Maharashtra Budget Session 2023 LIVE : आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण प्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारला धरले धारेवर

| Updated on: Mar 15, 2023 | 6:13 AM

Maharashtra Assembly Budget Session 2023-2024 LIVE Updates : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे. अधिवेशनात अर्थसंकल्पासह विविध मुद्द्यांवर चर्चा होत आहे. त्यामुळे आज अधिवेशनात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Maharashtra Budget Session 2023 LIVE : आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण प्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारला धरले धारेवर
Maharashtra Assembly Budget Session
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालचा दिवस सत्ताधाऱ्यांनी गाजवून सोडला. सत्ताधारी आमदारांनी शीतल म्हात्रे यांच्या मॉर्फ व्हिडीओच्या प्रकरणावरून सभागृह दणाणून सोडलं. या प्रकरणाची चौकशी करून आरोपीला पकडाच. पण या प्रकरणामागचा मास्टरमाइंड कोण आहे? त्यालाही ताब्यात घ्या, अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासह राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनातील सर्व महत्वाच्या घडामोडी वाचा क्लिक करा…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 Mar 2023 01:17 PM (IST)

    आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण प्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारला धरले धारेवर

    पाण्यासाठी आदिवासी महिलेला विवस्त्रकरुन मारहाण

    सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करावी, अजित पवार यांची मागणी

    पाण्यासाठी आदिवसी बांधवांची परवड सुरु आहे,

    पाण्यासाठी त्यांना अत्याचार सहन करावे लागत आहेत

    आदिवसी पाड्यांवर पाण्याची व्यवस्था करा, अजितदादांची मागणी

  • 14 Mar 2023 12:29 PM (IST)

    अब्दुल सत्तार राजीनामा द्या राजीनामा द्या… महाविकास आघाडीच्या नेत्यांची मागणी

     

    दहाव्या दिवशी शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्‍या अब्दुल सत्तारांच्या विरोधात महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक

    असंवेदनशील कृषीमंत्री अब्दुल सत्तारांची हकालपट्टी करा… गद्दार सत्तार हाय हाय… शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्‍या अब्दुल सत्तार यांचा धिक्कार असो…

    किसानों के गद्दारोंको जुते मारो सालों को… शेतकऱ्यांना वार्‍यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो…

    पन्नास खोके एकदम ओके… बोलाचीच कढी बोलाचिच भात जेवोनिया तृप्त कोण झाला… यंदाचा अर्थसंकल्प वाया गेला…

    अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली

    विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

  • 14 Mar 2023 09:00 AM (IST)

    ठाकरे गटानं आज सुप्रीम कोर्टात जोडपत्र केलं सादर

    पाच मुद्दे पुन्हा जोडपत्रातून मांडले

    आमदारांवर अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना आमदारांनी कार्यवाही केली.

    राज्यपालांनी अधिकारांचा गैरवापर करत बहुमत चाचणी बोलावली

    अध्यक्षीय निवडणूकीत अपात्र आमदारांनी मतदान केलं

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली

    राज्यपालांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला…

     

  • 14 Mar 2023 08:32 AM (IST)

    अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस

    नवी दिल्ली

    अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस

    आजही विरोधक आक्रमक होण्याची शक्यता

    काल पहिल्या दिवशी कामकाज न होता लोकसभा आणि राज्यसभा तहकूब

    राहुल गांधी यांच्या माफी मागण्याच्या मुद्द्यावरून भाजप आणि विरोधक आले होते आमने-सामने

    आज अदानी आणि तपास यंत्रणांचा मुद्दा घेऊन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता

  • 14 Mar 2023 07:53 AM (IST)

    सोलापुरातील 100 पेक्षा अधिक शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर काढणार बैलगाडा मोर्चा

    आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून बैलगाडी मोर्चा काढत शेतकरी मुंबईला निघणार

    दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील नियोजित एमआयडीसीसाठी भूसंपादन केलेल्या सातबारा उताऱ्यावरील नोंद कमी करण्याची शेतकऱ्यांची मागणी

    यासाठी 170 दिवसाहून अधिक काळ मंद्रूप ग्रामपांचायतीसमोर धरणे आंदोलन सुरु आहे

    उपोषण करूनही सरकारकडून केवळ आश्वासने मिळाली त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थाना बाहेर उपोषण करणार

    22 डिसेंबर रोजी एमआयडीसीच्या भूनिवड समितीने नियोजित जागेला भेट देऊन महिनाभरात उताऱ्यावरील नोंद कमी करण्याचे आश्वासन दिले होते

    मात्र भूनिवड समितीच्या भेटीला तीन महिने लोटले तरीही नोंद कमी न झाल्याने शेतकरी आक्रमक

  • 14 Mar 2023 07:44 AM (IST)

    एकाच दिवसात नाशिक शहरात आढळले सहा कोरोनाबाधित

    नाशिक ब्रेकिंग

    -एकाच दिवसात नाशिक शहरात आढळले सहा कोरोनाबाधित

    -शहरात एकूण तेरा कोरोना बाधित रुग्ण

    -अचानक वाढलेल्या कोरोना रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणा अलर्टवर

    -ग्रामीण भागात देखील आढळले सहा रुग्ण

    -सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण 25 पॉझिटिव्ह रुग्ण

  • 14 Mar 2023 07:17 AM (IST)

    गोकुळ दूध संघाच्या चाचणी लेखापरीक्षणाला ब्रेक

    कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या चाचणी लेखापरीक्षणाला ब्रेक

    राज्यात सत्तेत असलेल्या नेत्यांचा चाचणी लेखापरीक्षणाला विरोध

    राजकीय सूडबुद्धीतून गोकुळ वर कारवाई नको

    सत्तेतील नेत्यांचा सूर

    गोकुळच्या चाचणी लेखापरीक्षणाची संचालिका शौमिका महाडिक यांनी केली होती मागणी

    महाडिक यांच्या मागणीनंतर विशेष दुग्धविकास विभागाने 22 जानेवारीला दिले होते चाचणी लेखापरीक्षणाच्या आदेश

    चाचणी लेखापरीक्षणाचा अहवाल दहा दिवसात सादर करण्याच्याही दिल्या होत्या सूचना

  • 14 Mar 2023 06:35 AM (IST)

    अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी आज पुन्हा आमनेसामने

    अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आहे, शेतकऱ्यांना भरपाई द्यावी म्हणून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता

    शीतल म्हात्रे प्रकरणाचे आजही सभागृहात पडसाद उमटण्याची शक्यता

    शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून विरोधक शेतकऱ्यांना घेरण्याची शक्यता