Maharashtra Breaking News in Marathi : वर्षावर महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला?

| Updated on: Mar 25, 2024 | 7:21 AM

Maharashtra Breaking News in Marathi : आज 24 मार्च 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News in Marathi : वर्षावर महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला?
Follow us on

महायुतीच्या जागा वाटपासाठी नवी दिल्लीत बैठक झाली. बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रफुल पटेल, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. बैठकीत काय निर्णय झाला हे अद्याप समोर आले नाही. महाविकास आघाडीत काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केले आहे. परंतु चंद्रपूरचा उमेदवार अद्याप जाहीर केला नाही. परभणीत भाजपकडून लोकसभा उमेदवारीसाठी जोरदार दावा केला जात आहे. मुंबईत लोकल सेवेचा आज आणि उद्या मेगा ब्लॉग घेण्यात येणार आहे. या दरम्यान देखभाल, दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे. कल्याण, डोंबिवली महापालिकेने अनधिकृत इमारतीवर कारवाई केली आहे. कल्याण पूर्व अडवली ढोकली परिसरात आरक्षित शाळेच्या भूखंडवर चार मजली इमारत आहे. या ठिकाणी हातोडा चालवण्यात आला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळाला नाही. त्यांच्या जामीन याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्याची मागणी दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 24 Mar 2024 06:21 PM (IST)

    ‘देशात अभद्र हुकूमशाही’, अमोल कोल्हे यांची टीका

    पुणे : “देशात अभद्र हुकूमशाही आहे. भ्रष्ट्राचार वाढत चालला आहे. राजकीय बेडूक उड्या वाढल्या आहेत. त्याला तिलांजली द्यायची आहे. मग रंगपंचमी खेळायची आहे. गद्दारीचं पीक महाराष्ट्रमध्ये वाढू लागलं आहे”, अशी टीका अमोल कोल्हे यांनी केली आहे.

  • 24 Mar 2024 05:37 PM (IST)

    थोड्याच वेळात महायुतीची पत्रकार परिषद

    या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. महायुतीच्या गोटातून ही बातमी आली आह. महायुतीची थोड्या वेळात पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अनेक दिवसांपासून कायम होता. या जागावाटपाबाबत वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद होणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युल ठरल्याचंही म्हटलं जात आहे.


  • 24 Mar 2024 05:33 PM (IST)

    पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्या घरी, बहीण-भाऊ एकत्र

    लोकसभेचं तिकीट जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्या भेटीला गेल्या आहेत.या निमित्ताने बहीण-भाऊ एकत्र आले आहेत. पंकजा मुंडे यांनी आजपासून लोकसभा निवडणुकीनिमित्ताने प्रचाराला सुरुवात केली. तेव्हा पंकजा मुंडे आपल्या भावाच्या घरी गेल्या. या निमित्ताने बहीण भावातील राजकीय दुरावा कमी झाल्याचं म्हटलं जात आहे.

  • 24 Mar 2024 05:18 PM (IST)

    दिवा विझण्यापूर्वी फडफडतोय, मिटकरींची शिवतारेंवर टीका

    अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी विजय शिवतारे यांच्यावक टीका केली आहे. विजय शिवतारे बालिश विधान करतात. तसेच दिवा विझण्यापुर्वी फडफडतोय असं म्हणत मिटकरींनी शिवतारेंवर निशाणा साधलाय.

  • 24 Mar 2024 03:45 PM (IST)

    ठाणे – शिवसैनिकांनी काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे पोस्टर जाळले

    महाराष्ट्र भवन उभारण्यास नकार देणाऱ्या काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे पोस्टर शिवसैनिकांनी जाळले.

  • 24 Mar 2024 03:25 PM (IST)

    मी पक्षावर नाराज नाही, पक्षासाठी काम करीत आहेत – गोपाळ शेट्टी

    उत्तर मुंबईतील भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांचे तिकीट रद्द झाल्यानंतर गोपाल शेट्टी पहिल्यांदाच टीव्ही 9 मराठी बोलताना आपण नाराज नसून पक्षांसाठी काम करीत राहणार असल्याचे म्हटले आहे.

  • 24 Mar 2024 03:03 PM (IST)

    बुलढाणा – सैलानी येथील नारळाच्या आगळीवेगळ्या होळी उत्सवाला सुरुवात

    सैलानी बाबा यात्रा महोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. येथील नारळाची होळी प्रसिद्ध असून शेकडो वर्षांची परंपरा कायम आहे.

     

  • 24 Mar 2024 01:56 PM (IST)

    रवी राणा यांनी केले मोठे आवाहन

    आमदार रवी राणा यांच्याकडून मेळघाटमध्ये नवनीत राणा यांच्यासाठी भाजपच्या “कमळ” चिन्हाचा प्रचार. सबको बोलना कमल चिन्ह है कमल. आदिवासी बांधवांशी संवाद साधताना कमळाला मतदान करण्याचे रवी राणांचे आवाहन. सध्या राणादाम्पत्य होळी निमित्ताने मेळघाटच्या दौऱ्यावर.

  • 24 Mar 2024 01:38 PM (IST)

    जागा वाटपासंदर्भातील दिल्लीतील महायुतीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहीती

    चार जागांवर भाजप आणि शिवसेनेत अद्याप एकमत नाही. राष्ट्रवादी कांग्रेसही ७ जागांची मागणी करत असल्याची माहीती. नाशिकची जागा लढवण्यासाठी छगन भूजबळ आग्रही. प्रमुख नेते आज पुन्हा जागेचा तीढा सोडवण्यासाठी एकत्र येणार नसल्याची माहिती

  • 24 Mar 2024 01:21 PM (IST)

    विजय शिवतारे यांनी केले मोठे विधान

    आज संपूर्ण 6 विधानसभा मतदार संघातील सर्वांना बोलावलं होत. सर्व प्रमुख नेत्यांची बैठक आज पार पडली. बैठकीत उत्साह होता. मी 2008 साली पुरंदरला आलो. आधी मुंबईत होतो,सर्व तरुणांनी माझी निवडणूक हातात घेतली होती. मोठे मोठे राजकीय पुढारी सांगत होते की मी काय करणार पण मी आमदार झालो 25 हजार मतांनी मी जिंकलो, असे विजय शिवतारे यांनी म्हटले.

  • 24 Mar 2024 01:03 PM (IST)

    रावेर लोकसभा मतदारसंघाची 27 आणि 28 ला मुंबईत बैठक

    एकनाथ खडसे बैठकीला उपस्थित असणार आहेत. स्वतः शरद पवार अंतिम नावावर शिक्कामोर्तब करणार. आजच्या बैठकीत प्राथमिक चर्चा. खडसे यांच्या घरातील उमेदवार नसणार असल्याचे सांगितले जातंय.

     

  • 24 Mar 2024 12:50 PM (IST)

    नागपूरची जागा काँग्रेस पुन्हा मिळवेल- वडेट्टीवार

    नागपूरची जागा काँग्रेस पुन्हा मिळवेल. नितीन गडकरींच्या विरोधात आम्ही तगडा पैलवान दिला आहे. तर चंद्रपूरची जागा जिंकण्यासाठी हायकमांड सावध पावलं टाकत आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

     

  • 24 Mar 2024 12:40 PM (IST)

    उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी होळी साजरी करताना धरला ठेका

    उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी देहराडूनमधील त्यांच्या निवासस्थानी होळी साजरी केली. यावेळी त्यांनी इतर लोकांसोबत ठेका धरला.

  • 24 Mar 2024 12:30 PM (IST)

    मोनोरेल मार्गिकेवर मेगाब्लॉक

    चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेवर आज (रविवार) आणि उद्या (सोमवारी) दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामासाठी मोनोरेल मार्गिकेवर मेगाब्लॉक असेल. रविवारी वडाळा डेपो स्थानक ते चेंबूर स्थानकादरम्यानची सेवा सकाळपासून बंद राहील. रात्री 8 नंतर 1 तासाच्या अंतराने मोनोच्या फेऱ्या सुरू होतील. संत गाडगे महाराज चौक ते वडाळा आगार या स्थानकांदरम्यानची सेवा मात्र सुरळीत राहणार आहेत.

  • 24 Mar 2024 12:20 PM (IST)

    कांदा निर्यातबंदी कायम

    देशांतर्गत कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी डिसेंबरमध्ये लागू केलेली निर्यातबंदी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 31 मार्चनंतरही अनिश्चित काळासाठी कायम ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. उन्हाळी कांद्याची आवक सुरू झाल्यामुळे 31 मार्चनंतर निर्यात खुली होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. ती फोल ठरल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

  • 24 Mar 2024 12:10 PM (IST)

    विजय शिवतारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांची भेट

    विजय शिवतारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी भेट घेतली. दत्तात्रय भरणे यांनी भेट घेऊन विजय शिवतरे यांना माघार घेण्यासाठी विनंती केली आहे. महायुतीचा धर्म आपण पाळला पाहिजे अशी विनंती विजय शिवतारे यांच्याकडे केली आहे.

