मुंबई | 19 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीत महायुतीत नवीन पक्ष येणार आहे. राज ठाकरे यांचा मनसे महायुतीत सहभागी होणार आहे. त्यासाठी मनसे नेते राज ठाकरे दिल्लीत पोहचले आहे. ते भाजप नेते अमित शाह यांची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे २० मार्च रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात आज सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. नवीन संसदेचं रूपडं पालटणार आहे. जुन्या संसदेसमोरील महापुरूषांचे पुतळे नवीन संसदेसमोर बसवले जाणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ११ प्राध्यापकांवर ४० पदांची जबाबदारी आहे. एका प्राध्यापकावर ५ पदांची जबाबदारी यामुळे विद्यापीठाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
विरार | पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वसई-विरार दरम्यान साडेचार पाचच्या दरम्यान सिग्नल फेलीयर झाला. त्यामुळे प्रवाशी रेल्वे ट्रॅकवरून चालत निघाले. वसई ते विरार दरम्यान लोकल वाहतूक 5 ते 10 मिनिटाने उशिराने असल्याची रेल्वे प्रशासनाची माहिती दिलीय. कार्यालय सुटण्याच्या वेळेत रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने लोकल प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मनसेच्या बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. तसेच राज ठाकरे सांगतील त्या जागेवर उभं राहणार असल्याचंही नांदगावकर यांनी म्हटलं आहे. उमेदवारी कुणाला द्यायची हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय असेल, असं नांदगावकर यांनी स्पष्ट केलं. तसेच पुढील 1-2 दिवसात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती नांदगावकर यांनी दिली. अमित शाह आणि राज ठाकरे यांच्यात नवी दिल्लीत 30 मिनिटं चर्चा झाली. आता महायुतीसोबत चौथा भिडू जोडला जाणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
बारामती | बारामती लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने दंड थोपाटले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना फोन केला. फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील यांना उद्या सकाळी सागर बंगल्यावर येण्याचे निमंत्रण दिले. बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा करण्यासाठी पाटील यांना फडणवीस यांनी फोन केला. दोन्ही नेत्यांमध्ये उद्या बारामती मतदारसंघाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.
मुंबई : शिंदे गटाच्या खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या बैठकीत विद्यमान खासदारांच्या मतदारसंघांची मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून लवकरच एक दोन दिवसात जागा वाटप संदर्भात निर्णय होणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. खासदारांची कुठेही नाराजी नव्हती. खासदारांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे, अशी माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.
शिर्डी : राज ठाकरे यांचे संघटन कौशल्य चांगले आहे. राज ठाकरे महायुतीत आले तर त्याचा नक्कीच फायदा होईल. शिर्डीच्या जागेबाबत महायुतीची चर्चा सुरू आहे. राज ठाकरे कोणत्या जागेची मागणी करणार हे माहित नाही. मात्र, महायुतीचा जो उमेदवार असेल त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही तयार आहोत असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता नुकतीच लागू झाली आहे.निवडणूक कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, आचारसंहितेचा भंग होऊ नये याकरिता पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
पुणे : निवडणूक जाहीर होताच आयकर विभाग एक्शन मोडवर. पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी २४ तास यंत्रणा कार्यरत. नियंत्रण कक्षाची केली स्थापना. नागरिकांना संशय असल्यास नोंदवू शकणार तक्रार.
