Maharashtra Live Updates : चिंचवडचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांची माघार नाहीच, तिरंगी लढत होणार

| Updated on: Feb 11, 2023 | 6:06 AM

Maharashtra News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Live Updates : चिंचवडचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांची माघार नाहीच, तिरंगी लढत होणार
Maharashtra News Live
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: पुण्यात दोन्ही विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार जोरात सुरू झाला आहे. आज चिंचवड आणि कसबा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याची शेवटचा दिवस आहे. त्यामुळे किती उमेदवार माघार घेणार? मित्र पक्ष आणि बंडोबांना महाविकास आघाडी कसे शांत करणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 10 Feb 2023 06:59 PM (IST)

    सोलापूर काँग्रेस कमिटीसमोर राष्ट्रवादी युवक आणि युवती काँग्रेसची निदर्शने

    – सोलापूर काँग्रेस कमिटीसमोर राष्ट्रवादी युवक आणि युवती काँग्रेसची आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात निदर्शने

    – काँग्रेस कमिटी समोर आमदार रोहित पवार यांच्या समर्थनार्थ बॅनर लावून घोषणाबाजी करण्यात आली

    – सोलापूर लोकसभा मतदारसंघाबद्दल वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार प्रणिती शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर केली होती टीका

    – कोण रोहित पवार? असा सवाल विचारात आमदार प्रणिती शिंदे यांनी केली होती टीका

    – रोहित पवार कोण आहेत या संदर्भात काँग्रेस कमिटीसमोर बॅनर लावून राष्ट्रवादीच्या युवक आणि युवती काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

    – रोहित पवार यांच्याकडे असलेले पद बॅनरवर लिहिण्यात आले आहे

  • 10 Feb 2023 06:40 PM (IST)

    देशात लवकरच हायटेक रेल्वे स्टेशन्स

    रुफ प्लाझामध्ये खरेदीचा लुटता येणार आनंद

    आधुनिकतेची कास धरत रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट

    रेल्वे स्थानकांचा चेहरामोहरा बदलणार

    प्रवाशांना खरेदीचा, खेळण्याचा घेता येईल आनंद, वाचा बातमी

     

     

  • 10 Feb 2023 05:39 PM (IST)

    एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ केंद्रीय मंत्री नारायण राणेही उद्या पुणे दौऱ्यावर

    पुणे :

    – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पुणे दौऱ्यावर,

    – तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणेही उद्या पुणे दौऱ्यावर,

    – कसबा,चिंचवड पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांच्या दौऱ्याला महत्व,

    – नारायण राणे आणि मुख्यमंत्री प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत निवडणुकीचा आढावा घेणार

    – मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नगररचना विभागाच्या ग्रंथालयाचे उद्घाटन

    – तर नारायण राणे यांच्या हस्ते मेधा कुलकर्णी यांच्या घे भरारी प्रदर्शनाचे उद्घाटन

  • 10 Feb 2023 05:11 PM (IST)

    INDvsAUS| दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, टीम इंडियाकडे 144 धावांची आघाडी

    नागपूर कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला

    दुसऱ्या दिवसअखेर टीम इंडिया 7 बाद 321 धावा

    रोहित शर्माचं शतक, जडेजा-पटेलं याचं अर्धशतक

    टीम इंडियाकडे 144 धावांची आघाडी

  • 10 Feb 2023 05:02 PM (IST)

    गोकुळच्या दूध विक्री दरात दोन रुपयांनी वाढ

    कोल्हापूर :

    गोकुळच्या दूध विक्री दरात वाढ

    संपूर्ण महाराष्ट्रात गोकुळ दुधाचे दर वाढवले

    मुंबईत म्हैस दूध दर आधी प्रतिलिटर 69 होता तो आता 72 रुपयांवर पोहचला

    मुंबईत गायीच्या दुधाचा दर 54 वरून 56 रुपयांवर प्रति लिटर पोहोचला

    पुण्यामध्ये म्हशीच्या दुधात दोन रुपयांची वाढ 70 वरून 72 रुपये प्रति लिटर दूध मिळणार

    तर गाईचे दूध प्रति लिटर 56 रुपयांना मिळणार

    कोल्हापुरात म्हशीच्या दुधाचे दर 64 वरून 66 रुपये प्रति लिटर वाढवण्यात आले

    तर गाईचे दूध प्रति लिटर 48 रुपयावरून 50 रुपये इतके करण्यात आले

  • 10 Feb 2023 05:00 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर

    कोल्हापूर :

