Maharashtra Breaking News Live : काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल ‘मातोश्री’वर दाखल, घडामोडींना वेग

| Updated on: Apr 18, 2023 | 8:02 AM

Maharashtra Live News : देश-विदेशातील तसंच तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live : काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल मातोश्रीवर दाखल, घडामोडींना वेग
Follow us on

मुंबई : नवी मुंबईतील खारघर येथे डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या सोहळ्यात उष्माघातामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 11 झाली आहे. अजूनही काही लोक अत्यवस्थ आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांनी मध्यरात्री रुग्णालायत जाऊन रुग्णांची विचारपूस केली. मनसेचे नेते राज ठाकरे हे सुद्धा रुग्णालयात जाऊन रुग्मांची विचारपूस करणार आहेत. जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर बोरघाटातील दरीत बस कोसळून अपघात झाला होता. त्या ठिकाणी आता ग्रील लावण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या मानहानीच्या खटल्यावर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत उपस्थित राहणार का? याकडे सर्वांचं लक्ष. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 17 Apr 2023 08:40 PM (IST)

    काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल ‘मातोश्री’वर दाखल

    मुंबई : 

    राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल ‘मातोश्री’वर दाखल

    राहुल गांधी मुंबईत येण्याची शक्यता, त्याच पार्श्वभूमीवर वेणुगोपाल आणि ठाकरे यांच्या भेटीची चर्चा

    बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि संजय राऊत ‘मातोश्री’वर दाखल

    महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडींना वेग

  • 17 Apr 2023 07:59 PM (IST)

    काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल मुंबई विमानतळावर दाखल

    मुंबई :

    काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत
    वेणुगोपाल आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे
    के. सी. वेणुगोपाल उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर जाणार असल्याची माहिती समोर येतेय

    खासदार संजय राऊत मातोश्रीवर पोहोचले


  • 17 Apr 2023 07:27 PM (IST)

    पुणे : होर्डिंग कोसळून ८ जण अडकले

    पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत भागात होर्डिंग कोसळले

    होर्डिंग कोसळून यात ८ जण अडकले होते

    ४ ते ५ जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती

    रावेर पोलिसांनी दिली प्राथमिक माहिती

  • 17 Apr 2023 07:10 PM (IST)

    ‘त्या’ बातम्या खोट्या, अजित पवारांकडून ट्वीट करत स्पष्टीकरण

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आमदारांच्या बैठकीबद्दल चुकीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याचं स्पष्ट केलं आहे. पवारांनी ट्विट करत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. “सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. मी मुंबईतच आहे. उद्या, मंगळवार दि. १८ एप्रिल २०२३ रोजी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमित कामकाज सुरु राहणार आहे. मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्या पूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी”, असं पवार ट्विटरवर म्हणाले आहेत.

  • 17 Apr 2023 06:39 PM (IST)

    एनआयएची पीएफआय संघटनेवर मोठी कारवाई

    पुण्यातील दोन फ्लोअर एनआयएने केले जप्त

    ब्लू बेल स्कूल नावाने चालवली जात होती संस्था

    याच संस्थेत दहशतवादी कारवायासंदर्भात प्रशिक्षण दिले जात असल्याचा ठपका

    चौथा आणि पाचवा मजला केला जप्त

    दोन संशयित आरोपींना घेतले ताब्यात

  • 17 Apr 2023 06:27 PM (IST)

    पवार साहेबांची जागा राहुल गांधींनी घेतली – दीपक केसरकर

    पवार साहेब सांगतील तेच महाविकास आघाडीमध्ये चालत होतं

    आता ही जागा राहुल गांधींनी घेतली आहे

    अजित दादांचा निर्णय पवार साहेबांनी घेतला तो चुकीचा नसेल

    पवार साहेबांचे नेतृत्व हे भारतातील सर्वात ज्येष्ठ नेतृत्व समजलं जातं

    जे कुठे असतील त्याचा योग्य तो मान ठेवला गेला पाहिजे असं मराठी कार्यकर्ता म्हणून मला वाटतं

