मुंबई : मागच्या तीन-चार दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस कोसळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालं आहे. पंचनाम्याच काम अजून पूर्ण झालेलं नाही, त्यात आज सकाळी 6.30 च्या सुमारास मुंबईत अचानक पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सकाळीच कामावर निघालेल्या नोकरदारांचे हाल झाले. हवामान विभागाने आधीच राज्यात पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवला होता. दरम्यान मागच्या सात दिवसांपासून सुरु असलेला संप राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मागे घेतला आहे.
मुंबई :
– राज्यातील बाजार समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजलं,
– 27 मार्चपासून नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार
– तर 28 आणि 30 एप्रिला दोन टप्प्यात निवडणुका पार पडणार,
– गेल्या काही महिन्यांपासून लांबणीवर पडलेल्या निवडणुका घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय
घरगुती कच्चा तेलावर विंडफॉल करात केली कपात
घरगुती कच्चा तेलाच्या उत्पादनाला मिळेल चालना
एटीएफवरील निर्यात शुल्क समाप्त
ग्राहकांना लवकरच मिळणार मोठा दिलासा
आता पेट्रोल-डिझेलच्या स्वस्ताईचा सुकाळ, वाचा बातमी
धाराशिव :
धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल सादर
जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी विभागीय आयुक्ताकडे दिला लेखी अहवाल
धाराशिव जिल्ह्यातील 2 हजार 472 शेतकऱ्यांचे 1 हजार 525 हेक्टर क्षेत्रावर नुकसान
जिरायत 1 हजार 92 हेक्टर, 360 हेक्टर बागायत व 73 हेक्टर फळबागचे नुकसान झाल्याचा अहवाल
धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक कळंब तालुक्यात 1 हजार 628 हेक्टर नुकसान, धाराशिव 174 तर उमरगा तालुक्यात 644 हेक्टर नुकसान
असा वाचविता येईल तुम्हाला कर
नवीन कर पद्धतीत नाही आयकर बचतीसाठी योजना
जुन्या कर पद्धतीत कर बचतीसाठी अनेक पर्याय
मानक वजावटीसाटी नवीन कर पद्धतीत संधी, वाचा बातमी
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागात एसीबीचा छापा
लिपिकाने ठेकेदाराकडे लाच मागितली, लाच स्वीकारताना लिपिक दिलीप आडे एसीबीच्या जाळ्यात फसला
या लाचेत वरिष्ठ अधिकाऱ्याचा ही वाटा असण्याची शक्यता
पुणे जिल्ह्यातील प्रलंबित रस्त्याची कामं लवकरात लवकर पूर्ण करा
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रशासनाला सूचना
पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना जोडणारे रस्ते लवकर पूर्ण होणार.
तोरणा किल्ला, सिंहगड किल्ला, पुरंदर किल्या, सासवड ते कापूरहोळ
या रस्त्यांची कामं मार्गी लावण्याचे आदेश
पुणे जिल्ह्यातील आमदारांसोबत रवींद्र चव्हाणांनी घेतली बैठक
जिल्ह्यात 9 लाख 16 हजार आनंदाचा शिधा किट मंजूर
गुढीपाडवा आला तरी अद्यापही किट पॅकिंग सुरू
गुढीपाडव्याला नागरिक राहणार आनंदाच्या शिधापासून वंचित
आनंदाच्या शिद्यासाठी जिल्ह्यात अजून 8 दिवस वाट पाहावी लागणार
पुणे : आनंदाचा शिधा अद्याप गोडाऊनमध्येच पडून,
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शिधा राशन दुकानापर्यंत पोहचू शकला नाहीय,
उद्याच्या गुढी पाडव्यासाठी आज संध्याकाळपर्यंत शिधा राशन दुकानांपर्यंत पोहचण्याची शक्यता.
