मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे राज्यात ठिकठिकाणी पडसाद उमटत आहेत. मनसे कार्यकर्त्यांकडून अनेक ठिकाणी निषेधाचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. तर चिंचवडमध्ये विजयी झालेल्या अश्विनी जगताप यांचं आज भाजपचे नेते चंद्रकांत पाटील अभिनंदन करणार आहेत. इयत्ता 12 वीच्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही, राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण. यासह राज्यातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
सरकारने आणली सुवर्ण रोखे योजना
सोमवारपासून योजनेचा होणार श्रीगणेशा
जोरदार मिळेल परताव्यासह मिळेल सरकारची हमी
एक ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागतील इतके रुपये, वाचा बातमी
अदानी समूहाच्या शेअर्समधून बक्कळ नफा
गुंतवणूकीची पत्करली मोठी जोखीम
दोनच दिवसात मिळाला तगडा रिटर्न
कोण आहेत NRI गुंतवणूकदार राजीव जैन? वाचा बातमी
मुंबई :
संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणारे आरोपी अटकेत
पोलिसांनी आतापर्यंत चौघांना अटक
चारही जणांना नऊ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
जगभरातील अनेक देशांनी लावल्या रांगा
या प्रिटिंग प्रेसमध्ये 18000 कर्मचारी करतात काम
नोटा छपाईसाठी 10 प्लँटमध्ये दररोज काम सुरु
अनेक देशाच्या अर्थसत्तेत आणि राजकीय सत्तेत थेट शिरकाव, वाचा बातमी
अदानी समूहाने घेतली फिनिक्स भरारी
समूहातील काही शेअर्सने घेतली उसळी
दोन तासांत संपत्तीत पडली 11 अंकी भर
अमेरिकेतील एका फर्मने केली मोठी गुंतवणूक, वाचा बातमी
नाशिक : कळवण पोलीस ठाण्यात करण्यात आला गुन्हा दाखल,
सीसीटीव्ही कॅमेरा वर चुना लावत दानपेटीतून काढले पैसे,
विश्वस्तांच्या मागणीनंतर 20दिवसांनी गुन्हा दाखल.
कळवण पोलीस ठाण्यात करण्यात आला गुन्हा दाखल
सीसीटीव्ही कॅमेरावर चुना लावत दानपेटीतून काढले पैसे
विश्वस्तांच्या मागणीनंतर 20 दिवसांनी गुन्हा दाखल
पुणे : पीएमपीचा गेल्या अनेक दिवसांपुर्वी बंद पडलेल्या ‘महिलादिनानिमित्त मोफत प्रवास’ हा उपक्रम आता पुन्हा सुरू,
त्यानुसार महिलांना आता तेजस्विनी बसमध्ये दरमहिन्याच्या 8 तारखेला दिवसभर मोफत प्रवास करता येणार,
त्यामुळे महिला प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण.
नाशिक
नाशिकच्या जेलरोड परिसरात आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
स्कूल व्हॅन मधून उतरून घरी जात असताना स्कूल व्हॅन ने चिरडले
स्कूल व्हॅनचा चालक गाडी रिव्हर्स घेताना घडली घटना
स्कूल व्हॅनच्या मागच्या टायर मध्ये आल्याने दुर्दैवी मृत्यू
सरकार विरोधात बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकलं जात आहे
जनतेला जागृत करण्याची वेळ आलीय
मला भाजपविरोधी नेत्यांनी साथ द्यावी
देश संविधानावर न चालता धर्मावर चालतोय
तुनिषा शर्मा प्रकरणातील मुख्य आरोपी शिझान खान याला दिलासा
गेल्या अडीच महिन्यापासून अभिनेता होता ठाणे मध्यवर्ती कारागृहात… वाचा सविस्तर
या सभेच्या तयारीसाठी ठाकरे गट सज्ज झाले आहेत
खेड तालुक्यामधील गोळीबार मैदानात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे
30 हजारहून अधिक कार्यकर्ते या सभेला हजेरी लावण्याचा अंदाज
मोठ्या संख्येने कार्यकर्ते हजर राहतील म्हणूनच गोळीबार मैदानात ही सभा घेण्यात आली आहे
गोळीबार मैदानाच्या सर्कलला हॅलोजन लावण्यात आले आहेत
संपूर्ण सभा ही विद्युत रोषणाईने होणार आहे
या सभेमध्ये गुहागर मतदारसंघातील बहुसंख्या कार्यकर्ते हे राष्ट्रवादीतून ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत
राष्ट्रवादीचे माजी आमदार संजयराव कदम हे देखील याच मेळाव्यात ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत
जळगाव : दररोज उठून कोणाला शिव्या घालतील कुणाला काय बोलतील
संजय राऊत बेछूट सुटलेले आहेत.
एक जागा जिंकली म्हणून फार मोठा तीर मारला असं समजण्याचं कारण नाही
येणाऱ्या निवडणुका पुढे आहे तिथे शिवसेना काय दिवे लावते हे त्यांनी दाखवावे
गिरीश महाजनांचा संजय राऊतांवर पलटवार
संगमनेर / अहमदनगर
कॉग्रेस नेते बाळासाहेब थोरात ऑन मविआ 200 जागा
मध्यंतरी एक सर्व्हे झाला
त्यात मविआ एकत्र लढली तर लोकसभेच्या 34 जागा निवडून येतील
कसबा हा भाजपचा बालेकिल्ला तरी तेथे धुळ खावी लागली
चिंचवड मध्ये जरी आमचा पराभव झाला असला तरी दोघे उमेदवार आमचे
दोघांच्या मताची बेरीज केली तर 25 हजाराने मविआचा विजय झाला असता
जनमत भाजप , शिंदे – फडणवीस सरकारच्या विरोधात त्याचे परिणाम दिसण्यास सुरूवात
ऑन शरद पवार ; देशात बदलाचे वारे
बदल हा निश्चित आहे
2024 सालामध्ये मोठे बदल संपूर्ण देशाच्या राजकारणात झालेले दिसतील
जे आता सुडाचे , दहशतीच वातावरण आहे
महागाई , बेरोजगारी वाढलीय
याचा एकत्र परिणाम 2024 मध्ये दिसेल
ऑन देशपांडे हल्ला
कोणावरही हल्ला झाला तर ते चुकीचं
त्यामुळे शांतता सुव्यवस्था बिघडली हे स्पष्ट दिसतंय
ऑन नाना पटोले
कॉग्रेस मध्ये काय अंतर्गत राजकारण आहे ?
जे तुम्ही प्रसिद्ध केलय तेच मला दिसतंय
कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दिल्ली कॉग्रेस नेत्यांच्या भेटीवर थोरातांची प्रतिक्रिया
ऑन राज्य सरकार
सरकारमध्ये शेतक-यांच प्रतिनीधी कोण अशी म्हणण्याची वेळ आलीय
परिणामत: ही अवस्था आहे
शेतक-यांचे दुख : जाणून कोण घेणार ?
भाषण मोठी करतात , त्यांची सुंदर भाषणे ऐकावेत
भाषण करून पोट भरत नाही वस्तुस्थितीमध्ये नेमक काय अशी अपेक्षा आम्ही करत आहोत
ऑन आंदोलन
आंदोलनाच्या माध्यमातुन शेतक-यांनी असंतोष व्यक्त केलाय
कांदा कवडीमोल झालाय…सरकारने पाठीशी उभ रहायला हवं
आमची ही मागणी
अहमदनगर
कांद्याचे भाव कोसळल्याने राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचं रस्ता रोको आंदोलन
तर निवेदन घेण्यासाठी तहसीलदार किंवा प्रांत येत नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही
कांद्याच्या दरावरून लंके आक्रमक, लाठीचार्ज झाला तरी चालेल मात्र रस्त्यावरून उठणार नाही
नगर – पुणे महामार्गावर सुपा चौकात आंदोलन
गेल्या अर्ध्यातासापासून आंदोलन सुरू असल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प
रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा
8 ते 11 मार्चपर्यंत त्यांचा हा दौरा असणार आहे
या दौऱ्यामुळे दोन्ही देशांचे मैत्रीपूर्ण संबंध वाढणार
अंथोनी हे पहिल्यांदाच भारताच्या दौऱ्यावर येत आहेत
परराष्ट्र मंत्रालयाकडून या दौऱ्याची जय्यत अशी तयारी सुरू
कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू
मोदी सरकारने दिली होळीपूर्वीच भेट
भाजप सरकार जुनी पेन्शन योजनेसाठी प्रतिकूल
पण केंद्र सरकार या कर्मचाऱ्यांना पावले, वाचा बातमी
डोंबिवली
विद्युत पोलावर एका अज्ञात इसमाने गळफास लावून केली आत्महत्या
डोंबिवली स्टेशन परिसरातील धक्कादायक घटना
कल्याण नंतर डोंबिवली स्टेशन परिसरात आत्महत्य
स्टेशन परिसरात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
कोल्हापुरात झळकले धिस इस धंगेकर चे पोस्टर
महाविकास आघाडीने ताराराणी चौकात लावला बॅनर
मंत्री चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरात महाविकास आघाडी कडून बॅनरद्वारे प्रत्युत्तर
स्वतःला गिरणी कामगाराचा मुलगा बनवणाऱ्या चंद्रकांत दादांनी धंगेकरांना मात्र तुच्छ लेखल
महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांचा संताप
कसबा पोटनिवडणुकीत हू इस धंगेकर असा चंद्रकांत दादांनी केला होता सवाल
चंद्रकांत दादांच्या होम ग्राउंड वरच महाविकास आघाडी कडून झालेल्या बॅनरबाजी ने चर्चाना उधाण
आठवडाभरात सोने झाले इतके स्वस्त
चांदीच्या किंमतीत किलोमागे मोठी घसरण
आठवड्यात सोने-चांदीच्या किंमतीत चढउतार
उच्चांकी किंमतींपेक्षा इतक्या कमी झाल्या किंमती, वाचा बातमी
ठाणे : ३ महिने प्रायोगिक तत्वावर सुरू होती ई रिक्षा,
सर्वोच्च न्यायालयाने दिले होते ई रिक्षा चालवण्याचे निर्देश,
माथेरानकरांची मात्र ई रिक्षा सुरू ठेवण्याची मागणी.
