अभिनेते सय्याजी शिंदे यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘महायुतीचे मतदारसंघ कुणाला मिळणार हे जाहीर झालं नाही. बारामती आमच्याकडे आली तर पटेल यांनी सांगितलेली अंमलबजावणी केली पाहिजे. पण बारामती आमच्याकडे आला पाहिजे. आम्ही महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेऊन कुणाला मतदारसंघ दिले वगैरे त्याची माहिती देऊ. सिन्नरचे लोकं आग्रह करत आहेत. प्रत्येक कार्यकर्ता प्रेमापोटी बोलत असतो. आमदारांनी मागणी केली. बारामतीत असताना कार्यकर्त्यांनी तीव्र भावना बोलून दाखवल्या. राजकारणात आम्ही लोकशाहीला महत्त्व देतो. बहुमताचा आदर करावा लागतो. अनेकदा कार्यकर्त्यांचं ऐकावं लागतं. त्यांच्याही म्हणण्याला मान सन्मान द्यावा लागतो.’
अजित पवार पुढे म्हणाले की, मी, अनेक वर्ष भुजबळांनी जास्त काळ मंत्रिमंडळात काम केलं आहे. शेवटी काही असलं तरी त्या विभागाला काय वाटतं ते तो विभाग करतो. ओव्हररूल करण्याचा अधिकार कॅबिनेटला आहे. विभागत तिथे बसून निर्णय घेतो. कॅबिनेट चांद्यापासून बांद्यापर्यंतचा निर्णय घेते. काही निर्णय गरीब आणि वंचितांसाठी घ्यावे लागतात. निवडणुका आल्या म्हणून तुम्ही म्हणता. त्यांनी त्यांचं काम केलं. कॅबिनेटने कॅबिनेटचं काम केलं आहे.’
या आर्थिक वर्षात दोन महिने लोकसभेच्या आचारसंहिता. दोन महिने विधानसभेच्या. आचारसंहिता ३५ दिवसाची असली तरी काही वेळ जातो. या सर्वांचा विचार करून अर्थ संकल्प सादर केला. उद्याच्या काळात या निवडणुका झाल्यावरही व्यवस्थितपणे राज्याचा आर्थिक गाडा पुढे नेण्यात आम्ही यशस्वी होऊ. रामराजे नाईक निंबाळकरांशी मी, पटेल, तटकरे बोललो. आम्ही सर्व चर्चा करत आहोत. बातम्या येत असतात. अनेकांबद्दल येतात. त्यांनाही माहीत नसतं बातम्या कशा आल्या. पण निंबाळकर यांनी अजून कोणताही निर्णय घेतला नाही. असं ही अजित पवार म्हणाले.