पुणे जिल्ह्यात अद्याप आनंदाचा शिधा पोहचला नाही
आनंदाचा शिधा अद्याप गोडाऊनमध्येच पडून
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शिधा राशन दुकानापर्यंत पोहचू शकला नाहीय
उद्याच्या गुढी पाडव्यासाठी आज संध्याकाळपर्यंत शिधा राशन दुकानांपर्यंत पोहचण्याची शक्यता
चांदवड तालुक्यातील पन्हाळे परिसरात वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपले
कृषीमंत्री अब्दुल सत्तर यांचा आज दौरा असल्याने पंचनामे सुरू
कृषी, महसूल विभागाच्यावतीने पंचनामे सुरू
नुकसानीचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज
1000 हेक्टरच्या वर शेत नुकसानीचे पंचनामे झाले
तलाठी, कृषी अधिकारी शेतात जाऊन पीक सर्व्हे करत आहेत
गहू, हरभरा, फळपिके, कांदा, भाजीपाला या पिकांचे गारपिटीने नुकसान
अवघ्या तीन दिवसांत पुणे विभागात 1 लाख 31 हजार महिलांनी केला प्रवास
यातून सुमारे 35 लाख रुपयांचे उत्पन्न एसटी खात्याला प्राप्त
प्रवासात 50 टक्क्यांच्या सवलतीनंतर महिला प्रवाश्यांची संख्या वाढताना
पहिल्या दिवशी पुणे विभागात 19 हजार 186 महिलांनी केला प्रवास
यातून सुमारे 35 लाख रुपयांचे उत्पन्न एसटी खात्याला प्राप्त
प्रवासात 50 टक्क्यांच्या सवलतीनंतर महिला प्रवाश्यांची संख्या वाढताना
पहिल्या दिवशी पुणे विभागात 19 हजार 186 महिलांनी केला प्रवास
ठोठावला सव्वा 2 कोटींचा दंड
तुमचं तर खातं नाही ना या बँकेत
नियमाचं पालनं न केल्याने घेतला निर्णय
HDFC नंतर पुन्हा एकदा जोरदार कारवाई, वाचा बातमी
पुणे जिल्ह्यातील वढू येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३४ वा बलिदान दिनानिमित्त शासकीय मानवंदना देण्यात येणार आहे. यानंतर हेलिकॉप्टरद्वारे आकाशातून छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
चंद्रपूर :- गुढीपाडव्याचा ‘आनंदाचा शिधा’ अद्याप गोदामातच,
चंद्रपुरात स्वस्त धान्य दुकानात अद्याप ग्राहक करत आहेत केवळ चौकशी,
राज्य सरकारने गुढीपाडवा व सणांच्या पार्श्वभूमीवर स्वस्त धान्य दुकानात शंभर रुपयात आनंदाचा शिधा पोहोचवण्यासाठी केली होती जय्यत तयारी,
मात्र गेले आठ दिवस राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप व वाहतूक व्यवस्थेतील अडचणी यामुळे आनंदाचा शिधा पोहोचण्यात विघ्न,
या महिन्याच्या शेवटपर्यंत आनंदाचा शिधा विविध रेशन दुकानात पोहोचण्याची शक्यता,
आनंदाचा शिधाविनाच यंदाचा गुढीपाडवा होण्याची सध्या चिन्हे
अवघ्या 10 हजार रुपयांत 7 दोस्तांचा सत्ते पे सत्ता!
आज कंपनीची इतक्या लाख कोटींची उलाढाल
अमेरिकन शेअर बाजार नॅस्डॅकमध्ये केला प्रवेश
बाजारात प्रवेश करणारी पहिली भारतीय कंपनी
आज लाख कोट्यवधींची बाजार भागभांडवल
कंपनीकडे एकूण 3.14 लाख कर्मचारी, एका क्लिकवर वाचा बातमी
रजनीश ओशो यांचा ७० वा संबोधी दिवस साजरा होत आहे. या निमित्ताने जगभरातून अडीच ते तीन हजार ओशो शिष्य कोरेगाव पार्कातील आश्रम परिसरात दाखल झाले आहे. आश्रमातील ओशोंच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आत जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. पणं आश्रम प्रशासनाने ओशो दीक्षा माळा घालून आत जाण्यास प्रतिबंध केला आहे.
G 20 च्या पार्श्वभूमीवर फेरीवाल्यांवर कारवाई
फेरीवाल्यांचे साहित्य जमिनीत पुरले
फेरीवाल्यांचा महानगरपालिकेवर संताप
हर्षद मेहता याच्या काळापासून अशी करतायेत कमाई
बाजारात यांच्या नावाचा अजूनही बोलबोला
लाखो गुंतवणूकदार करतात फॉलो
शेअर बाजाराचा मंत्र जपण्यासाठी यांचा गिरवा कित्ता, वाचा बातमी
परेल येथील कृष्णनगर परिसरातील इमारतीत पाणी
कृष्णानगर परिसरातील राहिवाशांचे प्रचंड हाल
अवकाळी पावसामुळे घराच्या छतात शिरूर आतमध्ये पाणी
नाशिक : हातात कोयता घेऊन 6-7 जणांनी केली शिवीगाळ,
भर रस्त्यात कोयता आपटत करत होते शिवीगाळ,
नाशिकच्या सिडको दत्तमंदिर परिसरात भीतीचे वातावरण,
कोयता हातात घेऊन फिरणाऱ्या टोळीचा व्हिडियो व्हायरल,
शहरात पोलिसांचा वचक नसल्याने गुंड मोकाट.
नाशिकच्या गंगापूर सातपूर लिंक रोड परिसरात तीन महिन्याच्या चिमुकलीची हत्या
आईला बेशुद्ध करून करण्यात आली मुलीची हत्या
गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पोलीस तपास सुरू
हत्या कुठल्या कारणातून झाली हे मात्र अद्याप अस्पष्ट
तीन महिन्याच्या मुलीची हत्या केल्याने खळबळ
सोन्याने घेतली पुन्हा गिरकी ,सोन्याच्या किंमती आज घसरल्या
चांदीनेही दिली घसरणीची वर्दी ,चढत्या दरांनी आज घेतला ब्रेक
दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर भावात झाली होती एकदम वाढ
सणाला खरेदीदारांना सोने-चांदी खरेदीची मोठी संधी, वाचा बातमी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुनावणी
सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका निवडणुकांबाबत आजची सुनावणी महत्त्वपूर्ण
निवडणुका लांबणीवर पडणार की सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार याकडे राज्याचे लक्ष
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी,
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका निवडणुकांबाबत आजची सुनावणी महत्त्वपूर्ण,
निवडणुका लांबणीवर पडणार की सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार याकडे राज्याचे लक्ष.
नवी दिल्ली
विधान परिषदेतील 12 आमदारांचे नियुक्ती प्रकरण
सर्वोच्च न्यायालयात आज होणार सुनावणी
गेल्या अनेक महिन्यांपासून प्रकरण प्रलंबित
आज सुनावणी होणार की पुढची तारीख पडणार
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्ती बाबत आज सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी
जळगाव भुसावळ ब्रेकिंग
जळगाव जिल्ह्यात अंदाजे 88 हेक्टर क्षेत्रात अवकाळी पावसामुळे नुकसान
कर्मचाऱ्यांचा संप मागे तरीदेखील शेतकऱ्याच्या बांधावर पंचनामेसाठी अधिकारी पोहोचला नाही
शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर
मुक्ताईनगर भुसावळ रावेर जळगावच्या अनेक भागात अवकाळी पावसाचे अजून पर्यंत नुकसानीचे पंचनामे नाहीत
आंतरराष्ट्रीय बाजारात किंमतीत चढउतार
भारतीय बाजारावर नाही काहीच परिणाम
दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर
भारतीय तेल विपणन कंपन्या भाव करतात अपडेट
गेल्या वर्षभरापासून मोठी दरवाढ नाही
देशातील प्रत्येक राज्यात करामध्ये मात्र मोठा बदल
तुमच्या शहरातील भाव जाणून घ्या, बातमी एका क्लिकवर
मुंबई उपनगरातील कांदिवली, बोरिवली, मालाड, गोरेगाव, अंधेरी परिसरात आज सकाळपासून अधूनमधून पाऊस पडत आहे.
पावसाच्या आगमनामुळे एकीकडे लोकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे, तर दुसरीकडे अवकाळी पावसाने मुंबईकरही हैराण झाले आहेत.
बोरीवली परिसरात आज सकाळपासून अधूनमधून पाऊस पडत आहे. सध्या आतापर्यंत कुठेही पाणी साचण्यासारखी परिस्थिती दिसून आलेली नाही.
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने दिली होती.
त्यानंतर रोहित गर्ग नावाच्या एका तरूणाने सलमान खानच्या जवळच्या सहकाऱ्याला ई मेल पाठवून अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
धमकीचा मेल आल्यानंतर मुंबई पोलिसांकडून सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
जलवहिन्या आणि पाईपलाईनच्या देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद राहणार
शुक्रवारी कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा होणार
पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची माहिती
नाशिक : सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटला, मात्र पंचनामे कधी,
जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे आदेश देऊन उलटला आठवडा,
अद्याप शेतकरी पंचनाम्याच्या प्रतीक्षेत,
जिल्ह्यात सुमारे 5500 हेक्टर क्षेत्रात नुकसान.
पुणे : रोझरी एज्युकेशन ग्रुपचे संचालक विनय अऱ्हाना आणि त्यांचे बंधू विवेक अऱ्हाना यांची ४७ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता ईडीकडून जप्त,
त्यात रोझरी स्कूलची इमारत आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या जागेचा समावेश,
विनय अऱ्हाना यांनी शाळेच्या नूतनीकरणासाठी कॉसमॉस बॅंकेतून २० कोटी ४४ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते,
ईडीच्या अधिकाऱ्यांनी २८ जानेवारी रोजी त्यांच्या मालमत्तेवर छापे टाकून त्यांची चौकशी केली,
त्यानंतर ईडीने १० मार्च रोजी विनय अऱ्हाना यांना अटक केली होती,
अऱ्हाना आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जप्त केलेल्या मालमत्तेचे बाजारमूल्य ९८ कोटी २० लाख रुपये इतके.
पिंपरी चिंचवड
-पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाने विक्रमी 700 कोटींचा मिळकत कर वसूल केलाय
-आता मार्च अखेर असल्याने मिळकत कर उत्पन्न आणखी वाढवण्याच्या दृष्टीने महापालिकेने एक लाख हून अधिक थकबाकी असलेल्या मिळकत कर धारकांची नावे थेट वर्तमान पत्रात प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.
-कर संकलन विभागाच्या या निर्णयामुळे अनेक जण कर भरण्यासाठी पुढे येत असल्याचे चित्र आहे
-मात्र अशा पद्धतीने नावे जाहीर करणे कितपत योग्य असा सवाल संतप्त नागरिक करत आहेत
मुंबई उपनगरात कांदिवली, बोरिवली, मालाड, गोरेगाव, अंधेरीसह अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 20 मिनिटांपासून मुंबई आणि उपनगरात मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे
ब्रेक –
– पुणे महापालिकेचे 2023-24 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक शुक्रवारी सादर होणार,
– पहिल्यांदाच स्थायी समिती आणि मुख्य सभेशिवाय प्रशासक म्हणून आयुक्त विक्रम कुमार अंदाजपत्रक सादर करणार
– त्यामुळे हे अंदाजपत्रक वास्तववादी होणार का? याबाबत उत्सुकता,
– दरवर्षी महापालिका प्रशासनाकडून जानेवारी महिन्यात अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले जाते.
ब्रेक –
– अष्टविनायक इन्व्हेस्टमेंटकडून 300 कोटींचा पुणेकरांना गंडा,
– कंपनीकडून 200 पुणेकरांना 300 कोटींचा चुना,
– कंपनीचे संचालक सेलवाकुमार नडार यांच्याविरोधात 26 जणांनी केली तक्रार,
– नडार फेब्रुवारीपासून फरार
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील भांबर्डा या गावात एका मेंढपाळाच्या तब्बल 40 मेंढ्यांचा मृत्यू,
अवकाळी पाऊस सोसाट्याचा वारा गारपीट आणि विजेच्या कडकडाट,
या मेंढपाळाला आर्थिक मदत देण्याची मागणी सध्या धनगर समाजातून होत आहे.
मुंबईत आज सकाळीच अचानक 6.30 च्या सुमारास पाऊस सुरु झालाय, त्यामुळे कामावर जाणाऱ्या नोकरदारांचे हाल होतायत.
ठाण्यात अवकाळी पाऊस
ढगांच्या गडगडाटा सह मुसळधार पाऊस..
अर्ध्यातासापासून कोसळतोय पाऊस