  • 24 Mar 2024 12:00 PM (IST)

    मी न्यायपालिकेला अलविदा म्हटले नाही

    मी न्यायपालिकेला अलविदा म्हटले नाही, मी केवळ जागा बदलवली, पण मला गैरवर्तन आणि भयंकर ट्रोलिंगचा सामना करावा लागला, अशा भावना देशाचे सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांनी व्यक्त केल्या.

  • 24 Mar 2024 11:53 AM (IST)

    सोने स्वस्त, चांदी झाली महाग

    गेल्या दोन आठवड्यापासून सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागला होता. पण गुरुवारी 21 मार्च रोजी सोने आणि चांदीने अचानक मोठी उसळी घेतली. या आठवड्यात सोने 1500 रुपयांनी वधारले तर चांदीने या आठवड्यात 2800 रुपयांची भरारी घेतली.

  • 24 Mar 2024 11:45 AM (IST)

    माझ्या जीवावर राजकारणात यायचं नाही -नितीन गडकरी

    गेल्या 10 वर्षांत नागपूरात 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणली आहे. ही फक्त रील आहे खरा सिनेमा अजून बाकी आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. मला माझ्या मुलाला राजकारणात आणण्याची चिंता नाही. मी मुलांना सांगितलंय, माझ्या जीवावर राजकारणात यायच नाही.

  • 24 Mar 2024 11:32 AM (IST)

    ओमराजे निंबाळकर पुणे दौऱ्यावर

    धाराशिव येथील गावं भेट व नियोजन बैठका नंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांचा पुणे येथे प्रचार करत आहेत. पुणे येथील स्थायिक मतदारांना भेटण्यासाठी ओमराजे व कैलास पाटील यांचा पुणे प्रचार दौरा सुरुवात झाली. धाराशिव जिल्ह्यातून पुणे येथे नौकरी व शिक्षणासाठी आलेल्या मतदारांशी संवाद साधण्यासाठी गाठीभेटी घेणार आहेत.

  • 24 Mar 2024 11:22 AM (IST)

    रावेर लोकसभेचा तिढा सोडविण्यासाठी घेणार भेट

    राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने रावेर लोकसभेच्या जागेबाबत तिढा सोडण्याची मागणी शरद पवार यांच्याकडे करण्यात येणार आहे. त्यासाठी पवार यांची पुण्यात पदाधिकारी भेट घेतील. जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांना उमेदवारी मिळण्यासाठी एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे लोकसभा क्षेत्रातील काही पदाधिकाऱ्यांसह पुण्यात दाखल होणार आहेत.

  • 24 Mar 2024 11:10 AM (IST)

    चंद्रशेखर बावनकुळे यांचा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल

    मोदींच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नसल्यानं संविधान बदलाच्या अफवा पसरविण्यात येत आहे. जनतेनं शरद पवारांच्या भुलथापांना बळी पडू नये असा हल्लाबोल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. भाजपने नेहमीच घटनात्मक मूल्य आणि राष्ट्रहितासाठी काम केलं.
    भारताचे संविधान बदलणे हे कुणाच्या बापालाही शक्य नाही असे बावनकुळे म्हणाले.

  • 24 Mar 2024 11:03 AM (IST)

    राजकीय संभावरील खर्चानवर इंदुरीकर महाराजांची टीका

    कीर्तनकारांनी ५ हजार रुपये जादा घेतले तर धंदा मांडला अशी टीका होते, असे इंदुरीकर महाराज म्हणाले. मात्र राजकीय सभांना ५ कोटींचा खर्च केला जातो.त्याचे काय? असा रोकडा सवाल त्यांनी केला.

  • 24 Mar 2024 10:55 AM (IST)

    Maharashtra News | ‘मी समाजाचा मालक नाही’

    “मी समाजाचा मालक नाही, समाज माझा मालक आहे. माझी जेलमध्ये जाण्याची तयारी आहे. गृहमंत्री स्वतः माझ्यावर गुन्हे दाखल करून तडीपार करण्याबाबत स्पष्टीकरण दिल्यामुळे मी त्यावर बोलणार नाही. पण अजूनही वेळ गेलेली नाही. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. आमची वेळ आली की, त्यांचे डोके दुखते” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

  • 24 Mar 2024 10:51 AM (IST)

    Maharashtra News | नितेश कराळे गुरुजींची शरद पवारांसोबत भेट

    नितेश कराळे गुरुजींची शरद पवारांसोबत 7 वी भेट झाली. शरद पवारांनी काम सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या. 26 किंवा 27 तारखेला अंतिम निर्णय होईल. अमर काळे तयारी लागले आहेत. त्यांच्या उमेदवारीबाबत अंतिम निर्णय नाही. आधी पक्ष प्रवेश करणार आणि नंतर उमेदवारी मागणार. मी एकनिष्ठ राहणार असा शब्द दिला आहे.

