Maharashtra Breaking News Live : एकनाथ शिंदे उत्तर प्रदेशात दाखल, लखनौ विमानतळावर मोठ्या घडामोडी

| Updated on: Apr 09, 2023 | 7:42 AM

Maharashtra Breaking News Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आमदार आणि खासदारांसोबत अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांचा हा दौरा दोन दिवसांचा आहे. या दौऱ्याची जय्यत तयारी झाली आहे.

Maharashtra Breaking News Live : एकनाथ शिंदे उत्तर प्रदेशात दाखल, लखनौ विमानतळावर मोठ्या घडामोडी
Maharashtra Breaking News
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. आज दुपारी 3 वाजता ते आमदार आणि खासदारांसोबत अयोध्येच्या दिशेने प्रयाण करतील. विरोधी पक्षनेते अजित पवार कालपासून गायब आहेत. अजित पवार यांचा फोन नॉट रिचेबल येत आहे. सात आमदारांसोबत ते गेले असल्याचं कळतंय. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आज आणि उद्या नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. यासह राज्यातील आणि देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 Apr 2023 09:25 PM (IST)

    साईभक्तांना घेऊन विमान शिर्डीत उतरले

    शिर्डीत आजपासून नाईट लॅण्डींग सुविधा सुरू

    231 भक्तांना घेऊन दिल्लीतून विमान शिर्डीत पोहचले

    इंडिगो कंपनीचे पहिले विमान शिर्डीत रात्री उतरले

    साईभक्तांचे मोठ्या जल्लोषात स्वागत

    आलेल्या भाविकांचे केले स्वागत

    केक कापून आनंद केला साजरा

    आज शिर्डी विमानतळावर रात्री पहिल्यांदाच उतरले विमान

  • 08 Apr 2023 09:06 PM (IST)

    आधार कार्ड- पॅन कार्ड लिकिंगसंदर्भात मोठी अपडेट

    आता केंद्र सरकारने घेतला हा मोठा निर्णय

    दोन्ही कार्डच्या जोडणीसंदर्भात केंद्राचा दणका

    केंद्रीय अर्थमंत्र्यांनी नागरिकांना दिला हा इशारा

    जूनपर्यंत नागरिकांना कार्ड जोडणीसाठी दिली मुदतवाढ

    मुदतवाढीनंतर मात्र केंद्र घेणार कडक भूमिका, वाचा सविस्तर 

  • 08 Apr 2023 08:25 PM (IST)

    आता पाण्याखालून करा प्रवास

    अंडरवॉटर मेट्रोचा लवकरच श्रीगणेशा

    तुम्हाला अनुभवता येईल आगळीवेगळी सफर

    पाण्याखालून प्रवासाची पर्वणी

    या वर्षाच्या अखेरीस धावणार पाण्याखालून मेट्रो, वाचा बातमी 

  • 08 Apr 2023 08:24 PM (IST)

    सावरकर यांचा अपमान होत असताना उद्धव ठाकरे शांत का?; अतुल सावे यांचा सवाल

    छत्रपती संभाजीनगर :

    छत्रपती संभाजीनगरमध्ये वीर सावरकर गौरव समारोप यात्रा

    सहकार मंत्री अतुल सावे यांच्यासह शेकडो सावरकरप्रेमी महिला पुरुष यात्रेत सहभागी

    समारोप यात्रेतून अतुल सावे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका

    उद्धव ठाकरे यांना टीका करण्याशियाय काय येते

    सावरकरांबद्दल मनीशंकर अय्यर जेव्हा बोलले होते, त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना चपलेने आणि बुटाने मारले होते.

    आज सावरकर यांचा अपमान होत असताना उद्धव ठाकरे शांत का बसले .

    उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस सोबतची युती तोडायला, त्यांना सोडायला पाहिजे होते ते आज काँग्रेसच्या मांडीला मंडी लावून बसले आहेत

  • 08 Apr 2023 08:20 PM (IST)

    नगर शहरासह जिल्ह्यात काही भागात जोरदार पावसाची हजेरी

    वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह गारांचा पावसाला सुरुवात

    जोरदार पावसाने अनेक भागातील विजेची बत्ती गुल

    नगर ,कर्जत ,पारनेर सह अधिभागात गारपीट

    कलिंगड,खरबूज टोमॅटो,कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

  • 08 Apr 2023 07:35 PM (IST)

    एकनाथ शिंदे उत्तर प्रदेशात दाखल, लखनौ विमानतळावर मोठ्या घडामोडी

    लखनौ : 

    एकनाथ शिंदे उत्तर प्रदेशात दाखल, लखनौ विमानतळावर मोठ्या घडामोडी

    एकनाथ शिंदे यांच्या स्वागतसासाठी यूपीचे मंत्री स्वतंत्रदेव सिंह लखनौ विमानतळावर

  • 08 Apr 2023 07:26 PM (IST)

    जपानने छापल्या होत्या भारतीय नोटा

    नकली नोटा नाही तर खरंच छापल्या होत्या नोटा

    5,10 आणि 100 रुपयांची केली होती छपाई

    नोटा छापण्यामागील कारण तरी काय

    भारतात छपाईचा कारखाना असताना का केला प्रताप, वाचा बातमी 

  • 08 Apr 2023 07:11 PM (IST)

    अंबरनाथमध्ये भरधाव अल्टो गाडीचा भीषण अपघात

    अपघातात चार ते पाच जण गंभीर जखमी

    लोकनगरी नवीन बायपास रोडवरील घटना

    अतिवेगामुळे नियंत्रण सुटून कारचा अपघात

    गंभीर जखमीवर उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू

    दोन तरुण गाडीच्या दारावर बसून स्टंटबाजी करताना अपघात झाल्याची माहिती

  • 08 Apr 2023 07:11 PM (IST)

    माळशिरस तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी

    गिरवी, इस्लामपूर परिसरात मेघगर्जनेसह मुसळधार अवकाळी पाऊस

    इस्लामपूर येथे नारळाच्या झाडावर वीज पडून झाडांनी घेतला पेट

    दुपारपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते

    त्यानंतर या भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळायला सुरुवात

    पावसामुळे या भागातील अनेक गावांमध्ये पाणीच पाणी

    पावसामुळे पिकाला मोठा फटका

  • 08 Apr 2023 06:55 PM (IST)

    एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी लखनौ विमानतळावर विशेष बँड पथक सज्ज

    लखनौ :

    एकनाथ शिंदे आमदार-खासदारांसह अयोध्या दौऱ्यासाठी रवाना
    एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी लखनौ विमानतळावर विशेष बँड पथक सज्ज
    विमानतळावर सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा अलर्टवर
    उत्तर प्रदेश सरकारकडून सर्व गोष्टींची काळजी घेतली जात आहे

  • 08 Apr 2023 06:37 PM (IST)

    पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दावत ए इफ्तार पार्टीचं आयोजन

    राष्ट्रवादीच्या इफ्तार पार्टीला राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची उपस्थिती

    पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे इफ्तार पार्टीचं आयोजन

  • 08 Apr 2023 06:24 PM (IST)

    या शेअरने करुन दिली कमाई छप्परफाड

    एकाच दिवसात एफडीपेक्षा दिला जास्त परतावा

    रेल्वेने ऑर्डर दिल्याची वार्ता कळताच शेअर सूसाट

    गुंतवणूकदारांना मालामाल केले एकाच दिवसात

    रेल्वेने दिले कोट्यवधीचे कंत्राट, हा शेअर धावणार तुफान, वाचा सविस्तर

  • 08 Apr 2023 06:07 PM (IST)

    नाशिकमध्ये बागलाण तालुक्यात गारपिटीसह अवकाळी पावसाची पुन्हा हजेरी

    करंजाड, जायखेडा, वाघेळे, बिजोडे, नीताने, पारनेर

    कांद्यासह मिरची टोमॅटो आदी शेती पिकांचे नुकसान

  • 08 Apr 2023 05:51 PM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता

    मुंबई : 

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदार-खासदारांसह अयोध्या दौऱ्यासाठी रवाना
    मुख्यमंत्र्यांसह भाजपचे काही नेतेदेखील अयोध्येला रवाना
    आता देवेंद्र फडणवीसही अयोध्या दौऱ्याला जाण्याची शक्यात

     

  • 08 Apr 2023 05:38 PM (IST)

    आता घरातील दागिन्यांचं काय करणार

    हॉलमार्कचा नियम तर लागू झाला

    घरातील सोन्याची विक्री करता येणार की नाही

    हॉलमार्कशिवाय सोने विक्रीवर तर बंदी आली

    केंद्र सरकारने तर लागू केला नवीन नियम

    मग आता तुम्हाला दागिन्यांची विक्री करता येणार की नाही, वाचा बातमी 

  • 08 Apr 2023 03:42 PM (IST)

    Breaking | मंत्री उदय सामंत यांचं अयोध्येतून मोठं वक्तव्य

    ‘अंबादास दानवे मुख्यमंत्री एकनात शिंदे यांच्या संपर्कात’

    दानवेंना शिंदे यांच्यावर टीका करणे क्रमप्राप्त- उदय सामंत

  • 08 Apr 2023 02:58 PM (IST)

    पुणे लोकसभेबाबत बावनकुळे म्हणतात

    पुणे लोकसभेबाबत तूर्तास मी चर्चा घडवणार नाही, तुम्ही ही घडवू नका – चंद्रशेखर बावनकुळे

    पुण्यातील भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट कुटुंबीय अद्याप दुःखातून सावरलेलं नाही.

    त्यामुळं पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीबाबत तुम्ही काहीही चर्चा करू नका.

  • 08 Apr 2023 02:31 PM (IST)

    पुण्यातील महाविकास आघाडीच्या सभेला 1 लाख लोक जमणार

    14 एप्रिल रोजी महाविकास आघाडीची सभा

    पुण्यातील नाना पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार सभा

    महविकास आघाडीचे सर्व नेते या सभेला उपस्थित राहणार

    सभेसाठी कुठलाही मानपान होणार नाही, आम्ही सगळे एकाच प्लॅटफॉर्मवर, आघाडीच्या नेत्यांचा दावा

  • 08 Apr 2023 02:29 PM (IST)

    मुख्यमंत्री सचिवालयाचे अधिकारी लखनऊ विमानतळावर दाखल

     

     

    सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात येतोय

    संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लखनऊ विमानतळावर दाखल होणार

    त्या आधी केंद्रीय पोलीस फोर्स आणि मुख्यमंत्री सचिवालयाचे अधिकारी यांच्याकडून विमानतळावरचा आढावा घेण्यात आलाय

  • 08 Apr 2023 02:16 PM (IST)

    हिंगोली : अवकाळी पावसाने घेतला शेतकऱ्याचा बळी

    अवकाळी पावसात 28 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

    वीज पडल्याने पिराजी चव्हाण या शेतकऱ्याचा मृत्यू

    औंढा तालुक्यातील गोजेगाव शिवारातील घटना

  • 08 Apr 2023 01:06 PM (IST)

    खासदार श्रीकांत शिंदे थोड्याच वेळात लखनौ विमानतळावर दाखल होणार

    भाजपा पदाधिकारी करणार स्वागत, स्वागतासाठी काळ्या गाड्यांचा ताफा सज्ज

    एकाच रंगाच्या गाड्या ताफ्यात असणार, पदाधिकारी विमानतळावर जमले

     

  • 08 Apr 2023 12:04 PM (IST)

    मनसे नेते अविनाश जाधव यांना मुंब्र्यात त बंदी

    11 एप्रिल रोजी अविनाश जाधव यांचा मुंब्र्यत होता सत्कार

    मुस्लिम समाजाने आयोजित केला होता सत्कार

    कायदा सुव्यवस्थचा प्रश्न उभा राहू नये म्हणून पोलिसांनी अविनाश जाधव यांनी दिली नोटीस

    जाधव यांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष

  • 08 Apr 2023 11:46 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याआधी सुशोभीकरणाच्या कामाला वेग

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याआधी लखनौ विमानतळावर सुशोभीकरणाचं काम जोरात

    ‘आय लव्ह लखनौ’ च्या सजावटीचं काम जोरात सुरू आहे

    कामगारांकडून फुलझाडांची सजावट करण्यात येतीये

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी लखनौ विमानतळावर येतायेत

  • 08 Apr 2023 11:41 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा

    लखनौ विमानतळावर सुशोभीकरणाचे काम जोरात

    आय लव्ह लखनौ या सजावटीचे काम जोरात

    कामगारांकडून फुलझाडांची सजावट करण्यात येते

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी लखनौ विमानतळावर येणार

  • 08 Apr 2023 11:39 AM (IST)

    कोल्हापूर : चेक पोस्टच्या खाजगीकरणाला विरोध वाढला

    कागल चेक पोस्ट खाजगीकरणाविरोधात आज लोरी असोसिएशनचा मोर्चा

    50 ट्रक घेऊन ट्रक चालक-मालक मोर्चामध्ये सहभागी

    कोल्हापुरातील शाहू टोल नाकापासून होणार मोर्चाला सुरुवात

    ट्रकसह मोर्चाने कागल चेक पोस्ट ऑफिसवर जात दाखवले जाणार काळे झेंडे

  • 08 Apr 2023 10:54 AM (IST)

    लखनौ विमानतळावर शिवसैनिक यायला सुरुवात

    आपल्याला पद्धतीने शिवसैनिक अयोध्येत दाखल होणार

    ठाण्यातून 2 हजार कार्यकर्ते अयोध्येत दाखल होणार

    शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे

  • 08 Apr 2023 10:38 AM (IST)

    आशिष देशमुख यांना नोटीस

    महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीचे कारणे दाखवा नोटीस मला देण्यात आली आहे.

    नोटिशीबाबत माझे म्हणणे आहे की मी जी काही भूमिका घेतली ती काँग्रेस व राहुल गांधी यांच्या हितासाठी घेतली आहे

    नोटीसीला मी लवकरच सविस्तर उत्तर देणार

    मी इतर कुठल्याही पक्षात जाणार नाही

    शुक्रवार,शनिवार रविवार असा मोठा विकेंड आल्याने विमानाच्या तिकीट वाढल्याने मी पुणे मार्गे नागपुरात आलो- आशिष देशमुख

  • 08 Apr 2023 10:26 AM (IST)

    गुंतवणूकदारांना एफडीची लॉटरी

    वाढीव व्याजदराचा सर्वाधिक परतावा

    एफडीवर अजून मिळणार का व्याज

    पतधोरण समितीची बैठक जून महिन्यात

    गुंतवणूकदारांना मिळेल मोका, होईल धोका, वाचा बातमी 

  • 08 Apr 2023 10:08 AM (IST)

    विदर्भातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा तडाखा

    बहुतांश जिल्हांत वादळी पाऊस आणि गारपीट

    अमरावती जिल्ह्यात विज पडून एक ठार, दोन जखमी

    नागपूरसह अनेक भागात अजूनही पावसाची रिपरीप

  • 08 Apr 2023 09:46 AM (IST)

    सोलापूर जिल्ह्यातील बार्शी मध्ये वादळी वाऱ्याचा शेतकऱ्याला फटका

    बार्शी तालुक्यातील शेलगांव होळे गावातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याचे मोठे नुकसान

    अल्पभूधारक शेतकऱ्याची बाग संपूर्णपणे जमीन दोस्त झाली

    शेलगाव होळे येथील अल्प भूधारक शेतकरी योगेश शिंदे यांची दीड एकर द्राक्ष बाग वादळीवाऱ्यामुळे पूर्णतः झोपली

    द्राक्ष बागेचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याचे जवळपास आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान

    काल मध्यरात्री आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे संपूर्ण द्राक्ष बाग झोपली

    प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून न्याय देण्याची मागणी

  • 08 Apr 2023 09:38 AM (IST)

    सोने-चांदीत गुंतवणुकीचा मोका की धोका

    या आठवड्यात भावात जोरदार मुसंडी

    आंतरराष्ट्रीय बाजारात किंमतीत मोठी वाढ

    डॉलर इंडेक्स दोन महिन्यांच्या निच्चांकावर

    खरेदीदारांनी आखडता घेतला हात

    सोने-चांदीत गुंतवणूक करावी की नाही

    अजून भाव किती वाढणार, बातमी एका क्लिकवर

  • 08 Apr 2023 09:24 AM (IST)

    अयोध्याच्या शरयू नदी तिरी महाआरतीची तयारी सुरू

    अयोध्याच्या शरयू नदी तिरी महाआरतीची तयारी सुरू

    दुसरीकडे नौकाविहाराचा राम भक्त घेत आहेत आनंद

    शरयू घाटावरचा परिसर स्वच्छ करायला देखील सुरुवात

    सर्व बोटींवर शिवसेनेचे ध्वज लावण्यात आले

  • 08 Apr 2023 09:24 AM (IST)

    17 तासांनंतर अखेर अजित पवार दिसले

    अजित पवार नॉट रिचेबल झाल्याच्या चर्चा

    आमदारांना घेऊन नॉट रिचेबल झाल्याच्या चर्चांना उधाण

    17 तासानंतर पुण्यातील एका कार्यक्रमाला सपत्नीक हजेरी लावली

    पण एवढा वेळ कुठे होते, या प्रश्नाचं गूढ वाढलं

  • 08 Apr 2023 09:18 AM (IST)

    कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पैशाचा पाऊस ?

    कोल्हापूर

    कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पैशाचा पाऊस?

    कोगनोळी टोल नाक्यावर साडेसात लाखांची रोकड पकडली

    बस मधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडे सापडली रक्कम

    सलग दुसऱ्या दिवशी मिळून आली रोकड

    गुरुवारी रात्री याच ठिकाणी दीड कोटीची रोकड केली होती जप्त

    विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वाहनांची केली जातेय
    तपासणी

    तपासणी दरम्यान सलग दोन दिवस सापडली रोकड

  • 08 Apr 2023 09:03 AM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार आज पालघर जिल्हा दौऱ्यावर

    मोखाडा येथील रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महावीध्यालाय नवीन इमारतीचा उद्घाटन आणि नामकरण समारंभ पवारांच्या हस्ते पार पडणार

    10.30 वाजता शरद पवार यांचे मोखाडा येथे हेलिकॅप्टरने आगमन होईल, 11 ते साडे 12 या कालावधीत कार्यक्रम होणार आहे.

    या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालघर पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील निमंत्रित आहेत

  • 08 Apr 2023 09:02 AM (IST)

    सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या

    पहाटेच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली

    अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली

    या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

    हवामान खात्याने सोलापूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता.

    शुक्रवारी दिवसभर शहर, जिल्ह्यात ढगाळ वातावरण दिसून आले. त्यानंतर पहाटेच्या सुमारास जोरदार पाऊसाने हजेरी लावली

  • 08 Apr 2023 09:01 AM (IST)

    कच्चा तेलाने उडवली झोप

    कच्चा तेलाचे भाव पुन्हा वाढले

    100 डॉलरकडे आगेकूच

    अनेक अर्थव्यवस्थांना बसेल फटका

    भारतावर होणार मोठा परिणाम

    आज तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव काय, वाचा बातमी 

  • 08 Apr 2023 09:01 AM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आज आणि उद्या नाशिक दौऱ्यावर

     

     

    आज नाशिकरोड येथे होणाऱ्या हिंदू मजदूर सभेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाला लावणार हजेरी

    तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील नाशिक दौऱ्यावर

    बावनकुळे विविध कार्यक्रमांसह पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक

  • 08 Apr 2023 08:59 AM (IST)

    चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील “भानुसखिंडी” नावाची वाघीण जखमी असल्याचे आले निदर्शनास

     

     

    टायगर सफारी दरम्यान निमडेला परिसरात काही पर्यटकांच्या लक्षात आली बाब

    पर्यटकांनी वाघिणीचा व्हिडिओ आणि फोटो काढून सोशल मीडियावर केले शेअर

    या वाघिणीसोबत तिचे 3 पिल्लं असून तिच्या मागच्या पायाला जखम असल्याने ती लंगडत असल्याची शक्यता

    कर्मचारी या वाघिणीवर लक्ष ठेवून असल्याची ताडोबा प्रशासनाकडून देण्यात आली माहिती

  • 08 Apr 2023 08:56 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्या दौऱ्यावर, दुपारी मुंबईतून निघणार

     

     

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या स्वागतासाठी लखनऊ विमानतळाच्या परिसरात शिवसेनेचं जोरदार शक्तीप्रदर्शन

    शिवसेना पक्षाच्या झेंड्यावर धनुष्यबाणाचं चिन्ह असलेले झेंडे सगळीकडे पाहायला मिळतायेत

    लखनऊ विमानतळावर भगवं वातावरण पाहायला मिळतंय

    लखनऊ विमानतळावर मुख्यमंत्र्यांच आज जल्लोषात स्वागत केलं जाईल