Professors Recruitment | मोठा निर्णय ! राज्यात प्राध्यापक भरतीला मान्यता, पहिल्या टप्प्यात 2088 प्राध्यापकांची भरती

| Updated on: Nov 09, 2021 | 7:42 PM

राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. प्राध्यापकांच्या पहिल्या टप्यातील 2088 प्राध्यापक भरतीला आणि सर्व प्राचार्य पद भरण्याला मान्यता देण्यात आली आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिलीय.

Professors Recruitment | मोठा निर्णय ! राज्यात प्राध्यापक भरतीला मान्यता, पहिल्या टप्प्यात 2088 प्राध्यापकांची भरती
PROFESSOR RECRUITMENT
Follow us on

मुंबई : राज्यातील प्राध्यापक भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करावी अशी मागणी गेल्या कित्येक महिन्यांपासून केली जात आहे. यासाठी राज्यात पुणे, मुंबई तसेच इतर जिल्ह्यांत आंदोलनदेखील करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. राज्यात पहिल्या टप्यातील 2088 प्राध्यापक भरतीला आणि सर्व प्राचार्य पद भरण्याला मान्यता देण्यात आली आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिलीय.

उदय सामंत यांनी ट्विटद्वारे दिली माहिती

उदय सामंत यांनी राज्यात प्राध्यापक भरतीला मान्यता देण्यात आल्याचे सांगितले. ट्विट करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही भरती प्रक्रिया सुरु होणार असल्याचे म्हटले. सामंत यांनी सांगितल्यानुसार प्राध्यापकांच्या पहिल्या टप्यातील 2088 प्राध्यापक भरतीला आणि सर्व प्राचार्य पद भरण्याला मान्यता मिळालेली आहे. लवकरच भरती प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

प्राध्यापक भरतीसाठी राज्यभर आंदोलन

मागील अनेक महिन्यांपासून राज्यात प्राध्यापक भरती करण्यासाठी आंदोलन करण्यात येत होते. पुणे, मुंबई, औरंगाबाद येथे या आंदोलनाची तीव्रता अधिक होती. 100 टक्के पदभरती करावी, अशी मागणी महाराष्ट्र नव प्राध्यापक संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. राज्य सरकारच्या वतीनं त्यावेळी प्राध्यापक भरतीच्या पहिल्या टप्प्याला लवकरच मंजुरी देण्यात येईल, असं आश्वासन दिलं होतं. वित्त विभागाकडे फाईल पाठवणार असल्याचं देखील सांगण्यात आलं होतं, मात्र अद्याप या कोणताही कारवाई करण्यात आली नव्हती. आता मात्र ही भरती प्रक्रिया लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे.

प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरु होण्याची प्रतीक्षा

दरम्यान, राज्यात गेल्या अकरा वर्षांपासून प्राध्यापक भरती नियमितपणे झालेली नाही. राज्यातील महाविद्यालयातील पन्नास टक्के जागा रिक्त असल्यानं शिक्षणावर परिणाम होत आहे. सेट नेट परीक्षांचं आयोजन मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. आता मात्र उशिराने का होईना पण प्राध्यापक भरतीला मान्यता मिळालेली आहे. या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून आता प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरु होण्याची वाट पाहिली जात आहे.

इतर बातम्या :

‘उदय शेट्टी मजनूमध्ये त्यांचा घुंगरू शेठ झालाय’, चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना टोला

Rafale Scam: फ्रेंच मॅगझिनच्या दाव्यानंतर राफेल विमान भ्रष्टाचार प्रकरणात भाजप आणि काँग्रेसमध्ये परत जुंपली

ST Workers Strike | एकीकडे संपाची तीव्रता वाढली, दुसरीकडे कारवाईचा बडगा, तब्बल 376 एसटी कर्मचाऱ्यांचे निलबंन

(maharashtra government given approves professors recruitment process information given by uday samant)