महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा, कोणत्या जिल्ह्यात कुणाची बाजी? वाचा सविस्तर

| Updated on: Dec 20, 2022 | 10:08 PM

महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात कोणता पक्ष आघाडीवर राहिलाय, कोणत्या तालुक्यात कुणी बाजी मारली, जिल्हानिहाय निकालात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, याबाबत सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा, कोणत्या जिल्ह्यात कुणाची बाजी? वाचा सविस्तर
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : राज्यातील जवळपास साडेसात हजार ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा निकाल आज समोर येतोय. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागांवर विजय मिळताना दिसतोय. भाजप हा निवडणुकीत एक नंबरचा पक्ष ठरताना दिसतोय. दरम्यान, अनेक दिवसांपासून सुरु असलेला ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा निकालांनी आज शांत झालाय. कोणत्या जिल्ह्यात कोणता पक्ष आघाडीवर राहिलाय, कोणत्या तालुक्यात कुणी बाजी मारली, जिल्हानिहाय निकालात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, याबाबत सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

कोणत्या जिल्ह्यात कुणाची बाजी?

पुणे जिल्ह्यात 221 गावांमध्ये राष्ट्रवादी पहिल्या स्थानी राहिली. राष्ट्रवादीनं 105, काँग्रेसनं 44, भाजपनं 33, ठाकरे गट 15, शिंदे गट 15 आणि
इतरांनी 14 गावांमध्ये विजय मिळवला

हे सुद्धा वाचा

वर्धा ग्रामपंचायतीत 113 पैकी भाजपनं सर्वाधिक 51 ग्रामपंचायती जिंकल्या. काँग्रेसनं 40, राष्ट्रवादीनं 3, ठाकरे गटानं 1 तर इतरांनी
18 गावांमध्ये सत्ता मिळवली

धुळ्यातल्या 128 ग्रामपंचायतींमध्ये भाजपनं 52, शिंदे गटानं 31, काँग्रेसनं 29, ठाकरे गट 7, राष्ट्रवादी 3 तर इतरांना 6 गावांची सत्ता मिळाली

जळगावातल्या 140 गावांच्या निवडणुकीत भाजपनं सर्वाधिक म्हणजे 43, राष्ट्रवादीनं 32, शिंदे गटानं 27, काँग्रेसनं 16, ठाकरे गटानं 13
तर इतर 9 गावांत स्थानिक आघाड्यांनी सत्ता मिळवली

रत्नागिरीत ठाकरे गट अव्वल राहिला. 222 पैकी ठाकरे गटानं 101, शिंदे गटानं 45, भाजपनं 17, राष्ट्रवादी 8, काँग्रेस 3 आणि
47 गावांमध्ये इतरांचा विजय झाला.

नाशिकच्या 196 ग्रामपंचातींपैकी राष्ट्रवादीनं 63, भाजपनं 55, ठाकरे गट 28, शिंदे गट 22, काँग्रेस 8 आणि इतर 20 ठिकाणी सत्तेत राहिले

मुख्यमंत्री शिंदें यांच्या ठाण्यातल्या 42 ग्रामपंचायतींमध्ये भाजपनं 18, शिंदे गटानं 14, ठाकरे गटानं 5 आणि इतरांकडे 3 गावांची सत्ता राहिली

हिंगोलीतल्या 62 गावांमद्ये शिंदे गटानं 18, भाजपनं 9, ठाकरे गट 8, राष्ट्रवादीनं 8, काँग्रेसनं 6 तर इतर स्थानिक आघाडी 13 ठिकाणी सत्तेत आली

लातूरच्या 351 गावांपैकी भाजप 83, राष्ट्रवादी 36, ठाकरे गट 13, शिंदे गट 11, काँग्रेस 3 तर स्थानिक आघाड्यांनी तब्बल 175 गावांमध्ये सत्ता मिळवली

वाशिमच्या 287 ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीनं 65, भाजपनं 45, ठाकरे गट 31, काँग्रेस 31, शिंदे गट 29 आणि इतर 86 गावांमध्ये विजयी झाले

औरंगाबादच्या 219 गावांच्या निवडणुकांमध्ये शिंदे गटानं बाजी मारली., शिंदे गट 71, भाजप 60, ठाकरे गट 35, राष्ट्रवादी 16, काँग्रेस 11
आणि इतर 26 गावांमध्ये स्थानिक आघाड्या सत्तेत आल्या

नगरच्या 203 गावांमधल्या निवडणुकांत भाजपनं 74 गावांमध्ये, राष्ट्रवादीनं 68, काँग्रेसनं 27, ठाकरे गटानं 19, शिंदे गटानं 1 तर
इतरांनी 14 गावांमध्ये विजय मिळवला

सोलापूरच्या 189 ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपनं 77, राष्ट्रवादीनं 41, शिंदे गट 26, काँग्रेस 14, ठाकरे गट 8, इतरांना 23 गावांची सत्ता मिळाली

नंदुरबारमध्ये 123 गावांत निवडणूक झाली. ज्यात काँग्रेस 33 , शिंदे गट 32, भाजप 32, ठाकरे गट 13, राष्ट्रवादी 3 आणि इतर आघाड्यांनी 10 गावांची सत्ता मिळवली

जालन्यातल्या 266 ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप 124, राष्ट्रवादी 69, ठाकरे गट 31, काँग्रेस 16, शिंदे गट 8 आणि इतरांचे पॅनल 18
गावांमध्ये विजयी झाले

नांदेडच्या 179 गावांमध्ये भाजपनं 76, राष्ट्रवादी 36, काँग्रेस 27, ठाकरे गट 10, शिंदे गट 5 इतर 25 गावांमध्ये स्थानिक आघाड्यांनी सत्ता बनवली

यवतमाळच्या 100 गावांच्या निवडणुकीत भाजपनं 29, काँग्रेस 21, शिंदे गट 15, राष्ट्रवादी 15 , ठाकरे गट 8 आणि इतरांनी 11 गावांमध्ये सत्ता मिळवली

बुलडाण्यात 279 गावांमध्ये निवडणूक होती. ज्यात शिंदे गट 71, भाजप 48, राष्ट्रवादी 33, काँग्रेस 24, ठाकरे गट 11 आणि इतरांनी 92
गावांमध्ये सत्ता स्थापन केली