  • 24 Mar 2024 10:19 AM (IST)

    Maharashtra News | इंदुरीकर महाराजांची राजकीय सभांवर जोरदार टीका

    किर्तनकारांनी 5 हजार रुपये जादा घेतले तर धंदा मांडला अशी टीका होते.मात्र राजकीय सभांना 5 कोटींचा खर्च केला जातो.त्याचे काय ?. किर्तनकारांच्या कार्यक्रमाला लोक येतात. सभेला आणली जातात.त्यांना पाण्याच्या बाटल्या- समोसे दिले जातात. सभेच्या खर्चावर कोण विचारायला गेला तर त्याचे काय खरं नाही, अशी देखील मिश्कील टिप्पणी इंदुरीकर महाराजांनी राजकीय नेते मंडळीच्या सभांवर केली.

  • 24 Mar 2024 10:18 AM (IST)

    Maharashtra News | शहाजी बापूंच्या पुतण्याचा शरद पवार गटात होणार प्रवेश

    पुढील आठवड्यात संग्राम पाटलांचा सांगोल्यात पक्ष प्रवेश. शरद पवार राहणार उपस्थित. शहाजी बापूंना शरद पवारांकडे यावं लागेल. जसं ते गुवाहाटीला गेले तस त्यांनी इकडे यावं. त्यानी शरद पवार यांच्या गटात यावं. पुतण्याचं शहाजी बापूना आवाहन. आम्हाला रणजित निंबाळकर यांचा पराभव करायचा आहे.

  • 24 Mar 2024 09:58 AM (IST)

    Live Update | राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना पितृषोक

    राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना पितृषोक… राजेश क्षीरसागर यांचे वडील विनायक क्षीरसागर यांचा उपचारादरम्यान मृत्यू… गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात सुरू होते उपचार

     

  • 24 Mar 2024 09:45 AM (IST)

    Live Update | मनोज जरांगे पाटील यांची आज अंतरवली सराटीत बैठक

    मनोज जरांगे पाटील यांची आज अंतरवली सराटीत बैठक… बैठकीसाठी समाजबांधवांची मोठी गर्दी… आज सकाळी 11 वाजता सुरू होणार बैठक… बैठकीत राजकीय निर्णय होणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष…

  • 24 Mar 2024 09:35 AM (IST)

    Live Update | नितेश कराळे (गुरुजी) आज पुन्हा एकदा शरद पवार यांच्या भेटीला

    नितेश कराळे (गुरुजी) आज पुन्हा एकदा शरद पवार यांच्या भेटीला… मागील आठवड्यात घेतली होती कराळे गुरुजी यांनी शरद पवार यांची भेट… वर्धा लोकसभा जागेसाठी कराळे गुरुजी इच्छुक आहेत… शरद पवार यांनी जर आदेश दिला तर ही निवडणूक लढवणार अशी प्रतिक्रिया कराळे गुरुजी यांनी मागच्या आठवड्यात दिली होती

  • 24 Mar 2024 09:20 AM (IST)

    Live Update | बुलढाणा लोकसभा मतदार संघातील अद्याप कोणाचीही उमेदवारी निश्चित नाही ..

    महाविकास आघाडी आणि महायुती कडून उमेदवारची घोषणा नाही.. मतदारांत अद्याप संभ्रम कायम… मात्र अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांचं प्रचार सुरू… महायुतीचे संभाव्य उमेदवार प्रतापराव जाधव ही करत आहेत प्रचार… 28 मार्च पासून होणार अर्ज भरण्यास सुरुवात ..

  • 24 Mar 2024 09:09 AM (IST)

    Live Update | सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली

    अजित पवार गटाच्या नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्याचा सोहळा संपन्न… सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 146 पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली… अजितदादा गटाचे जिल्हा समन्वयक आणि आमदार यशवंत माने यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले…

     

  • 24 Mar 2024 08:57 AM (IST)

    सीईटी सेलने परीक्षांच्या वेळापत्रकात बदल

    लोकसभा निवडणुकीमुळे सीईटी सेलने परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला आहे.  १५ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान विविध विभागाच्या परीक्षा होणार होत्या.  आता बदल करत २ मे ते २९ मे च्या दरम्यान होणार आहेत. नवीन सुधारित वेळापत्रक सीईटी सेलने संकेतस्थळावर उपलब्ध केल आहे. पीसीबी गटाची परीक्षा ही २२ ते ३० एप्रिल दरम्यान पार पडणार आहे.

  • 24 Mar 2024 08:45 AM (IST)

    अजित पवार गटाची जम्बो कार्यकारणी जाहीर

    सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली. अजित पवार गटाच्या नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्याचा सोहळा संपन्न झाला. सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 146 पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली. अजितदादा गटाचे जिल्हा समन्वयक आणि आमदार यशवंत माने यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

  • 24 Mar 2024 08:30 AM (IST)

    बुलढाण्यात कोण असणार निवणुकीच्या रिंगणात?

    बुलढाणा लोकसभा मतदार संघातील अद्याप कोणाचीही उमेदवारी निश्चित नाही. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उमेदवारांची घोषणा नाही.  त्यामुळे मतदारांमध्ये अद्याप संभ्रम कायम आहे.  मात्र अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांचं प्रचार सुरू केला आहे. महायुतीचे संभाव्य उमेदवार प्रतापराव जाधव प्रचार ही करत आहेत.  तर महायुती कडे तुल्यबळ उमेदवार नसल्याने उद्धव ठाकरे कडून उमेदवारांची घोषणा नाही. 28 मार्चपासून होणार अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.

  • 24 Mar 2024 08:15 AM (IST)

    …तरच भाजपकडून नवनीत राणांना उमेदवारी

    सुप्रिम कोर्टातील जात प्रमाणपत्राच्या निकालावरच राहणार खासदार नवनीत राणांच्या उमेदवारीचे भवितव्य अवलंबून आहे.  येत्या 27 मार्चला खासदार नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल लागण्याची शक्यता-सूत्रांची माहिती आहे. जात प्रमाणपत्राचा निकाल खासदार नवनीत रानांच्या बाजूने लागल्यास भाजपकडून अमरावती लोकसभेची उमेदवारी दिली जाणार आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांनी ही अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे.

  • 24 Mar 2024 07:53 AM (IST)

    आकाशवाणीचे पुणे केंद्र प्रसारण पुन्हा सुरू होणार

    दोन वर्षापासून बंद असलेले आकाशवाणीचे पुणे केंद्र पुन्हा सुरु होणार आहे. ७ एप्रिलपासून पुणे आकाशवाणीवरुन बातम्यांचे पुन्हा प्रसारण होणार आहे. प्रसार भारतीच्या निर्णयामुळे हे केंद्र बंद करण्यात आलं होते. मात्र पुन्हा सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे.

  • 24 Mar 2024 07:44 AM (IST)

    विजय शिवतारे यांनी आज बोलावली बैठक

    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय शिवतारे आज मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर शिवतारे आज पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे.

  • 24 Mar 2024 07:30 AM (IST)

    कोकणात होळीसाठी २५० बसेस

    कोकणवासीय कोकणाकडे निघाला आहे. होळीनिमित्त कोकणवासीयाची मोठी गर्दी कुर्ला डेपोत आपल्याला पाहायला मिळत आहे. खाजगी बच्चे दर प्रचंड असल्याने एसटी महामंडळाकडून होळीनिमित्त अडीचशे जादा बसेसची सुविधा देखील करण्यात आलेली आहे. गणेशोत्सवाबरोबर होळी देखील कोकणात महत्त्वाचा सण मानला जातो. यासाठी कोकणवासीय सध्या कोकणाकडे जातात ना पाहायला मिळत आहे.

  • 24 Mar 2024 07:16 AM (IST)

    नाशिकमध्ये दुष्काळामुळे चारा टंचाई

    नाशिक जिल्हयात यंदा भीषण दुष्काळाची दाहकता पहावयास मिळत आहे. जनावरांसाठी चारा आणि पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. देवळा तालुक्यातील खामखेडा येथील प्रगतशिल शेतकरी निंबा पवार यांनी आपल्याकडील उपलब्ध असलेले पाणी रोज सकाळ संध्याकाळ परिसरात राहणाऱ्या परप्रांतीय काठेवाडी यांच्या ३०० जनावरांना उपलब्ध करुन देत आहे.