‘सूचना, पर्यायांचा अभ्यास करु’, येत्या शुक्रवारी ओबीसी आरक्षणासाठी पुन्हा सर्वपक्षीय बैठक, उद्धव ठाकरेंची माहिती

| Updated on: Aug 27, 2021 | 6:05 PM

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे या विषयावर सगळ्याच पक्षांचे एकमत आहे. यासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीत प्राप्त झालेल्या सूचना, विविध पर्यांयाचा अभ्यास केला जाईल. त्यानंतर सर्वानुमते निर्णयाप्रत येण्यासाठी येत्या शुक्रवारी यावर पुन्हा एक बैठक घेऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.

सूचना, पर्यायांचा अभ्यास करु, येत्या शुक्रवारी ओबीसी आरक्षणासाठी पुन्हा सर्वपक्षीय बैठक, उद्धव ठाकरेंची माहिती
ALL PARTY MEETING
Follow us on

मुंबई : ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे या विषयावर सगळ्याच पक्षांचे एकमत आहे. यासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीत प्राप्त झालेल्या सूचना, विविध पर्यांयाचा अभ्यास केला जाईल. त्यानंतर सर्वानुमते निर्णयाप्रत येण्यासाठी येत्या शुक्रवारी यावर पुन्हा एक बैठक घेऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत ते बोलत होते. (Maharashtra government will study on suggestions given by all party members on OBC reservation issue will hold meeting on next Friday information given by Maharashtra CM Uddhav Thackeray)

बैठकीला सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती

या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उद्योग मंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,  इतर मागास वर्ग व बहूजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री अॅड.अनिल परब, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार कपिल पाटील, आमदार देवेंद्र भुयार यांच्यासह सर्वपक्षीय नेते विनायक मेटे, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई, शैलेंद्र कांबळे, बाळासाहेब दोडतुले, मिलिंद रानडे, डॉ. अरुण सावंत आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

सूचना व पर्यायांचा अभ्यास करुन शुक्रवारी बैठक

स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे यावर सर्वपक्षांचे एकमत आहे. राजकीय आरक्षणामध्ये येणाऱ्या  अडचणी दूर करण्याबाबत सर्वांनी केलेल्या सूचनांचे स्वागत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणासंबंधी विविध राजकीय पक्षांची मते समजून घेतली. ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत ही सर्वांचीच भावना असल्याचे ठाकरे म्हणाले. दरम्यान बैठकीत प्राप्त झालेल्या सूचना आणि पर्यायांचा येत्या काही दिवसात अभ्यास करून येत्या शुक्रवारी यासंबंधाने सर्व सहमतीने निर्णय घेऊ अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिली.

एकजूट आणि एकमत असेच टिकवून ठेवावे असे आवाहन ठाकरे

या महत्वाच्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी सर्वपक्षीय नेते उपस्थित राहिल्याची बाब स्वागतार्ह असल्याचेही ठाकरे म्हणाले. तसेच ओबीसी आरक्षणासाठीची सर्वपक्षीय एकजूट आणि एकमत असेच टिकवून ठेवावे असे आवाहनही त्यांनी केले. बैठकीत प्रास्ताविक करताना अन्न व नागरी पुरवठामंत्री भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणासंबंधात शासकीय पातळीवर करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व पक्षीय नेत्यांनी आरक्षण टिकवून ठेवण्यासाठीचे विविध पर्याय, सूचना यासंबंधातील आपली मते मांडली. निमंत्रित सर्वपक्षीय मान्यवरांनी या महत्वाच्या विषयावर सर्वपक्षीय बैठक आयोजित केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. महेश पाठक, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

इतर बातम्या :

उड्डाणानंतर पायलटच्या छातीत जोराची कळ, नागपूर विमानतळावर परदेशी विमानाचं इमर्जन्सी लँडिंग

दोन राऊतच शिवसेनेला पार खोल डुबवणार, नारायण राणेंचा हल्लाबोल

राजकारणात वातावरण बदल होतोय, काही विषाणुही येतायेत, आमच्यासाठी विषय संपला: आदित्य ठाकरे

(Maharashtra government will study on suggestions given by all party members on OBC reservation issue will hold meeting on next Friday information given by Maharashtra CM Uddhav Thackeray)