पुणे : महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात अखेर शिवराज राक्षे विजयी झालाय. या अंतिम सामन्यात त्याची लढत पुण्याचा मल्ल महेंद्र गायकवाड यांच्यासोबत झाली. अतिशय थरार हा सामना ठरला. दोन्ही पैलवान एकमेकांना भारी पडत होते. अखेर शेवटच्या क्षणी शिवराज राक्षेने महेंद्रला कुस्तीच्या आखाड्यात चितपट केलं.
महाराष्ट्र केसरीच्या (Maharashtra Kesari) अंतिम सामन्याच्या थराराच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमस्थळी दाखल झाले. माती विभागातील सोलापूरचा सिकंदर शेख (Sikandar Shaikh) आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) यांच्यात उपांत्य सामना पार पडला. अतिशय थरारक असा हा सामना बघायला मिळाला. अखेर या थरारक सामन्यात महेंद्र गायकवाडचा विजय झाला.
माती विभागाच्या मल्लांची कुस्ती संपल्यानंतर मॅट विभागाचे शिवराज राक्षे आणि हर्षवर्धन सदगीर यांच्यात उपांत्य फेरीची लढत सुरु झाली. दोन्ही मल्लांमध्ये अतिशय चुरशीची लढत झाली. अखेर 8-2 च्या फरकाने शिवराज राक्षेने मजल मारली. त्यानंतर दोन्ही उपांत्य फेरीतील विजयी मल्ल आमनेसामने आले.
महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील मुद्दे :
– या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत महाराष्ट्र केसरी होताच मामासाहेब मोहोळ यांच्याकडून गदा दिली जाते
– याचा एक आनंद आपल्याला सर्वांना मिळतो
– आम्ही पण राजकारणात कुस्ती करतो, पण ती फक्त टीव्हीवर असते
– ऑलम्पिकमध्ये महाराष्ट्र मेडल मिळवण्यात मागे राहिला का?
– महाराष्ट्र मिशन ऑलम्पिक सुरू करणार, त्यासाठी बृजभूषण आपली मदत घेणार
– महाराष्ट्रातील खेळाडू नक्कीच मेडल मिळवणार
– आपल्या राज्यात खेळाडूंना 2 वर्षांपासून मानधन मिळत नाही
– जे 6 हजार मानधन मिळत होते ते आता 20 हजार करूया
– वयोवृद्ध खेळाडूंना अडीच हजार मानधन आहे ते आता साडे सात हजार करूया
– महाराष्ट्र केसरी खेळाडूंना राज्य सरकार नोकरीत संधी देणार
– महिला केसरीसाठी राज्य सरकार मदत करणार
महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील बृजभूषण सिंह यांच्या भाषणातील मुद्दे :
– महाराष्ट्राच्या धरतीला आणि शिवरायांना वंदन करतो,
– महाराष्ट्र सरकारने मिशन ऑलम्पिकसाठी मदत केली पाहिजे
– ऑलम्पिकसाठी महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे, तो दूर झाला पाहिजे
– महिला महाराष्ट्र केसरी संदर्भात विचार केला पाहिजे, महिला कमी नाहीयत
– रामदास तडस यांनी यावर विचार केला पाहिजे
मॅट विभागाचे शिवराज राक्षे आणि हर्षवर्धन सदगीर यांच्यात चुरशीची लढत
शिवराज राक्षे – 6,
हर्षवर्धन – 1
मॅट विभागाच्या पहिल्या फेरीची समाप्ती, निकाल 0-6
अमरावती शहरातील छत्री तलाव परिसरात बॉक्स क्रिकेट, झुंबा डान्स, योगा मैदानच उद्घाटन
आमदार रवी राणा यांच्याहस्ते संपन्न झाला सोहळा
यावेळी उद्घाटन झाल्यावर रवी राणांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला
संशयित आरोपीचा पोलिसांकडून तपास सुरू
पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती
पुणे पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे
ती गोष्ट आता जूनी झाली आहे
बृजभुषण सिंहाची प्रतिक्रिया
महाराष्ट्राकडून मला भरपूर प्रेम मिळालं आहे
महाराष्ट्र सारखा मोठा भाऊ राहिलेला आहे
महाराष्ट्र केसरीची स्पर्धा होईल आता बघूयात
-सत्यजित तांबे बंडखोर, महाराष्ट्र शिक्षक सेनेचा आरोप
-सुधीर तांबे उमेदवार असते, तर मदत केली असती
-मात्र सुधीर तांबे उमेदवार नसल्याने सत्यजित तांबे यांना पाठिंबा नाही
-सत्यजित तांबे हे महाविकास आघाडीचे उमेदवार नसल्याने विरोध
आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑईलच्या किंमतीत 1.74 टक्क्यांची वाढ
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भावात पुन्हा वाढ
क्रूड ऑईल 85.49 डॉलर बॅरलवर पोहचले
6 जानेवारी रोजी ब्रेंट क्रूड ऑईलचे भाव 78.57 डॉलर
ब्रेंट क्रूड ऑईलच्या भावात 8 डॉलर प्रति बॅरलची वाढ
ब्रेंट क्रूड ऑईलच्या किंमतीत 9 टक्क्यांची वाढ
30 जानेवारीपर्यंत येणार एक दिवस आड पाणी
शिंगणापूर जल उपसा केंद्रातील तांत्रिक अडचणीमुळे महापालिकेचा निर्णय
ए,बी आणि ई वॉर्डात होणार होणार अपुरा पाणीपुरवठा
तिन्ही वार्डांना योग्य दाबाने मिळणार पाणी
27 फेब्रुवारीला महाराष्ट्र एकीकरण समितीचा आझाद मैदानावर धरणे आंदोलनाचा निर्धार
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सीमा प्रश्नाकडे वेधणार लक्ष
महाराष्ट्र सरकार सीमा प्रश्नाकड अजूनही गांभीर्याने पाहत नसल्याची सीमा बांधवांची तक्रार
महाराष्ट्र सरकारला जाग आणण्यासाठी करणार धरणे आंदोलन
मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश
आर्थिक नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज
शेजारी राहणाऱ्या लोकांच्या लक्षात हा सर्व प्रकार आला त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली
मुंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत
शिवीगाळ आणि धक्काबुक्कीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी 17 जणांच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
मात्र विकासकांच्या इशाऱ्यावर कारवाई करत असल्याचा आरोप करत जागा मालक व गावकरीने केले ठिय्या आंदोलन
कल्याण ग्रामीण परिसरातील निळजे गावामधील धक्कादायक घटना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीच्या आश्वासनानंतर पुण्यातल्या अलका टॉकीज चौकातलं आंदोलन विद्यार्थ्यांकडून स्थगित
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी केलं आंदोलन स्थगित
उद्या पाच विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पुण्यात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
मुख्यमंत्र्यांची भेट घेत विद्यार्थी आपल्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार
आंदोलन स्थगित म्हणजे स्वल्पविराम, पूर्णविराम नाही, विद्यार्थ्यांच्या भावना
कबड्डी आणि शॉर्ट बॉल्समध्ये अनेक ठिकाणी झाला होता तिचा सत्कार
दीक्षा गोंधळी असे या तरुणीचे नाव असून तिची आई आणि वडील हे तिघेही देवदर्शनासाठी शिर्डी जात असताना झाला अपघात
या अपघातात दीक्षाची आई गंभीर जखमी असून वडील किरकोळ जखमी
या घटनेने कल्याण शहरावर शोककळा पसरली