Maharashtra Live Updates : पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी कुणाला उमेदवारी द्यावी या विषयावर राष्ट्रवादीची बैठक

| Updated on: Feb 07, 2023 | 7:53 AM

Maharashtra News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Live Updates : पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी कुणाला उमेदवारी द्यावी या विषयावर राष्ट्रवादीची बैठक
Follow us on

मुंबई: स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची आज प्रथम पुण्यतिथी. त्यानिमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. अखेर कसब्यातून रवींद्र धंगेकरांना काँग्रेसची उमेदवारी. आज अर्ज भरणार. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

 

 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 07 Feb 2023 07:46 AM (IST)

    सामूहिक विवाह सोहळ्यात सर्वधर्मीय 11 विवाह जोडपी विवाहबद्ध, विदेशी पाहुण्यांची हजेरी

    सामूहिक विवाह सोहळ्यात सर्वधर्मीय 11 विवाह जोडपी विवाहबद्ध, विदेशी पाहुण्यांची हजेरी, वाचा 

  • 06 Feb 2023 09:00 PM (IST)

    पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी कुणाला उमेदवारी द्यावी या विषयावर राष्ट्रवादीची बैठक

    पुणे :

    पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी कुणाला उमेदवारी द्यावी या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक

    अजित पवार बैठकीतून बाहेर आले

    ‘चर्चा सुरु आहे, मी उद्या अर्ज भरायला येणार’, अजित पवारांची प्रतिक्रिया

  • 06 Feb 2023 07:43 PM (IST)

    नेपाळ | 15 जानेवारी रोजी पोखरामधील विमान अपघात प्रकरण

    यती एअरलाइन्सच्या ATR-72 विमानाच्या फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरनुसार इंजिनमध्ये बिघाड

    इंजिन बिघाडामुळेच विमान कोसळल्याची चौकशी समितीची माहिती

  • 06 Feb 2023 07:37 PM (IST)

    पुण्यात भाजप कार्यालयात स्थानिक पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक

    पुणे :

    पुण्यात भाजप कार्यालयात स्थानिक पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक

    कसबा विधानसभा पोटनिवडणुकी संदर्भात स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये होत आहे चर्चा

    शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली भाजप कार्यालयात बैठक सुरू

  • 06 Feb 2023 07:33 PM (IST)

    8 लाख रुपयांच्या लाच प्रकरणात तिघांना अटक

    सीबीआयने ईशान्य फ्रंटियर रेल्वेचे उपमुख्य अभियंता, वरिष्ठ विभाग अभियंता (SSE) आणि गुवाहाटीमधल्या एका खासगी कंपनीच्या कंत्राटदाराला केली अटक

    आसाम, इंफाळ, दिल्ली, बिहार आणि हरयाणाच्या सुमारे 19 ठिकाणी छापे

    आरोपी आणि इतरांच्या घरांवर छापे टाकून 1.02 कोटी रुपये जप्त, सीबीआयची माहिती

  • 06 Feb 2023 07:25 PM (IST)

    तुर्कस्तान आणि सीरियामधील भूकंपात आतापर्यंत 1500 हून अधिक लोकांचा मृत्यू

    शेकडो जण अजूनकही अडकल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

  • 06 Feb 2023 07:20 PM (IST)

    नाशिकमध्ये मोठी दुर्घटना टळली, पेट्रोल पंप शेजारी उभ्या असलेल्या ट्रकने अचानक घेतला पेट

    नाशिक :

    आडगाव परिसरात मोठी दुर्घटना टळली

    आडगाव ट्रक टर्मिनस परिसरात उभ्या असलेल्या ट्रकने अचानक घेतला पेट

    पेट्रोल पंप शेजारीच ट्रक ने पेट घेतल्याने उडाला गोंधळ

    अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

    सुदैवाने जीवित हानी नाही

  • 06 Feb 2023 06:37 PM (IST)

    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे घेणार टिळक कुटुंबियांची भेट

    पुणे : 

    – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे घेणार टिळक कुटुंबियांची भेट

    – टिळक कुटूंबियांची भेट घेऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार

  • 06 Feb 2023 06:36 PM (IST)

    तरकारी मालवाहू गाडी सोडवण्यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत थेट क्षेत्रीय कार्यालयात

    पुणे : 

    तरकारी मालवाहू गाडी सोडवण्यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत थेट क्षेत्रीय कार्यालयात

    चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना विचारला जाब

    नागरिकांना विनाकारण त्रास दिला तर कारवाई करण्याचाही इशारा

    धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मनपा अतिक्रमण कर्मचाऱ्यांनी टेम्पोवर केली होती कारवाई

    भाजीविक्रेत्यांना त्रास दिल्यास कारवाई करणार सावंतांचा इशारा

  • 06 Feb 2023 05:32 PM (IST)

    कुपवाडा | भारतीय लष्कराकडून कालारोस ब्लॉकच्या बडाखेत गावातून एका गर्भवती महिलेची सुटका

    5 किलोमीटर अंतरावर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेपर्यंत सैनिकांनी महिलेला स्ट्रेचरवर उचलून नेलं

    महिला आणि बाळ दोघांचीही प्रकृती ठीक असल्याची माहिती

  • 06 Feb 2023 05:28 PM (IST)

    तमिळनाडू | चेन्नई एअर कस्टम्सकडून दुबईहून आलेल्या एका पुरुष प्रवाशाकडून सोनं जप्त

    अंतरवस्त्रांमध्ये लपवलं होतं पोस्ट फॉर्ममधील सोन्याचं एक पाऊच

    नी-कॅपमध्ये लपवले होते पोस्ट स्वरुपातील सोन्याचे दोन पाऊच

    जप्त केलेल्या सोन्याची किंमत 56.94 लाख रुपये

  • 06 Feb 2023 05:18 PM (IST)

    चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात भाजपची मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

    पुणे : 

    – चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसंदर्भात भाजपची मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्वपूर्ण बैठक सुरू

    – प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू

    – भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना, आर पी आय, रासप, शिवसंग्राम पक्षाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित आहेत

  • 06 Feb 2023 04:25 PM (IST)

    ‘मला कधीही अटक होऊ शकते’, असं जितेंद्र आव्हाड का म्हणाले? भूमिका समोर

    जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

    जे मला प्राप्त परिस्थिती दिसतेय, त्यावरुन मला अटक होऊ शकते असं मी बोलतोय. माझ्यावर कलम 354 गुन्हा दाखल झालाय. पण कोर्टाने तो गुन्हा खोटा ठरवलाय

    मला वाटतं जेव्हा दोन गुन्हे पडले तेव्हा कसे पडले होते ते तुम्हाला माहिती आहे का?

    माझ्यावर सर्वोच्च न्यायालयात एक केस दाखल केली होती. त्यामध्ये एक प्रतिज्ञापत्र सादर करायचं होतं. त्या प्रतिज्ञापत्राला महत्त्व प्राप्त करुन देण्यासाठी दोन दिवसांत दोन केस दाखल केल्या. नंतर ते प्रतिज्ञापत्र सादर केलं. त्यामध्ये हा सराईत गुन्हेगार आहे, दोन महिन्यात याच्यावर दोन गुन्हे दाखल झाले आहेत, असं प्रतिज्ञापत्र पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलंय.

    विशेष म्हणजे माझ्यावर प्रकरणच नाहीय. असे खोटे गुन्हे करुन काहीतरी कारण काढून फसवायची कामे चालू आहेत.

    मी गुन्हाच केला नव्हतो. 1932 क्रिमिनल अॅमेंटमेंट अॅक्ट सेक्शन 7 हा अस्तित्वातच नाहीय. त्यांना 41 अ नोटीस द्यावी लागते. न्यायाधीशांनी लिहिलंय की, हे कुठल्याही पोलिसांनी पाळलेलं नाही. त्यामुळे नो केस असं पोलिसांनी म्हटलं आहे. त्यांनी कलम 354 गुन्हावरही there is no case, hence bail granted असं कोर्टाने म्हटलं आहे

  • 06 Feb 2023 04:09 PM (IST)

    जितेंद्र आव्हाड यांचं वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण, ‘टीव्ही 9 मराठी’ला मुलाखत देत म्हणाले….

    जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

    माझं वक्तव्य दोन हजार टक्के वादग्रस्त नाही. अफजल खान 1 लाखाचं सैन्य घेऊन प्रतापगडाकडे निघाला होता. जिजाऊंनी महाराजांना सांगितलं की, माळरानावर युद्धाच्या आमंत्रणासाठी जाऊ नकोस. अतिशय विचार करुन रणनीती आखली.

