मुंबई : आज 10 नोव्हेंबर 2022. काल (9 नोव्हेंबर 2022) बुधवारी रोजी शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना अखेर जामीन मिळाला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने अटक केल्यानंतर तब्बल 102 दिवसांनंतर संजय राऊत हे न्यायालयीन कोठडीतून बाहेर आले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackereay) गटाने बुधवारी जल्लोष साजरा केला होता. दरम्यान, आजपासून संजय राऊत पुन्हा एकदा सक्रिय होताना नेमकी काय वक्तव्य करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे आज टी-20 वर्ल्ड कपची दुसरी सेमीफायनल मॅच होणार आहे. पहिली सेमीफायनल पाकिस्तानने जिंकली. त्यानंतर आज भारत विरुद्ध इंग्लड (IND vs ENG Live) सामना होणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारतं, याकडेही सगळ्यांचं लक्ष असणार आहे. तर भारत जोडो यात्रेचा आजचा चौथा दिवस असून राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पदयात्रेवरही सगळ्यांची नजर आहे. दिवसभरातील सर्व महत्त्वपूर्ण घडामोडींचा आणि लाईव्ह अपडेट्सचा आढावा या ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
Marathi News LIVE Update
राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदा शेतकऱ्यांवर कर लावण्यात आला
शेती अवजारे, खते यांच्यावर पहिल्यांदा कर वाढवण्यात आला
केंद्र सरकारच्या धोरणांवर राहुल गांधींचे टीकास्त्र
नांदेडमध्ये भारत जोडो यात्रेतंर्गत जाहीर सभा
Marathi News LIVE Update
उद्धव ठाकरे यांना आरोप करण्याची सवय
देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
ठाकरेंनी त्यांच्या अंतर्मनात पहावं उत्तरे मिळतील
फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
Marathi News LIVE Update
मंत्री संदिपान भुमरेंविरोधात तरुणाची पोलीस ठाण्यात धाव
सोशल मीडियावरील पोस्टमुळे धमकी दिल्याचा आरोप
युवराज चौरे असे तरुणाचे नाव, धमकावल्याचा केला आरोप
मंत्री संदिपान भुमरेंविरोधात तरुणाची पोलिसात तक्रार
Marathi News LIVE Update
अफजल खानाच्या कबरी जवळील अतिक्रमण काढण्याचा निर्णय स्वागतार्ह
छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारच्या निर्णयाचे केले स्वागत
विशालगड, लोहगड यासह इतर गडावरील अतिक्रमण काढण्याची केली मागणी
अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे काढण्याची कारवाई जलद करावी-संभाजीराजे
अफजलखानाच्या कबरी जवळील अतिक्रमण काढण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. याबरोबरच, विशाळगड, लोहगड अशा इतरही अनेक गडांवर झालेली अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे जलद कार्यवाही करत सरकारने काढून टाकावीत.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) November 10, 2022
Marathi News LIVE Update
आता गुंतवणुकीसाठी Green Bond
गुंतवणूकदारांना मिळेल चांगला परतावा
पर्यावरण पूरक कामामध्ये गुंतवा पैसा
केंद्र सरकारने बजेटमध्ये केली होती घोषणा
Marathi News LIVE Update
संजय राऊत यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक
राऊतांनी केले देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक
फडणवीसच राज्य चालवितात, इतर भटकतात
राऊतांची शिंदे गटावर जोरदार टोलेबाजी
Marathi News LIVE Update
भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये
राष्ट्रवादीचे नेते भारत जोडो यात्रेत
राहुल गांधी यांची आज जाहीर सभा
राष्ट्रवादीचे अनेक नेते यात्रेत सहभागी
समता पार्टीकडून निवडणूक आयोगाकडे माहिती अधिकार अंतर्गत अर्ज दाखल
ठाकरे गटाला चिन्ह कुठल्या आधारे दिलं? समता पार्टीचा निवडणूक आयोगाकडे अर्ज
निवडणूक आयोगाकडून समता पार्टीला काहीच उत्तर नाही, सूत्रांची माहिती
समता पार्टी निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार
मशाल चिन्ह गोठवावे, समता पार्टीची सर्वोच्च न्यायालयात मागणी
सुप्रिया सुळे प्रकरणानंतर जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू
सुभेदारी विश्रामगृहात शेकडों कार्यकर्त्यांनी केले सत्तारांचे जंगी स्वागत
एकीकडे सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी तर दुसरीकडे कार्यकर्त्यांची तुफान गर्दी
उद्या मी स्वतः रत्नागिरीला स्टेटमेंट देण्यासाठी जाणार आहे
माझ्या तक्रारीच्या आधारावरती परवा एफआयआर झाली
केंद्र सरकारने जी तक्रार केली होती त्यावर दापोली कोर्टाने अनिल परब यांच्या विरोधात समन्स काढला
14 तारखेला रिसॉर्ट तोडण्याचं कामाला प्रारंभ होणार, उद्या टेंडर भरण्याची शेवटची तारीख आहे.
