मुंबई : नव्या संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर आप आणि टीएमसीचा बहिष्कार. येत्या 28 मे रोजी होणार नव्या संसदेचं उद्धाटन. पुण्यात आज लाक्षणिक हेल्मेट दिवस साजरा करण्यात येणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज घेणार राज्यस्तरीय खरीप हंगामाचा आढावा. गोंदिया जिल्हा झाला कोरोनामुक्त. शेवटच्या रुग्णालालाही मिळाला डिस्चार्ज. हिंगोली जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये मान्सून पूर्व जोरदार पावसाला सुरुवात. यासह राज्य आणि देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.
लाहोर :
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत आणखी वाढ
इम्रान खान यांच्या पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे बडे नेत्यांची पक्षाल सोडचिठ्ठी
इम्रान खान यांचा पुन्हा शाहबाज सरकार आणि पाकिस्तानी लष्करावर जोरदार हल्लाबोल
सरकार आणि लष्कर मिळून आमच्या सर्व नेत्यांना तुरुंगात टाकत असल्याचा इम्रान खान यांचा आरोप
मुख्यमंत्र्यांच्या शिखर समितीने केलेल्या विकास आराखडा मंजूर
पुरातन वास्तू कलेशी सुसंगत होणार मंदिराच्या विकास आराखड्यांतर्गत बदल
नव्याने होणाऱ्या मंदिराचे पहिले ॲनिमेटेड रूप खास प्रेक्षकांसाठी
पुरातन वास्तु सौंदर्य नव्याने होणाऱ्या विकासा आराखड्यात दिसणार
आषाढी यात्रेपासून नवीन विकास आराखड्याचे होणार काम सुरू
केजरीवाल-ठाकरे यांच्या भेटीवरुन भाजपची ताकद दिसते, फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
सापनाथ, नागनाथ साथ आओ, फडणवीस यांचा टोला
इंदिरा गांधी यांनी संसदेचं उद्घाटन केलेलं लोकशाही विरोधी होतं का? फडणवीस यांचा सवाल
विरोधकांचा लोकशाहीच्या मंदिरावर विश्वास नाही : देवेंद्र फडणवीस
जलयुक्त शिवार योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
जलयुक्त शिवार योजनेच्या दुसऱ्या टप्प्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा
बैठकीत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतल्याची फडणवीस यांची माहिती
जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीस याचा निर्धार
शेतकऱ्यांना 12 तास वीज देण्यासाठी सोलर योजना
शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळवण्यासाठी प्रयत्नशील
गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार योजनेला गती
महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण प्रकरण, खासदार ब्रिजभूषण सिंह नार्कोटेस्टसाठी तयार
माझ्यासह कुस्तीपटूंचीही नार्को टेस्ट करावी , यापूर्वी पोलिसांनी माझ्याकडे पाच-सहा तासांची चौकशी केली आहे यापुढेही पोलीस चौकशी करू शकतात
ब्रिजभूषण सिंह यांनी नार्कोटेस्टला तयारी दर्शवल्यानंतर पोलिसांच्या भूमिकेकडे कुस्ती जगताचे लक्ष
शेलार सिल्व्हर ओकवर पवार यांची भेट घेणार
भेटीमागचं कारण लवकरच कळणार
सिल्व्हर ओकवर शेलार दाखल
मुख्यमंत्री सी लिंकवरुन आज करणार पाहणी
जवळपास 21 किलोमीटराचा मार्ग
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज करतील पाहणी
महानगरपालिकेच्या ऐतिहासिक मुख्यालय इमारतीचा पुरातन वारसा पाहिला
हेरिटेच वॉकसह केला अभ्यास दौरा
वास्तूरचना आणि इमारतीची भव्यता पाहून शिष्टमंडळ गेले भारावून
जी२० परिषदेच्या आपत्ती जोखमी सौम्यीकरण कार्यगट बैठकीसाठी मुंबईत आलेल्या शिष्टमंडळाने आज बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयास भेट दिली. महानगरपालिकेच्या ऐतिहासिक मुख्यालय इमारतीचे पुरातन वारसा दर्शन अर्थात हेरिटेज वॉक करण्यासह आपत्ती व्यवस्थापन विभागाचाही त्यांनी अभ्यास दौरा केला.… pic.twitter.com/Hb9uYXo1xG