    मी सुद्धा त्यांच्याबरोबर काम केलेलं त्यामुळे त्यांचा ग्रेटनेस मला माहिती आहे

  • 17 Apr 2023 05:40 PM (IST)

    नवी दिल्लीत शेलार बावनकुळे यांच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी

    महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा – सूत्रांची माहिती

    आशिष शेलार आणि चंद्रशेखर बावनकुळे या दोन्ही नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांची घेतली भेट

    भेटीनंतर शेलार बेंगलोरला रवाना, बावनकुळे मुंबईला रवाना

  • 17 Apr 2023 05:19 PM (IST)

    एमजीएम रुग्णालय परिसरात नाना पटोले आणि किरीट सोमय्या यांची भेट

    नवी मुंबईत एमजीएम रुग्णालय परिसरात काँग्रेस नेते नाना पटोले आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांची भेट
    दोन्ही नेते रुग्णांच्या विचारपूससाठी पोहोचले

  • 17 Apr 2023 05:09 PM (IST)

    पुण्यातील भूमकर पुलावर खोबऱ्याचे तेल घेऊन जात असलेल्या टँकरचा अपघात

    पुणे :

    पुण्यातील भूमकर पुलावर टँकरचाचा अपघात

    खोबऱ्याचे तेल घेऊन जात असलेल्या टँकरचा अपघात

    टँकरचे गिअर तुटल्यामुळे तसेच ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात घडला

    या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर तेल सांडले

    फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल झाले असून कुठली ही जीवितहानी झालेली नाही

    या अपघातामुळे मात्र मुंबई-बेंगलोर महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत

  • 17 Apr 2023 04:35 PM (IST)

    पुण्यातील भूमकर पुलावर टँकरचा चा अपघात

    खोबऱ्याचे तेल घेऊन जात असलेल्या टँकरचा अपघात

    टँकरचे गिअर तुटल्यामुळे तसेच ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात घडला

    या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर तेल सांडले

    फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल झाले असून कुठली ही जिवीतहानी झालेली नाही

    या अपघातामुळे मात्र मुंबई बेंगलोर महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत

  • 17 Apr 2023 04:17 PM (IST)

    हडपसर पोलिसांनी केलेत वाहन चोरीचे दहा गुन्हे उघड

    यामध्ये सात लाख तीस हजाराचा मुद्देमाल केला जप्त,

    जानेवारीपासून केलेल्या कारवाईमध्ये 27 दुचाकी आणि एक चार चाकी गाडीच्या चोरीचे गुन्हे उघड

    दरम्यान पोलिसांनी केलेल्‍या कारवाईत दोन आरोपींना केली अटक

    दत्ता शिवाजी दहिफळे आणि बाबुराव धर्मराज तोंडे अशी आरोपींची नावे

  • 17 Apr 2023 04:01 PM (IST)

    कर्नाटक विधानसभा निवडणूक

    पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 मेला कर्नाटक दौऱ्यावर

    4 मेला उडपी मध्ये होणार मोदींची जाहीर सभा

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही प्रचारात सहभागी होणार

    10 मेला कर्नाटक विधानसभा विधानसभेसाठी होणार आहे मतदान

  • 17 Apr 2023 03:10 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांना मुंबई हायकोर्टाचा धक्का

    मुंबई महापालिका प्रभाग रचेनसंदर्भातला शिंदे सरकारचा निर्णय कायम

    बीएमसी प्रभाग संख्या २२७ ठेवण्याचा शिंदे सरकारचा अध्यादेश

    ठाकरे गटाचे राजू पेडणेकर यांची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली

     

  • 17 Apr 2023 02:52 PM (IST)

    इशान किशन बाद होताच सुहाना खानच्या तोंडून निघाला ‘तो’ शब्द; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

    कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध मुंबई इंडियन्सच्या सामन्यातील व्हिडीओ व्हायरल

    वानखेडे स्टेडियममध्ये मॅच पाहण्यासाठी पोहोचलेल्या सुहाना खानचा व्हिडीओ व्हायरल

    इशान किशन बाद होताच उत्साहाच्या भरात सुहानाच्या तोंडून निघाला नको तो शब्द, वाचा सविस्तर..

  • 17 Apr 2023 02:39 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांच्या सह्याद्री अतिथीगृहाबाहेर बॅनरबाजी

    कृपया आमचा छळ करू नका

    मलबार हिल वासियांकडून परिसरात निषेधाचे बॅनर

    मलबार हिल मार्गावर वाहन पार्किंगसाठी हवी परवानगी

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या वाहनांच्या वाहतुकीमुळे पोलिसांकडून पार्किंग करण्यास मनाई

    वाहतूक पोलिसांकडून नो पार्किंगची कारवाई होत असल्याने नागरिक नाराज

    आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या भुमिकेकडे लक्ष

  • 17 Apr 2023 02:38 PM (IST)

    खारघरमधील उष्माघात दुर्घटना

    मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची जोरदार टीका

    अमित शाह यांच्यासह नेते AC मध्ये बसले होते, लोकांना उन्हात बसवलं गेलं

    लोकांना घरी जायचं होतं, पण त्यांना जाऊ दिले नाही

    11 लोकांचा मृत्यू झाला पण 600 लोकांना उष्माघात चा त्रास झाला आहे

    गरमी असताना लोकप्रियता दाखवायला लोकांना बाहेर बसवलं गेलं – ममता

  • 17 Apr 2023 02:04 PM (IST)

    अजित पवार कुठेही जाणार नाहीत, नाना पटोले यांचा ठाम विश्वास

    मी ठाम आहे अजित पवार भाजपमध्ये जाणार नाहीत

    महाविकास आघाडी 2024 पर्यंत नक्की टिकेल

    प्रकाश आंबेडकर म्हणाले पंधरा दिवसात राजकीय भूकंप होतील, ते कधीपासून भविष्यकार झाले?, पटोले यांचा सवाल

    सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात म्हणून अतिवृष्टीचे पंचनामे होत नाहीत

  • 17 Apr 2023 01:54 PM (IST)

    सिंहगड एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांमध्ये जागेवरून वादावादी

     

     

    पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेसमध्ये खडकी ते लोणावळा दरम्यान जागेसाठी प्रवासांमध्ये वाद झाले

    महिलांना बसायला जागा मिळत नसल्याने काही जणींनी एका व्यक्तीशी वाद घातला

    या घटनेचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे

    या ट्रेनची बोगी संख्या आधी 19 होती ती आता 14 वर आली आहे

    पुणे-मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेसचे पूर्वीप्रमाणे डबे वाढवण्यात यावे अशी प्रवाशांची मागणी

  • 17 Apr 2023 01:48 PM (IST)

    शहरातील जळका बाजार परिसरात शॉट सर्किट घराला आग

    नंदुरबार : आगीत घरातील सासर उपयोगी वस्तूंसोबत महत्वाचे दस्तावेज जळून खाक

    नंदुरबार अग्निशामक दलाच्या चार बंबांनी आगीवर मिळवले नियंत्रण

    रहिवासी भागात लागलेल्या आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

    वेळेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली

  • 17 Apr 2023 01:04 PM (IST)

    तो गुन्हेगार आहे म्हणून गोळ्या घालणार का? एन्काऊण्टरवर नितीश संतापले, तेजस्वी म्हणाला की, ‘अतिक-अश्रफच्या हत्येचं…’

    बिहार : संपूर्ण देशात उत्तर प्रदेशातील (UP) हत्याकांडाची चर्चा सुरु आहे, अनेकांनी या सगळ्या प्रकरणावर टीका केली आहे. अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. देशभरातील नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडत आहेत.

  • 17 Apr 2023 12:21 PM (IST)

    Tandoori Chicken Ice Cream | चिकन तंदुरी आईस्क्रीम कसं तयार करतात तुम्हाला माहित आहे का ? पाहा व्हिडीओ

    Tandoori Chicken Ice Cream | सोशल मीडियावर अनेकजण वेगळे खाण्याचे पदार्थ शेअर करीत असतात. सध्या सोशल मीडियावर एक नवा पदार्थ व्हायरल झाला आहे. हे पाहून तुम्हाला धक्का बसणार आहे एवढं मात्र नक्की.

    वाचा संपूर्ण बातमी 

  • 17 Apr 2023 12:09 PM (IST)

    सोलापुरात जिल्हा परिषदेच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे घागर आंदोलन

    सोलापूर : जिल्हा परिषदेच्या नेहरू वसतिगृहात मागील आठ दिवसापासून पाणी नसल्याने विद्यार्थी आक्रमक

    टॉवेल आणि बनियन परिधान करून विद्यार्थी जिल्हा परिषदेत घुसले

    घागर, बादली घेऊन जिल्हा परिषद सीईओच्या कार्यालयाबाहेर विद्यार्थ्याचा ठिय्या

    मागील आठ दिवसापासून प्यायला आणि अंघोळीला पाणी मिळत नसल्याने वसतिगृहातील विद्यार्थी आक्रमक

    जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नसल्याचा ईशारा

  • 17 Apr 2023 12:08 PM (IST)

    Entertainment News Live | इफ्तार पार्टीतील ‘त्या’ कृत्यावर मुफ्ती अनसवर भडकले नेटकरी

    बाबा सिद्दिकींच्या इफ्तार पार्टीतील सना खानचा व्हिडीओ व्हायरल

    पती मुफ्ती अनसने गरोदर सनाला नेलं खेचत

    व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया

    टीकांनंतर सना खानने दिलं स्पष्टीकरण, वाचा सविस्तर..

  • 17 Apr 2023 12:08 PM (IST)

    Entertainment News Live | ‘तरुण वर्ग तुमच्याच नादात असला आणि…’, शेतकरी मुलाचं गौतमी पाटील हिला पत्र

    ‘गौतमी पाटीलचे हाल बेहाल…..’, शेतकरी मुलगा गौतमी पाटील हिला पत्र लिहित म्हणतो, ‘तुझ्यासोबत लग्न करायला कोणीच…’

    सध्या सर्वत्र प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचीच चर्चा… वाचा सविस्तर

     

  • 17 Apr 2023 11:56 AM (IST)

    अभिनेत्री महिमा चौधरीला मातृशोक

    महिमा चौधरीच्या आईचं दीर्घकाळ आजाराने निधन

    इंडस्ट्रीतील कलाकारांनी व्यक्त केला शोक, वाचा सविस्तर..

  • 17 Apr 2023 11:54 AM (IST)

    Entertainment News Live | आर. माधवनच्या मुलाची सुवर्णकामगिरी

    वेदांत माधवनने जलतरण स्पर्धेत मिळवला मोठा विजय

    एक किंवा दोन नव्हे तर तब्बल पाच सुवर्णपदकं जिंकली

    मलेशियन इन्वटेशनल एज ग्रुप चॅम्पियनशिपमध्ये वेदांतची सुवर्णकामगिरी, वाचा सविस्तर..

  • 17 Apr 2023 11:53 AM (IST)

    Entertainment News Live | गरोदर सना खानला पतीने बाबा सिद्दिकींच्या इफ्तार पार्टीत सर्वांसमोरून नेलं खेचत; भडकले नेटकरी

    अभिनेत्री सना खानने पती मुफ्ती अनससोबत बाबा सिद्दिकी यांच्या इफ्तार पार्टीला लावली हजेरी

    पार्टीतील तिचा एक व्हिडीओ व्हायरल

    सनाचा पती तिला खेचून घेऊन जाताना दिसत आहे

    पत्नी गरोदर असतानाही अशा पद्धतीने तिला पटापट चालत नेणं योग्य नाही म्हणत नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, वाचा सविस्तर..

  • 17 Apr 2023 11:42 AM (IST)

    अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचं “शर्म करो मोदी शर्म करो” आंदोलन सुरू…

    अमरावती फ्लॅश

    अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचं “शर्म करो मोदी शर्म करो” आंदोलन सुरू…

    काँग्रेसच्या आंदोलनाला प्रतिउत्तर म्हणून भाजपचाही जिल्हाधिकारी कार्यालय समोर प्रतिउत्तर आंदोलन

    भाजपायुमोचा “दल बदलू नेता शर्म करो, शर्म करो” आंदोलन…

    दोन्ही पक्षां कडून जोरदार घोषणा

    दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेरले

  • 17 Apr 2023 11:33 AM (IST)

    अमरावती शहर बस मागील 48 दिवसांपासून बंद…

    अमरावती शहर बस मागील 48 दिवसांपासून बंद…
    शहर बस चालवण्याच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी महानगरपालिका न्यायालयात..
    मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात आज होणार सुनावणी…
    अजुन बँकेकडून मनपाला शहर बस चालवण्याची एनओसी न मिळाल्याने शहर बस बंद..
    पूर्वीच्या कंत्राटदाकडे बँकेचे कर्ज थकीत असल्याने बँकेने दिली नाही एनओसी…
  • 17 Apr 2023 11:30 AM (IST)

    अजित पवार पुन्हा चर्चेत, ‘हा’ कार्यक्रम अचानक टाळला, कुठे गेले?

    पुरंदरमधील राष्ट्रवादीच्या शेतकरी मेळाव्याला शरद पवार, सुप्रिया सुळे यांची उपस्थिती,

    अजित पवारांची शेतकरी मेळाव्याला अनुउपस्थिती

    अजित पवार शेतकरी मेळाव्याला येणार नसल्यामुळे आयोजकांनी आयत्या वेळी शरद पवार, सुप्रिया सुळेंना निमंत्रित केलं

    अजित पवारांचा आज पुरंदर तालुक्याचा नियोजित दौरा होता

  • 17 Apr 2023 10:51 AM (IST)

    पुण्यात काँग्रेसच्या आंदोलनाला सुरुवात

    पुलवामा हल्ल्याच्या प्रसंगी केंद्र सरकारने निष्काळजीपणा दाखवला काँग्रेसचा आरोप

    पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेस केंद्र सरकार विरोधात आंदोलन

  • 17 Apr 2023 10:47 AM (IST)

    गारपीट आणि अवकाळी नंतर प्रशासन लागलं कामाला

    नाशिक : दिंडोरी तालुक्यात पंचनामे करण्यास युद्धपातळीवर सुरुवात

    मंडळ अधिकारी, तलाठी,ग्रामसेवक गारपीट झालेल्या शेतात दाखल

    कालच्या गारपीटी मध्ये अनेक शेतात गारांचा खच

    आज दिवसभरात पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना..

  • 17 Apr 2023 10:46 AM (IST)

    गारपीट आणि अवकाळी नंतर प्रशासन लागलं कामाला

    नाशिक – गारपीट आणि अवकाळी नंतर प्रशासन लागलं कामाला

    दिंडोरी तालुक्यात पंचनामे करण्यास युद्धपातळीवर सुरुवात

    मंडळ अधिकारी, तलाठी,ग्रामसेवक गारपीट झालेल्या शेतात दाखल

    कालच्या गारपीटी मध्ये अनेक शेतात गारांचा खच

    आज दिवसभरात पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना..

  • 17 Apr 2023 10:41 AM (IST)

    पुण्यात काँग्रेसचं आंदोलन

    पुलवामा हल्ल्याच्या प्रसंगी केंद्र सरकारने निष्काळजीपणा दाखवला काँग्रेसचा आरोप

    पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेस केंद्र सरकार विरोधात आंदोलन

    पुलवामा हल्ल्याच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक

    आंदोलनाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची देखील उपस्थिती

  • 17 Apr 2023 09:54 AM (IST)

    अजित पवार आज पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर

    विरोधी पक्षनेते अजित पवार आज पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर

    अजित पवारांच्या हस्ते वडकीत जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन

    पुरंदरमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत 11 वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन

  • 17 Apr 2023 09:31 AM (IST)

    पिंपरी- चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट दोन ने सोन्याच्या दुकानात गोलमाल करणाऱ्या कामगाराला अटक केली

    पिंपरी चिंचवड

    -पिंपरी- चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट दोन ने सोन्याच्या दुकानात गोलमाल करणाऱ्या कामगाराला अटक केली

    -आरोपी खुशाल ओसवालने सोन्याच्या दुकानातील पाच किलो सोन्याचे दागिन्यांची चोरी केले होती.ही चोरी केल्यानंतर आरोपी ओसवाल यानें त्याचे बनावट रेकॉर्ड तयार करून मालकाला धोका दिला

    -ही चोरी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी खुशाल ओसवाल याच्यासह एकूण सात जणांना अटक केली आहे

    -त्यांच्याकडून १ कोटी ४५ हजारांचे तीन किलो सोने दागिने जप्त केले असून सात लाख रोख रक्कम देखील मिळाली आहे

  • 17 Apr 2023 09:30 AM (IST)

    सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा,संभाजी ब्रिगेडची मागणी

    सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा,संभाजी ब्रिगेडची मागणी

    आप्पा धर्माधिकारी या व्यक्तीच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमात अंदाजे 11 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडल्याची बातमी आहे. बरेचजण अत्यावस्थ आहेत. कार्यक्रम आयोजनाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री प्रधान सचिव यांच्यासह अप्पा धर्माधिकारी यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे.

  • 17 Apr 2023 09:29 AM (IST)

    शॉर्टसर्किटमुळे गोठ्याला लागली आग नीलागोंदी येथील घटना आगीत जनावर जखमी

    भंडारा

    – शॉर्टसर्किटमुळे गोठ्याला लागली आग नीलागोंदी येथील घटना आगीत जनावर जखमी.

    – अल्पभूधारक शेतकऱ्यांचे लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गोठ्यात बांधलेल्या जनावरांवर इजा झाली आहे. यात एक गाय जखमी झाली तर दोन गाई व चार लहान जनावर यांना वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले आहे.

  • 17 Apr 2023 09:13 AM (IST)

    बाजार समिती निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्व पक्षीय नेते प्रयत्नशील

    कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्व पक्ष नेत्यांचे प्रयत्न

    शिंदे गटाकडून काँग्रेस-राष्ट्रवादीला प्रस्ताव

    तर आमदार विनय कोरे यांनीही मागणी करत दिला बिनविरोधचा प्रस्ताव

    बिनविरोधच्या प्रस्तावावर प्राथमिक चर्चा दोन दिवसात पुन्हा बैठक होणार

    20 एप्रिल माघारीचा शेवटचा दिवस

    भाजपसोबत न जाण्याचा नाना पटोले यांच्या सूचनेमुळे बिनविरोधसाठी काँग्रेसची होणार गोची

  • 17 Apr 2023 08:52 AM (IST)

    VIDEO | स्मशानभूमीत मोठ्याने ओरडण्याचा आवाज ऐकून पोलिस इकडे-तिकडे धावायला लागले, व्हिडिओ व्हायरल

    Viral Video | सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. स्मशानभूमीत जोरात ओरडण्याचा आवाज ऐकल्यानंतर घाबरलेले पोलिस कर्मचारी इकडे-तिकडे धावत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही हसल्याशिवाय राहणार नाही.

  • 17 Apr 2023 08:51 AM (IST)

    Unseasonal Rain : काढणीला आलेल्या पिकांना अवकाळी पावसाचा फटका, शेतात गारांचा खच

    हवामान विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोकण अणि मराठवाड्यात पुढील आठवडाभर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात देखील पुढील आठवडाभर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

  • 17 Apr 2023 08:50 AM (IST)

    Buldhana : व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडविले, आता मुलांचे शिक्षण, वर्षभराचा खर्च कसा भागवायचा, शेतकऱ्यांसमोर…

    बुलढाणा – चिखली (Chikhali) येथील व्यापारी संतोष गळे, अंकुश गाडे आणि त्यांचा साथीदार या तिघांनी मिळून जिल्ह्यातील जवळपास 300 शेतकऱ्यांचां शेतमाल (Agricultural goods) घेऊन कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचं प्रकरण उजेडात आल्यापासून त्याची सगळीकडं चर्चा सुरु आहे. संपूर्ण बातमी

  • 17 Apr 2023 08:45 AM (IST)

    कोल्हापुरात उपसा बंदीच्या आदेशामुळे शेतकऱ्यांना धडकी

    नदीकाठचे 50 हजार हून अधिक शेतकरी चिंतेत

    पंचगंगा आणि भोगावती नदीवर उपसा बंदीचा पाटबंधारे विभागाने दिलाय आदेश

    भोगावती नदी काठावर 18 ते 20, तर पंचगंगा नदी काठावर 21 ते 23 दरम्यान असणार उपसा बंदी

    पाटबंधारे विभागाच्या आदेशामुळे पिके वाळण्याचा धोका

    आदेशाविरोधात शेतकरी होतायेत आक्रमक, आज इरिगेशन फेडरेशनचा पाटबंधारे कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन

  • 17 Apr 2023 08:43 AM (IST)

    दोन दिवसापूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कोल्हापूरच्या करवीर पश्चिम भागात शेतीचं नुकसान

     

     

    32 हेकटरवरील पिकांच नुकसान, ऊस, मका पिकांसह भाजीपाल्याला सर्वाधिक फटका

    वाकरे गावात पडल्या गारांच्या लाद्या, कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू

  • 17 Apr 2023 08:42 AM (IST)

    उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत दिल्ली उच्च न्यायालयात हजर राहणार का?

    शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्या विरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याची आज सुनावणी

    उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडून सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या टीकेच्या संदर्भात ही याचिका दाखल केली होती.

    या याचिकेवर 28 मार्चला उच्च न्यायालयाने तिघांना समन्स बजावत 17 एप्रिलला प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले होते

    त्यामुळं हे तीनही नेते आज प्रत्यक्ष हजर राहणार का? हे पाहणं महत्त्वाचे आहे

  • 17 Apr 2023 08:40 AM (IST)

    जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील बोरघाटात बस दरी कोसळली, त्याच ठिकाणी लोखंडी ग्रील बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

     

     

    आता बसवले जाणारे हे ग्रील आधीपासूनच इथं असते तर कदाचित आज हा दिवस बाजीप्रभू ढोल ताशा पथकावर आला नसता

    हाच मुद्दा काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर उपस्थित करण्यात आला होता

    त्यानंतर 24 तासांच्या आत झोपी गेलेल्या यंत्रणेला जाग आली अन् इथं लोखंडी ग्रील बसवण्याच्या कामाला वेग आलाय

  • 17 Apr 2023 08:36 AM (IST)

    राज ठाकरे कामोठ्याच्या एमजीएम रुग्णालयात जाऊन श्रीसदस्यांची विचारपूस करणार

    उष्माघाताचा त्रास झाल्याने श्रीसेवकांवर कामोठ्याच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू

    महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघातामुळे 11 जणांचा मृत्यू

    माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली रुग्णांची विचारपूस