मुंबई : जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचं काल रात्री दीर्घ आजाराने निधन झालं. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेचं खंडन केलं आहे. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
सोन्याने शुक्रवारी पुन्हा घेतली झेप, चांदीचा भाव मात्र घसरला
दुपारी 12 वाजता सोन्याचा भाव 55,941 रुपये प्रति 10 ग्रॅम
तर चांदी घसरुन 68,338 रुपये प्रति किलोवर
वायदे बाजारात सोन्यात तेजी तर चांदीच्या किंमतीत दिसली घसरण
पुण्याचे सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि विभागीय आयुक्त बैठकीला उपस्थित आहेत
काँग्रेसचे अतुल लोंढे आणि विद्यार्थी शिष्टमंडळ यांच्यासोबत विधानभवनात बैठक सुरू झाली आहे…
विधान परिषद अर्ज छाननी मद्ये २९ पैकी २२ मंजूर ७ नामंजूर,
सत्यजित तांबे यांचा उमेदवारी अर्ज वैध,
सत्यजित तांबे यांचा उमेदवारी अर्ज अपक्षच,
भाजप सह काँग्रेसचा एकही अधिकृत उमेदवार नाही,
छाननी अखेर नाशिक विधानपरिषदेच्या रिंगणात २२ उमेदवार,
माघारी नंतर होणार चित्र स्पष्ट.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यामध्ये तब्बल एक तास चर्चा झाली…..
भेटीचे कारण अद्यापही गुलदस्त्यात…..
पुणे शहराचे नामकरण “जिजाऊ नगर” व्हावे ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची इच्छा
येणाऱ्या अधिवेशनात याबाबत सरकारकडे मागणी करणार.
अमोल मिटकरी यांनी ट्विट करत जाहीर केली भूमिका
गुरूंकुज मोझरी येथील घटना
भरधाव ट्रक अनियंत्रित झाल्याने पान टपरीत घुसला
मध्यरात्रीची घटना; सुदैवाने जीवितहानी नाही
नागपूर वरून अमरावती कडे जात होता ट्रक
ट्रक पान टपरीत घुसल्याने पानटपरी चालकाचं मोठं नुकसान
एमपीएससीत येणाऱ्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर तीव्र आंदोलन
औरंगाबाद शहरातील औरंगपुरा चौकात आंदोलन सुरू
आंदोलनात काँग्रेस सोबत एमपीएससीचे अनेक विद्यार्थी सहभागी
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकार्यांनी गटशिक्षणाधिकार्यांना दिलेत आदेश,
मान्यता नसतानाही इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू असल्याचे प्रकार समोर,
या शाळांची मनमानी थांबविण्यासाठी थेट गुन्हेच दाखल करण्याचे आदेश,
यामध्ये पुंरदर, दौंड, मुळशी आणि हवेली तालुक्यांतील शाळांचा समावेश,
पुढील दोन दिवसांत याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येणार.
अलका चौकात विद्यार्थी करणार आंदोलन,
पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात,
एमपीएससीला युपीएससीचा पँटर्न 2023 पासून राबवा-विद्यार्थ्याची मागणी.
राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेच्या समारोपाला देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती
तर दुपारी 2 वाजता एका दैनिकाच्या कार्यक्रमालाही फडणवीस उपस्थित रहाणार
उद्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या फायनल, देवेंद्र फडणवीसांची प्रमुख उपस्थिती
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढले
क्रूड ऑईलच्या दरात 2 टक्क्यांची वाढ
तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) कोणतीही दरवाढ केली नाही
येत्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या भावावर परिणाम होणार?
नाशिक – एकूण 29 उमेदवारांनी भरले 44 अर्ज,
छाननी नंतर चित्र होणार स्पष्ट,
भाजप आणि काँग्रेस कडून एकही अर्ज नाही,
सत्यजित तांबे यांनी काल भरला अपक्ष उमेदवार अर्ज,
तांबे यांच्या तुल्यबळ एकही उमेदवार नाही.
बँनरवर स्वराज्यरक्षक संभाजी महाराज असा उल्लेख,
बँनरवर अजित पवारांचाही फोटो,
महाविकास आघाडीनं तुळापूर समाधीस्थळासाठी 250 कोटीचा निधी मंजूर केला,
स्वराजरक्षक संभाजी महाराजांना मानाचा मुजरा असा उल्लेख,
राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वारगेट चौकातचं झळकावला बँनर.
काल दिवसभरात विद्यापीठाच्या भरारी पथकाची कारवाई
हिवाळे सत्रातील पदवी आणि पदव्यूत्तर अभ्यासक्रमाच्या 39 अभ्यासक्रमांच्या परीक्षा एकाच दिवशी पडल्या पार
खाजगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात,
अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त,
आराम बसमधील बहुसंख्य प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती.
इंडिगो एअरलाइन्सकडून दिली जाणार कोल्हापूर ते कोईम्बतूर विमानसेवा
सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी कोईम्बतूरकडे झेपावणार विमान
कोल्हापूर- अहमदाबाद, कोल्हापूर -हैदराबाद, कोल्हापूर- बंगळूरू नंतर आता इंडिगोकडून कोल्हापूर-कोईम्बतूर विमानसेवा
मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी बोलावली मंत्रिमंडळाची बैठक
स्थलांतर, मदत याबाबत आज मोठा निर्णय होण्याची शक्यता
आतापर्यंत 700 हून अधिक घरांच्या भिंतींना मोठे तडे
आज मंत्रिमंडळ काय निर्णय घेणार संपूर्ण उत्तराखंड राज्याचे लक्ष
वाराणसी मधील क्रूजचे होणार उद्घाटन
गंगा विलास क्रूझचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
टेंट सिटीचेही उद्घाटन करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी
गृहमंत्री आज दुपारी जम्मूला पोहोचतील आणि तेथून राजौरीला जातील
गृहमंत्री राजौरीतील डांगरी गावालाही भेट देतील
तिथे स्थानिक लोकांची हत्या करण्यात आली होती, गृहमंत्री मृतांच्या कुटुंबीयांचीही भेट घेणार आहेत
जम्मू राजभवनात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्यानंतर गृहमंत्री सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेतील
त्यानंतर गृहमंत्री स्थानिक भाजप नेत्यांचीही बैठक घेणार आहेत
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या तयारीबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे
शरद यादव यांचं पार्थिव छतरपूर येथील 5 वेस्टर्न (डीएलएफ)मध्ये ठेवणार
गुरुवारी रात्री 10.19 वाजता गुरुग्राम रुग्णालयात शरद यादव यांनी घेतला अखेरचा श्वास
शरद यादव गेल्या काही दिवसांपासून होते आजारी
ॲम्बुलन्स वेळेत न आल्यामुळे 40 मिनिटं प्लॅटफॉर्मवरच!
आधी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात आणि तिथून कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आलं.