वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीत लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. प्रकाश आंबेडकर आज आपली भूमिका जाहीर करणार आहे. मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे यांनी पुण्यात मराठा समाजाच्या बैठकीला हजेरी लावली. ठाकरे गट आज उमदेवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे. सकाळी ९ वाजता उमेदवारी यादी जाहीर करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राजू पारवे उमेदवारी अर्ज भरणार आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
खासदार नवनीत राणा यांना आदिवासी महिलांनी घेराव घालत चांगलंच सुनावलंय. खासदार राणा होळी निमित्ताने नवनीत राणा होत्या मेळघाट दौऱ्यावर होत्या. यावेळेस नवनीत राणांनी वाटलेल्या साड्यावरून आदिवासी महिलांनी नाराजी व्यक्त केली. तसेच विविध मूलभूत सुविधा नसल्याचा आरोप करत आदिवासी महिला संतापल्या.
शिवसेनेने आगामी लोकसभा निवडणुकींसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून अनेक दिग्गजांचा समावेश आहे. गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकूण ४० नेत्यांचा स्टार प्रचारक म्हणून समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेरठमध्ये 30 मार्चला होणाऱ्या रॅलीची तारीख बदलण्यात आली आहे. आता 31 मार्चला मेळावा होणार आहे.
फेमा प्रकरणी ईडीने महुआ मोईत्राला उद्या चौकशीसाठी बोलावले आहे.
ईडीच्या कोठडीत अरविंद केजरीवाल यांची प्रकृती खालावली असल्याचा दावा आम आदमी पक्षाने केला आहे. त्याची शुगर लेव्हल सतत वर-खाली होत असते. साखरेची पातळी 46 पर्यंत घसरली. शुगर लेव्हल एवढ्या खालच्या पातळीवर जाणे अत्यंत धोकादायक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
अभिनेत्री कंगना राणौतवर अशोभनीय टिप्पणी केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट यांना नोटीस बजावली आहे. निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुप्रिया श्रीनेट यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने सुप्रिया श्रीनेट यांना 29 मार्चला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांचे शिरवळ येथे आगमन झालं आहे. समर्थकांकडून उदयनराजेंचं स्वागत करण्यात येत आहे. उदयनराजे यांचा रथ कमळाने सजला आहे.
वंचित कडून दोन उमेदवारांचे रामटेकसाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. वंचित आघाडीसाठी काल मंगळवारी शंकर चाहांदे यांनी तर आज किशोर गजभिये यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मागील निवडणुकीत किशोर गजभिये काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांनी अजून काँग्रेसचा राजीनामा दिलेला नाही
छत्रपती उदयनराजे भोसले थोड्याच वेळात साताऱ्याच्या शिरवळ फाट्यावर पोहोचणार आहेत. शिरवळ फाट्यावर उदयनराजे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. उदयनराजेंची मिरवणूक काढण्यात येणार आहे.
महाविकास आघाडीमध्ये कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. सगळे एकमेकांच्या सीटवर उमेदवार घोषित करीत आहेत, अशी परिस्थिती आहे. अनेक लोकं महाविकास आघाडीतून बाहेर पडलीत. वंचित आणि महाविकास आघाडीत काय झालं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्या संदर्भात मला काहीही बोलायचं नाही, अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली.
बारामती तालुक्यातील डोरलेवाडी गावात तुकाराम महाराज बीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी हजेरी लावली.
धुळे लोकसभा मतदारसंघाची काँग्रेसची जागा ठाकरे गटाला द्या अशी मागणी माजी आमदार शरद पाटील यांनी केली आहे. गेल्या तीन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा सतत पराभव होत आहे.
अमरावती लोकसभेच्या निवडणुकीसाठी वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांचे नाव चर्चेत असतानाच प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान यांना दिली संधी
ठाकरे गटाचे सुरेश साखरे रामटेकमधून उमेदवारी दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत. रामटेकची जागा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे असताना सुरेश साखरे अर्ज भरत आहेत.
नागपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार नितीन गडकरी आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते.
साताऱ्यात गुंडांच्या अनधिकृत घरांवर जिल्हा प्रशासनाचा हातोडा टाकला आहे. प्रतापसिंह नगरमधील कारवाईदरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गुंड दत्ता जाधव, युवराज जाधव, लल्लन जाधव यांच्या घरावर हातोडा पडला आहे. एकूण 16 गुंडांची घरं जिल्हा प्रशासनाकडून जमीनदोस्त करण्यात आली आहेत.
लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ठाकरे गटाकडून सोशल मीडियावर जोरदार प्रचार सुरू झाला आहे. ठाकरे गटाकडून प्रत्येक उमेदवाराला विशेष टॅगलाइन देऊन प्रचार केला जात आहे.
अहमदनगर – आमदार निलेश लंकेंचा राजीनाम्याचा मार्ग मोकळा, निलेश लंके लवकरच तुतारी वाजवणार. लंके लवकरच राजीनामा देऊन मैदानात उतरणार.
अकोला मतदारसंघाची पोटनिवडणूक हायकोर्टाकडून रद्द. कोर्टाच्या निर्णयानं पारनेरचीही पोटनिवडणूक होणार नाही. अकोल्याच्या निर्णयामुळे लंकेंचा मार्ग मोकळा झाला आहे.
एक दिवस ही आघाडी राज्यातील काँग्रेस पक्षाचं नुकसान करेल. सांगली. मुंबई दक्षिण मध्यच्या जागेवरून जिशान सिद्दीकींनी ही टीका केली आहे.
ठाकरे गट काँग्रेसला किती महत्वं देतं हे यावरून दिसतं, असंही त्यांनी म्हटलं आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा केज तालुक्यत दौरा सुरू आहे. मात्र मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी थांबवून त्यांच्यासमोर घोषणाबाजी केली.
राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी उद्धव ठाकरे यांच्या भेटीला आल्या आहेत. मातोश्री निवासस्थानी प्रियंका चतुर्वेदी दाखल झाल्या आहेत.
नवी दिल्ली- दिल्लीच्या कथित दारू घोटाळ्यात २५० पेक्षा अधिक ठिकाणी छापा टाकल्या आहेत. दिल्लीच्या कथित दारू घोटाळ्याचा पैसा कुठे गेला? असा सवाल अरविंज केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांनी केला.
अकोला : वंचित बहुजन आघाडीचा लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातील निर्णय झाला असून, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी याविषयीची माहिती दिली आहे. काल मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा झाली. सविस्तर चर्चा झाल्यानंतर ठरवले गेले की, ओबीसी समुदायाला उमेदवारी दिली जात नव्हती. ओबीसीसोबत आघाडी होईल, मुस्लीम समुदायाला उमेदवारी दिली जाईल. सोबतच जैन समुदायालाही उमेदवारी दिली जाणार असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
“ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे. काही लोकं दिशाभूल करण्याचा प्रयन्त करत आहेत. क्रीडा क्षेत्रासाठी मी काम केलं आहे. कुठलीही अडचण येऊ दिली नाही. महायुतीच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राचा सर्वांगिक विकास कसा होईल हे बघतोय,” असं अजित पवार म्हणाले.
“खेळात राजकारणात न आणता मदत केली पाहिजे. देशाच्या पातळीवर जसं ऑलिम्पिक भवन आहे. तसंच ऑलिम्पिक भवन आपल्या पुण्यात करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शिव छत्रपती क्रीडा पुरस्कारात मदत वाढवण्याचं काम आम्ही केलं आहे. मित्रांनो आम्ही काही साधू संत नाही आहोत. आम्ही राजकीय मंडळी आहोत. या मतदारसंघाची प्रतिनिधित्व करण्याची संधी आम्हाला दिली आहे. याठिकाणी मुरलीधर मोहोळ यांना संधी देण्यात आली आहे, त्यांना संसदेत पाठवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे,” असं अजित पवार म्हणाले.
ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर होताच शिंदे गट आक्रमक… शिवसेना शिंदे गटाच्या ट्विटवर ट्विट करत ठाकरे बाळासाहेबांचे नाव घ्यायलाही लाज वाटते का? केला सवाल
वादग्रस्त जागांबाबत आज बैठक होण्यापूर्वीच राऊत यांनी केली यादी जाहीर… जयंत पाटील यांच्यासह मविआचे अनेक नेते नाराज असल्याची सूत्रांची माहिती… शरद पवार, जयंत पाटील, उध्दव ठाकरे यांच्यात आज होणार होती बैठक… नाशिकसह इतर जागांबाबत आज होणार होती बैठक… बैठकीच्या आधीच यादी जाहीर केल्याने राउतांवर नाराजी
प्रतापसिंह नगर येथील कुख्यात गुंड दत्ता जाधव, युवराज जाधव, लल्लन जाधव यांच्यासह इतर गुंडांच्या 16 घरांवर जिल्हा प्रशासनाचा हातोडा… परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त… कुख्यात गुंड दत्ता जाधव यांच्यासह 16 आरोपींवर खंडणी दरोडा, बलात्कार, घरफोडी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल
शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर पहिली प्रतिक्रिया… शिवसेनेनेमुळे मला आमदार खासदार होता आले, ठाकरे कुटुंबाचे मानले आभार… विकास कामांच्या जोरावर मला विजय नक्की मिळेल… व्यसनाधीन माणसाने व्यसनमुक्तीवर व्याख्यान करावे असे माझ्यावर विरोधक टीका करतात…भाजपला पराभवाची भीती आहे त्यामुळे उमेदवार जाहीर करीत नाहीत… असं देखील ओमराजे निंबाळकर म्हणाले.
अरविंद केजरीवाल यांची जामीनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव… केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणीला सुरूवात… अटक आणि इडीच्या कोठडीच्यी विरोधात अरविंद केजरीवाल यांनी अर्ज दाखल केला आहे.. केजरीवाल यांच्या अर्जावर उत्तर देण्यासाठी इडीने वेळ मागितला…
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल या पत्रकार परिषद घेणार आहेत. सुनीता केजरीवाल यांची दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद होत आहे. केजरीवाल यांच्या अटकेनंतर सुनिता केजरीवाल काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन दिवसांपूर्वी इडी कोठडीत जाऊन सुनीता केजरीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती.
बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु होती, अखेर आज ठाकरे गटाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाने 17 उमदेवार जाहीर केले आहेत. मुंबईमध्ये उद्धव ठाकरे गटाचा सामना थेट भाजपा बरोबर होणार आहे. उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीसोबत आहे. मुंबईत उद्धव ठाकरे गटाची ताकद जास्त आहे.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे..
*मुंबई दक्षिण मध्य:श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे.
इतर 16 उमेदवार… pic.twitter.com/nPg2RHimSF— Sanjay Raut (@rautsanjay61) March 27, 2024
गेल्या आठवड्यात सोने 1500 रुपयांनी वधारले तर चांदीने या आठवड्यात 2800 रुपयांची भरारी घेतली होती. या आठवड्यात सोने आणि चांदीने ग्राहकांना दिलासा दिला आहे. दोन्ही धातूंच्या किंमतीत घसरण झाली आहे.
पुण्यातील बारामतीमध्ये आज लोकसभा मतदारसंघातील नामांकीत वस्ताद आणि कुस्तीगिरांचा मेळावा होत आहे. या मेळाव्याला अजित पवार उपस्थिती लावणार आहेत. येत्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कोण कोणाला चीतपट करते याची खमंग चर्चा रंगली आहे.
विमा खरेदीदारांसाठी महत्वाची बातमी आहे. आता पॉलिसी सरेंडर केल्यावर विमाधारकांना मोठा फटका बसणार आहे. त्यांना जादा पैसा मिळणार नाही. भारतीय विमा नियामक IRDAI ने विमा क्षेत्रात अनेक बदल केले आहेत.
बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत चंद्रकांत खैरे यांची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. जे जे नशिबात असेल ते तुला मिळत जाईल. उमेदवारी मिळताच चंद्रकांत खैरे यांची फेसबुकवरील पोस्ट चर्चेत आली.
नागपूर लोकसभा निवडणुकीसाठी नितीन गडकरी तर रामटेकसाठी राजू पारवे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नागपूरमधील संविधान चौकातून रॅली निघणार आहे
मला कल्पना नाही, मी पुण्याला गेल्यावर विचारतो. जे दिल्लीला गेले होते, त्यांना जाऊन विचारतो. अनेक इच्छुक आहेत. आम्ही कुणावरही दबाव टाकला नाही. मी राष्ट्रवादी पक्षात, माझ्या पक्षातर्फे लढणार, पक्ष बदलण्याचा प्रश्न येत नाही. ज्या पक्षाला जागा सुटेल तो लढेल. ज्या गटाचा उमेदवार असेल त्याला 100 टक्के निवडून आणण्याचा प्रयत्न करणार असं छगन भुजबळ म्हणाले.
ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांना ईडीचे समन्स. अमोल कीर्तिकर हा गजानन किर्तिकर यांचा मुलगा आहे. अमोल कीर्तिकरला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. खिचडी घोटाळ्यात अमोल कीर्तिकर यांना समन्स. आजच ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं.
सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांचे काँग्रेसमध्ये परतण्याचे निश्चित. 31 मार्च रोजी मुंबईत टिळक भवन मध्ये दुपारी एक वाजता होणार प्रवेश. माजी आमदार दिलीप माने यांनी स्वतः या माहितीला दिला आहे दुजोरा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते दिलीप माने यांचा काँग्रेसमध्ये होणार प्रवेश. प्रवेश सोहळ्यास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे देखील उपस्थित राहण्याची शक्यता. दिलीप माने हे दक्षिण सोलापूर मतदारसंघांचे आमदार राहिले आहेत. 2019 साली त्यांनी शिवसेनेकडून प्रणिती शिंदेच्या विरोधात निवडणूक देखील लढवली होती.
दिल्लीतून भुजबळांची उमेदवारी निश्चित, सूत्रांची माहिती. आज अजित पवारांनी बोलावली नाशिक लोकसभा मतदारसंघाची बैठक. छगन भुजबळांसह नाशिक लोकसभेतील अजित पवार गटाचे पदाधिकारी राहणार बैठकीला उपस्थित. भुजबळ फार्मवरून भुजबळांसह पदाधिकाऱ्यांचा ताफा पुण्याला रवाना.
मेफेड्रोन ड्रगतस्करीचे आंतराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्त केल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हेशाखेने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. पुणे शहरात केमिकल ताड़ी तयार करण्यासाठी लागणारे केमिकल पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एक कारखाना उद्धवस्त केला आहे. तेथून तब्बल दोन हजार तीनशे किलो क्लोरल हायड्रेट पावडर जप्त करण्यात आली आहे. त्याची किंमत 60 लाख रुपये आहे.
पुण्याच्या बारामती लोकसभा मतदार संघातील भोर तालुक्यातल्या विविध भागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना सुनेत्रा पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटप करण्यात आलं. सुनेत्रा पवार यांच्या भोर तालुका दौऱ्या दरम्यान हे नियुक्तीपत्र वाटप करण्यात आलं.
वंचित बहुजन आघाडीची राज्य कार्यकारिणी बैठक अकोला येथे प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 3 तास चाललेली राज्य कार्यकारिणी बैठक रात्री 12.30 वाजता संपली. पक्षाची भूमिका आणि आगामी राजकारणाची दिशा या बैठकीत ठरविण्यात आली. सकाळी 11 वाजता अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका जाहीर करण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. विदर्भातील पाच मतदार संघात पहिल्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. त्यात नितीन गडकरी यांचा नागपूर लोकसभा मतदार संघ आहे.