Maharashtra Breaking News in Marathi : वाशिंगमशीनमध्ये तब्बल अडीच कोटींची रोकड, ईडीची मोठी कारवाई

| Updated on: Mar 27, 2024 | 7:02 AM

Maharashtra Breaking News in Marathi : आज 26 मार्च 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News in Marathi : वाशिंगमशीनमध्ये तब्बल अडीच कोटींची रोकड, ईडीची मोठी कारवाई
Follow us on

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून अद्यापही उमेदवार निश्चित झाला नाही, दररोज नवीन नवीन चर्चा पाहायला मिळते, कधी अजित पवार गट, कधी भाजप तर कधी रासप अशा केवळ चर्चा सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागावाटप अजूनही रखडले आहे. शिवसेना उबाठाच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अजित पवार गटाच्या आमदारांची आज पुण्यात बैठक होत आहे. शिवाजी आढळराव पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे.  कल्याण लोकसभेत शिंदे पुत्राविरुद्ध ठाकरे गटाला उमेदवार आयातीची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीबाबत आज मराठा समाजाची महत्वाची बैठक आयोजित केली आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 26 Mar 2024 09:38 PM (IST)

    ईडीला वाशिंग मशिनमध्ये सापडले तब्बल अडीच कोटी रुपये

    ईडीकडून मुंबईसह, दिल्ली हैदराबाद परिसरात छापेमारी करण्यात आली आहे. एका खाजगी शिपिंग कंपनीशी सबंधित ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. या छापेमारीदरम्यान वाशिंग मशिनमध्ये लपवलेली अडीच कोटी रुपयांची रोकड सापडली आहे. ईडीने अडीच कोटींची रोकड जप्त केली आहे. कॅप्रिकोरनियन या शिपिंग कंपनीसह अन्य सहकारी कंपन्यांवर ईडीने छापे टाकले. फेमा कायद्याच उल्लंघन करुन जवळपास १८०० कोटींची अफरातफर केल्याचा आरोप या प्रकरणी आहे..

  • 26 Mar 2024 08:25 PM (IST)

    अकोल्यात 2.9 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के

    अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. अकोला जिल्ह्यात 2.9 रिश्टर स्केल भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी 6 वाजून 18 मिनिटांनी भूकंपाचे धक्का जाणावले आहेत. बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर येथे भूकंपाचे केंद्र असल्याची माहिती मिळत आहे. तर शेगांव तालुक्यातीलही काही गावांना धक्का जाणवल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विशेष म्हणजे नागपूर जिल्ह्यातही दुपारी दोन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले होते.


  • 26 Mar 2024 05:52 PM (IST)

    मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर उद्या हायकोर्टात सुनावणी

    दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात अटक करण्यात आलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी होणार आहे. केजरीवाल 28 मार्चपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत आहेत.

  • 26 Mar 2024 05:37 PM (IST)

    कंगना यांच्याविरोधातील वक्तव्याबाबत भाजपा नेत्यांनी घेतली निवडणूक आयोगाची भेट

    मंडीतील भाजप उमेदवार कंगना राणौत यांच्याविरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली. निवडणूक आयोगाची भेट घेतल्यानंतर भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले की, आमच्या शिष्टमंडळाने आज निवडणूक आयोगाची भेट घेतली. आम्ही वेगवेगळ्या राज्यांतील निवडणूक अधिकाऱ्यांच्या विविध प्रतिसादांची नोंद घेतली. याकडे लक्ष देणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले.

  • 26 Mar 2024 05:25 PM (IST)

    खैबर पख्तुनख्वामध्ये आत्मघातकी हल्ला, पाच चिनी नागरिकांचा मृत्यू

    पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा येथील शांगला येथे चिनी नागरिकांच्या ताफ्याला लक्ष्य करून आत्मघातकी बॉम्बस्फोटात पाच चिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

  • 26 Mar 2024 05:10 PM (IST)

    पंतप्रधान मोदींनी बशीरहाटमधील भाजप उमेदवार रेखा पात्रा यांच्याशी फोनवर केली चर्चा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बशीरहाटमधील भाजप उमेदवार रेखा पात्रा आणि संदेशखळी पीडितांपैकी एक यांच्याशी फोनवर चर्चा केली. प्रचाराची तयारी, भाजपला जनतेचा पाठिंबा आणि इतर मुद्द्यांवर पंतप्रधानांनी त्यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधानांनी त्यांचे शक्तिस्वरूपा असे वर्णन केले. त्याचवेळी रेखा पात्रा यांनी संदेशखळीमध्ये महिलांना येणाऱ्या अडचणींबाबत पंतप्रधान मोदींना माहिती दिली.

  • 26 Mar 2024 04:45 PM (IST)

    अमरावती लोकसभेसाठी रिपब्लिकन पक्ष गवई गटाकडून डॉ. राजेंद्र गवई निवडणूक लढवणार

    अमरावती लोकसभासाठी रिपब्लिकन पक्ष गवई गटाकडून डॉ. राजेंद्र गवई निवडणूक लढवणार आहेत. 3 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार अशी माहिती  डॉ.राजेंद्र गवई यांनी दिली. त्यांनी वंचितने आमच्या सोबत यावं असं आवाहनप्रकाश आंबेडकर यांना केलं आहे.

     

     

     

     

  • 26 Mar 2024 04:31 PM (IST)

    शिवसेनेमध्ये यादी जाहीर करण्याची परंपरा नाही- संजय राऊत

    शिवसेनेमध्ये यादी जाहीर करण्याची परंपरा नाही. वंचित आजही मविआमधील घटकपक्ष आहे.  प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आमचा संवाद सुरू आहे.  ठाकरेंनी आमचे सर्वा उमेदवार निश्चित केले असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.

  • 26 Mar 2024 04:15 PM (IST)

    विकासासाठी अजित पवार यांनी महायुतीसोबत जाण्याची भूमिका घेतली- सुनेत्रा पवार

    अनेक वर्षांपासून पवार साहेब सांगत होते व्यक्ती स्वातंत्र्य हे प्रत्येकाला मिळाल पाहिजे, आपण संविधानाच्या गोष्टी सांगतो. लोकशाही आहे म्हणतो. मग जर लोकशाही असेलं तर अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर पक्ष चोरला किंवा चोरून नेला असं होऊ शकत? असं सुनेत्रा पवार म्हणाल्या

  • 26 Mar 2024 02:56 PM (IST)

    माजी आमदार राजू तोडसाम अपक्ष म्हणून उतरणार लोकसभेच्या रिंगणात

    यवतमाळ- चंद्रपूर लोकसभेच्या निवडणुकीत माजी आमदार राजू तोडसाम रिंगणात उतरणार आहेत. अपक्ष उमेदवार म्हणून ते अर्ज दाखल करणार आहेत. राजू तोडसाम हे भाजप चे माजी आमदार असून त्यांनी नंतर बीआरएसमध्ये प्रवेश केला होता.

  • 26 Mar 2024 02:54 PM (IST)

    धुळे शहरात तापमानाचा पारा 39 अंशावर गेला आहे

    धुळे शहरात तापमानाचा पारा 39 अंशावर गेला आहे. प्रचंड तापमान वाढीमुळे रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. आठवड्याभरात तापमानात सतत वाढत आहे. जिल्ह्यात चार अंशाने तापमान वाढले आहे. मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता.

  • 26 Mar 2024 02:11 PM (IST)

    अखेर शिवाजी आढळरावांच्या फेसबुक पेजवर राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळरावांनी फेसबुक पेजमध्ये बदल केलाय. अजित पवारांच्या उपस्थितीत आज सायंकाळी आढळरावांचा प्रवेश होणार आहे. तत्पूर्वीच आढळरावांनी फेसबुक पेजवर राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळाचं चिन्ह टाकलं आहे. “जनता हीच माझी ताकद, काम हीच माझी ओळख” असं ब्रीद त्यांनी यावर नमूद केलेलं आहे. त्यामुळं पक्ष प्रवेशापुर्वीच सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलेलं आहे.

  • 26 Mar 2024 12:50 PM (IST)

    इंदापुरातील भाजपचे पदाधिकारी देवेंद्र फडणवीसांना भेटणार

    इंदापुरातील भाजपचे पदाधिकारी देवेंद्र फडणवीसांना भेटणार आहेत. येत्या शुक्रवारी मुंबईत सागर बंगल्यावर ही बैठक होणार आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष, महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ भेट घेणार आहे. पुढच्या आठवड्यात इंदापुरात देवेंद्र फडणवीसांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

  • 26 Mar 2024 12:40 PM (IST)

    राजीनामा देणार असल्याच्या चर्चांवर आमदार निलेश लंके यांची पहिली प्रतिक्रिया

    अहमदनगर- राजीनामा देणार असल्याच्या चर्चांवर आमदार निलेश लंके यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माझा राजीनामा द्यायचा आणि मलाच माहिती नाही अशी प्रतिक्रीया आमदार निलेश लंके यांनी दिली आहे. मला माझ्या मतदारांना विचारात घेऊन निर्णय घ्यावा लागेल. त्यांना न सांगता मी निर्णय घेऊ शकत नाही. मात्र राजकारण कधीही कोणत्याही वळणावर जाऊ शकतं, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय.

  • 26 Mar 2024 12:30 PM (IST)

    नवी दिल्ली- केंद्रीय मंत्रिमंडळाची उद्या बैठक

    नवी दिल्ली- केंद्रीय मंत्रिमंडळाची उद्या बैठक होणार आहे. उद्या सकाळी 10.30 वाजता ही बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पंतप्रधान निवासस्थानी होणार आहे.

  • 26 Mar 2024 12:20 PM (IST)

    के. कविता यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याची ईडीची मागणी

    नवी दिल्ली- के. कविता यांना ईडीने न्यायालयात हजर केलं. आज ईडी कोठडी संपल्यानंतर कविता यांना न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. के. कविता यांना न्यायालयीन कोठडीत पाठवा अशी ईडीने मागणी केली आहे. के. कविता यांचा जबाब नोंदवण्यात आला असून इतर आरोपींसोबत एकत्र तपास केला गेला आहे, अशी माहिती ईडीने कोर्टात दिली.

  • 26 Mar 2024 12:10 PM (IST)

    काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी; निवडणूक आयोगाला पत्र

    नवी दिल्ली- राष्ट्रीय महिला आयोगाने निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. काल अभिनेत्री कंगना रणौतला मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुप्रिया श्रीनेत यांनी सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती.  वादानंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट करून दिलगिरी व्यक्त केली होती.

  • 26 Mar 2024 11:50 AM (IST)

    Live Update | चंद्रपूर लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची विजय संकल्प यात्रा

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राहणार उपस्थित… सभेनंतर रोड शो करत मुनगंटीवार उमेदवारी अर्ज करणार दाखल

  • 26 Mar 2024 11:30 AM (IST)

    Live Update | माढा लोकसभेच्या जागेवर नव्याने विचार करणार – जयंत पाटील

    माढा लोकसभेच्या जागेवर नव्याने विचार करणार… 1-2 जागांवरील तिढा चर्चेतून सुटणार… मविआची वंचितसोबत चर्चा सुरु, जयंत पाटलांची माहिती

  • 26 Mar 2024 11:20 AM (IST)

    Live Update | विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना फोडण्याचे भाजप आणि शिंदे गटाचे प्रयत्न सुरू

    अंबादास दानवे यांना फोडून संभाजीनगर लोकसभेसाठी उभं करण्याचे प्रयत्न सुरू… शिंदे गट भाजपच्या प्रयत्नाला वैतागून अंबादास दानवे यांनी केले फोन बंद… फोन बंद करून अंबादास दानवे यांचे गाठीभेटी दौरा सुरू… आपण शिंदे गट किंवा भाजपात जाणार नसल्याचं अंबादास दानवे यांनी केलं स्पष्ट

  • 26 Mar 2024 11:06 AM (IST)

    Live Update | महादेव जानकर बारामती मधून लढणार या केवळ चर्चा

    महादेव जानकर बारामती मधून लढणार या केवळ चर्चा… परभणीची जागा महायुतीला मिळणार आणि परभणीतून राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर महादेव जानकर निवडणूक लढवणार… रसपाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते यांची प्रतिक्रिया

  • 26 Mar 2024 10:47 AM (IST)

    शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर पुढील महिन्यात सुनावणी

    नवी दिल्ली –  शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर पुढच्या महिन्यात 19 एप्रिलला या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता. गेल्या अनेक महिन्यांपासून ही सुनावणी झालेली नाही, त्यामुळं या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

    या प्रकरणाचा निकाल विधानसभा निवडणुकीपूर्वी लागण्याची शक्यता, त्यामुळं लोकसभा निवडणुकीत तरी ठाकरे यांना मशाल चिन्हावरच निवडणूक लढवावी लागणार.

  • 26 Mar 2024 10:41 AM (IST)

    नवनीत राणा बोगस जात प्रमाणपत्राचा निकाल १ एप्रिल नंतरच येण्याची शक्यता

    नवनीत राणा बोगस जात प्रमाणपत्राचा निकाल १ एप्रिल नंतरच येण्याची शक्यता.  सर्वोच्च न्यायालयाला सध्या होळीची सुट्टी असल्याने हा निकाल ३१ मार्च पर्यंत येणं कठीण आहे.  १ एप्रिल पासून सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाला सुरूवात होणार,  त्यानंतरच हा निकाल येणार. नवनीत राणा जात प्रमाणपत्र निकालाचं वाचन ओपन कोर्टात होणार आहे. वेबसाईटवर अपलोड केलं जाणार नाही. त्यामुळं निकाल १ एप्रिल नंतर येणं अपेक्षित आहे.

