मुंबई : कोरोनाच्या नव्या व्हायरसने दस्तक दिली आहे. H3N2 या नव्या व्हायरसमुळे देशात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. हा व्हायरस लहान मुलं आणि ज्येष्ठांसाठी घातक असल्याचं सांगितलं जात आहे. अंबरनाथच्या डीएमसी डम्पिंगला मोठी आग. आगीच्या धुराचे लोट रेल्वे रुळापर्यंत पोहोचले होते. यासह राज्यातील विविध राजकीय घडामोडी जाणून घ्या.
पुणे :
कालीचरण महाराजांची उद्धव ठाकरेंवर टीका
हिंदूविरोधी भूमिका घेतली म्हणून हातातून पक्ष आणि चिन्ह निघून गेलं
आम्हाला विकास हवा आहे मात्र तो विकास हिंदुत्वयुक्त विकास हवाय
‘लव्ह जिहादच्या घटना 40 हजारावर भारतात घडल्यात, त्यांना सक्त म्हणजे फाशीची शिक्षा द्यायला हवी’
कालीचरण महाराजाच वक्तव्य
आता कंपनी विक्रीची नाही तर आयपीएलमधील सहभागाची रंगतेय चर्चा
या IPL टीमशी केली मोठी डील, तीन वर्षांसाठी केला करार
जयंती चौहान झाल्या सक्रिय, या आयपीएल टीमसोबत केला करार
यापूर्वी पण केला होता या आयपीएल टीमशी करार, वाचा बातमी
हा विषाणू श्वसन संस्थेवर बाधित करत असतो
लहान मुलं आणि वृद्धांनी काळजी घेण्याची गरज आहे
कोरोना काळात आपण जी काळजी घेतली होती त्यापद्धतीने काळजी घेण्याची गरज आहे
मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणे, हात स्वच्छ धुणे
सर्दी, खोकला असल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या
या विषाणूवर अद्याप औषधं किंवा लस उपलब्ध नाही
अर्थव्यवस्थेला असा धोका निर्माण करतात नकली नोटा
तुम्हाला माहिती आहे का कुठे होती यांची सर्वाधिक छपाई
या बोगसगिरीला कसा घालण्यात येतो आळा
बोगस नोटांविरोधात कोणती करण्यात आली होती सर्जिकल स्ट्राईक, वाचा बातमी
उपनेतेपद मिळाल्यानंतर अद्वय हिरे यांचा नाशिक जिल्ह्यात जल्लोष
उपनेतेपदी अद्वय हिरे यांची नेमणूक झाल्यानंतर मालेगावात मोठ्या जल्लोष
उद्धव ठाकरे सेनेच्या वतीने ढोल ताशे वाजवत, मिरवणूक काढत स्वागत
मंत्री दादा भुसे यांना सह देण्यासाठी उद्धव ठाकरेंची रणनीती
पालकमंत्री यांना त्यांच्याच मतदारसंघात आव्हान देण्यासाठी आखली रणनीती
26 तारखेला होणाऱ्या सभेच्या पार्श्भूमीवर मालेगावात सुरू आहे जोरदार प्रचार
हिंदुस्तान युनिलिव्हरच्या नवीन सीईओंची संपत्ती किती
बोर्ड ऑफ डायरेक्टरने नुकताच केला व्यवस्थापनात बदल
दोन महिन्यानंतर स्वीकारतील नवीन सीईओची जबाबदारी, वाचा बातमी
जगभरातील स्टार्टअप्सला करत होती वित्त पुरवठा
आता अमेरिकन नियमकाने बँक बंद करण्याचे दिले आदेश
टेस्लाचा मालक एलॉन मस्क ओतणार पैसा
बँक खरेदी करण्याचे दिले संकेत
या भावाचे डाव आणि पेच सर्वात हटके, वाचा ही बातमी
मुंबई :
“अलिबाग कोरले 18 बंगले घोटाळा प्रकरणी उद्धव ठाकरे यांचे पार्टनर रवींद्र वायकर यांचा एक नवीन घोटाळा बाहेर आला आहे. लहान मुलांचं खेळाचं मैदान हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 2 लाख चौरस फुटाचं खेळाचं मैदान रवींद्र वायकर यांनी खाललं. 2021 च्या जुलै महिन्यात उद्धव ठाकरे यांनी बेकायदेशीरपणे पंचतारांकित हॉटेल बांधण्याची रवींद्र वायकर यांना परवानगी दिली. आज तिथे जोराचं काम सुरु आहे. लहान मुलांचं मैदान बळकावल्यानंतर आदित्य ठाकरे आता गप्प का? पर्यावरणाच्या नावाने त्यांनी मुंबई मेट्रोची वाट लावली. आता उद्धव ठाकरे शांत का आहेत?”, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला.
कोल्हापूर :
ईडीचे अधिकारी हसन मुश्रीफ यांच्या घरातून बाहेर पडले
गेल्या साडेनऊ तासांपासून ईडी अधिकाऱ्यांकडून धाडसत्र सुरु होतं
नऊ तासांच्या झाडाझडती नंतर ईडीचं पथक मुश्रीफांच्या घराबाहेर पडलं आहे.
गेल्या नऊ तासापासून ईडी चे अधिकारी आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरात
कुटुंबातील काही सदस्यांचे जबाब घेण्याचं काम सुरु असल्याची प्राथमिक माहिती
ईडी करावाई सुरु झाल्या पासून आमदार मुश्रीफ मात्र संपर्का बाहेर
आमदार मुश्रीफ यांचा संपर्क होत नसल्यान चर्चाना उधाण
बुवापाडा भंगार गल्लीतील कंपनीला।लागली आग
अग्निशमन दलाच्या तीन ते चार गाड्या घटनास्थळी दाखल
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू
नीती आयोगाच्या बैठकीनंतर सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे आदेश
H3N2 व्हायरस मुळे आतापर्यंत देशात 6 जणांचा मृत्यू
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना सतर्क राहण्याची दिले आदेश
परदेशातून आलेल्या व्यक्तींची वेळेवर तपासणी केली जाणार
ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांचा पराभव
साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी पुन्हा मराठी व्यक्तीच्या निवडीला हुलकावणी
हिंदी साहित्यिक माधव कौशिक यांची निवड
छत्रपती संभाजी नगरात GST वसुली पथकाचा छापा
छत्रपती संभाजी नगरातील प्रसिद्ध सराफा दुकानावर छापा
साडे अकरा तास सखोल चौकशी
आर्थिक वर्षाचा अखेरचा महिना असल्याने करवसुली यंत्रणा सक्रिय
जीएसटी विभागाच्या छाप्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ
जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अजित पवारांचे समर्थक संजय पवार यांची वर्णी
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना मोठा धक्का
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीत बंडखोरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ॲड रवींद्र पाटील यांचा धक्कादायक पराभव
राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार संजय पवार यांचा विजय
उपाध्यक्षपदी शिंदे गटाचे उमेदवार अमोल पाटील बिनविरोध
महाविकास आघाडीत गद्दारी झाल्याची खडसेंची प्रतिक्रिया
एकच दरवाजा उघडत नसल्याने प्रवाशी संतप्त
दुसरा दरवाजा उघड नसल्याने लोकलमध्ये चढताना प्रवाशांमध्ये गोंधळ
रेल्वे प्रशासनाला ट्विटरवरून ट्विट करत दिली तक्रार
वारंवार तक्रार करून रेल्वे प्रशासन लक्ष देत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी
आमदार के कविता ईडी कार्यालयात दाखल
तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या कन्येला ईडीकडून समन्स
राजधानीतल्या मद्य घोटाळ्याप्रकरणी कविता यांना ईडीचे समन्स
आज दिवसभर कविता यांची चौकशी होणार
भारतीय रेल्वे आणि टाटा समूहात झाला करार
टाटा स्टीलच्या कारखान्यात तयार होणार ट्रेन
एका वर्षात इतक्या रेल्वे तयार होऊन येतील बाहेर
विमानासारखी असेल आसन व्यवस्था
गुंतवणूकदारांची अशी होणार बल्ले बल्ले, वाचा बातमी
सीबीआय कडून पुन्हा समन्स, आजच हजर राहण्याचे आदेश
कथित रेल्वे घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून समन्स
राबडीदेवी, लालूप्रसाद यादव यांच्यानंतर आता तेजस्वी यादव सीबीआयच्या रडारवर
ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा आज राज्य सरकार आणि दादर पोलिसांविरोधात मोर्चा
सायंकाळी 5 वाजता दादर पोलीस ठाण्यावर नेणार मोर्चा
दादर पोर्तुगीज चर्च येथून निघणार मोर्चा
