मुंबई : आज 07 मार्च. विविध घडामोडी घडत आहेत. ठाण्यात पक्षाच्या शाखेवरून शिवसेना आणि ठाकरे गटात वाद झाला. तसंच केंद्र सरकारच्या विरोधात सर्व विरोधीपक्ष एकवटले आहेत. या पार्श्वभूमीवर घडामोडी घडण्याची शक्यता आहे. औरंगाबादच्या नामांतरवरून एमआयएम आक्रमक झाली आहे. तर त्याला भाजपकडून उत्तर देण्यात येत आहे. यासह देश आणि राज्य पातळीवर विविध घडामोडी घडत आहेत. तुमच्या जिल्ह्यातील बातमी पाहा टीव्ही 9 मराठीवर… सगळे ताजे अपडेट्ससाठी तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून वाचायला मिळतील. सर्व महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर…
काल होळीचा सण साजरा झाला. आज धुलिवंदन आहे. त्यामुळे सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. तुम्हा सर्वांना tv9 मराठीकडून धुलिवंदनाच्या आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा! तुमच्या आयुष्यात विविध रंगी आनंदाची उधळण होवो याच सदिच्छा…
हा VIDEO पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा चिडाल, कुठे गेली खेळ भावना? वाचा सविस्तर…..
IND vs AUS : कशामुळे झाला मृत्यू? पोलिसांचा रिपोर्ट अजून बाकी. वाचा सविस्तर….
केएल राहुलच्या फ्लॉप कामगिरीमुळे त्याची खराब कामगिरी झाकली जात होती. पण तिसऱ्या कसोटीतील पराभवामुळे त्याच्या टीममधील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण केल जातय. वाचा सविस्तर….
रवींद्र जाडेजा सध्या बॉर्डर-गावस्कर सीरीजमध्ये व्यस्त आहे. चौथ्या कसोटीआधी त्याने फॅन्सना आनंदाची बातमी दिलीय. वाचा सविस्तर…..
मॅचआधी भर मैदानात घडलेल्या या प्रकाराने सगळेच अवाक झाले, सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय. वाचा सविस्तर….
स्वतःला मूल नसल्याने चिमुकल्याचे अपहरण करणारे दाम्पत्य 48 तासांच्या आत पोलिसांच्या ताब्यात
कोल्हापूरमधील घटना….
बाळूमामा येथून अपहरण केलेल्या मुलाला कोल्हापूर पोलिसांनी 48 तासांत शोधून काढले
पळवून नेणाऱ्या जोडप्याला 6 मार्च रोजी रात्री केली अटक
स्वतःला मूल नसल्याने नेले होते पळवून, सोलापूरातून घेतले ताब्यात
मोहन अंबादास शितोळे आणि छाया मोहन शितोळे असे या दाम्पत्याचे नाव
दोघेही साताऱ्यातील मेढा मधील रहिवासी
सात वेगवेगळ्या तपास यंत्रणा राबवून 24 तासांत मुलाला काढले शोधून
तब्बल 90 ते 95 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तापासून लागला शोध
चंद्रपूर : घुग्घुस येथील न्यू रेलवे कोल साइडिंग येथे उघडकीस आली घटना,
आज सकाळी ही मालगाडी चंद्रपुर थर्मल पावर स्टेशन मधून या कोल सायडिंग मध्ये दाखल झाली,
त्यावेळी इंजिन च्या वर बिबट्या दिसला मृतावस्थेत,
चंद्रपुर थर्मल पावर स्टेशन परिसरात मोठया प्रमाणात आहे वन्यजीवांचा वावर,
त्यामुळे मालगाडीच्या वर चढलेल्या बिबट्याला हाईटेंशन इलेक्ट्रिक ताराचा स्पर्श झाला असावा आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता,
वनविभाग आणि रेल्वे प्रशासन करताहेत घटनेचा तपास.
घुग्घुस येथील न्यू रेलवे कोल साइडिंग येथे उघडकीस आली घटना
आज सकाळी ही मालगाडी चंद्रपूर थर्मल पावर स्टेशनमधून या कोल सायडिंगमध्ये दाखल झाली
त्यावेळी इंजिनच्यावर बिबट्या मृतावस्थेत दिसला
चंद्रपूर थर्मल पावर स्टेशन परिसरात मोठया प्रमाणात आहे वन्यजीवांचा वावर
मालगाडीच्या वर चढलेल्या बिबट्याला हाईटेंशन इलेक्ट्रिक ताराचा स्पर्श झाला असावा
वनविभाग आणि रेल्वे प्रशासन करताहेत घटनेचा तपास
वसंत मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवून मागीतली ३० लाख रुपयांची खंडणी
खंडणी दिली नाही तर गोळ्या घालण्याची दिली धमकी
आज ईडीची टीम तिहार जेलमध्ये चौकशी करणार
सकाळी 11 वाजता इडीकडून सिसोदिया यांची चौकशी होणार
सिसोदिया हे सध्या सीबीआयच्या न्यायालयीन कोठडीमध्ये
एकनाथ शिंदे दे धक्का … असे म्हणत वेगवान निर्णय, महाराष्ट्र गतिमान अशी जाहिरात असलेली बंद एसटी प्रवाशांनी धक्का मारून केली चालू
धाराशिव जिल्ह्यातील तेर येथील बसस्थानकावरील व्हिडिओ व्हायरल होऊन चर्चेत
स्टार्टर खराब असल्याने एसटी बंद होती त्याला प्रवाशी लहान मुलांनी धक्का दिला मात्र बस चालू नाही
सोन्याचा दरवाढीचा रंगोत्सव
तर चांदीने पण धरला वृद्धीवर ठेका
चांदीच्या दरात तब्बल 3000 रुपयांची वृद्धी
विक्रमी भावापेक्षा स्वस्तात सोने-चांदी खरेदीची संधी, बातमी एका क्लिकवर
देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठा बदल नाही
इंधनावरील कर कपातीचा मुद्या पुन्हा ऐरणीवर
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिले कर कपातीचे संकेत
होळीत महागाईचे दहण झाल्याची चर्चा खरी ठरणार?
रशियाकडून सर्वाधिक कच्चा तेलाची आयात, वाचा बातमी
ढगाळ वातावरणामुळे हवेत जाणवत आहे गारवा
रात्रीपासून पुण्यात पावसाच्या हलक्या सरी सुरूच
शहरातील अनेक भागांमध्ये रात्री अवकाळी पाऊस
आज देखील हवामान खात्याकडून शहरात पावसाचा अंदाज
पुणेकरांची धुळवड पावसात जाणार
वारा वादळ आणि विजेच्या कडकडाटात मुसळधार पाऊस
तर काही भागात गारा पडल्याने शेतीमालाचे मोठे नुकसान
अवकाळी पावसामुळे गहू कांदा हरभरा या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता
छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात पावसाची हजेरी
शहर आणि परिसरात सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस
अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ
पाऊस असतानाच बहुतांश ठिकाणी होळीचं दहन
पुढील दोन ते तीन दिवस हवामान खात्याच्या वतीने पावसाचा इशारा
नाशिक : 135 गावांमधील सुमारे अडीच हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अंदाज,
द्राक्षे, कांदा, गहू या पिकांचे नुकसान,
निफाड तालुक्यात झाले सर्वाधिक नुकसान.