Maharashtra Breaking News in Marathi : आता मोदी गॅरंटी नाही,फक्त उध्दव साहेबांची गॅरंटी चालणार – संजय राऊत

| Updated on: Mar 19, 2024 | 7:07 AM

Maharashtra Breaking News in Marathi : आज 18 मार्च 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News in Marathi : आता मोदी गॅरंटी नाही,फक्त उध्दव साहेबांची गॅरंटी चालणार - संजय राऊत
Follow us on

मुंबई | 18 मार्च 2024 : लोकसभा निवडणूक जाहीर होताच निवडणूक आयोगाने आचारसंहितेचे पालन करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने एसटी बसवर असलेली ‘निर्णय गतिमान, महाराष्ट्र वेगवान’ या जाहिराती काढण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात रविवारी मध्यरात्रीनंतर भूकंपाचा ३.३ तीव्रतेचा सौम्य हादरा बसला, असे इन्स्टिट्यूट ऑफ सिस्मॉलॉजिकल रिसर्चने सांगितले. बाजारपेठेत बटाटा महागला आहे. कमी आवक असल्यामुळे दर वाढत चालले आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाने होळीच्या काळात यापूर्वी ११२ होळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची घोषणा केली होती. आता सणासुदीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता आणखी १२ होळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 18 Mar 2024 09:11 PM (IST)

    उत्तर मुंबईत काँग्रेस राज बब्बर यांना उमेदवारी देणार?

    मुंबई | सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर मुंबई लोकसभेसाठी भाजपने पीयूष गोयल यांचे नाव जाहीर केल्यानंतर काँग्रेस राज बब्बर यांना उमेदवार बनवू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,उत्तर मुंबईत काँग्रेसला उमेदवार न मिळाल्यास शिवसेना ठाकरे गटाचे विनोद घोसाळकर यांना लोकसभेसाठी रिंगणात उतरवू शकते,

  • 18 Mar 2024 05:52 PM (IST)

    मुख्तार अन्सारी यांचा मुलगा अब्बास याला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

    शस्त्र परवाना प्रकरणात मुख्तार अन्सारी यांचा मुलगा अब्बास अन्सारी याला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.


  • 18 Mar 2024 05:47 PM (IST)

    जम्मू-काश्मीरमध्ये दोन्ही निवडणुका एकाच वेळी व्हाव्यात : ओमर अब्दुल्ला

    नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला म्हणाले की, दोन्ही निवडणुका एकाच वेळी व्हाव्यात अशी आमची इच्छा होती, पण तसे झाले नाही. येथील विद्यमान सरकारने यात ढवळाढवळ केली आहे. जनतेच्या हातात सत्ता यावी असे त्यांना वाटत नाही. मुकुट नसलेला राजा बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना ३० सप्टेंबरपूर्वी येथे निवडणुका घ्याव्या लागणार आहेत.

  • 18 Mar 2024 05:35 PM (IST)

    मनीष सिसोदिया यांच्या जामिनाला सीबीआयचा विरोध

    दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने माजी उपमुख्यमंत्री आणि आप नेते मनीष सिसोदिया यांच्या जामिनाला विरोध केला आहे. या प्रकरणात काही हायप्रोफाईल लोकांना अटक केली जाऊ शकते, असे सीबीआयने न्यायालयात सांगितले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून जामीन मंजूर झाल्यास आरोपी त्यात अडथळा ठरू शकतात, असे सीबीआयने म्हटले आहे.

  • 18 Mar 2024 05:25 PM (IST)

    डुंगरपूर प्रकरणात आझम खानला 7 वर्षांची शिक्षा

    डुंगरपूर प्रकरणात खासदार आमदार कोर्टाने आझम खान यांना 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी न्यायालयाने उर्वरित दोषींना 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. आझम खान यांना आयपीसी कलम 427, 504, 506, 447 आणि 120 बी अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. आझम खान, माजी नगरपालिकेचे अध्यक्ष अझहर अहमद खान, कंत्राटदार बरकत अली, निवृत्त सीओ आले हसन या प्रकरणी दोषी आढळले आहेत.

