मुंबई | 24 नोव्हेंबर 2023 : मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करुन मराठा आंदोलनाचे नेत मनोज जरंगे पाटील अंतरवाली सराटी या गावांत दाखल झाले. गावाच्या वेशीवर नागरिकांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर ते पुन्हा आंदोलन स्थळावर गेले. मुंबई नाशिक महामार्गावर पाडळी फाट्याजवळ तीन गाड्यांचा अपघात झाला. त्यात नऊ जण जखमी झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दहिसर विभागात पोस्टर्स लावून दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी मुदत दिली आहे. 25 नोव्हेंबर ही मराठी पाट्या लावण्याची शेवटची तारीख असून त्यानंतर मनसे स्टाईलमध्ये उत्तर देण्यात येईल, असे म्हटले आहे. राजकीय, जिल्ह्या जिल्ह्यातील बातम्यांसह मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचणास मिळणार आहे. त्यासाठी आमचा हा ब्लॉग दिवसभर फॉलो करा…
नाशिक | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तातडीनं अहमदाबादला रवाना झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील दौरा अर्धवट सोडून बावनकुळे अचानक अहमदाबादला रवाना झाले आहेत. बावनकुळे ओझर विमानतळावरून विशेष विमानाने अहमदाबादला रवाना झाले आहेत. त्यांचं अचानक अहमदाबादला जाण्याचं कारण मात्र अस्पष्ट आहे.
नवी दिल्ली | राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची? यावरची केंद्रीय निवडणूक आयोगातील आजची सुनावणी संपली आहे. आता निवडणूक आयोगात पुढची सुनावणी बुधवारी होणार आहे. बुधवारी शरद पवार गटाचा युक्तिवाद पूर्ण होणार आहे. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्थात गुरुवारी अजित पवार गट पुन्हा युक्तिवाद करणार आहेत. या सुनावणीकडे राज्यासह देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.
पुणे | पुण्यात मराठी पाट्यांवरून मनसेने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. सर्वोच्च नयायलायच्या आदेशानुसार दुकानावरील पाट्या मराठीत असणे बंधनकारक आहे. उद्या दिलेली मुदत संपत आहे. त्याआधी आज मनसेनं महापालिका आयुक्तांना दिलं निवेदन आहे. मराठीत पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करणार असा धमकीवजा इशारा हा शहराध्यक साईनाथ बाबर यांनी दिला आहे.
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या बैठकीत आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. मराठा,धनगर आणि ओबीसी आरक्षणावर विस्तृत चर्चा होणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अजीत पवार झाल्यानंतर पहिल्यांदाच बैठक होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार एनडीएतील योगदानाबाबत चर्चा होणार आहे. तसेच देशाच्या विविध प्रश्न या बैठकीत चर्चीले जाणार आहेत.
सांगली | जिल्ह्यातल्या कृष्णा नदी पाणीटंचाई प्रकरण चांगलंच पेटलं आहे. यावरुन आता थेट सांगली पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीकडून राजीनाम्याची मागणी केली जात आहे. वारंवार मागणी करून देखील कोयना धरणातुन सांगली जिल्ह्याचे हक्काचे पाणी देण्यात येत नाही. याबाबत कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीकडून पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे.
दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय म्हणाले की राजधानीत प्रदूषणाची पातळी काही प्रमाणात वाढली आहे. याबाबत बैठकही झाली आहे. जाळण्याच्या घटना आता खूपच कमी झाल्या आहेत, तरीही प्रदूषणाची पातळी वाढत आहे.
सरकार आता नागरिकांना सोशल मीडिया कंपन्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यास सक्षम करेल. डीप फेक सारख्या आक्षेपार्ह मजकुराचा बळी झाल्यास आयटी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एफआयआर दाखल करण्यासाठी सरकार नागरिकांना मदत करेल.
ड्रग्ज तस्कर प्रकरणातील आरोपी ललित पाटील याच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. 29 नोव्हेंबरपर्यत न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली आहे. ललित पाटीलचे सहकारी सहकार्य करत नसल्याचा दावा पोलिसांनी कोर्टात केला आहे. ललित पाटीलचे कॉल रेकॉर्ड्स, बँक व्यवहार तपासणी सुरुच आहे.
शिंदे गटानं निर्लज्जपणाचा कळस गाठल्याचा टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. किती मुखवटे घालून फिरणार, काहीही करा माथ्यावरचा गद्दारीचा शिक्का कधीही पुसला जाणार नाही, असा आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. दुसरीकडे, विनाकारण राजकारण करणं गैर असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजस्थान प्रचारात हिंदूहृदयसम्राट असा उल्लेख करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. दरम्यान बेईमानांना हिंदूहृदयसम्राट म्हणण्याची नवी परंपरा सुरु झाल्याचा टीका संजय राऊत यांनी केली आहे. हिंदूहृदयसम्राट म्हणावं असं शिंदेंनी कोणतं काम केलं आहे अशी बोचरी टीकाही राऊत यांनी केली. तर शिंदे स्वत:ला कधीही हिंदूहृदयसम्राट म्हणवून घेत नाहीत, असं शंभूराज देसाई यांनी म्हंटलं आहे.