  • 26 Mar 2024 10:30 AM (IST)

    दादरा नगर हवेली दमण दिवच्या शिवसेनेच्या राज्यप्रमुख पदावरून अभिनव डेलकर यांची शिवसेना ठाकरे गटाकडून हकालपट्टी

    दादरा नगर हवेली दमण दिवच्या शिवसेनेच्या राज्यप्रमुख पदावरून अभिनव डेलकर यांची शिवसेना ठाकरे गटाकडून हकालपट्टी करण्यात आली आहे.  श्वेतल भट यांची प्रभारी राज्य प्रमुख पदी नियुक्ती केली आहे.

  • 26 Mar 2024 10:14 AM (IST)

    एकनाथ शिंदे, अजित पवारांना कोणतीही प्रतिष्ठा नाही – संजय राऊत

    आम्हाला जागावाटपासाठी दिल्लीत जावं लागत नाही. शिंदे, अजित पवारांना दिल्लीला जाव लागतं.

    एकनाथ शिंदे, अजित पवारांना कोणतीही प्रतिष्ठा नाही. निर्णय घेण्याचे अधिकार , हिंमत दोघांमध्येही नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

  • 26 Mar 2024 10:03 AM (IST)

    अनिल देसाई यांचे स्वीय सहायक दिनेश बोभाटे यांना ईडीचे समन्स

    मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देसाई यांचे स्वीय सहायक दिनेश बोभाटे यांना ईडीचे समन्स.  सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने दाखल केला गुन्हा. मूळ मिळकतीपेक्षा ३६ टक्के ज्यादा बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा आरोप. बोभाटे हे न्यू इंडिया अश्युरन्स कार्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत असिस्टंट ते सीनियर असिस्टंट पदावर कार्यरत होते.

  • 26 Mar 2024 09:57 AM (IST)

    अरविंद केजरीवाल यांच्या अटके विरोधात विरोधी पक्षांची महारॅली

    केजरीवाल यांच्या अटके विरोधात 31 मार्चला विरोधी पक्षांची महारॅली… दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटके विरोधात इंडिया आघाडीच्या विरोधी पक्षांच्या वतीने येत्या 31 मार्च रोजी सकाळी दहा वाजता रामलीला मैदानात महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या महारॅलीत महाराष्ट्रातून घटक पक्ष सहभागी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षचे नेते शरद पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे संजय राऊत सहभागी होणार आहे.  मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी सहभागी होणार आहे.

  • 26 Mar 2024 09:45 AM (IST)

    उदयनराजे यांचा भव्य स्वागत सोहळा

    भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार छत्रपती उदयनराजे यांचा भव्य स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला आहे. उद्या दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शिरवळ ते सातारा खासदार उदयनराजे भोसले यांचे जागोजागी भव्य स्वागत होणार आहे. खासदार उदयनराजे भोसले यांचे अजूनही भाजपाच्या वतीने उमेदवारी जाहीर झालेली नाही.  कमळ चिन्हाचे पोस्टर असलेले भव्य स्वागत सोहळ्याचे पोस्टर व्हायरल झाले आहे.  खासदार उदयनराजे भोसले यांचे शिरवळ ते सातारा शक्ती प्रदर्शन होणार आहे.

  • 26 Mar 2024 09:30 AM (IST)

    नाशिकमध्ये उद्या पाणीपुरवठा बंद

    नाशिकमध्ये उद्या निम्म्या शहरात पाणी बानी… सातपूर सिडको नाशिक पश्चिमच्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जलशुद्धीकरण दुरुस्तींच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बुधवारी पाणी बंद तर गुरुवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. पाणीपुरवठा विभागाच्या वतीने माहिती देण्यात आली आहे.

  • 26 Mar 2024 09:15 AM (IST)

    नाशिकमध्ये आढळून आली पेशवेकालीन रहाड

    नाशिकमध्ये आढळून आली पेशवेकालीन रहाड… नाशिकमधली होळी परिसरात खोदकाम करताना रहाड सापडली. रंगपंचमीच्या दिवशी शहरातील या पारंपारिक रहाडी उघडल्या जातात.  रंग खेळण्यासाठी या रहाडी पेशवे काळात तयार करण्यात आल्या होत्या. मधली होळी परिसरात सापडलेल्या राहाडीची डागडुजी सुरू आहे. यंदा पारंपारिक पद्धतीने पूजन करून ही रहाड सुरू केली जाणार आहे.  शहरात सद्यस्थितीला 5 रहाडी सुरू आहेत.  रहाडींच्या वैभवशाली परंपरेत आणखी एका रहाडीचा समावेश आहे.