राज ठाकरे आणि आमचे विचार एकच आहे. आमची काम करण्याची पद्धत एकच आहे. त्यामुळे आमचे विचार जुळतात. राज ठाकरे आले तर आनंदाची गोष्ट आहे. आमच्या पक्षाच्या आणि महायुतीमध्ये वाढ होणार आहे. – आमदार प्रकाश सुर्वे
संध्याकाळी अमित शाह यांच्यासोबत बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिल्लीत येणार… बैठकीला अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे उपस्थित राहणार… आज महायुतीच्या जागांवर अंतिम निर्णय होणार… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मावळचे खासदार श्रीरंग बारणे, खासदार राहुल शेवाळे , खासदार भावना गवळी, कोल्हापूरचे विद्यमान खासदार संजय मंडलिक मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले असून गेल्या 4 तासांपासून लोकसभा उमेदवारी संदर्भात बैठक अखेर संपली… उद्या महायुतीचा फॉर्मुला आणि लोकसभा जागा वाटप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे
शरद पवार पुण्यातील निवासस्थानी दाखल… प्रतिभा पवार आणि शरद पवार पुण्यात आले आहेत… आजचा दिवस राखीव असणार उद्या शरद पवारांच्या पुण्यात बैठका
आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट… भेट घेत काँग्रेस नेत्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन… पुण्यात भाजपकडून आचारसंहितेचा भंग करत पक्ष चिन्हाचा प्रचार केल्याचा काँग्रेसचा आरोप… भाजप जाणून बुजून शहरभर कमळ या चिन्हाचा वॉल पेंटिंग करत असल्याचं कलेक्टर यांच्या निदर्शनास काँग्रेस नेत्यांनी दिल आणून…
ऊपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर अजीत पवार दाखल… चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलारही पोहोचले… ८ जागा लढण्यावर एनसीपी ठाम… जागेची अदलाबदल करा दादांचा बैठकित आग्रह… न केल्यास महायुतीचं तसेच पक्षाचंही नुकसान होईल अशी व्यक्त केली खंत… सुत्र… मनसेच्या युतीवरही बैठकीत चर्चा…
नवी दिल्ली- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज ठाकरे यांच्यामध्ये बैठक सुरू आहे. मनसेला महायुतीत घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यात लोकसभा जागावाटपासंदर्भात चर्चेची शक्यता आहे.
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आणि त्यांचे पुतणे दुर्गेश साळवी ठाण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या ठिकाणी आले आहेत. दुर्गेश साळवी यांची चौकशी होणार आहे. राजन साळवी यांची चौकशी झाली आहे. कथित मालमत्ता प्रकरणात राजन साळवी यांच्यासह कुटुंबीयांचीदेखील चौकशी झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी केली आहे.
नवी दिल्ली- मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अमित शाहांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. राज ठाकरे कालपासून ताज मानसिंग हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. शाहांच्या भेटीसाठी ते हॉटेलमधून रवाना झाले आहेत.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार हे आधीपासूनच सागर बंगल्यावर उपस्थित आहेत.
ठाणे- मावळचे खासदार श्रीरंग बारणे, खासदार राहुल शेवाळे, खासदार भावना गवळी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले आहेत. आज लोकसभेची यादी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीला विद्यमान खासदार येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी खासदारांची रेलचेल वाढली आहे. कृपाल तृमाने, हेमंत गोडसे हे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.
जळगाव लोकसभा निवडणुकीमुळे सहा दिवस कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे पेपर होणार नाहीत. पदवी अभ्यासक्रमांची परीक्षा दि. ४ एप्रिलपासून तर पदव्युत्तरची २० एप्रिलपासून सुरू होणार आहे. पदवी आणि पदव्युत्तर अशा वेगवेगळ्या विद्याशाखा मिळून एकूण ३९५ परीक्षा एप्रिल महिन्यात होणार आहेत. मतदानाच्या आधीचे आणि नंतरचे मिळून एकूण सहा दिवस कोणताही पेपर घेतला जाणार नाही.
महाविकास आघाडीने कुठलंही अल्टिमेटम वंचित बहुजन आघाडीला दिलेलं नाही. या सर्व बातम्या खोट्या आणि निराधार आहेत. असं कुठलंच कम्युनिकेशन महाविकास आघाडीने आमच्याशी केलेलं नाही, अशी प्रतिक्रिया वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांनी दिली.
दिल्लीतील पटियाला सत्र न्यायालयाने दिल्ली पोलिसांना आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या एससी/एसटी अत्याचार प्रकरणात आयपीएस अधिकारी ज्ञानेश्वर सिंग, डीडीजी, एनसीबी यांच्याविरुद्ध नवीन कारवाई अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले.
ज्या दिवशी वसंत मोरे निवडणुकीच्या रिंगणात येईल, त्या दिवशी खरी रंगत येईल, असा दावा वसंत मोरे यांनी केला. लोकसभा निवडणूक लढण्यावर आपण ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक लढवायची आणि जिंकायची सुद्धा असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
दिल्लीतील ताज मानसिंग हॉटेलमध्ये विनोद तावडे आणि राज ठाकरे यांच्यात भेट होणार आहे. राज ठाकरे महायुतीत सहभागी होण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्वाची मानण्यात येत आहे.
राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, भावना गवळी आणि अन्य काही खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही वेळात ठाण्याच्या घरी शिवसेना खासदार त्यांची भेट घेणार आहे. जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याने खासदार आपली भूमिका मांडणार असल्याचे कळते. आज मुख्यमंत्र्यांचे सर्व कार्यक्रम राखीव ठेवण्यात आले आहेत, दुपारनंतर मोठ्या घडामोडींना वेग येणार असल्याचे समजते.
प्रकाश महाजन यांनी अंबादास दानवे यांच्यावर सडकून टीका केली आहे. पद मिळालं म्हणजे अक्कल येते असं नाही. अंबादास दानवे यांचं पदच धोक्यात आहे. तांत्रिक दृष्ट्या अंबादास दानवे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांचं विधान परिषदेतील संख्याबळ घटलं आहे. अंबादास दानवे काही मोठा नेता नाही, असा टोला त्यांनी हाणला.
आज दुसऱ्या दिवशी नांदेडमध्ये उद्धव ठाकरे यांच्या कुटुंब संवाद दौऱ्याला सुरुवात थोड्याच वेळात होणार आहे. नांदेड येथून उद्धव ठाकरे यांचा ताफा यवतमाळ च्या उमरखेडकडे रवाना होणार आहे. नांदेड-हिंगोली लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितित पार पडणार कुटुंब संवाद मेळावा होत आहे.
पद मिळालं म्हणजे अक्कल येते असं नाही. अंबादास दानवे यांचं पदच धोक्यात आहे. तांत्रिक दृष्ट्या अंबादास दानवे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांचं विधान परिषदेतील संख्याबळ घटलं आहे. अंबादास दानवे काही मोठा नेता नाही. उध्दव ठाकरे स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी दिल्लीला जाऊन कुणाचे पाय धरत होते. अंबादास दानवे यांनी उध्दव ठाकरे टाकतील तो तुकडा चघळावा, असं म्हणत प्रकाश महाजन यांनी अंबादास दानवेंवर टीकास्त्र डागलंय.
काँग्रेस मुख्यालयात कार्यकारिणीची बैठक सुरू झाली आहे. 2024 साठी पक्षाचा जाहीरनामा बैठकीत मंजूर होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, के. सी. वेणुगोपाल, रेवंत रेड्डी, सुखविंदर सखू, अंबिका सोनी यांच्यासह अनेक नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
खासदार संजय मंडलिक यांनी भाजप नेते समरजीत घाटगे यांची भेट घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मदत करण्यासाठी चर्चा केली. महायुतीकडून कोल्हापूर लोकसभेचा उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू असतानाच संजय मंडलिक यांनी घेतलेल्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. महायुतीत भाजपकडून कोल्हापूरच्या जागेसाठी आग्रह धरला जातोय. भाजपकडून समरजीत घाटगे उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. संजय मंडलिक यांच्याकडून माजी आमदार के पी पाटील यांचीही भेट घेतली आहे. साखर कारखाना निवडणुकीत झालेले आरोप प्रत्यारोप विसरून येणाऱ्या निवडणुकीत मदत करण्याची मंडलिक यांनी के पी पाटील यांना विनंती केली आहे.
चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करायला काँग्रेस श्रेष्ठींची दमछाक होत आहे. आमदार प्रतिभा धानोरकर व शिवानी वडेट्टीवार यांच्यात चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही गटांनी उमेदवारी प्रतिष्ठेची केल्याने कोणीही मैदान सोडायला तयार नाही. निवडणुकीपूर्वीच दोन गटांमधील ही स्पर्धा पाहून कार्यकर्ते चिंतेत पडले असून, चंद्रपुरात पक्ष शांत, मुंबईत खलबतं, असे चित्र दिसत आहे.
२०१९ मध्ये बाळू धानोरकर यांच्या काँग्रेस प्रवेशापासून विजयापर्यंत विजय वडेट्टीवार यांनी मोठी भूमिका बजावली होती.
