मुंबई, दि.29 जानेवारी 2024 | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अपात्र प्रकरणात आज सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात ओबीसी नेत्यांची छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी काल बैठक झाली. या बैठकीत सगेसोयरेचा निर्णय रद्द करण्याबाबतचा ठराव करण्यात आला. सांगलीतील कवठेमहांकाळ शहरातील एसटी स्टँडसमोरील पाटील होंडा शोरूम व महांकाली स्विटमार्टला भीषण आग लागली. या आगीत 30 ते 35 गाड्या जळून खाक झाल्या. नागपूर जिल्ह्यातील उमरेड कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची जिप्सी उलटली. यामुळे काही पर्यटक जखमी झाले. यासह राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
पुणे | “गोडसेच्या कृत्याबाबत वैचारिक गोंधळ नको. गांधीजी यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि हत्येची जवाबदारी सुद्धा स्वीकारल्याचं गोडसे यांनी मान्य केल्यानंतर आता त्यात गोंधळ घालण्याचं काम कोणी करायला नको. गोडसे यांनी हत्येची पार्श्वभूमी, तयारी हे सगळं विस्तृतपणे लिहून दिल्यानंतर सुद्धा ते आणखी कोणाच्या संपर्कात होते हा विचारच चुकीचा आहे”, अशी प्रतिक्रिया हिंदू महासंघाचे प्रमुख आनंद दवे यांनी दिली आहे.
पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह वाढत आहे. अमृतसरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीच्या बैठकीला नवज्योतसिंग सिद्धू अनुपस्थित राहिले. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सिद्धू यांना बोलावण्यात आले होते, मात्र त्यांनी पाठ फिरवली.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कूचबिहारमध्ये सांगितले की त्यांनी (बीएसएफ) निवडणुकीच्या वेळी चार जणांना गोळ्या घालून ठार केले. मारले गेलेले लोक निवडणूक रॅलीत होते. आता सीमावर्ती भागात बीएसएफ स्वतंत्रपणे देखरेख करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तुम्ही (बीएसएफ) असे करू नका, असे केले तर तुम्हाला येथून हाकलून दिले जाईल. आमच्या कायदेशीर व्यवस्थेत हस्तक्षेप करू नका.
राजकीय पक्षांनी त्यांच्या जाहीरातील जात किंवा धर्माचा उल्लेख करणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, नितीश कुमार भाजपासोबत जायला नको होतं, त्यांनी चूक केली आहे. लोकशाहीसाठी चांगले नाही. त्यामुळे बिहारमध्ये एनडीएचे नुकसानच होणार असून इंडिया आघाडीचा फायदा होणार आहे, इंडिया आघाडीचा पहिला विजय असेल.
नागपूर | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच मराठा आरक्षणामुळे ओबीसी वर्गात निर्माण झालेल्या गोंधळाबाबत फडणवीस यांनी आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. “सरकार ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. भाजप सत्तेत असेपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही. आताचा निर्णय हा सरसकट नाही. नोंदी असणाऱ्यांना केवळ प्रमाणपत्र देणार”, असं फडणवीस म्हणाले. ते नागपुरात बोलत होते.
पुणे – आयटी हब म्हणून ओळख असलेल्या हिंजवडीमध्ये 26 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणीची हत्या ही प्रेम प्रकरणातूनच झाल्याचं स्पष्ट झालंय. इन्फोसिस मध्ये काम करणाऱ्या वंदना द्विवेदी या 26 वर्ष तरुणीचे आरोपी ऋषभ निगम याच्याशी गेले कित्येक वर्षापासून प्रेम संबंध सुरू होते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये वंदना आणि ऋषभ यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. वंदना ही सॉफ्टवेअर इंजीनियरिंगचे काम करत असताना ऋषभ ब्रोकर होता. त्यामुळे वंदना आपल्याला सोडून जाईल असं त्याला वाटत होते. तिचे इतर प्रेम संबंध असल्याचा संशय ही त्याला होता. त्याचमुळे ऋषभ याने वंदना हिला हिंजवडी मधल्या एका लॉजवर बोलवले आणि २७ तारखेला रात्री तिची पाच गोळ्या घालून हत्या केली. नाकेबंदीमध्ये मुंबई पोलिसांनी त्याला काल अटक केल्यानंतर आता हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.
नवी दिल्ली : राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. दोन एप्रिल 2024 रोजी संपणार राज्यसभेची टर्म. त्यापूर्वी 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. अधिसूचना – 8 फेब्रुवारी 2024 रोजी निघणार असून अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख – 15 फेब्रुवारी 2024 असणार आहे. अर्जाची छाननी – 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत तर अर्ज मागे घेण्याची मुदत – 20फेब्रुवारी 2024 असणार आहे. मतदान – 27 फेब्रुवारी 2024 सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत होणार आहे. तर मतमोजणी – 27 फेब्रुवारी 2024 संध्याकाळी 5 वाजता होणार आहे.
महामंडलेश्वर शांतीगीरी महाराज नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. रामराज्य आणण्यासाठी आपण लोकसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे शांतीगिरी महाराजांचे म्हणणे. शांतिगिरी महाराज यांनी यापूर्वी संभाजीनगर मधून निवडणूक लढवली होती.
पिंपरी-चिंचवडच्या काळा खडक भागात सुरू होणाऱ्या एसआरए योजनेला स्थानिकांनी विरोध केला आहे.
खाजगी बिल्डरच्या माध्यमातून ही योजना राबवली जात आहे, कसलीही माहिती दिली जात नसून तुम्हाला घर देतो, राहती घरं खाली करा असं आमिष दाखवलं जात असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव यांनी म्हटले आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विरोधातच स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेचे बोंबाबोंब आंदोलन, स्वाभिमानी संघटनेने कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. छगन भुजबळ यांच्याशी बोलण्यासाठी थोडासा तरी वेळ द्या, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी मराठा आरक्षणासंदर्भात दिली आहे.
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात अजित पवारांनी बैठक घेतली आहे. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, “कोल्हापूर जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. बरीच कामं हातात घेतली पण ती पूर्ण करता आली नाहीत.”
कोल्हापूर- जिल्हाधिकारी कार्यालयात अजित पवारांची बैठक सुरू असतानाच बाहेर कुटुंबासह आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. अतिक्रमण केलेलं घर पाडल्याने या कुटुंबाने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. मौजे सांगाव इथलं कुटुंब असल्याची माहिती आहे.
रवींद्र वायकर ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची आज चौकशी होणार आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी त्यांची आज चौकशी होणार आहे.
बोर्डाच्या परीक्षेआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. लिखाणाची रोज तयारी करा. जेवढी जास्त तयारी कराल तेवढे चांगले परिणाम दिसतील, असा मोलाचा सल्ला मोदींनी विद्यार्थ्यांना दिला आहे.
झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांच्या दिल्लीतील घरी ईडीचं पथक दाखल झालं आहे. कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी सोरेन ईडीच्या रडारवर…
राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात SC त सुनावणी पार पडली आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागणार… असा निर्णय कोर्टाने दिला आहे.
शरद पवार आज दिल्लीकडे रवाना होणार… संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार दिल्लीला जाणार… शिवाय निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या सुनावणीसाठी शरद पवार दिल्लीला जाणार… आज तीन वाजता मुंबईहून दिल्लीकडे रवाना होणार
नारायण राणे अतृप्त असलेला आत्मा… अधिसूचनेवरुन राणेंनी घेतलेल्या भूमिकेवर विनायक राऊत यांची टीका… एकाचं ओरबडून खायचं आणि दुसऱ्यांकडे ढेकर द्यायची राणेंची सवय असं देखील विनायक राऊत म्हणाले…
लासलगाव ( नाशिक ) : कांदा प्रश्नी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाले आहेत. कांद्याच्या दरात मोठी घसरण. लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव बंद पाडले. कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी ; अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
जे भाजपासोबत जात नाहीत त्यांना त्रास देण्याचं काम सुरू आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर राजकीय सूडातून कारवाई केली जात आहे. भाजपासोबत गेल्यावर कारवाई बंद केली जाते, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
नारायण राणे मराठा समाजाच्या अन्नात विष कालवायला बघत आहेत, असा थेट आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
सोशल मीडियावर बोलण्यापेक्षा प्रत्यक्षात बोलावं, अधिसूचनेसंदर्भात टीका करणाऱ्यांना मनोज जरांगेंचे चोख प्रत्युत्तर
छगन भुजबळ यांच्या बंगल्यावर आज सकाळी 11 वाजता महत्त्वाच्या सर्व ओबीसी नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत ओबीसींच्या न्याय हक्कासाठी पुढची दिशा ठरवली जाणार आहे.
प्रकाश अण्णा शेंडगे चंद्रकांत बावकर जेडी तांडेल आणि इतर मराठा नेत्यांसोबत छगन भुजबळ यांची महत्त्वाची आणि तातडीची बैठक होईल.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची आज चौकशी होणार आहे. आज सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात रवींद्र वायकर यांची होईल. जोगेश्वरी भूखंड घोटाल्याप्रकरणी त्यांची आज चौकशी होणार आहेत. रवींद्र वायकर आजही ईडी-ऑफिसमध्ये जातात की नाही हे पाहणं महत्वाचं असेल.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे चार दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिकमध्ये चार दिवस तळ ठोकून असणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळच्या दौऱ्यावर येणार आहेत. नरेंद्र मोदी ११ फेब्रुवारीला यवतमाळला येतील. पंतप्रधानाचा संभाव्य दौरा लक्षात घेत आज जिल्हा प्रशासनाने तातडीची बैठक बोलवली आहे. पंतप्रधान ११ फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावर येणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारी बैठक आज होत आहे. पोलीस, महसूलसह २५ विभागांवर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. यवतमाळच्या किन्ही इथे पंतप्रधान मोदींची सभा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
पुण्यात आज संजय राऊत यांची आगळीवेगळी मुलाखत रंगणार आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे संजय राऊत यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. पुण्यातील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात सुषमा अंधारे संजय राऊत यांची मुलाखत घेणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दोन नेत्यांमध्ये आज पुण्यात मुलाखत रंगणार आहे.
वैजापूर तहसील कार्यालयात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न. सुनील जाधव असं आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव. शेतीच्या रस्त्याच्या वादातून शेतकऱ्याने केला आत्मदहनाचा प्रयत्न. पोलिसांनी वाचवले शेतकऱ्याचे प्राण. शिऊर गावातील शेतकऱ्याने केला वैजापूर तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न.
मनोज जरांगे पाटलांच्या रायगड दौऱ्यासाठी राज्यभरातील कार्यकर्ते एकवटले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी आज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून रायगडला जाणार. “जरांगे पाटील आज रायगडला जाणार आहेत. त्यामुळे आम्ही देखील त्यांच्यासोबत जाणार आहोत. मराठा आरक्षणाबाबत जरांगे जे म्हणतील ते आम्ही करणार आहोत” असं कार्यकर्त्यांनी सांगितलं.
धाराशिव तालुक्यात सापडल्या 700 नवीन कुणबी मराठा नोंदी. धाराशिव तालुक्यातील उपळा, जवळे दुमला व वाघोली या गावच्या 700 कुणबी मराठा नोंदी बार्शी येथील रेकॉर्डमध्ये सापडल्या. अहवाल तहसीलदार शिवानंद बिडवे यांनी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्याकडे केला सुपूर्द. मोडी लिपीतील या नोंदी असून यात जन्म मृत्यू अशा स्वरूपाच्या नोंदी आहेत. या सर्व नोंदी ऑनलाईन करण्यात येणार. उपळा येथील 654, वाघोली 23 व जवळा दुमला येथे 29 जणांच्या कुणबी नोंदी सापडल्या
पुण्यातून रेल्वेने अयोध्येत जाणाऱ्या भाविकांना अजून काही दिवस वाट बघावी लागणार. पुण्यातून अयोध्येसाठी 15 विशेष गाड्या 30 जानेवारीपासून सोडल्या जाणार होत्या. अयोध्येतील गर्दीमुळे या गाड्यांचे वेळापत्रक पुढे ढकलले जाण्याची शक्यता. इंडियन रेल्वे केटरिंग टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) या गाड्या सोडणार आहे. या गाड्यांसाठी एकट्या प्रवाशाला तिकीट आरक्षित करता येणार नाही. प्रवाशांचा समूह असेल तरच तिकिट आरक्षित करता येईल. यासाठी किमान 15 प्रवाशांचा समूह आवश्यक. अयोध्येतील गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या गाड्यांचे वेळापत्रक काही दिवस पुढे ढकलण्याचे रेल्वेचे नियोजन.
शरद मोहोळ हत्याप्रकरणी आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. शरद मोहोळ हत्या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या 15 आरोपींसह फरार आरोपी गणेश मारणेवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत कारवाई कारवाई करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता बाबत आज सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टात ही सुनावणी होणार आहे. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. अजित पवार गटातील आमदारांचे निलंबन करावं या मागणीसाठी ही याचिका आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर जात आहे. यावेळी गोकुळ दूध संघाच्या भेटीसह जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचा देखील उद्घाटन होणार आहे.
सांगलीतील कवठेमहांकाळ शहरातील नवीन एसटी स्टँड समोरील पाटील होंडा शोरूम व महांकाली स्विटमार्ट ला भीषण आग लागल्याने लाखोचे नुकसान झालेले आहे. या भीषण आगीमध्ये अंदाजे 30 ते 35 गाड्या जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे. तर या आगीमध्ये साधारणता चार ते पाच दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे होंडा शोरूमचे झाले आहे.