    अफजल खानाचा फुटलेला वकील कृष्णा कुलकर्णी याला निरोप पाठवून आम्ही तुम्हाला शरण येत आहोत अशी परिस्थिती निर्माण करुन पाच जणांना एकत्र करुन शिवाजी महाराज घुसले आणि अफजल खानाला झोपवलं.

    अफजल खान आदिलशाहीमधला एवढा मोठा सरदार होता. आदिलशाहच्या मातोश्रीने सांगितलेलं तू जाऊन शिवाजी महाराजांना हरवून ये. पण तो पडला ना धारातीर्थ!

    अफजल खान एवढा मोठा होता. त्याच्यापेक्षा पाच सैनिकांना घेऊन गेलेले शिवाजी महाराज मोठे ठरले हा इतिहास ठरला.

    शाहिस्तेखान लाल महालात होता. बाजूला सैन्य होतं. पण त्याला कळलंही नाही शिवाजी महाराज लाल महालात शिरले आणि त्याला खिडकीतून पळावे लागले. यामध्ये त्याची बोटं छाटली गेली. औरंगजेब एवढे वर्ष दिल्लीत होता त्याला एकदाही महाराष्ट्रात जमीन घेता आली नाही म्हणून महाराष्ट्र श्रेष्ठ ठरले ना?

    तुम्ही अंदमान स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनातून काढून टाका आणि सावरकर समजून सांगा.

    तुम्ही गांधीजी काढून टाका आणि नथुराम समजून सांगा.

  • 06 Feb 2023 03:43 PM (IST)

    IND vs PAK : जावेद मियाँदाद वाटेल ते बरळला, पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य

    IND vs PAK : जावेद मियाँदादने खूपच वायफळ बडबडल करताना काय म्हटलय? वाचा सविस्तर….

  • 06 Feb 2023 03:28 PM (IST)

    सोलापूर- रोहित पवार यांचे भाजपवर गंभीर आरोप

    लक्ष्मण जगताप आजारी असताना भाजपाने त्यांना केवळ मतदानासाठी बाहेर काढले

    मात्र त्यांना आजारी असताना अजित दादांनी मतद केली. त्यांची विचारपूस केली

    भाजपाने केवळ मतदानपुरते बाहेर काढले.. आजारी असताना किती मदत, विचारपूस केली हे माहिती नाही- रोहित पवार

  • 06 Feb 2023 03:14 PM (IST)

    कसबा पेठ पोटनिवडणूकित काँग्रेसमध्ये बंडखोरी

    पुणे : काँग्रेसचे इच्छुक।उमेदवार बाळासाहेब दाभेकर उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार,

    बाळासाहेब दाभेकर उद्या अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणार,

    दाभेकर यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती.

  • 06 Feb 2023 02:56 PM (IST)

    बेळगाव महानगरपालिकेवर पुन्हा मराठी भाषिक विराजमान

    बेळगाव महानगरपालिकेवर पुन्हा मराठी भाषिक विराजमान

    महापौर पदी शोभा सामना तर उपमहापौर पदी समितीच्या रेश्मा पाटील यांची निवड

    बेळगाव महानगर पालिकेवर सर्वाधिक जागा ह्या भाजपच्या होत्या

    भाजपकडे अनेक कन्नड संघटनांनी महापौरसाठी कन्नड उमेदवार द्यावा अशी मागणी केली होती

    मात्र भाजपने महापौरपदी शोभा सामना तर उपमहापौरपदी समितीच्या रेश्मा पाटील यांची निवड केली

  • 06 Feb 2023 02:12 PM (IST)

    VIDEO : युसूफ पठानची एक चाल Mumbai Indians वर पडली भारी, 7 SIX, 9 फोर, 122 रन्स, मॅचच फिरली

    कॅप्टनशिपची संधी मिळताच युसूफ पठान एक चाल खेळला. त्यामुळे डावच उलटला. वाचा सविस्तर….

