Maharashtra Cabinet Minister 2024: राज्यातील १६ जिल्ह्यांची पाटी कोरी, पुणे, जळगाव-नाशिकमधून तीन-तीन मंत्री, साताऱ्यास सर्वाधिक मंत्रीपदे

| Updated on: Dec 15, 2024 | 7:29 PM

Maharashtra Cabinet expansion Check full list of ministers: भाजपने काही जुना चेहऱ्यांना वगळून नऊ नवीन चेहऱ्यांना संधी दिली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सहा नवीन चेहऱ्यांना या मंत्रिमंडळात स्थान दिले. तर अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये पाच नवीन चेहऱ्यांना संधी दिली.

Maharashtra Cabinet Minister 2024: राज्यातील १६ जिल्ह्यांची पाटी कोरी, पुणे, जळगाव-नाशिकमधून तीन-तीन मंत्री, साताऱ्यास सर्वाधिक मंत्रीपदे
devendra fadnavis cabinet expansion
Follow us on

Maharashtra Cabinet Minister 2024: महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार रविवारी झाला. या मंत्रिमंडळात ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात भारतीय जनता पक्षाचे १९, शिवसेनेचे ११ तर राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. रविवारी ३३ कॅबिनेट सहा राज्यमंत्री झाले. त्यात भाजपने काही जुना चेहऱ्यांना वगळून नऊ नवीन चेहऱ्यांना संधी दिली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सहा नवीन चेहऱ्यांना या मंत्रिमंडळात स्थान दिले. तर अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये पाच नवीन चेहऱ्यांना संधी दिली. राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये मंत्रीपदे आहे. परंतु १६ जिल्ह्यांमधी मंत्री म्हणून कोणालाच संधी नाही. पुणे, जळगाव-नाशिकमधून तीन-तीन मंत्री झाले आहेत. तसेच साताऱ्यास सर्वाधिक चार मंत्रीपदे दिली.

मंत्रिमंडळात समतोल साधण्याचा प्रयत्न

विधानसभा निवडणुकीत महायुतीला बंपर यश मिळाले. त्यात भाजपने १३२ जागा जिंकल्या. एकानाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ५७ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या. २३ नोव्हेंबर रोजी निकाल आल्यावर ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला. तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर दहा दिवसांनी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. फडणवीस सरकारमध्ये अनुभवी आणि नवखे असा संगम साधण्यात आला आहे. तसेच विविध जाती आणि धर्मातील लोकांनाही संधी दिली आहे.

असे आहे मंत्रिमंडळ

पक्ष नेते
भाजपा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री
शिवसेना एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार उपमुख्यमंत्री
भाजपा चंद्रकांत पाटील
भाजपा मंगलप्रभात लोढा
भाजपा राधाकृष्ण विखे पाटील
भाजपा पंकजा मुंडे
भाजपा गिरीश महाजन
भाजपा गणेश नाईक
भाजपा चंद्रशेखर बावनकुळे
भाजपा आशिष शेलार
भाजपा अतुल सावे
१० भाजपा संजय सावकारे
११ भाजपा अशोक उईके
१२ भाजपा आकाश फुंडकर
१३ भाजपा माधुरी मिसाळ
१४ भाजपा जयकुमार गोरे
१५ भाजपा मेघना बोर्डीकर
१६ भाजपा पंकज भोयर
१७ भाजपा शिवेंद्रराजे भोसले
१८ भाजपा नितेश राणे
१९ भाजपा जयकुमार रावल
२० शिवसेना दादा भूसे
२१ शिवसेना गुलाबराव पाटील
२२ शिवसेना संजय राठोड
२३ शिवसेना उदय सांमत
२४ शिवसेना शंभूराज देसाई
२५ शिवसेना प्रताप सरनाईक
२६ शिवसेना योगेश कदम
२७ शिवसेना आशिष जैस्वाल
२८ शिवसेना भरत गोगावले
२९ शिवसेना प्रकाश आबिटकर
३० शिवसेना संजय शिरसाट
३१ राष्ट्रवादी काँग्रेस हसन मुश्रीफ
३२ राष्ट्रवादी काँग्रेस आदिती तटकरे
३३ राष्ट्रवादी काँग्रेस धनंजय मुंडे
३४ राष्ट्रवादी काँग्रेस दत्तमामा भरणे
३५ राष्ट्रवादी काँग्रेस बाबासाहेब पाटील
३६ राष्ट्रवादी काँग्रेस नरहरी झिरवाळ
३७ राष्ट्रवादी काँग्रेस मकरंद पाटील
३८ राष्ट्रवादी काँग्रेस इंद्रनील नाईक
३९ राष्ट्रवादी काँग्रेस माणिकराव कोकाटे