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 23, 2023
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते करा उद्धघाटन
एआयएमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन ओवेसी यांची मागणी
पंतप्रधानांच्या हस्ते उद्धघाटन होणार असेल तर जाणार नाहीत
#WATCH हम प्रधानमंत्री से अपील करते हैं की आप पीछे हट जाइए और स्पीकर ओम बिड़ला को उद्घाटन करने दें। अगर प्रधानमंत्री ऐसा करेंगे तो हम कार्यक्रम में जरूर जाएंगे: नए संसद भवन के उद्घाटन पर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी pic.twitter.com/5OeAekNLmM
— ANI_HindiNews (@AHindinews) May 24, 2023
नुकसान भरपाई न दिल्याने शेतकरी आक्रमक
फडणवीस उद्या सोलापूर दौऱ्यावर
अखिल भारतीय किसान सभेने दिला इशारा
या कार्यक्रमाला देशाच्या राष्ट्रपतींना आमंत्रित न केल्याचा आरोप
हा आदिवासी, मागास वर्गातील लोकांचा अवमान
आपचे खासदार संजय सिंह यांचा आरोप
#WATCH नई संसद के उद्घाटन में देश की राष्ट्रपति को नहीं आमंत्रित करना..ये आदिवासी समाज, दलित समाज, पिछड़े समाज का अपमान है और ये प्रदर्शित करता है कि बीजेपी की मानसिकता आदिवासी, दलित और पिछड़ा विरोधी है, वरना संसद के उद्घाटन में अगर आप राष्ट्रपति को ही नहीं बुला रहे हैं तो फिर… pic.twitter.com/adUUQW8aGz
— ANI_HindiNews (@AHindinews) May 24, 2023
अजित पवार यांनी केली मागणी
कोकणातील चाकरमान्यांना घरी जाण्यासाठी सुविधा मिळावी
रेल्वे राज्यमंत्र्यांना पाठविले पत्र
गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा आणि विशेषत: कोकणवासीयांच्या अस्मितेचा, श्रध्देचा, जिव्हाळ्याचा आणि संस्कृतीचा विषय आहे. कोकणच्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी गणेशोत्सव काळात अतिरिक्त रेल्वे गाड्या कोकणात सोडण्याची मागणी पत्राव्दारे केंद्रीय रेल्वेमंत्री मा. @AshwiniVaishnaw जी आणि रेल्वे… pic.twitter.com/n3qBzGj3bM
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 24, 2023
विरोधकांनी नवीन संसद भवनाच्या उद्धघाटनाला केला विरोध
आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिस्वा सरमा यांनी लगावला टोला
विरोधक बहिष्काराचे नाटक करत असल्याचा केला आरोप
#WATCH बहिष्कार तो होना ही था। उन्होंने कभी नहीं सोचा था कि भवन का निर्माण इतनी जल्दी पूरा हो जाएगा। सिर्फ अपना चेहरा बचाने के लिए बहिष्कार का नाटक कर रहे हैं: विपक्ष द्वारा नए संसद भवन के उद्घाटन का बहिष्कार करने पर असम के मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा pic.twitter.com/MEc9SWQSTb
— ANI_HindiNews (@AHindinews) May 24, 2023
शेतकऱ्याकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा ताफा अडवण्याचा इशारा
विविध मागण्या पूर्तता न केल्यामुळे उपमुख्यमंत्र्यांना अखिल भारतीय किसान सभेचा इशारा
नुकसान भरपाईचे अनुदान अद्याप शेतकर्यांना मिळाले नाही
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत 385 कोटी रुपये शेतकर्यांना कारखानदारांकडून येणे बाकी
अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवानंद झळके यांनी दिला इशारा
पथकासोबत आलेल्या पोलिसांनादेखील मारहाण
कल्याण ग्रामीण भागातील खोणी गावातील घटना
खोणी गावातील वीजपुरवठा महावितरणकडून खंडीत
महावितरण कर्मचाऱ्यांच्या गाडीची तोडफोड
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात आणखी एक महत्त्वाचा ट्वीस्ट
संभाजी ब्रिगेडही लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत
संभाजी ब्रिगेडकडून पुणे, हिंगोली आणि बुलढाण्याच्या जागांची मागणी
दोन किंवा तीन जागांवर लोकसभा उमेदवार उभे करण्याचे संभाजी ब्रिगेडची तयारी
शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या तीन जागा संभाजी ब्रिगेडला देण्याची मागणी
दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंकडे तीन जागांची मागणी केल्याची माहिती
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी दिली माहिती
पुण्यात आज गौतमी पाटीलच्या विरोधात पार पडली बैठक
गौतमी पाटीलचे आडनाव गौतमी चाबुकस्वार आहे
पाटील आडनाव लावून ही पाटलांची बदनामी करत आहे
गौतमी पाटीलनं पाटील आडनाव लावू नये
अन्यथा महाराष्ट्रात गौतमी पाटीलचे कार्यक्रम होऊ देणार नाही
राजेंद्र जराड पाटील मराठा समन्वयक यांनी दिला इशारा
अभाविपच्या राष्ट्रीय कार्यकारीणी बैठकीत देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन
आजपासून 28 तारखेपर्यंत पुण्यात अभाविपची राष्ट्रीय बैठक
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 26 ला पुण्यात येणार
संसदेच्या उद्घाटनाला बाकी कोणी जाऊ न जाऊ मात्र संजय राऊत यांना जायचा मुळीच अधिकार नाही
ज्या लोकांच्या मतावर ते खासदार झाले ते त्यांना सोडून गेले
संजय राऊत यांनी खासदारकीचा राजीनामा दिला पाहिजे
विकास टिंगरे विश्रांतवाडी ब्लॉकचे अध्यक्ष होते
पतसंस्थेच्या कार्यालयात काल गळफास घेत केली आत्महत्या
आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलं नाही
पोलिसांकडून अधिकचा तपास केला जातोय
राज्य शासनानं जाहीर केलेल्या 40 टक्के करसवलतीचा मसुदा महापालिकेकडून तयार
मसुदा विधी समितीकडे पाठवण्यात आला आहे
मुख्य सभेच्या मान्यतेनंतर महापालिका राज्य शासनाला पाठवणार प्रस्ताव
राज्य सरकारच्या मंजूरीनंतर मिळणार कायदेशीर व तांत्रिक मंजूरी
पुणेकरांना 40 टक्के करसवलत मिळणार
प्रशासनाकडून मसुदा तयार करण्यात आला आहे
या वेबसाईटवर पाहता येणार निकाल
Maharesult.nic.in
hsc.maharesult.org.in
hscresult.mkcl.org
पुणे जिल्ह्यातील खेड बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी कैलास लिंभोरे यांची निवड
उपसभापती पदी विठ्ठल वनगरे यांची निवड
कल्याणच्या इराणी वस्ती मधून ड्रग लेडी गजाआड
सबा सैय्यद असे महिलेचे नाव
महिलेकडून एम डी ड्रग्ज आणि चरस हस्तगत
कल्याणच्या आंबिवली , मोहने, आणि आजूबाजूच्या परिसरात एम डी ड्रग्ज, चरस विक्री करत असल्याची माहिती
कल्याण खडकपाडा पोलिसांनी केली रंगेहाथ अटक
दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून बच्चू कडू यांची निवड
अमरावती शहरात बच्चू कडू यांच्या प्रहार कार्यकर्त्यांचा जल्लोष
बच्चू कडू यांना शासनाकडून मंत्रीपदाचा दर्जा
अपंग कल्याण मंत्रालय स्थापन झाल्याने अमरावतीत आनंद उत्सव साजरा
अमरावतीत फटाके फोडून लाडू मिठाई वाटप करत प्रहार कार्यकर्त्यांचा जल्लोष
पुण्यातील हडपसरमध्ये वनवास यात्रा दाखल झाली आहे
मराठा समाजाला ओबीसींमधूनच आरक्षण मिळावं ही याची प्रमुख मागणी आहे
उद्या पुण्यात सकाळी स्वारगेट ते लाल महालापर्यंत निघणार पदयात्रा
लाल महालासमोर उद्या सभा
मराठा समन्वयक पुढच्या आठवड्यात मुंबईत मंत्रालयावर मारणार धडक
तुळजापूर ते मुंबई अशी निघाली आहे मराठा वनवास यात्रा
अमरावती शहरात बच्चू कडू यांच्या प्रहार कार्यकर्त्यांचा जल्लोष
बच्चू कडू यांना शासनाकडून मंत्रिपदाचा दर्जा
अपंग कल्याण मंत्रालय स्थापन झाल्याने अमरावतीत फटाके फोडून लाडू मिठाई वाटप करत प्रहार कार्यकर्त्यांकडून आनंद साजरा
दुपारी 2 वाजता ऑनलाईन पद्धतीने लागणार निकाल
अध्यक्ष या नात्याने नवीन संसद भवनाच्या भेटीचं आमंत्रण आहे का?
