Ladka Bhau Yojana How To Apply : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेपाठोपाठ आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडका भाऊ या योजनेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात केलेल्या भाषणादरम्यान या योजनेची घोषणा केली. यानंतर आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, यासाठी कोण पात्र असणार, कोणाला याचा फायदा मिळणार याची माहिती समोर आली आहे.
राज्य सरकारने सुरु केलेल्या लाडका भाऊ योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे असा आहे. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. तसेच त्यांना स्वयंरोजगारही प्राप्त होईल आणि राज्यातील बेरोजगारीचे प्रमाणही कमी होईल. या योजनेतंर्गत प्रशिक्षणासोबतच बेरोजगार तरुणांना दरमहा 10 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभही दिला जाणार आहे. तसेच प्रशिक्षणादरम्यान राज्य सरकार 12वी उत्तीर्ण तरुणांना दरमहा 6,000 रुपये, आयटीआयला 8,000 रुपये आणि पदवीधरांना 10,000 रुपये देणार आहे.
दरम्यान लाडका भाऊ योजनेचा लाभ राज्यातील बेरोजगार तरुण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. लाडका भाऊ योजना महाराष्ट्र अंतर्गत प्रशिक्षणादरम्यान युवकांना दरमहा 10,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे. तसेच अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणेही महत्त्वाचे आहे. तर महाराष्ट्रातील लाडका भाऊ योजनेंतर्गत दरवर्षी राज्यातील 10 लाख तरुणींना मोफत कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ दिला जाणार आहे.