संगमनेर / अहमदनगर
कांदा आणि विजप्रश्नी महाविकास आघाडीच आक्रमक….
संगमनेर बस स्थानक येथे ठिय्या आंदोलन करत निदर्शनं..
कांद्याला हमीभाव मिळावा , शेतक-यांची विज तोड बंद करावी अशा विविध मागण्यांसदर्भात आंदोलन…
डॉ.जयश्री थोरात आंदोलनात सहभागी…
थोडयाच वेळात कॉग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे देखील आंदोलनात होणार सहभागी…
नाशिक – पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणार…
केवळ 10 रुपयांच्या गुंतवणुकीतून होईल मोठा फायदा
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक करेल मालामाल
SIP च्या माध्यमातून दीर्घकालीन गुंतवणुकीतून लक्ष्य होईल साध्य
एक कप चहा सोडा आणि श्रीमंत व्हा, वाचा बातमी
अनेकांची फसवणुक करणाऱ्या पंकज मेहाडीयाच्या घराचीही झाडाझडती
नागपुरात आर संदेश ग्रुपवर ईडीचं धाडसत्र
रामदेव उर्फ रम्मु अग्रवाल यांचा घर आणि कार्यालयावर काल सकाळी ईडीची छापेमारी
आर संदेश ग्रुपचे बांधकाम आणि औषध यासह अनेक क्षेत्रात गुंतवणूक
नागपूरातील अनेक स्टील, लोहा, उद्योगातील गुंतवणूकदार ईडीच्या रडारवर
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर काय झाला परिणाम
काही शहरात भावात किंचित वाढ
कर कपातीचा चर्चा पुन्हा थंड बस्त्यात
मार्च महिन्यात केंद्र सरकार देणार का दिलासा? वाचा बातमी
लहान मुलीचा फोटो शेअर केल्याने कारवाईची मागणी
मनिष सिसोदिया यांच्या अटकेनंतर भाजपवर टिका करताना संजय राऊत यांनी लहान मुलीचा फोटो शेअर केल्याचा आरोच
यवतमाळ जिल्ह्यातील वणीत मनसेच्या वतीनं टायर जाळत तीव्र आंदोलन
संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ विदर्भातील मनसेचा गड असलेल्या वणीत आंदोलन
आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी
मनसेचे नेते राजू उंबरकर यांच्या नेतृत्त्वात मनसैनिकांचं विदर्भात ठिकठिकाणी आंदोलन
पोलिसांनी मनसेच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं
संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याचे पडसाद विदर्भातही दिसून आले
होळी आणि धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही गैरप्रकार होऊ नये म्हणून पोलीस ॲक्शन मोडवर
नागपूर शहरात ६ ते ८ मार्चदरम्यान ४० ठिकाणी बंदोबस्त
होळीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह तपासणीची कारवाई मोहीम
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुख्य चौकात पोलीस नाकाबंदी मोहीम राबविणार
शाळकरी मुला-मुलींचे वसतिगृह, महिलांच्या वसतिगृहाजवळ फिक्स पॉईंट, या परिसरात पोलीस सलग गस्त करणार
पुणे
पुण्यात आठ मार्चपासून तेजस्विनी बस सेवा होणार सुरू
प्रत्येक महिन्याच्या आठ तारखेला महिलांना दिला जाणार मोफत प्रवास
महिला दिनापासून पुणे महानगर परिवहन महामंडळाचा उपक्रम
23 मार्गांवर धावणार 28 तेजस्विनी बसेस
डोपिंग चाचणीत पॉझिटिव्ह आल्याने नाडाने घातली तीन वर्षांची बंदी
निकिता ही नागपूरातील तिसरी खेळाडू, जिच्यावर डोपिंगविरोधी कारवाई करण्यात आलीय
नुकतेच NADA ने धावपटूच्या लघवीचा नमुना घेऊन त्याची तपासणी केली
निकिताने प्रतिबंधित अॅनाबॉलिक स्टिरॉइड घेतल्याचे तपासणीत आढळून आले
हा पदार्थ स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी वापरला जातो
रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर नाडाने निकितावर तीन वर्षांची बंदी घातली
छत्रपती संभाजीनगरमधील समृद्धी महामार्गावर फतियाबाद परिसरात भीषण अपघात
केमिकलने भरलेला ट्रक पुलावरून खाली कोसळला
ट्रक पुलावरून कोसळताच ट्रकला भीषण आग
आगीत केमिकलचा ट्रक पूर्णपणे जळून खाक
ट्रकमधील ड्रायव्हरसह सर्वांचा जळून मृत्यू झाला