मनसेकडून लोकसभेसाठी ठाकरे घराण्यातील उमेदवार ? अमित ठाकरे लोकसभा निवडणूक लढणार ?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे एनडीएत सहभागी झाल्यानंतर अमित ठाकरे संभाव्य उमेदवार असू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज ठाकरे कालपासून राजधानी दिल्लीत असून आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार.
येत्या 21 मार्चला आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाच्या विदर्भातील सर्व जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची अमरावतीत महत्त्वाची बैठक होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडूंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती.
अमरावती लोकसभा मतदारसंघासह विदर्भातील इतरही लोकसभा मतदारसंघा संदर्भात बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये प्रहारची काय भूमिका राहणार हे बैठकीत होणार स्पष्ट होणार .
राज ठाकरे दिल्लीला का गेले हे काही तासांत स्पष्ट होईल. ते जो निर्णय घेतील तो राज्याच्या हिताचा असेल. आम्ही राज ठाकरेंच्या आदेशाचं पालन करणार, असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले.
कोल्हापुरात नंग्या तलवारी नाचवत गाड्यांची तोडफोड. पूर्ववैमनस्यातून टाकाळा झोपडपट्टीत टोळक्यांचे कृत्य. शालेय मुलांच्या भांडणातून दहशत माजवण्याचा प्रकार. दहशत माजवणाऱ्या टोळक्याने 10 चारचाकी फोडल्या.
“भाजपच्या विरोधात जे कोणी लढत आहेत , महाविकास आघाडीतील जेवढे पक्ष आहेत, सगळ्यांची जबाबदारी आहे ती ही लढाई आपण लढली पाहिजे. घरोघरी जाऊन लोकांना आपण जागृत केलं पाहिजे” असं प्रणिती शिंदे म्हणाल्या. “मोदींनी दहा वर्षात लोकांचा विश्वासघात केला आहे. खाजगीकरण करून महाराष्ट्र गुजरातला चालवायला दिल आहे का?” असं त्या म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाचा वाद. सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी. सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला शरद पवारांचे नाव आणि फोटो वापरण्यावरून झापल्यानंतर आज होणार सुनावणी.
इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML), आसाम काँग्रेसचे नेते देबब्रत सैकिया यांच्यासह इतर याचिका कोर्टात दाखल झाल्या होत्या. नागरिकत्व दुरुस्ती नियम 2024 रद्द करण्याची याचिकेत मागणी. CAA अवैध स्थलांतरितांना कायदेशीर ठरवते. त्यामुळं स्थानिक संस्कृतीवर त्याचा परिणाम होणार. याचिकेत हा मुद्दा मांडण्यात आला आहे. केंद्र सरकारने 11 मार्चला CAA लागू केल्याचं नोटीफिकेशन जाहीर केल. कोर्ट काय दिशा देत हे पाहणं महत्वाचं.
पुण्याच्या भोर तालुक्यातील बाजारवाडी गावात, ग्रामदैवत श्री कालभैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य कुस्ती भरविण्यात आली. यामध्ये पुण्याच्या विविध भागातून आलेले 100 हून अधिक मल्ल सहभागी झाले होते. कुस्ती क्रीडा प्रकरातील सर्व वजन गटातील कुस्त्या यावेळी घेण्यातं आल्या. कुस्त्यांचा हा जंगी आखाडा पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांची गर्दी केली होती.
गोंदिया जिल्ह्यात हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये गहू मका पिकाची कापणी करून ठेवली आहे. या पावसामुळे या पिकांना नुकसान झाले आहे.
उद्धव ठाकरे उद्या २० मार्च रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर जाणार आहे. सिंदखेड राजा आणि मेहकर येथे जनसंवाद दौरा आहे. मनोहर जोशी यांच्या निधनाने मागील २३ फेब्रुवारीचा त्यांचा दौरा रद्द झाला होता.
भारतीय जनता पक्षाची आज पुन्हा कोअर गटाची बैठक होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, सरचिटणीस संघटक बी एल संतोष यांच्या उपस्थित ही बैठक होणार आहे. यामध्ये जागा वाटपाबाबत चर्चा होणार आहे.