गोपीचंद पडळकर यांनी आज जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेतली. यावेळी दगड फेक प्रकरणी या मागे कोण आहे याचा तपास झाला पाहिजे. जो एपीआय आहे त्याला 36 नावे घेतली ते कुणी दिली, आमची भावना सरकारला कळवावी तसेच जो जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ झाला त्याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
छगन भुजबळ यांनी जातीय तेढ निर्माण करणारी भाषा वापरली आहे. ते पुरोगामी विचाराचे आहेत. त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. पण त्यांची भूमिका चुकीची आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षण आम्ही मिळवणारच असे त्यांनी दृढपणे सांगितले. भुजबळांनी मराठा आरक्षणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. भुजबळांना उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी समज द्यावी असे ते म्हणाले.
राज्यव्यापी दौरा केल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीत दाखल झाले आहे. पुढील टप्प्यात ते खानदेश, मराठवाडा आणि विदर्भात जाणार आहेत. तिसरा टप्पा संपल्यानंतर ते अंतरवालीत आले आहे. भुजबळांना वैयक्तिक विरोध नसून त्यांच्या भूमिकेवर टीका केल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. भुजबळांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे. मराठा आरक्षण मिळणारच असल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले.
कोण्या लुंग्या-सुंग्याच्या सर्टिफिकेटची गरज नाही, सदाभाऊ खोतांच्या टिकेकर राजू शेट्टी यांनी पलटवार केला. 20 वर्षांपासून माझ्यावर असे आरोप होत आहेत. एका हाकेवर हजारो शेतकरी जमत असतील आणि साथ देत असतील तर हेच माझ्यासाठी सर्टिफिकेट आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. कारखानदारांशी संगनमत करून स्वतःच्या अंगाला गुलाल लावून घेतल्याची सदाभाऊ खोत यांनी त्यांच्यावर टीका केली होती.
राष्ट्रवादी नेमकी कुणाची, यावर थोड्याच वेळात केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होत आहे. या सुनावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित गटाचे मंत्री, आमदार, खासदार उपस्थित असतील. यावेळी दादा-दादा करत सुप्रिया सुळे यांनी राजकारण केल्याचा हल्लाबोल सुनील तटकरे यांनी केला.
अमरावती विद्यापीठात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या समोरच भाजप खासदार अनिल बोंडें यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. अमरावती विद्यापीठातील एका सभागृहाच्या नाम फलकावर खासदार बोंडें यांचे नाव नसल्याने खासदार अनिल बोंडें यांनी जाब विचारला होता. अनिल बोंडे आक्रमक झाल्यानंतर शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या समर्थकांनी अनिल बोंडे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
जायकवाडी धरणामध्ये अधिवेशनापर्यंत पाणी सोडा अन्यथा विधान भवनाला टाळं ठोकणार असं राहूल पाटील म्हणाले. ठाकरे गटाचे आमदार राहूल पाटील यांनी हा इशारा दिला आहे.
जायकवाडी धरणामध्ये तुरतास पाणी सोडू नका असं अधिक्षक अभियंत्यानं सरकारला पत्र लिहिलेलं आहे. मराठा आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे.
आताचं अधिवेशन हे या सरकारचं शेवटचं अधिवेशन असेल, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहे. 2024 मध्ये राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये परिवर्तन होणार असं आदित्य ठाकरे म्हणाले.
ठाकरेंचा भाजपसोबत लपूनछपून युती करण्याचा डाव आहे. ठाकरे युतीसाठी भाजवला पायघड्या घालत आहे, असे नितेश राणे म्हणाले.
अजित पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ३० नोव्हेंवरला कर्जतमध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीत सर्व आमदार आणि खासदारांना उपस्थित राहाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे.
नागपूरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी पोलिस दलाने कंबर कसली आहे. वाहतूक व्यवस्थेचं नियोजन सुरू. सात हजार पोलिस कर्मचारी तैनात.