दादर पोलीस ठाण्याच्या आवारात बंदुकीतून झालेल्या गोळीबार प्रकरण
दादर पोलिसांनी स्थानिक शिवसेना आमदार सदा सरवणकर यांना दिली क्लीन चिट
दादर पोलिसांच्या या निर्णयाबद्दल ठाकरे गटाचे शिवसैनिक मोर्चातून करणार निषेध व्यक्त
उच्चांकी भावापेक्षा आजही स्वस्तात सोने खरेदीची संधी
आठवड्याभरात सोन्या-चांदीच्या भावाने केली कमाल
आता हॉलमार्क दागिनेच विकता येणार, ग्राहकांचा होणार फायदा, वाचा बातमी
संपत्तीच्या बाबतीत तोडले सर्व रेकॉर्ड
भारतीय स्टार्टअपचा हा नवीन चेहरा करतो तरी काय
कोण आहेत दिव्या गोकुळनाथ, वाचा बातमी
भल्या पहाटे ईडीच्या पाच ते सहा अधिकाऱ्यांची मुश्रीफ यांच्या घरावर धाड
दीड महिन्यात दुसऱ्यांदा छापेमारी
मुश्रीफ समर्थकांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी
ईडी विरोधातही घोषणा, सुडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप
पेट्रोल-डिझेलचे दर कधी करणार कमी
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत नाही मोठी वाढ
तेल विपणन कंपन्यांना नुकसान भरपाईचाही मिळाला डोस
कर कपातीचा आता सर्वसामान्यांना हवा दिलासा
आज तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव काय, बातमी एका क्लिकवर
रुपीनगर परिसरातील सरस्वती शाळेजवळ ही वाहनांची तोडफोड झालीय
3 अज्ञात जणांनी पहाटे 4:15 च्या सुमारास ह्या वाहनांची केली तोडफोड
या तोडफोडीत 8 ते 10 वाहनांच्या काचा फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान
नाशिक : 31 शासकीय कार्यालयांकडे मनपाची तब्बल 10 कोटींची थकबाकी
वारंवार सूचना देऊनही संबंधित शासकीय कार्यालयांकडून प्रतिसाद नाही
विभागीय महसूल आयुक्तालय, आयकर आयुक्तालय, बीएसएनएल, शहर पोलीस आयुक्तालय, पोलीस अधीक्षक कार्यालय हे टॉप थकबाकीदार
पुणे शहरात 13 ते 15 मार्च या कालावधीत वादळी वार्यांसह हलक्या पावसाचा इशारा
शहरात 7 व 8 मार्च रोजी हलका पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता
मात्र, त्यानंतर लगेच कमाल तापमानात वाढ होऊन उकाड्यास सुरुवात झाली
शहराचे कमाल तापमान 30 अंशांवरून पुन्हा 35 ते 36 अंशांवर गेले
उत्तर भारतातील पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने शहरात 13 ते 15 मार्च या कालावधीत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा इशारा
पुणे हवामान खात्याचा अंदाज
युवकाची गोळी घालून हत्या केल्याची माहिती
पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून हत्या
भामरागड तालुक्यातील ताडगाव पोलीस मदत केंद्रांतर्गत क्षेत्रातील मर्दहूर येथील घटना
साईनाथ नरोटे असं या तरुणाचं नाव, साईनाथ गडचिरोली येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी होता वास्तव्याला
होळीच्या सुट्टीत आपल्या गावी गेला असता नक्षल्यांनी त्याला घरून उचलून नेत गोळी घालून हत्या केल्याने खळबळ
नदी प्रदूषण रोखण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे मोठे पाऊल
नदी प्रदूषण आणि पाण्यावर येणाऱ्या जलपर्णी रोखण्यासाठी गॅबियन बंधारे आणि बायो सॅनिटायझर इको चीपचा करणार वापर
केडीएमसी आयुक्तांनी उल्हास नदीची पाहणी करत घेतला निर्णय
रिक्षाचालक, फेरीवाल्यांची पार्किंग कर्मचाऱ्यांना मारहाण
किरकोळ वादाचं मोठ्या हाणामारीत रूपांतर
पार्किंग कर्मचाऱ्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत
नव्या व्हायरसमुळे देशभरात आतापर्यंत दोघांचा मृत्यू
हरियाणा आणि कर्नाटकात दोघांचा मृत्यू
आतापर्यंत या नव्या व्हायरसमुळे 3038 लोकांना लागण
राज्यांना अलर्ट राहण्याचे आदेश