  • 06 Feb 2023 02:11 PM (IST)

    अर्थसंकल्पानंतर सोने, चांदी दरात काय होतोय बदल, आजचा दर पाहा

    गेल्या दोन महिन्यांत दहा ग्रॅम सोन्याचा दर सुमारे सात हजार रुपयांनी वाढला आहे. अर्थसंकल्पामुळे सोन्याचेच नव्हे तर चांदीच्या दरातही वाढ झाली. मात्र, सोमवारी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे….वाचा सविस्तर

  • 06 Feb 2023 02:11 PM (IST)

    IND vs AUS Test : ऑस्ट्रेलियाला एकटा पुरुन उरतो, पण टेस्ट सीरीजमध्ये नाही खेळणार ‘हा’ भारतीय प्लेयर

    IND vs AUS Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध तो सर्वात यशस्वी आहे. त्याची सरासरीच सर्वकाही सांगून जाते. वाचा सविस्तर….

  • 06 Feb 2023 02:10 PM (IST)

    Shikhar dhawan : दोन मुलांच्या आई बरोबर लग्न, आता तीच धवनला उद्‌ध्वस्त करायला निघाली?

    Shikhar dhawan Divorce : आयेशा धवनसाठी लकी होती का? कारण ती गेली, आणि….वाचा सविस्तर….

  • 06 Feb 2023 01:50 PM (IST)

    पुण्यात काँग्रेस पक्षाचं आंदोलन, एलआयसी कार्यालयासमोर निदर्शने

     

    अदानी समूहातील गैरव्यवहारा प्रकरणी काँग्रेसचं आज देशभर आंदोलन सुरू

    पुण्यातील अलका टॉकीज चौकात असलेल्या एलआयसी कार्यालयासमोर सुरु आहे आंदोलनं

    आंदोलनाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, सुशील कुमार शिंदे आदी नेते उपस्थित

  • 06 Feb 2023 12:32 PM (IST)

    VIDEO : मुलाने वॉशरूममध्ये हँड ड्रायरने केस सुकवले, 6 सेकंदाचा हा व्हिडिओ पाहून लोक म्हणतात…

    VIDEO : वॉशरूममध्ये लावलेल्या हँड ड्रायरने मुलगा केसं सुकवतोय, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल,  वाचा सविस्तर बातमी

  • 06 Feb 2023 12:11 PM (IST)

    परभणीत एलआयसी कार्यालयासमोर काँग्रेसची निदर्शन

     

     

    अदाणी समूहातील आर्थिक गैरव्यवहार झाल्याने एलआयसी कार्यालयासमोर काँग्रेसचे आंदोलन

    भाजप आणि पंतप्रधान मोदी विरोधात घोषणाबाजी सुरू

    काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते जमले

  • 06 Feb 2023 12:09 PM (IST)

    आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का

     

    50 हून अधिक ज्येष्ठ शिवसैनिक शिंदे गटात करणार प्रवेश

    थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी पार पडणार प्रवेश सोहळा

    आदित्य ठाकरेंचा आजपासून संवाद यात्रा निमित्त नाशिक दौरा

  • 06 Feb 2023 11:49 AM (IST)

    जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजप आक्रमक

    मुंबई : जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपकडून घोषणाबाजी,

    जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागावी अशी मागणी,

    भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार होते,

    आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याचा आरोप भाजपने केला आहे.

  • 06 Feb 2023 11:16 AM (IST)

    कोल्हापुरात शिवसेनेचा कोश्यारींविरोधात चलेजावचा नारा

    कोल्हापुरात शिवसेनेचा कोश्यारींविरोधात चलेजावचा नारा

    येत्या 16 तारखेला कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ

    काळे झेंडे दाखवत निषेध करणार असल्याचा जिल्हाप्रमुख संजय पवार यांचा इशारा

    दीक्षांत समारंभाला कुलपती म्हणून राज्यपाल राहणार उपस्थित

    भगतसिंह कोश्यारी यांना शिवसेना ठाकरे गटाचा विरोध

    कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्य विरोधात शिवसेना आक्रमक

  • 06 Feb 2023 11:11 AM (IST)

    नाना पटोले यांना मांजर आडवी गेली, पुणे शहरध्यक्षांनी काय केले पाहा

    काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुण्यात होते. त्यावेळी काँग्रेस भवनाच्या गेटवर एक मांजर आली होती. ही मांजर नेमकी नाना पटोले बाहेर पडत असताना त्यांच्या मार्गावर आली….वाचा सविस्तर

  • 06 Feb 2023 10:55 AM (IST)

    IND vs AUS : नागपूरच्या पीचला ऑस्ट्रेलियन टीमने घाबरलच पाहिजे, बघा आकडे काय सांगतात?

    IND vs AUS : ऑस्ट्रेलियन टीमने नागपूरच्या विकेटवर शेवटचा कसोटी सामना 2008 मध्ये खेळलेला. त्याचा निकाल काय लागलेला? वाचा सविस्तर…

  • 06 Feb 2023 10:54 AM (IST)

    कसबा पोटनिवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी थोड्याच वेळात काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते कसबा मंदिरात

    कसबा गणपती मंदिरात आरती करून काँग्रेस उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार

    काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आदी नेते उपस्थित

    काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर

  • 06 Feb 2023 10:54 AM (IST)

    RCB च्या स्टार बॅट्समनची धुवाधार बॅटिंग, 7 फोर, 4 SIX, IPL टीम्ससाठी धोक्याची घंटा

    त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. इतर टीम्ससाठी ही धोक्याची घंटा आहे. वाचा सविस्तर….

  • 06 Feb 2023 10:53 AM (IST)

    Virat Kohli : ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या कसोटीत विराट कोहलीकडे महारेकॉर्ड करण्याची संधी

    Virat Kohli : विराट कोहली नवा इतिहास रचू शकतो. वाचा सविस्तर….

  • 06 Feb 2023 10:37 AM (IST)

    मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी, कसारा घाट कसा केला पार?

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेली वंदे भारत एक्स्प्रेस सोमवारी इगतपुरी स्थानकात चाचणीसाठी दाखल झाली आहे. घाट सेक्शन असल्याने येणाऱ्या रेल्वेस घाट चढण्यासाठी मागून बँकर लावावे लागतात…..वाचा सविस्तर

  • 06 Feb 2023 10:08 AM (IST)

    Entertainment Update : पठाणचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला कायम; १२ व्या दिवशी सिनेमाने केली इतक्या कोटींची कमाई

    ‘पठाण’ सिनेमाच्या व्यवसायात मोठी वाढ; सलग १२ दिवशी सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची सिनेमागृहाबाहेर मोठी गर्दी…

    जगभरात सिनेमाने केली इतक्या कोटींची कमाई… वाचा सविस्तर

  • 06 Feb 2023 09:42 AM (IST)

    हरभरा पिकाची काढणी सुरु, योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी निराश

    धुक्यामुळे या पिकाला बसला मोठा फटका, निराश शेतकऱ्यांचं सरकारकडं साकडं, वाचा बातमी सविस्तर 

  • 06 Feb 2023 08:48 AM (IST)

    Entertainment Update : भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण

    ६ फेब्रुवारी २०२२ मध्ये लतादीदी यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आणि एका पर्वाचा अंत झाला

    लतादीदी आज आपल्याच नसल्या तरी त्यांच्या अनेक आठवणी आपल्या सोबत आहेत…. वाचा सविस्तर

  • 06 Feb 2023 08:47 AM (IST)

    चिंचवड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप आपला उमेदवारी अर्ज करणार दाखल

    पिंपरी चिंचवड : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयापासून ते पिंपळे गुरव चे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर असणार पदयात्रा,

    दहा वाजता दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालया समोर कार्यकर्ते जमणार,

    अर्ज दाखल करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांची उपस्थिती.

  • 06 Feb 2023 08:41 AM (IST)

    जय शाह यांच्याशी PCB अध्यक्ष उद्धटपणे बोलले, बैठकीतील INSIDE स्टोरी आली समोर

    आशियाई क्रिकेट काऊन्सिलच्या बैठकीत काय घडलं? त्याची माहिती समोर आलीय. वाचा सविस्तर…..

  • 06 Feb 2023 08:40 AM (IST)

    IND vs AUS : दीड वर्ष बेंचवर बसवलेल्या खेळाडूला रोहित-राहुल जोडी पहिल्या टेस्टमध्ये देणार संधी

    IND vs AUS : ‘या’ महत्त्वाच्या जबाबदारीसाठी केएल राहुलचा अजिबात विचार होणार नाही. वाचा सविस्तर….

  • 06 Feb 2023 08:32 AM (IST)

    तुरीच्या गंजीला आग लावल्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान, दिवसाढवळ्या प्रकरण घडल्यामुळे…

    Agriculture News : दुपारी तुरीच्या गंजीला आग, शेतकऱ्यांची आग विझवण्यासाठी पळापळ,पण शेवट व्हायचा तोच झाला, वाचा बातमी 

  • 06 Feb 2023 08:16 AM (IST)

    कसबा पोटनिवडणूक वंचित बहुजन आघाडी लढवण्याच्या तयारीत

    रात्री उशीरापर्यंत वंचित आघाडीत नेत्यांमध्ये चर्चेची खलबतं

    आज राज्य पदाधिकाऱ्यांची दुपारी बैठक

    बैठकीत उमेदवाराबाबत निर्णयाची शक्यता

    रात्री संभाव्य उमेदवाराला फोन निवडणूक लढवण्यासाठी तयार आहात का

    प्रकाश आंबेडकर आज निर्णय घेणार

     

  • 06 Feb 2023 08:02 AM (IST)

    तलावाशेजारी चपला आढळून आल्याने लोकांच्या मनात तर्क-वितर्क, पोलिस म्हणतात..

    भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील एकोडी येथे एका इसमाचा तलावात मृतदेह सापडल्याची घटना सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. वाचा नेमकी घटना काय आहे

  • 06 Feb 2023 07:47 AM (IST)

    प्रस्तावित नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाला केंद्राची संमती

    प्रस्तावित नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाला केंद्राची संमती

    नाशिक पुणे अंतर येणार अवघ्या दोन तासांवर

    ताशी 200 किलोमीटरच्या वेगाने धावणार रेल्वे

    आता पर्यंत 43 हेक्टरचे भूसंपादन

    जमीन मालकांना मिळाला 55 कोटींचा मोबदला

    लवकरच प्रकल्पाला वेग येणार असल्याची रेल्वे मंत्र्यांची माहिती

  • 06 Feb 2023 07:09 AM (IST)

    उद्या पासून तीन दिवस अमरावती जिल्ह्यातील रेशन दुकाने राहणार बंद

    अमरावती : शासनाकडून ग्राहकांना मोफत धान्य वाटपामध्ये महिन्याचे आगाऊ मानधन देण्याची रेशन दुकानदारांची मागणी,

    अमरावती जिल्ह्यातील तबल 1914 दुकाने राहणार उद्यापासून बंद,

    केंद्र सरकारच्या मोफत धान्य वाटप योजनेमुळे दुकानदारांच्या समस्या वाढल्याचा आरोप,

    रेशन दुकानदारांना किती कमिशन भेटणार याबद्दल स्पष्टता नाही.

  • 06 Feb 2023 06:20 AM (IST)

    भाषण सुरू करण्याआधीच शेतकऱ्याने कापसाच्या भावाबाबत वेधले मंत्री गिरीश महाजन यांचे लक्ष

     

     

    लोकप्रतिनिधींनी गिरीश महाजनांकडे केलेल्या विविध मागण्यांमध्ये कापसाच्या भाव वाढीबाबत मागणी केली नव्हती

    त्यामुळे शेतकऱ्यांनी गिरीश महाजन यांचे भाषणापूर्वीच कापसाच्या भाव वाढीकडे वेधले लक्ष

    आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे भाव कमी झाल्याने भाव 8 हजारांवर आले आहेत

    मात्र पुढील काळात भावात सुधारणा होईल, असं गिरीश महाजन यांनी केले स्पष्ट

  • 06 Feb 2023 06:18 AM (IST)

    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मांजर आडवी जाऊ नये म्हणून पुणे शहराध्यक्षाची धावपळ

    नाना पटोलेंचे बैठकीसाठी काँग्रेस भवन येथे आगमन झाले असता एक मांजर त्यांच्या मार्गामध्ये आडवी जाण्याची शक्यता होती

    हे ओळखून शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची मांजरीला बाजूला करण्याची धडपड पाहायला मिळाली

    कसबा पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले सध्या पुण्यात तळ ठोकून आहेत

  • 06 Feb 2023 06:16 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीहून मुंबईला पोहोचले

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी दिल्लीला गेले होते

    लग्न सोहळा आटोपून मुख्यमंत्री दिल्लीहून मुंबईत परतले आहेत

  • 06 Feb 2023 06:14 AM (IST)

    कसब्यातून अखेर रवींद्र धंगेकरांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता

    रवींद्र धंगेकरांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता

    उमेदवारी मिळाल्यास धंगेकर आज आपला उमेदवारी अर्ज भरणार

    महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी राहणार उपस्थित

    काँग्रेसचे महत्वाचे नेते राहणार उपस्थित