म्हाडा लॉटरीतील पडून असलेल्या घरांच्या किंमती कमी होणार आहेत. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी ही माहिती दिली. विक्रीअभावी पडून असलेल्या घरांच्या किंमतीचा आढावा घेण्यात येणार आहे. या घरांच्या किंमती कमी करून पुनर्विक्री करणार आहेत. म्हाडाच्या सुमारे ११ हजार घरांच्या किंमती कमी होणार आहेत. संबंधित घरांचे वीज बिल, पाणी पट्टी भरावी लागत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. नुकसान टाळत महसूल वाढीसाठी गृहनिर्माण मंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये हवेची गुणवत्ता ढासळली. महापालिकेकडून कारवाईला सुरुवात झाली आहे. गेल्या दहा दिवसांत तब्बल 55 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरात नदीच्या प्रदूषणाने सर्वजण चिंतेत असताना शहरातील हवेची गुणवत्ता ही धोकादायक पातळीवर गेल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हवेत वाढलेले धुलीकण कमी करत प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून तब्बल 16 पथकं तयार करत महापालिकेने प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या हॉटेल, बेकरी तसंच बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई सुरू केली आहे.
“हिंदू हृदयसम्राट असा उल्लेख एकनाथ शिंदे यांचा करण्यात आला आहे. जर असं पोस्टर लागलं असेल तर त्यात गैर काय आहे? शिवसेनेत काम करणारा प्रत्येकजण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने काम करत आहे. एकनाथ शिंदे यांच्याबाबत त्यांना वाटलं असेल. म्हणूनच असे पोस्टर लावले असतील,” अशी प्रतिक्रिया मंत्री अनिल पाटील यांनी दिली.
थोड्याच वेळात नाशिकचे नवे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पदभार स्वीकारणार आहेत. मावळते पोलीस आयुक्त अंकुश शिंदे हे कर्णिक यांच्याकडे पदभार सोपविणार आहेत. नाशिकच्या परंपरेनुसार एक चावी देऊन हा पदभार दिला जातो. नाशिकच्या पोलीस दलात झालेली खांदेपालट राज्यात चर्चेत आहे. त्यामुळे कर्णिक पदभार घेत असल्यानं यास महत्व प्राप्त झालं आहे.
जामखेड येथील धनगर समाजाच्या उपोषण स्थळाला गोपीचंद पडळकर यांनी भेट दिली आहे. तीन उपोषण कर्त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. गोपीचंद पडळकर यांच्याकडून विचारपूस सुरू… धनगर समाज उपोषणाचा आज 8 व दिवस… भगवान भोजने, भगवान गोविंदराव भोजने, देवलाल मंडलिक अशी उपोषण कर्त्यांची नावे
राजू शेट्टी यांच्यासह अडीच हजार जणावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुरुवारी बेकायदेशीर महामार्ग रोखल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बंदी आदेश झुगारून आंदोलन केल्याप्रकरणी शिरोली पोलिसांनी कारवाई केली आहे.
संशयास्पद व्यवहारांची कागदपत्रे, 100 कोटींची उलाढाल, सामान्य जनतेची फसवणूक; काय आहे प्रकरण? ‘सिंघम’ सिनेमातील खलनायक प्रकाश राज ईडीच्या रडारवर… ईडीकडून प्रकाश राज यांना समन्स जारी… चौकशीमध्ये काय येणार समोर? वाचा सविस्तर
नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर पोलिसांची विशेष तयारी पाहायला मिळत आहे. वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्थेचं पोलिसांनी आता पासूनच नियोजन सुरू केलं आहे. जवळपास 7 हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत.
गद्दार गटाला प्रचारासाठी बाळासाहेबांचा फोटो वापरावा लागत आहे… असं वक्तव्य खासदार विनायक राऊत यांनी केलं आहे. राजस्थानमध्ये हिंदुरुदय सम्राट नावाचा वापर केला म्हणजे मोदींची जादू संपली की काय…राजस्थानमध्ये नक्कीच भाजपचा पराभव होईल… संजय राऊत यांनी ट्विट करत सूचक इशारा दिला आहे अजून मोठे मोठे खुलासे बाहेर येतील… मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न भाजप करता आहे… असं देखील विनायक राऊत म्हणाले
राज्यात यांची काय औकात? बाहेरच्या लोकांना काय माहित.. शिंदेनी नेमकं काय काम केलं हिंदूत्वासाठी? बेईमान आणि गद्दारांना हिंदुहृदयसम्राट बोलण्याची नवी परंपरा अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली.
दहशतवाद मुक्त काश्मीर कधी करणार?. आजही सुरक्षा दलातील जवानांची काश्मीरमध्ये हत्या होत्या आहे. महाराष्ट्रातील खूप पनवती बाहेर जातायत अशी टीका संजय राऊत यांनी केली.
महाराष्ट्रात अशा पदव्या लावायची हिंमत नाही , नाहीतर लोकं जोड्याने मारतील असे टीकास्त्र संजय राऊत यांनी सोडलं.
