मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव काहीसा कमी झालेला पाहायला मिळतोय. अशावेळी राज्यातील 25 जिल्हातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तर 11 जिल्ह्यात अद्यापही लेवल 3 चे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. तशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबई लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी अशी आक्रमक मागणी आता होत आहे. भाजपसह अन्य विरोधी पक्ष आणि रेल्वे प्रवासी संघटनांकडून या मागणीसाठी आंदोलनही करण्यात येत आहे. तर व्यापारी वर्गही राज्य सरकारकडे शिथिलता देण्याची मागणी करत आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री जनतेशी काय संवाद साधणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (CM Uddhav Thackeray will address the people at 8 pm tonight)
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे काही भागात डेल्टा प्लस प्रकाराचे रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर उद्या कोरोना टास्क फोर्सची बैठक होणार आहे. तत्त्पूर्वी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहे. रात्री 8 वाजता मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधतील. यावेळी मुख्यमंत्री कोणता संदेश देतात? कोणती मोठी घोषणा करतात? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
राज्यातील व्यापारी वर्गात मोठी नाराजी नाही. पुण्यातील व्यापाऱ्यांनी सरकारचे नियम धुडकावून लावत दुकानं संध्याकाळपर्यंत सुरु ठेवली आहेत. हॉटेल आणि रेस्टॉरंट्सच्या मालकांनीही नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावेळी अजून तरी हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना पूर्ण मुभा देणं शक्य नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले होते. दुसरीकडे कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबईत लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी यासाठी भाजप, मनसे या विरोधी पक्षांसह सर्वसामान्य नागरिक आणि प्रवासी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे.
संबंधित बातम्या :
लॉकडाऊननंतर क्रॉफर्ड मार्केटमधील मासेविक्रेत्यांसमोर नवं संकट, जागाच मिळत नसल्याने धंदा बसला
पुणेकरांची गटारी फुल्ल जोशात; चिकन-मटणाच्या दुकानांबाहेर सकाळपासून रांगा
CM Uddhav Thackeray will address the people at 8 pm tonight