मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona OutBreak) पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या आरोग्य यंत्रणेसाठी (Health Department) चिंताजनक ठरत आहे. राज्यात आज कोरोनाचे 5 हजार 368 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. काल ही संख्या 3 हजार 900 इतकी होती. त्यात मुंबईत सर्वाधिक 3 हजार 928, त्या पाठोपाठ ठाण्यात 864 आणि पुण्यात 520 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर ही वाढ सरकारसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
मुंबईत आज 3 हजार 928 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या बुधवारी 2 हजार 510 इतकी होती. त्यामुळे मुंबईतील पॉझिटिव्हिटी रेट आता 8.5 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत आज 371 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत सध्या 11 हजार 360 सक्रीय रुग्ण असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.
#CoronavirusUpdates
३० डिसेंबर, संध्या. ६:०० वाजता#कोरोना_ला_ना #NaToCorona pic.twitter.com/6EXeNeZAVH— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) December 30, 2021
मागील 24 तासांत देशभरात 10 हजारांहून अधिक नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. महत्वाचे म्हणजे, गेल्या 33 दिवसांनंतर एका दिवसात एवढे रुग्ण समोर आले आहेत. याच वेळी, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये पॉझिटिव्हिटी रेट वेगाने वाढत असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिलीय. सध्या देशातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 82 हजार 000 एवढी आहे.
देशातील 8 जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. याच वेळी, 14 जिल्हे असे आहेत जेथे साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट 5-10 टक्के एवढा आहे. महाराष्ट्रात 9 डिसेंबरला पॉझिटिव्हिटी रेट 0.76 टक्के एवढा होता, तो आता 2.3 टक्के झाला आहे. याचप्रमाणे, बंगालमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 1.61 टक्के होता, तो वाढून 3.1 टक्के झाला आहे. तसेच, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीतील पॉझिटिव्हिटी रेट 0.1 टक्के होता, तो आता 1 टक्का झाला आहे.
Approximately 90% of the adult population in India has been vaccinated against #COVID19 with the first dose
More than 143.83 crore total doses have been administered so far
– @MoHFW_INDIA #IndiaFightsCorona pic.twitter.com/jFwtxWw1YA
— PIB India (@PIB_India) December 30, 2021
राज्यातील रुग्णवाढ ही चिंता वाढवणारी आहे. टास्क फोर्सच्या बैठकीत महत्वाची चर्चा झाली. कठोर निर्बंधांबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. तो निर्णय आज उद्यामध्येच घेतला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी टास्क फोर्सच्या बैठकीनंतर दिली आहे. ‘हे नक्कीच आहे की गर्दी टाळलीच पाहिजे. गर्दी नको कारण त्यामुळे संसर्ग झपाट्याने वाढेल. टेस्टिंग संदर्भात एसजीटीएफ हे कीट आहे. त्यातून ओमिक्रॉनचं डिटेक्शन होतं. ते किट वापरलं जावं, त्यामुळे डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण किती आणि ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण किती हे समजेल. तर ट्रिटमेंटवर ‘मोनोपिरॅमिल’ हे केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातील टास्क फोर्सनं मान्य केलेलं अॅन्टी व्हायरल ड्रग आहे. त्याची मागणी आणि पुरवठा याबाबत सविस्तर चर्चा झाली, अशी माहितीही टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
इतर बातम्या :