  • 26 Mar 2024 09:02 AM (IST)

    Maharashtra News | आमदार राम सातपुते यांचा आज कृतज्ञता मेळावा

    माळशिरसचे आमदार राम सातपुते यांचा आज सायंकाळी 5 वाजता मांडवे येथील निवासस्थानी कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन. आमदार राम सातपुते लोकप्रतिनिधी व जनता यांचा कृतज्ञता मेळावा घेणार आहेत. आमदार राम सातपुते यांना सोलापूर लोकसभेची उमेदवारी मिळाल्याने माळशिरस विधानसभा मतदारसंघात कृतज्ञता मेळावा घेत आहेत. आमदार सातपुते यांनी माळशिरस मतदार संघात अनेकवेळा जनता दरबार घेतलेला आहे. मात्र आज कृतज्ञता मेळावा घेतल्याने सगळ्याचे लक्ष लागले आहे.

     

  • 26 Mar 2024 08:48 AM (IST)

    National News | केजरीवाल यांच्या अटकेविरोधात 31 मार्चला विरोधी पक्षांची महरॅली

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात इंडिया आघाडीच्या विरोधी पक्षांच्या वतीने येत्या 31 मार्च रोजी सकाळी दहा वाजता रामलीला मैदानात महा रॅलीचे आयोजन. या महा रॅलीत महाराष्ट्रातून घटक पक्ष सहभागी होणार. राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे, संजय राऊत सहभागी होणार. मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी सहभागी होणार.

  • 26 Mar 2024 08:24 AM (IST)

    Maharashtra News : नाशिकच्या जागेवरून महायुतीत तिढा कायम

    भाजप, शिंदे गटात नाशिक लोकसभेच्या जागेवरून शिमगा. युतीत कोणाचाच उमेदवार ठरेना, केवळ दावेदारी. शिंदेंपाठोपाठ भाजपचे ही मुंबईत शक्तिप्रदर्शन. फडणवीसांची घेतली भेट. नाशिकच्या उमेदवारी बाबत अद्याप उत्कंठा.

  • 26 Mar 2024 08:23 AM (IST)

    Maharashtra News : कवठेमहांकाळमधून 246 कोटी रुपयांचा एमडी ड्रग्स साठा जप्त

    कवठेमहांकाळ तालुक्यातील एरळी येथे मुंबई गुन्हे शाखेच्या कारवाईत तब्बल 246 कोटी रुपयांचा एमडी ड्रग्स साठा जप्त. सहा संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. मुख्य संशयित हा कवठेमंकाळ तालुक्यात असून तो गेल्या 17 वर्षापासून मुंबईमध्ये वास्तव्यास. मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने एमडी ड्रग्ज तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून केली कारवाई. कारवाईमध्ये 122.5 किलो कच्च्या मालासह तयार करण्यासाठी लागणारे केमिकल्स, मशिनरी, मिक्सर ग्राइंडर असे सर्व प्रकारचे साहित्य ताब्यात घेतले.

  • 26 Mar 2024 07:56 AM (IST)

    Marathi News | धाराशिवमध्ये दोन गटात तणाव निवळला

    धाराशिव येथील दोन गटात तणाव निर्माण झाला होता. दोन गटात दगडफेक झाली होती. पोलीस, महसूल अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यानंतर आता शांतता आहे.

  • 26 Mar 2024 07:44 AM (IST)

    Marathi News | उमेदवाराची बंजारा समाजासोबत होळी

    होळी हा बंजारा समाजाचा महत्त्वाचा सण आहे. दरवर्षी बंजारा समाज पारंपरिक पद्धतीने होळीचा सण साजरा करतो. रामदेववाडी ता.जळगाव येथे देखील आज बंजारा समाज व भाजप महिला मोर्चातर्फे पारंपरिक होळीचे आयोजन करण्यात आले होते.

  • 26 Mar 2024 07:29 AM (IST)

    Marathi News | वीस शाळांवर कारवाई

    केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यातील दोन शाळांसह देशभरातील वीस शाळांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गैरप्रकारांसंदर्भात केलेल्या पडताळणीनंतर सीबीएसईने कारवाईचा निर्णय घेतला आहे.

  • 26 Mar 2024 07:17 AM (IST)

    Marathi News | निवडणूक आयोगाचा उपक्रम

    युवक मतदारांची निवडणूक प्रक्रिया, मतदानाबाबत आस्था वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयीन विद्यार्थी घरोघरी जाऊन आणि पालकसभेत पालकांना आवाहन करणार आहेत.