पुन्हा फुटली जलवाहिनी
उंबरदे गावाजवळ हजारो लिटर पाण्याची वाया
शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत
नागरिकांकडून संताप व्यक्त
सुप्रीम कोर्टातील ओबीसी आरक्षणावरील सुनावणी लांबणीवर
17 नोव्हेंबरला होणार पुढील सुनावणी
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकातील ओबीसी आरक्षणावरील सुनावणी पुढे
‘बाजीप्रभू देशपांडे असते तर राज ठाकरेंचा कडेलोट केला असता’
इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटेंची राज ठाकरेंवर घणाघाती टीका
हर हर महादेव चित्रपटात शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडेंची बदनामी- कोकाटे
हर हर महादेव चित्रपटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंदी घालावी- कोकाटे
‘नोटाबंदीचा कोणताही फायदा झाला नाही’
राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य
देशातून भ्रष्टाचार जाणार असल्यास आनंदच- सुप्रिया सुळे
बेरोजगारी आणि महागाई प्रचंड वाढलीय- सुळे
इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलरने टॉस जिंकून पहिली फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज मार्क वुड दुखापतीमुळे या मॅचमध्ये खेळत नाहीय. डेविड मलानही फिटनेसमध्ये अपयशी ठरला. मार्क वुड, डेविड मलानच्या जागी फिल सॉल्ट आणि ख्रिस जॉर्डनचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय.
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची पत्रकार परिषद लाईव
उद्धव ठाकरे यांचा केंद्र सरकारवर जोरदार निशाणा
‘तपास यंत्रणा केंद्राच्या पाळीव प्राण्यांप्रमाणे वागत आहेत’
उद्धव ठाकरे यांची भाजपवर घणाघाती टीका
संजय राऊत यांच्या धाडसाचं कौतुक आहे- उद्धव ठाकरे
पळून गेलेल्यांना न्यायालयानं काल धडा दिलाय- ठाकरे
टॉस जिंकून इंग्लंडचा फलंदाजीचा निर्णय
भारत आणि इंग्लंड आज सेमीफायनलमध्ये भिडणार
फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी टीम इंडियाचा इंग्लंडशी महामुकाबला
फायनलच तिकीट मिळाल्यास पुन्हा भारत-पाकिस्तान थरार रंगणार
थोड्याच वेळात उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांची पत्रकार परिषद
संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल
मातोश्रीवर पोहोचताच आदित्य ठाकरे-संजय राऊतांची गळाभेट
आदित्य ठाकरेंनी मिठी मारत संजय राऊतांचं केलं स्वागत
मातोश्रीवर राऊतांच्या स्वागतासाठी आदित्य ठाकरेंची हजेरी
संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची गळाभेट
संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल
सातारा – कराडमध्ये तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न
यशवंतराव मोहिते पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या ठेवीदारांचा आत्मदहनाचा प्रयत्न
संस्थापक इंद्रजित मोहिते यांच्या घरासमोर घोषणा देत अंगावर रॉकेल ओतून घेतले
यशवंतराव मोहिते पतसंस्थेत ठेवी अडकल्यानं ठेवीदार अडचणीत
संतप्त ठेवीदारांना घेतले पोलिसांनी ताब्यात
संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट होणार
शरद पवारांची देखील भेट घेणार संजय राऊत
सामना कार्यालयाला देखील देणार भेट
औरंगाबाद : मालवाहू ट्रकला भीषण आग
चालू ट्रकला बीड बायपास परिसरात लागली भीषण आग
ट्रकमध्ये माल असतानाच अचानक पेट घेतल्यानं खळबळ
अग्निशमन दल घटनास्थळी,आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु
आगीत ट्रक पूर्णपणे जळून खाक, तर लाखो रुपयांच्या मालाचे नुकसान
मिरारोड : काशीमीरा परिसरात महाजनवाडी रहिवासी वस्तीजवळ आढळला बिबट्या
जंगलातील झाडावर बिबट्या बसलेला असल्याचं कॅमेऱ्यात कैद
परिसरात बिबट्याचा वावर असल्यानं लोकांमध्ये भीती
बरखास्त महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेतील रामदास तडस गटाला मोठा दणका
बाळासाहेब लांडगे यांना सरचिटणीस म्हणून पूर्ण अधिकार बहाल
मुंबई हायकोर्टाचा रामदास तडस गटाला मोठा दणका
कोर्टाच्या निर्णयामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याचा मार्ग मोकळा
रामदास तडस गटाला कोणतेही अधिकार नसतील
परभणी जिल्ह्यातील 9 तालुक्यात 128 ग्रामपंचायतीसाठी राज्य निवडणुक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर
सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने या निवडणुकीत मातब्बरांसह नवखे उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरणार
18 डिसेंबर रोजी मतदान, 20 डिसेंबर रोजी मतमोजणी
परभणी तालुक्यातील 29, गंगाखेड 13, जिंतूर 33, मानवत 8, पालम 11, पाथरी 7, पुर्णा 13, सेलू 11, सोनपेठ 03 ग्रामपंचायतीचा समावेश
सत्तासंघर्षानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात होणाऱ्या या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेत
नागपूर – हिवाळी अधिवेशनासाठी मंत्र्यांच्या बंगल्याची डागडुजी सुरु
नागपुरातील रवीनगर परिसरातील बंगल्यांची रंगरंगोटीही झाली सुरु
19 डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची तयारी जोरात
यावर्षी अधिवेशनावर 98 कोटींवर खर्च येणार, 30 कोटी रुपयांनी खर्च वाढला
2019 मध्ये झालेल्या अधिवेशनाच्या तयारीवर एकूण 68 कोटी रुपये खर्च झाले होते
नागपुरात 10 डिसेंबरपासून विधिमंडळ सचिवालयाच्या कामकाजाला होणार सुरुवात
तीन वर्षानंतर नागपुरात होणार हिवाळी अधिवेशन
गोवंडीच्या रफी नगर मध्ये 48 तासांत एकाच कुटूंबातील 3 मुलांचा गेला बळी,
बीएमसीने 914 घरांचा केला सर्वे, 4,086 लोकांची केली स्क्रीनिंग
13 संशयितांना ताप आणि खरूज सारखे लक्षण आढळली
हा रोग इतर वार्डातही पर्यंत असल्याची कार्यकारी स्वास्थ्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांची माहिती
मुंबई महापालिका अॅलर्ट मोडवर
अतिक्रमण नव्हे, कबरच काढा- आनंद दवे
हिंदी महासंघाचे आनंद अध्यक्ष दवे यांची मागणी
प्रतापगडावरील अफझल खानाच्या कबरीवरुन राजकारण पुन्हा तापलं
कबरीजवळील अनधिकृत बांधकामवरील कारवाईला सुरुवात
‘कबरीसाठी जागा देण्यामागील महाराजांची मते काही वेगळी असतील, पण स्वराज्याच्या शत्रूला या भूमीत जागाच असता कामा नये’
हिंदी महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांचं वक्तव्य
गुजरात विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता
यादीत 100 पेक्षा जास्त उमेदवारांची नावं घोषित केली जाण्याचा अंदाज
संजय राऊत यांच्या जामिनाला स्थगिती देण्याच्या ईडीच्या याचिकेवर आज सुनावणी
पत्राचाळप्रकरणी राऊतांची 102 दिवसानंतर जामिनावर सुटका
ईडीच्या याचिकेवरील सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष
सातारा : अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवणार
प्रतापगडाच्या पायथ्याजवळ अफजल खानाची कबर
स्थानिक प्रशासन जेसीबीच्या सहाय्यानं अनधिकृत बांधकाम पाडणार
थोड्याच वेळात कबरीजवळील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरूवात होणार
अफजल खानाच्या कबरीच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात