मुंबई : आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अर्थसंकल्प सादर करतील. त्यामुळे (Maharashtra budget 2023 live) फडणवीस हे राज्यातील जनतेसाठी काय घोषणा करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे राज्यातील 14 महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. त्यामुळेही अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. आजच्या अर्थसंकल्पात (Maharashtra budget News) जुन्या योजनांसाठी भरपूर तरतूद करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच नव्या योजनांही लागू करण्याची शक्यता आहे. खासकरून आरोग्य आणि कृषी या दोन क्षेत्रावर आजच्या अर्थसंकल्पात (Maharashtra budget updates) काय तरतूद असणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. यासह अर्थसंकल्पाच्या बातम्या जाणून घ्या.
राजू शेट्टी यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया :
राज्य सरकारचे बजेट म्हणजे चाट मसाला. तेवढ्यापुरते चविष्ट वाटतं पण हाताला काही लागत नाही
6 हजार प्रोत्साहन अनुदान जाहीर केलं, पण केवळ रासायनिक खतात किती वाढ झाली बघा
छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेतून राहिलेल्या शेतकऱ्यांची अवस्था घर का ना घाट का अशी झाली होती त्यांच्याबाबत घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे
धान उत्पादन शेतकऱ्याबाबत घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे
अतिरिक्त मालाच्या साठवणूक आणि प्रक्रियाबाबत कोणतीही घोषणा झाली नाही
या अर्थसंकल्पात खोली कमी उथळपणा जास्त आहे
पुणे :
– भिडे वाड्यासाठी अर्थसंकल्पात 50 कोटींची तरतूद केल्यामुळे भाजपकडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा,
– प्रदेश ओबीसी आघाडीचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वात जल्लोष,
– भिडे वाड्याच्या पेढे वाटून भाजपकडून आनंदोत्सव साजरा केला जातोय
नोकरदार महिलांसाठी 50 वसतीगृहे, दोन योजना एकत्र करुन ‘शक्तीसदन’ ही नवी योजना
शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतीगृहांची निर्मिती
दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना
या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा
या योजनेत 50 नवीन ‘शक्तीसदन’ निर्माण करणार
Maharashtra Budget 2023 LIVE : विद्यार्थ्यांना आता चांगली शिष्यवृत्ती आणि गणवेश मोफत मिळणार आहेत.
महाराष्ट्राच्या 2023 च्या अर्थसंकल्पात आता विद्यार्थ्यांना चांगली शिष्यवृत्ती आणि गणवेश मोफत मिळणार आहेत.
स्थानिक सरकारी शाळांमध्ये आठवीपर्यंतच्या सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिले जातील.
झाडे झुडे जीव सोईरे पाषाण…
पर्यावरणपूरक विकास
– राज्याचे नेट झिरो उत्सर्जन साध्यतेसाठी उपाययोजना करणार
– 20,000 ग्रामपंचायतीत सौर उर्जा प्रकल्प
– भुसावळ येथे 500 किलोवॅटचा हरित हायड्रोजन प्रकल्प, सौर उर्जेचा वापर करणार
– जायकवाडी नाथसागर जलाशयात तरंगत्या सौरउर्जा पॅनेलद्वारे वीजनिर्मिती
– शैवाळ शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अभ्यासगट
– हरित हायड्रोजन, हरित अमोनिया, सौर, पवन उर्जा क्षेत्रात 75,000 कोटींची गुंतवणूक अपेक्षित
– 15 वर्ष जुनी शासकीय वाहने निष्कासित करणार
– 8 ते 15 वर्षांत खाजगी वाहने निष्कासित केल्यास नवीन वाहनखरेदीसाठी कर सवलत
– एसटी महामंडळात 5150 इलेक्ट्रीक बसेस
– डिझेलवरील 5000 बसेस द्रवरुप नैसर्गिक वायू इंधनावर परावर्तित करणार
– पर्यावरण सेवा योजनेचा 7500 शाळांमध्ये विस्तार
– स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 तलाव संवर्धनाचा कार्यक्रम
– प्रत्येक जिल्ह्यात धार्मिक व औषधी वृक्षांची अमृत वन उद्यानांची निर्मिती
– ग्रामीण भागात कडूनिंब, वड, उंबर, देशी आंबा, बेल असे पंचायतन
– धार्मिक स्थळाच्या परिसरात देवराई
– औषधी व व्यावसायिक वृक्षांच्या प्रजाती संवर्धनासाठी 50 हायटेक रोपवाटिका
– गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात आफ्रिकन सफारी, पक्षी उद्यान यावर्षी
– शिवनेरी (जुन्नर) येथे बिबट सफारी
नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला निधी
सोलापूर-तुळजापूर-धाराशिव ब्रॉडगेज : ४५२ कोटी रुपये
नांदेड-बिदर, फलटण-पंढरपूर, खामगाव-जालना, वरोरा-चिमूर-कांपा या प्रकल्पांना ५० टक्के राज्य हिस्सा देणार
सेतूबंधनअंतर्गत राज्य रेल्वेफाटक मुक्त करण्यासाठी २५ नवीन उड्डाणपूल
१०० बसस्थानकांचे आधुनिकीकरण आणि पुनर्बांधणीसाठी सुमारे ४०० कोटी
एसटी महामंडळाला ५,१५० ईलेक्ट्रीक बसेस मिळणार,
लिक्वीड डीझेसच्या ५,००० बसेस
शिर्डी विमानतळावर नवे प्रवासी टर्मिनल: 527 कोटी
छत्रपती संभाजीनगर विमानतळ भूसंपादनासाठी : 734 कोटी
नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार
पुरंदर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ
नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी
बेलोरा (अमरावती), शिवणी (अकोला) येथे विमानतळ विकासाची कामे
आदिवासी बांधवांच्या शिक्षणासाठी…
– 250 शासकीय आदिवासी आश्रमशाळांना आदर्श आश्रमशाळा करणार
– अनुसूचित जमातीच्या 100 विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी अधिछात्रवृत्ती
……
अल्पसंख्यकांसाठी…
– अल्पसंख्यक महिलांच्या आर्थिक विकासासाठी 15 जिल्ह्यात 3000 बचतगटांची निर्मिती
– उच्च शिक्षण घेणार्यांना शिष्यवृत्ती: 25,000 वरुन 50,000 रुपये
असंघटित कामगार/कारागिर/
टॅक्सी-ऑटोचालक/दिव्यांगांसाठी…
– 3 कोटी असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ, सामाजिक सुरक्षा, कल्याणकारी योजना राबविणार
– ऑटोरिक्षा व टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करणार
– माती कारागिरीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, संत शिरोमणी गोरोबा काका महाराष्ट्र मातीकला मंडळाला 25 कोटी
– स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागामार्फत शिक्षण, पुनर्वसन, रोजगाराच्या योजना राबविणार
– मुंबईच्या सुशोभिकरणासाठी : 1729 कोटी रुपये
– एमएमआर क्षेत्रात पारसिक हिल्स बोगदा, मीरा-भाईंदर पाणीपुरवठा, मुंबई पारबंदर प्रकल्प, विविध उड्डाणपूल यावर्षी पूर्ण
– ठाणे-वसई खाडी जलवाहतुकीने जोडणार: 424 कोटी रुपये
– गेट वे ऑफ इंडियाजवळ रेडिओ क्लबनजीक प्रवासी जेट्टी, इतर सुविधांचे निर्माण : 162.20 कोटी
यावर्षी 10 लाख घरांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम
इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षांत 10 लाख घरांची ‘मोदी आवास घरकुल योजना’
– प्रधानमंत्री आवास योजना: 4 लाख घरे
(2.5 लाख घरे अनुसूचित जाती-जमाती, 1.5 लाख इतर प्रवर्ग)
– रमाई आवास : 1.5 लाख घरे/1800 कोटी रुपये
(किमान 25 हजार घरे मातंग समाजासाठी)
– शबरी, पारधी, आदिम आवास : 1 लाख घरे/1200 कोटी रुपये
– यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत: 50,000 घरे/600 कोटी
(25,000 घरे विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी धनगर : 25,000 घरे)
– इतर मागासवर्गियांसाठी नवीन घरकुल योजना : मोदी आवास घरकुल योजना : 3 वर्षांत 10 लाख घरे /12,000 कोटी रुपये
(या योजनेत यावर्षी 3 लाख घरे बांधणार/3600 कोटी रुपये)
रेल्वे प्रकल्पांना भरीव तरदूत आणि एसटी बसस्थानकांचे आधुनिकीकरण
– नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला निधी
– सोलापूर-तुळजापूर-धाराशिव ब्रॉडगेज : 84 कि.मी/452 कोटी रुपये
– नांदेड-बिदर, फलटण-पंढरपूर, खामगाव-जालना, वरोरा-चिमूर-कांपा या 4 प्रकल्पांना 50 टक्के राज्यहिस्सा देणार
– सेतूबंधनअंतर्गत राज्य रेल्वेफाटक मुक्त करण्यासाठी 25 नवीन उड्डाणपूल
– 100 बसस्थानकांचे आधुनिकीकरण आणि पुनर्बांधणीसाठी सुमारे 400 कोटी
कोकण आणि आजरा, चंदगड तालुक्यासाठी काजू आणि बोंडू प्रकल्पा भरीव तरतूद
काजू प्रक्रियेसाठी कोकणासाठी 200 कोटीच्या भागभांडवलासह काजू धोरणाची निर्मिती
या प्रकल्पासाठी 5 वर्षात 1 हजार 325 कोटींची तरतूद
कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा आणि चंदगड तालुक्याला होणार फायदा
असंघटित कामगार : महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ
लिंगायत तरुणांना रोजगार : जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ
गुरव समाज : संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ
रामोशी समाज : राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ
वडार समाज : पैलवान कै. मारूती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ
ही महामंडळे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळांतर्गत संतपण करण्यात येणार असून यासाठी प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा निधी देणार
नागपूर-गोवा 860 किमीचा शक्तिपीठ महामार्ग तयार करणार
समृद्धी महामार्गाचं 88 टक्के काम पूर्ण
25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीअंतर्गत आणणार
3 कोटी असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ, सामाजिक सुरक्षा, कल्याणकारी योजना राबविणार
ऑटोरिक्षा व टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करणार
माती कारागिरीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, संत शिरोमणी गोरोबा काका महाराष्ट्र मातीकला मंडळाला 25 कोटी
स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागामार्फत शिक्षण, पुनर्वसन, रोजगाराच्या योजना राबविणार
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार, सिंदखेडराजा नोड ते शेगावपर्यंत चौपदरी रस्ता
पवनार (वर्धा) ते पात्रादेवी (सिंधुदुर्ग) महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग/86,300 कोटी रुपये (नागपूर-गोवा)
(माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, अंबेजोगाई ही शक्तीपीठे, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही दोन ज्योर्तिलिंग, नांदेड गुरुद्वारा, पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर जोडले जाणार)
या महामार्गाचा हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, वर्धा, यवतमाळ, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना लाभ
असंघटित कामगार : महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ
लिंगायत तरुणांना रोजगार : जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ
गुरव समाज : संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ
रामोशी समाज : राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ
वडार समाज : पैलवान कै. मारूती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ
ही महामंडळे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळांतर्गत संतपण करण्यात येणार असून यासाठी प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा निधी देणार
राज्यात जलयुक्त शिवार-2 राबवणार
महात्मा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा आता 5 लाखांवर
ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक महापालिका क्षेत्रात विरंगुळा केंद्र स्थापन करणार
ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा राज्य सरकारकडून विस्तार
वयोवृद्धांना वैद्यकीय उपकरणे, अन्य सुविधा उपलब्ध करून देणार
संजय गांधी निराधार/श्रावणबाळ योजनेत अर्थसहाय्य आता 1000 हून 1500 रुपये
राज्य सरकार अतिरिक्त 2400 कोटी रुपयांचा भार उचलणार
प्रत्येक महिन्यात पहिल्याच आठवड्यात नियमित प्रदान
महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत विमा संरक्षण 1.50 लाखांहून 5 लाख रुपये
त्यामुळे आता 5 लाख रुपयांपर्यंत उपचार घेता येणार
नवीन 200 रुग्णालयांचा यात समावेश करणार
मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे लाभ 2.50 लाखांहून 4 लाखांपर्यंत
राज्यभरात 700 स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना
शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतीगृहांची निर्मिती
अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या
दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना
या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा
या योजनेत 50 नवीन ‘शक्तीसदन’ निर्माण करणार
– राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत
– चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार
– महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर
– कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर
– मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना
– महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण
– माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार
मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात
पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ
जन्मानंतर मुलीला 5000 रुपये
पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये
अकरावीत 8000 रुपये
मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये
नाशिक : नमो शेतकरी योजनेची देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घोषणा,
धान उत्पादक शेतकऱ्यांना 15 हजार हेक्टरी मदत जाहीर,
शेतकऱ्यांचा पिकविमा आता राज्य सरकार भरणार.
उत्पन्न वाढीसाठी कोकणामध्ये प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात येतील. काजूच्या लागवडीपासून प्रक्रिया आणि विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी काजू फळ विकास योजना, संपूर्ण कोकण कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आणि आजरा या तालुक्यात राबवण्यात येईल. आगामी पाच वर्षात या योजने करता एक हजार तीनशे पंचवीस कोटी रुपये देण्यात येथील.
गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 3000 कोटींची तरतूद
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवणार
प्रत्येक शेतकऱ्यांच्या 6 हजारात अजून सहा हजारांची भर घालणार, त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये मिळणार
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करणार
शिवराज्यभिषेक दिन साजरा करणार, 350 कोटी रुपयांची तरतूद
मुंबई, अमरावती, नाशिक, संभाजी नगर, नागपूरमध्ये सार्वजनिक उद्याने विकसित करण्यात येणार, शिवाजी महाराजांची जीवन गाथा प्रसिद्ध केली जाईल
शिवनेरीवर महाराजांच्या जीवन चरित्रावर संग्राहालय उभारण्यात येईल
राज्यातला शेतकरी फार अडचणीत आहे. त्याला मदत होण्याची आवश्यकता आहे- दिलीप वळसे पाटील
शेतकऱ्यांसाठी ठोस आर्थिक तरतुद करण्याची गरज- दिलीप वळसे पाटील
ग्रामीण भागाकडे लक्ष दिल्या जात नसल्याचा दिलीप वळसे पाटील यांचा आरोप
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
देवेंद्र फडणवीस विधानसभेत दाखल, पहिल्यांदाच सादर करणार अर्थसंकल्प
शिंदे – फडणवीस सरकारचाही पहिलाच अर्थसंकल्प
फडणवीस यांच्या पोतडीत काय? संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं
नाफेडकडून अजूनही कांदा खरेदी सुरू नाही, अजित पवार यांचा दावा
तर नाफेडकडून कांदा खरेदी सुरू झाल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा
विरोधकांचा विधानसभेत गोंधळ, मुख्यमंत्री विरोधकांवर संतापले
चिंचवडमधील भाजपच्या आमदार अश्विनी जगताप यांनी पद आणि गोपनियतेची घेतली शपथ
कसब्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी घेतली पद आणि गोपनियतेची शपथ
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही आमदारांना दिली शपथ
मुख्यमंत्री शेतकरी कुटूंबातले असल्याने सर्वसामान्यांचे हित जाणतात- संयज शिरसाट
आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडतात- संयज शिरसाट यांचा टोला
संभाजीनगर मधील उद्धव ठाकरेंची सभा एप्रिल फुल बनविण्यासाठी- संयज शिरसाट
पुण्यातील विकास प्रकल्पांसाठी आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात भरीव तरतुदींची अपेक्षा
शहरातील पुरंदर येथे नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंग रोड, बीआरटी सेवेचा विस्तार, या विकास प्रकल्पांची कामे रखडलेलीच
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यातील विकास कामांना किती निधी देणार याकडे पुणेकरांचे लक्ष
राज्याचा अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत अर्थसंकल्प सादर करतील
तर राज्याला अर्थराज्यमंत्रीच नसल्याने विधानपरिषदेत अर्थसंकल्प कोण सादर करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे
मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभा अध्यक्षांना अर्थसंकल्प सादर करण्यासाठी काही मंत्र्यांची नावं दिली आहेत. त्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होणार आहे
आज सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पाकडे पुणेकरांचे लक्ष
पुणे शहराचे अनेक प्रकल्प रखडलेल्या अवस्थेत
आज पुण्यासाठी अर्थसंकल्पात काय मिळणार
पुण्यातील विकास प्रकल्पांसाठी आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात भरीव तरतुदींची अपेक्षा
शहरातील पुरंदर येथे नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंग रोड, बीआरटी सेवेचा विस्तार, या विकास प्रकल्पांची कामे रखडलेलीच
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यातील विकास कामांना किती निधी देणार याकडे पुणेकरांचे लक्ष
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अर्थसंकल्प सादर करणार
दुपारी सादर होणार अर्थसंकल्प
कृषी आणि आरोग्य विभागावर अधिक भर देण्याची शक्यता