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर

    कनेरी मठ इथे होणाऱ्या पंचमहाभूत लोकोत्सवाच्या तयारीची पाहणी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार

    20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान कनेरी मठ इथे होणार आहे पंचमहाभूत लोकोत्सव

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे लोकोत्सवाची सुरुवात

    कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी उद्या स्वतः मुख्यमंत्री करणार

  • 10 Feb 2023 04:59 PM (IST)

    सोन्याच्या भावात आठवडाभरात पुन्हा घसरण

    सोने विक्रमी उच्चांकावरुन आले खाली

    सोन्यातील घसरणीचा गुंतवणूकदारांना मोठा फायदा

    चांदीतही विक्रमी घसरण, चांदी खरेदीदारांना होणार लाभ

    गुंतवणुकीसाठी आजच्या घडीला मोठी संधी, वाचा बातमी

     

     

  • 10 Feb 2023 04:05 PM (IST)

    उच्च न्यायालयाचा खडसेंना दिलासा

    भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी उच्च न्यायालयाचा खडसेंना दिलासा

    भोसरी प्रकरणी चौकशी करा

    या प्रकरणात अटकेपासून संरक्षण व चार्ज शीट दाखल न करण्याचा निर्णय देत उच्च न्यायालयाने दिला खडसेंना दिलासा

  • 10 Feb 2023 04:04 PM (IST)

    एकनाथ खडसे यांना दिलासा

    भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी उच्च न्यायालयाचा खडसेंना दिलासा

    भोसरी प्रकरणी चौकशी करा मात्र या प्रकरणात अटकेपासून संरक्षण

    चार्ज शीट दाखल न करण्याचा निर्णय देत उच्च न्यायालयाने दिला खडसेंना दिलासा

  • 10 Feb 2023 03:57 PM (IST)

    बुलढाणा : टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

    कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या टिप्पर दिली धडक

    मृतकाच्या नातेवाईकांनी मृतदेह घेऊन कंपनीत दोन तास दिला ठिय्या

    प्रदीप निंबोळकर यांचा अपघातात मृत्यू

    अपघातानंतर दोन तास मृतदेह कंपनीत ठेवला

  • 10 Feb 2023 03:17 PM (IST)

    Kasaba Bye Poll | आनंद दवे यांचा माघार घेण्यास नकार, कसब्यातही तिरंगी लढत

    आनंद दवे यांचा माघार घेण्यास नकार, कसब्यातही तिरंगी लढत

    चिंचवडनंतर आता कसब्यातही तिरंगी लढत

    हिंदू महासंघाचे आनंद दवे यांचा माघार घेण्यास नकार, कसब्यातही तिरंगी लढत

    कसब्यात आता रवींद्र धंगेकर, हेमत रासने आणि दवे यांच्यात चुरशीची लढत होणार

     

  • 10 Feb 2023 03:16 PM (IST)

    Pune Bye Election | चिंचवडमध्ये आता तिरंगी लढत

    राहुल कलाटे यांच्या एन्ट्री, चिंचवडमध्ये आता तिरंगी लढत

    अर्ज मागे घेण्याची दुपारी 3 पर्यंतची मुदत संपली

    अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांची माघार नाहीच

    आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक

    माझा एकतर्फी विजय होणार, कलाटे यांना विश्वास

     

  • 10 Feb 2023 03:13 PM (IST)

    आनंद दवे, अभिजित बिचुकले यांचा उमेदवारी अर्ज कायम

    कसब्यात आनंद दवे आणि अभिजित बिचुकले यांचा उमेदवारी अर्ज कायम

    कसब्यात आता भाजपच्या हेमंत रासने विरुद्ध महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर यांच्यात लढत, माघारीनंतर चित्र स्पष्ट

  • 10 Feb 2023 03:05 PM (IST)

    राहुल कलाटे निवडणूक लढणार

    राहुल कलाटे निवडणूक लढणार

    माघारीची मुदत संपल्यानंतर नाव मागे नाही

    महाविकास आघाडीची होणार अडचण

    सर्वांनी लढण्याचा आग्रह धरला- राहुल कलाटे

    लोकभावनामुळे निवडणूक लढणार- राहुल कलाटे

    तिरंगी लढतीचा फायदा होणार- राहुल कलाटे

  • 10 Feb 2023 02:53 PM (IST)

    देशात प्रथमच मिळाले लिथियम

    सोन्याचा भंडाराचा लागला शोध

    देशातील ११ राज्यात खनिजांचा मोठा भंडार मिळाला

    या भंडाऱ्यात १०० टक्के आयात करावे लागणारे लिथियमचा समावेश

  • 10 Feb 2023 02:52 PM (IST)

    जळगाव : बहाळ शिवारात बिबट्याचा धूमाकूळ

    जळगाव : बहाळ शिवारात बिबट्याचा धूमाकूळ

    बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकला

    बिबट्याने 15 जनावरांना फस्त केल्याने परिसरात भीतीचे वातावरण

    बिबट्याची करण्यात आली वैद्यकीय तपासणी

  • 10 Feb 2023 02:49 PM (IST)

    पुणे : मुलीची हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न

    पर्वती परिसरामध्ये असणाऱ्या जनता वसाहत येथील प्रकार

    १३ वर्षीय मुलीला तिच्या वडिलांनी हत्या करून कॅनलमध्ये फेकले

    त्यानंतर वडिलाने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला

  • 10 Feb 2023 02:35 PM (IST)

    नाशिकमधील अवैध सावकारीवर होणार कठोर कारवाई

     

     

    पोलीस पथक, कलेक्टर आणि सहकार विभाग हे तिघे मिळून ताबडतोब कारवाई करणार

    सहकार मंत्री अतुल सावे यांचे आश्वासन

    अशा प्रकारच्या खासगी सावकारीला आळा घातला पाहिजे

    कायद्याची अंमलबजावणी करताना तक्रारदार खरी माहिती देत नाही, त्यामुळे अनेक अडचणी येतात

    जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील पथक काम करणार

  • 10 Feb 2023 01:52 PM (IST)

    कसबा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचीही माघार

    किरण कचरे यांनी आपला अर्ज घेतला मागे

    आप कडून महापालिका निवडणूकीची तयारी केली जाणार

     

  • 10 Feb 2023 10:57 AM (IST)

    तर पिंपरी चिंचवड, कसबा पोटनिवडणूक रद्द होणार? कायदेतज्ज्ञाचा मोठा दावा?

    राज्यातील राजकीय घडामोडीसंदर्भात पुढील आठवड्यात महत्वाचा निर्णय होणार आहे. या निर्णयामुळे पुणे कसबा पेठ व पिंपरी चिंचवड निवडणूक रद्द होऊ शकते, असा दावा केला जात आहे….सविस्तर वाचा

  • 10 Feb 2023 10:25 AM (IST)

    मुकेश अंबानी यांना ब्रिटिश ब्रदर्सकडून तगडे आव्हान

    इस्सा ब्रदर्सही बूट्स ब्रँड खरेदीसाठी मैदानात

    रिलायन्स इंडस्ट्रीपेक्षा लावली जास्त बोली

    इंग्लंडमध्ये बूट्सचे 2200 हून अधिक औषधी स्टोअर, वाचा बातमी 

     

     

  • 10 Feb 2023 10:17 AM (IST)

    कसब्यात हेमंत रासनेंच्या प्रचारासाठी भाजप दिग्गजांना उतरवणार

     

     

    भाजप नेते किरीट सोमय्या आज संध्याकाळी 7 वाजता कसबा भाजप कार्यालयात आढावा घेणार

    शिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यात येणार आहेत

    शाह कसब्यातील ओकांरेश्वर मंदिरात महादेवाचं दर्शन घेणार

    भाजपकडून आजपासून प्रभागनिहाय बैठकांचे आयोजन

  • 10 Feb 2023 10:03 AM (IST)

    गोदावरी नदीच्या पात्रात फेसाळ युक्त पाणी

     

    नाशिक गोदावरी नदीपात्रात फेसाळ युक्त पाणी साचत आहे.

    गोदा काठावरील परिसरातील दहा ते पंधरा गावांच्या आरोग्याचा प्रश्न

    साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता

    गोदावरी पात्रात मलनिस्सारण केंद्रातून दूषित पाणी सोडले जात असल्याने पाणी फेसाळ युक्त

  • 10 Feb 2023 09:49 AM (IST)

    पुण्यात भाजपला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून ठाकरे गटाचं मोठं प्लानिंग

    पुण्यात भाजपला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून ठाकरे गटाचं मोठं प्लानिंग

    उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार

    तर संजय राऊत ,सुषमा अंधारे यांच्या होणार जाहीर सभा

    पुण्यात संजय राऊतांची प्रचाराच्या काळात तोफ धडाडणार

    तर आदित्य ठाकरेंचा पुण्यात होणार रोड शो

    मविआनं प्रचाराचं केलं मास्टर प्लानिंग !

