मुंबई, दि.31 जानेवारी 2024 | बिहारपाठोपाठ शेजारील राज्य झारखंडमध्ये आज महत्त्वाची राजकीय घडामोड घडू शकते. ईडीकडून हेमंत सोरेन यांची जमीन घोटाळा प्रकरणात चौकशी सुरु आहे. हेमंत सोरेन यांच्या अडचणी वाढल्यास त्यांच्याजागी त्यांची पत्नी कल्पना सोरेन मुख्यमंत्री बनू शकतात. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकार विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यांनी सग्या सोऱ्याच्या कायद्याची अमलबजावणी करण्यासाठी सरकारला 15 दिवसांची मुदत दिली आहे. कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर मी येत्या 10 फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण करणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. यासह राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
मुंबई | राज्य सरकारच्या गृह विभागाने वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. त्यानुसार आता पंकज देशमुख हे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक असणार आहेत. नागपूर पोलीस आयुक्त पदी रवींद्र कुमार सिंगल यांची वर्णी लागली आहे. नागपूर पोलीस आयुक्त अमितेशकुमार आता पुणे पोलीस आयुक्त म्हणून कारभार पाहणार आहेत.
एम सुदर्शन हे चंद्रपूरचे नवे पोलीस अधीक्षक असणार आहेत. चंद्रपूरचे विद्यमान अधिक्षक रवींद्रसिंग परदेशी यांची परभणी येथे बदली करण्यात आली आहे. तर एस राजकुमार हे सोलापूरचे नवे पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी पाहणार आहेत.
मुंबई | लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी आणि त्यांना निवडून देणाऱ्या लाखो मुंबईकरांचा अपमान शिंदे सरकारने चालवला आहे. मुंबईच्या विकास कामांसाठी केवळ सत्ताधारी आमदारांना निधी देण्यात आलाय. तर विरोधी पक्षाच्या आमदारांना हा निधी देण्याचं शिंदे सरकारने टाळलं आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. या नितीचा आम्ही तीव्र धिक्कार करत असून याबाबत शिंदे सरकारला घेरलं जाईल, असा इशारा मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड यांनी दिला.
चेक बाऊन्स प्रकरणी नागपूर पोलिसांनी माजी क्रिकेटपटू प्रशांत वैद्य याला बुधवारी अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध जारी अजामीनपात्र अटक वॉरंटवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 90 च्या दशकात भारतीय संघासाठी एक वनडे सामना खेळलेल्या वैद्यला कोर्टात हजर करण्यात आले आणि त्यांनी त्याला वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडले.
हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यातील एका घराच्या अंगणात एक संशयास्पद फुगा सापडला असून त्यावर पाकिस्तानचा झेंडा आणि PIA असे लिहिलेले आहे. घुमरविन उपविभागातील भापरल ग्रामपंचायतीचे उपप्रमुख पृथ्वीराज यांच्या घरी हा फुगा पडलेला असल्याचे पोलिसांनी सांगितले. पृथ्वीराज यांनी पाहिले की फुग्यावर पाकिस्तानचा झेंडा आणि हिरव्या अक्षरात PIA लिहिलेले होते. त्यानंतर पृथ्वीराज यांनी स्थानिक लोकांना आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली.
पुणे : शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी मोक्का, तडीपार, एम.पी.डी.ए अंतर्गत पोलीस आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. आयुक्तांनी दहशत पसरवणाऱ्या १०० सराईत गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढ्या कमी कालावधीत अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे.
शहापूर : शहापूर तालुक्यातील भातसई येथील गाडगे महाराज प्राथमिक आदिवासी आश्रम शाळेमधील विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणातून विषबाधा झाली. दुपारी ही संख्या कमी होती मार त्यात आणखी वाढ झाली आहे. 63 मुली आणि 46 मुले अशा एकूण 109 जणांना विषबाधा झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 11 फेब्रुवारी रोजी यवतमाळ दौऱ्यावर येणार आहेत. यानिमित अमरावती परिक्षेत्राचे प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांनी जिल्ह्यात येऊन जागेची पाहणी केली.
मुंबई : राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपला. कुठल्याही फॅक्टसचा आधार न घेता जी कामे निवडणूक आयोगाकडे चालतात त्या धर्तीवर मांडणी केली आहे. त्यांच्या गटाकडे कोणतेही मुद्दे नव्हते. त्यामुळे आम्हीच जिंकू असा आम्हाला विश्वास आहे, असे अजितदादा गटाचे मंत्री अनिल पाटील म्हणाले.
जालना शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणीसाठी जालना महानगर पालिकेसमोर काँग्रेसच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.
केळी पिक विम्याचे पैसे मिळत नसल्याने जळगावात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांनी शेतकऱ्यांना सोबत पिक विमा कंपनीच्या कार्यालयातील खुर्च्या फेकल्या तसेच पोस्टर फाडले. 4 तारखेच्या आत केळी पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविणार असल्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
हिंदुत्ववादी संघटनांनी उद्या 1 फेब्रुवारी रोजी अक्कलकोट शहर बंदची हाक दिली आहे. सोमशेखर किवडे या तरुणाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ अक्कलकोट बंदची हाक दिली आहे.
आम्ही या पूर्वीचं नीधीसाठी आवाज उचलला होता की आम्हाला आमदार निधी मिळत नाही निधीबाबत सरकार दुजाभाव करत आहे सत्ताधाऱ्यांना निधी मिळतो आम्हाला मिळत नाही,असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला आहे. आरटीआयच्या माध्यमातून ते उघड झाल्याचं त्या म्हणाल्या.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने कथित मद्य घोटाळ्याप्रकरणात पुन्हा समन्स बजावले आहे. ईडीने या प्रकरणात त्यांना पाचव्यांदा समन्स बजावले आहे.
हिंदुत्ववादी संघटनांकडून उद्या 1 फेब्रुवारी रोजी अक्कलकोट शहर बंदची हाक देण्यात आली आहे. सोमशेखर किवडे या तरुणाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली आहे. प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेची विटंबना का केली असा जाब विचारल्याने सोमशेखर याला मारहाण झाल्याचा हिंदुत्ववादी संघटनाचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपी व्यक्तींवर गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. उद्या पोलिसांना या संदर्भात निवेदन देखील देण्यात येईल, हिंदू महासभेचे अध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांनी माहिती दिली.
नोंदी नाहीत, अशा मराठा बांधवाना सगेसोयऱ्यातून आरक्षण मिळणार असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. यासंबंधीचे प्रमाणपत्र मिळाल्यावर राज्यात महादिवाळी साजरी होणार आहे. तसेच अजून एक मोठी सभा घेण्याचा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातून देण्यात येणारा मानाचा शिव सन्मान पुरस्कार हा भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आला असून येत्या 19 फेब्रुवारीला सैनिक स्कूल ग्राउंड सातारा येथे भव्य दिव्य असा हा सोहळा पार पडणार असल्याचे निमंत्रक श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले महाराज यांनी सांगितले.
छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर चित्रपट आहे. त्यावर सेन्सर बोर्ड मध्ये बसलेला जिहादी अडथळे आणतोय. महाराजांवर चित्रपट असेल आणि हे जिहादी वळवल करत असतील तर हे जिहादी कसे ठेचायचे आम्हाला माहिती, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला. हा चित्रपट लवकर प्रकाशित होईल, असा दावा त्यांनी केला.
छगन भुजबळ यांना माणसं मोजायला पुलावर उभे रहा असे मी सांगितले होते. मराठ्यांची 64 किलोमीटर रांग होती आणि एकूण 27 टप्पे होते. पुलावर वही पेन घेऊन थांबा असे सांगितले होते. पण ते थांबले नाहीत, त्यांना मराठे कसे दिसतील, असा चिमटा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काढला. मंडल आयोग कोर्टाने स्वीकारलेला नाही. त्यामुळे छगन भुजबळने जर पुन्हा पुन्हा काड्या केल्या तर मी शंभर टक्के मंडल आयोग चॅलेंज करेल.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी तेलंगणा मधून लोकसभा लढवणार… तेलंगणा मधील लोकसभा मतदारसंघ अद्याप निश्चित नाही… प्रियंका गांधी रायबरेली मधून निवडणूक लढवणार… तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांची घोषणा
श्रीगोंदा तालुक्यातील कोळगावयेथे छगन भुजबळ यांचे पोस्टर फडल्याने तणावाचे वातावरण… भुजबळ यांच्या उपस्थित अहमदनगर येथे येत्या 3 तारखेला ओबीसी एल्गार मेळाव्याचे आयोजन… सभेच्या पार्श्वभूमीवर जिल्हातील अनेक ठिकाणी बॅन
अकलूजची पारंपारिक राज्यस्तरीय लावणी स्पर्धा पुन्हा एकदा सुरू होणार…. 9,10,11 फेबृवारि 2024 ला अकलूजमध्ये रंगणार लावणी … 27 वर्षापासून सुरू असणारा लावणी महोत्सव गेल्या सहा वर्षापासून होता बंद….. लावणी महोत्सवातील सहभागी लावणी कलावंतांसाठी सुमारे वीस लाखाची रोख बक्षीस दिले जाणार… प्रताप कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष स्वरूपाराणी मोहिते पाटील यांची अकलूज येथे घोषणा
नागपूरच्या हिंगणा पोलिस स्टेशन हद्दीत कोतेवाडा भागात 2 कोटी रुपये असलेली बॅग घेऊन आरोपी फरार झाल्याची माहिती समोर येत आहे. कोतेवाडा भागातील इंपिरियल सिटी भागात सकाळी घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅव्हल्स इजेन्सीचे पैसे घेऊन दोघे अमरावती मार्गाने मुंबईकडे जाताना लूट केली. हिंगणा पोलीस घेत आहे घटनेची माहिती…
पुणे विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ… विमानच्या उड्डाणाला वेळ प्रवाशांचा विमानातच राडा… स्पाइस जेट कंपनीच्या विमानाला तब्बल 15 तासांचा लेट… पुण्यावरून दिल्लीला निघालेल्या विमानाला 15 तासांचा झाला विलंब… काल सायंकाळी 4.20 मिनिटांनी सुटणार होतं विमान… त्याच विमान तब्बल 15 तासाने म्हणजे आज सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी दिल्लीसाठी झालं रवाना… तांत्रिक अडचणीमुळे विमान उड्डाणाला वेळ लागल्याचा कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे…
कोल्हापुरातील वादग्रस्त मदरसा अतिक्रमण कारवाईबाबत आज दुपारी तीन वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर बैठक होणार आहे. मदरसा ट्रस्टचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांमध्ये ही बैठक होणार आहे. ही बैठक पूर्ण होईपर्यंत कोणतीही कारवाई केली जाणार नाही. कारण सोबतच्या बैठकीत काय तोडगा निघतो याकडे लक्ष लागून आहे. लक्षतीर्थ वसाहत परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
फेब्रुवारी महिन्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. विधिमंडळ अधिवेशनपूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा मंत्रिमंडळ विस्तारासाठी असल्याची सूत्रांची माहिती आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
विमानसेवेला पुन्हा एकदा खराब हवामानाचा फटका बसला आहे. पुणे विमानतळावरून जाणारी 3 विमाने रद्द झाली आहेत. दिल्लीतील हवामानामुळे आणि उत्तरेकडील काही केंद्रांवर आज फ्लाइट रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. हवामान खराबामुळे गेल्या 15 दिवसांत अनेक फ्लाईट्स रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
“उद्याचा अर्थसंकल्प हा नारीशक्तीचे पर्व असेल. सगळे खासदार या अधिवेशनात शेवटचं भेटत आहेत. ते सगळे आत्मपरीक्षण करणार आहेत. विरोधकांनी कठोर शब्दात टीका केली असली तरी, त्यांची नोंद इतिहासात ठेवली जाईल. पण ज्यांनी फक्त नकारात्मक विचार दाखवले त्यांची नोंद कोणी घेणार नाही. निवडणुका असल्यामुळे पूर्ण बजेट सादर केले जाणार नाही, नवीन सरकार आल्यानंतर पुन्हा नवे बजेट सादर केले जाईल”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. नव्या संसदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पहिल्यांदा भाषण करत आहेत. राष्ट्रपतींकडून माझी माती माझा देश अभियानाचा उल्लेख करण्यात आला आहे.
पुण्याच्या ग्रामीण भागात विद्युत रोहित्र चोरीला जाण्याच्या घटना मध्ये वाढ झाली आहे. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांकडून विद्युत रोहीत्रा मधील तारांची चोरी केली यामुळे अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने रब्बी हंगामातील पिकांना पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित केलं.
नवी दिल्ली – केंद्र सरकारचा मोठा निर्णय. मोबाईल फोनच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या प्रमुख घटकांवर आयात शुल्क कमी. आयात शुल्क 15 टक्क्यांवरून 10 टक्के. मोबाईल धारकांसाठी केंद्र सरकारकडून मोठा दिलासा
ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीच्या संचालकपदी भाजपचे 4 नेते आहेत. 2024 ची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाचं नियोजन आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
आम्ही पलटूराम होणार नाही, असेही त्यांनी खडसावले.
मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेला ओबीसी संघटनांकडून कोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. ओबीस वेलफेअर फाऊंडेशनचे ॲड. मंगेश ससाणे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
कोल्हापूरात अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येत आहे. कारवाईसाठी पालिका अधिकारी आणि पोलिसांचं पथक दाखल झालं आहे.
राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गट अलर्ट मोडवर आहे. कुढल्याही फॉर्मवर सही करू नका अशा सुचना अजित पवार यांनी आमदारांना दिल्या आहेत.
नाशिकमध्ये आयकर विभागाने धाड टाकली आहे. उद्याजक आणि राजकिय क्षेत्राशी संबंधीत लोकांवर छापा पडल्याची चर्चा आहे.
मुंबईत केवळ सत्ताधारी आमदारांनाच विकास निधी मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीच्या अधिकारत ही माहिती मिळाली आहे. मुंबईतील 36 आमदारांपैकी 21 सत्ताधारी आमदारांनाच केवळ निधी मिळाला आहे. विरोधी पक्षातील 11 आमदारांना पालिकेकडून निधी मिळालेला नाही.
शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन झाले. अनिल बाबर यांच्या अंत्यसंस्कारासाठी मुख्यमंत्री शिंदे आटपाटीकडे रवाना होणार आहेत.
5 फेब्रुवारीपासून ओबीसींची महाएल्गार यात्रा निघणार आहे. मराठवाड्यातून यात्रेला सुरूवात होणार आहे. मंत्री भुजबळ आणि पडळकर या यात्रेचं नेतृत्त्व करणार आहे.
ट्रिपल इंजिन सरकार भुजबळांचं ऐकत नाही हा भुजबळांचा आपमान आहे असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे आमरण उपोषणाला बसणार आहेत. अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्याच्या मागणीसाठी ते उपोषण करणार आहेत.
19 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा असणार आहे. पुणे विमानतळाच्या नविम टर्मिनलचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते पुण्यात मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याच होणार उद्घाटन. रुबी हॉल ते रामवाडी दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन. 19 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात. रूबी हॉल ते रामवाडी हा मेट्रो मार्ग सुमारे 5.5 किलोमीटरच्या तिसऱ्या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या आरक्षणबद्दल केलेल्या वक्तव्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाने काळजी न करण्याच आवाहन केलं आहे. आरक्षणाचा कायदा मोठा आहे.हे समाजाने लक्षात घेतले पाहिजे. ‘सरसकट’ या शब्दाला काही होणार नाही. कितीही जण एकत्र आले तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळणारच असा ठाम विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन. वयाच्या 74 व्या झाले निधन. शिवसेना शिंदे गटाचे खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन. न्यूमोनिया झाल्याने काल दुपारी दाखल केले. सांगलीतील हॉस्पिटलमध्ये केले होते दाखल.
मनसेचे जिल्हाध्यक्ष, उप जिल्हाध्यक्ष यांनी मागितली खंडणी. सोयाबीन, कापूस व्यापाऱ्याकडे मागितली 2 लाखांची खंडणी. व्यापाऱ्याला मारहाण ही केली. चिखली येथील गोविंद अग्रवाल यांची पोलिसांत तक्रार. मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल. मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, मनसे उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष प्रदीप भवरसह 10 ते 15 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल