मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात (Maharashtra Mumbai Rains Live Update) जोरदार पावसाने सुरूवात केली आहे. अजून पाच दिवस राज्यात अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवाफमान खात्याने (IMD Update) व्यक्त केली आहे. मुंबईतल्या माटुंगा, सायन, कुर्ला, दादर, अंधेरी, बांद्रा (Heavy Rain in Mumbai City) परिसरात पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने पाणी साचले आहे. कोकणात (Kokan Heavy Rain Update) काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईतील रेल्वे सेवेवरती सुध्दा (local train status mumbai) पावसाचा परिणाम झाला असून रेल्वे संथगतीने सुरू आहे. मुंबईतल्या विक्रोळी परिसरात सकाळी एक दरड कोसळली (Land Slide) आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम सध्या या भागात मदतकार्य पुरवत आहेत, पावसाची प्रत्येक अपडेट…
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे दापोली तालुक्याला पावसाने झोडपले आहे. दापोली तहसिलदार कार्यालयाबाहेर मोरी पाण्याखाली गेली आहे. तहसील कार्यलया नजीकची मोरी पाण्याखाली गेली आहे.
जळगावात मुसळधार पाऊस झाला. या धुवाधार पावसामुळे परिसरातील गेल्या दोन दिवसापासून त्याचबरोबर शहरात नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले झाडाच्या फांद्या पडल्याने रस्त्यावर वाहन चालवण्यास कसरत करावी लागत आहे काही भागात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे जळगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना जीवनदान मिळाले असून शेतकऱ्यांमध्येही आनंद पहावयास मिळाला तर दुसरीकडे मुसळधार पावसामुळे रस्त्यावर ठिक-ठिकाणी पाणी साचल्याने ग्रामस्थांचे पाण्यातून वाट काढताना हाल झाले.दरम्यान असाच पाऊस अजून सलग दोन ते तीन दिवस आल्यास पिकांची चांगली वाढ होईल असे मत बळीराजा कडून व्यक्त लागल्याचे पहावयास मिळाले.
मुंबईत रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर जाण्यास बंदी
रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी केवळ सकाळी 6 ते 10 या वेळेतच समुद्रकिनारी जाण्यास परवानगी असेल त्यानंतर बीचेसवर कुणीही फिरकू नये- महापालिका प्रशासनाच्या सूचना
यंदाच्या मान्सूनमध्ये समुद्रात बुडून 10 जणांच्या मृत्युची नोंद झालीय, या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय
मुंबईत रेड आणि ऑरेंज अलर्टच्या दिवसांमध्येही वारंवार विनंती, आवाहने करुनही मुंबईकर आणि इतर पर्यटक समुद्रकिनारी फिरण्यास जातात…तसेच, बीचवर पोहण्यास जातात
त्यामुळे रेड आणि ऑरेंज अलर्ट असतांना कोणीही समुद्रकिनारी , बीचेसवर फिरण्यास किंवा पोहण्यास जायला प्रशासनाकडून प्रतिबंध करण्यात आलाय
मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या कामाचा फटका पालघर मधील शेतकरी आणि स्थानिकांना बसू लागला आहे . महामार्गाच्या कामासाठी करण्यात आलेल्या माती भरावाने नैसर्गिक नाले बुजवले गेले आहेत . पालघर मधील नवघर घाटीम येथे नैसर्गिक नाला फुटल्याने नाल्याच पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतीचं मोठं नुकसान झालं आहे . केंद्र सरकारच्या मुंबई वडोदरा या द्रुतगती महामार्गाच काम सध्या पालघर जिल्ह्यात युद्ध पातळीवर सुरू आहे . मात्र या महामार्गाचा माती भराव करण्याकरता अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसवून नैसर्गिक नाले बुजवण्यात आल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाण्याने आपला प्रवाह बदलला आहे . त्यामुळे येत्या काळात मुसळधार पाऊस झाल्यास पालघर मधील शेतकऱ्यांच मोठं नुकसान होण्याची भीती आता शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे .
हिंगोली जिल्ह्यात काही भाग वगळता आज सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाला. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला तर उगवलेल्या पिकांना ही नवसंजीवनी मिळाली.
– मुक्त विद्यापीठाचा पेपर देवून 8 मुले गेली होती विरचक्क धरणात पोहायला
– यातील राहुल सुनील वाकडे आणि कल्पेश भगवान सोनवणे या दोघांचा मृत्यू
– गाळाचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू
– धरण परिसरात परिवाराचा आक्रोश
उल्हास नदी ही पुणे जिल्ह्यात उगम पावून पुढे रायगड आणि ठाणे जिल्ह्यात वाहात येते. गेल्या काही दिवसात घाटावर आणि रायगड, ठाणे जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसामुळे उल्हास नदीच्या प्रवाहात मोठी वाढ झालीये. उल्हास नदीची धोक्याची पातळी १७.५० मीटर इतकी असून सध्या नदीची पातळी १४.३० मीटरवर पोहोचली आहे. दरवर्षी जुलै महिन्यात उल्हास नदीला मोठा पूर येतो आणि त्याचा फटका बदलापूरसह आसपासच्या ग्रामीण भागाला बसतो. यंदाही गेल्या २ दिवसातल्या पावसामुळे उल्हास नदीनं अक्राळविक्राळ रूप धारण केलं असून बदलापूरची उल्हास नदी चौपाटी ही पूर्णपणे पाण्याखाली गेलीये. त्यात पुढील काही दिवस ठाणे आणि रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून त्यामुळे उल्हास नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची भीती व्यक्त होतेय.
मात्र नरेंद्रनगर ब्रिजमध्ये साचलं मोठ्या प्रमाणात पाणी
ब्रिजच्या खाली पाण्यात पडला एक ट्रक आणि मिनी डोर बंद
तर एक स्कुल बस सुद्धा बंद पडली
ब्रिजच्या दुसऱ्या बाजूला रात्रीच एक खांब पडला त्यामुळे दुसऱ्या बाजूची वाहतूक सुद्धा बंद
नागरिकांना ब्रिज बंद असल्याने मोठा त्रास
महापालिकेची झाली पोल खोल
ट्रक बाहेर काढण्यासाठी बोलाविण्यात आली क्रेन
गावकऱ्यांना जाण्यायेण्यासाठी मार्ग बंद आहे, या नाल्यावरून पाणी वाहत असल्याने शाळकरी मुलांनाही याचा फटका बसत आहे.
सकल भागातील मुख्य रस्त्यावर साचलेले पाणी ओसरायला सुरवात.
सिंधुदुर्गात आजही हवामान विभागाचा अंदाज पावसाने चुकवला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुसळधार पाऊस लागला नसला तरी समुद्र मात्र दुपार नंतर खवळलेला पाहायला मिळाला. मालवण जेटी येथील ही दृश्ये असून समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर धडकत होत्या. आजपासून तीन दिवस जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला होता मात्र मुसळधार पावसाने दडी मारलेली पहायला मिळाली. आज सकाळ पर्यंतच्या मागील 24 तासात जिल्ह्यात सरासरी 50 मिमी पावसाची नोंद झाली होती. कालही सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट जारी झाला होता त्यालाही पावसाने चकवा दिला होता.
रेल्वे सेवा विस्कळीत झाली होतीय त्यानंतर मोटरमन यांनी काळजी घेत ट्रेन थांबवली. आज दोन तासाचा स्पेशल मेगा ब्लॉक घेऊन भिंत हटवण्याचे काम करण्यात आलं आहे आणि ट्रेन सेवा सुरळीत करण्यात आली आहे.
इचलकरंजी शहरासह राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. आज इचलकरजी महापालिकेमध्ये सर्व शासकीय बैठक घेऊन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी महापुरासंबंधी सूचना केल्या. यावेळी पोलीस प्रशासन महसूल प्रशासन, महावितरण प्रशासनाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मालवण शहरातील अर्धवट स्थितीतील व रखडलेल्या गटार खोदाई प्रश्नी नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांनी बुधवारी मालवण शहरात येत नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांसह ठेकेदाराला फैलावर घेतले. ठेकेदाराच्या हातात असलेली फाईल आमदारांनी काढून घेत “फाईल कसल्या फिरवतोस तोंडात मारून देईन” असा आक्रमक पवित्रा आमदार नाईक यांनी घेतला. शांत स्वभावाच्या वैभव नाईक यांचा हा आक्रमक अंदाज पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला .
नांदेडमध्ये आज पावसाचे दमदार आगमन झालंय, जिल्ह्यात बहुतांश जागी आज पाऊस जोरदारपणे बरसलाय. आजच्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय, तर या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. आता या पावसानंतर यापुढे खरीप हंगामाच्या कामाची शेतकऱ्यांची लगाबग वाढलेली दिसणार आहे.