  • 10 Feb 2023 09:45 AM (IST)

    कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत संदर्भात आज पुण्यात ठाकरे गटाची बैठक

    बैठकीत प्रचारासाठीची ठरणार रणनीती

    ठाकरे गट ताकदीने मविआला मदत करणार

    आज दुपारच्या बैठकीत ठाकरे गटाकडून ठरवली जाणार रणनीती

    शहरातील पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या पक्षप्रमुखांच्या सूचना

    आज बैठकीत पदाधिकाऱ्यांना सचिन अहिर मार्गदर्शन करण्याची

     

  • 10 Feb 2023 08:44 AM (IST)

    आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव काय

    अमेरिका अखेर भारतासमोर नरमली

    रशियाकडून कच्चे तेल खरेदीला आडकाठी नाही

    अमेरिकेने जाहीर केले नवीन धोरण

    देशात पेट्रोल-डिझेलची किंमत कमी होणार? वाचा सविस्तर

     

  • 10 Feb 2023 08:28 AM (IST)

    VIDEO : कोण आहे हा? 12 चेंडूत 60 धावा, बॅटिंगचा झंझावात, ठोकलं तुफानी शतक

    T20 क्रिकेटमध्ये याआधी जे त्याने केलं नव्हतं, ते त्याने करुन दाखवलं. वाचा सविस्तर….

  • 10 Feb 2023 08:18 AM (IST)

    अहमदनगरच्या आलमगीर येथील औरंगजेबची शेवटची आठवण असलेला चौथरा हटवण्याची मनसेची मागणी

    अहमदनगरच्या आलमगीर येथील औरंगजेबची शेवटची आठवण असलेला चौथरा हटवण्याची मनसेची मागणी

    औरंगजेबचा चौथरा न हटवल्यास जनआंदोलन उभारून चौथरा हटवू

    मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुसारे यांचा इशारा

    औरंगजेबचा चौथरा हटवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

    औरंगजेबाला शेवटाची अंघोळ घातलेल्या ठिकाणी बांधलेला चौथरा हटवा मनसेच्या नितीन भुतारे यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे पत्रा द्वारे मागणी

    मतांच्या राजकारणासाठी राष्ट्रवादीचे नेते औरंगजेबाच्या चौथाऱ्याला स्मारकाची मागणी करू शकतात

  • 10 Feb 2023 08:18 AM (IST)

    मात्र 15 फेब्रुवारीनंतर थंडी पूर्णपणे कमी होईल

    पुणे

    – राज्यात सध्या थंडीचे प्रमाण कमी असले तरी पुढील तीन दिवसानंतर पहाटे व रात्रीच्या थंडीत काहीशी वाढ होण्याची शक्यता,

    – मात्र 15 फेब्रुवारीनंतर थंडी पूर्णपणे कमी होईल,

    – हवामान विभागाने वर्तवला अंदाज,

    – उत्तर भारतात पश्चिमी चक्रावाताच्या प्रभावामुळे दाट धुके तसेच तीव्र थंडीची लाट, त्याचबरोबर बहुतांश राज्यात पाऊस,

    – त्यामुळेच राज्यातील तापमानातदेखील वाढ आणि घट होत असल्याचं दिसून आले आहे.

  • 10 Feb 2023 08:07 AM (IST)

    वसंत मोरेंची शिंदे फडणवीसांवर टीका

    वसंत मोरेंची शिंदे फडणवीसांवर टिका

    तुमची मतं कमी होतील म्हणून चिंचवड आणि कसब्यात निवडणूक घेतली

    मागील एक वर्षापासून शहराला कोणताही लोकप्रतिनिधी नाही

    प्रशासनाने शहराचं वाटोळ केलंय

    विकासकामे ठप्प झालीत निधी मिळत नाही लोकांना थोबाड दाखवू वाटत नाही

    कोणत्या पक्षाला सहानुभूती मिळेल म्हणून तुम्ही निवडणूका पुढे टाळत असाल तर तुमचा पराभव निश्चित आहे

    कारण जो मनात हरतो तो रणाय काय जिंकणार

    महापालिका निवडणुकीवरुन टिका

  • 10 Feb 2023 07:52 AM (IST)

    IND vs AUS 1st Test : आजच विजय होऊ शकतो पक्का, फक्त ‘या’ 4 गोष्टी केल्यास ऑस्ट्रेलिया येईल शरण

    IND vs AUS 1st Test : आज या 4 गोष्टी घडल्या, तर टीम इंडियाचा विजय पक्का समजा. वाचा सविस्तर…..