  • 18 Mar 2024 05:12 PM (IST)

    आयपीएल अधिकारी विवेक सहाय पश्चिम बंगालचे नवे डीजीपी

    निवडणूक आयोगाने आज पश्चिम बंगालच्या डीजीपीला हटवल्यानंतर आयपीएस अधिकारी विवेक सहाय यांची पश्चिम बंगालच्या पुढील डीजीपीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

  • 18 Mar 2024 04:02 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप घेवून मंत्री दिपक केसरकर पुण्यात दाखल

    मुंबई : मंत्री दीपक केसरकर यांनी पुण्यातील रुबी हॉलमध्ये विजय बापू शिवतारे यांची भेट घेतली. बारामती मतदारसंघातून निवडणूक लढविण्यावर शिवतारे ठाम आहेत. त्यामुळे त्यांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्री यांनी मंत्री दीपक केसरकर यांना पाठवलं आहे. त्यांच्यासोबत खासदार राहुल शेवाळे सुद्धा आहेत.

  • 18 Mar 2024 03:45 PM (IST)

    आमदार निलेश लंके यांच्यावर शिवाजी कर्डीले यांचा निशाणा

    अहमदनगर : भाजपच्या नगर दक्षिण लोकसभा निवडणूक आढावा बैठकीत माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांनी आमदार निलेश लंके यांच्यावर निशाणा साधला. महायुती सरकारमध्ये अजित पवार यांच्याकडून त्यांनी निधी मिळवला. आता दुसरीकडे (शरद पवारांकडे) जाऊन फोटो काढत “आम्ही तुमचेच म्हणत आहेत” असा टोला कर्डिले यांनी आमदार लंके यांना लगावला.

  • 18 Mar 2024 03:23 PM (IST)

    मंत्र्याच्या निवासस्थानाबाहेर कंत्राटदाराचे आंदोलन

    मुंबई : थकीत बिल संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व कंत्राटदारांनी आंदोलन सुरु केले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शासकीय निवासस्थाना बाहेर हे आंदोलन सुरु आहे. लोकसभा आचारसंहिता लागू झाल्यामुळे राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व कंत्राटदारांना त्यांच्या कामाचे बिल मिळणार नाही. त्यामुळे या सर्व कंत्राटदारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

  • 18 Mar 2024 03:12 PM (IST)

    राहुल गांधी यांचे कुणाचे नाव घेतले माहित माही – नाना पटोले

    मुंबई : महायुतीमध्ये अद्याप 5 जागांबाबत चर्चा चालू आहे. सांगलीची जागा आम्हीच लढणार आहोत. कोणतीही जागा आम्ही सोडलेली नाही. त्याची जाहीर वाच्यता कुणलाही करता येणार नाही. अशोक चव्हाण यांनी दिल्लीला जाऊन काय बोलले हे मला माहित नाही. ते खर्गे साहेबांना सुद्धा भेटले होते. तर, राहुल गांधी यांनी कुणाचे नाव घेतले हे त्यांनाच माहित आहे असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

  • 18 Mar 2024 03:07 PM (IST)

    खासदार संजय जाधव यांच्यावर मराठा युवकांचा रोष

    परभणी : ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांना मराठा युवकांच्या रोषाचा सामना करावा लागला. पालम तालुक्यातील भोगाव मारुती येथे खासदार संजय जाधव आले असता मराठा युवकांनी त्यांना विरोध केला. दरम्यान, आपण प्रचारासाठी नाही तर मंदिरात दर्शनासाठी आलो असल्याचे खासदार जाधव यांनी सांगितले.

  • 18 Mar 2024 02:55 PM (IST)

    २२ मार्च रोजी शरद पवार यांचा बारामतीत मेळावा

    राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बरामतीत शेतकरी आणि कष्टकरी यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर शरद पवारांचा हा पहिलाच मेळावा आहे. ज्या मुक्ताई लॉन्समध्ये अजित पवारांची सभा झाली तिथेच शरद पवारांची सभा होणार असून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.

  • 18 Mar 2024 02:53 PM (IST)

    मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची बदली

    मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची बदली. अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांना ही हटवण्याचे निवडणूक आयोगाने आदेश.

  • 18 Mar 2024 02:51 PM (IST)

    6 राज्यांतील गृह सचिवांना हटवण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश

    नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय. 6 राज्यांतील गृह सचिवांना हटवण्याचे आदेश. गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सहा राज्यांमधील गृहसचिवांना हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मिझोराम आणि हिमाचल प्रदेशमधील सामान्य प्रशासकीय विभागाच्या सचिवांनाही हटवण्याचां निर्णय घेण्यात आला आहे.

  • 18 Mar 2024 01:47 PM (IST)

    आता मोदी गॅरंटी नाही,फक्त उध्दव साहेबांची गॅरंटी चालणार – संजय राऊत

    इकडचे खासदार पळाले पण शिवसैनिक जाग्यावर आहेत. इतिहास हा गद्दारांचा नव्हे तर निष्ठावतांचा लिहला जातो. आता मोदी गॅरंटी नाही, फक्त उध्दव साहेबांची गॅरंटी चालणारी असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे.

  • 18 Mar 2024 01:35 PM (IST)

    बीड : जुन्या वादातून पाटोदा तालुक्यात गोळीबार

    पोटादा तालुक्यातील चिखली येथे जुन्या वादातून गोळीबार होऊन दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. बीडच्या शासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

     

  • 18 Mar 2024 01:21 PM (IST)

    मी उभा राहीलो नाही तरी अजित पवार गट निवडून येणार नाही – विजय शिवतारे

    आपण अजित पवार गटा विरोधात जरी उभे राहीलो नाही तरी अजित पवार गट निवडून येणार नाही अशे माजी आमदार विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षावर भेट घेतल्यानंतर सांगितले.

  • 18 Mar 2024 12:58 PM (IST)

    गेल्या अडीच तासापासून रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा सुरू

    कॅबिनेटमंत्री रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्गातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा

  • 18 Mar 2024 12:20 PM (IST)

    नांदेड एअरपोर्टवर उद्धव ठाकरे यांचे आगमन

    संजय राऊत ,विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह परभणी ,नांदेड हिंगोली जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित आहेत.

  • 18 Mar 2024 12:05 PM (IST)

    धुळे लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे राजेन्द्र भोसले यांची पक्षाकडून चाचपणी

    राजेंद्र भोसले यांना पक्ष श्रेष्ठींकडून बोलविण्यात आल्याची माहिती. शरद पवार गटाकडून उमेदवारी निश्चित होणार असल्याची चर्चा. धुळे लोकसभेसाठी मालेगावचा चेहरा उमेदवार म्हणून देण्याची रणनानिती आसल्याची माहिती..

  • 18 Mar 2024 12:01 PM (IST)

    Live Update | पोलीस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक

    नांदेड | पोलीस आणि उध्दव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक… एरअरपोर्ट वरील प्रवेशद्वारातुन प्रवेश करण्याच्या कारणावरून शाब्दिक चकमक… उध्दव ठाकरे यांच काही वेळात नांदेड एअरपोर्ट वरती होणार आगमन

  • 18 Mar 2024 11:43 AM (IST)

    Live Update | गिरीष महाजन यांनी उदयनराजे भोसले यांची जलमंदिर पॅलेस येथे घेतली भेट

    सातारा | गिरीष महाजन यांनी उदयनराजे भोसले यांची जलमंदिर पॅलेस येथे घेतली भेट… ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन अचनक खासदार उदयनराजे भोसले यांच्या भेटीला.. उदयनराजे आणि गिरीष महाजन यांच्यात होत असलेल्या भेटीकडे राज्याचं लक्ष… भेटीत नक्की कशावर होणार चर्चा याबाबत उत्सुकता

  • 18 Mar 2024 11:40 AM (IST)

    Live Update | माजी राज्यसभा सदस्य अमर साबळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या भेटीला

    माजी राज्यसभा सदस्य अमर साबळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या भेटीला… मेघदूत बंगल्यात अमर साबळे दाखल… अमर साबळे यांचे नाव सोलापुरातील लोकसभा मध्ये चर्चेत… लोकसभेच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीस अमर साबळे

  • 18 Mar 2024 11:30 AM (IST)

    Live Update | विश्वजीत कदम, विशाल पाटील, विक्रम सावंत, थोरातांच्या भेटीला

    विश्वजीत कदम, विशाल पाटील, विक्रम सावंत, थोरातांच्या भेटीला गेले आहेत. सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी आग्रह.. मविआत सांगलीची जागा ठाकरे गटाकडे जाणार असल्याची शक्यता…

  • 18 Mar 2024 11:08 AM (IST)

    Live Update | महिला आरक्षणाबाबत मोठी बातमी

    महिला आरक्षणाबाबत केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र… महिला आरक्षण तात्काळ लागू केलं जाऊ शकत नाही…असं सरकारने सांगितलं आहे. जया ठाकूर यांनी दाखल केलेली याचिका घटनाबाह्य, न्यायालयाने याचिका रद्द करावी… कायद्याला अनुसरूनच राजकारणात महिलांना आरक्षण दिलं जाऊ शकतं – केंद्र सरकार

  • 18 Mar 2024 10:56 AM (IST)

    निवडणूक रोखे प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू

    निवडणूक रोखे प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू, न्यायालय इलेक्टोरल बाँड्सशी संबंधित विविध याचिकांवर सुनावणी सुरू ठेवणार.

    सुप्रीम कोर्टाने या वर्षाच्या सुरुवातीला ही योजना असंवैधानिक असल्याचे म्हटले होते.

    SBI ला बाँडद्वारे देणग्यांशी संबंधित डेटा भारतीय निवडणूक आयोगाला अपलोड करण्यासाठी सुपूर्द करण्याचे निर्देश दिले होते.

  • 18 Mar 2024 10:49 AM (IST)

    कोपरखैरणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई, घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक

    कोपरखैरणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई, घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला केली अटक. नवी मुंबईत खैराणे गाव बोनकडे गावात घरफोडी झाली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार तपास करत रिजवान उस्मान खान याला अटक केली.  चोरट्याकडून 17 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

  • 18 Mar 2024 10:30 AM (IST)

    बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत विधिमंडळात काँग्रेसच्या सर्व आमदारांची आज बैठक

    विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत विधिमंडळात काँग्रेसच्या सर्व आमदारांची सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे.  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, हे प्रमुख नेते बैठकीला मार्गदर्शन करणार.

    आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात बैठकीत होणार विचार मंथन. राहुल गांधी यांच्या काल पार पडलेल्या शिवाजी पार्क येथील सभेबाबतही चर्चा होणार .

  • 18 Mar 2024 10:07 AM (IST)

    नगर दक्षिण लोकसभेचा आढावा घेण्यासाठी भाजपची बैठक

    अहमदनगर –  नगर दक्षिण लोकसभेचा आढावा घेण्यासाठी भाजपची थोड्याच वेळात नगर शहरातील माऊली सभागृहात बैठक होणार आहे.

    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यासाठी महत्वपूर्ण बैठक आहे.  भाजप प्रवेश महामंत्री विजय चौधरी, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे,भाजप उमेदवार खा सुजय विखे यांच्यासह आजी- माजी आमदार उपस्थित राहणार.

  • 18 Mar 2024 09:57 AM (IST)

    नड्डा-शाह यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक

    भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत उत्तर प्रदेशसह इतर राज्यांच्या कोअर ग्रुपची आज बैठक होत आहे. उमेदवारांच्या नावांवर चर्चा होणार, मात्र उमेदवारांवर अंतिम शिक्कामोर्तब केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत होणार आहे.

  • 18 Mar 2024 09:45 AM (IST)

    नाशिकच्या जागेसाठी भाजपकडून दबावतंत्र

    नाशिकच्या जागेसाठी भाजपकडून दबावतंत्र सुरूच आहे.  भाजप सातपूर मंडलची आज महत्वाची बैठक पार पडली.  सकाळी 11 वाजता सातपूरमध्ये बैठक झाली.  नाशिकच्या जागेवर भाजपचा दावा सांगण्यासाठी बैठक झाली. महायुतीत ही जागा हेमंत गोडसे यांना जाण्याची शक्यता आहे.  श्रीकांत शिंदे यांनी थेट घोषणाच केल्याने भाजपात नाराजी पाहायला मिळतेय.

  • 18 Mar 2024 09:30 AM (IST)

    पाईप लाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया

    दिवा शहरातील गणेश नगर परिसरात पाईप लाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे.  मध्य रात्री अचानक पाईप फुटल्याने परिसरात झाले पाणीच पाणी झालं. गावकरी आणि अधिकारी वर्गांकडनं पहाटेपासून दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.

  • 18 Mar 2024 09:15 AM (IST)

    भाजपने उत्तम जानकर यांना उमेदवारी द्यावा; कुणी केली मागणी

    भाजपकडून उत्तम जानकर यांना सोलापूर लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली आहे. यशवंत सेना राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतोले यांनी ही मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत सर्व पक्षांनी धनगर समाजाला उमेदवारी न दिल्यास धनगर समाज विरोधात मतदान करणार आहे. सोलापूर मतदारसंघांमध्ये पाच लाख धनगर समाज असून जानकर यांना उमेदवारी न दिल्यास विरोधात मतदान करणार आहोत.  सर्वपक्षीय नेतेमंडळींना सकल धनगर समाजाकडून इशारा देतोय.  राज्यातील अनेक मतदारसंघावर धनगर समाजाचे प्राबल्य आहे. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी संसदेत आवाज उठवण्याची गरज आहे.  सोलापूर, माढा लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचा प्रभाव मोठा आहे. त्यामुळे जानकरांना उमेदवारी द्या, अशी मागणी बाळासाहेब दोडतोले यांनी केली आहे.

  • 18 Mar 2024 08:56 AM (IST)

    Maharashtra News | नाशिकमध्ये आचारसंहिता जाहीर होऊन देखील प्रशासन सुस्त

    आचारसंहिता जाहीर होऊन देखील प्रशासन सुस्त. शहरात अनेक भागात अद्याप फलक कायम. नामफलक आणि एसटी वरील फलक काढण्याचा प्रशासनाला विसर. अमलबजावणी यंत्रणेची विश्रांती. आचारसंहिता लागून 2 दिवस लोटले तरी शहरातील अनेक भागात फलक कायम.

  • 18 Mar 2024 08:50 AM (IST)

    Maharashtra news | अमरावती जिल्ह्यामधील 988 गावांवर जलसंकटाच सावट

    मार्च महिना संपण्यापूर्वीच अमरावती जिल्ह्यामधील 988 गावांवर जलसंकटाचे सावट. अकराशे उपाय योजनांचे नियोजन प्रशासनाचा दावा. पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती. उन्हाचा पारा वाढल्याने विहिरीतील पाण्याची पातळी खालावली. सर्वाधिक पाणीटंचाई मेळघाटमध्ये. मेळघाटातील तीन गावात टॅंकरने पाणीपुरवठा सुरू.