या संदर्भात विधीमंडळ सचिवालयात माहिती मिळेल
या संदर्भात माझ्याकडे अधिकृत माहिती नाही
मी अनेक वेळा अनेक लोकांना भेटत असतो
तशी काही राजकीय दृष्टीकोनातून तुषार मेहतांशी भेट झालेली नाही
मी दिल्लीला येत असतो, या निर्णयानंतर पहिल्यांदा आलोय
उसने दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या बापाच्या अंगावर ट्रॅक्टर घातला
मुलगा घटनास्थळावरून फरार
घटनास्थळी पोलीस दाखल
नारायणगाव बाजार समितीमध्ये टॉमेटोला कावडींमोल भाव
कमी भाव मिळत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी टॉमेटो दिला रस्त्यावर फेकून
टॉमेटोला 1 ते 2 रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी संतप्त
गेली दीड वर्ष जुन्नर बाजार समितीवर प्रशासक
बाजार समितीची सभापती पदाची निवडणूक हित असतानाच शेतकऱ्यावर टोमॅटो फेकून देण्याची वेळ
मातोश्रीत आल्यावर कुटुंबीयांसारखी वागणूक मिळते
मोदींकडून देशातील लोकशाहीची हत्या
राजभवन मोदींचं कार्यालय बनलं
देशाला वाचवण्यासाठी विरोधकांनी एकत्र येण्याची गरज
भाजपला पराभवाची भीती वाटतेय
2024 ला मोदी सत्तेत आल्यास संविधान बदलतील
भाजप आणि संघाचं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान नाही
सरकार येताच केंद्राने आमचे अधिकार हिरावून घेतले
मोदी सरकारच्या याच हुकूमशाहीच्या विरोधात आमचा लढा
दिल्लीत ऑपरेशन लोटस केले
आमचा एकही आमदार फुटला नाही
दिल्लीत आप सरकार तोडता न आल्याने अधिकारांवर घाला
आमदार फोडून देशभरातील सरकार फोडण्याचा मोदींचा धंदा
ईडी, सीबीआयची भीती दाखवून सरकार तोडले जातंय
उद्धव ठाकरे
केजरीवाल दुसऱ्यांदा मातोश्रीवर आलेत
नातं जपण्यासाठी शिवसेना आणि मातोश्री प्रसिद्ध
राजकारणापलिकडे आम्ही नातं जपतो
लोकशाही आणि संविधआन टिकवण्यासाठी आम्ही एकत्र
दिल्लीतला अधिकारी पोस्टिंगचा कोर्टाचा निर्णय लोकशाही जपणारा
विकास टिंगरे विश्नांतवाडी ब्लॉकचे अध्यक्ष होते
पतसंस्थेच्या कार्यालयात काल गळफास घेत केली आत्महत्या
आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलं नाही
पोलिसांकडून अधिकचा तपास केला जातोय
तीन कनिष्ठ अभियंत्यांची हकालपट्टी केली जाणार
गेल्या वर्षी महापालिकेनं 448 पदांची भरती केली होती, त्यापैकी 145 पदं ही कनिष्ठ अभियंत्यांची होती
तीन उमेदवारांच्या अनुभव प्रमाणपत्राबाबत शंका उपस्थित झाल्यानं चौकशी समिती नेमण्यात आली
यामध्ये प्रमाणपत्र बोगस असल्याचं निष्पन्न झालं
राज्यातील शासकीय आणि महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पैसे मिळणार
बीएस्सी पॅरामेडिकल टँक्नोलॉजीच्या विद्यार्थ्यांना कार्यप्रशिक्षणासाठी मिळणार 8 हजार रुपये
मार्चपासून उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं लागू केला निर्णय
नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठांतर्गत हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आलाय
राज्य सरकारने हा निर्णय लागू केल्यानं विद्यार्थ्यांना आर्थिक मदत होणार
ऑनलाईन औषधे विकण्याच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची 1.23 लाख रुपयांची फसवणूक
पुणे पोलिसांनी बंगालमध्ये जाऊन या सायबर चोरट्याला केली अटक
याप्रकरणी खराडी भागातील एका ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली होती
परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीत जोरदार रस्सीखेच
आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील आणि राहुल मोटे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीनंतर लाठीचार
मंत्री सावंत यांच्या गटाने महाविकास आघाडीचे काही संचालक फोडल्याच्या चर्चेने दोन्ही गटात तणावाचे वातावरण
निवड पुढे ढकलली
परंडा बाजार समितीत 18 जगापैकी 13 जागा या महाविकास आघाडीने जिंकल्या
5 जागा भाजप शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात
भाजपचे आत्माराव पवार यांची सभापतीपदी तर उपसभापतीपदी यशवंत चौधरी यांची निवड
बोरी बाजार समितीत भाजपच्या मेघना बोर्डीकर गटाने 12 जागा पटकावल्या
महाविकास आघाडीला 6 जागा मिळाल्या
– नोएडा येथील कारखान्यात बनवलेले एमडीएमए अमली पदार्थ मुंबई आणि गोव्याला सागरी मार्गाने पाठवले जात आहेत.
– ग्रेटर नोएडा ते वडोदरा या रस्त्याने अमली पदार्थ मुंबई आणि गोव्याला समुद्रमार्गे जात होते.
– गेल्या चार वर्षांत 2,400 कोटी रुपयांच्या ड्रग्जचा पुरवठा मुंबई आणि गोव्यात करण्यात आला आहे.
– नोएडा येथे सूरजपूर कोतवाली परिसरात आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ कारखान्यावर पोलिसांनी धड टाकली.
– या धाडीमध्ये पोलिसांना एक डायरी सापडली असून त्यातून ही माहिती समोर आली आहे.
– आधी जनतेच्या हक्काचे पाणी तातडीने सोडा. सवड मिळेल तेव्हा उद्घाटन करा, असा टोला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना लगावला आहे.
– बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहिले असून त्यामधून त्यांनी हा टोला लगावला आहे.
– उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील 182 गावांना पाणीपुरवठा करणारे निळवंडे धरण पूर्ण झाले आहे.
– अनेक अडचणींवर मात करून कालव्यांची कामे पूर्णत्वास आणली.
– फक्त श्रेयवादासाठी दुष्काळी जनतेला वेठीस धरले जात आहे असा आरोप थोरात यांनी केला.
– केवळ पंतप्रधान महोदयांची वेळ मिळत नाही म्हणून या हक्काच्या पाण्यापासून दुष्काळी भागातील जनता वंचित राहिलेली आहे, असे थोरात यांनी म्हटले आहे.
– विरोधी पक्षांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या दृष्टीकोनाची काहींना ॲलर्जी आहे.
– त्यामुळेच लोकशाहीचे मंदिर नवीन संसदेच्या उद्घाटनाला विरोध करण्याची त्यांना दुर्बुद्धी सुचली आहे.
– हे सगळे संकुचित मनोवृत्तीचे पुतळे आहेत.
– जनतेने तीनशेपेक्षा अधिक खासदार संसदेत पाठवून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवला.
– काही पक्ष ५० खासदारांच्या पुढे गेले नाही, काही पक्षांना भोपळा फोडता आला नाही तर काहींचा पक्षच उरला नाही.
– खऱ्या अर्थाने संसदेच्या कार्यक्रमाला बॅायकॅाट करणाऱ्यांना जनतेनेच बॅायकॅाट केले आहे आणि 2024 ला ही तेच करेल, असा टोला भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा किशोर वाघ यांनी लगावला आहे.
– देशातील तब्ब्ल 19 पक्षांनी नव्या संसद भवनाच्या उदघाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे.
– राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट यांनी या कायर्कर्मावर बहिष्कार घातला आहे.
– त्याचबरोबर तृणमूल काँग्रेसने सुद्धा या सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे
– त्यासोबतच आम आदमी पक्ष, जनता दल आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांनीही या नवीन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे.
– दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवान मान हे मातोश्री निवासस्थानी पोहोचले आहेत.
– उद्धव ठाकरे यांचे हे दोन मुख्यमंत्री भेट घेणार आहेत.
– नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधी पक्ष एकत्र मोट बांधत आहे. त्यामुळे ही भेट महत्वाची मानली जात आहे.
– राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले आहे.
– कोल्हापूर, नागपूर आणि औरंगाबाद येथे युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली.
– नागपूरमध्ये राहुल गांधी यांचा पुतळा जाळून त्यांचा निषेध करण्यात आला.
– छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर राहुल गांधींची यांची तुलना केल्याने भाजप पक्ष आक्रमक झाला आहे.
– विश्रांतवाडी येथील काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्षाने स्वतःच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
– विकास शिवाजी टिंगरे असे आत्महत्या केलेल्या ब्लॉक अध्यक्षाचे नाव आहे.
– विकास टिंगरे हे जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत होते.
– पोरवाल रस्त्यावरील पतसंस्थे शेजारी त्याचे कार्यालय आहे.
– आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या आईच्या नावाने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती.
– गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्याच्या बुकिंगमध्ये मोठा घोळ आढळून आला आहे.
– अवघ्या काही मिनिटात रेल्वे बुकिंग फुल्ल झाल्या.
– हा घोटाळा असून असंख्य कोकणवासियांनी आम्हाला फोन केला आहे
– यासंदर्भांत केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सोमवारी रेल्वे मंत्र्यासोबत बैठक घेणार आहेत.