मुंबईसह उपनगरात पावसाची दमदार बॅटिंग सुरू असली तरी मराठवाड्यातील बीड जिल्ह्याला अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाने घेतलेल्या विश्रांतीनंतर आज दुपारनंतर माजलगाव तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली. माजलगाव, दिंद्रुड, वडवणी यासह परिसरात समाधानकारक पाऊस झालाय. त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. तर अनेक ठिकाणी आजही म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे. बहुतांश ठिकाणी लवकर पेरण्या केल्याने या भागात दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. तर आजही अनेक भागातील पेरण्या कोळंबल्यात, त्यामुळे बीड जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
कोकणातील पाऊस आणि पुरपरिस्थिबद्दल प्रशासनाची बैठक लावून उपाययोजना कराव्यात
भाजप नेते प्रविण दरेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली मागणी
कोकण आणि महाड अतीवृष्टी दौऱ्याहून परतल्यानंतर लिहील पत्र
वसई विरार मधील शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात ही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. वसईच्या पश्चिम पट्टीतील ग्रामीण भागात रस्त्यावर पाणीच पाणी साचलं आहे. वसईच्या गिरिज, देवतालव, बंगली रोड, गास, निर्मळ, सत्पाला, वटार इत्यादी ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं आहे. त्यामुळे काही ठिकाणच्यां रिक्षा आणि पालिकेच्या परिवहन सेवेच्या वाहतूकीवरही परिणाम झाले आहेत.
वसईत पुराच्या पाण्याने वाहून आलेला एका 17 वर्षाच्या तरुणाचा मृतदेह सापडला आहे.
राहुल नंदलाल विषवकर्मा असे या 17 वर्षाच्या मुलाचे नाव असून तो वसईच्या गावाराई पाडा येथील रहिवासी आहे.
सोमवारी हा तरुण वसईच्या वालीव भागातील कंपनीत कामाला गेला होता. सायंकाळी 7 वाजता तो कंपनीतून बाहेर पडल्या नंतर तो घरी पोहचण्याऐवजी बेपत्ता झाला होता.
बुधवारी दुपारी 4 च्या सुमारास वसईच्या मधूबन परिसरातील लोखंडी ब्रिज जवळ नाल्यात वाहत आलेला त्याचा मृतदेह पोलिसांना मिळाला आहे.
7 July: सक्रिय मान्सून राज्यात …
राज्यात पुढचे 4,5 दिवस मुसळधार-अति मुसळधार पाऊस शक्यता.
कोकण,मध्य महाराष्ट्र काही भागात अतिवृष्टी शक्यता पहिले 2,3 दिवस.
मराठवाडा मध्यम ते जोरदार, विदर्भात हि
– IMD
Watch for IMD Updates please daily. pic.twitter.com/vs2qb2pSuT— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 7, 2022
नागपूरच्या काही भागात ढगांच्या गडगडाटसह मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरवात झाली आहे. चांगल्या मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
शहापूर तालुक्यातील अशोका धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय. पावसाळ्यात जरी पर्याटकांना अशोका धबधबा खुणावत असला तरी अद्याप हा अशोक धबधबा पर्यटकांसाठी खुला केलेला नाही यामुळे येथे येणारे पर्यटक नाराज होऊन परत जात आहे . दर वर्षी पावसाळा सुरू झाला की पर्यटकांची पावले ही निर्सग रम्य ठिकाणी वळतात मात्र असे असताना सुरक्षेच्या दृष्टीने या धबधब्याकडे जाणारे मार्ग वन विभागाने बंद केले आहेत .
पालघर तालुक्यातील सफाळे पुर्व भागातील नवघर-घाटीम ग्रामपंचायत हद्दीतील मुंबई- बडोदरा एक्सप्रेस वे कामामुळे नैसर्गिक नाला बंद झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन गावड पाड्यात घुसण्याची शक्यता आहे. मुंबई-बडोदरा एक्सप्रेस वेच्या कामाची सुरुवात करण्यात आली असून जीआर इन्फा प्रोजेक्ट्स या कंपनीने भराव टाकून नैसर्गिक नाले बंद झाले आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूला शेती मोठ्या प्रमाणात असल्याने वर्षभरासाठी उदरनिर्वाहसाठी कुठलेही नसल्याने शेतकऱ्यांना शेतीवर अवलंबून राहावं लागते. या नाल्याच्या दोन्ही बाजूला आदिवासी व बिगर आदिवासी असे 30 च्यावर शेतकऱ्यांची शेती असुन मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. नैसर्गिक नाला बंद केल्याने गावात पावसाळ्यात पावसाचे पाणी गावात शिरण्याची ही शक्यता आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्याना पुर आले आहेत.
शहापूर तालुक्यातील अशोका धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय. पावसाळ्यात जरी पर्याटकांना अशोका धबधबा खुणावत असला तरी अद्याप हा अशोक धबधबा पर्यटकांसाठी खुला केलेला नाही यामुळे येथे येणारे पर्यटक नाराज होऊन परत जात आहे . दर वर्षी पावसाळा सुरू झाला की पर्यटकांची पावले ही निर्सग रम्य ठिकाणी वळतात मात्र असे असताना सुरक्षेच्या दृष्टीने या धबधब्या कडे जाणारे मार्ग वन विभागाने बंद केले आहेत .
