मुंबई : राज्यात कोरोनाचा हाहा:कार माजलाय. राज्याची राजधानी मुंबई, उपराजधानी नागपूर आणि सांस्कृतिक राजधानी पुण्यात दिवसेंदिवस गंभीर परिस्थीत होत चालली आहे (Maharashtra Corona Update). या शहरांमध्ये गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झालीय. राज्यात दिवसभरात तब्बल 16 हजार 620 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मुंबईतील 1962, पुण्यातील 1740 तर नागपुरातील 2252 नव्या कोरोनाबाधितांचा समावेश आहे. कोरोनाचा वाढता आकडा चिंता वाढवणारं आहे. हा आकडा आणखी वाढण्याच्या आधी सर्वसामान्य जनतेने सावध होणं जास्त जरुरीचं आहे. अन्यथा परिस्थिती जास्त भीषण होत जाईल. त्यामुळे लॉकडाऊन सारख्या भयानक गोष्टींना पुन्हा तोंड देण्याची पाळी आपल्यावर ओढवण्याची शक्यता आहे.
दिवसभरात 50 रुग्णांचा मृत्यू
कोरोना संकट आणखी किती लोकांचा जीव घेईल? असा प्रश्न आता उद्भवतोय. राज्यात आज दिवसभरात तब्बल 50 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यात आतापर्यंत तब्बल 52 हजार 861 रुग्णांचा मृत्यू झालाय. राज्याचा मृत्यूदर हा 2.28 टक्क्यांवर पोहोचला आहे (Maharashtra Corona Update).
दिवसभरात 8 हजार 861 रुग्णांची कोरोनावर मात
राज्यात दिवसभरात 8 हजार 861 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत 21 लाख 34 हजार 72 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 92.2 टक्के इतकं आहे. राज्यात सध्या 5 लाख 83 हजार 713 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 5 हजार 493 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 17 कोटी 51 लाख 16 हजार टेस्ट करण्यात आल्या आहेत. यापैकी 23 लाख 14 हजार 413 टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत.
नागपुरात कोरोनाची भीषण परिस्थिती
नागपुरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात नागपुरात तब्बल 2252 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 12 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झालाय. नागपुरात आतापर्यंत 173547 जणांना कोरोनाची लागण झालीय. यापैकी 152959 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 16964 रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर आतापर्यंत 3584 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झालाय.
मुंबईतही कोरोना रुग्ण वाढले
मुंबई शहरातही गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मुंबईत आज दिवसभरात तब्बल 1962 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 1259 रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईत सध्या 13940 सक्रीय रुग्ण आहेत. मुंबईत दिवसभरात 7 रुग्णांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत एकूण 11531 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यातही आकडा वाढताच
पुण्यात दिवसभरात 1740 नवे कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. पुण्यात दिवसभरात 17 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यापैकी 2 रुग्ण हे पुण्याबाहेरील आहेत. आतापर्यंत 4952 रुग्णांचा मृत्यू झालाय. पुण्यात सध्या 355 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात सध्या 11590 रुग्ण सक्रीय आहेत.
राज्यभरात कुठे किती रुग्ण? पाहा सविस्तर आकडेवारी
जिल्हा | रुग्ण | बरे | मृत्यू |
---|---|---|---|
मुंबई | 343962 | 318995 | 11535 |
पुणे | 439562 | 405696 | 8144 |
ठाणे | 293052 | 274816 | 5873 |
पालघर | 49872 | 47852 | 939 |
रायगड | 72974 | 69761 | 1613 |
रत्नागिरी | 12336 | 11646 | 425 |
सिंधुदुर्ग | 6777 | 6359 | 180 |
सातारा | 60722 | 57120 | 1858 |
सांगली | 51829 | 49294 | 1800 |
नाशिक | 137449 | 128167 | 2093 |
अहमदनगर | 79880 | 76380 | 1171 |
धुळे | 18870 | 16902 | 337 |
जळगाव | 69604 | 63098 | 1542 |
नंदूरबार | 11448 | 10157 | 229 |
सोलापूर | 59754 | 56379 | 1859 |
कोल्हापूर | 50144 | 48056 | 1684 |
औरंगाबाद | 59429 | 50987 | 1289 |
जालना | 16713 | 15779 | 394 |
हिंगोली | 5342 | 4497 | 100 |
परभणी | 9332 | 7943 | 313 |
लातूर | 26927 | 25245 | 716 |
उस्मानाबाद | 18533 | 17413 | 576 |
बीड | 20796 | 18513 | 577 |
नांदेड | 26170 | 22710 | 692 |
अकोला | 20302 | 16111 | 404 |
अमरावती | 43318 | 38752 | 567 |
यवतमाळ | 21989 | 18875 | 497 |
बुलडाणा | 20865 | 17605 | 270 |
वाशिम | 11352 | 10120 | 169 |
नागपूर | 173547 | 152959 | 3584 |
वर्धा | 16143 | 14254 | 325 |
भंडारा | 14604 | 13711 | 315 |
गोंदिया | 14858 | 14440 | 175 |
चंद्रपूर | 25987 | 24485 | 422 |
गडचिरोली | 9325 | 8994 | 103 |
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) | 146 | 0 | 91 |
एकूण | 2314413 | 2134072 | 52861 |