मुंबई : राज्यात दिवसभरात तब्बल 56 हजार 647 नवे कोरोनाबाधित रुग्ण (Maharashtra Corona Update) आढळले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा दररोज वाढत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये दररोज कोरोनाचा उद्रेक बघायला मिळतोय. महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 47 लाख 22 हजार 401 वर पोहोचला आहे. यापैकी 39 लाख 81 जार 685 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आज दिवसभरात 51 हजार 356 रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण चांगलं जरी असलं तरी बाधितांचा वाढता आकडा ही चिंतेची बाब आहे. राज्यात काल दिवसभरात 63 हजारापेक्षाही जास्त रुग्ण आढळले होते. त्या तुलनेने राज्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यात कालपेक्षा आज सहा हजार नवे कोरोनाबाधित रुग्ण कमी झाले आहेत (Maharashtra Corona Update).
राज्यात दिवसभरात 669 रुग्णांचा मृत्यू
राज्यात नव्या कोरोनाबाधितांची संख्या सध्या 55 ते 70 हजारांच्या दरम्यान स्थिर आहे. कोरोना हा गुणाकार करतो. मात्र, हा गुणाकार थोपवण्यात प्रशासनाला काही प्रमाणात यश आलं आहे. याशिवाय राज्यात कडकडीत लॉकडाऊन असल्याने परिस्थितीत थोडीफार नियंत्रणात येताना दिसत आहे. मात्र, तरीही कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा आजही नियंत्रणात आलेला नाही. रोज शेकडो रुग्णांचा मृत्यू होतोय. राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 669 रुग्णांचा मृ्त्यू झालाय. रुग्णांचा मृत्यू आकडा कमी करणं हे सरकार आणि प्रशासनापुढील मोठं आव्हान आहे.
मुबंईत कोरोनाची परिस्थिती काय?
कोरोनाची दुसरी लाट आली तेव्हा मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा प्रचंड प्रमाणात वाढला. मात्र गेल्या काही दिवसांपासून हा आकडा हळूहळू कमी झाला आहे. मुंबईत आज दिवसभरात 3672 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर 5544 रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईत नव्या कोरोनाबाधितांचा आकडा कमी झाला असला तरी शहरात दिवसभरात तब्बल 79 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईत आजच्या घडीला 57 हजार 342 रुग्ण सक्रिय आहेत.
पुण्यात कोरोनाची नेमकी परिस्थिती काय?
पुणे शहरात सध्या दिवसभरात 4044 नवे रुग्ण आढळले. तर 66 रुग्णांचा दुर्दैवी मृ्त्यू झाला. पुण्यात सध्या 42 हजार 229 रुग्णांवर उपचार सुरु आहे. दिवसभरात 4 हजार 656 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. पण एकूण पुणे जिल्ह्याविषयी सांगायचं झालं तर परिस्थितीत चिंताजनक आहे. कारण पुणे जिल्ह्यात दिवसभरात 11 हजार 661 नवे रुग्ण बाधित झाले. 159 रुग्णांचा मृत्यू झाला. दुसरीकडे जिल्ह्यातील 9 हजार 566 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
नागपुरात मृत्यूचं तांडव, दिवसभरात जिल्ह्यात 112 रुग्णांचा मृत्यू
नागपूर जिल्ह्यात मृत्यूचं तांडव सुरु आहे. दिवसभरात तब्बल 112 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 5007 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 419370 असून एकूण मृत्यूसंख्या 7599 आहे. जिल्ह्यातील 6376 जणांनी आज कोरोनावर मात केली.
वाशिम जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक
वाशिम जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक पहायला मिळतोय. जिल्ह्यात आज 11 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 680 नवे रुग्ण सापडले. दिवसभरात 718 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील 32 दिवसांत 121 रुग्णांचा मृत्यू झाला तर 12493 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.
56,647 new cases and 51,356 discharges and 669 COVID-19 deaths reported in Maharashtra today.
Active cases: 6,68,353
Death toll: 70,284 pic.twitter.com/voea0c6qjX— ANI (@ANI) May 2, 2021