पुढचे काही दिवस कोकण भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून कोकण भागाला रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात एनडीआरएफच्या दोन टीम या तैनात आहेत. सध्या सावित्री नदी ही धोक्याच्या पातळीखाली आहे. त्यामुळे महाड शहराला कोणताही धोका नाही. परंतु जर परिस्थिती बिघडली तर महाडकरांना कशा पद्धतीने करता येईल या संदर्भात एनडीआरएफ टीमकडून मॉकड्रिल करण्यात येत आहे..
विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे आवाहन
“भारतीय हवामान खात्याने दिलेला अतिवृष्टीचा इशारा आणि राज्यात सर्वदूर होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर समुद्र, नदी किनारपट्टीवरील नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. जिल्हा, राज्य प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षितस्थळी आश्रय घ्यावा. जीवित, वित्तहानी होणार नाही यासाठी सर्वांनी सतर्क राहून काळजी घ्यावी. राज्य सरकारनेही एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलिस, महसूल आदी बचाव, मदत यंत्रणांना सतर्क ठेवून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तात्काळ मदत मिळेल याची निश्चिती करावी. अतिवृष्टी, पूरस्थिती, दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत बचाव, मदत कार्यात विरोधी पक्षाचे स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला संपूर्ण सहकार्य, मदत करावी. राज्यातील नागरिकांची जीवित, वित्तहानी टाळण्यासाठी विरोधी पक्ष कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून मदतकार्यात सहभागी व्हावे,” असे आवाहन राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे.
Today’s High Tide: 17:31hrs-3.75mtr
Low tide :Dt 08.07.2022: 0:009hrs- 1.51mtr https://t.co/GHkhIFgM9G— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 7, 2022
रायगड जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 125 मि.मी. पावसाची झाली नोंद
अलिबाग – रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 125.45 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.01 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 963.17 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-
असे आजचे एकूण पर्जन्यमान 2 हजार 007.20 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 125.45 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 31.06 टक्के इतकी आहे. रायगड जिल्ह्यात मागील वर्षी दि.7 जुलै 2021 रोजी सरासरी 2.82 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली होती. तसेच दि.01 जून पासून 7 जुलै 2021 अखेर पर्यंत एकूण सरासरी 1 हजार 008.49 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली होती.
नवी मुंबई गेल्या 24 तासात 133 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे
मोरबे धरणाची पातळी देखील 71 मीटर एवढी झालेली आहे, बऱ्यापैकी पाऊस या क्षेत्रात पडला आहे
त्यामुळे नवी मुंबईकरणात पाण्याची चिंता ही आता मिटलेली आहे
पालघर जिल्हा पावसाची तालुका निहाय अहवाल दिनांक 07/07/2022
1)वसई:- 127मी मी
2)जव्हार:- 62.66मी मी
3) विक्रमगड:- 113.5मी मी
4) मोखाडा:- 60.4मी मी
5) वाडा :- 135.75 मी मी
6)डहाणू :- 94.02मी मी
7) पालघर:- 79.07मी मी
8) तलासरी :- 41.75मी मी
एकूण पाऊस :- 714.15मी मी
एकुण सरासरी 89.27मी मी
एनडीआरएफ च्या टीमने प्रयागसंगमावर केली पाहणी
प्रयाग संगम हा पंचगंगा नदीच उगम स्थान
एनडीआरएफ च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला पावसाचा आढावा
सध्या पावसाचं प्रमाण कमी त्यामुळे धोका नाही
मात्र नऊ तारखेपर्यंत जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा
सध्या गरज नसली तरी आवश्यकता वाटल्यास एनडीआरएफ च्या आणखी टीम बोलावणार
एनडीआरएफ चे सहाय्यक कमांडर प्रवीण धत यांची माहिती
मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर खालापूर खोपोली महामार्गचे काही वर्षांपूर्वी काम करण्यात आले होते.खालापूर खोपोली व खोपोली खालापूर असा प्रवास करताना महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालक यांना खडड्यांमधुन वाहन चालवावे लागत असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही त्यामुळे तात्काळ सबंधीत यंत्रणा यांनी याची तात्काळ दखल घेऊन तात्पुरती का होईना रस्त्याची डागडुजी करून खड्डे भरण्याची मागणी केली जात आहे.
हतनुर धरणाचे 30 दरवाजे एक मीटरने उघडले
हतनुर धरणातून तापी नदी पात्रात 4 हजार 378 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू
तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने देण्यात आला सतर्कतेचा इशारा
रस्त्यावर गुडगाभर पाणी साचले आहे. पाण्यातून मार्ग काढताना अनेक वाहन बंद पडत आहेत..