शिंदे, अजित पवार गट भाजपमध्ये विलीन होणार, असेही ते म्हणाले.
नवी मुंबईत उलवेहून बेलापूरला जात असताना कार आणि ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. रात्रीच्या सुमारास एका अनियंत्रित कारने ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. यामध्ये ट्रकचालकाचा मृत्यू झाला असून आणखी दोघे जखमी झाले आहेत. नवी मुंबईतील एनआरआय पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.
पाच राज्यांतील निवडणुकांच्या निकालानंतर महायुतीची दिल्लीत महत्वाची बैठक होणार आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने बैठकीला विशेष महत्त्व आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे.
राज्यातील मराठा, ओबीसी आरक्षण विषय, उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार, पालकमंत्री आणि महामंडळ वाटप बाबतदेखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुती मधील छोट्या घटक पक्षांना बोलवणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मिळून आजअखेर पर्यंत 1 लाख 40 हजार कुणबी नोंदी सापडल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक खेड आणि जुन्नर तालुक्यातील नोंदी सापडल्या आहेत.
या नोंदी शोधण्यासाठी आतापर्यंत विविध 13 प्रकारच्या दस्तामधून तब्बल 24 लाख नोंदी तपासण्यात आल्या.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहीलं आहे. लाठीमारानंतर जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशींवर कठोर कारवाईची अपेक्षा होती, मात्र कारवाईच्या नावाखाली त्यांना पुण्यात ‘क्रीम पोस्ट’वर बदली मिळाली, असे वडेट्टीवार यांनी पत्रात म्हटलं आहे.
पुणेकरांवर पाणी कपातीची पुन्हा टांगती तलवार, सेंबरपासून आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. धरणातील पाणीसाठा पाहता जलसंपदा विभागाने पुणे शहरात पाणीकपात करण्याची सूचना महापालिकेला दिली आहे.
जलसंपदा विभागाने दिलेल्या पाणीकपातीच्या सूचनेनुसार महापालिकेने नियोजन करणे अपेक्षित आहे. डिसेंबरपासून सुरू होणारी पाणीकपात जुलै महिन्यापर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये सिटीलिंक बसची सेवा रात्री उशिरा पुन्हा सुरू झाली आहे. तात्पुरता तोडगा काढल्यानंतर बससेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे नाशिककरांनी सुटकेचा निश्वास सोडला .
महापालिकेने ठेकेदाराला वेतनासाठी 56 लाख रुपये दिले, पुन्हा संप झाल्यास महापालिका ठेका रद्द करणार. दोन दिवसांच्या संपामुळे सिटीलिंकच्या 2960 फेऱ्या रद्द झाल्याने महापालिकेचं लाखोंचं नुकसान झालं.
25 आणि 26 नोव्हेंबर या दोन दिवसात पुणे रेल्वेचा ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. शिवाजीनगर ते खडकी स्टेशन दरम्यान तांत्रिक कामांसाठी ब्लॉक घेतला जाणार
यामुळे शनिवारी सुटणारी डेक्कन क्वीन आणि सिंहगड एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तर रविवारी पुणे ते लोणावळा धावणाऱ्या सर्व लोकल्स रद्द झाल्या आहेत.
जालना येथे ओबीसींचा एल्गार महामेळावा यशस्वी झाल्या नंतर आता हिंगोली येथे होणाऱ्या दुसऱ्या ओबीसी एल्गार महा मेळाव्यासाठी ओबीसी समाजाने तयारी सुरू केलीय. नांदेडच्या किनवट, माहुर येथे ओबीसी महा मेळाव्याचे मुख्य संयोजक डॉ बी.डी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजाची बैठक घेण्यात आली.
देशाचे सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आज नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेची सुरुवात मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
मनोज जरंगे पाटील यांचे रात्री साडेबारा वाजता अंतरवाली सराटी या गावांमध्ये आगमन झाले. आगमन झाल्याबरोबर गावाच्या वेशीतच गावातील नागरिकांकडून आणि महिलांकडून मनोज जरंगे यांचं औक्षण करून स्वागत करण्यात आले. त्यांनी गावातील मारुती आणि मातेच्या मंदिरात दर्शन घेऊन पुन्हा एकदा आंदोलन स्थळावरील आसनावरती आसनस्थ झाले. मराठवाडा, खान्देश आणि विदर्भ दौरा लवकरच करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दहिसरमध्ये मराठी पाटी बाबत मनसेने डेडलाइन जारी केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दहिसर विभागात पोस्टर्स लावून दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची मुदत दिली आहे. 25 ही शेवटची तारीख असून, मराठीत पाटी न लावल्यास 26 तारखेला मनसे स्टाईलमध्ये उत्तर देण्यात येईल, अशी धमकी मनसेने दिली आहे.