Maharashtra Breaking News in Marathi : भाजप उमेदवार राम सातपुते सोलापुरात शक्तिप्रदर्शन करण्यात येणार

| Updated on: Mar 26, 2024 | 7:09 AM

Maharashtra Breaking News in Marathi : आज 25 मार्च 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News in Marathi : भाजप उमेदवार राम सातपुते सोलापुरात शक्तिप्रदर्शन करण्यात येणार
Follow us on

होळीमुळे कोकणात रात्रीपासूनच शिमगोत्सवाचा फिवर सुरु झाला आहे. फाल्गुन पोर्णिमेच्या मध्यरात्री मिऱ्या येथील ग्रामदेवतेच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा रंगला. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे होळीच्या रंगात राजकीय रंग लगणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपचा तिढा अजूनही सुटला नाही. परंतु महादेव जानकर पुन्हा महायुतीत दाखल झाले आहे. रासपाला महायुती एक जागा देणार आहे. महायुतीचे जागा वाटप दोन-तीन दिवसांत जाहीर होणार आहे. पुणे लोकसभेचे भाजपा-महायुती अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 25 Mar 2024 05:52 PM (IST)

    तुरुंगातून फक्त चोरच टोळी चालवतात : दुष्यंत कुमार गौतम

    भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंत कुमार गौतम म्हणाले की, “मुख्यमंत्री तुरुंगात आहेत आणि त्यांच्या हट्टीपणामुळे त्यांना तेथून मंत्रालय चालवायचे आहे, हे दुर्दैवी आहे. आजपर्यंत असे घडले नाही. तुरुंगातून फक्त चोरच टोळ्या चालवतात.”

  • 25 Mar 2024 05:35 PM (IST)

    महाकाल मंदिरात भस्म आरती दरम्यान आग

    महाकाल मंदिरातील भस्म आरतीचे मुख्य पुजारी संजय गुरु, विकास पुजारी, मनोज पुजारी, अंश पुरोहित, सेवक महेश शर्मा, चिंतामण गेहलोत आदी जखमी झाले आहेत. महाकाल मंदिराच्या गर्भगृहात हा अपघात झाला. सर्वांवर उज्जैनच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


  • 25 Mar 2024 05:25 PM (IST)

    राजस्थानच्या 4 उमेदवारांची घोषणा

    काँग्रेसच्या नव्या यादीत एकूण 5 उमेदवारांची नावे असून त्यापैकी 4 राजस्थानमधील आहेत. राजस्थानच्या अजमेरमधून रामचंद चौधरी, राजसमंद मतदारसंघातून सुदर्शन रावत, भिलवाडामधून दामोदर गुर्जर आणि कोटामधून प्रल्हाद गुंजाळ यांना तिकीट देण्यात आले आहे. तर तामिळनाडूच्या तिरुनेलवेली मतदारसंघातून अधिवक्ता रॉबर्ट ब्रूस यांना तिकीट देण्यात आले आहे.

  • 25 Mar 2024 05:13 PM (IST)

    दहिसर येथील खाणीत दोन जणांचा बुडून मृत्यू

    मनोज रामचंद्र सुर्वे (45) आणि चितामणी वारंग (43) हे दोघे जण दहिसर येथील सौरज पटेल मार्गाजवळील जय महाराष्ट्र खाणीत बुडाले.

  • 25 Mar 2024 05:01 PM (IST)

    राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे आमनेसामने

    सोलापूर भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचे सोलापुरात शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. राम सातपुते थोड्याच वेळात सोलापूर शहरात पोहोचणार आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राम सातपुते सोलापुरात पहिल्यांदाच येत आहे. आमदार राम सातपुते यांची सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौकातून भव्य रॅली निघणार आहे. दरम्यान सोलापुरातून काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री-गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

  • 25 Mar 2024 04:18 PM (IST)

    एकनाथ शिंदेच पक्षप्रमुख राहिले पाहिजेत : शहाजीबापू पाटील

    आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत मनसेच्या रुपात चौथा भिडू जोडला जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मनसेप्रमुख राज ठाकरे यांना शिवसेनेचे सर्वेसर्वा करण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. या चर्चेमुळे शिंदे गट आणि आमदारांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण आहे. आता यावरुन आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पक्षाचे प्रमुख शिंदेच राहिले पाहिजेत. आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही”, असं शहाजीबापू राज ठाकरे यांच्या शिवसेना नेतृत्वााबाबतच्या चर्चेवर म्हणाले.

  • 25 Mar 2024 01:55 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आनंदमठात धुळवड

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आनंदमठात धर्मवीर आनंद दिघे यांच्या फोटोला पुष्पहार घालत रंग लावून अभिवादन केले आणि कार्यकर्त्यांसोबत धुळवड साजरी केली.

  • 25 Mar 2024 01:44 PM (IST)

    बीडचे पार्सल बीडला पाठवा, सोलापूरचे भाजपा उमेदवार राम सातपुते ट्रोल

    सोलापूर लोकसभेचे भाजप उमेदवार राम सातपुते काँग्रेस कार्यकर्त्यांकडून ट्रोल झाले आहेत. बीडचे पार्सल बीडला परत पाठवा अशा आशयाचे स्टेटस आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  • 25 Mar 2024 01:39 PM (IST)

    नगर : पतीने पत्नीसह दोन मुलींना जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना

    एका पतीने पत्नीसह दोन मुलींना जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना ( अहिल्या नगर ) नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे घडली आहे.

  • 25 Mar 2024 12:54 PM (IST)

    शिंदे गटाचे उमेदवार उद्या जाहीर होणार

    खासदार संजय मंडलिक यांची माहिती. कोल्हापूरमधून माझ्याच नावाची घोषणा होईल. आज सकाळी सुधा माझ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं झालं

  • 25 Mar 2024 12:31 PM (IST)

    धाराशिव लोकसभेबाबत येत्या 2 -3 दिवसात निर्णय होईल

    भाजप पक्षाने सुचना दिल्यास मी निश्चितपणे लोकसभा लढविणार. सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांचे मोठे वक्तव्य. परदेशी यांनी बंजारा समाजा सोबत होळी साजरी करताना केले वक्तव्य

  • 25 Mar 2024 12:15 PM (IST)

    संपूर्ण मुंबईत होळीचा जल्लोष

    संपूर्ण मुंबईत होळीचा जल्लोष पाहायला मिळतोय. विविध रंगांची ऊधळण होतेय. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात तरुणाई होळीच्या रंगात न्हाऊन निघाली आहेत.

  • 25 Mar 2024 11:50 AM (IST)

    रंगपंचमीच्या निमित्ताने मुंबईतील जुहू बीचवर पर्यटकांची मोठी गर्दी

    रंगपंचमीच्या निमित्ताने मुंबईतील जुहू बीचवर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. मुंबईतील जुहू बीचवर दूरदूरवरून लोक रंगपंचमी खेळण्यासाठी आले आहेत. मुंबई पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी तैनात आहेत. कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी बीएमसीने बीचवर लाईफगार्ड तैनात केले आहेत.

  • 25 Mar 2024 11:40 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदींना अरविंद केजरीवाल यांची भीती वाटते- संजय राऊत

    “इंडिया आघाडीकडून दिल्लीच्या रामलीला मैदानात निषेध रॅली आयोजित करण्यात येणार आहे. आम्ही सर्वजण त्या रॅलीत सहभागी होणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना अरविंद केजरीवाल यांची भीती वाटते. आता अरविंद केजरीवाल त्यांना अधिक धोकादायक वाटतील, कारण ते आता तुरुंगात काम करत आहेत. त्यामुळे जनता त्यांचं म्हणणे ऐकून घेईल आणि त्यांना पाठिंबा देईल. स्वातंत्र्यलढ्यातही तुरुंगात गेलेले नेते अधिक ताकदीने बाहेर आले”, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधला.

  • 25 Mar 2024 11:30 AM (IST)

    उज्जैनच्या महाकाल मंदिरातील आगीप्रकरणी दंडाधिकारी चौकशीचे आदेश

    उज्जैनच्या महाकाल मंदिरातील आगीप्रकरणी दंडाधिकारी चौकशीचे आदेश देण्यात आलं असल्याची माहिती कलेक्टर नीरज कुमार सिंह यांनी दिली. याप्रकरणी समिती स्थापित करण्यात आली असून पुढील तीन दिवसांत त्यांना चौकशीचा अहवाल सादर करावा लागेल.

  • 25 Mar 2024 11:20 AM (IST)

    बुलढाणा- लहान मुलांच्या वादाने दोन गटात तुफान हाणामारी

    बुलढाणा- मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी इथं होळीच्या दिवशी सायंकाळी लहान मुलांच्या वादाने दोन गटात तुफान हाणामारी झाली होती. या हाणामारीत 15 जण जखमी झाले होते. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर डोनगाव पोलिसांत 38 लोकांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. आतापर्यंत दोन्ही गटातील 10 जणांना पोलिसांनी अटक केली असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.

  • 25 Mar 2024 11:10 AM (IST)

    बुलढाणा- अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

    बुलढाणा- अखेर बिबट्याला वनविभागाने जेरबंद केलंय. दोन दिवसांपासून मलकापूर तालुक्यातील वाकोडी गावाच्या शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. बिबट्याच्या वावरामुळे शेतात जायलाही शेतकरी आणि मजूर घाबरत होते. अखेर आज वनविभागाने बिबट्याला जेरबंद केलं.

  • 25 Mar 2024 10:50 AM (IST)

    Live Update | नाशिकच्या जागेसाठी भाजप नेते अन्नत्याग आंदोलन करतील

    नाशिकच्या जागेसाठी भाजप नेते अन्नत्याग आंदोलन करतील… भाजप नेते दिनकर पाटील यांचा इशारा… दबाव टाकून हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळणार नाही… गोडसे भाजप मुळे खासदार झाले… मात्र मोदी – शहा – फडणवीस यांचा फोटो देखील लावत नाहीत… गोडसे यांच्या बद्दल राष्ट्रवादीत देखील नाराजी

  • 25 Mar 2024 10:21 AM (IST)

    Live Update | अरविंद केजरीवाल आजा जास्त मजबूत झाले आहेत – संजय राऊत

    अरविंद केजरीवाल आजा जास्त मजबूत झाले आहेत… लोकं केजरीवालांच्या पाठिशी उभे राहतील… जेलमध्ये गेलेले नेते मजबूत होतात… असं वक्तव्य संजय राऊत यांनी कलं आहे.

     

  • 25 Mar 2024 10:13 AM (IST)

    Live Update | सोलापूर काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी ट्वीटद्वारे केले भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचे स्वागत

    प्रणिती शिंदे यांच्या पत्राद्वारे स्थानिक विरुद्ध उपरा असा संघर्ष पाहायला मिळणार…. राम सातपुतेजी, आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणुक रिंगणात स्वागत आहे… “सोलापूर शहर आणि जिल्हा हा नेहमीच आपली मतं मांडण्याची मुभा मिळते. मग तो इथला असो की बाहेरचा” लोकांचे प्रश्न, समस्या मतदारसंघाचा विकास हे मुद्दे निवडणुकीच्या केंद्रस्थानी असावेत… पुढील 40 दिवस आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू आणि समाजात फूट न पाडता समाजाचा विकास होण्यासाठी लढाई लढू अशी मी आशा करते.

     

  • 25 Mar 2024 09:57 AM (IST)

    पुण्यात होळी आणि रंग मोहोत्सवाचं आयोजन

    पुण्यात भोई प्रतिष्ठानच्या वतीने अनोख्या होळी आणि रंग मोहोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यात भोई प्रतिष्ठानच्या वतीने रंग बरसे या होळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे.  पुण्यात 1000 विशेष लहान मुलांसोबत सार्वजनिक धुळवड साजरी करण्यात येणार आहे. भोई प्रतिष्ठानच्या या होळीचा यंदाचं 28 वं वर्ष आहे.  शहरातील अनेक संस्थेमधील 1000 विशेष बालक रंग मोहोत्स कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.

  • 25 Mar 2024 09:45 AM (IST)

    बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या पक्षाला वाढता विरोध

    बारामती लोकसभा मतदारसंघात संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवारांना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा ही विरोध पाहायला मिळतोय.  खडकवासला विधानसभा मतदार संघातील शिवसेनेला विचारात घेत असल्याने नाराजी पाहायला मिळतेय. बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रचार करायचा नसून पुणे लोकसभेतील मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार करूया, असा मेसेज शिवसेना पदाधिकाऱ्याने शिवसैनिकांना दिला आहे. सेनेच्या एका पदाधिकाऱ्याने व्हॉट्सअप ग्रुपवरील तो msg व्हायरल झाला आहे.

     

  • 25 Mar 2024 09:30 AM (IST)

    ‘त्या’ जागेवरून भाजपचा शिंदे गटाला इशारा

    नाशिकच्या जागेसाठी भाजप नेते अन्नत्याग आंदोलन करतील, असा इशारा भाजप नेते दिनकर पाटील यांनी दिला आहे.  दबाव टाकून हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळणार नाही.  गोडसे भाजपमुळे खासदार झाले. मात्र मोदी – शहा – फडणवीस यांचा फोटो देखील लावत नाहीत.  गोडसे यांच्याबद्दल राष्ट्रवादीत देखील नाराजी आहे, असं पाटील म्हणाले.

  • 25 Mar 2024 09:16 AM (IST)

    पार्टीचा ‘तो’ व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल

    वसई ते मीरा भाईंदर रो रो सेवा देणाऱ्या बोटीत तरुणांची दारू आणि बियरच्या पार्टीचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  रो रो सेवा देणाऱ्या आरोही नावाच्या बोटीत टेबल खुर्च्या टाकून, गाण्याच्या तालावर काही तरुण दारूची पार्टी करताना दिसत आहेत. नागरिकांच्या सेवे साठी मीरा-भाईंदर, वसई विरार शहर कमी वेळात जोडण्यासाठी समुद्रात सुरू केलेल्या रो रो सेवेत दारूच्या पार्टीचा व्हीडीओ समोर आल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

  • 25 Mar 2024 08:57 AM (IST)

    शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांच्यावर गुन्हा दाखल

    शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांच्यावर गुन्हा दाखल.  शिवसेना संपर्क कार्यालयाच्या गेटसमोर वाहन लावल्याच्या कारणावरून हॉटेल मॅनेजर आणि कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मात्र मनीष काळजे यांनी हे आरोप फेटाळून लावलेत.

  • 25 Mar 2024 08:37 AM (IST)

    मनसे नेत्याच्या नावे बोगस फेसबुक अकाऊंट उघडून नागरीकांची फसवणूक, गुन्हा दाखल

    बोगस फेसबुक अकाऊंटद्वारे नागरीकांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चारकोप विधानसभेचे विभाग अध्यक्ष दिनेश अनंत साळवी यांच्या नावाने अज्ञात सायबर ठगाने बोगस अकाऊंट उघडून केली फसवणूक.

    आरोपी हा सीआरपीएफचा कर्मचारी असल्याची बतावणी करून फर्निचरसह इतर घरगुती सामानाची विक्रीच्या बहाण्याने फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  साळवी यांच्या तक्रारीवरून चारकोप पोलिसांनी आशीषकुमार या अज्ञात सायबर ठगाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे

     

  • 25 Mar 2024 08:27 AM (IST)

    नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या पत्नीची कार चोरीला

    नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या पत्नीची कार चोरीला गेली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसात FIR दाखल करण्यात आली आहे. सर्व्हिस सेंटर मधून पांढऱ्या रंगाची fortuner गाडी चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे.

  • 25 Mar 2024 08:13 AM (IST)

    मुंबईत होळीला उत्साहात सुरूवात, जुहू बीचवर रंगात रंगले नागरिक

    मुंबईत होळीनंतर रंगाच्या सणाला मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे. जुहू बीचवर मुंबईकर होळीच्या रंगात  रंगून गाताना, नाचताना दिसत आहेत. एकमेकांना गुलाल लावून होळीच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत.

     

  • 25 Mar 2024 08:06 AM (IST)

    महाविकास आघाडी मधील काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेमध्ये चाललेल्या राजकारणाची गोपीचंद पडळकरांकडून खिल्ली

    लोकसभेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेमध्ये चाललेल्या राजकारणावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी खिल्ली उडवली आहे. आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये आत एक बाहेर एक असे काही नसतं. त्यामुळे भाजपचे उमेदवार खासदार संजय काकांच्या बरोबर आम्ही सगळे जोरात कामाला लागलो आहोत.

    मात्र अजून देखील भाजपचे उमेदवार संजयकाकाच्या विरोधात नेमका कोण पैलवान आहे हे निश्चित होईना, त्यामुळे अजून सगळे लोक संभ्रमात आहेत असे म्हणत सांगली लोकसभेच्या जागेवरुन मविआ मध्ये चाललेल्या राजकारणाची आमदार गोपीचंद पडळकर यांनी टोला लगावला.

  • 25 Mar 2024 07:58 AM (IST)

    महाराष्ट्राचे भवन काश्मीरमध्ये होणार

    काश्मीरमध्ये देशभरातून पर्यटक पर्यटनासाठी येतात. यात महाराष्ट्रातील पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला आव्हान देताना काश्मीरचे नेते उमर अब्दुल्ला यांनी विरोध केला आहे. महाराष्ट्र भवन कसे होते ते पाहतो असे म्हटले आहे.

  • 25 Mar 2024 07:51 AM (IST)

    Marathi News | 31 लाख रुपयांचा गुटखा जप्त

    पुणे ग्रामीण पोलिसांनी बारामती तालुक्यात ‘सुपा’ येथे सर्वात मोठी कारवाई केल्याचे समोर आले. एका सराईत गुटखा तस्कराकडून तब्बल 31 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल छापा टाकून ताब्यात घेतला. याबाबत सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड यांनी माध्यम प्रतिनिधींना ही माहिती दिली.

  • 25 Mar 2024 07:40 AM (IST)

    Marathi News | अमरावतीमध्ये पाच अपघातात १० मृत्यू

    होळीच्या दिवशी अमरावती जिल्ह्यात दोन मोठे अपघात झाले. तसेच पाच वेगवेगळ्या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला. मेळघाटात दुचाकीवरून जाणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू- कारची दुचाकीला धडक दारसिंबे कुटुंब ठार झाले. मेळघाट मधील घंटाग सेमाडोह रस्त्यावर एसटी बस दरीत कोसळली.

  • 25 Mar 2024 07:25 AM (IST)

    Marathi News | मुरलीधर मोहळ यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

    पुणे लोकसभेचे भाजपा-महायुती अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहोळ यांची ही पहिलीच भेट होती.