मुंबई : कोरोनाचे नवे रुप अर्थात ओमिक्रॉन (Omicron) विषाणूमुळे जगाची झोप उडालीय. संसर्गदर जास्त असल्यामुळे वेगवेगवेगळ्या देशातील वैज्ञानिक आणि आरोग्य विभाग या विषाणूचा अभ्यास करत आहेत. या पार्श्वभूमीवर देशात खबरदारी म्हणून अनेक प्रतिबंधात्मक नियम लागू केले जातायत. महाराष्ट्र सरकारने तर आंतरराज्यीय विमान उड्डाणांविषयी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. विमानतळावर डोमॅस्टिक पॅसेंजरकरीता (Domestic passengers) 72 तासांपर्यंतचा आरटीपीसीआर (RTPCR) चाचणीचा अहवाल निगेटिव्ह दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
यापूर्वी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करायचा असेल तर कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक होते. मात्र आता मुंबई विमानतळावर 72 तासांपर्यंतचा कोरोना चाचणी अहवालल निगेटिव्ह असल्याचे दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे प्रवाशांकडे आरटीपीसीआरचा अहवाल नसल्यास विमानतळावरच कोरोना चाचणी केली जाणार आहे. यापूर्वीच्या राज्य शासनाच्या आदेशानुसार साऊथ अफ्रिका, रिस्क कंट्रीज मधून येणाऱ्या प्रवाशांचे 7 दिवस संस्थात्मक विलगीकरण आणि त्यानंतर 14 दिवस होम आयसोलेशन करणे सक्तीचे करण्यात आलेले आहे.
इतर बातम्या :