नंदूरबार : महाराष्ट्रात पेट्रोल-झिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. राज्यातील परभणीत सर्वात महाग म्हणजे 94.65 रुपये प्रतीलीटर पेट्रोल असा भाव आहे. तर नंदूरबार जिल्ह्यात पेट्रोलचा दर 92.87 रुपये प्रतीलीटर इतका आहे. नंदूरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यात पेट्रोलचे दर 92 रुपयांच्या पुढे गेले आहेत. हे दर सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेले आहेत (petrol diesel price hike).
नंदूरबार जिल्ह्यात 67 टक्के आदिवासी जनता राहते. त्यांचा सध्या जगण्याचा संघर्ष सुरु आहे. त्यामुळे बेरोजगारी, दुष्काळ अशा स्थितीत एवढे महागडे पेट्रोल कसे भरावे आणि आर्थिक ताळमेळ कसा बसवावा या विचारात नंदुरबारकर पडले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्याला लागून असलेल्या गुजरात राज्यात पेट्रोलच्या किंमती कमी आहेत. त्यामुळे अनेक वाहन चालक फक्त पेट्रोल भरून घेण्यासाठी गुजरात राज्यातील सीमाभागातील पेट्रोलपंपांवर जात आहेत. दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकार यांनी आपआपल्या करात कपात करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याची मागणी जोर धरत आहे (petrol diesel price hike).
पेट्रोलचे दर आवाक्याबाहेर जाण्याचं कारण काय?
राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांकी गाठली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 90 च्या पार गेली आहे. तर डिझेलचे दर हे 80 रुपयांच्या पार गेले आहेत. मात्र, प्रक्रिया केल्यानंतर पेट्रोल पंपावर पेट्रोलचा मूळ दर हा 28.50 रुपये प्रति लीटर असते. तर डिझेलचा मूळ दर हा 29.52 रुपये प्रति लीटर असते. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या करांमुळे पेट्रोल-डिझेलचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. सरकार पेट्रोल आणि डिझेलवर त्याच्या मुळ किमतीच्या दुप्पटीपेक्षा जास्त कर आकारते.
सकाळी सहा वाजता जाहीर होतात पेट्रोल-डिझेलचे दर
दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत संबंधित शहरात नमदू केलेल्या दराप्रमाणे पेट्रोल-डिझेलची विक्री होते. पेट्रोल-डिझेलच्या मूळ किंमतीमध्ये अबकारी कर, डिलर्स कमिशन आणि अन्य गोष्टींचा समावेश झाल्यानंतर ही किंमत जवळपास दुप्पट होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात.
राज्यातील विविध शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर किती?
शहरं आजचे भाव कालचे भाव
अकोला 92.65 92.10
अमरावती 93.10 93.09
औरंगाबाद 92.50 92.82
भंडारा 92.91 92.77
बीड 93.60 92.05
बुलढाणा 92.80 92.25
चंद्रपूर 92.24 92.02
धुळे 92.51 91.96
गडचिरोली 93.06 93.04
गोंदिया 93.72 93.13
ग्रेटर मुंबई 92.32 92.20
हिंगोली 93.28 92.77
जळगाव 93.58 92.25
जालना 93.84 93.20
कोल्हापूर 92.11 92.31
लातूर 93.46 92.91
मुंबई 92.28 92.04
नागपूर 92.79 91.94
नांदेड 94.42 94.33
नंदूरबार 92.87 93.16
नाशिक 92.78 92.02
परभणी 94.65 94.12
पुणे 92.07 91.74
संबंधित बातमी : Petrol Price Today : देशातलं सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात, परभणीत दर 95 रुपयांकडे!