  • 10 Feb 2023 07:50 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील 1400 गावांत महसूल विभागाकडून राबवली जाणार मोहिम

    पुणे : गावातचं शेतकऱ्यांना मिळणार बिनचूक सातबारा,

    सातबाऱ्यातील त्रुटी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोहिम घेतली हाती,

    शेतकऱ्यांच्या जमीनीबाबत सातत्याने तक्रारी येतायेत,

    मात्र त्या दूर करण्यासाठी महसूल विभागान ही मोहीम हाती घेतली आहे.

  • 10 Feb 2023 07:49 AM (IST)

    भाजपाचे आजपासून नाशिकमध्ये अधिवेशन

    दोन दिवस चालणार अधिवेशन

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पीयूष गोयल, नारायण राणे यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि पदाधिकारी राहणार उपस्थित

    अमित शाह आणि नितीन गडकरी यांचा दौरा मात्र नाही

    प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत 150 ठराव केले जाणार संमत

  • 10 Feb 2023 07:46 AM (IST)

    राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर

     

     

    कादवा साखर कारखाना इथेनॉल प्रकल्पाचे करणार उद्घाटन

    तर मविप्रच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या नितीन ठाकरे यांचा करणार सत्कार

    पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक देखील होणार

  • 10 Feb 2023 07:10 AM (IST)

    एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी वंद भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटन जाहीरातीवरून मविआला डिवचलं

    मुंबई : महाराष्ट्रातील डबल इंजिन सरकारच्यावतीनं डबल वंदे भारत ट्रेन भेट,

    स्थानिक वर्तमानपत्रातून राज्य सरकारची जाहीरातबाजी,

    आज नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईत वंदे भारत ट्रेनचं होणार उद्घाटन.

  • 10 Feb 2023 06:32 AM (IST)

    पुण्यात राजगुरुनगरमधील हुतात्मा राजगुरु विद्यालयातील 80 मुलांना विषबाधा

     

     

    शालेय पोषण आहारातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज

    विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या आधिक…

    काल दुपारच्या वेळी शालेय पोषण आहार खाल्यानंतर विद्यार्थींना उलट्या पोटदुखी होऊ लागल्या

    सर्व विद्यार्थ्यांना चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले

    विद्यार्थ्यांना अचानक विषबाधा झाल्याने खळबळ…!

    चांडोली रुग्णालयात उपचार करणारे डॉक्टरच दारुच्या नशेत पालकांचा आरोप

    पालकांना मुलांना भेटून न दिल्याने पालकांमध्ये संताप

  • 10 Feb 2023 06:25 AM (IST)

    पत्रकार शशिकांत वावारीशे मृत्यू प्रकरणी अटकेत असलेला पंढरीनाथ आंबेरकर जिल्हा रुग्णालयात दाखल

     

     

    छातीत दुखत असल्याने केलं रुग्णालयात दाखल

    सध्या पंढरीनाथ आंबेरकर याला 7 दिवसांची पोलीस कोठडी

  • 10 Feb 2023 06:19 AM (IST)

    मुंबई विमानतळावर 2.8 किलो सोने जप्त

    मुंबई विमानतळ कस्टमच्या अधिकाऱ्यांनी 3 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 1.44 कोटी मूल्याचे सोने जप्त केले

    सोन्याची किंमत सुमारे 2.8 किलो

    2 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एकूण 92.43 लाख रुपयांचे 90,000 एईडी

    आणि 90,000 अमेरिकन डॉलर जप्त केले

  • 10 Feb 2023 06:13 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत वंदे भारत ट्रेनला देणार हिरवा कंदील

     

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वंदे भारत ट्रेनला हिरवा कंदील दाखवणार

    ही ट्रेन मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर अशी धावणार

    यावेळी मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार

    त्यानंतर अंधेरी मरोळ येथील बोहरा समाजाच्या अरबी अकादमीचंही मोदींच्या हस्ते लोकार्पण पार पडणार आहे.