– यामधून कोकणी जनतेला दिलासा देऊ असे आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे.
कुकडीच्या पाण्यावरून पुन्हा पुणे आणि नगर जिल्हा वाद पेटण्याची चिन्ह
राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांनी विरोध केल्याने कुकडीच आवर्तन लांबीवर
आवर्तन लांबल्याने पारनेर,श्रीगोंदा, कर्जत आणि करमाळा परिसरातील शेतकऱ्यांना फटका
तर शेतीसाठी २२ मे रोजी आवर्तन सोडणार असल्याचे कालवा सल्लागार समितीने केले होते जाहीर
मात्र, पुणे जिल्ह्यातील काही नेते आणि संघटनांनी विरोध केल्याने हे आवर्तन सोडले नाही
तर घारगाव येथील राष्ट्रीय महामार्गावर रास्तो रोको आंदोलनाचा शेतकऱ्यांचा इशारा
कुकडीच्या आवर्तनासाठी श्रीगोंदा येथील तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी केलं लक्षणीय उपोषण
छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर राहुल गांधींची तुलना केल्याने भाजप आक्रमक
कोल्हापुरात भाजप युवा मोर्चाची काँग्रेस विरोधात निदर्शन
कोल्हापूरच्या शिवाजी चौकात युवा मोर्चाची निदर्शने
काँग्रेसच्या सोशल मीडिया साईटवर राहुल गांधी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करणारा व्हीडिओ प्रसिद्ध करण्यात आल्याने नव्या वादाला तोंड
मनसे नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात अनोखा उपक्रम
अमित ठाकरे यांच्या 31 व्या वाढदिवसानिमित्त मनविसेतर्फे पुणेकरांसाठी खास गिफ्ट
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून पुणेकरांसाठी 31 रुपये स्वस्त पेट्रोल
पुण्यातील अनेक पेट्रोल पंपावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे 31 रुपये कमी दराने दिले जात आहे पेट्रोल
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून पुणेकरांसाठी खास कुपन
शहरातील अनेक पेट्रोल पंपावर मनसेतर्फे वाटले जात आहेत स्वस्त पेट्रोलचे कूपन
नवी मुंबईतील खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बॉम्बसारखी वस्तू असल्याचा पोलीस ठाण्यात फोन
टेंबोडे गावाच्या जवळ बॉम्ब असल्याच्या माहितीने खळबळ
पोलीस आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल
बॉम्बशोधक पथकाने केला शोध सुरू
डमी हॅन्ड ग्रॅनाईट सापडले असल्याचे माहिती समोर
बॉम्ब शोधपथकासह पोलीस दाखल अजून काही मिळते का याचा शोध सुरू
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात भ्रष्टाचार?
वरळी सार्वजनिक बांधकाम विभागात भ्रष्टाचार झाल्याचा शिवेसेनेचा आरोप
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले चौकशीचे आदेश
याआधी देखील वरळीतल्या अधिका-यांनी भ्रष्टाचार केल्याच्या घटना घडल्या आहेत
तातडीनं चौकशी करून अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केली होती वरळीतील भ्रष्टाराचाराची तक्रार
वरळीतील नागरिकांनी मुख्यमंत्र्यांकडे देखील केली होती तक्रार
राष्ट्रवादीचा एकही नेता संसदेच्या उद्धाटन सोहळ्यास उपस्थित राहणार नाही
RJDचे नेतेही टाकणार बहिष्कार, तेजस्वी यादव यांनीही केले जाहीर
वयाच्या 51 व्या वर्षी कार्डिॲक अरेस्टने झालं निधन
अनुपमा मालिकेत साकारली होती भूमिका
नितेश पांडे यांच्या इतर मालिकांमधील भूमिकाही लोकप्रिय
भाजपात जाण्यासाठी नकार दिल्याने देशमुखांना तुरूंगात टाकलं
अनिल देशमुखांवरील दबावासंदर्भात माझ्याकडे पुरावे आहेत , संजय राऊतांचा दावा
फक्त पंतप्रधानांची इच्छा म्हणून अर्ध्या दिल्लीवर बुलडोझर फिरवून नवे बांधकाम केले
राष्ट्रपतींना डावलून संसदेचे उद्घाटन का, राऊत यांनी केला सवाल
समीर वानखेडे आज सीबीआयसमोर हजर होणार नाहीत.
सीबीआयने वानखेडे यांना आज तिसऱ्यांदा बीकेसी कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते.
