मुंबई | दि. 13 मार्च 2024 : राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी १२ वाजता बैठक होणार आहे. राज्यात उन्हाळ्याची चाहूल सुरु झाली आहे. अनेक शहरांचे तापमान वाढले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या माध्यमातून शुक्रवारपासून तीन दिवस नागपुरात आरएसएस मंथन होणार आहे. परिवहन विभागाच्या १८७ इंटरसेप्टर वाहनांना हिरवा झेंडा दाखविण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज करणार आहेत. आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्यावर टीका केल्यानंतर शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी आज कार्यकर्त्यांची बैठक बोलवली आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
मुंबई | देशासह राज्यात पक्षपातळीवर लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. अवघ्या काही दिवसांनी निवडणूक जाहीर होणार आहे. या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपकडून मुंबईतील गोपाल शेट्टी आणि मनोज कोटक या दोघांना यंदा उमेदवारी मिळणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच या दोघांसोबत हायकमांडसह फोनद्वारे याबाबतची चर्चा झाल्याचंही समजतंय.
पुरंदर | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा आज पुरंदर दौरा केला. सुनेत्रा पवार यांनी या दौऱ्यादरम्यान पुरंदरचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दादा जाधवराव यांची भेट घेतली. दा जाधवराव यांची भेटी दरम्यान दोघांच्यात काहीवेळ चर्चा झाली. लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्या गाठी भेटी वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी भोर तालुक्याच्या दौऱ्या दरम्यान काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची घेतली होती भेट, त्यानंतर आता पुरंदर दौऱ्यावर असताना घेतली दादा जाधवराव यांची भेट घेतली.
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी कर्नालच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी नायब सिंग सैनी यांच्यासाठी कर्नाल विधानसभा जागा सोडण्याची घोषणा केली.
बनावट शस्त्र परवाना प्रकरणी न्यायालयाने बाहुबली मुख्तार अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. वाराणसीच्या खासदार-आमदार न्यायालयाने जन्मठेपेसह दोन लाखांचा दंड ठोठावला आहे.
मुख्य निवडणूक आयोग राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाचे पथक जम्मू-काश्मीर दौऱ्यावर पोहोचले आहे. श्रीनगरमध्ये आयोगाच्या पथकाने राजकीय पक्ष तसेच प्रशासकीय आणि पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली.
दिल्ली पोलिसांनी संयुक्त किसान मोर्चाला रामलीला मैदानावर महापंचायत आयोजित करण्याची परवानगी दिली आहे. या बाबी लक्षात घेऊन संयुक्त किसान मोर्चाला परवानगी देण्यात आली आहे. पंचायतीच्या वेळी 5000 पेक्षा जास्त लोक नसतील आणि ट्रॅक्टर ट्रॉली आणण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कार्यक्रम तीन तास चालेल, जो सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत चालेल.
पुणे : लोकशाहीमध्ये कोणी लढावे हा त्यांचा अधिकार आहे. शिवतारे जेव्हा सेनेत होते तेव्हाच त्यांना आधीच दादांनी सांगून पाडलं होतं. शिवतारे महायुतीमध्ये आहेत म्हणून आम्ही बोलत नव्हतो. पण त्यांना जशास तसे उत्तर द्यायला आम्ही खंबीर आहोत असा पलटवार राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी केला.
पुरंदर : माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या ताफ्यात फिक्स खासदार २०२४ अशी टॅगलाइन घेऊन विजय शिवतारे यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली. विजय बापूना एक मत म्हणजे पवारांना संपवण्याचा दुर्मिळ योग अशी टॅगलाईन घेवून या गाड्या निघाल्या आहेत.
मुंबई : गेल्या 25 वर्षांपासून शिवसेना महापालिकेत सत्तेत होती. तेव्हाही गुजराती वृत्तपत्रात गुजराती भाषेत टेंडरच्या जाहिराती यायच्या. मुकेश अंबानी म्हणाले होते की रिलायन्स ग्रुप हा गुजरातचा आहे. तेव्हा संजय राऊत गप्प का होते? तेव्हा गुजरातींचे अतिक्रमण नव्हते का? गुजरातींचे मुंबईवर अतिक्रमण सुरु आहे असे राऊत म्हणतात. पण, अंबानीच्या लग्नात आदित्य ठाकरे जाऊन नाचतात हे कसे काय चालते? तेव्हा गुजरातींचे अतिक्रमण नाही होत का? असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांना केला.
नाशिक : श्रीकांत शिंदे यांनी काहीही निर्णय जाहीर करो. जय बाबा भक्त परिवाराचा निर्णय आहे की लोकसभा लढवायची आणि जिंकायची. भाऊसाहेब चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणली. यावेळी सकारात्मक चर्चा झाली. त्यांनी सांगितलं दोन दिवसानंतर निर्णय घेऊ. आता पुढील शब्द त्यांनी ठरवावा असे आव्हान शांतीगिरी महाराज यांनी दिलंय.
धुळे : गॅरंटी हा शब्द राहुल गांधी यांनी पहिल्यांदा वापरला, तेव्हा त्यांची टिंगल उडवली गेली. पण, कर्नाटकात यश मिळाल्यानंतर मोदींनीही गॅरंटी शब्द वापरायला सुरुवात केली, अशी टीका कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत केली. शेतकऱ्याशी निगडित चार गॅरंटी कॉंग्रेस देत आहे असेही ते म्हणाले. Msp साठी कायदा केला जाणार आहे. तसेच, कर्जमाफी आयोग गठीत करणार, कर्जमाफी होणार, पीक विमा योजना ही खासगी कंपन्यासाठी आहे ती शेतकरी हिताची करणार असेही त्यांनी सांगितले.
पुण्याती पुरंदर तालुक्यातील खळद येथे महिला बालकल्याण विभागाच्या प्रशिक्षण कार्यशाळेला सुनेत्रा पवार हजर राहणार आहेत. यावेळी महीला बचत गटाना देखील सुनेत्रा पवार मार्गदर्शन करणार आहेत.
केंद्रातील भाजपा सरकार केवळ विरोधी पक्षांना ईडी, सीबीआय आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे कारवाई करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. विरोधी पक्षांच्या एकूण 121 लोकांवर कारवाई केली असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.
एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनातील पाटी बदलली..
मोहन जोशी यांच्याशी चर्चा केली. लोकसभेची नाही पण पक्षात या म्हणून त्यांनी मला सांगितलं. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना सांगतो असं म्हणले. काँग्रेसची जी रॅली सुरू आहे, त्यामध्ये ते देखील बोलतो असं म्हणाले, असे वसंत मोरे यांनी म्हटले.
पंतप्रधान यांना घेवून यायचं बारामती दाखवायची. पश्चिम भाग दाखवा ना २२ गावात प्यायला पाणी नाही. जे बागायत आहे ते ब्रिटिशकालीन आहेत, असे थेट विजय शिवतारे यांनी म्हटले आहे
भारतातील सर्व गरीब महिला मजुरांच्या खात्यात काँग्रेस सरकार आल्यानंतर दरवर्षी एक लाख रुपये टाकले जातील, राहुल गांधी यांनी आश्वासन दिलंय.
लोकसभेच्या जागा वाटपाची घोषणा कधीही होऊ शकते आणि आम्ही सगळे तयारीमध्ये आहोत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे योग्य तो निर्णय घेणार आहेत आणि आमच्या जागा कुठेही कमी होत नाहीत. चुकीच्या बातम्या आमच्याबाबत पसरवल्या जात आहेत. आमच्या जागा आम्ही लढवणार आहोत आणि जास्तीत जास्त जागा लढून आम्ही तिथे उमेदवार जिंकून आणू, असं संजय गायकवाड म्हणाले.
नागपूर – नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवसीय अखिल भारतीय प्रतिनिधी सभा होणार आहे. त्या संदर्भात आरएसएसची पत्रकार परिषद थोड्या वेळात सुरू होईल. अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर ही पत्रकार परिषद घेणार आहेत.
नागपूर – नागपुरातील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रामध्ये काही दिवसांपूर्वी कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचं समोर आलं होतं. तेव्हा कोंबड्यांना मारण्यासाठी आणि नंतर संपूर्ण केंद्र सॅनिटाइस करण्यासाठी ज्या 89 कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावले होते, त्या सर्वांची बर्ड फ्लू संदर्भातील चाचणी नकारात्मक आली आहे. त्यापैकी कोणालाही एव्हियन इन्फ्लुएन्झाची लागण झालेली नसल्याचं निष्पन्न झाले आहे. दरम्यान त्यापैकी दोन कर्मचाऱ्यांना कोरोना असल्याचं निष्पन्न झालं आहे.
धुळे- खासदार राहुल गांधी यांचं थोड्याच वेळात महिला न्याय हक्क परिषदेच्या ठिकाणी आगमन होणार आहे. याठिकाणी ते महिलांना मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेसाठी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती पहायला मिळतेय. जयराम रमेश, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार प्रणिती शिंदे, खासदार रजनी पाटील यांचीही उपस्थिती आहे.
सांगली – शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दूषित पाणीपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून जलशुद्धीकरण केंद्र स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरातल्या माळ बंगल्यावरील जलशुद्धीकरण केंद्रावर सध्या पालिका प्रशासनाकडून युद्धपातळीवर साफ-सफाई आणि दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातल्या काही भागात बुधवारी पाणी पुरवठा होऊ शकणार नसल्याने पाणी जपून वापरण्याचे आवाहन सांगली महापालिकेकडून करण्यात आले आहे.
वसंत मोरे यांना काँग्रेसकडून ऑफर… वसंत मोरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा… काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी भेट घेऊन केली विनंती… कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार, वसंत मोरे यांचे स्पष्टीकरण.. वसंत मोरे लोकसभा लढवण्यावर ठाम…
येत्या 2 दिवसात मी माझा निर्णय जाहीर करणार… काँग्रेसकडून मला विचारणा करण्यात आली आहे, माजी आमदार मोहन जोशींचा फोन आला होता… मी पुणे लोकसभा लढवण्यावर ठाम आहे… कुणाकडून लढणार ते लवकरच जाहीर करणार.. कालच्या निर्णयामुळे माझ्या आईला दुःख झालं आहे, तिच्या डोळ्यात पाणी आलं… मला राज ठाकरेंशी बोलायचं नाही… अविनाश जाधव यांनी काही बोलू नये, अन्यथा मलाही बोलावं लागेल आणि लवकरच त्यांच्या टीकेला उत्तर देणार… असं वक्तव्य वसंत मोरे यांनी केलं आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या घरी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राहुल गांधी पोहचले.. अवघ्या काही वेळानंतर राहुल गांधी धुळे शहरातील महात्मा गांधी चौकात येणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात येणार…
शरद पवार नाशिकमध्ये दाखल… नाशिकमध्ये शरद पवार यांच जोरदार स्वागत… ढोल ताशांच्या गजरात पवारांचे स्वागत… ठाकरे गट आणि शरद पवार गटात जागा वाटपाचा तिढा… शरद पवार गटाकडून देखील नाशिकच्या जागेवर दावा… शरद पवार आज उमेदवार निश्चित करण्याची शक्यता
अंबरनाथचं अनधिकृत डम्पिंग देतंय नागरिकांना श्वसनाच्या आजाराचं निमंत्रण… आंदोलनानंतरही अनधिकृत डम्पिंग सुरूच असल्याने संताप… कचऱ्याला आग लावली जात असल्याने नागरिकांचं आरोग्य धोक्यात
भाजप 200 पण करू शकणार नाही. देश संकटात असल्यावर मतभेद विसरून एकत्र याव लागतं.
दिल्लीमध्ये मराठी माणसाचा अवमान सहन झाला नाही, म्हणून आम्ही आमची भूमिका मांडली. नितीन गडकरींना दिलेल्या ऑफरबद्दल संजय राऊत यांची प्रतिक्रिया.
राहुल गांधी यांचे थोड्याच वेळात धुळे शहराच्या नगाव बारी भागात होणार आगमन… थोड्याच वेळात धुळे शहरात रोडशो सुरू होईल. काँग्रेस सह राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट आणि ठाकरे गटाच्या वतीने विविध चौकात राहुल गांधी यांचे स्वागत होणार.
बैल गेला आणि झोपा केला… जेव्हा उद्धव ठाकरेंनी फिरायला पाहिजे होतं तेव्हा ते घरात बसले.अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना मातोश्री मधून बाहेर पडले नाहीl, उद्धव ठाकरे यांच्या यवतमाळ वाशिम दौऱ्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी खोचक टीका केली.
जेव्हा शिवसैनिकांशी संवाद साधायला पाहिजे होता तेव्हा साधला नाही. अख्खी शिवसेना एकनाथ शिंदेंच्या सोबत गेली तेव्हा त्यांना जाग आली. पण आता जाग येऊन त्यांच्या हाताला आता काहीच लागणार नाही, असा टोलाही दरेकर यांनी लगावला.
नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाची आज 12 वाजता होणार बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडेल.
लोकसभा निवडणुकीपूर्वी ही शेवटची बैठक आहे.
ठाणे शहरातील घोडबंदर रोडवरील कापूरबावडीपासून गायमुखपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या 9-9 मीटर सेवा रस्त्याचा समावेश मुख्य रस्त्यांमध्ये करण्यात येणार आहे. सेवा रस्त्यांचा समावेस मुख्य रस्त्यांमध्ये करावा, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. सरनाईकांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून लवकरच या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
बिटकॉईन या वर्षाच्या सुरुवातीला 3 जानेवारी 2024 रोजी किंमत 45 हजार डॉलर इतकी होती. आज बिटकॉईनची किंमत जवळपास 72 हजार 800 डॉलरच्या पार गेल्या आहेत. भारतीय चलनात ही किंमत 60,28,145 रुपये आहे. म्हणजे एक बिटकॉईन खरेदीसाठी 60 लाख
रुपये मोजावे लागतील. डिसेंबर 2021 नंतर 63,725 डॉलरपेक्षा तो पुढे गेला.
संसदेत महिलांना 33 टक्के आरक्षण मिळाल्यावर महिलांचा राजकारणातील सहभाग वाढेल अशी अपेक्षा आहे. मात्र यंदा होणाऱ्या कल्याण, भिवंडी, ठाणे लोकसभा निवडणुकीत महायुती महिला उमेदवार देणार नाही हे चित्र स्पष्ट दिसत आहे. परंतु महाविकास आघाडी, मनसे हे पक्ष नेमके काय करतात, याकडे महिला मतदारांचे लक्ष लागले आहे.
नागपूरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे लोकाभिमुख काम करत असल्याने त्याना बिनविरोध लोकसभा खासदार निवडून द्यावं अशी मागणी करणारे फलक हातात घेऊन सामाजिक संघटनांनी मागणी केलीय.
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची ११ मार्चला सोमवारी रात्री बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर दुसरी यादी आज येण्याची शक्यता आहे.या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्व समिती सदस्य तसेच त्या त्या राज्यातील प्रमुख नेते बैठकीला उपस्थित होते.
कारागृहातील बंद्यांना कपडे धुण्यासाठी पाच वॉशिंग मशीन व कपडे सुकविण्यासाठी पाच ड्रायर मशीन देण्यात आले आहेत. कैद्यांच्या मनोरंजनासाठी एकूण ३८ टीव्ही संच देण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेंतर्गत कारागृहातील पात्र कैद्यांची ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली असून या अंतर्गत पाच लाखापर्यंत वैद्यकीय उपचाराचे कवच दिले जाणार आहे. या योजनेतर्गत लाभार्थी कैद्यांना आयुष्मान भारत कार्डचे वाटप करण्यात आले.
सोने मागील दहा दिवसांत 3,430 रुपयांनी तर चांदीत 2300 रुपयांनी उसळली. या आठवड्यात अजून दोन्ही धातूंना मोठी कामगिरी बजावता आली नाही. सोन्याची किंमत किंचित कमी झाली तर चांदीचा भाव 500 रुपयांनी वाढला.
उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर. बारामती दौऱ्यात अजित पवारांचा सभांचा धडाका. अजित पवारांच्या उपस्थित पार पडणार तब्बल सात सभा. या सभेत सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता. बारामती तालुक्यातील सुपे परगणा,कोऱ्हाळे बु, झारगडवाडी,सोमेश्वरनगर, माळेगाव,पेन्सिल चौक येथे होणार सभा. या सभांच्या माध्यमातून अजित पवार शक्ती प्रदर्शन करणार
उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या धर्तीवर दादरच्या सिद्धीविनायक मंदिर परिसराचा विकास होणार. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने अर्थसंकल्पात 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. लवकरच मंदिर विकासाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलीये. खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबतचे पत्र दिलय.
कौटुंबिक वादातून मेहुण्याने केली जावयाची हत्या. बेलतरोडी पोलीस स्टेशन हद्दीतील घटना. नागपूर शहरातील बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रचना गृह निर्माण सहकारी संस्था येथे काम करणाऱ्या एक तरुणाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रवी कहार असे हत्या झालेल्याचं नाव आहे. रवी कहारची हत्या त्यांच्याच मेहुण्याने अरुण अन्नू बनवारी याने केली आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या उमेदवारीवरून चुरस रंगली. भाजपकडून भागवत कराड यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती, तर शिंदे गटाकडून संदीपान भुमरे यांचे नाव अंतिम. मात्र जागा कुणाला मिळणार यावरून संभ्रम कायम. तर उध्दव ठाकरे यांच्याकडून चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे या दोन नावांची चर्चा.
पुण्याच्या भोर तालुक्यातील आठ बिटमधील 267 अंगणवाडी सेविकांना शासनातर्फे नवीन स्मार्ट फोनचे वाटप करण्यात आले. यामुळं अंगणवाडी सेविकांचा कारभार पुन्हा स्मार्ट होणार आहे. शासनाकडून देण्यात आलेल्या नवीन स्मार्ट फोनमध्ये अनेक ॲप समाविष्ट करून देण्यात आल्याने, आता अंगणवाडी सेविकांना काम करणे अधिक सुलभ होईल.
निवडणूक कामात टाळाटाळ खपवून घेतली जाणार नाही. निवडणूक संबंधित सर्व यंत्रणांनी तत्पर राहण्याचे आदेश नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी काढले आहेत. प्रशासनाने लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी जोरात सुरुवात केली आहे. सगळ्या विभागांचा समन्वय साधण्यासाठी बैठका होत आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या माध्यमातून शुक्रवारपासून तीन दिवस नागपुरात आरएसएस मंथन आहे. 15 ते 17 मार्च दरम्यान नागपुरात आरएसएसची प्रतिनिधी सभा होणार आहे. यात देशभरातील प्रतिनिधी सहभागी होणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या अगोदर ही सभा होणार असल्याने राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राज्य मंत्रीमंडळ बैठक घेत आहे. दुपारी १२ वाजता ही बैठक होणार आहे. तसेच परिवहन विभागाच्या १८७ इंटरसेप्टर वाहनांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत.