मुंबई : दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन या नव्या कोरोना विषाणूची सर्वांनीच धास्ती घेतली आहे. देशात आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा अलर्ट मोडमध्ये आल्या असून वेगवेगळ्या राज्यात खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रातसुद्धा सरकारने नवे कोरोना नियम जारी केले आहेत.
दक्षिण आफ्रिकेतून कर्नाटकमध्ये आलेल्या दोन प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या त्यांच्यावर अपचार सुरु आहेत. त्यांना कोरोनाच्या कोणत्या व्हेरिएंटची लागण झाली आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र खबरदरी म्हणून राज्यात नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. मुंबईमध्ये जगभरातून प्रवासी येतात. त्यामुळे विमानतळावर उतरताच प्रवाशांचे अलगीकरण तसेच कोरोना चाचणी करण्यात येत आहे. या व्यतिरिक्त राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे .
♦ सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करायचा असेल तर लसीचे दोन्ही डोस बंधनकारक
♦ सार्वजनिक वाहतुकीसाठी यूनीव्हर्सल पास बंधनकारक
♦ बाहेरच्या देशातून येणाऱ्यांना लसीचे दोन्ही डोस बंधनकारक
♦ बाहेरच्या देशातून येणाऱ्यांना 72 तासांच्या आतील आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असणे बंधनकारक
♦ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास योग्य वाटल्यास कोणत्याही क्षणी संबंधित अधिकारक्षेत्रासाठी निर्बंध व शर्ती वाढविता येतील. परंतु 48 तासांची पूर्वसूचना दिल्याशिवाय तसे करता येणार नाही.
♦ कोरोना नियमांचे पालन न करणान्या कोणत्याही व्यक्तीला 500 रुपयांचा दंड असेल.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतून पसरलेला कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हायरस चिंता वाढवणारा आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. “कोरोनाचे हे नवे रुप असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. हा विषाणू मोठ्या प्रमाणात आणि वेगानं पसरेल. त्यामुळे लोकांना संसर्ग होईल. या विषाणूवर अँटीबॉडीजचाही परिणाम होणार नाही. देशात पुन्हा एकदा लॉकडाऊनची स्थिती होऊ शकते. या व्हेरियंटमध्ये 30 म्युटेशन आढळून आलेत. हाँगकाँग, बेल्जियम, इस्त्रायल या देशात हा विषाणू वेगानं पसरतोय,” असे आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगिलं. तसेच हा विषाणू देशातील डेल्टापेक्षाही धोकादायक आहे. त्यामुळे काळजी घ्या. कोरोना नियम पाळा असे आवाहन भोंडवे यांनी केले.
इतर बातम्या :