  • 18 Mar 2024 08:37 AM (IST)

    Maharashtra News | दिपाली सय्यद यांनी कोणाच्या ईडीची चौकशीची मागणी केली?

    राजू नेर्लेकरकडून गुंतवणूकधारकांची 1 हजार कोटींची फसवणूक. शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांचा गंभीर आरोप. नेर्लेकरच्या ईडी चौकशीची दिपाली सय्यद यांची मागणी. या फसवणूक प्रकरणी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची भेट घेणार. दिपाली सय्यद यांची पत्रकार परिषदेत माहिती. हुपरीच्या राजू नेर्लेकर याने जादा परताव्याच आमिष दाखवून महाराष्ट्रसह कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमधील गुंतवणूक धारकांची फसवणूक केल्याचा आरोप. फसवणूक झालेल्या गुंतवणूकधारकांनी कोल्हापूरमध्ये दिपाली सय्यद यांची भेट घेऊन मांडली कैफियत.

  • 18 Mar 2024 08:15 AM (IST)

    Maharashtra News | नाशिकच्या जागेसाठी भाजपाकडून दबावतंत्र

    नाशिकच्या जागेसाठी भाजपा कडून दबावतंत्र. भाजप सातपूर मंडलची आज महत्वाची बैठक. सकाळी 11 वाजता सातपूर मध्ये बैठक. नाशिकच्या जागेवर भाजपचा दावा सांगण्यासाठी बैठक. महायुतीत ही जागा हेमंत गोडसे यांना जाण्याची शक्यता. श्रीकांत शिंदे यांनी थेट घोषणाच केल्याने भाजपात नाराजी.

  • 18 Mar 2024 07:56 AM (IST)

    Marathi News | मुंबई महापालिका मत्सालयासाठी खर्च करणार ६० कोटी रुपये

    मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयात पर्यटकांना लवकरच काचेच्या बोगद्यांमधून प्रवेश करत देशी- विदेशी रंगीबेरंगी मासे पाहायला मिळणार आहेत. मुंबई महापालिका राणीच्या बागेत तब्बल साडेपाच हजार चौरस फूट जागेवर सिंगापूर, दुबईच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारणार आहे. यासाठी विविध करांसह सुमारे ६० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे

  • 18 Mar 2024 07:44 AM (IST)

    Marathi News | गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का

    गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात रविवारी मध्यरात्रीनंतर भूकंपाचा ३.३ तीव्रतेचा सौम्य हादरा बसला, असे इन्स्टिट्यूट ऑफ सिस्मॉलॉजिकल रिसर्चने सांगितले. भूकंपाचा केंद्रबिंदू खवदापासून २२ किमी पूर्व-दक्षिण पूर्वेला नोंदवला गेला, असे संस्थेने म्हटले आहे.

  • 18 Mar 2024 07:31 AM (IST)

    भायखळ्याच्या प्राणी संग्रहालयात वर्षभरात ४० प्राण्यांचा मृत्यू

    निवडणूक आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने खबरदारीची पावले उचलली आहेत. राज्य सरकारने एसटी बसवर ‘निर्णय गतिमान, महाराष्ट्र वेगवान’ या जाहिराती लावल्या होत्या. या जाहिरातीसह इतर राजकीय जाहिराती तत्काळ हटवण्याच्या सूचना एसटी महामंडळाने संबंधित विभाग नियंत्रक, आगार व्यवस्थापकांना दिल्या आहेत.

  • 18 Mar 2024 07:20 AM (IST)

    भायखळ्याच्या प्राणी संग्रहालयात वर्षभरात ४० प्राण्यांचा मृत्यू

    मुंबईतील भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयात (राणीची बाग) २०२२-२३ या कालावधीत तब्बल ४० प्राणी पक्षी दगावले असल्याचे वार्षिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने प्रकाशित केलेल्या या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे.