मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची (Corona Patient) संख्या झपाट्याने वाढतेय. मुंबई, पुणे, नागपूर अशा शहरांमधील कोरोना रुग्यसंख्येत मोठी वाढ होत आहे. अशावेळी आज राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा तब्बल 18 हजाराच्या पुढे गेलाय. तर साडे चार हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजच्या कोरोना आकडेवारीमुळे राज्यातील कोरोना स्थिती (Corona Situation) आता चिंताजनक बणल्याचं पाहायला मिळत आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज 18 हजार 466 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 4 हजार 558 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आज 20 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राज्यात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 66 हजार 308 वर पोहोचली आहे. कोरोनाच्या सुरुवातीपासूनची आकडेवारी पाहिली तर राज्यात आतापर्यंत 67 लाख 30 हजार 494 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 65 लाख 18 हजार 916 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या 1 लाख 41 हजार 573 झाली आहे.
#Maharashtra #COVID19 Updates for today
*⃣ 75 new cases of #OmicronVariant reported from Maharashtra today; 40 from Mumbai
*⃣ Patients infected with #Omicronvariant in Maharashtra reported till date- 653
(2/6)?@airnews_mumbai pic.twitter.com/g5nijPXLUy
— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) January 4, 2022
राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. तर दुसरीकडे ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झालेले रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. राज्यात आज 75 ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 40 रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. आजच्या 75 रुग्णांसह राज्यातील ओमिक्रॉन रुग्णांची एकूण संख्या आता 653 वर पोहोचली आहे.
मुंबई – 408
पुणे शहर – 71
पुणे ग्रामीण _ 26
पिंपरी-चिंचवड – 38
ठाणे – 22
पनवेल – 16
नागपूर – 13
नवी मुंबई – 10
सातारा – 8
कल्याण-डोंबिवली – 7
उस्मानाबाद, कोल्हापूर – 5
वसई विरार – 4
नांदेड, भिवंडी – 3
औरंगाबाद, बुलडाणा, मीरा भाईंदर, सांगली – 2
लातूर, अहमदनगर, अकोला, रायगड, उल्हासनगर, अमरावती – 1
मुंबई रुग्णवाढीचा वेग आता पाचव्या गिअरमध्ये असल्याचं आजच्या आकडेवारीवरुन दिसून आलं आहे. मुंबईत तब्बल 10 हजार पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून आले आहे. तर 654 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 92 टक्के असून सध्याच्या घडीला वाढलेल्या सक्रिय रुग्णसंख्येनं चिंतेत भर पडली आहे. 47 हजार 476 सक्रिय रुग्ण एकट्या मुंबईत असल्याचं आजच्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे.
#CoronavirusUpdates
४ जानेवारी, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण- १०८६०
२४ तासात बरे झालेले रुग्ण-६५४
बरे झालेले एकूण रुग्ण-७५२०१२
बरे झालेल्या रुग्णांचा दर-९२%एकूण सक्रिय रुग्ण- ४७४७६
दुप्पटीचा दर-११० दिवस
कोविड वाढीचा दर (२८ डिसेंबर- ३ जानेवारी)-०.६३%#NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 4, 2022
इतर बातम्या :