मात्र वैयक्तिक कारणांमुळे वानखेडे आज चौकशीसाठी जाणार नाहीत
25 कोटींच्या खंडणीप्रकरणी सीबीआयने समीरची दोनदा चौकशी केली आहे.
राज्यातील मंत्रीमंडळाचा विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता
केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तार रखडल्याने राज्यातही विस्तार लांबणार ?
अहमदनगरला नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील कर्मवीर विद्यालयातील प्राचार्यांची बदली रद्द झाल्याने विद्यार्थ्यांनी फुलांची उधळण करून त्यांचं स्वागत केलाय. प्राचार्य संपतराव काळे यांची जामखेड तालुक्यात बदली झाली होती. मात्र ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे बदली रद्द झाली असून पुन्हा सारोळा शाळेत रुजू झाले आहेत.
पश्चिम रेल्वेत प्रवाशांनी एसी लोकल थांबवली
सकाळी ७.५६ वाजता विरारहून चर्चगेटला जाणाऱ्या लोकलचा एसी काम करत नसल्याने प्रवाशांनी ट्रेनचे दरवाजे बंद करू दिले नाहीत.
दरवाजा बंद असल्याने प्रवाशांना प्रवास करताना त्रास होत होता
दरवाजा बंद नसल्याने गाडी वांद्रे स्थानकात थांबली
त्यानंतर लोकांनी विरोध करत ट्रेन रोखल्यानंतर एसी सुरू करण्यात आला
वांद्रे स्थानकात सुमारे १५ ते २० मिनिटे गोंधळ सुरू होता.
गोंदियाच्या अमित उंदीरवाडे यांनी पटकावले यूपीएससी स्थान
यूपीएससी परीक्षेत आला तो 581 वा
अमितच्या घरी पेढे वाटून फटाके फोडून आनंद केला व्यक्त
संभाजीनगरातील ऐतिहासिक हर्सूल तलावाची पाणी पातळी साठ टक्क्यांनी घटली
शहरातील 8 ते 10 वार्डना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाची पाणी पातळी घटली
हर्सूल तलावात फक्त 40 टक्के पाणीसाठा शिल्लक
शहराला पाणी टंचाईच्या झळा बसण्याची शक्यता
400 वर्षांपूर्वी बांधण्यात आला आहे ऐतिहासिक हर्सूल तलाव
पाणीपातळीत तब्बल 60 टक्क्यांची घट झाल्यामुळे वाढली चिंता
कोल्हापूर जोतिबा विकास प्राधिकरणाचे काम सुरू होणार
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घेतला कामाच्या प्रस्तावाचा आढावा
विविध विभागाने सादर केलेल्या आराखड्याचे लोकप्रतिनिधी समोर होणार सादरीकरण
सादरीकरणानंतर प्रत्यक्ष कामाला होणार सुरुवात
श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसरात सुविधा देण्यासाठी जोतिबा डोंगर विकास प्राधिकरणाची करण्यात आलीय स्थापना
प्राधिकरणाकडून 50 कोटीच्या निधीलाही मिळाली आहे मंजुरी
विद्यार्थी गणवेशाबाबत शिक्षणमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाला आता पालक संघटनांकडून विरोध
एकाच आठवड्यात विद्यार्थ्याना दोन गणवेश घालायला सांगणं हे चुकीचं आहे.
दोन गणवेश घेणं पालकांना परवडणारं नाही
शिवाय खाजगी शाळा सरकारचा नियम पाळणार का ? याबाबत साशंकता, त्यामुळे आधीचाच नियम कायम ठेवण्याची पालकांची मागणी
कोल्हापूर पन्हाळा तालुक्यातील देवाळे चे उपसरपंच राजेंद्र चावरे यांचं ग्रामपंचायत सदस्यत्व अपात्र
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश
चावरे यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्या बाबत गावातील विरोधी गटाने केली होती तक्रार
समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरुच आहे. महामार्गावर रात्री 1 च्या सुमारास ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा अपघात झाला. या अपघातात 12 जण गंभीर तर 18 ते 20 जण किरकोळ जखमी झाले आहेत. ट्रक चालकाने अचानक लेन कटिंग केल्यामुळे पाठीमागून येणारी लक्झरी ट्रकवर धडकल्याने हा अपघात घडला आहे
यामध्ये माधुरी मिसाळ,राहुल कुल आणि महेश लांडगे ही तीन नावं मंत्रिपदासाठी चर्चेत
राहुल कुल यांनी याआधीच देवेंद्र फडणवीसांची घेतली होती भेट
जिल्ह्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आणि शहर असा समतोल साधण्याची शक्यता
‘साराभाई वर्सेस साराभाई’ या लोकप्रिय मालिकेत जास्मिनची भूमिका साकारलेली अभिनेत्री वैभवी उपाध्यायचं निधन
अवघ्या 32 व्या वर्षी घेतला अखेरचा निरोप
हिमाचल प्रदेशमध्ये कार अपघातात गमावला जीव, वाचा सविस्तर..
अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती
दोन जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर
करमाड ते औरंगाबाददरम्यान झाला अपघात
कार कठड्याला धडकून भीषण अपघात
सकाळी सहा वाजताच्या सुमारास झाला अपघात
शेतकऱ्यांना पूरक उद्योग म्हणून अतिरिक्त उत्पन्न प्राप्त व्हावे, यासाठी राबविला जाणार प्रकल्प
सर्व तालुक्यांत विविध ठिकाणी घेण्यात येणार वर्कशॉप
रेशीम शेती प्रकल्प प्रशिक्षणासाठी नाव नोंदविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
पंडीत गोयकर असे आरोपीचे नाव, आरोपी फरार
भुम पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद
पीडित मुलीच्या आईच्या जबाबवरून गुन्हा नोंद
या बाजार समितीत 17 पैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 10 संचालक विजयी
सभापतीपदावर दोन जुन्या की आठ नव्या संचालकांपैकी कुणाला संधी मिळणार? याची उत्सुकता
आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत होणार निवड
वादळी वाऱ्याने विजेच्या तारा अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
महावितरण आणि ठेकेदाराचा हलगर्जीपणा उघड
मुरूम येथील लक्ष्मण कुंभार असे मृत शेतकऱ्याचे नाव
जिल्ह्यातील 59 गावे आणि 50 वाड्यांना 52 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू
जिल्ह्यातील जवळपास 97 हजार नागरिकांना पाणीपुरवठा सुरू
येवला तालुक्यातील 43 गावांसाठी सर्वाधिक 20 टँकर सुरू
आयुष्य नागलोद आणि संकेत ब्रह्मवृत अशी तळ्यात बुडालेल्या दुर्दैवी मुलांची नावे
एकाच वय सात वर्षे तर दुसऱ्या मुलाचे वय 17 वर्षे
पोहता येत नसल्यामुळे पाण्यात बुडून झाला दुर्दैवी मृत्यू
घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती
गावातील नागरिकांनी दोन्ही मुलांचे मृतदेह काढले बाहेर
131 यात्रेकरुंना देण्यात आला मेंदूज्वर, पोलिओचा डोस
19 ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली एन्फ्लुंझा लस
महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसैन रुग्णालयात राबविण्यात आले शिबीर
शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर अमित ठाकरे यांचा मध्यरात्री वाढदिवस साजरा
अमित ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मनसैनिक मोठ्या संख्येने शिवतीर्था बाहेर जमले
अमित ठाकरे यांनी आपल्या चाहत्यांसोबत केक कापून केला वाढदिवस साजरा
स्फोटात 11 जण जखमी झाल्याची माहिती
खाणीच्या सीएम – 2 सेक्टर 16 मध्ये मंगळवारी दुपारी झाला स्फ़ोट
जखमी सहा कामगारांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु
कोळसा काढताना एअर स्टोनिंग ब्लास्ट झाल्याने 11 कामगार झाले जखमी
मेल एक्सप्रेसच्या तिकिटासाठी रांगेत उभे असलेल्या प्रवाशाला दलालाने केली बेदम मारहाण
दोन दिवस रांगेत उभे राहून तिकीट मिळत नसल्याने तिसऱ्या दिवशी प्रवाशाने रात्री दलाल कशा रांगा लावतात याचा व्हिडिओ काढायचा प्रयत्न केल्याने दलालाने केली मारहाण
कल्याण लोहमार्ग पोलीस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शहरातील सर्व प्रमुख शासकीय कार्यालयाबाहेर हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांची जनजागृती करण्याबरोबरच कारवाई करण्यात येणार
जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हेल्मेट वापराबाबत व्यापक जनजागृतीसाठी 24 मे रोजी लाक्षणिक हेल्मेट दिवस साजरा करण्याचे आवाहन
त्यासाठी सर्वप्रथम सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन केले आहे
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक
जलयुक्त शिवार अभियान 2.0, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2.0 व गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आढावा बैठक
तर दुपार नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आय. आय. टी. मुंबई आणि आय. आय. एम. नागपूर या संस्थांसोबत होणाऱ्या सामंजस्य कराराप्रसंगी उपस्थित राहणार
त्यानंतर मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (शिवडी-न्हावा शेव्हा) रोडची करणार पाहणी