केमिकल ट्रक असल्यामुळे आग विझवण्यात अग्निशमनदलाला अपयश आले
ट्रकमधील ड्रायव्हरसह इतरांना वाचवण्यातही अपयश आले
ट्रक अपघातात नेमका किती जणांचा मृत्यू झाला याचा आकडा अस्पष्ट
मध्यरात्री उशिरा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला
एमआयएमच्या आंदोलनाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वाक्षरी मोहीम आंदोलन
औरंगाबादच्या टीव्ही सेंटर चौकात मनसे करणार स्वाक्षरी मोहीम आंदोलन
दुपारी 12 वाजता टीव्ही सेंटर चौकात आंदोलनाला होणार सुरुवात
संभाजीनगर शहराच्या सन्मानासाठी मनसे करणारा स्वाक्षरी मोहीम आंदोलन
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 7 मार्चला दारुविक्री बंद
नागपूरचे जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांनी जारी केला आदेश
पोलीसांच्या आकडेवारीनुसार धुळवडच्या दिवशी अनेक गुन्हे घडतात
त्यामुळे पोलीस विभागाच्या विनंतीवरुन नागपूर जिल्हयात धुळवडीच्या दिवशी दारुविक्री बंद
खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत होणार साखळी उपोषण आंदोलन
बेमुदत सुरू राहणार साखळी उपोषण आंदोलन
आज सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला होणार सुरुवात
एमआयएमचे हजारो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता
देशात जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात 34 वाघांचा मृत्यू
मध्य प्रदेशामध्ये वाघाचे सर्वाधिक मृत्यू, त्यापाठोपाठ चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचे सर्वाधिक मृत्यू
जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यात 6 वाघांचा मृत्यू
वाघाचे वाढते मृत्यू चिंतानजक, यावर तातडीने उपाययोजना गरजेची
जगात सर्वाधिक वाघ भारतात, भारतात वाघांची संख्या 2 हजार 967
भंडारा : गोसेखुर्दचे पाणी पोहोचले घोडेझरी व खराशी तलावात.
33 वर्षांच्या कार्यकाळानंतर वर्षांनंतर पाणी मिळाल्याने परिसरात आनंद व्यक्त होत आहे.
नेरला लिफ्ट अंतर्गत मुख्य कालवा 43.80 किलोमीटरचा तयार करण्यात आला.
12 पैकी 3 पंप सुरू करण्यात आले आहेत.दरम्यान हे फक्त प्रायोगीत तत्वावर सूरु असून वितरीकैचे काम पूर्ण झाल्यावर पुढील वर्षी पासून पाणी मिळणार आहे. त्यामुळे या भागातील शेती आता सुजलाम सुफलाम होणार आहे.
काल झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे आज पत्रकार परिषद घेणार
संदीप देशपांडे कोणता गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचं लक्ष
देशपांडे यांच्या हल्ल्याप्रकरणी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्याची मनसेने मागणी केली आहे
त्यामुळे संदीप देशपांडे आज कुणावर आरोप करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे
त्रिपुरातील मुख्यमंत्रीपदासाठी माणिक साहा आणि प्रतिमा भोमिक यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे
माणिक साहा हे विद्यमान मुख्यमंत्री आहेत, तर प्रतिमा भौमिक या केंद्रीय मंत्री आहेत
दोन दिवसात भाजपची संसदीय दलाची बैठक होणार, त्यात मुख्यमंत्रीपदाची निवड केली जाणार
जीवघेणा हल्ला करून चोऱ्या वाढल्या
तालुका पोलिसांच्या कार्यक्षमतेवर ग्रामीण भागातील नागरिकांनी उभे केले प्रश्न चिन्ह
ठोस कारवाई व्हावी यासाठी अपर पोलीस अधीक्षकांना निवेदन
हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद
राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण
3 मार्च रोजीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाले होते
तथापि, या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही
यामुळे इयत्ता 12 वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे