाबांना जो महाराष्ट्र पाहिजे होता,तो राहिला का हा प्रश्न कठीण आहे.

  • 02 Jun 2023 02:44 PM (IST)

    चाळीसगावात अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकडून थाली बजाव आंदोलन

    चाळीसगावात अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकडून थाली बजाव आंदोलन

    परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी विद्यार्थी आक्रमक

    विद्यार्थ्यांचे पालक चार दिवसांपासून साखळी उपोषणाला बसले

    महापालिका राजकारण करत असल्याचा स्थानिकांचा आरोप.

    पालिका सरसकट अतिक्रमण काढत नसल्याचा पालकांचा आरोप

    पालिकेने अतिक्रमण न काढल्यास स्थानिकांचा आत्मदहनाचा इशारा

     

  • 02 Jun 2023 02:39 PM (IST)

    आमच्याकडे 170 पेक्षा जास्त पाठबळ, संजय राऊतांनी बहुमत सिद्ध करावे!

    जागा वाटपाचा मविआचा अंतर्गत प्रश्न आहे.

    संजय राऊतांच्या वल्गनांचा परिणाम आमच्यावर होणार नाही.

    आमच्याकडे 170 पेक्षा जास्त पाठबळ आहे.

    संजय राऊतांनी विधीमंडळात बहुमत सिद्ध करावे.

    मविआचे नेते आमच्या संपर्कात आहेत.

  • 02 Jun 2023 02:26 PM (IST)

    एकाच गावात 52 लोकांचा साजरा केला वाढदिवस, शाल श्रीफळ देत केला सत्कार!

    खेडमध्ये एकाच गावात 52 लोकांचा केला वाढदिवस.

    प्रत्येकाला फेटा बांधत, शाल श्रीफळ देत केला सत्कार.

    गावातील तरुणांनी केला वृद्धांचा वाढदिवस साजरा.

    गावकऱ्यांनी एकत्र येत दिल्या शुभेच्छा

  • 02 Jun 2023 02:11 PM (IST)

    “सत्ता गेल्यामुळे संजय राऊत भ्रमिष्ट, उद्या रस्त्यावर दगडं मारतील!”

    सत्ता गेल्यामुळे संजय राऊत भ्रमिष्ट झाले.

    संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला.

    आज ते फक्त थुंकले, उद्या ते रस्त्यावर दगड मारतील.

    संजय राऊत यांच्या टीकेला नरेश म्हस्केंचं प्रत्त्युत्तर

    संजय राऊतांमुळे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खालावली

  • 02 Jun 2023 02:08 PM (IST)

    जून महिना आला तरी, नाफेडचे कांदा खरेदीकडे दुर्लक्ष

    जून महिना आला तरी नाफेडचे कांदा खरेदीकडे दुर्लक्ष

    एप्रिलमध्येच होते कांदा खरेदीला सुरुवात

    नाफेडने स्वतः बाजार समितीतून कांदा खरेदी करावा

    शेतकरी वर्गाची नाफेडकडे मागणी

  • 02 Jun 2023 11:53 AM (IST)

    बाळासाहेबांच्या पुण्यतिथीवेळी देखील आदित्य ठाकरे लंडनमध्ये होता – नितेश राणे

    महापुरुषांचा वापर हे फक्त राजकारणासाठीच करतात

    बाबासाहेबांचा अपमान, महाराजांचा अपमान

  • 02 Jun 2023 11:52 AM (IST)

    350 व्या राज्यभिषेकावर बोलले साजरा करता तर उपकार करता काय?

    आम्ही तुला संरक्षण देतोय, तेच उपकार करतोय

    शिवरायांबद्दल बोलणं तुझ्यासारख्या मुगलाच्या वंशजाच्या जन्माला आलेल्यांना शोभत नाही

    आज तिथीनुसार राज्यभिषेक आहे

    हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्यांनी केली

    तुझ्यासारखे मुगलांचे कारटे ज्याने त्रास दिला, त्या सर्व साम्राज्याला उलथवत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली

    काही मुसलमान आमच्या राज्यासोबत होते, ते धर्मभिमानी होते

    राहुल गांधीचे पाय चाटत दिवस काढतोय

    त्याने मुस्लिम लीगला सेक्युलर म्हटलं हे तुम्हाला आणि मालकाला मान्य आहे का?

    मुस्लिम लीग काय आहे? हे तुम्हाला माहिती आहे का?

    राहूल गांधीचे हिंदूद्वेष मान्य आहे का?

    सरकार आणि आमदारांवर थुंकतो घटनाबाह्य म्हणतो मग त्यांची ॲड का घेतली?

    सरकारच्या तुकड्यांवर जगणारा तू आणि तुझा मालक

    त्यांच्या जीवावर तुझा आणि तुझ्या मालकाचा पगार निघतो

    सरकारला आवाहन याचे संरक्षण काढा याच्या जीभेचे हाड आम्ही काढू

    दलित समाजाचा अपमान आम्ही मुळीच सहन करणार नाही

    जे शिवसैनिक प्रवेश करतायत ते संदेश देतायत की यांनी लंडनमध्येच राहा, येऊ नका

    महाराष्ट्राला आता तुमची गरज नाही

    कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही आमदार संपर्कात

    मोहन भागवत यांना राष्ट्रपती बनवा अशी मागणी राऊतने केली होती, त्यांच्यावरच आता टीका करतायत

    संजय राऊतचा लव्ह जिहाद झाला आहे

    आज त्याने आपल्या मालकाचीच लायकी काढली आहे

    वरळीतील शिवसैनिक तरी राहिले आहेत का? सचिन अहिर तरी यांचे राहिले आहेत का?

    मातोश्रीवर अधिवेशन घ्या किंवा एका वाटीत अधिवेशन घ्या आणि संपवून टाका

    राजाराम राऊतांचा मुलगा असेल तर त्याने राजीनामा द्यावा आणि परत निवडून यावं

    सरकार आमचं आहे, लोकांची मागणी असेल तर गाड्यांचे थांबे वाढवू

  • 02 Jun 2023 11:49 AM (IST)

    संजय राऊतांची जीभ फार वळवळते आहे – नितेश राणे

    काल ते एका मराठी पत्रकारावर थुंकलेत

    राऊतांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा

    मुंबईतील डॉक्टर महिला राऊतांचं नाव ऐकल्यावर देखील थुंकते

    राऊताला देखील हे माहिती आहे

    सरकारला विनंती आहे, ह्याला दिलेलं संरक्षण काढा

    याची जीभ किती वळवळते, तो कार्यक्रम आमच्यावर सोडा

    हा कोणावर थुंकला असेल तर ते उद्धव ठाकरेंवर थुंकला आहे

    ज्याच्या पगारावर त्याचं घर चालतं ते शरद पवार हे मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटले

    तुझी आणि मालकाची काय किंमत आहे ते पवार साहेबांनी याच्या मालकाला दाखवून दिली

    लंडनमध्ये बसलेल्या तुझ्या मालकाला सांग इथं यायची गरज नाही

    तिकडेच एखाद्या हॉटेलचं नाव मातोश्री द्या

    गौतम अदानीजी पवारांना भेटायला आले

    काय लायकी आहे संजय राऊत सारख्या कारट्याची आणि उबाठाची

    दुसऱ्यांवर थुंकण्यापेक्षा आरशात जात स्वत:वर थुंक

    जो राज्याचा होत नाही, तो देशाचा होत नाही

  • 02 Jun 2023 11:41 AM (IST)

    कांद्यासह शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतप्त

    राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचे लोण

    नाशिकच्या देवळा तालुक्यातील दहिवड व रामनगर गावातही शेतकरी संतप्त

    शेतकऱ्यांकडून तातडीची ग्रामसभा घेत गावबंदी करण्याचा ठराव

  • 02 Jun 2023 11:36 AM (IST)

    धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात मोठी आग

    आगीत कागदपत्रे आणि संगणक यांचे मोठे नुकसान

    जिल्हाधिकारी कार्यालय येथील पुरवठा आणि नगर परिषद प्रशासन विभागाला आग

    अनेक कागदपत्रे जळून खाक तर संगणक यांचे मोठे नुकसान

    आग आटोक्यात, कारणाचा शोध सुरु

    अनेक चौकशी प्रकरणे आणि इतर कागदपत्रे जळून खाक

  • 02 Jun 2023 11:27 AM (IST)

    शिव राज्यभिषेक सोहळ्यावर खासदार सुनिल तटकरे नाराज

    सुनिल तटकरे यांची जोरदार टिका

    सोहळा सोडून सुनिल तटकरे गडाखाली

    एक शिवभक्त म्हणून मी सोहळ्याला आलो होतो

    सोहळा मी पाहिला पण पुढचा सगळा कार्यक्रम राजकीय वाटत आहे

    त्यामुळे मी सोहळा सोडून गडाच्या खाली आलो

    आता सगळा राजकीय एकसूर्ती कार्यक्रम सूरू आहे

    एकाच राजकीय पक्षाचे विचार वर ऐकायला मिळत आहेत, म्हणून मी निघून आलो

    सोहळ्याचे स्वयंघोषित स्वागताध्यक्ष म्हणत सुनिल तटकरे यांची गोगावले यांच्यावर जोरदार टीका

  • 02 Jun 2023 11:26 AM (IST)

    जेजुरी विश्वस्त निवड वाद

    ग्रामस्थांच्या आंदोलनाचा आज आठवा दिवस

    ग्रामस्थांनी काढला दिवटी बुदली मोर्चा

    विविध मार्गाने प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा ग्रामस्थांचा प्रयत्न

  • 02 Jun 2023 11:16 AM (IST)

    शिवसृष्टीसाठी 50 कोटी रुपये देण्याची घोषणा

    शिवछत्रपतींच्या स्वप्नातील शिवसृष्टी उभारण्याचा प्रयत्न आपण करु

    शिवछत्रपतींच्या स्वप्नातला सुखी, संपन्न महाराष्ट्र आपण घडवूया

  • 02 Jun 2023 11:09 AM (IST)

    जनकल्याणाचा संकल्प साकार करण्याचा आमचा प्रयत्न

    शेतकऱ्यांसाठी नमो कल्याण योजना सुरु

    जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु

    महिलांसाठी अनेक योजना सुरु करुन महिलांना सन्मान दिला

    गड-किल्ल्यांच्या संवर्धनावर भर देणार

    जनकल्याणाचा शिवसंकल्प पूर्ण करण्याचा आमचा मानस

    शिवरायांच्या कल्पनेतील सुराज्य आणणार

  • 02 Jun 2023 11:06 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दोन घोषणा

    किल्ले प्रतापगडाचे प्राधिकरण करणार

    उदयनराजे प्रतापगड प्राधिकरणाचे अध्यक्ष

    कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देणार

    शिवरायांच्या विचारांवर आमच्या सरकारचा कारभार

  • 02 Jun 2023 11:00 AM (IST)

    शिवराय आणि राजमाता जिजाऊंना कोटी कोटी प्रणाम – मुख्यमंत्री

    शिवराय आणि राजमाता जिजाऊंना कोटी कोटी प्रणाम – मुख्यमंत्री

    ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याला आपल्याला उपस्थित राहण्याची संधी मिळाली.

    शिवराय आणि मावळ्यांच्या शौर्याला विनम्र अभिवादन

    आज सोहळ्याला आपणं उपस्थित आहोत, हे आपलं भाग्य आहे.

    राज्याभिषेक सोहळ्याकडं संपूर्ण देशाचं लक्ष आहे.

    शिवरायांच्या विचारांवर सरकारचा कारभार आहे

    रयतेच्या हक्कांचं रक्षण करणार सरकार आहे.

  • 02 Jun 2023 10:49 AM (IST)

    शिवरायांनी कठीण काळात जनतेत आत्मविश्वास जागवला

    शिवरायांनी कायम एकतेला महत्त्व दिलं – नरेंद्र मोदी

    शिवरायांनी कठीण काळात जनतेत आत्मविश्वास जागवला

    शिवरायांच्या कार्यानं जनता प्रेरित झाली होती

    राजगड स्वराज्याची पहिली राजधानी आहे

  • 02 Jun 2023 10:42 AM (IST)

    शिवराय न्यायप्रिय राजे म्हणून अजरामर – फडणवीस

    शिवराय न्यायप्रिय राजे म्हणून अजरामर – फडणवीस

    स्वराज्य स्थापनेपासून महाराष्ट्र निर्मितीला सुरुवात

    शिवरायांच्या चांदीच्या मूर्तीला दुग्धाभिषेक

    १ जून ते ६ जून रायगडावर विविध कार्यक्रम

    शिंदे फडणवीसांकडून शिवरायांना अभिवादन

     

  • 02 Jun 2023 10:35 AM (IST)

    बायको ‘नको रे बाबा’ म्हणत पिंपळाच्या झाडाला औरंगाबादमध्ये घटस्फोटित पुरुषांनी उलट फेऱ्या मारल्या

    बायको ‘नको रे बाबा’ म्हणत पिंपळाच्या झाडाला औरंगाबादमध्ये घटस्फोटित पुरुषांनी उलट फेऱ्या मारल्या

    एकाही जन्मात बायको नको, म्हणत मारल्या उलट फेऱ्या

    वटसावित्री सणाच्या पूर्वसंध्येला पुरुषांनी उलट फेऱ्या मारल्याची सगळीकडं चर्चा

  • 02 Jun 2023 10:26 AM (IST)

    मुख्यमंत्री पवारांना भेटले त्यात गैर काय आहे ? – अजित पवार

    मुख्यमंत्री पवारांना भेटले त्यात गैर काय आहे ?

    आपल्या देशात एखाद्या व्यक्तीला त्रास होत असेल, तर त्यांनी आपल्या सरकारकडे वेगवेगळ्या यंत्रणा आहेत.

    शिरुर लोकसभेच्या जागेसाठी अनेकजण इच्छूक आहेत.

  • 02 Jun 2023 10:16 AM (IST)

    मोदींबाबत राहूल गांधींच व्यक्तव्य योग्यचं आहे, राऊतांची भाजपवरती टीका

    मुख्यमंत्री शिंदें यांनी खुर्ची बळकावली

    आता सगळ्यांना समान वागणूक मिळत आहे का ?

    मोदींबाबत राहूल गांधींच व्यक्तव्य योग्यचं आहे.

    मी पणा हाच त्याचा पराभव करणार आहे, राऊतांची भाजपवरती टीका

  • 02 Jun 2023 10:13 AM (IST)

    १८ जूनला महाविकास आघाडीचं महाअधिवेशन होईल, संजय राऊतांची शिंदेंवरती टीका

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सिहासन लवकरचं हालणार असं राऊत म्हणाले

    एकनाथ शिंदे आणि पवारांची औपचारिक भेट होती.

    महाविकास आघाडीचं लोकसभा आणि विधानसभेचं जागा वाटप व्यवस्थित होईल.

    कोण जागा जिंकू शकत ? कशा पध्दतीनं जिंकू शकतं यावर चर्चा होईल.

    १८ जूनला महाविकास आघाडीचं महाअधिवेशन होईल.

    महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन वाद होणार नाहीत.

  • 02 Jun 2023 10:04 AM (IST)

    यवतमाळ जिल्ह्यातील 27 महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेवर बंदीचे आदेश

    यवतमाळ जिल्ह्यातील 27 महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेवर बंदीचे आदेश

    कुलसचिवांचे पत्र धडकल्यामुळे खळबळ उडाली

    नॅक मूल्याकन टाळणे भोवले असल्याची जिल्ह्यात चर्चा

  • 02 Jun 2023 09:51 AM (IST)

    शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त नागपुरात मोठ्या थाटामाटात उत्सव

    आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांची सोहळ्याला उपस्थिती

  • 02 Jun 2023 09:46 AM (IST)

    दहावीचा निकाल आज

    दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार

    विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेल्या गुणांचा तपशील वेबसाइटवर उपलब्ध होईल

    राज्य मंडळाने 2 ते 25 मार्च 2023 या कालावधीत दहावीची परीक्षा घेतली

    यंदा परीक्षेला राज्यभरातून 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांची नोंदणी

  • 02 Jun 2023 09:40 AM (IST)

    जम्मू-काश्मीर | राजौरीतील दसल जंगल परिसरात चकमकीत एक दहशतवादी ठार

    शोध मोहीम सुरू असल्याची लष्करी अधिकाऱ्यांची माहिती

  • 02 Jun 2023 09:32 AM (IST)

    सोलापूर | शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रद्द करण्यात आलेली पदोन्नतीची योजना पुन्हा सुरू

    कृषी विद्यापीठे तसंच त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदोन्नतीची योजना पुन्हा सुरू

    सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पुनर्जीवित करण्यात आली

    31 मे रोजी याबाबतचा शासन निर्णय उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने काढला

    या आदेशामुळे राज्यातील 17 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा

    या मागणीसाठी राज्यातील 17 हजार कर्मचारी 6 वर्षांपासून होते प्रयत्नशील

  • 02 Jun 2023 09:25 AM (IST)

    दिल्ली : 16 वर्षीय मुलीची चाकूने वार करून हत्या प्रकरण

    आरोपी साहिलने वापरलेला चाकू दिल्ली पोलिसांनी केला जप्त

    पोलीस उपायुक्त रवी कुमार सिंग यांची माहिती

  • 02 Jun 2023 09:20 AM (IST)

    महानगरपालिकेच्या सहा केंद्रात ‘आरआरआर’ केंद्राची उभारणी

    रिड्युस, रियुज आणि रिसायकल केंद्र स्थापन

    ‘मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर’ अंतर्गत उपक्रम

    नागरिकांना निरुपयोगी वस्तू या केंद्रांवर जमा करण्याचे आवाहन

  • 02 Jun 2023 09:15 AM (IST)

    चंद्रपुरात आज आणि उद्या उष्णतेची लाट

    नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन

    दुपारी 12 ते 3 दरम्यान घराबाहेर जाणं टाळण्याचं आवाहन

  • 02 Jun 2023 09:10 AM (IST)

    औरंगाबाद जिल्ह्यातील 1198 सदस्य ठरले अपात्र

    जात वैधता प्रमाणपत्र न दिल्यामुळे 1198 सदस्य ठरले अपात्र

    1198 सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवले अपात्र

    आपत्रता कारवाईत सरपंच आणि उपसरपंच यांचाही समावेश

    राखीव जागांवर निवडून आलेल्या तब्बल 1198 सदस्यांना मोठा झटका

  • 02 Jun 2023 09:05 AM (IST)

    सिद्धरामय्या सरकारची आज पहिली कॅबिनेट

    आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नागरिकांना दिलेल्या योजनांवर होणार शिक्कामोर्तब

    बीपीएल कार्डधारकांना दहा किलो तांदूळ, बेरोजगारांना भत्ता, महिलांना बस प्रवास मोफत

    200 युनिट मोफत वीज, गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दोन हजार रुपये भत्ता

    या निर्णयांवर आज होणार शिक्कामोर्तब

  • 02 Jun 2023 08:57 AM (IST)

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

    विदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधी यांचे वक्तव्य

    मुस्लिम लीग धर्मनिरपेक्ष असल्याचा राहुल यांचा दावा, भाजप देशात ध्रुवीकरण करत आहे

    राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर भाजपची जोरदार टीका

    राहुल गांधी विदूषक – गिरीराज सिंह यांची टीका

  • 02 Jun 2023 08:50 AM (IST)

    कुस्तीपटूंना न्याय मिळण्यासाठी आता राष्ट्रपतींना साकडे

    कुस्तीपटूंना न्याय मिळण्यासाठी आता राष्ट्रपतींना साकडे

    उत्तर प्रदेशमधील खापंपंचायतीचा मोठा निर्णय

    खाप पंचायतीचे एक शिष्ट मंडळ राष्ट्रपती द्रोपदी मुरमु यांची भेट घेणार.

    खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर अद्यापही कारवाई नाही

    महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा ब्रिजभूषण यांच्यावर आरोप

    पुढील आठवड्यात खापपंचायतीचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींची भेट घेणार

  • 02 Jun 2023 08:35 AM (IST)

    WTC Final 2023 : फक्त 156 ग्राम वजनी वस्तूमुळे ओव्हलमध्ये होणार ऑस्ट्रेलियाचा ‘गेम ओव्हर’

    WTC Final 2023 : ‘या’ वस्तूच्या वापरात ऑस्ट्रेलियापेक्षा टीम इंडिया तरबेज. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये डब्ल्यूटीसी चॅम्पियनशिपची फायनल 7 जूनपासून इंग्लंडमध्ये सुरु होणार आहे. वाचा सविस्तर…..

  • 02 Jun 2023 08:34 AM (IST)

    MS Dhoni Surgery : धोनीला अचानक हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, कधीपर्यंत फिट होणार? कधीपर्यंत पळू शकतो?

    MS Dhoni Surgery : धोनीला पूर्णपणे फिट होऊन आपल्यासमोर येण्यासाठी किती महिने लागणार? मुंबईत धोनीवर ऑपरेशन सुरु असताना तिथे त्याच्यासोबकत कोण होतं? वाचा सविस्तर…..

  • 02 Jun 2023 08:32 AM (IST)

    समृद्धी महामार्गावर पोलिसांकडून हप्ते वसुली

    समृद्धी महामार्गावर पोलिसांकडून हप्ते वसुली

    विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून हप्ते वसुलीचा भांडाफोड.

    हप्ता वसुलीचा व्हिडीओ ट्विट करत केला भांडाफोड.

    व्हिडिओत समृद्धी महामार्गावर पोलीस पैसे उकळत असल्याचे आले समोर.

    समृद्धी महामार्गावर रोजगार असलेल्या लोकांची समृद्धी सुरू.

    अंबादास दानवे यांचा ट्विटमधून खोचक सवाल

  • 02 Jun 2023 08:08 AM (IST)

    नाशिक – पीओपी मूर्तींवर बंदीसाठी महापालिका आक्रमक

    – शहरात पीओपी मूर्तींवर बंदीसाठी महापालिकेचा पुन्हा आक्रमक

    – पीओपी मुर्तींची निर्मिती, आयात, साठा आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा.

    – तसेच पीओपी मुर्ती नदीपात्रात किंवा नैसर्गिक पाणी स्त्रोतात विसर्जित न करण्याचे आवाहन.

    – गेल्या वर्षीपासून पीओपी मुर्तींवर बंदी.

  • 02 Jun 2023 08:07 AM (IST)

    नाशिक – पालखीचे आज पंढरपूरकडे होणार प्रस्थान

    – संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे आज पंढरपूरकडे होणार प्रस्थान

    – पालखीत 40 ते 45 दिंड्या होणार सहभागी

    – 28 दिवसांचा असेल प्रवास

    – आज दुपारी दोन वाजता होणार प्रस्थान

    – हजारो भाविक होणार सहभागी

    – प्रशासनाकडून भाविकांसाठी करण्यात आल्या सुविधा

  • 02 Jun 2023 08:06 AM (IST)

    औरंगाबादमध्ये शिवपुराण कथा कार्यक्रमाच्या रॅलीत हुल्लडबाजी

    शिवपुराण कथा कार्यक्रमाच्या रॅलीत हुल्लडबाजी

    हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांची डीसीपी सोबत बाचाबाची

    बाचाबाची करणाऱ्या तरुणाला डीसीपीनी दिला चोप

    डीसीपी दीपक गिरहे यांनी दिला हुल्लडबाजी करणाऱ्यांना चोप

    शिवपुराण कथा रॅलीत निराला बाजार परिसरात घडली घटना

  • 02 Jun 2023 07:59 AM (IST)

    चंद्रपुरात दुचाकीचालकासह आता मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्ती

    आरटीओ विभागाचा आदेश, जिल्ह्यात आजपासून कडक अंमलबजावणी

    दुचाकीचालकाला हेल्मेटसक्ती हा नियम आधीपासूनच लागू आहे

    तरीही अपघातात दुचाकीस्वारांचे सर्वाधिक बळी जात असल्याचे स्पष्ट होताच उपप्रादेशिक परिवहन विभागाने एक धक्कादायक आदेश जारी केला

    या आदेशानुसार, चंद्रपूर जिल्ह्यात आता दुचाकीचालकासह आता मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे

  • 02 Jun 2023 07:53 AM (IST)

    पुणे-मिरज साप्ताहिक रेल्वे मंगळवारपासून सुरू

    रेल्वे प्रशासनाने प्रवाशाची मागणी लक्षात घेत पुणे-मिरज-पुणे दरम्यान नवीन विशेष एक्सप्रेस रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतलाय

    ही रेल्वे येत्या 6 जूनपासून दर मंगळवारी या मार्गावर धावणार आहे

    पुणे-मिरज ही साप्ताहिक विशेष रेल्वे जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, सांगली या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे

    या रेल्वे सेवेत चार जनरल कोच, सात स्लीपर कोच, पाच एसी तृतीय श्रेणी आणि दोन एसी द्वितीय श्रेणीचे कोच असतील

  • 02 Jun 2023 07:37 AM (IST)

    नागपुरात शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह

    हातात भगवे झेंडे घेऊन तरुणाई उतरली रस्त्यावर

    महाल परिसरात 350 वा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यासाठी मोठी गर्दी

    पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातोय शिवराज्याभिषेक दिन

    सकाळी 8 वाजता सरसंघचालकमोहन भागवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पअर्पण करण्यासाठी नागपुरातील महाल परिसरात येणार

  • 02 Jun 2023 07:34 AM (IST)

    आमदार हसन मुश्रीफ यांच्या मुलांना न्यायालयाचा 14 जूनपर्यंत दिलासा

    ईडीच्या अटके पासून दिलेल संरक्षण तूर्तास कायम

    सरसेनापती संताजी घोरपडे सहकारी साखर कारखान्याशी संबंधित कथित गैरव्यवहाराच प्रकरण

    नाविद, आबीद आणि साजिद मुश्रीफ यांनी अटकपूर्व जामीन यासाठी न्यायालयात केलाय अर्ज

  • 02 Jun 2023 07:31 AM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे रायगडावर करणार ध्वज पूजन

    शिवराज्याभिषेकासाठी राज ठाकरे रागयडावर

    शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरेही रायगडावर दाखल

    रायगडावर शेकडो शिवभक्त उपस्थित

  • 02 Jun 2023 07:29 AM (IST)

    रायगडावर शिवसृष्टी उभी करा, भरत गोगावले करणार मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी सरकारने प्रचंड मदत केली

    मुख्यमंत्री कधीचं काही कमी पडू देत नाहीत

    रायगडासाठी 350 कोटी रुपयांचा निधी आम्ही दिला आहे, भरत गोगावले यांची माहिती

  • 02 Jun 2023 07:28 AM (IST)

    इयत्ता दहावीचा आज निकाल, विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली

     

     

    आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाईल

    त्यानंतर दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे

    राज्यात 15,77,256 विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती

    ही परीक्षा राज्यभरातील 5033 परीक्षा केंद्रावर पार पडली होती

    यावर्षी 2 मार्चपासून ते 25 मार्चपर्यंत परीक्षा चालली होती.

  • 02 Jun 2023 07:23 AM (IST)

    किल्ले रायगडावर 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन; राज ठाकरे सपत्नीक रायगडावर उपस्थित

    आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन, रायगडावर भव्य सोहळ्याचं आयोजन

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार

    किल्ले रायगडावर शेकडो शिवभक्तांची उपस्थिती