मुंबई : राज्यात कोरोनाचा विळखा (Corona Outbreak) अधिक घट्ट होत असल्याचं चित्र आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची (Corona Patient) संख्या झपाट्याने वाढतेय. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली (Corona Guidelines) जाहीर केली आहे. त्या नियमावलीनुसार आता राज्यात 10 जानेवारीपासून रात्रीची संचारबंदी (Night Curfew) लागू असणार आहे. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालये, मॉल, शॉपिंग मॉल, मैदानं, उद्याने, चित्रपट गृहे, केशकर्तनालय, सरकारी आणि खासगी कार्यालये आदींसाठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे मुंबई लोकल प्रवासासाठी कुठलेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 8, 2022
आपल्याला कुठलाही लॉकडाऊन करून सगळं ठप्प करायचे नाही. केवळ कायदे आणि नियम करून अशा आव्हानांचा मुकाबला होऊ शकणार नाही. कोरोनाचे दूत बनून इतरांचे आरोग्य धोक्यात आणू नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे pic.twitter.com/Lx8NT6S1bG
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 8, 2022
>> लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त 50 लोकांची उपस्थिती
>> अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त 20 लोकांची उपस्थिती
>> सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांसाठी जास्तीत जास्त 50 लोकांची उपस्थिती
>> शाळा, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. मात्र 10 वी, 12वीचे वर्ग सुरु राहणार. तसंच शाळेतील प्रशासकीय कामे सुरु राहणार.
>> स्विमिंग पूल, जीम, स्पा, वेलनेस सेंटर्स आणि ब्यूटी सलून बंद राहणार
>> हेअर कटिंग सलून 50 टक्के उपस्थितीत सुरु राहणार, सलूनमध्ये कोरोना नियमांचे काटेकोर पालन आणि कामगारांना लसीचे दोन्ही डोस बंधनकारक, रात्री 10 पर्यंतच परवानगी
>> मनोरंजन पार्क, प्राणी संग्रहालय, म्युझियम बंद राहणार
>> शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार
>> चित्रपटगृहे, नाट्यगृह 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार
>> तारीख जाहीर झालेल्या सर्व परीक्षा होणार
इतर बातम्या :