मुंबई : आज दिनांक 4 नोव्हेंबर 2022 जाणून घेणार आहोत राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेसाठी काँग्रेसची राज्यात जोरदार तयारी. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बाईक रॅली आणि जनजागृती मोहिमेवर भर. आजपासून राष्ट्रवादीचं आजपासून शिर्डीत दोन दिवसीय शिबीर सुरू होणार. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना रुग्णालयातून अजूनही डिस्चार्ज नाही. कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली सपत्नीक विठ्ठलाची पूजा. कार्तिक एकादशीनिमित्त चंद्रभागा तीर भक्तिमय. हजारो भाविक पंढरपुरात दाखल.
Marathi News LIVE Update
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शरद पवार यांच्या भेटीला
मुख्यमंत्री शिंदे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
पवारांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु
शिंदे ब्रीच कँडी रुग्णालयात पोहचले
Marathi News LIVE Update
एकनाथ शिंदे यांनी बेईमानी केली
अजित पवार यांचा शिंदेंवर हल्लाबोल
घर उद्धवस्त करणे म्हणजे बेईमानी
महाराष्ट्र ही बेईमानी कधीही विसरणार नाही
पवारांची शिंदे यांच्यावर घणाघाती टीका
Marathi News LIVE Update
चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वात बैठक सुरु
औरंगाबादमधील सिल्व्हर इन हॉटेलमध्ये बैठक
आदित्य ठाकरेंच्या सिल्लोड सभेसंदर्भात चर्चा
आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची तयारी सुरु
मित्रांनी आधी दिले गुंगीचे औषध नंतर त्याचा तरुणीसोबत अश्लील व्हिडीओ बनवला
व्हिडीओ व्हायरल करण्याच्या नावाखाली दोन वर्ष करत होते ब्लॅकमेल
डोंबिवली टिळकनगर पोलिसांनी कोल्हापूरहून एका आरोपीला केली अटक
संजय राजपूत असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे
Marathi News LIVE Update
निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी करा
अजित पवार यांचा कार्यकर्त्यांना आदेश
कुठल्याही आमिषाला बळी पडू नका
पवारांचा नेत्यांना सावधगिरीचा इशारा
Marathi News LIVE Update
दिल्ली महापालिका निवडणूक जाहीर
दिल्लीत 250 जागांसाठी होणार मतदान
4 डिसेंबरला मतदान, 7 डिसेंबरला निकाल
राजधानातील महापालिका कोणाच्या ताब्यात ?
Marathi News LIVE Update
आजपासून ट्विटर कर्मचाऱ्यांची कपात करणार
ट्विटरमधील जवळपास 7500 कर्मचाऱ्यांना डच्चू देण्यात येणार
ऑफिसला न येण्यासंदर्भात कंपनीचा कर्मचाऱ्यांना मेल
एलॉन मस्क आल्यापासून कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
गुजरात विधानसभा निवडणूक
आम आदमी पक्षाकडून मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर
इसुदान गढवी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा
फोन आणि मेलद्वारे नागरिकांची मतं मागवली होती
गुजरातमध्ये आपचे सरकार येणार, गढवी हे गुजरातचे मुख्यमंत्री असतील – केजरीवाल
16 लाख नागरिकांनी रिस्पॉन्स दिला – केजरीवाल
Marathi News LIVE Update
आपकडून गुजरात मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर
ईसुदान गढवी मुख्यमंत्री पदाचे उमेदवार
अरविंद केजरीवाल यांनी केली घोषणा
निवडणूक कार्यक्रम घोषीत झाल्यानंतर आपकडून उमेदवार
आदित्य ठाकरे यांच्या सभेत सिल्लोड नगरपरिषदेची आडकाठी
सिल्लोड शहरातील महावीर चौकातील सभेला नगरपरिषदेने परवानगी नाकारल्याची माहिती
दोन्ही सभा आमनेसामने होणार असल्यामुळे सिल्लोड नगर परिषदेची नकारघंटा
श्रीकांत शिंदे यांची सभा झेडपी ग्राउंडवर तर आदित्य ठाकरे यांची सभा महावीर चौकात
सिल्लोड नगर परिषद ही अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात
आदित्य ठाकरे यांच्या सभेचे ठिकाण बदलण्याची सिल्लोड नगर परिषदची सूचना
अवैध धंद्यातून बांगर पैसे कमावतात – खैरे
फडणवीस अशा आमदारांना कसं सहन करणार?- खैरे
संतोष बांगरांचे अवैध धंदे उघड करणार – खैरे
राणा आणि बच्चू कडू वाद नाटकी – खैरे
शिंदे गटातील आमदार अस्वस्थ – खैरे
आता पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही – खैरे
40 गद्दार पुन्हा निवडून येणार नाही – खैरे
संभाजी भिडेंच्या विरोधात पुण्यात काँग्रेस आक्रमक
संभाजी भिडे यांनी केलेल्या विधानावरून काँग्रेसचं आंदोलन
संभाजी भिडे यांनी महीला पत्रकाराला टिकली लावण्यावरून केलं होत वादग्रस्त विधान
भिडे यांच्या त्याच विधानावरून पुण्यात महिला काँग्रेस आक्रमक झाल्याच पाहायला मिळत आहे
भाजप कामगार आघाडीचे प्रदेश चिटणीस विक्रम नागरे यांच्या घरावर केला हल्ला
हातात चाकु, सुरे आणि पिस्तूल घेऊन घरावर हल्ला
7-8 जणांच्या टोळक्याने सातपूर परिसरातील नागरे यांच्या घरावर दगडफेक करत केला घुसण्याचा प्रयत्न
जलवाहिनी टाकण्याच्या कामामुळे रस्त्यात खड्डे होणार नाहीत याची काळजी घ्या
महापालिका आयुक्तांचे कर्मचाऱ्यांना आदेश
नवीन जलवाहिन्या रस्त्यावरून टाकण्यासाठी पादचारी मार्ग किंवा इतर पर्यायी रस्ता शोधण्याचे कर्मचाऱ्यांना आयुक्तांचे आदेश
नव्याने सुमारे 500 कोटी रुपये खर्च करून रस्ते दुरुस्त केले जाणार
रस्ते दुरुस्त झाल्यास पुन्हा न खोदण्याचे आयुक्तांचे आदेश
त्यानंतर पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनसाठी खड्डे न करण्याचे आदेश
दोन्ही राज्यांच्या राज्यपालांच्या उपस्थितीत होतेय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार दोन राज्यांमध्ये पहिल्यांदाच होते अशी बैठक
बैठकीत सीमा प्रश्नसह अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याच्या मुद्द्यावर होणार चर्चा
बैठकीसाठी कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत कोल्हापुरात दाखल
बैठकी आधी घेणार सपत्नीक करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन
राज्यपाल भगतसिंह कोशारी देखील अंबाबाई दर्शनाला येण्याची शक्यता
खासदार नवनीत राणा म्हणाल्या, सुषमा अंधारे यांना आलसी माणूस पाहायचा असेल तर मातोश्रीवर जाऊन बघा
सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती
नवनीत राणा यांनी सुषमा अंधारे यांना प्रत्युत्तर दिलंय
बच्चू कडू आणि रवी राणा वादावर नवनीत राणा यांची प्रतिक्रिया
आम्ही कालच म्हणालो होतो की, दोघांचा वाद संपला असून आता दोघांनी अमरावतीच्या विकास कामावर लक्ष केंद्रित करावं,
महाराष्ट्राच्या विकासासाठी, अमरावतीच्या विकासासाठी मी दिल्ली दौऱ्यावर जात आहे.
संध्याकाळी 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
नवी दिल्ली महापालिका निवडणूकीची आयोग घोषणा करणार असल्याची सूत्रांची माहिती
गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर दिल्ली महापालिका निवडणुकीची आजच घोषणा होण्याची शक्यता
जयंत पाटील जे बोलतात ते तर्क शुद्ध बोलतात
अभ्यास करून बोलतात, त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकते
राष्ट्रवादीबाबत फक्त अफवा पसरवली जाते आहे
राष्ट्रवादीत कोणीही फुटणार नाही राष्ट्रवादी एकदम घट्ट आहे
राजेश टोपे यांचं मंत्री उदय सामंत यांना प्रत्युत्तर
मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या लोकल गाड्या आज 15 ते 20 मिनिट उशिराने धावत आहेत.
गोरेगाव येथे अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 6.20 वाजता पॉइंट बिघाड झाला होता,
जो सकाळी 7.23 वाजता दुरुस्त करण्यात आला आहे.
सध्या उपनगरीय गाड्यांवर त्याचा परिणाम दिसून येत असून त्या सुमारे 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत.