भगतसिंह कोश्यारी उत्तराखंडमध्ये परतणार ? …तर लवकरात लवकर निघून जाईन म्हणत केले सूचक वक्तव्य

| Updated on: Sep 11, 2021 | 5:56 PM

केंद्रीय पातळीवर या साऱ्या घडामोडी घडत असताना आता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जयंत पाटील यांना उद्देशून मिश्किल भाष्य केलं. त्यांमनी अतिवृष्टीचा आधार घेत जयंत पाटील यांना वाटत असेल तर मी लवकरात लवकर इथून निघून जाईल, असं वक्तव्य केलं.

भगतसिंह कोश्यारी उत्तराखंडमध्ये परतणार ? ...तर लवकरात लवकर निघून जाईन म्हणत केले सूचक वक्तव्य
BHAGAT SINGH KOSHYARI
Follow us on

मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari )यांनी मिश्किल भाष्य करत उत्तराखंडमध्ये परत जाण्याची इच्छा व्यक्त केली. काही दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी उद्देशून यासंबंधी भाष्य केलं. कोश्यारी यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ समोर आला आहे. ते सांगलीमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. (maharashtra governor bhagat singh koshyari express desire to go back to uttrakhand)

भगतसिंह कोश्यारी यांचे मिश्किल भाष्य

बेबी राणी मौर्य यांनी उत्तराखंडच्या राज्यपालापदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अनेक राज्यांचे राज्यपाल 10 सप्टेंबर रोजी बदलले. यामध्ये उत्तराखंडचा कार्यभार सेवानिवृत्त ले. जनरल. गुरमित सिंह यांच्याकडे सोपवण्यात आला. केंद्रीय पातळीवर या साऱ्या घडामोडी घडत असताना आता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जयंत पाटील यांना उद्देशून मिश्किल भाष्य केलं. त्यांमनी अतिवृष्टीचा आधार घेत जयंत पाटील यांना वाटत असेल तर मी लवकरात लवकर इथून निघून जाईल, असं वक्तव्य केलं.

भगतसिंह कोश्यारी नेमंक काय म्हणाले ?

“नेहमी अतिवृष्टी पूर अशी संकटं असलेल्या भागातून मी आलोय. महाराष्ट्रात दुष्काळी स्थिती नेहमी असायची. पण मी राज्यपाल म्हणून महाराष्ट्रात आल्यापासून येथेही पाऊस सुरू झालाय. अतिवृष्टी होत आहे. जर हे जंयत पाटील यांना वटत असेल तर मी लवकरात लवकर हे सोडून निघून जाईल. असंच तर नुकसान झालं नसेल ना जंयत साहेब ?” असे कोश्यारी म्हणाले.

कोश्यारी सक्रिय होणार की नाही, हे माहिती नाही

दरम्यान, केंद्रीय पातळीवर भाजपमध्ये मोठे फेरबदल होत असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मिश्किल भाष्य करत मी उत्तराखंडला निघून जोतो, असं भाष्य केलं. त्यांचे हे वक्तव्य समोर आल्यानंतर कोश्यारी पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार का ? असा प्रश्न विचारला जातोय. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी भाजपचा अलिखित नियम सांगितला आहे. “भगतसिंह कोश्यारी पुन्हा राजकारणात सक्रिय होतात की नाही हे माहीत नाही. वयाच्या 75 वर्षांनंतर भापजमध्ये नेते निवडणुकीत सक्रिय नसतात,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

आधी उत्तराखंड आणि नंतर कर्नाटक, आता गुजरात, भाजपात मुख्यमंत्री बदलाची मालिका; नेमकं कारण काय काय? वाचा सविस्तर

PHOTO: गौराईच्या देखण्या मुखवट्यांनी सजली बाजारपेठ, पाहूनच मन प्रसन्न होईल, माहेरवाशीणीच्या आगमनाची उत्सुकता

जुन्या भांडणाचा राग, गोड बोलून मित्राला फिरायला बोलावलं, वेगवेगळ्या ठिकाणी दारु पाजली, नंतर मध्यरात्री काटा काढला

(maharashtra governor bhagat singh koshyari express desire to go back to uttrakhand)