पाणी साचल्याने अनेक रिक्षाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना रुग्णालयात जाण्यासाठी, औषध आणण्यासाठी ही पायपीट करत जावे लागत आहे.
नालासोपारा पूर्व आचोळा रोड वरून साचलेल्या पाण्यातून आढावा घेऊन रुग्णालयात पायपीट
– वरंध घाट रस्ता पावसाळा कालावधीत अवजड वाहतुकीकरीता पूर्णपणे बंद,
– महाड ते पंढरपुर या महामार्गावरील धोकादायक असलेला वरंध घाट रस्ता पावसाळा कालावधीत बंद,
– ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत अवजड वाहतुकीकरीता संपुर्णपणे बंद असणार,
– जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले निर्देश,
-पुणे-पिरंगुट-मुळशी-
ताम्हिणी घाट-
निजामपूर-माणगाव-
महाड या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आदेश.
नवी मुंबईत रिमझिम पाऊसाला सुरवात
वातावरणात देखील गारवा निर्माण झाला आहे
सर्वीकडे अंधार देखील मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे
नवी मुंबईतील पाम बीच रस्त्यावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी र
अमरावती जिल्ह्यात 1100 घरात घुसले पुराचे पाणी…दीड हजार नागरिकांचे स्थलांतर
426 घरांची पडझड 5 हजार हेक्टर वरील पिके अतिपावसामुळे बाधित….
पावसाचा अमरावती, तिवसा, चांदुर बाजार,चिखलदरा व धामणगाव रेल्वे तालुक्याला फटका…
महसूल विभागाचा प्राथमिक अहवाल आला समोर…
पावसामुळे शेतातला आले आहे तलावाचे स्वरुप….
वसई विरार नालासोपारा जलमय झाला आहे
नालासोपारा पूर्व स्टेशन रोड ते सेंट्रल पार्क ओसवाल नगरी, आचोळा रोड, वसई नवजीवन, वालीव, सनसिटी रोड, विरार विवा कॉलेज रोड, स्टेशन ते बोलींज रोड वर पाणीच पाणी झाले आहे..
सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने शहरातील शाळांना ही सुट्टी देण्यात आली आहे..
रेल्वे ट्रक वर कुठेही पाणी साचले नसल्याने, विरार वुन चर्चगेट ते चर्चगेट वुन विरार कडे धावणाऱ्या सर्व लोकल मात्र सुरळीत सुरू आहेत..
सकाळ च्या वेळेत कामावर जाणाऱ्या नागरिकांना गुडगाभार पाण्यातून मार्ग काडावा लागत आहे
वसई विरार नालासोपाऱ्यात रात्रभर जोरदार पावसाने बॅटिंग केली असून सकाळ च्या वेळेत मात्र रिमझिम पाऊस सुरू आहे
कल्याण डोंबिवलीत सलग चौथ्या दिवशी ही पावसाची संततधार सुरू असून अधून मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत . काल रात्री पावसाने चांगलीच बॅटिंग केली मात्र आज पहाटे पासून कल्याण डोंबिवली परिसरात रिमझिम पाऊस पडत असल्याने कुठल्याही सखोल भागात पाणी थांबले नाही मात्र गेले चार दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे हवेत चांगलंच गारवा जाणवत आहे
– गेल्या 24 तासात लोणावळ्यात 146 मिमी (5.75 इंच) पावसाची नोंद झालीय
-मागील दोन दिवसांपासून लोणावळ्यात जोरदार पाऊस झालाय
-यावर्षी आजपर्यत 727 मिमी (28.62 इंच) पाऊस झालाय
महाराष्ट्र | रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी 9 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी, तर पालघर, पुणे, कोल्हापूर आणि सातारा 8 जुलैपर्यंत रेड अलर्टवर. मुंबई आणि ठाणे 10 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्टवर:
Maharashtra | Red alert issued for Raigad, Ratnagiri & Sindhudurg till July 9, while Palghar, Pune, Kolhapur & Satara are on red alert till July 8. Mumbai & Thane are on orange alert till July 10: IMD pic.twitter.com/UWMip78mzs
— ANI (@ANI) July 7, 2022
पुणे – नाशिक महामार्गावरील नव्यानेच तयार केलेल्या खेड घाटात बऱ्याच ठिकाणी धोकादायक दरडी दिसून येत असल्याने प्रवास धोकादायक बनला आहे . या रस्त्याचे काम काही ठिकाणी दुरुस्ती करून दरड कोसळण्याचा धोका कमी करण्यात आला असला ; तरी अद्यापही अनेक ठिकाणी हा धोका कायम आहे काही ठिकाणी दरड कोसळून अपघात होण्याची भीती आहे.
गोसीखुर्द धरणाच्या पानलोट क्षेत्रात सतत पाऊस पड़त असल्याने काल रात्रि पासून गोसीखुर्द धरणाच्या(Open gate) उघड़े असलेल्या 2 दरवाज्यात आणि भर पड़ली असून आता गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 5 दरवाजे अर्ध्या मीटर ने उघड़ण्यात आले आहे।विशेष म्हणजे या वर्षिच्या मानसून सेशन मध्ये पहिल्यांदा हे धरणाचे दरवाजे उघड़े करण्यात आले आहे।तर या पाच दरवाज्यातुन 695.86 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे।यामुळे वैनगंगा नदी दुथळी भरून वाहत असून नदी काठीला गावाला सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे।
सर्वाधिक पावसाची साकोली तालुक्यात नोंद.
जिल्ह्यात आतापर्यंत 230.9 मिमी पाऊस.
गत २४ तासात जिल्ह्यात 6.2 मिमी पावसाची नोंद.
रखडलेली रोवणीची कामे आता वेगाने सुरू झाल्याने शेतशिवारात शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे.
मागच्या दोन दिवसांपासून मुंबईत सखल भागात पावसाचे पाणी साचायला सुरूवात झाली आहे.
आज पुन्हा सकाळी मुसळधार पाऊस असल्याने अंधेरी येथील सबवेमध्ये पाणी साचल्याचे पाहायला मिळाले
#WATCH | Maharashtra | Andheri Subway waterlogged in Mumbai as rain continues to lash the city pic.twitter.com/7kiRhDVjel
— ANI (@ANI) July 7, 2022
NDRF च्या टीम रत्नागिरीच्या गावामध्ये जाऊन पाऊस आणी परिस्थितीचा आढावा घेतला
रत्नागिरीत मागच्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस
कोकण किनारपट्टीवर दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस आहे
मुंबई जोरदार पावसाची सुरुवात कांदिवली मलाड गोरेगाव जोगेश्वरी एक तासापासून संततधार पाऊस पडत आहे
राज्यात कुठे किती पाऊस पडणार जाणून घ्या
दोन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे.
Mumbai Rainfall update:Intense spells of rainfall very likely over parts of Mumbai Thane Raigad and Palghar during next 3-4 hours. Ghat areas of Pune and Satara also to receive moderate to intense spells of rain. pic.twitter.com/602iVf0zMZ
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 6, 2022
काञज जुन्या बोगदा येथे दरड कोसळल्याची घटना घडली होती. पुणे मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने तातडीने तसेच महापालिका कर्मचारी आणि पाटबंधारे विभागाकडून जेसीबीची मदत घेऊन घटनास्थळी पोहोचले. सद्यस्थितीत रस्त्यावर आलेले मोठे दगड बाजूला करत काम पुर्ण केले असून तरी नागरिकांनी दक्षता घ्यावी
मुंबईत रात्री अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरु असल्याने अंधेरी सबवे मध्ये पाणी भरला आहे. मात्र इथे सांचलेल्या पाण्याचा प्रमाण वाढण्याची शक्यता आहे
मुंबईच्या मलबार हिल परिसरात रिमझिम पाऊस सुरू आहे
डोंगराळ भाग असल्या कारणाने इथे पाणी सांचलेला नाही
मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अग्रदूत निवास स्थान आणि जवळपासच्या परिसरात सध्या रिमझिम पाऊस सुरू आहे
मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, मुंबईसह उपनगरातील बांद्रा, अंधेरी, गोरेगांव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर परिसरात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे.
अंधेरी सबवे, मालाड सबवे सह अनेक सखल भागात पाणी साचले आहे, तर दुसरीकडे मुंबईतील नदी-नालेही पाण्याने भरून वाहू लागले आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
त्याचबरोबर काल झालेल्या पावसामुळे मुंबईतल्या अनेक सखल भागात पाणी साचले होते
सिंधुदुर्गात उद्यापासून पुढील तीन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून ndrf चे पथक तैनात करण्यात आले आहे. 22 जणांचे पथक जिल्ह्यात दाखल. नागरिकांनी खबरदारी व सतर्क राहण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना.
9 जुलै पर्यंत घाट राहणार बंद
दरड कोसळण्याचा धोका असल्यामुळे वाहतूक ठेवली जाणार बंद
प्रशासनाने काढला आदेश
अवजड वाहन प्रमाणेच छोट्या वाहनांसाठी देखील परशुराम घाट बंदच
वसई विरार नालासोपारा परिसरातील पूरजन्य परिस्थितीचा आयुक्त अनिलकुमार पवार यांनी प्रत्येक ठिकाणाला भेटी देत पाहणी करून आढावा घेतला आहे.
महानगरपालिका अग्निशमन विभागाच्या हॅजमेट वाहनातून ही पाहणी केली आहे. त्यांच्यासोबत अग्निशमन दलाचे अधिकारी, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांचीही समावेश होता.
वसई विरार नालासोपाऱ्यात मागच्या 3 दिवसात सलग मोठ्याप्रमाणात पाऊस झाला आहे.
आज एका दिवसात 217 मिलिमीटर पाऊस शहरात पडला आहे. या पावसामुळे शहरातील मुख्य रस्ते, जलमय होऊन सर्वत्र पाणीच पाणी होऊन पूर्ण शहरात पुरपरिस्थिती निर्माण झाली होती.
अनेक सोसायटीच्या तळमजाळ्यातील घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे जनजीवन ही विस्कळीत झाले होते.
महापालिकेने केलेल्या उपाययोजना, सध्याच्या पुरपरिस्थितीत कितपत कार्यान्वित आहे. नागरिकांच्या समस्या काय आहेत हेही आयुक्तांनी जाणून घेतले आहे.
-मावळमध्ये वर्षाविहारासाठी गेलेली वीस वर्षीय तरुणी कुंड मळ्यात वाहून गेलीय
-साक्षी सतीश वंजारे ही तरुणी मैत्रिणीसह इंदोरी येथील कुंडमळा येथे आली होती, कुंड मळाच्या कडेला फिरत असताना साक्षीचा पाय घसरला अन ती कुंडमळ्यात पडली
-पाण्यात वाहून गेल्याने तिचा शोध घेतला जातोय, तळेगाव एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते
-वर्षाविहारासाठी येणाऱ्या नागरिकांनी स्वतः ची काळजी घ्यायला हवी अस या घटनेतून अधोरेखित होतय
मुंबईला गेल्या दोन दिवसात पावसाने झोडपलं आहे. मात्र गेल्या काही तासांपासून पावसाचा जोर हा कमी झाला आहे. पावसाने काही काळ विश्रांती घेतली आहे.
चांदोलीत सलग दोन दिवस अतिवृष्टी झाली आहे, त्यामुळे धरण पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे, वारणा नदीवरील कोकरूड रेठरे बंधाराही पाण्याखाली गेला आहे.
दुपारी 3 वाजता उपग्रह निरीक्षण:
उत्तर कोकणात मध्यम ते मधूनमधून तीव्र सरी; पालघर, मुंबई ठाणे रायगड पुढील ३, ४ तास.
दक्षिण कोकणातही अशीच परिस्थिती आहे.
मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही मुसळधार पावसासाठी लक्ष ठेवावे लागेल … pic.twitter.com/vyJfgDn8Qc— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 6, 2022
जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून खोळंबलेल्या पेरणीला उद्यापासून वेग येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मुंबईच्या अंधेरीमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे, रस्त्यांवरून पावसाचे पाणी लोकांच्या घरात घुसले आहे. अंधेरी सबवे असो की आजूबाजूचे रस्ते, सर्वत्र यावेळी पाणी साचले आहे. पाण्याचा प्रवाह एवढा वेगवान आहे की बॅरिकेड्स आणि दुचाकीही वाहू लागल्या आहेत. आजूबाजूची सर्व दुकाने जलमय झाली असून रस्त्यावर उभी केलेली वाहनेही आता पाण्यात बुडाली आहेत.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागझरी गावातून जाणाऱ्या तळोजा कल्याण रस्त्यावर एमआयडीसीतील कंपन्यांनी नैसर्गिक नाले बुजवल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर येत असून त्यामुळे रस्त्याला तलावाचे स्वरूप आले आहे. यामुळे वाहनांच्या दोन-तीन किलोमीटर दुतर्फा रांगा लागलेल्या आहेत. अधिकृत व अनधिकृत कंपन्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे तसेच नैसर्गिक नाले बुजविल्यामुळे नागरिकांना पावसाच्या पाण्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शेकडो वाहने थोड्याशा पावसामुळे अडकून पडत आहेत. एमआयडीसी व पनवेल महानगरपालिका यांनी संयुक्त कारवाई करून नैसर्गिक नाले खुले करण्याची मागणी होत आहे. वाहतूक पोलीस या ठिकाणी उपस्थित नसल्याने ट्रॅफिक जामची नेहमीच समस्या निर्माण झाली आहे.
पालघर जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर वर आला आहे. डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पळे बोरीपाडा येथील शाळेच्या इमारतीची भिंत मुसळधार पावसामुळे जमीन दोस्त झाली आहे . सुदैवाने ही दुर्घटना रात्री घडल्याने कोणत्याही विद्यार्थ्याला अथवा शिक्षकाला इजा झाली नाही . पालघर जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून याच पावसामुळे ही भिंत कोसळल्याचे समोर आलय . मात्र पळे बोरीपाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत जीर्ण झाली असून त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून येथील शिक्षक आणि ग्रामस्थ करत होते, मात्र जिल्हा परिषदेने याकडे दुर्लक्ष केल्याने मध्यरात्रीच्या सुमारास अखेर ही दुर्घटना घडली .
जळगावातील पाचोरा तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली होती. यामुळे शेतकरी दुबार प्रेरणीच्या संकटात सापडला होता. यामुळे झालेल्या दमदार पावसामुळे पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
अतिवृष्टीच्या इशाराच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूर परिस्थिती निर्माण झाल्यास बचाव व उपाय योजना त्वरीत राबवण्यासाठी NDRFचे पथक कराडमध्ये दाखल झाले असून कराड, पाटण तालुक्यातील संभाव्य परस्थितीची माहिती घेतली जात आहे,
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालीय….. कोल्हापूरच्या प्रयाग चिखली जवळ असलेल्या प्रयाग संगमावर कुंभी कासारी भोगावती तुळशी आणि धामणी या पाच नद्यांचा संगम होतो… या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यान प्रयाग संगमाच्या ठिकाणी नदीचे पात्र विस्तीर्ण झालंय… नद्यांनी पात्र सोडल्यानंतर आजूबाजूच्या शेतामध्ये हे पाणी जायला सुरवात झालीय..या पाच नद्यांचा संगम होऊन पुढे पंचगंगा नदी वाहते.
पाहा व्हिडिओ
वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.. त्यामुळं पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी जिल्ह्यात काही ठिकाणी अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे……
नंदुरबार शहरासह तालुक्यात जोरदार पाऊसाने हजेरी लावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करून ठेवली होती. वरुणराजा बरसत नसल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी संकट समोर उभा राहिलं होतं. आज तीन वाजेच्या सुमारास आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
मुंबई महापालिकेशी समन्वय राखावा. पाणी साचून सेवा विस्कळीत झाल्यास प्रवाशांना त्रास होऊ नये याची काळजी घ्या. यासाठी एक समन्वयक अधिकारी ( नोडल) नियुक्त करावा. प्रवाशांच्या सुविधेसाठी बेस्ट, एसटी बसेस किंवा स्थानिक परिवहन सेवा यांची मदत घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी लोकांना माहिती देण्याची व्यवस्था करा. संपर्क आणि समन्वयासाठी अधिकारी नियुक्त करा.
पुढचे ४,५ दिवस राज्यात सर्वदूर पसरलेल्या पावसाची शक्यता. ??
? कोकण, मध्य महाराष्ट्र व इतर काही भागात अती मुसळधार पावसाचे इशारे.
??कोकणात पूर परिस्थिती अनेक ठिकाणी… https://t.co/kxlIAKcXa7— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 5, 2022
ग्रामपंचायतीच्या चुकीचा नियोजनामूळे घरात पावसाचे पाणी घुसल्याचा ग्रामस्थांचा आरोप,
राजोली गावात आज सकाळी या मौसमातील पहिलाच जोरदार पाऊस झाला आणि शेकडो घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले,
ग्रामपंचायतने नाल्यांची व रस्ताची उंची वाढविल्या मुळे राजोली गावात पावसाचे व नाल्याचे पाणी घरात घुसल्याच्या लोकांचा आरोप,
घरात पाणी शिरल्याले लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
सिंधुदुर्गात हवामान विभागाच्या अंदाजाला पावसाने चकवा दिला असून आज सकाळ पासून जिल्ह्यात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 90 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस हा दोडामार्ग तालुक्यात 170 मिलिमीटर पाऊस पडला आहे. आज सकाळ पासून जिल्ह्यात संमिश्र वातावरण आहे. कधी ढगाळ, कधी ऊन तर कधी मोठी सर अशा स्वरूपाच वातावरण जिल्ह्यात आहे. पाऊस कमी असला तरी पडझडीच्या घटना घडल्यामुळे काही ठिकाणी वाहतूकीचा खोळंबा देखील झाला होता. हवामान खात्याने काल रेड अलर्ट दिला होता मात्र रत्नागिरी आणि रायगडच्या तुलनेत पाऊस झाला नाही तर आज हवामान खात्याने सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट जाहीर केला असला तरी पावसाने हवामान विभागाच्या अंदाजाला चकवा दिला आहे.