मुंबई: चौफेर टीकेनंतर केंद्र सरकारकडून अखेर काऊ हग डे साजरा करण्याचा निर्णय मागे. जपानमध्ये साजरा होणार शिवजयंती सोहळा. कसबापेठ आणि चिंचडव निवडणूक तिरंगी होणार. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
– मुंबईच्या बांद्रा परिसरात बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून महिलांसाठी सामुहीक हळदी कुंकू आणि कोळी गरब्याचं आयोजन
– कुणाल सरमळकर देवारे आयोजीत कार्यकर्मात हजारोंच्या संख्येनं महिलांनी गरब्यात घेतला भाग
– शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे , कला शिंदे यांनीही पैठणीच्या खेळात घेतला भाग
– बाळासाहेबांच्या शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश
प्रणिती शिंदे या माझ्या मोठ्या भगिनीसारख्या आहेत.
– आमदार म्हणून त्यांचा मोठा अनुभव आहे.
– कुणाला कुठली जागा द्यायची हा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत वरिष्ठ घेतील.
– मी फक्त स्थानिक पदाधिकाऱ्यांची भावना बोलून दाखवली.
– आपल्याला सर्वांना मिळून भाजप विरोधात लढायचं आहे.
– छोट्या छोट्या गोष्टीचे नाट्य केलं जातंय.
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसब्याच्या मैदानात उतरणार
-पुढील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कसब्यात जाहीर सभा
-महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा
-कसबा पोटनिवडणूकीत शिंदे गट ताकतीने उतरणार
– ‘राजकीय विषयांवर बोलू नका’
– ‘राजकीय विषयांवर देवेंद्र फडणवीस बोलतील’
– ‘मंत्र्यांनी संबंधित विषयांवरच बोलावं’
– भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्र्यांना ताकीद
रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू
बुलढाणा पोलिसांनी केलेल्या अत्याचार विरोधात रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन
सुमारे 200 कार्यकर्ते सह अन्नत्याग आंदोलन
आजच्या आंदोलन दरम्यान पोलिसांनी बळाचा वापर करून केला लाठीचार्ज
प्रत्यक्ष कर संकलनात मोठी वृद्धी
तर प्राप्तिकरातूनही केंद्र सरकारला मोठा महसूल
चालू आर्थिक वर्षात करदात्यांनी तिजोरी भरली
मोदी सरकारच्या कर संकलन वाढविण्याच्या प्रयत्नांना यश, वाचा बातमी
चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीची बैठक
बाळासाहेबांची शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे दाखल
बैठकीला बाळासाहेबांची शिवसेना, शिवसंग्रामचे पदाधिकारी उपस्थित
कसब्यातील खा. गिरीष बापट यांच्या कार्यालयात बैठक
पुणेनंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये बॅनर वॉर
नागपूरची गुलामी, ठाण्याची गद्दारी..म्हणत राहुल कलाटेंवर निशाणा
बॅनर लावणारा खरा शिवसैनिक आहे कोण…वाचा सविस्तर
19 तारखेला पार पडणार शिवनेरीवर शासकीय सोहळा
शिवजयंती शिवनेरीवर उत्साहात पार पडणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निमंत्रण स्विकारलं
किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा
मुख्यमंत्र्यांनी शिवभक्तांना दिली माहिती
नाशिकमध्ये त्र्यंबकरोडवरील हॉटेल डेमॉक्रसी येथे भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन सुरू
अधिवेशनाचा आज दुसरा दिवस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन या नेत्यांच्या उपस्थितीत संघटनात्मक बैठक सुरू
या बैठकीला राज्यभरातून भाजपचे खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित
‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताने बैठकीची सुरुवात
केंद्रीय मंत्री पियूष गोयल देखील हजर
बैठकीला सुरुवात होताच सर्व मीडिया प्रतिनिधी यांना बाहेर काढण्यात आले
राजापूर तहसील कार्यालयावर रिफायनरी विरोधी संघटनेचे कार्यकर्ते धडकले
वारिसे यांच्या संशयास्पद मृत्यूमागील सूत्रधार कोण? याचा शोध घ्या
आंदोलकांच्या जोरदार घोषणा, रिफायनरी प्रकल्पाचाही नोंदवला निषेध
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी ठाकरेगटाचं जेलभरो आंदोलन
शिवाजी विद्यापीठाच्या दारात ठाकरे गटाचे जेलभरो आंदोलन
16 फेब्रुवारीला होणाऱ्या दीक्षांत समारंभासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना आमंत्रित करण्यात आलंय
मात्र कोशारी यांना ठाकरेगटाने विरोध केलाय
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाल्यास कार्यक्रम उधळून लावण्याचा ठाकरे गटाने इशारा दिलाय
विरोध दर्शवण्यासाठी आज ठाकरेगटाकडून जेलभरो आंदोलन करण्यात येतंय
18 ते 20 वर्षांच्या मित्रांनी आपल्या मैत्रिणींचे महागडे शौक पुर्ण पुरवण्यासाठी चक्क चोऱ्या सुरु केल्या. यातील काही मुलांचे वडील रिक्षा चालवतात किंवा कारखान्यात मजूर आहेत….सविस्तर वाचा
पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी व्यक्त केली शक्यता
आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किंमती जास्त
भारतात मात्र दर वाढू न दिल्याचा केला दावा
तेल विपणन कंपन्यांना 28,000 कोटी रुपयांचे नुकसान
पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितली आकडेवारी, वाचा बातमी
दहावी-बारावी परीक्षांच्या कामावर बहिष्कार घालण्याचा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा इशारा..
– प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यात १३ फेब्रुवारीला मोर्चा..
– त्यामुळे परीक्षेच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता,
– राज्यातील शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती २००५ पासून बंद आहे.
– त्यामुळे आता शाळांमध्ये बोटावर मोजण्याइतके शिक्षकेतर कर्मचारी राहिले आहेत.
– शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास परीक्षा काळात अनिश्चित काळासाठी संपाचा इशारा,
– महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांची माहिती
तुरूंगातून सुटका झाल्यावर प्रथमच ते नागपूरात येणार आहेत
कार्यकर्ते आणि कुटूंबीयांकडून जोरदार तयारी
बंगल्याला आकर्षक सजावट
उच्चांकी भावापेक्षा सोने 2300 रुपयांनी स्वस्त
तर चांदीत 6500 रुपयांची घसरण
आजही सोने-चांदीत मोठी घसरण
तज्ज्ञांचा अंदाज काय,गुंतवणूक करावी का? वाचा सविस्तर
केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले संकेत
स्वस्त पेट्रोल-डिझेलसाठी आखली योजना
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर वधारले
लोकसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल -डिझेलचे भाव उतरणार? वाचा बातमी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर
कणेरी मठ इथं होणाऱ्या पंचमहाभूत लोकोत्सव कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी करणार
20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान पंचमहाभूत लोकोत्सव होणार आहे
पंचमहाभूत लोकोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील येण्याची शक्यता
लोकोत्सव कार्यक्रमासाठी आठ राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल आमंत्रित
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कणेरी मठ येथील कार्यक्रमस्थळी चोख पोलीस बंदोबस्त
प्रशांत जगताप यांच्या नावाने फेक अकाउंट उघडून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट
प्रशांत जगताप यांची पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार
डी. एस. राठोर या व्यक्तीने फेक अकाउंट ओपन केल्याचा दावा
प्रशांत जगताप यांच्या नावाने अकाउंटवर होत आहेत आक्षेपार्ह पोस्ट
10 मिनिटं आधी प्रश्नपत्रिका दिली जाणारी पद्धत बंद
त्याच वेळेला प्रश्नपत्रिकांच केलं जाणार वाटप
उशीरा आलेल्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर प्रश्नपत्रिका आढळून आल्याच्या घटना घडल्या होत्या
त्यामुळे 10 मिनिटं आधी प्रश्नपत्रिका दिली जाणारी पद्धत बंद
सकाळच्या सत्रात अर्धा तास आधी म्हणजे 10.30 वाजता परीक्षा केंद्रावर तर दुपारी 2.30 वाजता परीक्षा केंद्रावर हजर राहणं बंधनकारक
बोर्डानं काढलं परिपत्रक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कणेरी मठ कोल्हापूर येथील पूर्वतयारीचा आढावा घेणार
12:30 वा कोल्हापूरमध्ये दाखल होतील आणि आढावा घेतील
पुणे, पिंपरी चिंचवड येथे महासत्संग सोहळ्याला उपस्थित राहणार
सायंकाळी 04:30 मोशी, पिंपरी चिंचवड येथे हा कार्यक्रम पार पडणार
वर्धा नदीवरील वाळू घाटांचा रखडला होता लिलाव, आता मार्ग मोकळा
सबंधित ग्रामपंचायतीच्या परवानगीसाठी 13 तारखेला विशेष ग्रामसभा
नागरिकाना बांधकामासाठी उपलब्ध होणार वाळू
केंद्र सरकारच्या पशू कल्याण बोर्डाने घेतला निर्णय
14 फेब्रुवारी हा दिवस काऊ हग डे म्हणून साजरा करण्याचे काढले होते आदेश
केंद्राच्या निर्णयावर विरोधकांसह देशवासियांकडून करण्यात आला होता विरोध